चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल.
ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-senior-leader-sharad-pawar-gave-advice-to-sachin-tendulkar/articleshow/80725877.cms
आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.
🗣 चर्चा
(226)
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 07:40
नवीन
संजय राऊत, यांनी जर ठरवले तर, उद्धव ठाकरे यांना पण पंतप्रधान करू शकतील ... तसा दावा पण त्यांनी केला आहे ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 07:41
नवीन
संजय राऊत, यांनी जर ठरवले तर, उद्धव ठाकरे यांना पण पंतप्रधान करू शकतील ... तसा दावा पण त्यांनी केला आहे ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 07:41
नवीन
संजय राऊत, यांनी जर ठरवले तर, उद्धव ठाकरे यांना पण पंतप्रधान करू शकतील ... तसा दावा पण त्यांनी केला आहे ...
- Log in or register to post comments
स
सॅगी
Tue, 02/09/2021 - 09:15
नवीन
पण भारताचा नाही, अमेरीका किंवा चीनचा...
- Log in or register to post comments
स
सॅगी
Tue, 02/09/2021 - 09:18
नवीन
भारताच्या पंतप्रधानपदासाठी आधीच काका साहेब डोळे लाऊन बसले आहेत (भले त्यांना स्वतःच्या राज्यात एकहाती सत्ता नाही मिळाली तरीही).
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 07:38
नवीन
स्वतः, किमान 100 शेतकर्यांना विचारा आणि मग ठरवा ...
माध्यमांनी सांगीतले म्हणून विश्र्वास ठेवू नका ...
- Log in or register to post comments
स
सॅगी
Tue, 02/09/2021 - 08:28
नवीन
ना आडात...ना पोहर्यात....आणि म्हणे भारतीय जनमत फिरवणार...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/09/2021 - 07:49
नवीन
काल राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. मोदींनी आतापर्यंत संसदेत आणि बाहेरही कित्येक भाषणे केली आहेत त्यातील मी बघितलेल्या भाषणांमध्ये सगळ्यात उत्तम मुद्देसूद भाषण कालचे नसले तरी सर्वोत्तम भाषणांपैकी एक नक्कीच होते. त्यांनी मांडलेल्या इतर मुद्दयांवर भरपूर चर्वितचर्वण होत राहिल पण त्यांनी मांडलेला एक मुद्दा मला महत्वाचा वाटला.
लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी कृषीक्षेत्रात सुधारणा करायला सुरवात केली होती. अर्थात एपीएमसीची मक्तेदारी मोडणे वगैरे स्वरूपाच्या त्या सुधारणा नव्हत्या तर शेतीचे उत्पादन वाढविण्यासंबंधी होत्या. त्यावेळीही तत्कालीन 'आंदोलनजीवी' लोकांनी देशभरात निदर्शने केली होती आणि शास्त्रीजींच्या या निर्णयांना विरोध केला होता. तसेच त्यांना अमेरिकाधार्जिणे वगैरे पण म्हटले होते. म्हणजे एकूणच या आंदोलनजीवी लोकांना सतत कोणत्यातरी गोष्टीला किंवा व्यक्तीला विरोध केला नाही तर अन्न गोड लागत नाही असे दिसते. आणि विशेष म्हणजे या लोकांना कोणी शिव्या घालायला नवीन माणूस/गोष्ट सापडली की पूर्वी ज्याला शिव्या घालत होते तो कित्ती कित्ती चांगला होता असे वाटायला लागते. या आंदोलनजीवी लोकांमध्ये प्रत्यक्ष आंदोलनात उतरणारे लोक असतात तसेच योगेन्द्र यादवांसारखे स्वतः आंदोलनात न उतरता पुढेपुढे करणारे उपटसुंभही असतात. तसेच समाजवादी/डाव्या विचारांचे प्रोफेसर वगैरे ढुढ्ढाचार्य मंडळींपासून सामान्य फेसबुकींपर्यंत अनेक लोकांची सहानुभूती त्यांना असते. हेच लोक स्वतः किंवा आपले पूर्वसुरी इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरूध्द कसे प्राणपणाने लढले आणि त्यांनी लोकशाही कशी वाचवली याचे गोडवे अगदी २०१३ पर्यंत गात होते. पण २०१४ पासून तीच आणीबाणी कशी अनुशासनपर्व होते आणि सामान्य लोकांना कसा त्रास त्यात झाला नाही ही उलटी टेप त्यांनी वाजवायला सुरवात केली. मला वाटते ही पोपटपंची मिपावरही मागे झाली होती. नुकत्याच दिवंगत झालेल्या पुष्पा भावेंच्या पुस्तकातही अशा स्वरूपाचा उल्लेख सापडला. म्हणजे मोदी हा शिव्या घालायला नवीन बकरा मिळाल्यावर पूर्वी हे लोक शिव्या घालायचे त्याच इंदिरा गांधी यांना खूप चांगल्या वाटायला लागल्या. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना शिव्या घालायचे पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून वाजपेयी कित्ती कित्ती चांगले होते हे कौतुक त्यांनी सुरू केले. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्या आर्थिक सुधारणांच्या नावाने खडे फोडायचे (हे अगदी याच गोतावळ्यातील पी.साईनाथ यांच्या १९९६ मध्ये प्रकाशित झालेल्या Everyone loves a good drought या पुस्तकातही वाचायला मिळेल). पण आता तेच लोक मनमोहनसिंगांना १९९१ च्या आर्थिक सुधारणांचे श्रेय देतात.
एकूणच सतत कोणाला तरी शिव्या घालत राहायचे आणि शिव्या घालायला नवीन माणूस सापडला की जुना कित्ती कित्ती चांगला होता याचा साक्षात्कार असल्या लोकांना होत असतो. मोदींनी कालच्या भाषणात असल्या लोकांना उघडे पाडले हे नक्कीच.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 08:39
नवीन
पिक्चर अभी बाकी है....
अभी तो सिर्फ मोदी और शहा है, तो ये हालत है. कल, शहा और योगी आयेंगे तो, कुछ गाड़ियाँ जरूर पलटेगी ...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/09/2021 - 08:50
नवीन
आंदोलनजीवी...म्हणने, मनमोहन सिंग यांच्या धोरणाचा उल्लेख करणे आणि ज्यांना देशद्रोही खलिस्तानवादी म्हटले आज त्याच शिख समुदायाबद्दल अभिमान वाटतो, हे म्हणने शेठचा उत्तम खोटारडेपणा कसा आहे त्यावरही लिहितो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
काळे मांजर
Tue, 02/09/2021 - 09:13
नवीन
1984 शीख दंगल , शीख खलिस्तानी आहेत , वगैरे काँग्रेसविरुद्ध प्रचार करूनही पंजाब राज्य निवडणुकीत मागचे भाजप सरकार हाकलून 2018 ला काँग्रेसमित्र सरकार आले, भाजपला ऑपरेशन लोचट करायलाही स्कोप नाही , इतके जोरात हाकलले आहे.
म्हणून भाजपे शिखांवर चिडून असावेत
महाराष्ट्रात सत्ता गेल्यावर हे मुंबईलाही पीओके म्हणत होते
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/09/2021 - 09:20
नवीन
मोदींच्या कालच्या भाषणात नक्की कुठे देशद्रोही खलिस्तानवादी हा उल्लेख होता?
यातून तुम्ही सगळे शीख आणि खलिस्तानवादी एकाच पारड्यात तोलत आहात हे लक्षात येत आहे का?
- Log in or register to post comments
स
सुक्या
Tue, 02/09/2021 - 19:10
नवीन
चंद्रसूर्यकुमार,
तुम्हाला उत्तर मिळणार नाही. लिहुन घ्या.
ते फुसुकली सोडुन गायब होतात ...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/10/2021 - 06:51
नवीन
आदरणीय पंतप्रधानांना गप्पा मारायची इतकी सवय लागलेली आहे की, दिवस रात्र कुठल्यान कुठल्या तरी वाहिन्यांवर त्यांचं भाषण उर्फ गप्पा चालू असतात त्यामुळे त्यांच्या विचारात आता नवीन काहीच नसते. तरीही आपल्याला कालचं राज्यसभेतील भाषण आवडलं, असेल तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा आदर आहेच.
काल पंतप्रधानांनी राज्यसभेत केलेल्या भाषणांपेक्षा इतर सदस्यांनी केलेली भाषणं अगदी मुद्देसूद आणि देशाकडून असलेल्या नवनव अपेक्षा आणि विचार मांडणारा होता, तो खरं तर वेगळा विषय आहे. भाषणाच्या सुरुवातीच्या पासून स्वातंत्र्याच्या पर्व साजरे केले पाहिजे असे म्हणनारे पंतप्रधानांनी जगाच्या देशाकडून अपेक्षा वगैरेच्या पुड्या नेहमीप्रमाणे सोडल्या. करोनाच्या काळात केलेले काम, आम्ही केलेलं काम, आम्ही निर्माण केलेली व्हॅक्सीन, हे सांगतांना करोना काळात अनेकांचे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावर मात्र डोळेझाक केलेली दिसली. भारताचा राष्ट्रवाद कसा निस्वार्थी आहे, हे कालच्या भाषणात त्यांनी सांगितले. नेताजी सुभाष चंद्र बोस, त्यांच्या विचारांना आम्ही विसरुन गेलो. भारत लोकतंत्र की जननी है, असे ते म्हणत होते. पण, आपल्या पंतप्रधानांनाच लोकशाहीची जी मुल्य आहेत त्याचा त्यांना विसर पडत चाललेला आहे असे दिसते.
भारत सर्वात मोठा इंटरनेट वापरणारा दुसरा देश आहे, असे ते कौतुकाने म्हणत होते. परंतू लोकांच्या विचारांची गळचेपी करायची असली तर इंटरनेट बंद कसे केले जाते तो भाग सर्वांनी शेतकरी आंदोलनात पाहिला आहे, जम्मू काश्मिरमधे टूजी सुविधा होती आता अमेरिकेने केलेल्या टीकेनंतर जम्मू काश्मिर मधे फोरजी सुरु झाले तो काही योगायोग नव्हता, नाही. माझं सरकार गरीबोकी समर्पीत आहे, असे म्हणत असतांना वाढत्या महागाईचा फटका फक्त गरिबांना बसतो. पूर्वी प्रयत्न केले गेले आहेत, आता त्यात वाढ केली पाहिजे, हे स्वत:च कबूल केले. शेतक-यांच्या घटत्या जमीनी, निवडणूका आल्या की योजना येतात, असे म्हणतांना या सरकारांनीही तेच केलं हे ते विसरुन जातात. शेतकरी बँक खाते, शेतकरी विमा, शेतकरी कर्ज, यात आम्ही सुधारणा केल्या. सिंचन सुविधा आम्ही दिल्या. देशात प्रत्येक सरकारांनी कृषी सुधारणांचा विचार मांडला होता हे सांगतांना, शास्त्री, शरद पवारांचा उल्लेख केला, या नेत्यांनी कृषीसुधार कायदे आवश्यक आहे, असे म्हटल्याचे त्यांनी म्हटले. शास्त्रींच्या काळात कृषीमंत्री व्हायला कोणी तयार होत नव्हतं, त्याची गोष्ट त्यांनी सांगितली. तरीही, देशाच्या भल्यासाठी त्यांनी पावले उचलली. आज मागील सरकारांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचं कौतुक करावे लागले, हा मोठेपण त्यांच्या अंगी आलं याचं कौतुक केलं पाहिजे. आम्ही आणलेल्या कृषी कायद्यातही काळाप्रमाणे सुधार करु हे त्यांना सांगावे लागले. मा.पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विपणन व्यवस्थेच्या अडचणीमुळे आपला शेतमाल विकता येत नाही. देशाच्या मोठ्या बाजारातली व्यापक अडचणी दूर केल्या पाहिजे या त्यांच्या विचारांचे कोट वाचून दाखवले.
प्रत्येक कायद्यात सुधारणा कराव्याच लागतात, हे त्यांना वारंवार म्हणावे लागले. शेतक-यांना समजावून सांगितलं पाहिजे. कृषीमंत्री शेतक-यांशी सतत चर्चा करीत आहेत, एकमेकांशी संवाद सुरु आहे. आंदोलन करणे हा आपला हक्क आहे, वयस्कर लोक आंदोलनात बसलेले आहेत, आपण आंदोलन संपवा. सदन के माध्यमसे निवेदेन करता हू चर्चा करते रहेंगे. किमान आधारभूत भाव होते, आहेत, आणि पुढेही राहतील. बाजारसमित्या अधिक आधूनिक झाल्या पाहिजेत.
पंजाबने जे सहन केलं त्या बटवा-याची गोष्ट सांगावी लागली, दंगलीची गोष्ट सांगावी लागली. सर्वांनी पाहिलं आहे, असे म्हणत असतांना शीख समुदायाबद्दल बोलतांना अभिमान आहे, असे म्हणत असतांना शीख समुदायाबद्दल जी भाषा बोलली जात आहे, खलीस्तानी देशद्रोही याचा उल्लेख न करता, शीखांच्या मनात काही वाईट भरवल्या जात आहे,या समुदायाचं मोठं योगदान आहे, त्यांचा अभिमान आहे असे त्यांचा वाढता विरोध पाहता त्यांना म्हणावे लागले.
आपल्या देशात श्रमजीवी आहेत, बुद्धीजीवी आहेत, आणि आंदोलनजीवीचा उल्लेख केला. आंदोलन करणा-यांवर टीका केली. या देशात स्वातंत्रसंग्रामापासून विविध आंदोलने झाली आहेत, हा आता ती गोष्ट वेगळी की ज्यांचा स्वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलनात सहभागच नव्हता त्यांना स्वातंत्र्य आंदोलनाची धग काय समजणार. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न याच सरकारांने केला. खिळे ठोकले, इंटरनेट बंद केले, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखले केले, त्यांना आंदोलन काय समजणार असे तरी कसे म्हणावे. पेट्रोल दरवाढ झाल्यावर भाजपाच्या इराणी यांनी केलेले आंदोलन, रथयात्रा, या आणि अशा विविध गोष्टीसांथी अनेक पक्षांनी आंदोलन केले आहे. आत्ताच एक जुना व्हीडीयो नितीन गडकरीचा पाहात होतो, ते म्हणतात आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे.देशात भ्रष्ट नेत्याच्या, सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा नागरिकांना अधिकार आहे, संविधानात तो अधिकार आहे. असे असतांना आंदोलनजीवी म्हणून हेटाळणी करणे हा पंतप्रधानाच्या विचारांच्या सीमा दाखवत आहे.
एकूणच आंदोलन मागे घ्या, चर्चेस या. करोना काळात देशाने मोठी आव्हाने पेलली. शुर जवानांनी सीमेवर जशास तसे उत्तर दिले, असे गोड गोड बोलुन भाषणाचा समारोप केला, त्यामुळे या भाषणात नवं काही नव्हतं. पण, सावध भूमिका होती, असे फार फार तर म्हणावे असे वाटते.
जाता जाता, काल अमोल कोल्हेंचं छोटेखानी भाषण उत्तम वाटलं, ते लिहिलं असतं पण प्रतिसाद लांब होईल. परदेशातील लोकांनी भारताचं कसं कौतुक केलं त्यावर बोलतांना ते म्हणाले, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लस मिळाली म्हणून आम्हाला संजीवनी दिली म्हणतात आपण खूश होतो, पण एखाद्या परदेशी व्यक्तीने मानवतावादी दृष्तीकोनातून शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत टीपन्नी केली असेल तर तर ती फॉरेन रीष्टक्टीव्ह आयडॉलॉजी होते, हे बॅरीकेट्स लावणे, तटबंदी उभारणे, खोळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे, असे त्यांनी विचारले.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुक्या
Wed, 02/10/2021 - 07:14
नवीन
"प्रत्येक कायद्यात सुधारणा कराव्याच लागतात, हे त्यांना वारंवार म्हणावे लागले. शेतक-यांना समजावून सांगितलं पाहिजे. कृषीमंत्री शेतक-यांशी सतत चर्चा करीत आहेत, एकमेकांशी संवाद सुरु आहे. आंदोलन करणे हा आपला हक्क आहे, वयस्कर लोक आंदोलनात बसलेले आहेत, आपण आंदोलन संपवा. सदन के माध्यमसे निवेदेन करता हू चर्चा करते रहेंगे. किमान आधारभूत भाव होते, आहेत, आणि पुढेही राहतील. बाजारसमित्या अधिक आधूनिक झाल्या पाहिजेत."
यात प्रोब्लेम काम आहे ? जर प्रोब्लेम नाही तर आंदोलन कर्ते कायद्यात सुधारणा करायला का तयार नाहीत? एम एस पी पे कानुन बनाओ असे म्हनतात ... मला सांगा .. कानुन असे रस्त्यावर बनतात काय ?
"खिळे ठोकले, इंटरनेट बंद केले, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखले केले, . . . "
का करावे लागले हे ? २६ जानेवारी ला काय झाले ते विसरलात काय?
जाउ दे .. डोक्यावर दगड आपट्ला काय किंवा डोके दगडावर आपट्ले काय ... त्रास डोक्याला होतो ...
- Log in or register to post comments
स
सुक्या
Wed, 02/10/2021 - 08:20
नवीन
प्रा. "अमुकढमुक" एका महविद्यालयात क्लिष्ट असा गणित विषय शिकवतात. दर वर्षी काही मुले पास होत काही नापास. काही नापास मुले प्राध्यापकांच्या केबिन मधे जाउन रडुन भेकुन स्वतः ला पास करुन घेत. प्रा. "अमुकढमुक" यांची बदली झाली आणी प्रा. "सुक्या" तो विषय शिकवायला लागले.
मुलांनी आपल्या बळावर पास व्हावे हा प्रा. "सुक्या" यांचा नियम. त्यासाठी विना शुल्क शिकवनी वर्ग पण घ्यायची त्यांची तयारी होती. तरीही काही मुले नापास झाली. ह्या नापास मुलांनी प्रा. सुक्या शिकवत नाहीत, लक्ष देत नाहीत अशी तक्रार केली. झाले स्टुडेंट काउनसिल ने लगेच कालेज कँटीन वर धरने आंदोलन सुरु केले. प्राचार्य बोलनी करण्यासाठी गेले ... "आधी सगळ्या नापास मुलांना पास करा ... मगच बोलु" अशी मागणी पुढे आली.
असे पास करता येत नाही असे प्राचार्य सांगत होते पण कुनीच ऐकले नाही. बघता बघता आंदोलन वाढले. बाकी कालेज मधीच विद्यार्थी पाठिंबा देउ लागले ... इतकेच काय हार्वर्ड मधील विद्यार्थी पण पाठिंबा देउ लागले. प्रकरण वाढले.
"आधी सगळ्या नापास मुलांना पास करा ..प्रा. सुक्या यांची बदली करा . . . पुढचा पेपर सोपा काढा . . . . मगच बोलु" ह्या विद्यारथ्यांच्या मागण्या पुढे आल्या ...
आता मला सांगा ...
प्राचार्यांनी विद्यारथ्यांच्या मागण्या मान्य कराव्या ... की नाही ?
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 02/10/2021 - 08:51
नवीन
खी खी खी
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/10/2021 - 08:55
नवीन
अगदी समर्पक प्रतिसाद.
- Log in or register to post comments
क
काळे मांजर
Wed, 02/10/2021 - 09:01
नवीन
सुक्याने सहावी नंतर शाळा सोडली होती म्हणे
तरीही 2018 मध्ये अचानक बी ए , एम ए ची सर्टीफिकेट उपजली म्हणे
स्ट्रेंथ चे स्पेलिंग येत नाही , suck चा उच्चार येत नाही. मग बाकी 130 कोटींनी काय घोडे मारले ?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 02/10/2021 - 09:26
नवीन
नावाने फक्त सुक्या पण 6 वी मधून सरळ ba पास .
करामती आहे सुक्या
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 09:32
नवीन
काळे मांजर, हे तुमच्या कंपूत येऊ शकतात ....
पण हा आयडी कधी गायब होईल किंवा किती दिवस राहील, ते सांगता येत नाही ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 09:29
नवीन
अजून किती येतील?
ते माहिती नाही ....
मिपाकर सहनशील आहेत ....
जिन के घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/10/2021 - 10:36
नवीन
म्हणजे प्रत्यक्षात कंपांऊंंडर असणारा भोंदू जगाला आपण डॉक्टर आहोत जसं सांगतो तसंच का?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 13:34
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
स
सॅगी
गुरुवार, 02/11/2021 - 04:26
नवीन
हे सगळे दावे एका अशा व्यक्तीने केले जी कधी बालवाडीही शिकली नव्हती म्हणे.
कारण त्या व्यक्तीला प्रा.डॉ.सुक्यांच्या जागेवर आपला चेला बसवायचा होता म्हणे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 09:27
नवीन
जनरेटा काय म्हणतो?
अमेरिकन नागरिक काय म्हणतात?
हे महत्वाचे, गुणवत्ता दुय्यम...असेच आजकाल समजल्या जाते...
त्यामुळे, प्राचार्यांनी, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात...
गुणवान विद्यार्थी, देश सोडून गेले तरी हरकत नाही ...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 02/10/2021 - 09:13
नवीन
काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नव्हती/नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारला नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारे निर्णय घ्यावेच लागतात. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये असा आदेश दिला गेला ती पण परिस्थिती सामान्य नव्हती आणि त्यावेळी जी माहिती उपलब्ध होती त्याप्रमाणे तसे करणे गरजेचे होते म्हणून. आणि कोरोनामुळे भारतात कशा कोट्यावधी केसेस होणार, कसे लाखो लोक मरणार आणि लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशी माहिती देण्यात प्रिन्सटन, जॉन हॉपकिन्स वगैरे विख्यात विद्यापीठातील प्रा.डॉ च होते. त्यामुळे ही असामान्य आणीबाणीची परिस्थिती म्हणून सरकारने लोकांच्या घराबाहेर पडायच्याच स्वातंत्र्यावर बंधन घातले. त्याप्रमाणेच काश्मीरमध्ये मोबाईल फोन सेवांवर अंशतः बंधन घातले गेले. आताही तथाकथित शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाला, लाल किल्ल्यावर तिरंग्याची विटंबना झाली त्यामुळे तो प्रकार परत व्हायला नको म्हणून तिथेही अशी बंधने घालण्यात आली. तुमच्यासारख्यांचे सोडून द्या पण देशातील सद्सद्विवेकबुध्दी ताळ्यावर असलेल्या नागरिकांना तरी यात काही चुकीचे वाटायचे नाही.
भारतात सगळ्या समस्यांवर कोणालाही रामबाण उपाय सापडलेला नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीत सुधारणा करता येऊ शकेलच. मग यात नक्की आक्षेपार्ह काय आहे?
बरं मग?
आंदोलन करणार्यांवर सरसकट टीका केली नाही. तर कुठेही घुसून आंदोलने भरकटवून त्यावर आपली पोळी भाजून घेणार्या प्रवृत्तींवर टीका केली आहे. मोदींनी कोणाचे नाव घेतले नाही पण ही टीका योगेंद्र यादव, मेधा पाटकर वगैरे मंडळींवर होती हे समजायला मला तरी कठीण गेले नाही.
हे मोदींनी पण मान्य केलेच नाही का?
आणि पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणे, राष्ट्रध्वजाची विटंबना करणे, भिंद्रनवालेसारख्या दहशतवाद्याची पोस्टर सर्रास फडकावणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे हे अमोल कोल्हेंनी विचारले नाहीच आणि तो प्रश्न तुम्हीही विचाराल ही अपेक्षा करणेही चुकीचे. मी तर म्हणतो की असले चाळे करणार्या लोकांविरूध्द अगदी कठोर कारवाई व्हायला हवी आणि तेव्हा अशा लोकांना लोकशाहीच्या नावाने बोंब मारायचा काडीमात्र अधिकार नाही. रथाचे चाक जमिनीत गाडले गेल्यावर कर्णाला बरोबर धर्म आठवत असेल तर ते चालायचे नाही. तरीही सरकार असल्या लोकांविरूध्द कडक कारवाई करत नाहीये हाच आक्षेप आहे. बरं अमोल कोल्हेंचा पक्ष ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये सामील आहे त्या पक्षाच्या नेता मंत्री आहे त्याच्या बंगल्यावर नेऊन सामान्य माणसाला मारहाण होते, व्हॉट्सअॅपवर एक चित्र फॉरवर्ड केले म्हणून निवृत्त नौदल अधिकार्याला मारहाण होते वगैरे गोष्टी अमोल कोल्हेंना कधी दिसल्या नसतीलच नाही का?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 09:22
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/10/2021 - 09:35
नवीन
विषय आभाराच्या शेठच्या जिलब्याचा होता....बाकी चालु द्या..! :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 02/10/2021 - 09:41
नवीन
राष्ट्रपतींचे अभिभाषण सरकारच लिहून देत असल्याने ते अभिभाषण म्हणजे सरकारचे धोरण असते. त्यामुळे त्यावरील धन्यवाद प्रस्तावात नेहमी व्यापक गोष्टींवर चर्चा होत असते कारण ती चर्चा सरकारी धोरणावर असते. राष्ट्रपतींना धन्यवाद द्यायचा प्रस्ताव आणि चर्चा म्हणजे 'राष्ट्रपतीजी, वा वा काय मस्त भाषण केलेत म्हणून तुमचे आभार' अशा स्वरूपाची नसते हे गेल्या कित्येक वर्षातील संसदीय चर्चेवरून कळेलच.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Wed, 02/10/2021 - 19:33
नवीन
हे एका प्राध्यापकाला सांगावे लागते !
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
गुरुवार, 02/11/2021 - 01:51
नवीन
+११
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 02/11/2021 - 12:18
नवीन
सहमत !
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
गुरुवार, 02/11/2021 - 01:51
नवीन
+१
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 02/11/2021 - 02:54
नवीन
परदेशी व्यक्तीने मानवतावादी दृष्तीकोनातून
अहो प्राध्यपक महाशय तुम्हाला पाहिजे त्या छोट्या आणि मोठ्या फुसकुल्या सोडून जाता .. आणि वर हि मखलाशी कि "चालुद्या"
कधीतरी रोख ठोक उत्तर द्या! प्राध्यपक आहात ना !.. वर्गात काही विद्यार्थी "हे असे का किंवा पटत नाही "असे विचारात असतीलच ना
तसं समजा
यात आपण शीख समुदायाचाह उल्लेख केलं...
यावर मी काही मुद्दे उपस्थित केले होते त्यावर तुम्हाला सरळ सरळ विचारतो... काहीच वाटत नाही?
परत लिहतो
- कळकळीचे शेतकरी आंदोलन आहे तर जगभर शीख धर्माचे आंदोलन सारखा प्रचार का चालू आहे ? निशाण साहेब आणि गुरुमुखी चा कानडा आणि ऑस्ट्रेलियातील समर्थक पाट्या शी काय संबंध ?
आणि जाता जाता डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविधांबद्दल
परदेशी व्यक्तीने मानवतावादी दृष्तीकोनातून .. वाह काय बात है.. मिया खलिफा चा भारतीय शेतकर्यांनशी संबंध काय तर हा असा
- मी जेवणात भाजी खाते
- शेतकरी भाजी पिकवतो
- म्हणून मी यावर बोलणार
हे म्हणजे "मी पाणी पितो म्हणून तुकरस्तानात धरणे बांधावी कि नाही यावर मी बोलण्यासारखेच आहे "
अहो एकवेळ मेधा पाटकर आणि सर्व अवॉर्ड वापसी ग्यांग यावर काही बोलली तर ते निदान ऐकून तरी घेऊ शकतो पण ती रिहाना आणि मिया खलिफा ?
आणि या डॉक्टर ना आणि बारामती / पिंपरी चिंचवड च्या दादांना रिहाना यावर बोलली चालते तर मग भारतातील तसेच "सेलेब्रिटी" सचिन आणि लताजी बोले तर ते खुपते?
असालच संबंध भारतीय शेतकऱ्याशी तर लताजी आणि सचिन चा कि रिहाना चा?
हे म्हणजे कसे चित्रपट सृष्टीतील लोक जर डाव्या विचारसरणी चाय बाजूने बोलले तर ते चालेल पण अनुपम खेर, कंगना , परेश रावळ काही सरकारच्या भाजपचं धोरणाच्या बाजूने बोलले तर मात्र ते नाही चालणार ...
अरे काय मोगलाई आहे काय ( होय मोगलाई .. इस्लमोफोबिया मुळे लिहितोय हे आधीच जाहीर करतो )
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 02/11/2021 - 04:18
नवीन
प्राध्यापक महाशयांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले की ते मौनव्रत धारण करतात. त्याच धाग्यावर मग फटकेबाजी करायला येतील पण त्यावर आधी उपस्थित केलेले प्रश्न, मी त्या गावचाच नाही या पद्धतीने सोडून देतील.
उत्तम प्रतिसाद आहे साहेब, पण उत्तर मिळणार नाही
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 02/09/2021 - 10:57
नवीन
मोदींना बाजूला ठेवा... तुम्ही आम्ही सामान्य माणसांबद्दल बोलूयात का? तुम्हाला आहे कि नाही ते माहित नाही पण एक सर्वसामान्य हिंदू म्हणून मला तरी शिखांबद्दल आदर आहेच .. दुर्दैवाने या शेतकरी आंदोलनाचा गैरवापर करून याला विनाकारण जणूकाही हे शिखांचे धर्मयुद्ध आहे असे स्वरूप दिलेले दिसते ...ते तुम्हाला दिसत नाही???
काय झापड बांधलाय राव ?
आहे ना कायदा शेतकऱ्यांचं विरुद्ध ... करा ना आंदोलन .. त्यात शीख धर्म का आणता ?
जगभर ह्याला शीख विरुद्ध इतर असा स्वरूप दिला जातंय जरा उघड्या डोळ्याने पाहत जा ,
पुढल्या निवडणुकीत भाजप आणि मोदींना घरी बसवा जरूर .. हकक आहे तुमचा तो, पण त्या द्वेषामुळे सगळंच तुमहाला काळं दिसायला लागलाय ...
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 02/09/2021 - 10:11
नवीन
न्याय देण्यात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे देशात.आणि ह्या योगी चा उत्तर प्रदेश देशात सर्वात खालच्या स्तरावर आहे.
तिथे जनतेला न्याय मिळणे मुश्कील आहे.
असे योगी चे कर्तृत्व.
आणि ह्यांना भारी त्या योगी चे कौतुक.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Tue, 02/09/2021 - 11:04
नवीन
आता कालचीच घटना पहा...नागपुरात एका गुंडाला लोकांनीच दगडांनी ठेचून ठार केले...महाराष्ट्र पोलिसांना कामाचा जास्त त्रास होऊ नये म्हणुन...
खरोखरंच न्याय देण्यात महाराष्ट्र नंबर 1 वर...मानले पाहिजे!!!
- Log in or register to post comments
स
सुक्या
Tue, 02/09/2021 - 19:24
नवीन
पुण्यात .. अजुन एक गोल्ड्मन ढगात गेले काल ...
रेकार्ड वर गुन्हेगार होते ... पोलिसांना त्रास होउ नये .. म्हणुन परस्पर काम केले ...
- Log in or register to post comments
क
काळे मांजर
Wed, 02/10/2021 - 03:02
नवीन
2014 नंतर गाय गोमांस ह्यावरून लिंचिंगे फार होत होती
हल्ली ती सुरू आहेत की बंद पडली ?
गोव्यात होत नाहीत नै ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/10/2021 - 04:43
नवीन
बाटली बदलली तरी दारू तीच राहते ...
मिपाकर सहनशील आहेत ....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 12:46
नवीन
हे नक्की का?
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 02/09/2021 - 11:04
नवीन
चला यात आता ब्रिगेड आली ..
https://www.esakal.com/pune/sambhaji-brigade-demanded-sachin-tendulkar-be-stripped-his-bharat-ratna-405849?utm_medium=talk_of_town&utm_source=vuukle
काय भाषा बघा... अमृत जणू
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 02/09/2021 - 11:12
नवीन
-सांस्कृतिक दहशदवाद , वारसा हक्क , अदानी अंबानी दलाल ...पातळ रुपी वामन .. करंट्या सचिन... गेलस आता तू आली री आली ब्रिगेड
- आता लता मंगेशकरांबद्दल काय तारे तोडले जातील याची आतुरतेने वाट पहातो आहे
- Log in or register to post comments
क
काळे मांजर
Tue, 02/09/2021 - 12:45
नवीन
आंदोलनजीवी होते म्हणून स्वातंत्र्य मिळाले
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 12:47
नवीन
मोगा कसे आहेत?
- Log in or register to post comments
स
सॅगी
Tue, 02/09/2021 - 12:49
नवीन
काही जणं म्हणतात की चरखा चालवून आणि मीठ उचलुन स्वातंत्र्य मिळाले...
- Log in or register to post comments
क
काळे मांजर
Tue, 02/09/2021 - 12:54
नवीन
सगळेच म्हणतात
मोदीही बोलतात गांधींचा देश म्हणून
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/09/2021 - 12:55
नवीन
जागो मोहन प्यारे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »