Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 02/06/2021 - 18:50
🗣 226 प्रतिसाद
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल. ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-senior-leader-sharad-pawar-gave-advice-to-sachin-tendulkar/articleshow/80725877.cms आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50306 views

🗣 चर्चा (226)
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 14:36 नवीन
पटत आहे
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Mon, 02/08/2021 - 11:59 नवीन
देशाबाहेरील लोकांनीही प्रक्षोभक लिहिले नाही अक्षयकुमार लिहितो तसेच लिहिले आहे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 12:08 नवीन
पण, त्यांना नाक खुपसायचा अधिकार कुणी दिला?
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Mon, 02/08/2021 - 12:33 नवीन
उद्या तुम्ही मिसळपाववर लिहिले होनोलुलुच्या राणीचे केस चांगले नाहीत मग ते नाक खुपसणे झाले का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 14:26 नवीन
1. होनोलुलुच्या कुठल्या नंबरच्या राणीचे केस? 2. वैयक्तिक गोष्टी वेगळ्या आणि देशांतर्गत बाबींवर ढवळाढवळ करणे वेगळे...
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/08/2021 - 16:20 नवीन
ते बाय द वे, रामदेवबाबांचे आंदोलन रात्रीत उखडले तेव्हा या सेलेब्रिटी मधल्या कोणाला दुःख झाले होते काय? तेव्हा ज्यांनी विरोध केला असेल त्यांनीच आज विरोध करावा.. अगदी योया पासून. बाकीच्यांना बोलायचा अधिकार नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 12:07 नवीन
100
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Mon, 02/08/2021 - 12:31 नवीन
मुंबईः महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांची यादी पाठवूनही तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही राज्यपाल कोश्यारी यांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची शक्यता पडताळून पाहण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीनिशी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवायच्या १२ जणांची यादी राज्यपाल कोश्यारींकडे दिली आहे. मात्र कोश्यारी यांनी त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता त्यांच्याविरुद्ध कायदेशीर करण्याचा पर्याय राज्य सरकार पडताळून पहात आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी राज्यपालांनी ही नावे स्वीकारली नाहीत आणि नाकारलीही नाहीत. शिफारशींच्या फाईलवर राज्यपाल अनिश्चित काळासाठी बसून राहू शकत नाहीत. राज्यपालांनी घटनात्मक पद स्वीकारलेले असेल तर त्यांनी एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचा एजंट म्हणून काम करू नये. त्यातून भावी राज्यपालांसाठी चुकीचा संदेश जाईल. हे दुसरे तिसरे काहीही नसून लोकशाहीची हत्या आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यपाल घटनात्मक संकेतांचे पालन करत नसतील तर केंद्र सरकारने त्यांना परत बोलावले पाहिजे, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 02/08/2021 - 13:45 नवीन
राज्यपालांनी त्वरित यादी मंजूर केली पाहिजे. अधिकाराचा गैर वापर करता कामा नये
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/08/2021 - 15:58 नवीन
राज्यपाल, राष्ट्रपती, न्यायालये, महापालिका सारख्या संस्था इ. ना निर्णय घेण्यासाठी राज्यघटनेने कालमर्यादेचे कोणतेही कायदेशीर बंधन घातलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही प्रकरणावर ते अनंत काळापर्यंत बसून राहू शकतात उदाहरणार्थ दयेच्या अर्जावर निर्णय घेणे, खटल्याचा निकाल देणे इ.). असे करणे फार तर अधिकारांचा नैतिक गैरवापर आहे असे काही जण म्हणू शकतील (कारण नैतिकता-अनैतिकता या सापेक्ष कल्पना आहे), परंतु कायद्याच्या नजरेतून हा गैरवापर नाही कारण अनंत काळापर्यंत निर्णय न घेण्याची मुभा कायद्यानेच दिली आहे. सर्व पदांना कोणताही निर्णय घेण्यासाठी घटनेने ठराविक कालमर्यादेचे कायदेशीर बंधन घातले पाहिजे असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 14:28 नवीन
ये बात कुछ हजम नहीं हुई
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Mon, 02/08/2021 - 13:09 नवीन
अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये पाकिस्तानचे समर्थन करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. या ठरावानुसार ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करण्यात येणार आहे. मात्र या ठरावाविरोधात भारताने कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. भारताने हा ठराव म्हणजे स्वार्थी हेतूने मांडण्यात आलेला ठराव असल्याचं म्हटलं आहे. तसेच जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून त्याला भारतापासून वेगळं करता येणार नाही. तसेच भारताने न्यूयॉर्क राज्यातील नवनिर्वाचित प्रतिनिधिंशी भारतीय समुदायाशीसंबंधित चर्चा करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 16:02 नवीन
महाराष्ट्रातील त्रिपक्षीय सरकार नक्की कोणत्या ट्विटची चौकशी करणार आहे बघा-- Image removed. म्हणजे आपला देश महान आहे, आपला देश सार्वभौम आहे या ट्विटची हे लोक चौकशी करणार. धन्य. किळस यायला लागली आहे या प्रकाराची.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/08/2021 - 16:31 नवीन
अक्षयकुमार आणि साईना नेहवाल यांची ट्विट्स एकसारखी आहेत म्हणे. म्हणून यामागे काही कारस्थान, कट, केंद्राचा दबाव वगैरे आहे का याची गुप्तचर विभाग चौकशी करणार आहे. अत्यंत निरूद्योगी असले तरच असा मूर्खपणा सुचतो.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 16:33 नवीन
अक्षयकुमार आणि साईना नेहवाल यांची ट्विट्स एकसारखी आहेत म्हणे. म्हणून यामागे काही कारस्थान, कट, केंद्राचा दबाव वगैरे आहे का याची गुप्तचर विभाग चौकशी करणार आहे. अत्यंत निरूद्योगी असले तरच असा मूर्खपणा सुचतो. घ्या आता मी हे लिहिले त्याला पण केंद्राचा दबाव आहे का? मूर्खपणाचा कळस नुसता. मिपाच्या भाषेत चोप्य-पस्ते कोणी करू शकत नाही का?
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Mon, 02/08/2021 - 18:07 नवीन
Internal Matter ? Modi Led BJP govt approved foreign Funding through Electoral bonds . So if the Govt doesnt want foreigners to interfere in our Country . Why did it allow foreign companies to donate to Indian Political parties . Bjp can very well return their Foreign Donations and keep foreigners away from interfering internal matters of our country. https://www.financialexpress.com/india-news/modi-govt-legitimises-foreign-poll-funding-subramanian-swamy-calls-it-terrible-what-you-must-know/1107290/ बाहेरचा पैसा हवा पण बाहेरचे ट्विट नको, हे म्हणजे ........
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 18:16 नवीन
तुमची मांजर कशी आहे? मोगा कसे आहेत? सचीन उद्दाम पोटे, यांना नमस्कार सांगावा... जागो मोहन प्यारे....
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 02/08/2021 - 20:02 नवीन
काल सुपरबोल पाहताना भारतातल्या (तथाकथित) शेतकरी आंदोलनाची जाहीरात पाहीली आणी नकळत तोंडात शिवी आली. हे आंदोलन भारतातल्या शेतकर्‍यांचे नसुन परकिय शक्ती यात १००% इनह्वाल्व आहे हे माझे मत आता दगडावरच्या रेघे सारखे झाले आहे. ज्या आंदोलनाला सुपरबोल सारख्या प्राइम टाइम मधे जाहीरात देण्याइतका पैशाचा ओघ आहे ते आंदोलन गरीब शेतकर्‍यांचे असुच शकत नाही. सुपरबोल सारख्या प्राइम टाइम मधे जाहीरात देण्यासाठी किती पैसा लागतो हे इच्छुकांनी गुगळुन पहावे. काही अजुन १. रेहाना, जीला आपल्या शहरात , राज्यात काय काय चालले आहे याच्याशी काहीही घेणे देणे नसते. त्या रेहाना ने साता समुद्रा पलीकडे चाललेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करावे इतका पुळका अचानक कसा काय आला? बीलएम किंवा युएस कॅपीटल वर झालेल्या हल्या विषयी तिने किती आटापिटा केला? उत्तर एकच आहे .. पैसा... हे सेलेब्रेटी दाम मोजल्याशीवाय असले काही करत नाही. २. ग्रेटा पर्यावरण कार्यकर्ता आहे. तिचे त्या क्षेत्रातले काम उल्लेखनीय आहे यावर कुनाचेही दुमत नाही. परंतु दुसर्‍या देशातल्या शेतकरी आंदोलनाला टुलकीट दाखवुन पाठींबा देणे हे जरा जास्तच आहे. एकतर हे आंदोलन पर्यावरण क्षेत्रातले नाही, दुसरे ते दुसर्‍या देशात चालु आहे, तिसरे त्या कायद्या विशयी तिला गमभन माहीत नाही. असे सगळे असताना तिला काळजी वाटणे हे जरा जास्तच आहे. बाकी तिने कुठे काय बोलावे याला माझा काही आक्षेप नाही. परंतु पैसे घेउन असे बोलणे यावर माझा आक्षेप आहे. राहील. ३. मिया खलीफा ... पैशासाठी ही बया काहीही करते ... इथे माझे टंकन्श्रम वाचवतो. तस्मात... शेतकरी आंदोलन अगदी परदेशात पोहोचले आहे वगेरे वगेरे मटा टाइप बातम्या ज्यांना खर्‍या वाटतात त्यांनी थोडा अभ्यास वाढवावा. ह्या आंदोलनाला माझा शुन्य पाठिंबा आहे आणी सहनुभुती तर २६ जानेवारी लाच संपली.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 02/08/2021 - 21:07 नवीन
४. टीकैत साहेबांविषयी राहीले ... ज्या पध्ध्तीने टीकैत साहेब गोल गोल फिरत आहेत .. रोज गोल पोस्ट बदलत आहेत त्यावरुन असे दिसते की त्यांना आंदोलन चिघळत ठेवणे यातच जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे ,.. कायदे रद्द करा त्या शिवाय बोलने नाही ... आम्ही सरकार शी बोलु इच्छीत आहोत पण सरकार इंटरेस्टेड नाही ... मग मोदी नी आवाहन केल्यावर ... मोदींचा नंबर कुनाकडे असेल तर द्या ... आम्ही बोलु ... २६ जानेवारी ला लाल किल्ल्यावर जाणारे आमचे लोक नाहीत.... मग सरकार ने खटले भरल्यावर ... शेतकर्‍यांचे खटले मागे घ्या मगच बोलु ... वगेरे वगेरे . . . यात आता शेतकरी बाजुला पडलाय ... आता इगो कुरवाळणे आणी खाल्या मिठाला जागणे चालु आहे ...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 02/09/2021 - 04:51 नवीन
सरकारच गोंधळलेय . हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही असे म्हणायचे मग आतापर्यंत चर्चा कोणाशी केली सरकारने ? अतिरेक्यांशी ?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/09/2021 - 04:56 नवीन
अरे वा! चर्चा केली आहे ? मग हे आंदोलक का म्हणतात की सरकार चर्चा करत नाही ते? मोदींचा फोन नंबर वगेरे मागत होते मागे ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 04:59 नवीन
तर म्हणतात की आधी, कायदे रद्द करा ... ही साम्यवादी हुकूमशाही आहे .... राजन नायर विरूद्ध टाटा
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Tue, 02/09/2021 - 02:50 नवीन
शेतकरी आंदोलनातील पैसा पांढराच आहे, 6 वर्षात प्रगती झाली की शेतकऱयांकडेही भरपूर पैसा आला, हे मोदींजींचे यश आहे काळा पैसा तर नोटांबंदीत मेला आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/09/2021 - 03:14 नवीन
+ १ सुपरबॉल सुरू असताना (ज्यात जाहिरातींचे दर सर्वाधिक असतात) ४० सेकंदाची मोठी जाहिरात देणे याचा अर्थ या तथाकथित आंंदोलनामागे धनाढ्य परकीय स्पॉन्सर आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/09/2021 - 04:44 नवीन
अगदी तगडा स्पॉन्सर आहे .. आणी बहुतेक धर्माच्या नावाखाली पैसा जमा पण होत असेल.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/09/2021 - 03:33 नवीन
"काल सुपरबोल पाहताना भारतातल्या (तथाकथित) शेतकरी आंदोलनाची जाहीरात पाहीली आणी नकळत तोंडात शिवी आली" १००% एकूणच भारताला स्वस्थ बसून द्यायचे नाही यात मग "डेथ बाय थाऊसंड कट" हि जी विचारसरणी आहे ती अश्या संन्ध्या शोधात असते आणि मग असले चाळे सुरु होतात ( मिया खलीफाळा आलेला पुळका! बरं ती आहे लेबनी , भारतीय मुस्लिमसुद्धा नाही ! काय संबंध हिचा ) एक सत्य आहे पण याला केवळ भाजप द्वेषाने आंधळे झालेले बघणार नाहीत .. ते सत्य हे कि जगातील दोन अब्राहमीक आणि विस्तारवादी धर्म जगाला आपल्यात वाटून घ्येण्यासाठी शेकडो वर्षे लढत आहेत त्यात उरले