चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.
पण ते आपल्याला विरोध करतात, म्हणुन लगेच क्रिकेटर, बॉलिवूड कलाकार यांच्या मार्फत लगेच ट्वीट्स पाडून घेऊन देश एकसंद आहे, आमचे आंम्ही बघू, हि नीती हि चुकीचीच..हा अहम आहे, जगातून मला कोणी विरोध केला तर आम्ही असे हजार सेलिब्रिटी उभे करू हा अहमच आहे..सरकारच्या सांगण्यावरून क्रिकेटपटू, अभिनेते वगैरेंनी ट्विट्स लिहिली?आणि बाहेरच्यांनी जर काही म्हणायचे नाही तर आपण हि बाहेरच्या कडे जाऊन अब कि बार ट्रंम्प सरकार म्हणणे हे हि योग्य नव्हते...तेथील जनतेला ट्रंम्प नको असताना आपण नाक खूपसने बरोबर नव्हतेच..अबकी बार ट्रंप सरकार हे वाक्य स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनीच २०१६ मध्ये स्वत:च्या प्रचारात भारतीयांच्या सभेत वापरले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये मोदींनी हा जुना संदर्भ दिला होता. अमेरिकेची निवडणुक त्यावेळी सुमारे १४ महिने लांब होती. आपल्या सव्वा तासांच्या भाषणात मोदींनी फक्त एकदा हा जुना संदर्भ दिला होता. https://www.google.com/search?sxsrf=ALeKk03G8Kigkqbj71fW7T2YCj81AFbH9Q%3A1612463367237&source=hp&ei=Bz0cYIyODNmb9QOtqZSYDA&q=ab+ki+bar+trump+sarkar&oq=ab+ki+bar+trump+sarkar&gs_lcp=ChFtb2JpbGUtZ3dzLXdpei1ocBADOgkIIxDqAhAnEBM6BwgjEOoCECc6BwgjECcQiwM6BQgAELEDOgIIADoECCMQJzoGCCMQJxATOggIABCxAxCDAToICC4QsQMQgwE6BwguEBMQkwI6CggAEMcBEK8BEBM6BAguEBM6BAgAEBM6BQgAEMsBOgcILhAKEMsBOgUILhDLAToHCAAQChDLAToICAAQFhAKEB46BggAEBYQHlCoGVjhc2DYfGgBcAB4AIAB-wGIAfUlkgEGMC4xLjIxmAEAoAEBsAEPuAEC&sclient=mobile-gws-wiz-hp#fpstate=ive&vld=cid:0195fc45,vid:ogg2Hf9Qia0,st:0- काही गोष्टी वरवर भावनिक वाटतं असल्या तरी लॉंगटर्म मध्ये त्याचे भयानक परिणाम असतात. अश्या गोष्टी भावनिक किंवा भोळेभाबडया लोकांना फसवण्यासाठी नसून येणाऱ्या पिढीसाठी असतात. पटत नसेल तर जगाचा इतिहास पुन्हा वाचा. गोष्टी काही 1-2 वर्षे किंवा 1-2 दशकात घडत नसतात.. असले बदल हे स्लो पॉयसनिंग प्रमाणे काम करतात व रिजल्ट 2-3 पिढ्यानंतर दिसतात.
.या सर्वाचा शीख आणि दलाल आंदोलनाशी डायरेक्ट संबंध नाहीये पण तुम्ही BJP च्या आणि सरकारच्या प्रत्येक गोष्टीला भावनिक आवाहन आणि मतं मिळवण्यासाठी चाललेली भावनिक खेळी असा जो काही गैर समज करून घेताय.. त्यामुळे इतके लिहिले. तुम्ही काहीही बोलला तरी ते लोकशाही आणि अगदी 100 टक्के खरं आणि प्रॅक्टिकल... पण मोदी किंवा सरकार समर्थनार्थ काही केले के लगेच भावनिक आवाहन, भोळेपणा., प्रतिमा निर्मिती वगैरे वगैरे.. कायच्या काय लॉजिक..पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते. सध्या जे काहि चालु आहे खीळे वगैरे व १५ तारखेला जो काही गोंधळ घातला गेला त्यामुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे असे वाटते. त्यामुळेच बाहेरुन टिका होत आहे व याला सरकार जबाबदार आहे कारण ते चुकीच्या पध्दतीने आंदोलन हाताळत आहे.बरं मग नक्की काय करणे योग्य होते? टिकैतने ६ फेब्रुवारीला बंद, चक्का जाम वगैरे करण्याचे जाहीर केलंय. २६ जानेवारीला या लोकांनी दिवसभर जसा धुडगूस घातला तसाही धुडगूस घालण्याची परवानगी द्यायला हवी होती का? जर तसा धुडगूस टाळायचा असेल तर काय करायला हवे?भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा.एकट्या सचिनने टीका केलेली नाही. अजय देवगण, सुनील शेट्टी, करण जोहर, चेतन भगत, अक्षयकुमार, सुरेश रैना, शिखर धवन, कोहली, कुंबळे, कैलाश खेर, अजिंक्य रहाणे, पीक्षटी उषा, रोहीत शर्मा, हार्दिक पंड्या अशा अनेक क्रिकेट खेळाडू व चित्रपटकर्मींनी असेच केले आहे. या सर्वांना असे करण्यास भाग पाडले गेले?"Right" is always right.. and "Left" can never be right.
त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे..सहमत आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडले तरच हे सरकार पडेल. नंतर त्यापैकी कोणी भाजपला पाठिंबा दिला तरच भाजपचे सरकार येईल. एकंदरीत दोन्ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप कमी आहे.