चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road
इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
भारतातील लस निर्मितीला खीळ घालून त्यांच्या फायझर आणि मॉर्डरना लसी भारतात आणि इतर आफ्रिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील गरीब देशात विकल्या जाव्यात यासाठी हा नीचपणा ते करत आहेत.भयानक आहे. NPR वरचा एक लेख दिसला त्यात सुद्धा आफ्रिकन देशांना लसीनपासून जाणून बुजून दार ठेवण्यात आल्याचे म्हणले आहे. US, UK, भारत, चायना आणि जर्मनी आहेत. ह्यांनी लस एक्स्पोर्ट करताना सरळसरळ आफ्रिकेला वंचित ठेवले आहे असे नामीबियाचे प्रेसिडेंट गेइंगोब यांनी आरोप केला. त्यांना ज्या काही लशी मिळाल्या त्या सगळ्या भारत आणि चायना तून मिळाल्या. युरोप आणि अमेरिकेने काहीही दिले नाही. लस घनता नकाशा (चायनाची माहिती दिसत नाही.) NPR लेख- https://www.npr.org/sections/goatsandsoda/2021/04/22/988814093/what-does-vaccine-inequality-look-like-see-chart