चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road
इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
आणी त्या माणसाने अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली होती ठाकरेंवरखालच्या दर्जाची पोस्ट? शून्य माहिती असली आणि समज कमी असली की असे निर्बुद्ध प्रतिसाद येतात. मदन शर्मा या ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला एका कायप्पा समुहात कोणी तरी काढलेले ठाकरेंवरील एक व्यंगचित्र मिळाले. त्यात काहीही खालच्या दर्जाचे नव्हते. असते तर पोलिसांनी मूळ व्यंगचित्रकर्त्याला पकडले असते. ठाकरेंवर काढलेली अशी असंख्य व्यंगचित्रे गुगलल्यावर मिळतील. अनेक नेत्यांवर काढलेली असंख्य व्यंगचित्रे रोज अनेक माध्यमातून प्रसिद्ध होतात व ती सर्वत्र फिरत असतात आणि त्यात काहीही बीभत्स, अश्लील, खालच्या दर्जाचे नसते. त्या अधिकाऱ्याने आपल्या सोसायटीच्या समुहात ते फॉरवर्ड केले. त्यानंतर त्यांना १०-११ सेना नेत्यांनी सोसायटीत येऊन बेदम मारहाण केली. व्यंगचित्र काढणे हा गंभीर गुन्हा असेल तर आर के लक्ष्मण यांना रोज मारहाण झाली असती. अत्यंत माज, काडीचीही अक्कल नाही, कामधंदा नाही, पोलिसांचे पाठबळ, गुंडगिरी अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे एका वयस्कर अधिकाऱ्याला १०-११ जणांनी बेदम मारहाण केली. दुर्दैवाने या गुन्ह्याचे काही जण तावातावाने समर्थन करीत आहेत.प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरदंष्ट्रान्तरात् समुद्रमपि सन्तरेत् प्रचलदुर्मिमालाकुलाम् । भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एखादा मनुष्य कठोर प्रयत्नांती मगरीच्या तोंडातून स्वर्णमणी ओढून काढू शकेल, महासागर पोहून पार करू शकेल, विषारी नागाला एखाद्या पुष्पाप्रमाणे मस्तकावर धारण करू शकेल, परंतु कितीही प्रयत्न केले तरी तो पूर्वग्रहदूषित मुर्खाचे समाधान करू शकणार नाही.