Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/02/2021 - 09:31
🗣 266 प्रतिसाद
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे. म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61966 views

🗣 चर्चा (266)
स
साहना Wed, 02/03/2021 - 23:10 नवीन
> एकी कडे असा आव आणायचा नी bjp ची समर्थ क नाही. भाजपाला मी कधीही मत दिलेले नाही. मोदी आणि डेव्ह फर्नाडिस ह्यांच्यावर मिपा वरील माझी टीका वाचून तुम्ही हे सहज पाहू शकता. टीका हि सत्यावर आधारित असावी व्यक्तीद्वेष वर आधारीत नसावी. > आणि कंगना पासून अर्णव पर्यंत सर्वांच्या मूर्ख बडबडी चे समर्थन करायचे. कंगना, अर्णब असो किंवा संजय झा असो किंवा तुम्ही स्वतः मी सर्वांच्या बोलण्याच्या अधिकाराचे १००% समर्थन करते. ह्याचा अर्थ मी त्यांच्या व्यक्तव्याशी संमती व्यक्त करत आहे असा होत नाही. तुम्हाला जर थोडी जरी शरम असेल तर मी ह्यांच्या कुठल्या मूर्खपणाच्या बडबडीचे समर्थन केले आहे हे स्क्रिनशॉट देऊन दाखवावे. असे केलेत तर मी तुम्ही सांगाल त्या धर्मादायी संस्थेला १०,००० रुपये देणगी देईन. (इतर मिपाकरांनी इथे जज म्हणून राहावे. ) > काँग्रेस कशी नालायक होती हा bjp la anukul असा विचार मांडायचा काँग्रेस हि नालायक होती आणि नेहरू सारखे नेते निर्बुद्ध आणि दुष्ट होते हे मी अनेकवेळा तर्क आणि पुरावे मांडून अनेकदा सिद्ध केले आहे. अर्थानं हे सिद्ध करायला मी काही दामिनी मधील सनी देओल प्रमाणे आव आणत नाही. हे सत्य सर्वमान्य आणि सर्वश्रुत आहे. है सत्याने भाजपायी लोकांचा फायदा होत असेल तर मी ते सत्य का म्हणून लपवू ? भाजपातील नेते काही विशेष चतुर किंवा विद्वान नाही आहेत पण सत्तेची शय्यासोबत ह्यांनी विशेष केली नाही त्यामुळे ह्यांची संतती कशी होईल ह्यावर लिहायला अजून वेळ आहे. > असा duttapi पना तर मी करत नाही. हो मी हे मान्य करते. तुम्ही दुटप्पी नाही आहात. तुम्ही द्वेष बुद्धीने प्रेरित आहात आणि भाजप पेक्षा मोदी ह्या माणसाचा अत्यंत एकांगी पद्धतीचा द्वेष तुम्ही करता. आणि विषय, स्थळ, काळ काहीही असला तरी लंगडत चालणार्या श्वानाप्रमाणे शेवटी भाजप आणि मोदी वाईट अशी निर्बुद्ध बडबड करायची इतकेच काय ती आपली कार्यक्षमता आहे. > जे आहे ते स्पष्ट व्यक्त होतो. जे टाकीत नाही ने नळांत कुठून येईल ? रिकाम्या टाकीचा नळ सोडला तर टाकीत काय आहे ह्या पेक्षा टाकीत काय नाही हे आम्हाला जास्त कळते. त्याच प्रमाणे आपल्या बडबडीतून आणि वैयक्तिक दोषआरोपातून आपल्यांत काय नाही ते जास्त व्यक्त होते. बाकी चालुद्या, मनोरंजन तरी होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 02:48 नवीन
असे मनोरंजन करणारै, किती तरी आले आणि गेले ... आता तर काही लोकांची नावे सुद्धा आठवत नाहीत ... उद्दाम, सचीन, पोटे, ही अशीच काही नावे ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/04/2021 - 03:37 नवीन
हा तुमचा दावा तुम्हाला खरा वाटत असेल तरी त्याचे स्वागत आहे. स्वतः ला वाटत आहे ना तुम्ही balance विचार करता कोणत्या विचारधारेच्या बांधील नाही आहात . बस . पण मोदी चे कोणतेच कर्तृत्व नसताना त्यांची जी इथे टोकाची लाल करण्याची स्पर्धा चालू असते म्हणून बाकी अलिप्त लोकांना पण जास्त अलिप्त राहता येत नाही. हेच कारण आहे टोकाची परस्पर विरोधी मत असण्याचा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 04:54 नवीन
1. गुजरात राज्याची प्रगती, मोदींच्या काळात वेगात सुरू झाली. 2. गोध्रा हत्याकांडा नंतर, गुजरात मध्ये एकही दंगल झाली नाही। । 3. चीनच्या आर्थिक नाड्या, हळूहळू आवळत चालले आहेत. 4. संरक्षण दलाला मजबूती आणली आहे. इतकाही मोदी द्वेष करू नका की जेणेकरून, देशाचे संरक्षण धोक्यात येईल ...
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 02/04/2021 - 18:30 नवीन
राजेशभाऊ, फालतू पोपटपंची नको. माझे वरील चॅलेंज ला स्वीकृत करा नाहीतर निलाजरे पणाने आपल्या विचारयांच्या फुसक्या इथे सोडू नका.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/03/2021 - 20:43 नवीन
देशातील गरिबी पासून ,भ्रष्ट प्रशासन,काश्मीर प्रश्न ,चीन,महागाई,अगदी रस्त्यावर खडे का आहेत असा विषय निघाला तरी नेहरू ना दोषी ठरवणारे इथे कमी नाहीत ते चालते का तुम्हाला . मी तर आता सत्तेवर असलेल्या पक्षाला च दोषी ठरवत आहे तुम्ही लोक सत्तेवर नसलेल्या आणि मरून 50 ते 60 वर्ष झालेल्या लोकांना पण आताच्या सर्व च गैर soyina दोषी ठरवता ते चालत का. अमित शाह नी संसदेत मत व्यक्त केल्या नंतर बाकी चमकेश लोकांना कंठ फुडला हे चुकीचे आहे का? मग bjp वर नाही आरोप करणार तर कोणावर करणार.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 02:50 नवीन
तेच तर सत्य आहे ... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे कटू सत्य पचवायची ताकद हवी ...
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 02/05/2021 - 06:07 नवीन
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे कटू सत्य पचवायची ताकद हवी ...
फॉर दॅट मॅटर्,कुठलाही राजकिय पक्ष जनतेच्या भल्याचा विचार सर्वात शेवटी करतो हे विधान सत्य आहे. एक नातेवाईक बीजेपी शासित प्रदेशात सरकारी पदावर काम करतो. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार सर्व योजनांमधली मलई प्रथम नेतेमंडळींमध्ये वाटली जाते व झिरपत झिरपत जनतेपर्यंत येते.किंबहुना योजना आणण्याआधी व्यक्तिगत फायदा व पक्षीय फायदा सर्वप्रथम पाहिला जातो. हे नागडे सत्य आहे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 03:27 नवीन
त्या निस्तरता निस्तरता, नाकी नऊ येत आहेत ... हे केंद्रीय सरकार, त्या चुका निस्तरत आहेत, हा केंद्रीय सरकारचाच दोष आहे, नाही का? बाय द वे, आपल्या मनांत, BJP बद्दल द्वेष पहिल्या पासूनच आहे की, इतर काही कारणे आहेत? नोटाबंदीचा तर काही संबंध नाही ना?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/04/2021 - 04:17 नवीन
त्यामुळे मी इथून पुढे तुमच्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देणार नाही. आणि इतर लोकांनाही विनंती करतो कि अश्या लोकांना फाट्यावर मारावे.
सहमत आहे. असेच करायला हवे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 04:50 नवीन
तितकाच वेळ चांगला जातो...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/04/2021 - 06:29 नवीन
आणि आपली कंपू गिरी शाबूत ठेवावी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 06:36 नवीन
आजकाल तसाही, आमचा टाईमपास होत नाही ... पुर्वी, सचीन, उद्दाम, पोटे, वगैरे मंडळी, आमचा छान टाईमपास करायची ... आता, ती मंडळी नाहीत .... ती असती तर, तुम्हाला छान वैचारिक मंडळी मित्र, म्हणून मिळाली असती... भाजपद्वेष आणि मोदी विरोध, हा तुमच्या मैत्रीचा, समान पाया आहे...
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sun, 02/14/2021 - 09:00 नवीन
संक्षि राहिले ओ
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 02/04/2021 - 06:56 नवीन
असे लिहून स्वतःदेखील तेच करायचे...नै का? :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 05:32 नवीन
https://www.esakal.com/maharashtra/dhananja-munde-clarification-after-women-allegations-about-achilrens-405463
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2021 - 06:03 नवीन
काका पाठीशी असल्याने कोणतीही भीति नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 06:29 नवीन
काका मला वाचवा, हे ऐतिहासिक सत्य आहे .... चाचा नेहरू पण, ह्याला अपवाद न्हवते .... पण, अंगाशी आले की, काका मंडळी, हात काढून घेतात.... घटोत्कचाचा वध पण, काकानेच केला ....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/04/2021 - 12:13 नवीन
आजची घडामोड... फेसबुक, ट्वीटर सारख्या माध्यमातून copy paste messages पडत असताना, आणि उगाच घाबरून किंवा कोणाच्या सांगण्यावरून hash tag चालवले जात असताना पाहतो आहे... मनापासून प्रेम केलेला सचिन पण यांच्यात सामिल झालाय.. बेहत्तर, देशा पेक्षा व्यक्ती महत्वाचा नाहीच.. मग to सचिन असो वा मोदी... . . रस्त्यावर ठोकलेला एक एक खिळा, तुमचा अहम, तुमचे सत्ता साम्राज्य खिळखिळे करणार हे नक्की... - शब्दमेघ
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 12:49 नवीन
मग ते घराणेशाही मुळे, पदावर बसलेले अपरिपक्व नेते असोत किंवा जनतेच्या भल्याचा विचार न करता, दळणवळण रोखणारे पक्ष असोत ...
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 02/04/2021 - 12:59 नवीन
पोलिसांच्या गाडीवर चढवलेला एक एक ट्रॅक्टर, जनतेच्या मनातुन, तुमच्यासाठी असलेली सहानुभूती कमी करणार हे नक्की...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/05/2021 - 05:11 नवीन
१) रस्त्यावर खिळे ठोकणे वगैरे मुळे टिकेचे धनी ठरलेल्या सरकारने गुपचुप खीळे काढायला लावले, ते काही प्रामाणिक मीडियाच्या नजरेतून सुटले नाही तेव्हा, स्थळ बदलामुळे असे करीत आहोत असे पोलिसांनी सांगितले. २) सेलिब्रेटीजचे ट्विटर, आंदोलनाला मिळणारा पाठिंबा, दररोज वाढणारे आंदोलक, या आणि इतर विषयावर गृहमंत्री अजित डोवाल, दिल्ली पोलिस आयुक्त यांची आज बैठक. ३) गाझिपुला शेतकरी आन्दोलकांना भेटीस निघालेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांना शेतकरी आन्दोलकांना भेटण्यापासून रोखले. आणि ४) गॅसचे दर २५ रूपयांनी वाढले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/05/2021 - 05:23 नवीन
Image removed. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/05/2021 - 05:27 नवीन
@ प्राध्यापक. म्हणजे रिहाना, राबिश, शीख / पंजाबी अक्टर्स हे पण पोपट आहेत हे मान्य केलेच शेवटी तुम्ही..
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 02/05/2021 - 05:43 नवीन
अगदी बरोबर, आता फक्त ती मलाला ट्वीट करायची बाकी आहे. एकदा का ते झाले की हा पोपटांचा थवा (खरे तर टोळीच) पुर्ण होईल बघा...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 05:29 नवीन
आमच्या बाजुलाच एका काकांनी, पिंजर्यात पोपट ठेवला आहे... आमचे हे काका, दर काही वर्षांनी, पोपट मेला की बदलतात ...
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/05/2021 - 06:10 नवीन
आमच्या शेजारी पण एक काका आहेत. पोपटच नव्हे तर इतर सर्व प्राण्यांवर त्यांचे भयंकर प्रेम. विशेषतः अस्वलांवर. त्यांच्या सोबत राहूनच ते सुद्धा आता कोलांट्या उड्या मारतात.. अगदी अस्वला पेक्षाही मोठ्या पलट्या अगदी सहज मारून दाखवतात. त्यांचा पोपट ( त्यांचा म्हणजे.. त्यांनी पाळलेला पोपट ) खूप हुशार आहे. कुठेही पळून जात नाही.. बिना पिंजर्याचा सुद्धा घरीच बसून असतो... टॅलेंट तर एकापेक्षा एक आहेत. खुर्चीवर बसतो काय.. लिहून दिलेले भाषण अगदी तंतोतंत वाचून दाखवतो काय.. काकांसमोर मिठू मिठू करतो काय.. आणि आतातर काकांनी त्याला कोलांटी उडी मारायला देखील शिकवले आहे. पोपट खूपच सर्वसमावेशक आहे. तो स्वतः पोपट आहे म्हणून घरात सर्वांनीच पोपट बनावे असा त्याचा बिलकुल हट्ट नाही. त्यामुळेच तर घरी पेंग्विन, आणि माकडे सुद्धा आहेत.. एक माकड रोज सकाळी घाण करते पण पोपट कधीही त्या माकडाकडे पाहत नाही. एरवी गळ्यात गळे घालून असते पण माकडाने केलेल्या कोणत्याही घाणीची जबाबदारी पोपट घेत नाही. नुकतेच माकडाने एका चिमणीचे घर पडण्याचा प्रयत्न केला पण पोपट त्यावेळी मात्र शांत बसले होते. कधीकधी वाटतं कि पोपटच पडद्यामागून माकडाला हे सर्व करायला सांगत असावा. काकांची फॅमिली खूप मोठी आहे. काकांचे एक भाऊ आहेत. काका आणि ते भाऊ एकत्र राहायचे पण नंतर त्यांच्या घरात वाटण्या झाल्या. काकांच्या भावाच्या मुलाने सर्वांच्या मनाविरुद्ध लग्न केले.. नवीन सुनबाई आपल्या जातीची नसल्याने काकांनी घराच्या वाटण्या करून आपले वेगळे घर बांधले.. पण शेवटी रक्ताची नाती अशी एका झटक्यात तुटत नाहीत. अजूनही वेगवेगळे राहत असले तरी सर्व कार्यक्रमात काका मिळून मिसळून असतात. काकांचा हा नवीन पोपट त्यांच्या भावासमोर देखील आपले कर्तब दाखवतो. काकांना आणि त्यांच्या भावाला दोघांनाही खुश ठेवतो.. पोपट आजकाल आपला रंग विसरलाय. हिरवा रंगात रंगला असला तरी जगाला माझा रंग भगवा आहे हे ओरडून ओरडून सांगत असतो.. पण काका आणि त्याचा भाऊ दिसल्यावर मात्र तो शांत बसतो. अचानक आपल्या अंगावर सगळे रंग आहेत. सगळे रंग कसे समान आहेत ते सांगू लागतो. असा हा मल्टी टॅलेंटेड पोपट कुठल्या बाजारात मिळतो कुणास ठाऊक. महाग असावा. पण काका शेवटी रॉयल माणूस.. त्याचे छंद पण रॉयलच असणार.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 02/05/2021 - 07:10 नवीन
जबराट प्रतिसाद मल्टी टॅलेंटेड पोपट कुठल्या बाजारात मिळतो अहो मकाऊ पोपट असेल. ख्या ख्या ख्या:
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 02/05/2021 - 08:26 नवीन
खतर्नाक प्रतिसाद.__/\__
कधीकधी वाटतं कि पोपटच पडद्यामागून माकडाला हे सर्व करायला सांगत असावा
हे खरे. माकडावर प्रकाशझोत असताना पोपट अंधारात काय करतो ते पहावे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/05/2021 - 17:36 नवीन
धन्यवाद अनंत अवधूत आणि सौन्दळा. काकांबद्दल अजुन बरेच काही लिहिण्यासारखं आहे. पण काकांनी फक्त पोपटच नाही. तर चावकी कुत्री देखील पाळलेत. काकांबद्दल काही बोलले कि काका कुत्र्यांना गुपचूप इशारा करतात. आणि मग कुत्री त्या व्यक्तीला स्वतःच्या घरी बोलावून अक्षरशः वळ उठेपर्यंत चावतात.. त्यामुळेच.. काकासे डर नही लगता साहब.. कुत्तो से लागता है. टीप - सदर प्रतिसाद हे केवळ मनोरंजनासाठी लिहिले आहेत. कोणीही राजकीय व्यक्तीशी त्याचा संबंध जोडू नये .. जोडायचा असल्यास तो तुमच्या जबाबदारीवर जोडावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 08:59 नवीन
गोड गोड बोलून, आमीषे दाखवून, पोपटाला पिंजर्यात बंद करतात.... काकांचा हात खांद्यावर पडला की, पोपट मेलाच, म्हणून समजायचा... घातक मधल्या कातिया पेक्षा, आमचे काका जास्त डेंजरस आहेत ...
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 02/04/2021 - 12:43 नवीन
कोण चूक का बरोबर हे जनताच ठरवेल. येत्या काहीच दिवसात पश्चिम बंगाल च्या निवडणुका आहेत. माझ्या महितीप्रमाने सध्या bjp चे 3 आमदार आहेत. जर ह्यात घसघशीत वाढ झाली तर कमीतकमी पश्चिम बंगाल मधील शेतकऱ्यांना तरी नवीन कायद्याची काहीही अडचण नाही आस म्हणू शकतो. माझ्या ओळखीच्या शेतकार्यापैकी एकाचाही ह्या कायद्याला विरोध नाही. ह्या आंदोलनाला देशाबाहेरून ही पाठिंबा मिळत आहे. जेव्हढा बाहेरून पाठिंबा जाईल तेव्हढा जास्त फायदा bjp ला होईल. कारण सामान्य जनतेला हे पटणार नाही. सचिन तेंडुलकर ने पहिल्यांदा अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या बद्दलच्या माझ्या मनात असलेल्या आदरा मध्ये वाढच झाली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 12:47 नवीन
म्हणजेच, कायदे जनतेच्या भल्यासाठी आहेत
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2021 - 12:54 नवीन
बंगालमध्ये भाजप १००+ जागा मिळवेल असा सध्याचा अंदाज आहे. सचिन व अनेक अभिनेत्यांनी अत्यंत योग्य भूमिका घेतली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 12:59 नवीन
शिवसेना, हा राष्ट्रीय पातळीवर प्रबळ पक्ष आहे, असे काही लोकांना वाटते... त्यामुळे, शिवसेनेचा मुख्यमंत्री पण होऊ शकतो ... महाराष्ट्रात, 20% लोकांनी, शिवसेनेला नाकारले तरी, मुख्यमंत्री पद, शिवसेनेला मिळालेच की नाही?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/04/2021 - 13:14 नवीन
एक प्रामाणिक प्रश्न.. तुम्हाला स्वतःला असे वाटत नाहीये का, आपण मुद्दा सोडून मुद्दाम शिवसेना विषय मध्ये आणत आहात.. मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि जनतेचे फसवणूक वगैरे.. येऊद्या कि बंगाल मध्ये bjp.. तसे हि ममता बद्दल एव्हडे काही चांगले ऐकलेय असे नाहीच.. पण आपल्या विचारांनी शिवसेनेला मध्ये आणायचे.. चर्चेचा रोख पुन्हा बदलायचा.. पुन्हा तेच जुन्या कढीला उधान आणायचे, कोणी खंजीर खुपसला बोलत रहायचे.. कंटाळा येत नाही का? बरं तसे वेगळे धागे पण आहेत.. तुम्ही म्हणु. शकता मी काहीही बोलेल.. माझा त्याला ना नाही.. पण दरवेळेस तेच तेच विषयाचा कंटाळा येत नाही का..बोलावे, पण कुठेही तो मुद्दा का घुसडावा? मोदी द्वेष, bjp द्वेष तुम्ही दुसऱ्यांना दाखवता, तेंव्हा आपण पण काँग्रेस, शरद पवार, शिवसेना द्वेषच करत असता, मग आपले ते खरे मानून दुसऱ्याला दोष देण्यात काय धन्यता? असो.. मी काय म्हणतोय तेव्हडे कळाले तरी चांगले आहे.. बाकी चालुद्या..अश्या इतर मुद्द्यावर बोलण्यात काय हाशील नाही..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 13:28 नवीन
बिहार मध्ये पण निवडणूक लढवली होतीच की ... बाय द वे, ह्या वर्षभरात, महाराष्ट्रात किती प्रगती झाली नाही? 1. मेट्रोचे काम मार्गी लागले का? 2. एक पण झाड तोडल्या गेले नाही, असे झाले का? 3. ते वीज बिला बाबतीतले आश्र्वासन पुर्ण केले का? 4. शेतकरी वर्गाला, बांधावर जाऊन, एकरी का हेक्टरी, 25-30,000 देणार होते, ते दिले का? ...... घराणेशाहीची इतकाही पुजा बरी नाही ...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/04/2021 - 14:03 नवीन
विकास दर वजा मध्ये गेला. बेरोजगारी वाढली पेट्रोल 100 री पार करेल च . हे असले प्रश्न विचारले की corona च्या आड लपायचे आणि दुसऱ्या तोंडाने महाराष्ट्र नी काय प्रगती केली ह्या वर्षात हे विचारायचे. इथे corona नव्हता का?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 02/04/2021 - 14:08 नवीन
राजेसाहेब, सरकार फुकट वॅक्सिंन वाटत आहे, तुम्ही लायनीत उभे आहात की नाही?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 02/04/2021 - 14:11 नवीन
कोणत्या देशाने विकासदर अधिक दाखवला आहे? अशा राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाचे आमच्या मालाड मालवणीमध्ये शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल. त्यांच्या वतीने तुम्ही आलात तरी चालेल!
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 02/04/2021 - 16:14 नवीन
कोणत्या देशाने विकासदर अधिक दाखवला आहे? व्हिएतनाम
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 02/04/2021 - 16:19 नवीन
3. ते वीज बिला बाबतीतले आश्र्वासन पुर्ण केले का?
फक्त या एका मुद्द्यामुळे उभ्या आयुष्यात मी परत सोनियासेनेला मत देणार नाही. याच्यासारखा लाचार मुखमंत्री होणार नाही. ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे भोंगे बंद करा असा नारा दिला त्याचा पोरगा आज अजान स्पर्धा भरवतोय. त्यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट पुसून जनाब लिहितोय.. अरे किती ही लाचारी..?? बऱ्याच जणांना वीजबिले अव्वाच्या सव्वा आली आहेत. त्यामागे काही काळेबेरे आहे का याचा तपास व्हायला हवा. माझे स्वतःच्या बाबतीत एका जुन महिन्याचे बिल 6790 रुपये आले आहे. इतर वेळी हाच आकडा 1000 च्या आत असतो. फार फार तर 100-150 जास्त. मी अगदी कितीही आपटली तरीही 2500 पेक्षा जास्त लाईट बिल येणे शक्य नाही. उन्हाळा असल्याने फॅन वापरला असा म्हणले तरी उन्हाळा दरवर्षी येतो.. पण तेव्हा तर बिल जास्त येत नाही.. मग याचं वर्षी का?? याची तक्रार करण्यासाठी ऐन कोरोनाकाळात लाइनमध्ये/ गर्दीमध्ये थांबून तक्रार देखील केली पण आधी सर्व बिल भरा मगच अड्जस्ट करू अशी तंबी देऊ लागले. बऱ्याच लोकांनी निमूटपणे पैसे भरले.. त्यानंतर त्यांचे लाईट बिल अड्जस्ट झाले कि नाही याचीही माहिती नाही. याउलट आपले घरबसे मुख्यमंत्री खुर्चीत बसून, इतरांना तत्वज्ञान रुपी अमृत पाजण्यात व्यस्त होते. कि कामगारांना पगार द्या, नोकरीवरून काढू नका. भाडे घेऊ नका.. आणि असले बरेच काही. अरे तू स्वतः मध्यमवर्गीयांसाठी काय केले ते सांग ना xxxx. बाकीच्यांना कश्याला ज्ञान देतोयस. यांच्याच ऊर्जामंत्र्याने सांगितले कि कोरोना काळातील बिले माफ होतील.. कधी म्हनाले कि बिल मागच्या वर्षीच्या रिडींग नुसार कन्सिडर केले जाईल.. कधी म्हणाले कि 100 युनिट फुकट देऊ.. आणि आता म्हणतायेत कि त्याचा निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ घेईल.. अरे मग तू कश्याला झालायस ऊर्जामंत्री... मंत्रिमंडळ च बघून घेईल बाकीचे सगळे. जा घरी.. दोन्ही पेंग्विन आता डोक्यात जायला लागलेत. आणि त्याहून कहर म्हणजे संपादक साहेबांची रोजची सामनात प्रसिद्ध होणारी तट्टी... वीट आला आता.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 02/04/2021 - 16:32 नवीन
त्याहून कहर म्हणजे संपादक साहेबांची रोजची सामनात प्रसिद्ध होणारी तट्टी सामन्यात प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही गोष्टी बद्दल काहीही अडचण नाही. परंतु सामन्यात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपले सगळे मराठी वर्तमानपत्र आणि news चॅनेल्स जाहीर प्रसिद्धी का देतात हे समजत नाही. म्हणजे लोकसत्ता ऑनलाईन वाचावा म्हणून उघडला तर सामना मध्ये bjp वरती काय टीका केली हीच headline असते. ह्यात सामना ची काही चुक नाही पण लोकसत्ता आणि बाकी सारे copy and paste का करतेत हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 02/04/2021 - 16:44 नवीन
कारण सामना हे वृत्तपत्र नसून शिवसेनेचे मुखपत्र आहे. सामना मध्ये प्रसिद्ध होणारी गोष्ट हि शिवसेनेची भूमिका आणि त्या पक्षाचे ओपिनियन असते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2021 - 17:44 नवीन
ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे भोंगे बंद करा असा नारा दिला त्याचा पोरगा आज अजान स्पर्धा भरवतोय. त्यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट पुसून जनाब लिहितोय.. अरे किती ही लाचारी..?? शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी आहे/होता हा फार मोठा गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/04/2021 - 18:18 नवीन
शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी आहे/होता हा फार मोठा गैरसमज आहे.
शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली आणि पक्षाच्या अस्तित्वातील जवळपास पहिल्या वीस वर्षांमध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वामधील हिं सुध्दा कधी उच्चारला नव्हता. १९८० च्या दशकात काहीकाही घटना झाल्या त्यातून हिंदुत्व हा मते मिळवायला योग्य मुद्दा होऊ शकेल हे त्यांना समजण्याइतके मुरब्बी राजकारणी ते नक्कीच होते. १९८० च्या दशकाच्या सुरवातीला मदुराईला हिंदूंचे सामुहिक धर्मांतर झाले, १९८० नंतर पंजाबात वातावरण बिघडायला लागल्यानंतर इंदिरा गांधींनी काही प्रमाणात हिंदू अपीजमेंट सुरू केली होती. मदुराई धर्मांतरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेने बोलावलेल्या सभेला सरकारच्या मालकीचे विज्ञान भवन वापरायला दिले गेले तसेच मुळात देवाधर्माचे काही न करणार्‍या इंदिरा गांधी मुद्दामून हिंदू मंदिरांच्या भेटी द्यायला लागल्या आणि रूद्राक्षाची माळ मुद्दामून flaunt करायला लागल्या. राजीव गांधींच्या कारभारात शहाबानो प्रकरणात मुस्लिम धर्मांधतेपुढे नांगी टाकली केली तर त्याला बॅलन्स करायला अयोध्येच्या रामजन्मभूमीची कुलपे उघडायला लागली. एकूणच वातावरण हिंदू राजकारणाला अनुकूल व्हायला लागले. त्यातून १९८६-८७ पासून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. १९८७ च्या पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत अगदी उघडपणे हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली. पण पक्षाच्या वाटचालीत पहिली २० वर्षे हिंदुत्वातील हिं पण न उच्चारणे हे मुळातला हिंदुत्ववादी नेता असायचे लक्षण आहे का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2021 - 18:57 नवीन
निव्वळ भगवी कफनी घालून हिंदुत्ववादी होता येत असते तर समाजवादी, निधर्मी, पुरोगामी वगैरे असलेले स्वामी अग्निवेश हिंदुत्ववादी समजले गेले असते. ज्या पक्षाने स्थापनेपासून आतापर्यंत समाजवादी, मुस्लिम लीग, कॉंग्रेस, भाजप, रिपब्लिकन पक्ष, शेकाप, राष्ट्रवादी अशा सर्व पक्षांशी फक्त सत्तेसाठी युती केली तो पक्ष कधीच हिंदुत्ववादी नव्हता. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असता तर अडवाणींंच्या श्रीरामजन्मभूमीसाठी काढलेल्या रथयात्रेपासून बाबरी पाडेपर्यंतच्या सर्व आंदोलनात सेनेने सहभाग घेतला असता.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/04/2021 - 13:02 नवीन
प्रत्येकाची मते वेगळी असतात..त्यामुळे तुमच्या मतांचा आदर आहेच... बाकी निवडणुका.. शेतकरी.. आमदार हे कसेही कोणाचे येवो.. शेतकरी हि आपलाच आहे.. या एकीच्या मेसेज मध्ये तेव्हडे जरी सरकार ला कळाले तरी खूप, असे मला वाटते.. कायदे बदलता येतात, कायदे बनवता येतात पण विचार विनिमय न होता कायदा बनवणे चुकीचे हे जरी कळाले तरी योग्य.. बाकी कायदे बरोबर असतील हि.. त्यांचा परिणाम पाहिल्या शिवाय ते चूक कि बरोबर हे म्हणणे मला योग्य वाटत नाही.. मग ते काँग्रेस ने केले असते तरी किंवा आता bjp ने केले आहेत तरी.. पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते निंदनीय आहे.. मग येथे कोणतेही सरकार असते तरी तेच मत माझे कायम असते... काँग्रेस ने केले तर बरोबर आणि bjp ने केले तर चूक हे मला मान्य च नाही.. उलट त्या अण्णांच्या आंदोलनावेळी मुंबई मध्ये मी रॅलीत त्यावेळेस च्या सरकार विरोधात ज्या घोषणा दिल्या त्याचा आता पश्चाताप होतोय...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 13:14 नवीन
तुम्ही आंबे पिकवता, असे गृहीत धरू ... सर्व खर्च लगा जाता, तुम्हाला 200₹ डझन, ह्या भावाने, आंबे विकले तरच फायदा होतो... तुम्हाला जबरदस्तीने, APMC मध्येच आंबे विकायला सांगीतले आणि दर लावला, 150₹ डझन ... आत्तापर्यंतचे कायदे हेच करत आहेत .. हा एक भाग.... --------‐------------ पण, जर तुम्हाला किरकोळ विक्री करायला किंवा दुसरा ठोक व्यापारी शोधायला परवानगी दिली, जे तुम्हाला 400₹ डझन, हा भाव द्यायला तयार आहेत.... नविन कायद्यांमुळे, ‐------------------ तर तुम्ही आंबे कुठे विकाल?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/04/2021 - 13:23 नवीन
मुवि मी कायद्या ला विरोध करत नाहीच.. कायदे काय आहेत याचे पुर्ण विश्लेषण किंवा analysis म्हणू शकतो ते हि मी केलेले नाहीये.. पण माझ्या शेतात काय पिकवायाचे आणि त्याचा भाव दुसऱ्याने ठरवायचा, याशिवाय त्यावर कायदेशीर काही करायचे हि नाही हे मला योग्य वाटले नाही.. पण तरीही कायदे चांगले आहेत तर विचार विनिमय करून का केले जावू नये...असा माझा प्रश्न आहे.. अहम का? शेतकरी मग तो पंजाब चा असो, गुजरात चा असो वा बंगाल चा सर्वांचे म्हणणे ऐकून तरी घ्या... आणि विदेशातील लोकांनी स्तुती केली कि जगभर डंका आणि नावे ठेवली कि अंतर्गत बाब,एकता हे मला पटत नाही... एकता हि पंजाब सोडून कशी होईल? असो..मी वरतीच लिहिलेलं आहे, कायद्याचा परिणाम काय होईल हे लगेच सांगता येणार नाही, ते जर योग्यच आहेत तर सरकारने ते शेताकऱ्यांशी बोलुन समोपचाराने करावे..हे इतके म्हणणे आहे.. असो.. घाईत तुटक लिहिलेले आहे.. समजुन घ्या..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा