चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल.
ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-senior-leader-sharad-pawar-gave-advice-to-sachin-tendulkar/articleshow/80725877.cms
आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.
जर अमित शहांनी आश्चासन देऊन आयत्या वेळी ते पाठ फिरवत असतील असे यांचे मत असेल तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत भाजपला पाठिंबा देणार नाही असे ठाकरे म्हणाले असते ते समजू शकतो.ठाकरेंनी तेच केले होते. परंतु त्यामुळे, ज्यांना चक्की पिसायला फडणवीस तुरुंगात पाठविणार होते, त्यांनाच क्लीन चिट देऊन त्यांच्याचबरोबर फडणवीसांनी सरकार स्थापन केले. फडणवीस सत्तेसाठी सर्व नीतिमत्ता विसरून कोणाहीबरोबर जाऊ शकतात हे दिसले व आपल्याला मुख्यमंत्रीपद तर सोडाच, कदाचित ५ वर्षे विरोधात बसावे लागेल, हे सुद्धा ठाकरेंच्या लक्षात आले असावे. अशावेळी काकांनी बरोबर फिल्डिंग लावली, सेनेला पाठिंब्यासाठी कॉंग्रेसला राजी केले व फडणवीस-अजितदादांचे ओटघटकेचे सरकार इतिहासजमा केले. सेना-भाजप एकत्र आले तर आपल्याला अजून ५ वर्षे विरोधात बसावे लागेल. तोपर्यंत आपला पक्ष संपलेला असेल हे दोन्ही कॉंग्रेसच्या लक्षात आले असणार. त्यापेक्षा आपल्या तालावर चालणारे मुख्यमंत्री व सरकार आणून व त्यात महत्त्वाची मंत्रीपदे मिळवून काकांनी सर्व दृष्टीने बाजी मारली.तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो?ज्या न्यायाने भाजपने कर्नाटकात देवेगौडांंबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने उत्तर प्रदेशात मायावतीबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली होती, त्याच न्यायाने शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करण्याचा अधिकार मिळतो.समजा या कारणाने विधानसभा विसर्जित करावी लागून परत निवडणुक घ्यायला लागली असती तर मध्यावधी निवडणुक घ्यायला लागायचे पाप भाजपच्या माथी मारून हे उजळ माथ्याने मतदाराला सामोरे जाऊ शकले असते.हेच भाजपलाही करता आले असते. पण ते करण्याऐवजी भाजपने राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती करून मतदारांचा विश्वासघात केला.पण हा जो प्रकार शिवसेनेने केला आहे तो सत्तेसाठी जनमताचा अपहारच झाला.भाजपने राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणे हा सुद्धा जनमताचा अपहारच होता. भाजप व शिवसेना या दोघांनीही अत्यंत चुकीच्या गोष्टी करू जनमताचा व दिलेल्या आश्वासनांचा अवमान केला आहे. दोघेही समान दोषी आहेत.फडणवीस-चंपांबरोबर आणखी कोणी दोषी आहे हे वाचून संतोष जाहला :)शिवसेनेचा मी कधीच समर्थक नव्हतो. या पक्षाशी युती करून भाजपने आत्मघात केला हे माझे १९८९ पासून आजतागायत मत कायम आहे.