Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)

श
श्रीगुरुजी
Mon, 04/12/2021 - 06:06
🗣 271 प्रतिसाद
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents-remain-delhi-border-agitating-farmers-withdrew-a629/ दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61811 views

🗣 चर्चा (271)
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 16:47 नवीन
दिपाली चव्हाण, आज आपल्यात असती...
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Tue, 04/13/2021 - 03:33 नवीन
लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही हे वाक्य आतापर्यंत अगणित वेळा ऐकले आहे पण एकदा रमझान होऊन जाऊ दे मग करुया असे काकानी मामुना सान्गितले असेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 03:42 नवीन
जनता, बारची वाट धरे...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 04/12/2021 - 15:28 नवीन
श्रिगुरूजींशी असमहत. राज्यसरकारवरील द्वेषातून लिहील्या सारख वाटतंय. मविआ अतिशष ऊत्तम काम करत आहेत. पवारांचे राज्यावर ऊपकार आहेत १०५ घरी बसवले म्हणून
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 15:29 नवीन
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात कामे सांगा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/12/2021 - 16:39 नवीन
१६-१७ महिन्यात केलेली चांगली कामे सांगा. एकही चांगले काम केले नसताना आणि अगणित वाईट कामे केलेली असताना अतिशय उत्तम काम कसे? १०५ घरी बसले ते फडणवीसांच्या घोडचुकांमुळे. त्यात पवारांचे कर्तृत्व शून्य आहे. ते तर भाजपलाच पाठिंबा देण्याची धडपड करीत होते. पाठिंब्याची ऑफर घेऊन दिल्लीत मोदी-शहांना भेटले होते. पण रिकाम्या हातानेच परतावे लागले होते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 04/12/2021 - 15:28 नवीन
अगदी काहीच कामे केली नाहीत असे नाही तर माझ्या मते सत्तेवर आल्यापासून या सरकारने पुढील दोन कामे नक्कीच केली: १. सत्तेत टिकून राहिले. २. (माझ्यासाठी) ज्या मुख्यमंत्र्याविषयी कमालीचा संताप वाटतो अशा मुख्यमंत्र्यांच्या यादीत अरविंद केजरीवाल यांचे नाव दुसर्‍या क्रमांकावर ढकलले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 15:43 नवीन
80% लोकांनी नाकारलेला पक्ष म्हणजे शिवसेना... आता, उरलेले 20% परिणाम भोगत आहेत, पण हा, तोंड दाबून, बुक्क्यांचा मार, सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.. ह्या सरकारने केलेली चांगली कामे, ते 20%वाले सांगू पण शकत नाहीत...
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 04/12/2021 - 18:44 नवीन
सरकारने कितीही काहीही महत्वाचे असले तरी असे कुंभमेळे, जत्रा, उत्सव, बंद केले पाहिजेत. परवानगी देऊ नये. अशाच प्रकारे १४ एप्रिलला दादर चौपाटीवर किंवा नागपूरात महामानव डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जी हजारोंची गर्दी जमते त्यावरही बंदी आणावी. एकगठ्ठा मतं मिळवण्यासाठी कदाचित हा निर्णय कठीण ठरेल पण तरीही शासनाने घ्यावाच.आणि तरीही गर्दी जमली आणि आलेल्यांना आणि संपर्कात आलेल्यांना शोधून शोधून क्वारंटीन करावे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 04/12/2021 - 14:01 नवीन
राज्यात निर्माण झालेला रेमडेसीवरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजपा नेत्यांनी आज (सोमवार)दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 04/12/2021 - 14:16 नवीन
त्यावरून पण शिव्या खाणार महाराष्ट्र भाजप. भाजप नेत्यांचे फार्मा कंपनीवाल्याशी साटलोट आहे म्हणूनच त्यांना मिळाली किंबहुना अस नसतं तर ही जाणत्या राजाला नाहीतर उधोजीना मिळाली असती
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 14:36 नवीन
अशीच नीती असण्याची, शक्यता वाटते...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 04/12/2021 - 15:25 नवीन
गुजरातची वाटचाल आरोग्य आणीबाणीच्या दिशेनं; हायकोर्टाचे सरकारच्या धोरणावर ताशेरे http://dhunt.in/dZE52?s=a&uu=0xf1b3901f5d830a6c&ss=wsp Source : "सकाळ"
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 04/12/2021 - 15:35 नवीन
गुजरात मध्ये अत्ता पर्यंत एकूण 3,47,495 रुग्ण सापडले आहेत तर साध्याला 27,586 active रुग्ण आहेत. पुण्यामध्ये अत्ता पर्यंत 6,51,586 रुग्ण सापडले आहेत तर साध्याला 1,09,590 active रुग्ण आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 15:38 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 16:44 नवीन
उपलब्ध करून देणार – दरेकर https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-will-provide-50000-remdesivir-injection-for-maharashtra-darekar-msr-87-2442701/ तरी पण हा दोष भाजपचाच, असे काही 20% वाले म्हणतील ...
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 04/12/2021 - 17:29 नवीन
मागिलवर्षी मार्चमध्ये लोकडाऊन केल्यावर ६, ७ महिन्यानंतर हा लोकडाऊन डिसेंबरमधेच करायला पाहिजे होता, विमाने बंद करायला पाहिजे होती अशी फुकट सल्लागारांची फौज झाली होती. त्याच हिशोबाने मी आता विचारतो दरवर्षी फेब्रुवारी मध्ये बारावी आणि मार्च मध्ये दहावीच्या परीक्षा होतात मग या वर्षी कोरोना केसेस फेब, मार्च मध्ये जास्त नव्हत्या तर एप्रिल पर्यंत पुढे का ढकलल्या? आतापर्यंत परीक्षा संपून मुलांची सुट्टी अर्धी संपत आली असती.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 04/12/2021 - 17:54 नवीन
‘लॉकडाउन’वर नाना पाटेकर म्हणतात, ‘मृत्यू टाळायचे असतील, तर…’ “प्रत्येकाने वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन केले पाहिजे. माझ्यासह सर्वांनी नियमांचं पालन केले पाहिजे. लॉकडाउन करण्यात कोणत्याही सरकारला आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे, असेल तर हे गरजेचं आहे,” असं नाना पाटेकर म्हणाले लॉकडाउन उत्सव सगल्यांनी साजरा केला पाहीजे व प्रत्येक आठवद्याला दिवे घालवा,थाळ्या वाजवा असे नवीन प्रतिकात्मक टास्क राज्य सरकारने जनतेला द्यावेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/12/2021 - 18:30 नवीन
लोकांच्या चुका कारणीभूत आहेत.विविध उस्तव,यात्रा ,लग्न ह्या मध्ये लोकांनी सर्व नियम तोडले .लग्नाला ५० माणसांची च परवानगी होती पण पाचशे सहाशे माणसं बोलवून लग्न झाली. यात्रा लोकांनी नियम तोडून साजऱ्या केल्या. मास्क वापरायचे पूर्ण बंद केले. आठवडी बाजारात विनाकारण गर्दी केली. त्या मध्ये यूट्यूब,आणि fb ,aani बाकी समाज माध्यमावर स्वयं घोषित तज्ञ अक्कल पाजळत होते. Corona काळात पंचायती आणि ग्राम पंचायत च्या निवडणुका झाल्या. निवडून आयोगाने निवणुका जाहीर केल्या पण corona चे नियम मोडणाऱ्या लोकांना कायद्याच्या दांडक्याचा प्रसाद दिला नाही. नेते मंडळी हजारो लोकांच्या सभा घेण्यात धुंद होते. एवढे होवून सुद्धा बंगाल मध्ये सर्रास सर्व नियम मोडून गर्दी जमा केली गेली. अगदी देशाच्या पंतप्रधान,देशाचे गृह मंत्री,राज्याची मुख्य मंत्री सायबा ह्यांना पण जबाबदारी चे भान राहिले नाही. ह्या सर्व कर्माची फळच आता देश भोगत आहे. एक तो आपलाच कार्बन कॉपी ब्राझील आणि भारत ही दोनच राष्ट्र संकटात आहेत. अमेरिका पण आपल्याच रस्त्यावर आहे. एक वर्ष होवून गेले,अनुभव मिळाला तरी मधल्या काळात मोकळीक मिळाली होती त्याचा फायदा करून घेता आला नाही. निवडणुकी पेक्षा वैद्यकीय सुविधा त्या काळात वाढवता आल्या असत्या. औषध,व्हेंटिलेटर, ऑक्सिजन ह्यांचा साठा करून सरकार ल ठेवता आला असता पण. दूर दृष्टीचा अभाव भारताच्या सत्ता धारी मंडळी मध्ये ठासून भरलेला आहे. दुर्दैवी आहे देश ह्या बाबतीत
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Mon, 04/12/2021 - 19:37 नवीन
राज्य सरकारला कुणी आडवले होते हे सगळे करण्यापासून, बीजेपी उपयोगाची नाही अस तुमचं मत आहे तर मग आघाडी सरकारने पण का तयारी केली नाही?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 04/13/2021 - 01:50 नवीन
केंद्राने ... केंद्राने अडविले हो ...नाहीतर काय काय कामे केली असती. केंद्र तर आज काल १ नंबर / २ नंबर ला पण जाउ देत नाहीत त्यांना.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 03:18 नवीन
आमच्या प्रश्र्नांची उत्तरे कधी देणार आहात? पळपुटेपणा तरी करू नका....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 04/12/2021 - 20:18 नवीन
https://www.lokmat.com/maharashtra/keshav-upadhye-gave-details-related-corona-vaccination-state-a719/
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 04/12/2021 - 22:57 नवीन
मोदी सरकारने नेहमी प्रमाणे वॅक्सीन विषयावर तोंड जास्त उघडले आहे आणि काम कमी केले आहे. उधोजी पूर्णपणे ........ नेते असले तरी मोदी महाराजांनी सुद्धा बऱ्यापैकी गोंधळ घातला आहे. तीन राज्यांत मोदी महाराजांच्या पक्षाने मोठ्या रॅली काढल्या. कुणीही कसलीही खभरदारी घेतली नाही. आम्हाला आधी सांगितले टेस्ट, ट्रीट आणि ट्रेक हि कोरोनाला हरवण्याची त्रिसूत्री आहे पण इलेक्शन येतंच त्याची जागा crowd, मोठा crowd आणि आणखीन मोठ्ठा crowd ने घेतली. ते सोडा, लस ह्या विषयावर अर्थशास्त्राचे मूलभूत नियम पुन्हा एकदा सरकारी खेचरांनी चुलीत घातले. रोगाने प्रचंड नुकसान होत असल्याने लस हि १००% फुकट उपलब्ध करून देणे बरोबर आणि देशाच्या फायद्याचे आहे ह्यांत शंकाच नाही. पण त्याच वेळी सरकार कडे पर्याप्त पैसा नाही. खाजगी व्यवस्थेंत टाकत आहे पण भांडवल नाही अशी परिस्थिती होती. खरे तर भारत बायोटेक आणि SSI ला आधीच ५००० कोटी चे लोन सरकारने द्यायला पाहिजे होते. सरकारी इस्पितळांतून फुकट लस दिली जात आहे हे बरोबर आहे पण त्याच वेळी खाजगी व्यवस्थेंतील वितरणावर विनाकारण निर्बंध घातले आहेत. २५० रुपयातील १०० रुपये इस्पितळाला जातात. दिवसाला एक नर्स साधारण ७० लोकांना लस देते तर त्याचे झाले फक्त ७००० रुपये रेव्हेन्यू. महिन्याला झाले १५०,०००. ह्यातून नर्स चा पगार, फ्रिज, इतर स्टाफ, वीज वगैरेचा खर्च काढला तर फार तर २०-३० हजार प्रति नर्स फायदा होतो. मग कुणी भांडण किंवा सरकरने चौकशी वगैरे कार्याला घेतली तर नुकसान. त्यामुळे लस वितरणात कुठल्याही इस्पितळाला गरजेपेक्षा जास्त इंटरेस्ट नाही. मूळ लस निर्मात्याला फक्त १५० रुपये मिळतात. ह्यातून फायदा ५० रूपये जरी असलात तर SSI ला लस निर्माण करण्यासाठी ज्या सुविधा निर्माण करायच्या आहेत त्याचा ३००० कोटी खर्च धरला तर साधारण ६० कोटी लोकांना लस द्यायला पाहिजे. त्या पेक्षा कमी लोकांना लस दिली गेल्यास SSI ची गुंतवणूक व्यर्थ ठरेल. त्यामुळे SSI आणि भारत बायोटेक दोन्ही कंपन्या लस निर्माण वाढविण्यात जास्त रस घेत नाहीत आणि फायझर वगैरेंना देशांत परवानगी मिळू नये ह्यासाठीच प्रयत्नरत आहेत असे वाटते. बँक, आर्मी, रेल्वे, बेस्ट, TCS, स्वीग्गी, ह्या सर्वाना खरे तर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लस घेण्यास आणि त्यासाठी कितीही किंमत देण्यास परवानगी असायला पाहिजे होती. सध्या लस २५०-३०० ह्या माफक किमतीत विकली जाते. ज्या माणसाला ३०० रुपये परवडत नाही तो माणूस सरकारी इस्पितळांत जाऊ फुकट घेऊ शकतो. त्यामुळे खाजगी आस्थापनेवर २५० रुपयांची सक्ती फारच जाचक वाटते. हीच किंमत ३०००-५००० सहज ठेवली जाऊ शकत होती. ह्यातून निर्माण होणार नफा हॉस्पिटल्स, भारत बायोटेक, SSI इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरू शकले असते. आता अमेरिका आपल्या संपूर्ण जनतेला वॅक्सीन देऊन कोरोनावर मत करेल ह्याची वाट पाहावी लागेल, त्यानंतर फायझर, मॉडर्ना आपला अतिरिक्त साठा भारतांत डम्प करायचा प्रयत्न करतील आणि त्यावेळी कदाचित सरकार निर्बंध काढून ह्या विदेशी संस्थांना फायदा करून देईल. लस निर्माणावर बंधने भारत सरकारने घातली आहे ती तर मेक इन इंडिया च्या पेकाटात घातलेली लाथ आहे. (प्रतिसाद संपादित)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 04/13/2021 - 04:29 नवीन
आपण फक्त सोसू शकतो किंवा परमेश्वराकडे प्रार्थना करु शकतो. _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/13/2021 - 09:14 नवीन
मा.मोदीसेठ यांना अचानक मोठी जवाबदारी पंतप्रधान म्हणून मिळाली आणि वाटेल तसे निर्णय घेण्याची एक वाईट प्रथा या देशात दुर्दैवाने सुरु झाली असे मागील काही उदाहरणांमधून म्हणता येते. मला जे वाटते, तेच योग्य अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या विचाराने देशाचं अधिकाधिक वाटोळ करायला फ़ार मोठा हात आदरणीय मा.पंतप्रधान यांच्या धोरणाचा लाभला आहे, असे म्हणायला आता काही हरकत नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. लशीच्या बाबतीत, लस मोफत द्यायची अजिबात गरज नव्हती, द्यायचीच होती तर ज्यांच्याकडे एकवेळ जेवणाची सोय होऊ शकत नाही अशा लोकांना लस मोफ़त दिली असती तरी चालले असते. दुसरी गोष्ट अशी की, करोनाचे जे वाहक आहेत ते तरुण लोक आहेत, नौकरी, खासगी कंपन्या, कामानिमित्त बाहेर पडणारा सर्वात मोठा जो समुह आहे, त्याचं लशीकरण प्राधान्याने व्हायला हवं होतं, हे करोनाचे वाहक घरी वयस्कर लोकांना करोनाचा संसर्ग देत गेले आणि त्यांच्याच जीवावर ते अधिक बेतल्या गेल्याचे वाढत्या आकडेवारी आणि मृत्युच्या प्रमाणामुळे दिसत आहे. अजूनही केंद्रसरकारचं धोरण नेमकं आणि निश्चित होतांना दिसत नाही. आपण म्हणता तसे, खासगी दवाखान्यात अशा लशींची सोय व्हायला हवी होती. अशा रुग्णालयांना जिथे अशा लस देता येईल अशी किमान सोयीसुविधा आहेत अशा ठिकाणी आपण कंपलसरी लस दिलीच पाहिजे असे आदेश खासगी डॉक्टर ओपीडीवाल्यांना द्यायला हवे होते. खासगी डॉक्टरांना सध्या लशीपेक्षा उपचार करण्यात जास्त इंट्रेष्ट आणि फायदा आहे. विपरित परिस्थितीत भरमसाठ पैसे कमविण्याची संधी करोनाने मिळवून दिली आहे. अपवाद डॉक्टर्स आणि रुग्णसेवा आहेच. डॉक्टरांना दर दोन तीन दिवसांना नव्या गाईडलाइन्स, नव्या काही सुचना त्यामुळे वरतून येणा-या सुचना-डोसेस यावर कार्यवाही होण्यापेक्षा आपल्या मनाला येईल तसेच उपचार डॉक्टर्स करतांना दिसत आहेत. परदेश धोरणांतर्गत काही धोरणे असतील की इतर देशांना लस पुरवठा केला पाहिजे, परंतु देशात अजूनही करोनाचा प्रसार आणि रुग्ण संख्या आटोक्यात येत नसतांना एक निश्चित असे धोरण ठरविता आले नाही, धोरणांचा अभाव एक वर्षानंतरही पूर्वीसारखीच स्थिती आजही आहे, अजूनही त्यात धाडसी असे वाढत्या रुग्णांना ब्रेक लागावे असे काहीही घडलेले नाही. राजकारणासाठी आयुष्य पडलं आहे. सध्या केंद्रसरकार आणि राज्यसरकारांनी एकदा जनतेला सुरक्षित मोडवर आणून ठेवावे आणि राहीलेल्या काळात उखाळ्या-पाखाळ्या चालू ठेवाव्यात असे वाटते. बाकी, सर्वांना 'लश्शीमहोत्स्वासाठी' शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 09:51 नवीन
पण गोव्यात नाही ... हे गौडबंगाल काही समजत नाही ...
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 04/13/2021 - 19:19 नवीन
गोव्यांत कोरोना बऱ्यापैकी पसरला आहे. माझ्या ओळखीचे २ लोक मागील दोन आठवड्यांत मृत्युमुखी पडले आहेतच पण अनेक लोक इस्पितळांत आहेत. एकूण परिस्थिती गंभीर आहे (मुंबई इतकी नसली तरी).
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 02:38 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/nandurbarkar-on-the-way-to-gujarat-as-there-is-no-bed-abn-97-2443073/ आता ही पण चुकी भाजपचीच बरं का!!!! त्यांनी आमच्या पेक्षा जास्त खाटा का ठेवल्या? असेही 20% वाले विचारतील ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 02:42 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/the-work-of-oxygen-tank-in-osmanabad-has-been-stalled-for-over-a-year-msr-87-2442928/ ही पण चुकी भाजपचीच बरं का!!!!! असेही 20% वाले म्हणतील...
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Tue, 04/13/2021 - 08:07 नवीन
त्यामुळे काय अवस्था करून ठेवलीय उस्मानाबाद जिल्ह्याची आम्हालाच माहिती , सोसवतही नाही अन सांगताही येत नाही , मागच्या पंचवार्षिक ला राहुल मोटे नामक व्यक्ती राष्ट्रवादी आमदार म्हणून निवडून आले , आणि राज्यात भाजप , मग काय फोडले राज्यसरकाराच्या नावाने खडे , इतके फोडले कि रस्त्यावरचे खड्डे भरून निघाले असते पण ते शाब्दिक खडे असल्यामुळे रस्त्यावरचे खड्डे तसेच राहिले , असो या पंचवार्षिक ला बाहेरून आलेले शिवाजी सावंत नामक व्यक्ती आमदार म्हणून निवडून आली , यांचे भर सभेत स्टेटमेंट होते "अख्या महाराष्ट्राला भिकेला लावीन पण शिवाजी सावंत कधीही भिकेला लागणार नाही " तरीही ते निवडून आले अर्थात पैसे वाटूनच , जसे निवडून आले तसे गायब आहेत , काहीतरी बिनसलय उद्धवजी सोबत , म्हणजे मरण आमचेच , कधी भेटले तर कसा सत्कार करायचा याचा पूर्ण आराखडा तयार आहे , पण वाटत नाही अजून तीन साडे तीन वर्षे फिरकेल म्हणून अहमदनगर कडून त्यांच्या हद्दी पर्यंत रस्ता एकदम सुस्थितीत आहे , पण जशी उस्मानाबादची ( भूम परांडा वाशी ) हद्द लागते तसे वैतागून लोक म्हणतात -- गाभण झालो रे , इकडे बार्शी पर्यंतही तेच हाल आमच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि खासदारांना कधी जाग येईल देव जाने ,
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Tue, 04/13/2021 - 10:21 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 04/14/2021 - 08:57 नवीन
अहमदनगर कडून त्यांच्या हद्दी पर्यंत रस्ता एकदम सुस्थितीत आहे , पण जशी उस्मानाबादची ( भूम परांडा वाशी ) हद्द लागते तसे वैतागून लोक म्हणतात -- गाभण झालो रे , शेवगाव सोडून बीडात इन्ट्री केली की असंच वाटतं. बाकी तिकडे छोटे छोटे फ्लाय ओव्हर सारखे रोड चांगले झाले आहेत.तुळजापूर रोड तर खतरनाक भारी झालाय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 02:50 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/pandharpur-election-anand-shinde-targets-devendra-fadnavis-with-a-song/articleshow/82039333.cms शिवसेना आणि कॉंग्रेस, काय प्रतिसाद देतात, हे बघणे रोचक ठरेल...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 03:53 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/antilia-bomb-scare-case-nia-inspector-general-anil-shukla-transferred-to-mizoram/articleshow/82036723.cms कॉंग्रेस जर आक्षेप घेत असेल तर, बदली योग्यच आहे.... हे माझे वैयक्तिक मत आहे.... कॉंग्रेसवर माझा अजिबात विश्र्वास नाही...
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 04/13/2021 - 04:31 नवीन
अनिल शुक्लांची बदली का केली त्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 04:40 नवीन
ज्याअर्थी, कॉंग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला आहे, त्याअर्थी काही तरी पाणी, कॉंग्रेसच्या विरोधात, मुरत असण्याची शक्यता आहे.... कॉंग्रेस जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 04:36 नवीन
पाकमध्ये जाऊन चर्चा करावी' ....... https://maharashtratimes.com/india-news/pdp-chief-mehbooba-mufti-targets-center-on-kashmir-issue/articleshow/82040495.cms कॉंग्रेसने केलेल्या चुकीची फळे, अशी भोगावी लागतात...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/13/2021 - 08:26 नवीन
गेल्या वर्षी मार्च-एप्रील महिन्यामधे दिल्लीत तबलिगींनी केलेल्या गर्दीला करोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत मानलं गेलं होतं, हेच तब्लिगी दिल्लीतील कार्यक्रमानंतर देशभरात गेल्यामुळे करोनाचा देशभर फैलाव झाला अशा पद्धतीने आपल्या सोयीचं गणित मांडून करोनाचं खापर तबलिगीवर फोडण्यात आलं होतं. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारने याहीवर्षी तबलिकी मरकजवर, त्यांच्या होणा-या गर्दीवर बंदी घालावी अशी एक याचिका मा.न्यायालयात केली होती. सदरील याचिकेवर मा.न्यायालय म्हणाले दिल्लीत इतर धर्मिंयांच्या प्रार्थनास्थळांवर बंदी नसेल तर आम्ही यांच्यावर बंदीचे आदेश देऊ शकणार नाही, असे स्पष्ट म्हणाले. तेथे किती लोक जमणार त्याचा अहवाल सादर करावा असे म्हटले आहे. (संदर्भ बातमी ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 04/13/2021 - 08:58 नवीन
बिरुटे सर. सहमत कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नको. निवडक लोकांच्या उपस्थित तो कार्यक्रम पार पाडून आपली परंपरा खंडित होणे टाळावे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/15/2021 - 00:53 नवीन
या बातमीच्या धाग्या मागील सुप्त हेतू दिसला......"बघा सुप्रीम कोर्टाने कशी अल्पसंख्यानख्यान्कांची तळी उचलून धरली आणि सकाळ च्या भाषेत सांगायचे तर "सुप्रीम कोर्टाने सरकारला आणि त्याद्वारे बहुसंख्यान्कांना सुनावले" तब्लिघी किंवा वारकरी दोन्ही कारणाने जर जमाव जमणार असेल आणि रोग वाढायची शक्यता असेल तर दोन्ही वर बंदी हाच योग्य मार्ग = खरा सर्वधर्मसमभाव दुर्दैवाने काही लोकांना तबलिगी वर बंदी केली म्हणजे अन्याय वाटतो ! आणि "अशी आरडाओरड केली " कि आपण किती पुरोगामी आहोत असे वाटते .अझान काय किंवा मोठ्या आवाजातील अवेळीची भजने काय दोन्ही तारतम्य पाहून नाही केले तर त्याचा समाजाला त्रासच होतो आणि दोन्ही वर वचक ठेवायला हिंमत लागते.. आणि ती एकवेळ! भाजप दाखवू शकेल पण मुळु मुळु "गांधीगिरी" वाले कधीच नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 13:32 नवीन
.....नालासोपाऱ्यात ७ करोना रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू.... https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-covid-19-situation-oxygen-shortage-seven-patients-die-bmh-90-2443421/ आता ही अक्षम्य चूक कुणाची?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 04/13/2021 - 17:38 नवीन
या धाग्यात परत एकदा बघितले की नेहमीचे यशस्वी कलाकार- १८९ आणि आर्मस्ट्राँग सारखे तेच तेच बिनबुडाचे मुद्दे मांडत आहेत आणि अशांशी कोणतीही साधकबाधक चर्चा होणे शक्य नाही. हाच प्रकार यापूर्वी अनेक चर्चांमध्ये बघायला मिळाला आहे आणि यापुढेही तसेच होत राहिल यात शंका नाही. तसे असतानाही त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष न करता सारखे- सरकारचे काम दाखवा, सरकारचे काम दाखवा हेच टुमणे लावून नक्की काय मिळते? यातून होते असे की चालू घडामोडींवरील धाग्यात अर्ध्याहून जास्त प्रतिसाद माहितीत कसलीही भर न टाकणारे निरर्थक असतात. अशा सदस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष नाही करता येणार का? आणि तसे काही सदस्य करू शकत नसतील आणि सतत तेच तेच टुमणे लावत असतील तर निदान मला तरी चालू घडामोडींवरील नवा धागा काढण्यात स्वारस्य नसेल. आतापर्यंत ६-८ धागे काढले पण प्रस्तावकाने धागे काढायचे आणि तेच तेच प्रतिसाद देऊन विनाकारण टी.आर.पी वाढवून अन्यथा जितक्या काळात १५० प्रतिसाद झाले असते त्याच्या पाव कालावधीत होतात. आणि त्यातून माहितीत काय भर पडते? तर शून्य.
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 04/13/2021 - 18:19 नवीन
चंद्रसूर्यकुमार यांचे म्हणणे खरे आहे. मुक्त विहारी यांचा विजय झाला आहे असे जाहीर करावे, म्हणजे ते तेच ते प्रतिसाद देणार नाहीत. अक्षरशः वीट आलाय त्यांचे प्रतिसाद बघून. नवीन प्रतिसाद आकडा मोठा असतो पण धागा उघडला की तेच ते आणि तेच ते
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 18:23 नवीन
मग प्रतिसाद द्यायची वेळ येणार नाही....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 18:22 नवीन
तर, गप्प तरी किती बसायचे? कामे दाखवली तर, मी नक्कीच मान्य करीन...
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 04/13/2021 - 19:43 नवीन
सहमत. राजकिय व अन्य काही धाग्यावर मी काही ठराविक आय.डींचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचायला येतो पण तिथे काही निर्बुध्द आय.डींनी घातलेला गोंधळ पाहुन उलटा मनस्ताप होतो. असे काही करता येईल का कि धागा काढल्यानंतर काही ठराविक आय.डींना ब्लॉक करण्याची सुविधा धागा काढणार्याला मिळू शकेल. काही निर्बुध्द आय.डीना हाकलता येईल अश्या धाग्यावरुन मग. अश्या भिकार आय.डीना मिपावरुनच ब्लॉक करण्याची गरज राहणार नाही मग. आणि जर एक ठराविक मर्यादेनंतरही तो आय.डी धाग्यांवरुन ब्लॉक होत राहिला तर त्याला नारळ देता येईल. मिपा तांत्रिक मंडळ असे काही करु शकेल काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/13/2021 - 20:14 नवीन
अशा प्रतिसादांकडे मी बहुतांशी दुर्लक्ष करतो. परंतु तोच तोच निर्बुद्धपणा पुन्हा पुन्हा येत राहिल्यावर नाईलाजाने प्रतिसाद देतो. शून्य माहिती असते, काही कळतही नाही, परंतु मविआ सरकार उत्तम काम करीत आहे, उद्धव ठाकरे उत्तम काम करीत आहेत हे किमान १०० वेळा लिहिलं गेलंय. परंतु अनेकदा विचारूनही केलेले एकही काम सांगता येत नाही. परंतु तोच दावा अजूनही सुरू आहे. शेवटी नाईलाजाने एखादा खरमरीत प्रतिसाद द्यावा लागतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/14/2021 - 01:16 नवीन
कुणीही अनावश्यक भलामण केली की, प्रत्येकवेळी द्यायलाच हवा... थापाडेपणा आणि पळपुटेपणा, अंगात भिनलेली माणसे, त्याशिवाय ऐकत नाहीत...आणि जर प्रतिवाद केला नाही तर मग त्यांच्या अंगात लोचटपणाच भिनतो... एकतर केलेली कामे दाखवा, किंवा जे लिहीले आहे, त्याला काही आधार तरी द्यायला हवा, नाहीतर लिहू नका...हे सांगावे लागतेच...
  • Log in or register to post comments
अ
असा मी असामी Wed, 04/14/2021 - 08:50 नवीन
मुक्त विहारी आणि श्रीगुरुजी ह्यानी तेच तेच प्रतिसाद देउन मनस्ताप करु नये. झोपलेल्या उठवता येत सोन्ग घेतलेल्याला नाही. मुक्त विहारी आणि श्रीगुरुजी ह्याचे बाकिचे लेख आणि प्रतिसाद चागले असतात म्हणुन विनंती
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा