चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents-remain-delhi-border-agitating-farmers-withdrew-a629/
दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.
- महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेऊन म्हणून पण सुरवातील "मित्र पक्ष" म्हणून आदर होता ...संपूर्ण असहमत. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात भाजपची कामगिरी अशी होती. १९६७ - ४, १९७२ - ५, १९८० - १४, १९८५ - १६ याच काळात शिवसेनेची कामगिरी अशी होती. १९६७ - ०, १९७२ - ०, १९७८ - ०, १९८० - ०, १९८५ - १ १९८५ पर्यंत महाराष्ट्रात भाजपचा मताधार कमी होता, परंतु महाराष्ट्राच्या सर्व भागात भाजपचे २-३ आमदार निवडून येत होते. याच काळात शिवसेनेचा मताधार शून्य होता व मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर अस्तित्व नव्हते. १९८५-१९९० या काळात शहाबानो, श्रीरामजन्मभूमी आंदोलन, बोफोर्स या प्रकरणांचा वापर करून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये आपली ताकद बरीच वाढविली होती व १९८९-९० मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काही राज्यात सत्ता मिळवून व अनेक जागा जिंकून हे सिद्ध केले. महाराष्ट्रातही भाजपने त्याच पद्धतीने ताकद वाढविली होती. भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुक युती न करता स्वतंत्र लढली असती तर किमान ५-६ खासदार व ६०-७० आमदार निवडून आले असते. त्यामुळे "महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेतले" हा निष्कर्ष वस्तुस्थितीवर आधारीत नाही. परंतु दुर्दैवाने तत्कालीन भाजप नेतृत्वाने जवळपास शून्य अस्तित्व असलेल्या शिवसेनेशी २५ वर्षे युती करून शिवसेनेला आपल्यापेक्षा खूप जास्त जागा देण्याची गंभीर घोडचूक केली ज्याचे परीणाम पुढील २५ वर्षी भाजपला भोगावे लागले. सुदैवाने भाजपने २०१४ मध्ये चूक सुधारून आपली ताकद दाखवून सत्ता मिळविली. परत २०१९ मध्ये फडणवीसांच्या नाकर्तेपणामुळे भाजपला पुन्हा एकदा अवदसा आठवली आणि पुन्हा एकदा शिवसेनेला खूप जास्त जागा देऊन युती करण्याची घोडचूक केली.