आहेत ते भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ( दोन्ही लोकसंख्येने मोठे ) त्यात भारतातील अति डाव्या विचारसरणीच्या लोकांची परिस्थिती म्हणजे "नाय मुल्ला प्याज हि प्याज खाता है " अशी हे आंदोलन सुरु झाले आणि पंजाब/ भारतापासून हजारो किमी दूर वर प्रथम गुरुमुखीतून पाटी पहिली आणि लगेच लक्षात आला कि फोड अहिंदू आणि शीख, फोड हिंदू आणि जैन / फोड हिंदू आणि बुद्ध आणि त्याचा बरोबर हिंदूंच्यात जातवारवरून आगी लावा याचा हा भाग आहे हे स्फटिकासारखे स्वच्छ दिसत आहे दुरदैवाने भारत सरकार ज्या आक्रमकतेने या "अप्रचाराला " जगात थांबवले पाहिजे उत्तर दिले पाहिजे तेवढ्या आक्रमकतेने उलट प्रोपागंड करतं दिसत नाही .. निदान उत्तर अमेरिकेत तरी करत असतील अशी अपेक्षा करतो ( अगदी सरकार स्पष्ट बोलू शकत नसेल तरी "परिवाराने" तरी बोलले पाहिजे .. मूळ आंदोलन करण्यामागे चांगली कां असतील हि पण या सगळ्यात ती लुप्त पावलेली दिसतात
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/09/2021 - 04:41 नवीन
अगदी खरे आहे हे. ह्यात खरा शेतकरी कुठेच नाही. अगदी पहिल्या दिवसापासुन हे आंदोलन खलिस्तान चळवळ जीवीत करायचे षडयंत्र आहे. आजही ट्वीटर पाहिले तर बहुते (७५%) समर्थक हे शिख धर्मिय आहेत. मिया खलिफा ला "रीस्पेक्ट फोर यु" वगेरे सारख्या कमेंट देउन हे आंदोलक किती खालच्या पातळीवर गेले आहेत हे दिसते. हा सगळा कारभार "शेतकरी आंदोलन" ह्या नावाखाली चालु आहे. म्हनुनच सरकार चे हात बांधलेले आहेत. जरा कुठे सक्ती दाखवली तर हेच लोक सरकार कसे निर्दयी आहे .. मोदी कसे हुकुमशहा आहेत असे गळे काढतील. खरे तर ह्या लोकांना हेच हवे आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची यथेच्छ निंदा करता येइल. गंमत म्हणजे मोदी हेच करत नाहीत. त्या जाहीरातीत "६ ह्युमन राइट व्हायोलेशन" लिहिले आहे. मला अजुनही प्रश्न पडला आहे ... मसाज पार्लर , पिझ्झा पार्लर , मिनरल वाटर, ए/सी तंबु अशा एकाहुन एक सुविधा असलेले हे आंदोलन, ह्यात साला ह्युमन राइट व्हायोलेशन कुठे झाले असेल?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 04:49 नवीन
जे आपल्याला समजते ते, बातमीदारांना का समजत नाही? लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत अशा मोठ्या वर्तमान पत्रांत, तळागाळातील, एकाही शेतकर्याची मुलाखत का नाही? बातमीदारांनी तरी व्यवस्थित शोध घेऊन, गावोगावी जाऊन, शेतकरी वर्गाला, खरोखरच काय अडचणी आहेत? ह्याचा शोध घ्यायला हवा ... हस्तदंती मनोर्यात बसून, काहीही मिळणार नाही ....
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/09/2021 - 04:53 नवीन
अहो मुवि, तळमळीने बातम्या देनारे वार्ताहर कुठे आहेत आता? आता बहुतेक (सन्माननिय अपवाद वगळता) वार्ताहर वडापाव किवा चहा भजी च्या मोबदल्यात बातम्या देतात. कामना च्या बातम्या नाही का सगळे पेपर छापतात... आणी ते "टोला हाणने" वगेरे वगेरे ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 04:56 नवीन
सिंहासन मधला, दिगू आठवला....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/09/2021 - 05:01 नवीन
बहुसंख्य माध्यमे मोदींविरोधी आहेत.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/09/2021 - 05:42 नवीन
असे तळमळीने बातम्या दिल्या तर टिनपाट मुखपत्रातील (ह)ग्रलेखाबद्दल बातमी कशी देता येईल?
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Tue, 02/09/2021 - 05:31 नवीन
कोण शेतकरी आहे कोण नाही हे बघून कसे समजते म्हणे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/09/2021 - 05:40 नवीन
कितीही वेगवेगळे आयडी घेतले तरी तो १०० वेळा हकालपट्टी होऊनही लोचटासारखा परत परत येणारा कागलकरच आहे हे जसे समजते तसेच.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 02/09/2021 - 08:44 नवीन
गडबडा लोळणारी स्मायली
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 08:46 नवीन
हे असे अवतारी बाबा, ह्या पृथ्वीतलावर परत सापडणे मुश्किल आहे ...
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/09/2021 - 05:43 नवीन
कोणता शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली पिझ्झा पार्टी करतो म्हणे ?
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Tue, 02/09/2021 - 06:10 नवीन
Pizza हे स्ट्रीट फूड झाले आहे 30 रु त मिळतो शिवाय पिझ्झा पिकवणारे शेतकरीच आहेत
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/09/2021 - 06:28 नवीन
कुठे होते ही पिझ्झा ची शेती .. मी पण लावेल म्हणतो .. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 06:58 नवीन
ते डुआयडीची पण शेती करतात, अख्खा मानसपुत्र परत आणतात, तिथे पिझ्झा वगैरे किरकोळ गोष्टी आहेत...
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/09/2021 - 06:37 नवीन
फूड कुठलेही असो...३० रु वाला असो वा ३०० रु वाला. रस्ते अडवुन आंदोलनाच्या नावाखाली पिझ्झा पार्टी करणारे शेतकरी नाहीत हेच म्हणणे आहे. बाकी, पिझ्झ्याचे पीक येण्यासाठी काय पेरावे लागते?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 06:52 नवीन
अशा कल्पना सुचतात, असे एक साहित्यिक म्हणून गेले आहेत ...
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Tue, 02/09/2021 - 06:11 नवीन
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलन शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 06:55 नवीन
इथे तर, पंख उडालेले आयडी पण परत येतात .... .बाय द वे, आपले नेहमीचेच प्रश्र्न.... मोगा कसे आहेत? सचीन उद्दाम पोटे, कसे आहेत? जागो मोहन प्यारे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 02/08/2021 - 20:28 नवीन
पण कोणत्या देशांमधून शेतकरी आंदोलन पाठिंबा आहे. ज्यांनी पाठिंबा देण्यासाठी ट्विट केले आहे ते भारताचे शत्रू राष्ट्र नाहीत. मग त्यांना भारत किंवा भारत सरकार ला विरोध का आहे? संबंधित व्यक्ती ज्या देशातील आहे त्या देशातील सरकार कडे भारताने निषेध नोंदवला आहे का? की गुन्हा मुंबई मध्ये आणि fir बिहार मध्ये अशी अवस्था नाही ना. संबंधित देशाकडे रीतसर नाराजी व्यक्त केली नसेल तर इथे त्याचे भांडवल का केले जात आहे. असे काही प्रश्न मनात आहेत. उत्तर कोणाला m
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/09/2021 - 03:45 नवीन
तुम्हाला खरोखरच, हे कायदे नक्की कुणाच्या फायद्यासाठी आहेत? हे जाणून घ्यायची इच्छा आहे का? उत्तर, हो किंवा नाही ... इतकेच द्या ...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 02/09/2021 - 05:37 नवीन
क्युबाने आपली अर्थव्यवस्था खाजगी उद्योगांसाठी काही प्रमाणावर खुली केली आहे. समाजवाद काम करू शकत नाही हे हळूहळू का होईना क्युबासारख्या देशांनाही समजायला लागले आहे असे म्हणायचे का? दुर्दैव हे की ज्या भांडवलशाहीवर युरोप-अमेरिकेची समृध्दी उभी राहिली त्यांना मात्र आता समाजवादाचे भिकेचे डोहाळे लागले आहेत :( https://www.bbc.com/news/world-latin-america-55967709
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 02/09/2021 - 06:34 नवीन
हेच लिहायला इथे आले होते पण आपण आधी लिहिले. आता अमेरिकेने क्युबा वरील बहुतेक निर्बंध काढले तर ह्या शतकांतील सर्वांत मोठी सक्सेस स्टोरी ठरेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/09/2021 - 07:04 नवीन
रीयाना ची एवढी ताकत आहे की अमेरिकन जनमत फिरवू शकते असे वाचले आहे. त्या मुळेच धसका घेवून सरकार का तिच्या विरोधात ट्विट करायला लागले. आणि आपल्या chamkesh सेलिब्रिटी ना पण tweet करायला भाग पाडले. पण सचिन,लता आणि बाकीचे ह्यांची एवढी तकत नाही की ते भारतीय जनमत फिरवू शकतील.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 02/09/2021 - 07:28 नवीन
एके काळी अशी क्षमता प्रशांत किशोर कडे आहे असे देखील म्हटले जायचे.. फक्त एक लक्षात ठेवायचे - आडात असेल तरच पोहर्यात येते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा