Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/02/2021 - 09:31
🗣 266 प्रतिसाद
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे. म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61966 views

🗣 चर्चा (266)
स
सुबोध खरे Sat, 02/06/2021 - 06:45 नवीन
हे सरकार पडणार नाही कारण सरकार पडले तर पुढची चार वर्षे विरोधी पक्षाच्या बाकांवरच बसावे लागेल हे सर्व आमदारांना माहिती आहे आणि मग मंत्रीपदे महामंडळांची अध्यक्षपदे ता दूरच कुठल्याही सरकारी कार्यालयात आपली कोणतीही

कामे

होणार नाहीत हे माहिती आहे. गुळाला चिकटलेला मुंगळा मरेपर्यंत आपली पकड सोडत नाही. त्यामुळे धुसफूस करत का होईना पण चार वर्षे सरकार चालणार आहे. बाकी तत्वनिष्ठा वगैरे शब्द केंव्हाच कालबाह्य झालेले आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 07:00 नवीन
शिवसेनेची कवचकुंडले (मराठीप्रेम आणि हिंदूत्व) जर, आपोआप गळून पडत असतील तर, मुद्दाम शिवसेनेला वाचवायला कुणीही जाणार नाही... काकांनी योग्य गेम केली आहे .... तुम लढो, हम कपडे सम्हालते है... मराठी माणसांचा आता एकही पक्ष नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ... अजूनही कुणी, शिवसेना ही मराठी माणसांची तारणहार आहे, असे म्हणत असेल तर, त्याला, "केम छो वरली..."
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/06/2021 - 08:50 नवीन
मराठी माणसांचा आता एकही पक्ष नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ... आता? म्हणजे यापूर्वी मराठी माणसांचा एखादा पक्ष होता का? मग कोणालाच तो पक्ष कसा माहिती नाही?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 02/06/2021 - 17:41 नवीन
पूर्ण वेळ टिकणे अशक्य. मुंबई मनपाच्या निवडणुका येऊ द्यात हो.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 02/05/2021 - 06:50 नवीन
माझ्या मते सरकारने विनाकारण ग्रेटा आणि रियाना ला महत्व दिले. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मठ्ठ जावडेकर किंवा कुडबुडे रविशंकर प्रसाद ह्यांना पुढे काढायला पाहिजे होते. ग्रेटा आणि रिहाना ह्यांचा तो सर्वांत मोठा अपमान ठरला असता.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 02/05/2021 - 06:53 नवीन
माझ्या मते रामदास आठवले ह्या साठी योग्य ठरले असते.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 02/05/2021 - 07:17 नवीन
अरे हो विसरलेच कि.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 08:15 नवीन
चंद्रकांत पाटील किंवा रावसाहेब दानवे सुध्दा चालतील.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 02/05/2021 - 17:35 नवीन
या कामासाठी संजय राऊत कसे वाटतात ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 02/06/2021 - 10:28 नवीन
ते अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष शिवसेनेचा कसा होईल त्याच्या तयारीत गुंतलेले आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 02/05/2021 - 07:03 नवीन
पण ती अत्यंत हुशार आहे तिचे कार्य खूप मोठे आहे. जग तिचा खूप आदर करते.भारत सरकार काय तिला जबाब देणार आणि दिल्ली चे अती शहाणे पोलिस काय तिच्यावर कारवाई करणार. दिल्ली मधील गुन्हेगार ह्यांना हातोहात फसवतात चालले ग्रेटा वर fir नोंदवायला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 07:31 नवीन
इतकेच Qualification पुरेसे आहे, नाही का? आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, "गोरा बोला, वहीं सही....गोरा बोला नाचो, तो नाचेंगे, और, गोरा बोला, कपडे निकालो तो,निकालेंगे ....भगवान के बाद, कोई सच्चा है, तो वो गोरा है....फिर वही गोरा, तुम्हें नंगा छोड देता है....ब्रिटिश लोगोंने ऐसा ही किया था...." वरील वाक्ये सामान्य आहेत, हा इतिहास आहे .... भारताच्या अंतर्गत मामल्यात इतर कुठल्याही परदेशी व्यक्तीने किंवा देशाने, ढवळाढवळ करू नये....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 02/05/2021 - 07:57 नवीन
ही सांगायची एवढी हिम्मत भारताकडे आहे . आणि कोणत्याच परक्या देशाच्या दबावाखाली भारत येत नाही. मग पोखरण मध्ये लपतछपत का अणू परीक्षण केले. जाहीर करून बिन्धास्त का अणू परीक्षण केले नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 02/05/2021 - 08:12 नवीन
राजेशभाऊ तुम्ही लिहीत राहा.. तितकाच आम्हाला विरंगुळा ☺️☺️
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 09:10 नवीन
अहो, हे तर काहीच नाही .... आमचे काही स्नेही होते.... सचीन, उद्दाम, पोटे, इत्यादी .... त्यांच्या मौलिक ज्ञानाचे, मिपावर बरेच कण विखूरले आहेत ...
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/05/2021 - 17:40 नवीन
मोगा आणि तर्राट जोकर यांनाही ऍड करा त्या लिस्ट मध्ये.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/05/2021 - 17:40 नवीन
आणि काळी मांजर ( ब्लॅक कॅट ) सुद्धा.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Fri, 02/05/2021 - 17:45 नवीन
हे तेच का? माझ्या मते ते तर एका विशिष्ट धर्माचे होते ना?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/05/2021 - 17:49 नवीन
ते राहुल गांधींप्रमाणे मल्टि धर्मीय होते. कधी देऊळ.. कधी टोपी.. कधी जनेयुधारी, कधी आजीकडे जाऊन पोप चे दर्शन.. कधी दलित.. हे सर्व उडालेले ID पण असेच.. कधी इकडे तर कधी तिकडे...
  • Log in or register to post comments
प
पिनाक Fri, 02/05/2021 - 17:31 नवीन
कशाला? काहीही लिहितो तो. माझ्या मते ग्रुप वर सर्वात मूर्ख कोण अशी स्पर्धा केली तर निवड करण्याची गरजच पडणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 09:07 नवीन
मॅनहटन प्रोजेक्ट बद्दल, पण काही तरी लिहाल का? ..............
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 02/05/2021 - 16:00 नवीन
तुमची आकलन शक्ती जबरदस्त आहे, सामनाचे संपादक बनण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. भारत हा विकसनशील देश आहे. अणूपरिक्षणसारखा स्फोटक मुद्दा थंड करून चघळायला पाहिजे हे शेंबडे पोर देखील सांगेल. शिवाय या ठिकाणी भारताने अनेक गुप्तहेरी करण्याऱ्या देशांचा पोपट बनवला होता हे विसरून चालणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 16:24 नवीन
पुलावामा हत्याकांडाचा बदला पण, असाच सांगून सवरून करायला हवा होता.... चर्चिलने पण, नाॅर्मंडी वरील हल्ला, हिटलरला न सांगता केला, पण ब्रिटन मधल्या कुठल्याही विरोधी पक्ष नेत्याने, चर्चिलला युद्ध काळात, एकही प्रश्र्न विचारला नाही .... मॅनहटन प्रोजेक्ट बद्दल, फक्त अमेरिकेच्या अध्यक्षांनाच कल्पना दिली होती... इतर कुणालाही नाही....
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 02/05/2021 - 22:12 नवीन
साक्षात राहुल गांधीच डू आय डी वापरून मिपावर लिहीत आहेत अशी शंका येते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/06/2021 - 06:47 नवीन
मग पोखरण मध्ये लपतछपत का अणू परीक्षण केले. जाहीर करून बिन्धास्त का अणू परीक्षण केले नाही. राजेश बुवा तुम्ही इतके विनोदी लेखन कसे काय लिहू शकता? महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या बंद आहे का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/06/2021 - 07:01 नवीन
अमेरिकेत एवढ्या अणू चाचण्या झाल्या अमेरिका गेला होता का कधी जगाची परवानगी घ्यायला. कोरिया च हुकूम शाह जगाला विचारात बसतो का की बाबांनो आम्हाला अणू परीक्षण करायचे आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/06/2021 - 07:06 नवीन
राजेश बुवा तुम्ही इतके विनोदी लेखन कसे काय लिहू शकता? महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या बंद आहे का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 07:09 नवीन
ते, बहुतेक, मोगा, यांची गादी चालवत असावेत ....
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 02/06/2021 - 08:41 नवीन
तुम्ही उत्तर कोरियाचे नाव घेतले, उत्तर कोरी
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 02/06/2021 - 08:45 नवीन
तुम्ही उत्तर कोरियाचे नाव घेतले. तुम्ही ज्या सरकारविरोधी पोस्ट इथे कुंथता ना, तेवढ्या तिथे टाकल्यात तर किम तुम्हाला रॉकेटवर बसवून अंतराळात सोडेल. अमेरिका महाशक्ती आहे. कोरियावर इतके निर्बंध आहेत की बाजारात एक मेड इन नॉर्थ कोरियाची वस्तू आणून दाखवा व हजार रुपये मिळवा अशी जाहिरात करायला हरकत नाही. अहो चर्चेचा धागा आहे त्यांला विनाकारण कॉमेडी शो का बनवत आहात?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 08:56 नवीन
यथा राजा तथा प्रजा ... ढाई हजार पाच सौ क्विंटल, देणारे राहुल गांधी आणि त्यांना पाठिंबा देणारे मतदार, ह्या आदरणीय व्यक्ती आहेत.... तसाही, आजकाल विनोद दुर्मिळ होत चालला आहे ....
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Fri, 02/05/2021 - 07:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 07:56 नवीन
काही लोकांच्या व्यक्तीपुजेला धक्का लागतो ....
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 02/05/2021 - 08:01 नवीन
शाळा बुडवुन पर्यावरणाच्या नावाखाली पालथे धंदे करणार्‍यांची हुशारी... मान गये...
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 02/05/2021 - 08:02 नवीन
ग्रेटा मतिमंद आहे आणि तिचे पालक आणि इतर मंडळी विनाकारण तिचे बालपण चुलीत घालत आहेत.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 02/05/2021 - 08:10 नवीन
फुकटचा पैसा आणि प्रसिद्धी मिळतेय म्हटल्यावर कोण बालपण वगैरेचा विचार करणार?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/05/2021 - 08:20 नवीन
ग्रेटाने आधी सगळा प्लॅन ट्विटरवर शेअर करणे आणि नंतर डिलीट करणे हा प्रकार धक्कादायक आहे. भारतात अस्थिरता माजवायचा (किंवा इतर कसलाही) प्लॅन असेल तर तो गुप्त ठेवावा- आपले अगदी विश्वासातले सहकारी सोडून बाहेर जाऊ नये आणि ट्विटरवर शेअर करून जगजाहीर तर अजिबात करू नये एवढे तिला कळत नसेल? की तिचा ट्विटर अकाऊंट बघणार्‍या मॅनेजर्सपैकी कोणालातरी आपल्या यंत्रणांनी फोडले आहे? की ती दोन्ही बाजूंनी खेळत आहे? म्हणजे हेरगिरीच्या विश्वात दोन्ही बाजूंनी खेळणारे डबल एजंट असतात तसे? की तिलाच आपल्या यंत्रणांनी दुसर्‍या बाजूला प्लॅन्ट केले आहे? तिचा पूर्वेतिहास लक्षात घेता तिला पुरोगामी लोक आपल्या कळपात या तथाकथित आंदोलनात अगदी हसत घ्यायला तयार होणार हे लक्षात घेता तिच्यावर काही जादूटोणा करून प्रभावित केले आहे आणि तो प्लॅन जगजाहीर करून पुरोगाम्यांना तोंडघशी पाडले आहे? कल्पना नाही. सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Fri, 02/05/2021 - 08:33 नवीन
एवढे तिला कळत नसेल? ती आधीच मतिमंद आहे. उगाच लहान पोर म्हणून जगाची सहानुभूती मिळवायला आणि त्याआडून आपला खौट अजेन्डा पसरवायला सोपं हत्यार म्हणून हे समाजवादी प्लँनिंग करून आपले पित्ते सोडत असतात. याआधी पण ती पाकडी मलाला अशाच पद्धतीने प्रसिद्ध झाली. मग एकेका व्याख्यानाचे काही कोटी रुपये घेऊन भारताविषयी आणि त्यांच्या विचारधारेविधात असलेल्या राष्ट्रांविषयी गरळ ओकायला मोकळी.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 02/05/2021 - 09:00 नवीन
वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, आता फक्त मलालाने ट्रॅक्टरबाजांसाठी ट्वीट करणे बाकी आहे. एकदा का तिचे ट्वीट आले, की लिब्बू पोपटांचा थवा/झुंड पुर्ण झाली असे समजायचे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/06/2021 - 06:54 नवीन
आजकाल कुत्रं जरी श्री मोदींकडे तोंड करून भुंकायला लागलं कि सगळे फुरोगामी त्याला आपला नेता मानायला लागतात. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी, उमर खालिद, शर्जील असे किती आले दीड दिवस चमकून अस्ताला गेले. आता नवे गोऱ्या कातडीच्या दोन पोरींनी काय ट्विट केलं ते सगळे फुरोगामी त्याना आपलया नेता मानायला लागले. या पण जातील दोन दिवसात. मग नवीन कोण तरी दळभद्री लोक उगवतील.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 02/06/2021 - 10:32 नवीन
मोदींसमोर तितकाच कणखर पर्यायी नेता त्यांच्याकडे उपलब्धच नाही, त्यामुळे कुत्रंच काय, उंदरालाही ते आपला नेता मानतील.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 02/05/2021 - 09:08 नवीन
Greta विरूद्ध जे भारत सरकार मत मांडत आहे आणि भारतीय खेळाडू,नेते,अभिनेते ,अभिनेत्री मत मांडत आहेत त्याला जग गंभीर घेतच नाही . उलट असल्या हास्यास्पद विरोधाला जग हसत असेल . भारताची लाज घालवत आहेत वरील सर्व मंडळी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 09:14 नवीन
मी तर उलट समजत होतो ..... खरी लाज तर, घराणेशाहीच्या अपरिपक्व उमेदवाराला, डोक्यावर घेणार्या मतदारांनी आणली आहे ..... खूद गिरे तो भी टांग उपर
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 10:34 नवीन
https://www.opindia.com/2021/02/poetic-justice-foundation-rihanna-farmer-protest-tweet-paid-18-crores-rupees-skyrocket/amp/?__twitter_impression=true Pop star was paid over Rs.18 crores in dollars by PR firm with Khalistani links to tweet in support of farmer protests: Report हे कितपत खरे आहे याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 12:28 नवीन
ह्या पेक्षा, हे आंदोलन शेतकरी वर्गाने काढलेले नाही, हेच सत्य आहे... इतका फावला वेळ, कुठल्याही शेतकरी वर्गाकडे नाही आणि हे कायदे नाकारून, स्वतःच्याच पायावर, धोंडा पाडून घेण्या इतका, शेतकरी मूर्ख नाही...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/05/2021 - 13:13 नवीन
ग्रेटा कोण किंवा रिहाना कोण हे मला माहिती हि नव्हते आधी. म्हणुन त्यांनी काय म्हणालेय, ते का काय म्हणतात हया पेक्षा, आपल्या सेलिब्रितिज इतके आता का बोलतात,७० दिवसांत का गप्प होते..? रिहाना च्या एका ट्यूट वर कोणाला इतका घाव बसलाय कि सारे सेलिब्रिटीना कधी नव्हे ते यात उडी घ्यायला लागली आहे.. देश एकच होता.. एकच आहे, आणि एकच राहिल.. पण तुम्ही आंदोलन कसे हाताळता आहात हे न बघता internal मामला आहे हे बोलुन नक्की काय साधता आहात? निदान शेतकऱ्यांना सोडा, या कायद्याचे फायदे तोटे पत्रकार परिषद घेऊन सरळ लोकां पर्यंत पोहचवा... कायदे बनवता येतात, बदलावता येतात, पण देशाची प्रतिमा तुम्ही मालिन करता आहात आणि वरती अहम हि सोडवत नाहीये हे का कळत नाहीये? तुम्ही सरकार आहात.. असहकार, आंदोलणे कोणत्याही सरकार विरोधात होत असतात, होत राहतील पण एक देश म्हणुन तुम्ही त्याला कसे सामोरे जाताय हे बघायला नको का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 14:14 नवीन
या कायद्याचे फायदे ज्या शेतकऱ्यांना समजले आहेत ते या आंदोलनात नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/05/2021 - 15:30 नवीन
निदान शेतकऱ्यांना सोडा, या कायद्याचे फायदे तोटे पत्रकार परिषद घेऊन सरळ लोकां पर्यंत पोहचवा...
आता फक्त प्रत्येकाच्या कानात जाऊन प्रत्येक कायदा समजावून सांगणे बाकी राहिले आहे. डिजिटल युगात प्रत्येकाला कायदे माहिती करून घेण्याची अक्कल आहे. बातम्यांमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये, संसदेमध्ये कित्येक वेळेला सरकाकरने यांची पूर्ण माहिती दिली आहे. ज्यांना ऐकूनच घ्यायचे नाही.. किंवा ज्यांना आपल्या बुद्धीपेक्षा दुसरा काय सांगतोय त्यावर जास्त विश्वास आहे.. किंवा ज्यांना अक्कलच नाही फक्त असे "शेतकरी " या आंदोलनात आहेत .. जो कि 2-3% आहे. बाकीचे 97 टक्के आंदोलनकर्ते शीख आणि दलाल आहेत.
कायदे बनवता येतात, बदलावता येतात, पण देशाची प्रतिमा तुम्ही मालिन करता आहात आणि वरती अहम हि सोडवत नाहीये हे का कळत नाहीये?
सरकार कायदे बदलण्यास तयार आहे. चर्चेच्या इतक्या फेऱ्या कश्यासाठी झाल्या मग?? सरकार चर्चा करून कायदे अँमेण्ड करण्यासाठी तयार आहे. पण शीख आणि दलाल लोकांना कायदे रद्दच करून पाहिजे आहेत. त्याशिवाय इतर काहीही करण्याची त्यांची तयारी नाही. आणि मागणी मान्य न झाल्यास ते कोणत्या लेवल ला जाऊ शकतात ते त्याचा ट्रेलर पण त्यांनी दाखवला आहे. त्यामुळे आडमुठे पणा कोण करतेय आणि देशाची प्रतिमा कोण मलीन करतेय ते पण समजतेय. इथे तुम्ही ज्यांची बाजू घेताय त्यांच्याबद्दल थोडा रिसर्च करत जा.. !! उगाच बळीराजा शेतकरी अन्नदाता असल्या भूलथापांना ( ज्या राजकारण्यांनी आपल्या सोयीसाठी केल्यात ) बळी पडून काहीही बरळू नका.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 15:43 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 15:48 नवीन
1. तुम्हाला खरोखरच, शेतकरी वर्गाचे भले व्हावे असे वाटते का? 2. तुम्ही, फक्त 6 दिवस, दापोली कृषी विद्यापीठात, मुक्काम करू शकता का? ....... आपण 2-3 वेळा फोन वर बोललो आहोत. काही गोष्टीत आपल्या दोघांचे मतभेद आहेतच, पण, फोन वर बोलतांना एक जाणवले की, तुम्ही एक व्यक्ति म्हणून निश्र्चितच उत्तम आहात. तुमच्या मनांत पाप नाही.. जे मनांत, तेच लिहीता... पण, ह्या आंदोलनाचा तुम्हाला खरोखरच अभ्यास करायची इच्छा आहे का? माध्यमांवर खूप अवलंबून राहू नका... स्वतः माहिती गोळा केली तरच फायदा होतो ....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा