Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)

व
वामन देशमुख
Sat, 04/24/2021 - 08:04
🗣 276 प्रतिसाद
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय. हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत. हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे. कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 68446 views

🗣 चर्चा (276)
R
Rajesh188 Sat, 04/24/2021 - 08:30 नवीन
https://www.sumanasa.com/go/xWMYw6
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 04/24/2021 - 08:34 नवीन
चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 04/24/2021 - 10:30 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #BoycottRadhe
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 04/24/2021 - 11:19 नवीन
तज्ञांनी डूम्सडेचे आकडे द्यायला सुरवात केली. वॉशिंग्टन विद्यापीठातील तज्ञांच्या मते मे महिन्यात दररोज ५ हजार मृत्यू भारतात होणार. https://maharashtratimes.com/international/international-news/coronavirus-in-india-covid-deaths-in-india-could-peak-by-mid-may-at-over-5000-per-day-said-us-study/articleshow/82229564.cms असल्या तज्ञांनी मागच्या मे महिन्यातच लाखो लोकांना कोरोना होईल, इतके हजार लोक मरतील, २०२० च्या शेवटापर्यंत ३० लाख लोक भारतात मरतील वगैरे अंदाज व्यक्त केले होते. पण तसे काहीही न होता त्यांचे अंदाज चुकून सप्टेंबरपासून अचानक रूग्णसंख्या कमी का झाली हे काही त्यांना सांगता आले नव्हते. आता दुसर्‍या लाटेत असले तज्ञ लोक आता डूम्सडेचे आकडे द्यायला लागले आहेत. या तज्ञ लोकांचा पूर्वेतिहास लक्षात घेता हे भाकित खरे ठरण्यापेक्षा खोटे ठरायची शक्यता जास्त आहे. म्हणज असले अंदाज ते लोक देत असतील तर सध्याच्या काळात ती एक सकारात्मक बातमी म्हणावी का?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/24/2021 - 11:40 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 04/24/2021 - 11:58 नवीन
ह्या तज्ञांचे त्यांच्या स्वतःच्या देशा बद्दल काय मत आहे ?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 04/24/2021 - 12:16 नवीन
ह्या तज्ञांचे त्यांच्या स्वतःच्या देशा बद्दल काय मत आहे ?
त्याविषयी माहिती नाही. पण भारताविषयी मात्र या लोकांचे कायमच डूम्सडेचे अंदाज राहिले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी सुरवातीला वीसेक वर्षे भारत देश एक कसा राहू शकणार नाही, भारताचे कसे तुकडेतुकडे पडतील, राज्याराज्यांमध्ये दंगली कशा होतील असली भाकिते होती. त्यानंतर भारतात वाढत्या लोकसंख्येमुळे धान्य कसे कमी पडेल आणि कसे लाखोंच्या संख्येने भूकबळी पडतील असली भाकिते यायला लागली. त्यानंतर १९८० च्या दशकात पंजाब भारतापासून वेगळा कसा होणार, भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर शीख सैनिक असल्याने सैन्यात बंडाळी होणार वगैरे भाकिते केली गेली. मग १९९० च्या दशकात अशीच भाकिते काश्मीरविषयी केली गेली होती. गेल्या वीसेक वर्षात भारतात डूम्सडे कसा येणार याविषयी या ढुढ्ढाचार्यांना भाकिते करायला काही न मिळाल्याने ते बहुदा अस्वस्थ असावेत. ती संधी नेमकी कोरोनाने त्यांना दिली. एक गोष्ट समजत नाही. या अमेरिकन ढुढ्ढाचार्यांना भारताचा इतका द्वेष का वाटतो? खरं तर लोकशाही, विविधता आणि इतर मूल्ये वगैरे गोष्टी लक्षात घेता असा द्वेष असायचे काही कारण नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 04/24/2021 - 14:44 नवीन
भारत हा जागतीक पातळीवर लोकशाहीचा आधारस्तंभ आहे हेच कळत नाहि.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 04/24/2021 - 16:55 नवीन
कदाचित भारतीयांच्या सार्वजनिक ठिकाणच्या बेशिस्त वर्तनावरून ही प्रजा कोणालाही सहजी न जुमानणारी , स्वयंशिस्त न पाळणारी आहे हे लक्षात घेऊन अंदाज बांधत असावेत.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 04/24/2021 - 11:33 नवीन
सप्टेंबर २०२० मध्ये माजी मंत्री रणजितसिंग पाटील यांनी विधानपरिषदेत ऑक्सिजनचा तुडवटा होऊ शकेल तेव्हा ऑक्सिजन प्लॅन्ट्स बांधण्याकडे लक्ष देण्यात यावे ही मागणी केली होती. पण तेव्हा महाभकास आघाडी सरकारपुढे कंगनाचे घर पाडणे, अर्णबला त्रास देणे, वाझेकडून कोट्यावधींची खंडणी उकळणे ही त्यापेक्षा बरीच जास्त महत्वाची कामे असल्याने ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारणे या किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले.

Despite timely warnings and repeated suggestions since the session held in September,2020 to set up a minimum of 15 #oxygen plants in the state, our system ignored the demands and turned a deaf ear to them! pic.twitter.com/K7lie8K3Ec

— Dr. Ranjit Patil (@Ranjitpatil_Mos) April 22, 2021
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/24/2021 - 15:28 नवीन
हेच माननीय पंतप्रधानांबद्दल ही लागू होईल. राहूल गांधीनी कोरोना स्फोट होईल असं जानेवारी की फेब्रूअरी २०२० मध्ये सांगीतले होते.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Sat, 04/24/2021 - 11:55 नवीन
https://youtu.be/9Ya32_1mRRI विराफीन ला परवानगी
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/24/2021 - 12:37 नवीन
ऑक्सिजन चा लोड कमी झाला तर भारीच.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 04/24/2021 - 15:56 नवीन
बेस्ट आहे न्युज. पण लवकर बाजारात उपल्ब्ध व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/24/2021 - 12:56 नवीन
तज्ञांच्या देशाचे नाव, आणि "अश्याच तज्ञांनी" मागच्या वेळेस केलेली भाकिते चुकली, म्हणून खोटे म्हणणे चुकीचे वाटते. त्यांचे जर स्टॅटिस्टिकल मॉडेल असेल तर त्यांच्या नॅशनॅलिटी चा संबंध नाही. भारताचा द्वेष वैगेरे फारच फार फेच्ड. आयआयटी खरगपूरच्या मॉडेल नुसार आपण मे तिसऱ्या आठवड्यात किंवा थोडेसे आधी ग्राफच्या शिखरावर पोहोचू. तेव्हा ३५ लाखापर्यंत ऍक्टिव्ह केसेस असू शकतात. संग्राम पाटील नावाचे डॉक्टर यूकेतून व्हिडीओ बनवतात त्यांनी सुद्धा कालावधी जवळपास हाच सांगितलं आहे.शिखरानंतर हळूहळू वाढ कमी होईल. https://www.financialexpress.com/lifestyle/health/indias-covid-graph-may-peak-at-33-35-lakh-active-cases-by-may-15-iit-scientists/2238825/
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 04/24/2021 - 15:55 नवीन
चेच मनिन्द्र अग्रवाल म्हनुन आहेत ट्विटरवर. त्यांचे मॉडेल सध्यातरी अक्युरेटली टॅली होत आहेत. त्यांच्यामते, पीक्स गाठले गेले असुन, बरेचसे मेजर सिटीज आता पीक क्रॉस करुन गेलेत किंवा पीकवर आहेत. मूंबई ठाणे पीक क्रॉस झालेले सांगताहेत, तर पुणे ऑन पीक. तरी २ आठवडे अत्यंत काळजीपुर्वक रहाणे भाग आहे. एखादाजरी सुपर स्प्रेडर निसटला तर संपल सगळ. (बाकी भारत द्वेश अन थर्ड वर्ल्ड कंट्री सिंड्रोम आहेत बर वेस्टर्न अ‍ॅकेडेमिक्सममध्ये)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/24/2021 - 16:10 नवीन
ट्विटर बघितले. शहरवाईज ग्राफ जास्त लॉजिकल वाटतंय. त्यांचे मॉडेल बरोबर असो अशी आशा. वेस्टर्न अकॅडेमिक्सचा बायस वैगेरे स्विपिंग स्टेटमेंटला काही अर्थ नाही. ज्या पर्टीक्युलर अकॅडमीची चर्चा आहे तिचा बायस दाखवा, तर अर्थ. नाहीतर आपल्याला आवडणारा वेस्टर्न रिसर्च स्वच्छ, नावडणारा साला कोलोनियल पिग.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 04/24/2021 - 16:48 नवीन
माझा पण साधारण हाच अंदाज आहे. Lockdown च्या पहिल्या आठवड्यात केस वाढत असतात, त्यानंतर कमी व्हायला लागतात असा अंदाज आहे.. आणि आता अनलॉक झाले तरी देखील लोक बाहेर पडतील असे वाटत नाही, कारण करोनाची भयानकता जवळ जवळ प्रत्येक कुटुंबाने या ना त्या मार्गाने अनुभवली आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/24/2021 - 17:02 नवीन
अग्रवाल यांचे देशभरासाठीचे मत आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात पीक गाठणार आहोत. https://news.abplive.com/videos/news/covid-second-wave-will-be-at-its-peak-in-1st-week-of-may-professor-manindra-agrawal-iit-kanpur-1454502
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 04/25/2021 - 17:28 नवीन
बऱ्याच शहरांबाबत अन राज्यांबाबत वेगवेगळे आहेत. कमी अधिक प्रमाणात मे पहिला दुसरा आठवडा दाखवतात पीक बाबत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/24/2021 - 15:31 नवीन
मागच्या श्रीगुरूजींच्या धाग्याने कमी वेळात विक्रमी अशी ३५० प्रतिसादांची धावसंख्या ऊभारल्या बद्दल गुरूजींचे धणूष्यबाण, वाघाची प्रतिमा आणी हातात शिवबंधन बांधून अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/24/2021 - 15:37 नवीन
*सावध व्हा अन्यथा आपली स्थिती भारतासारखी होईल! पीएम इम्रान खान यांचे पाकिस्तानला आवाहन* हेच पहायचं राहीलं होतं :( https://pudhari.news/news/International/Pakistan-PM-Imran-Khan-s-appeal-to-the-people/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 15:50 नवीन
...... पुणेकर उद्योजकाच्या पुढाकारातून सिंगापूरमधून येणार ३५०० व्हेंटीलेटर्स; मोदी सरकार करणार ‘एअर लिफ्ट’ ..... -------------- https://www.loksatta.com/pune-news/3500-ventilators-and-8000-oxygen-concentrator-will-be-brought-from-singapore-says-chandrakant-patil-svk-88-scsg-91-2453050/ --------------
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 15:58 नवीन
.....अनिल देशमुख यांच्या घर, कार्यालयांसह विविध ठिकाणी सीबीआयची छापेमारी..... https://www.loksatta.com/maharashtra-news/parambir-singh-letter-cbi-has-registered-an-fir-against-former-home-minister-anil-deshmukh-and-others-bmh-90-2452834/ ------------- CBI ला जर चौकशीची परवानगी दिली तर, अजूनही बरेच काही बाहेर येऊ शकते.... कदाचित महाराष्ट्र राज्यात घरोघरी भात तरी नक्कीच मिळेल ......
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/24/2021 - 16:15 नवीन
नेते लोकही हुशार झालेत. लगेच पक्श बदलतात आणी अभय मिळवतात. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 16:35 नवीन
अब्दुल सत्तार, हे उदाहरण डोळ्यासमोर आहेच ....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/24/2021 - 17:48 नवीन
:) तरी सुध्दा सत्ता मिळवू शकले नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/24/2021 - 18:41 नवीन
लादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :)
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 04/24/2021 - 19:40 नवीन
लादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :) बरोबर..!!! अमेरिकेने खूपच लवकर मारले लादेन ला. नाहीतरी ओसामाजी आणि हाफिज साहेब म्हणणारी टोळीचे प्रयत्न वाया गेले. इमेज क्लीन करण्याची सुरवात केलीच होती तेवढ्यात अमेरिकेने लादेन ला जन्नतवासी केले. तीच बाब झाकीर नाईक या देवमाणसाबाबत.. झाकीर नाईक जी एक्तत्मेचा आणि मानवतेचा संदेश घेऊन कामं करतायेत असे भर सभेत बोलणे, मिठ्या मारणे, त्यांच्या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणे अशी कामे देखील एक पक्ष अगदीआत्ताआत्तापर्यंत करतच होता.. त्याला फक्तं पक्षात घेणच बाकी राहिले होते.. !!! अशी जातीय "घाण" हुंगत हुंगत जाणे आणि तिला पक्षात घेणे किंवा छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/24/2021 - 20:42 नवीन
छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.>>> असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :)
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 04/24/2021 - 21:00 नवीन
असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :) बरोबर बोललात. हो ना. पब्लिक आता हुशार झालिये.. कारण पाहिले फक्तं मेसेजेस चालायचे पण आता बहुतांश लोकं बोलतात , लिहितात, आवाज उठवतात आणि आज त्याचाच परिणाम आहे की ३०० पार झालेत. असो तुम्ही मुळ मुद्द्याला बगल दिऊन गाडी तिसरीकडे नेलीत.. अश्या घाणेरड्या धार्मिक प्रवृत्तीना प्रोत्साहन देणे, मदत करने , कायदेशीर मदत करणे, आणि इमेज क्लीन करणे ही कामं करणार्या पक्षाच नावं मी घेणार नाही.. कारण तुम्ही ते ओळखले असेल. !!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 02:54 नवीन
आणि दुसर्याचे बघायचे वाकून ह्या आघाडीने, कुठलेही भरीव काम केलेले नाही...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 02:49 नवीन
हे शिवसेनेत आहेत... अब्दुल सत्तार, यांच्या बाबतीत माहिती मिळवलीत तर, फारच उत्तम..... Youtube वर क्लिप्स उपलब्ध आहेत...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/25/2021 - 07:40 नवीन
अब्दूल सत्तारच ऊदाहरण आहेत. राष्ट्रहीताचे सोंग आणणार्या पक्शात येऊन कोण कोण पावन झालं? अर्थात तिकडे दुर्लक्श करूयात ;)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 10:40 नवीन
नाव सांगा
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/25/2021 - 12:53 नवीन
फार भोळे तुम्ही. मेगाभरती केली तरी १०५ वरंच अडकलात. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 13:11 नवीन
अज्ञानी असलेले कधीही उत्तम... अर्थात, तुम्ही पळपुटेपणा करणारच, हा अनुभव आहेच ... अजूनही तुम्हाला ह्या राजवटीतली कामे सांगता आली नाहीत ...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/25/2021 - 13:35 नवीन
१०५ घरी बसवल्याचा राग किती दिवस मनात ठेवनार?? आता ऊभी हयात विरोधी पक्शातच जाणार आहे. अजून द्या “क्लिन चीट“ :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 15:44 नवीन
गोल गोल राणी ....
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 04/24/2021 - 18:31 नवीन
वास्तविक असल्या स्टोरीज (अनेक तद्दन खोट्या, इतर काही अतिशयोक्त, अजून काही मोडतोड केलेल्या...) काही ठराविक माध्यमे इतकी करतात व तथाकथित विद्वान, विचारवंत इत्यादी. त्या लगोलग उचलून पसरवतात, की ह्या अनेक माध्यमांची विश्वासार्हता, निदान माझ्या दृष्टिने तरी संपूर्ण संपलेली आहे. ह्यात बर्‍याच भारतीय आणि काही जुन्या, नावाजलेल्या पाश्चिमात्य मीडियांचा समावेश आहे. आता 'द वायर' हे खरे तर साम्यवादी बाजूचे न्यूज पोर्टल. अर्थात, ह्याला कमर्शियल दृष्टिकोन असण्याची जरूरी नाही, म्हणजे क्लिक्सवर अवलंबून राहून त्यांना जाहिराती मिळवून पैसा करण्याची जरूर नाही (किमानपक्षी, साम्यवादाच्या बांधिलकीमुळे तशी ती नसावी. असलीच तर ती स्वतःशीच प्रतारण आहे). तसे असल्यास, एकादी बातमी 'ड्यू डिलिजन्स' न करता देण्याची त्यांना घाई नसावी. पण तरीही राजनाथ सिंगांच्या तोंडी काही खोटे वक्तव्य खपवल्यावर, ते तसे करावेसे त्यांना वाटले- अथवा तसे करणे त्यांना भाग पडले. मग दिलेली बातमी मागे घ्यावी लागली व हा खुलासा द्यावा लागला. असा खुलासा देणे हेही नसे थोडके. इतरस्त्र तेही केले जात नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/24/2021 - 19:13 नवीन
द वायर साम्यवादाकडे झुकते म्हणजे काय समजले नाही. डावीकडे झुकणारे आहे, पण साम्यवादी कशावरून आहे ? (डावे म्हणजे कॉमी हे जुने मिसकनसेप्शन आहे.) आता साम्यवाद/समाजवाद ह्या छत्रीखाली अत्यंत भिन्नभिन्न अनेक विचारधारा आहेत. त्यापण सशस्त्र क्रान्ती वाला टिपिकल कॉमी ते निओ लिबरल अर्थव्यवस्थेत राहूनच सरकारने लोकांचे भल्यासाठी कामे करावीत म्हणणारा फ्री मार्केट पुरस्कर्ता सोशलिस्ट, इतकी भयंकर व्हास्ट रेंज आहे. आणि असावीच. इतक्या पूर्वीचे तत्वज्ञान, इतक्या देशांमध्ये इतक्या काळापासून इटक्यांदा चर्चिले गेले आहे कि त्याचे रूप बद्दलणारच. त्यामुळे साम्यवादाची प्रतारणा वैगेरे फार ब्रॉड विधान झाले. वायर टीमचे काय विश्वास आहेत हे जास्त महत्वाचं, प्रतारणा आहे की नाही पाहण्यासाठी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/24/2021 - 19:31 नवीन
वायरने खोटी बातमीचा खपवली/खपवायला लावली ह्याची इतकी खात्री का ? चूक सुद्धा असू शकतेच. हे मीडिया हाऊस असे असे वाईट आहे, हे फारच अपुरे आहे. एखाद्या बातमीची पडताळणी त्या बातमीच्या सोडून इतर कोणत्या संदर्भाने करू नये. त्यातल्या रिपोर्टेड फॅक्टस ची तरी.दिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का, आणि पूर्ण आहेत का, हे इतर सोर्सेसशी पडताळणी करून पाहणे. त्यातल्या मताबद्दल मीडिया हाऊस च्या संदर्भाने विचार होऊ शकतो. पण त्यातले तथ्य निर्विवाद असतील तर मीडिया हाऊसचे नाव आणि त्यांची मते इरिलेव्हन्ट आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 04/25/2021 - 06:29 नवीन
हे मीडिया हाऊस असे असे वाईट आहे, हे फारच अपुरे आहे. एखाद्या बातमीची पडताळणी त्या बातमीच्या सोडून इतर कोणत्या संदर्भाने करू नये. त्यातल्या रिपोर्टेड फॅक्टस ची तरी.
कुठल्याही व्यक्तिची, व्यक्तिसमूहाची, आस्थापनाची विश्वासार्हता असते, व ती आपण आपल्या अनुभवांवरून बनवत असतो. मी २०१३ सालापासून काही परदेशी व भारतीय बातम्या देणार्‍या मीडियागृहांना जवळून पहात आलो आहे. तेव्हा माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून, मी त्यांच्या विश्वासार्हतेविषयी मते बनवली आहेत. मी इतके ठामपणे सांगू शकतो की ही मते वरवर कुणीतरी काहीतरी सांगितले म्हणून, अथवा, 'एकाने- दुसर्‍याला-माहिती-दिली/मत-सांगितले, दुसर्‍याने-तिसर्‍याला.... 'अशा तर्‍हेने बनवलेली नाहीत. न्यू यॉर्क टाईम्स, गार्डियन, सी. एन. एन,. फायनॅन्शियल टाईम्स ही परदेशी आस्थापने व भारतांतील एकाद-दुसरे सोडून इतर सर्वच आस्थापने सातत्याने अतिशय एकांगी बातम्या देतात, 'ओपिनियन' ह्या नावाखाली काहीबाही लिहीतात, अनेकदा बातम्या चूक असतात (तथ्याला धरून नसतात), इतकेच नव्हे, त्या रचलेल्या असतात-- हे सर्व मी प्रत्यक्ष अनुभवले आहे, व त्यावरून मी हे मत बनवलेले आहे. बरे, हे त्यांचे रीपोर्टिंग, भारताविषयीच नव्हे तर मी राहतो तेथील घटनांच्या बाबतीतही तसेच आहे व होते. तेव्हा, मी ही सदर घटना व अशा पुढे होणार्‍या घटनांविषयी ह्या आस्थापनांना 'बेनेफिट ऑफ डाऊट' देणार नाही. तसे प्रत्येक गोष्तीच्या बाबतीत करणे मलातरी जरूरीचे अजिबात वाटत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 04/25/2021 - 06:57 नवीन
हे गृहस्थ, एड्वर्ड ल्यूस, फायॅन्शियल टाईम्सचे ज्येष्ठ वार्ताहर आहेत. "Associate Editor, Financial Times, US-based writer/columnist. Former DC & India bureau chief." Image removed. ही असली बातमी आपण कुठेही, कधीही ऐकलेली नाही, ना पाहिलेली आहे. पण हे ट्वीट आले, की तात्काळ मी त्याची सत्यासत्यता मूळापासून तपासून घेणार नाही, तसे करणे निव्वळ वेळ व शक्तिचा अपव्यव आहे. पण मी वर लिहील्याप्रमाणे, फाटाचे सर्वच रिपोर्टिंग असलेच आहे हे मी नेहमीच पहात आलेलो आहे. ह्या फाटाला मी तर, स्किफोफ्रेनिक वर्तमानपत्र म्हणतो. म्हणजे, मुख्य विभाग सगळा, ईकॉनॉमी, कंपन्या, कॅपिटल्स, बाँड्स, इन्वेस्टमेंट्स, इत्यादींवर असतो. मग दर वीकांतास इतर सेक्शन्स असतात- लाईफ अँड आर्ट्स-- ह्यांत एक मुलाखत, बहुधा कुठल्यातरी डाव्या, अतिडाव्या व तथाकथित लिबरल व्यक्तिची. ही मुलाखत 'लंच विथ एफ. टी.' अशी असते, जिचा जेवणाचा खर्च एफ. टी. करते. हा खर्च अनेकदा बर्‍यापैकी असतो, पण गप्पा मात्र डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या. ह्या सेक्स्नमधे पुढे आर्ट्स विभाग असतो, ज्यात अतिशय उच्च किंमतीच्या जुन्या-नव्या आर्ट्वर्क्सविषयी माहिती असते, कुठला पुढील लिलाव कुठे आहे, ह्याची माहिती असते. अजून एक सचित्र विभाग 'हाऊस अँड होम' हा पाश्चिमात्य देशांतील उच्च घरांच्या माहितीबद्दल असतो. आणि सर्वांत कहर म्हणजे, दर दुसर्‍या वीकांतात अजून एक स्पेशल विभाग असतो, त्याचे नावच 'हाऊ टू स्पेंड'. नावाप्रमाणेच हा विभाग अतिशय उच्चभ्रू वस्तू अथवा, जागांविषयी असतो. म्हणजे, पैसा मिळवण्याचे स्त्रोत सर्व भांडवलदारांच्या कंपन्यांकडून, आणि स्वतःचा सूर अतिशय डावा. ह्या सगळ्याच पाश्चिमात्य तथाकथित लिबरल मीडियांच्या मागे एक सूक्ष्म धार्मिक सूरही असतोच असतो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 04/25/2021 - 07:14 नवीन
मीडिया हाऊसच्या आयडियोलॉजी बद्दल आणि विश्वासार्हते बद्दल मत जरूर असावे, शंका जरूर असावी. तशी माझीही मते आहेतच. पण औट ऑफ हँड उडवून लावणे अत्यंत अयोग्य. उदा, तो स्क्रोल लेख तुमि जशी चिरफाड केली त्याशिवाय उडवणे अयोग्य नाही का ? Op India हे भयंकर कचरा रिपोर्टींग करते असे माझे मत आहे, तरी त्यांच्या आर्टिकल्स ची उडवाउडवी चूकच. तुम्हाला कुठले मीडिया हाऊस भारतात आणि बाहेरचे आवडतात ? तुम्ही याबद्दल बराच विचार केलाय म्हणून विचारतो.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 04/25/2021 - 09:28 नवीन
ऑपइंडियाच्या बातम्या अतिरंजित, खोट्या अथवा चुकीच्या असतात, असे माझ्यातरी पहाण्यात आलेले नाही. पण त्यांची रिपोर्ट्सच्या मांडणीची पद्धत अतिशय वाईट आहे- शब्दबंबाळ, इकडे- तिकडे पसरलेले -- थोडक्यात रिपोर्ट्सची कॉपी कशी लिहू नये, ह्याचे ते आदर्श उदाहरण आहे. भारतांत मी इंडियन एकस्प्रेस, लाईव्हमिंट व थोडेफार फर्स्ट्पोस्ट वाचतो; तसेच फेबु व ट्विटरवरूनही बरीचशी चांगली माहिती मिळते. परदेशांत वॉल स्ट्रीट जर्नल (धूमे सोडून) मला आवडते. व्हिऑन स्ट्रीमींगही चांगले असते. तुमचेही असे काही सांगा.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 04/25/2021 - 11:51 नवीन
लोकसत्ता ताज्या घडामोडी वाचायला. न्यूजलाउंड्रीचे ग्राउंड रिपोर्टींग चांगले असते. ते वाचतो. बाकी जी गोष्ट रोचक वाटते त्यासंदर्भात जिथे लिहिले आहे तिथे वाचतो. प्रिंट चे कट द क्लटर चांगले विश्लेषक असते. मागचे राजकीय संदर्भ कळतात. अमेरिकन राजकारण करमणूक म्हणून फॉलो करतो. त्यांचे लेफ्ट- राईट डिबेट असतात त्या पाहतो. सॅम सिडर, चार्ली कर्क, बेन शापिरो, सेक्युलर टॉक विथ काईल कलिनस्की, डेव्हिड पॅकमॅन, डेस्टीनी, हसनआबी वैगेरे. चांगली करमणूक होते. त्यातला जेस्सी ली पिटर्सन नावाचा मुलाखतकार आहे, त्याच्या मुलाखती इतक्या भन्नाट असतात की हसून हसून पुरेवाट व्हावी.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 04/25/2021 - 17:31 नवीन
म्हणजे सनातन प्रभात ची इंग्लिस आवृत्ती वाटते :D
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 04/25/2021 - 10:49 नवीन
या असल्या मंडळींनी अनेकदा अशा खोट्या गोष्टी पेरल्या आहेत. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कॅन्सरचे कुठलेसे औषध ७ हजार रूपयांवरून एक लाख रूपये झाले आहे अशी बातमी या लोकांनी पेरली होती. तसेच कुमारी मातांना आपल्या मुलांसाठी पासपोर्ट काढायचा असेल तर आपल्यावर बलात्कार झाला होता का ही बातमी पासपोर्ट फॉर्ममध्ये देणे या कुमारी मातांना बंधनकारक असेल अशीही बातमी यांनी आणली होती. या सगळ्या बातम्या खोट्या होत्या हे सांगायलाच नको. पनवेलला एका चर्चच्या कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याने रागातून दगड मारून चर्चच्या खिडकीची काच फोडल्यावर तो अगदी राष्ट्रीय कटाचा भाग असावा अशाप्रकारे त्यांनी अपप्रचार केला होता. राजदीप सरदेसाईला आपण खोटे बोललो होतो असे हैद्राबादच्या कोर्टामध्ये कबुल करावे लागले होते. अशा कित्येक कथा आहेत. एकूणच हे सगळे पुरोगामी मिडियावाले (एक तर काँग्रेस समर्थक असतील, समाजवादी असतील किंवा डावे असतील) असलेच थर्डक्लास असतात. त्यातही 'द हिंदू' किंवा 'फ्रंटलाईन' किंवा वायर किंवा स्क्रोल सारखे डावे सगळ्यात हलकट. लाल रंगाच्या अगदी फिक्या छटांपासून सगळ्यात गडद छटांपर्यंत सगळ्या छटांचे लोक थोड्याफार प्रमाणाने तसलेच असतात आणि कम्युनिस्टांविषयी मला जितका संताप आहे तितका संताप असलेले कोणीही मिपावर नाही याचा मला सार्थ अभिमान आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 10:56 नवीन
Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता . लांबून एक इसम लंगडत येताना दिसला . एक डॉक्टर म्हणाले " याला काय झालं असेल हो ? " डॉक्टर १ :left knee arthritis ." डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis ". डॉक्टर ३ :" काहीतरीच काय !Ankle sprain असणार ." डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार ." डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय . डॉक्टर ६.............काही बोलणार.... तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला , . . . . इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणात पाय भरलाय..... आजची मीडिया देखील असेच अंदाज लावत बसते......
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा