चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.
हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.
हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.
ऊगाच दाढीवाल्याचे समर्थन करायच्या नादात हवेत लाथा नको.श्री श्री १८८ च्या पावलांवर मार्गक्रमणा सुरू आहे, हे नमूद करू इच्छितो.पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला जानेवारीतच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी निधी दिल्याची आठवण भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना आताच कशी झाली?, एवढे दिवस ते काय झोपा काढत होते का?, असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारले आहेत.काय हा मूर्खपणा! मुळात प्रसाद लाड किंवा इतर कोणीही राज्य सरकारला आठवण करून द्यायची गरज काय? म्हणजे यांनी वेळेवर आठवण करून दिली नाही म्हणून आम्ही प्राणवायू प्रकल्प उभारले नाही असलं भिकार तर्कशास्त्र लावलं जातंय. जसं काही यांना जानेवारीत आठवण करून दिली असती तर यांनी एव्हाना महाराष्ट्रात हजारो प्राणवायू प्रकल्प उभारले असते. स्वतः अत्यंत नाकर्तेपणा केला, निष्क्रीयपणे घरात बसून राहिले, संपूर्ण वेळ फक्त खंडणी गोळा करण्यासाठी आणि मोदींना शिवीगाळ करण्यासाठी वापरला याची ना लाज ना खंत. वेळेवर व पुरेसा अभ्यास न केल्याने एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला व मला अभ्यास करायला आधीच का सांगितले नाही असे सांगून त्याने पालकांनाच दोष देणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच हास्यास्पद आपल्या नाकर्तेपणासाठी भाजपला दोष देणे आहे.केंद्राच्या पैशाशिवाय बांधणार नाही असे राज्य सरकारचे कोण म्हणल आहे ?मग बांधायला कोणी अडविले होते? खालील ट्विट पुरेसं बोलकं आहे. हे महाराष्ट्राने का केले नाही? केंद्राने २१ ऑक्टोबर २०२० ला याविषयी राज्यांकडून निविदा मागविल्या होत्या. आसामने त्याचा फायदा घेतला. ६ महिने उलटल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र हे का करू शकला नाही?