चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.
हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.
हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.
🗣 चर्चा
(276)
क
कॉमी
Tue, 04/27/2021 - 05:49
नवीन
कसं काय ? कोणते अतिरेकी, काय प्रतिवाद ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 04/27/2021 - 05:58
नवीन
चिनी सैन्याला मुक्तीसेना म्हणणारे, चीनने भारतावर केलेला हल्ला हे आक्रमण आहे का अतिक्रमण यावरच निर्रथक काथ्याकूट करणारे, चीनचा निषेध न करणारे साम्यवादी आणि देशासाठी प्राणार्पण करणारे हुतात्मा भगतसिंग यांच्यात काहीच फरक नाही का? मुळात ९० वर्षांपूर्वी साम्यवाद व साम्यवादी यांचा जगात कितपत प्रभाव होता? आपल्या २३ वर्षांच्या अल्प आयुष्यात भगतसिंगांनी साम्यवाद कितपत अंगिकारला होता?
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 04/27/2021 - 06:16
नवीन
असे म्हणतात की वयाच्या विसाव्या वर्षी तुम्ही साम्यवादी नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी पण साम्यवादीच असाल तर तुम्हाला डोकं नाही. भगतसिंग फासावर गेले तेव्हा त्यांचे वय होते २३. म्हणजे ते त्या स्वप्नाळू वयातले होते. त्यामुळे साम्यवादी विचारसरणी त्यांना आणि अनेक क्रांतिकारकांना आकर्षित करत होती हे काही अंशी समजता येते.
दुसरे म्हणजे भगतसिंग फाशी गेले १९३१ मध्ये. रशियात साम्यवादी राजवट येऊन तेव्हा १०-१२ वर्षेच झाली होती. साम्यवादाचा नक्की दुष्परिणाम किती आणि कसा होतो हे त्यावेळी माहित नव्हते. रशियातून बातम्या बाहेर येणे तितके सोपे नव्हते आणि अर्थातच तेव्हा गुगल नव्हते. नंतरच्या काळात याच साम्यवादी राजवटीने रशियात तर कत्तली केल्याच पण त्यानंतर चीन, पूर्व युरोप, क्युबा वगैरे अनेक ठिकाणी तेच केले. अशा परिस्थितीत भगतसिंग हयात असते तर त्यांनी त्याच विचारसरणीला समर्थन दिले असते असे वाटत नाही. अर्थातच या सगळ्या जर-तरच्या गोष्टी. नक्की काय झाले असते या सगळ्या आपल्या कल्पना. पण ही सगळी पार्श्वभूमी माहित झाल्यावरही त्याच विचारसरणीला पाठिंबा देणे भगतसिंगांनी चालूच ठेवले असते तर माझ्यासारख्यांनी त्यांनाही विरोधच केला असता. इंग्रजांचे राज्य जाऊन त्यापेक्षा कितीतरी अधिक खुनशी कम्युनिस्टांची राजवट येणे व्यक्तिशः मला तरी कधीच आवडले नसते.
तेव्हा भगतसिंगांच्या हौतात्म्याविषयी आदर ठेऊन म्हणतो की त्यांची विचारसरणी मला तरी कधीच आवडली नाही आणि आवडणारही नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 04/27/2021 - 06:27
नवीन
साम्यवादी लोकांना, नाॅर्थ कोरिया मध्ये, दोन चार वर्षे ट्रेनिंगला पाठवावे ...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 04/27/2021 - 06:47
नवीन
कम्युनिस्ट सरकारचा नागरिकांच्या प्रत्येक- अगदी लहानसहान गोष्टीतही कसा आणि किती हस्तक्षेप असतो त्याचे एक उदाहरण म्हणजे उत्तर कोरियातील केसांविषयीचे नियम. एखाद्याला समजा वाटले की हिप्पी हेअरकट करू, व्हिनस विल्यम्सप्रमाणे केसांचे मणी करू, साळींदरासारखे टोकदार केस ठेऊ, बाबा रामरहिमसारखी मोठी दाढी ठेऊ तर ते उत्तर कोरियात चालत नाही. केसांना रंग लावलेला चालत नाही. सरकारने काही प्रकारच्या 'अधिकृत हेअरस्टाईल्स' ठरवून दिल्या आहेत. त्याप्रमाणेच सगळ्यांना त्यांचे केस ठेवायला लागतात.
(संदर्भः http://newsfeed.time.com/wp-content/uploads/sites/9/2013/02/ap995892236224.jpg)
(संदर्भः https://newsfeed.time.com/wp-content/uploads/sites/9/2013/02/ap107251477025.jpg?w=720&h=480&crop=1)
त्यापेक्षा वेगळी 'हेअरस्टाईल' ठेवलेल्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करायलाही सुरवात केली. https://www.telegraph.co.uk/news/2018/08/17/north-korean-fashion-police-crack-banned-haircuts/
उत्तर कोरियात नक्की कायकाय चालत नाही याविषयी अधिक https://brightside.me/wonder-curiosities/16-things-that-are-prohibited-in-north-korea-403760/ वर. उत्तर कोरियातील लोकांना परदेशी जायची परवानगी नाही. इतकेच नाही तर सॅनिटरी पॅड्स सुध्दा अमुक एका प्रकारचेच असावेत हे सरकारचे बंधन. असे असतानाही एकीकडे स्त्रियांचे हक्क, स्त्रियांचे अधिकार वगैरे गोष्टींवर उच्चरवाने बोलणार्या अनेकांना तीच कम्युनिस्ट विचारसरणी आपली वाटते.
असे काही निदर्शनास आणून दिले की 'but it was not real communism' हे नेहमीचे पालुपद असतेच. सत्य परिस्थिती अशी आहे की कम्युनिझम ही विचारसरणी मुळापासून फांद्यांपर्यंत पूर्ण गंडलेली आहे. प्रॉब्लेम हा अंमलबजावणीत नसून मुळातल्या विचारातच आहे. आपल्याच नागरिकांवर इतकी बंधने घालणारे सरकार लष्करशाहीच्या वरवंट्यामुळेच स्थिर राहू शकते. त्यामुळे जिथेजिथे कम्युनिस्ट राजवट असते तिथेतिथे हुकुमशाही आणि लष्करशाहीच दिसेल.
त्यामुळेच म्हणतो की कम्युनिझम ही विचारसरणी दोन प्रकारच्या लोकांनाच आकर्षित करू शकते. अमेरिकेतील हार्वर्ड आणि इंग्लंडमधील केंब्रिज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स वगैरे मोठ्या विद्यापीठांमधील ढुढ्ढाचार्य प्रोफेसर आणि कम्युनिझम ही नक्की काय चीज आहे याची पुसटशीही कल्पना नसलेले भाबडे लोक- जे समता वगैरे मोठेमोठे शब्द ऐकून वहावत जातात.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/27/2021 - 09:32
नवीन
+१
आवडले.
कम्युनिझम ही नक्की काय चीज आहे याची पुसटशीही कल्पना नसलेले भाबडे लोक- जे समता वगैरे मोठेमोठे शब्द ऐकून वहावत जातात.>>>>>
हे फक्त कम्युनिझमलाच लागू होत नाही. हेच आज भारतात ही पहायला मिळतेय. राष्ट्रहीत, अच्छेदिन ला भूलून अनेक भाबडे लोक लोक वहावत गेले आणी आज भारताची वाताहत झालेली पहायला मिळतेय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 04/27/2021 - 09:43
नवीन
सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण करणे.
निवृत्त नौसैनिकाला मारहाण करणे.
ह्या बाबतीत, ही काही टक्के जनता मौनच बाळगून असते.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/27/2021 - 09:52
नवीन
बंगालातील सभा.
योगाच्या राज्यातील गुंडगीरी
पी एम केअर चा हिशेब
ह्यावर काही टक्के जनता मौनच बाळगून असते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 04/27/2021 - 15:21
नवीन
बंगालातील सभा.... कॉंग्रेसने पण घेतल्या
योगाच्या राज्यातील गुंडगीरी .... मुख्तार अन्सारी बद्दल वाचले असेलच
पी एम केअर चा हिशेब ... हा तर कॉंग्रेसनेच तयार केला आहे ....
अशा वेळी, काही टक्के जनता मौन पाळणारच...
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Tue, 04/27/2021 - 15:36
नवीन
PM Care ची स्थापना तर बिजेपीने केली आहे. त्यात काँग्रेसचा काय संबंध?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 04/27/2021 - 16:30
नवीन
हे फक्त कम्युनिझमलाच लागू होत नाही. हेच आज भारतात ही पहायला मिळतेय.
कम्युनिझम बद्दल वाचन वाढवा.
उगाच हत्ती आणि चिचुंद्री ची तुलना करू नका
- Log in or register to post comments
क
कॉमी
Tue, 04/27/2021 - 06:49
नवीन
भगतसिंघांनी साम्यवाद कितपत अंगिकारला होता ?
दोन पातळींवर सांगतो.
१. वरवरची- ते सहकार्यांना कॉम्रेड म्हणायचे आणि पत्राखाली लॉंग लिव्ह रिव्हॉल्युशन अशी सही करायचे.
२. खोलात- लाहोर कटाच्या सूनवाईमध्ये आरोपी लाल स्कर्फ घालून आले होते. आल्यावर त्यांनी "Long live socialist revolution, long live communist international, long live people, Lenin's name will never die, down with imperialism" अश्या आरोळ्या दिल्या. त्यानंतर शाहीद भगत सिंघांनी एक तार वाचून दाखबली आणि मॅजिस्ट्रेटला ती थर्ड इंटरनॅशनल, बोल्शेविकांची संस्था, हिला पाठवण्यास सांगितले. ते टेक्स्ट खाली देईन. भगत सिंग पक्के रिव्हॅल्युशनरी होते हे त्यांचे जवळपास कुठलेही साहित्य वाचले तरी कळेल. त्यांनी जेलमध्ये सोशलिझमचे आयडियल्स असा ग्रंथ लिहिला होता, त्यांच्या कॉम्रेड्सना पोलिसांच्या भीतीने जाळून टाकावा लागला.
श्री गुरुजी, भगत सिंघांची सगळी मते तुम्हाला मान्य असावी असा नक्कीच आग्रह नाही. पण उगाचच ते रिव्हॉल्युशनरी होते याकडे मान वळवू नये. जे आहे ते मान्य करावे.
हा प्रतिसाद भगतसिंग कॉम्युनिस्ट होते मग तुम्हीबी व्हा असा नाही. तो कॉन्सर्व्हेटिव्ह तर्क आहे, आपल्याला नाही पटत. हे डेड communist वाल्यांसाठी लिहिले आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 04/27/2021 - 09:54
नवीन
वयाच्या २३ व्या वर्षी असलेली मते व आवडणारी विचारसरणी उत्तर आयुष्यात टिकेलच असे नाही. मी शिकत असताना मला हुकुमशाही, हिटलर, बाळ ठाकरे वगैरे बदल एक प्रकारचे फॅसिनेशन होते. भारतात फक्त हुकुमशाहीच हवी, लष्करी राजवट हवी असे माझे मत होते. परंतु कालांतराने हे सर्व आकर्षण ओसरले.
१९६२ मधील चीन युद्धाच्या काळात भगतसिंग असते तर त्यांनी नक्कीच चीनला विरोध केला असता. भगतसिंग शालेय, महाविद्यालयीन वयात असताना जगात सर्वप्रथम साम्यवादी राजवट रशियात आली. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भगतसिंगांना त्याचे आकर्षण वाटले असेल. परंतु कालांतराने साम्यवाद्यांनी क्रांती, तळागाळातील जनतेसाठी लढणे, जमीनदारी नष्ट करणे वगैरे विसरून जनतेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून फक्त सत्ता टिकविणे व त्यासाठी हुकुमशाही, अत्याचार, गळचेपी इ. चा वापर करणे एवढेच केल्याने भगतसिंग नक्कीच साम्यवाद विरोधी झाले असते.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Tue, 04/27/2021 - 10:40
नवीन
चीनला विरोध केला असता हे नक्की.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Mon, 04/26/2021 - 07:51
नवीन
लंगडे समर्थन नाही ... मार्मिक पोस्टर आहे..
आणि त्यातला संदेश मला मान्य आहे..
संदेश म्हणजे शब्दशः अर्थ नव्हे .. हे तुमच्या सारख्या हत्तीच्या व्यंगचित्राचे रसग्रहण करणाऱ्यांना वेगळे सांगायला नकोच
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Mon, 04/26/2021 - 07:59
नवीन
मग केरळ मधील ऑक्सिजनवर बहिष्कार घाला. चीनचे एकही उत्पादन वापरू नका, आपोआप मरतील ते.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 04/26/2021 - 08:06
नवीन
(हत्तीच्या व्यंगचित्राला समर्थन असल्यास) भारतातील कोणतीच वस्तु/सेवा/सुविधा वापरू नका. काय म्हणता?
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Mon, 04/26/2021 - 08:11
नवीन
त्यापेक्षा माहूत बदलू शकतो की?
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 04/26/2021 - 08:15
नवीन
?
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 04/26/2021 - 08:19
नवीन
मेलेला हत्ती, त्यावरील भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र जमीनीला लागलेले, याबद्दल काही बोलला नाहीत हे इंटरेस्टिंग आहे. :)
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 09:33
नवीन
निवडुन दिलेत दादा, जनतेने आणि पक्षाने!
विरोधी पक्ष व्हावा येवढे पण एक पक्षाचे निवडुन नाही आले.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 10:46
नवीन
बदला की.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 08:06
नवीन
उत्तर कोरीया पासुन सुरवात करु या का? :-)
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 04/26/2021 - 08:13
नवीन
ज्या विचारसरणीने पूर्ण जगात लाखो लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले, सामान्य माणसाचे जीणे मुश्किल करून टाकले असल्या कुजलेल्या विचारसरणीला मोठ्या विद्यापीठांमधले ढुढ्ढाचार्य प्रोफेसर आणि कम्युनिझम म्हणजे नक्की काय चीज आहे याची पुसटशीही कल्पना नसलेले भाबडे लोक सोडले तर डोके ठिकाणावर असलेला कोणीही समर्थन देणार नाही. हिटलरपेक्षा जास्त लोकांचे बळी या हलकटांनी जगभरात घेतले आहेत. मागे एकदा एका फेसबुक ग्रुपवर कोणीतरी प्रश्न विचारला होता- कोणत्या साथीने जगात सर्वात जास्त बळी घेतले आहेत? त्यावर कोणी उत्तर दिले प्लेग, कोणी म्हटले कॉलरा तर कोणी आणखी काही म्हटले. या प्रश्नाला माझे उत्तर होते कम्युनिझम. याचे कारण इतर सगळे रोग शरीराचे असतात. औषध वापरून ते जंतू मारता येऊ शकतात. पण कम्युनिझम हा व्हायरस एकदा डोक्यात घुसला की तो बाहेर निघणे महाकर्मकठीण. आणि त्यातूनच लाखो लोकांना ठार मारायचे समर्थन होते किंवा असला व्हायरस घुसलेले लोक नेते झाले की ते स्वतः लाखो लोकांना ठार मारतात. आणि एकदा हे दुष्परिणाम पुढे आले की मग परत हे सगळे मोठे मोठे विचारवंत but it was not real communism असे परत परत समर्थन करत राहतात आणि काही वर्षांनी कुठेतरी असे रक्ताचे पाट परत वाहतात.
प्रोपोगांडा करण्यात या कम्युनिच लोकांचा हात कोणी धरू शकणार नाही. म्हणे क्युबात आरोग्यव्यवस्था उच्च दर्जाची होती. मग स्वतः फिडेल कॅस्ट्रोवर उपचार करायला स्पेनहून डॉक्टर का बोलावून घ्यायला लागला?https://www.nbcnews.com/id/wbna16346039 आणि क्युबा इतका स्वर्ग असेल तर त्या देशात जन्मलेले १०-१२% लोक अमेरिकेत का पळाले? हे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्या देशात एक अवैध घुसखोर म्हणून पण राहायला तयार झाले/होतात पण कम्युनिस्ट राजवट असलेला आपलाच देश त्यांना नकोसा झाला. आणि दरवेळी हा पलायन करणार्या सामान्यांचा (हेर वगैरे सोडून द्या) ओघ एकाच दिशेने असे- क्युबातून अमेरिकेत, पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत, उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात वगैरे. हे का हा साधा प्रश्न यांना पडत नाही आणि परत एकदा but it was not real communism असले गुडघ्यातले समर्थन हे फुकाचे विचारवंत करत असतात.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांना एकदा असाच एक क्युबन शरणार्थी म्हणाला की तुम्ही एका स्वतंत्र देशात जन्माला आलात म्हणून मला तुमचा हेवा वाटतो. त्यावर रेगन त्याला म्हणाले की तुला पळून जायला कुठलेतरी ठिकाण तरी होते म्हणून मला तुझा हेवा वाटतो. माझ्या देशात जर अशी दडपशाही करणारी राजवट सत्तेत आली तर मला पळून जायला दुसरे ठिकाणही राहणार नाही.
कम्युनिझम ही कुजलेली विचारसरणी म्हणजे मानवजातीला कलंक आहे हे माझे स्पष्ट मत आहे. जितक्या लवकर या विचारसरणीचे समूळ उच्चाटन होईल तितके चांगले. आणि माझे हे मत स्पष्ट आहे. त्यात कोणताही- अगदी कानामात्रावेलांटीचाही बदल करायची गरज मला वाटत नाही.
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Mon, 04/26/2021 - 09:22
नवीन
गुलामीची मानसिकता असलेली जनता नसत्या आवहानाना भुलते आणि कायमच दुखी होते..
सम्पत्तिचे समान वाटप असे आमिष दाखवणारे कायमस्वरुपी सत्तास्थानी रहातात आणि ऐशोआराम उपभोगतात
तरुण पिढी तर अश्या आमिषामागे लवकर जाते...
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 04/26/2021 - 09:24
नवीन
perhaps 100 million persons have been destroyed by the Communists;
the imperviousness of the Iron and Bamboo curtains prevents a more definitive figure."
https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_under_communist_regimes
केवळ वैचारिक मतभेदांसाठी १० कोटी स्वतःच्या देशातीलच लोक (स्वकीय) गेल्या १०० वर्षात कम्युनिस्टांनी ठार मारले आहेत.
त्या विचारसरणीचे कौतुक सोडाच, साधे समर्थन तरी कसे करणार
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 09:32
नवीन
एका आयडियोलॉजी खाली तुम्ही हजारो लोक गुंडाळताय. कम्युनिसम/सोशलिझम या नावाखाली लोकशाही समर्थक, प्रायव्हेट बिझनेस आणि फ्री मार्केट असावे अश्या विचारधारा सुद्धा उपलब्ध आहेत. इतकेच या विषयावर मी सांगू शकतो.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Mon, 04/26/2021 - 09:39
नवीन
अहं, काहींना समाजवाद ह्या शब्दाचीही ॲलर्जी असते. खाजगीकरण आणि भांडवलशाही हेच सगळ्या समस्यांवर इलाज आहे असे ह्या लोकांना वाटते. कोरोनाने अशा विचारसरणीच्या लोकांची तोंडे बंद केली.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 09:53
नवीन
अत्यंत सहमत.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 04/26/2021 - 10:04
नवीन
काहींना भांडवलशाहीची अॅलर्जी असते, तर काहींना संघ, भाजपची, तर काहींना अजुन कशाची...
याच धाग्यावर बघा, किती जणांना मोदींची अॅलर्जी झालीय. नाही का?
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 04/26/2021 - 10:08
नवीन
बरं ही मोदींची अॅलर्जी इतकी भयंकर झालीय की त्यासमोर त्यांना स्वतःच्या राष्ट्रध्वजाचीही विटंबना चालून गेलीय. हे त्याहुनही भयंकर..
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 10:13
नवीन
परमपूज्य राहुल गांधी यांना, डाॅलर आणि रुपया पण एकच वाटतो ....
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 10:37
नवीन
मोदी, त्यांचा पक्ष आणि त्यांचे काम कितीही घाण असले तरी ज्यांना लोकशाही आणि राष्ट्रध्वजाची किंमत नाही अश्या लोकांकडुन काय अपेक्षा ठेवावी?
- Log in or register to post comments
य
यश राज
Mon, 04/26/2021 - 11:07
नवीन
मोदींद्वेषात आंधळे झालेल्यांना आपण नकळत आपल्या देशाशी प्रतारणा करतोय हेच कळत नाहीये. मोदी भले ही आवडत नसतील तरी आनंद व्यक्त करताना त्याबरोबर आपल्या देशाच्या प्रतिकांचा पण अपमान होतोय याबद्द्ल तरी खेद व्यक्त करावा. पण ही भलतीच अपेक्शा आहे मोदीज्वर झालेल्यांकडुन.
बाकी परदेशात काही काळ वास्तव्य असल्यामुळे अनुभवावरुन सांगतो, परदेशी मिडिया डाव्या विचारसरणी कडे झुकलेला असतो(त्यातल्या त्यात बरेचदा पाहुणे संपादक म्हणुन राणा आय्युब सारखे लोक). त्यामुळे भले त्या देशाचे पंतप्रधान असो वा आपल्या देशाचे पंतप्रधान , दोघांबद्द्ल नेहमीच नकारार्थी लेख वाचायला मिळायचे
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Mon, 04/26/2021 - 10:00
नवीन
दहा कोटी ? माई गुडनस.
का ? एखादा धर्म जो पक्शपात करत आसेल आपल्याच लोकांमधे तो जर काळाच्यासोबत सुधारत असेल मुलभुत तत्वज्ञान न बदलता... तर हे ही का शक्य होनार नाही भविश्यात ?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 10:25
नवीन
एकदम चपखल प्रश्न आहे.
आत्ता पोर्तुगाल या युरोपियन देशात सलग दुसऱ्यांदा -
१. Partido Socialista (सोशलिस्ट.)
२. Bloco de Esquerda (कम्युनिस्ट)
३. सोशल डेमोकॅर्टिक पक्ष (डावे नाहीत.)
ह्यांचे एकत्रित सरकार सलग दुसऱ्यांदा निवडून आले. (२०१९) हे सरकार लोकशाही, बाजार अर्थव्यवस्था ह्याचातच काम करते. सोशलिस्ट पक्षाचा प्रधानमंत्री आहे. मागच्या वेळेस पेक्षा २२ शिटा सोशलिस्ट लोकांना जास्त मिळाल्या.
ह्यांची विचारधारा USSR मधल्या कम्युनिस्टांचीच आहे म्हणजे अगदी हास्यास्पद आहे.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 08:28
नवीन
कोल्हापुरात सात नवीन प्लांट बांधण्याचा निर्णय. अत्ता कोल्हापुरात गरज भागवण्याइतक ऑक्सिजन तयार होत असला तरी पुढे गरज वाटेल म्हणून निर्णय घेण्यात आला.
https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/city/pune/maharashtra-pune-nagpur-thane-nashik-mumbai-covid-19-lockdown-news-live-updates-25-april-2021/amp_liveblog/82238193.cms
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 08:37
नवीन
तामिळनाडू मध्ये ७०%+ केसेस चेन्नई मध्ये असून कॉर्पोरेशनने लोकांची काळजी घेतली आहे. सिरीयस केसेस ना ताबडतोब ऍडमिट केले जाते, आणि माईल्ड पेशंट्स ना त्यानंतर प्रेफरन्स. हे प्रत्येक जिल्ह्यात केले आहे.
केरळ- काही मोजके लोक सोडले ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलात भरती व्हावे लागले/ स्वतःहून झाले, केरळ मध्ये कोव्हिड उपचार सरकारी इस्पितळात विनामूल्य दिले गेले आहेत. आणि आत्ता पेशंट संख्या सहजपणे अकोमॉडेट होत असली तरी आरोग्य व्यवस्थेचे एक्सपान्शन चालू आहे, जर लोड वाढला तर असावे म्हणून.
तामिळनाडू आणि कॉम्रेड्स, सलाम.
https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/india/tamil-nadu-and-kerala-have-fought-the-covid-tsunami-well-so-far/amp_articleshow/82237792.cms
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Mon, 04/26/2021 - 09:22
नवीन
तामिळनाडू आणि कॉम्रेड्स ????
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 09:24
नवीन
तामिळनाडू आणि कॉम्रेड्स.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 04/26/2021 - 09:28
नवीन
केरळ मधील स्थिती भयानक आहे असे माझा डॉक्टर वर्गमित्र ( जो कम्युनिस्ट आहे) तो सांगतो आहे. ( अर्थात त्याच्या विचारसरणी प्रमाणे तो श्री मोदी यांनाच जवाबाबदार ठरवतो आहे ते ओघानेच आले)
तेंव्हा माध्यमात काय आले आहे ते माहिती नाही आणि त्यावर मी तरी विश्वास ठेवण्यास तयार नाही.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 09:34
नवीन
भयानक म्हणजे काय स्थिती आहे ? थोडं विस्तृत करून सांगावे.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 09:42
नवीन
आॅक्सीजनची कमतरता आहे असे सोशल मिडीयावर दाखवले तर संपत्ती जप्त करा असे केरळ च्या मामुनी सांगीतले असावे. :)
युपीसारख्या पंचतारांकीत सेवा आहेत का केरळात?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 09:56
नवीन
सांख्यकी बाजूला सारून anecdotal evidence वर खुश दिसतायत खरे सर. हि कितपत योग्य हे माहीत असण्याऐवढे ते नक्की हुशार आहेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 04/26/2021 - 17:01
नवीन
आपण आपल्या कोशात आनंदात रहा.
कम्युनिस्ट देशात सर्व कसं छान असतंय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 17:22
नवीन
तिथे तिथे कारखानदारी बंद होते...
पश्र्चिम बंगाल हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहेच आणि केरळ हे दुसरे...
साम्यवादी विचारसरणी, भारतात 100% कधीच रुजणार नाही, पण निव्वळ उपद्रवमुल्य ह्या पलीकडे, साम्यवादाला किंमत नाही...
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 04/26/2021 - 17:30
नवीन
कम्युनिस्ट देशात सगळं छान असतं असं मी कधीही म्हणले नाही आहे. तुम्हीसुद्धा मुद्द्याला बगल द्यावी वाईट वाटलं. असो.
- Log in or register to post comments
श
शलभ
Mon, 04/26/2021 - 19:52
नवीन
केरळ चा एक अनुभव आहे. कन्याकुमारी सायकल राईड करतानाचा. कर्नाटक मधे सहा लेन रस्ता आणि सीमा पार केली की केरळ मधे 2 लेन रस्ता विना divider चा. सकाळी 7 वाजता toddy आणि लॉटरी ची दुकाने उघडी पण खाण्याची दुकाने नाहीत. हा फक्त हायवे चा अनुभव आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 04/27/2021 - 06:42
नवीन
Volcano that can erupt anytime: Pinarayi on Kerala’s Covid situation.
https://www.newindianexpress.com/states/kerala/2021/apr/25/volcano-that-can-erupt-anytime-pinarayi-on-keralas-covid-situation-2294504.html
https://www.livemint.com/news/india/kerala-reports-record-28-469-new-covid-cases-30-more-deaths-in-last-24-hrs-11619355764277.html
महाराष्ट्राच्या एक चतुर्थांश लोकसंख्या असलेल्या राज्यात रुग्णसंख्येचा स्फोट होतो आहे. त्यातून तेथे हाताने काम करणारी माणसे सहज उपलब्ध होत नाहीत. शिक्षणाची पातळी उंच आहे आणि कम्युनिस्ट राज्यकर्ते असल्यामुळे युनियन बाजी मुळे त्यांच्या कडून काम करून घेणे फार कठीण आहे.
टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २२ % आहे.
अखाती देशात एकतरी नातेवाईक असलयामुळे खिशात पैसे आहेत पण त्यामुळे येणारी मग्रुरी सुद्धा आहे.
पण सध्या पर्यटन व्यवसाय ठप्प आहे आणि आखातातून येणार पैसा पण आटला आहे. मुळात कम्युनिझम मुळे उद्योगधंदे नाहीतच. त्यामुळे साठवलेल्या पैशावर चालू आहे.
मुसलमान व ख्रिश्चन लोकसंख्या जास्त असल्याने पार्थिव पुरण्यासाठी स्मशानभूमीत नेण्यासाठी माणसे मिळत नाहीत, स्मशानभूमीत जागा मिळत नाहीत
येणार काळ अधिक कठीण असणार आहे.
बाकी चालू द्या
- Log in or register to post comments
क
कॉमी
Tue, 04/27/2021 - 07:00
नवीन
केसेस वाढतायत खरंच आहे. मुख्यमंत्री स्वतःच परिस्थिती बिघडणार असा अंदाज लावतायत, ह्यात चांगले वाईट म्हणजे त्याबद्दल ते करणार काय हे आहे. आत्तापर्यंत तरी समाधानकारक वाटले आहे, आने वाला कल क्या लायेगा..?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »