Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

श
श्रीगुरुजी
Wed, 11/25/2020 - 16:28
🗣 272 प्रतिसाद
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला आहे. या दौर्‍यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे कसोटी सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अ‍ॅडलेड येथे दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे. या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल. एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की. यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे. २७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 79691 views

🗣 चर्चा (272)
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/19/2021 - 07:54 नवीन
अशी संधी पुन्हा येणे नाही. -- सहमत !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 08:18 नवीन
माय गॉड गोईंग टू अ न्यू रेकॉर्ड ! अरे बाप दिल की धडकने तेज. फक्त २४ धावा हव्या आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 08:31 नवीन
आता विजयासाठी केवळ दहा धावा हव्या आहेत, सुंदरचा बेजवाबदार फटका केला तरी २२ धावांच्या खेळीमुळे आपण विजयाच्या समीपजवळ आलो आहोत. आता शार्दुल आलाय खेळण्यासाठी.... जिंकणार नक्की. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 01/19/2021 - 08:26 नवीन
पंत कडून ही अपेक्षा नव्हती! अजून पंधरा! अभी नाय तो कभी नाय!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 08:32 नवीन
चौकार ठोकलाय. आता फक्त सहा धावा. ये....... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/19/2021 - 08:30 नवीन
१० हव्या
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/19/2021 - 08:31 नवीन
अजून ४ षटके आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 08:36 नवीन
जिंकण्यासाठी तीन धावा आहेत. शार्दुल ठाकूर दोन धावा काढून बाद झाला आहे. सोपा आहे सामना. आता येथून काही हाराकिरी करु नये. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 01/19/2021 - 08:36 नवीन
३ धावा हव्या आहेत.ठाकुर गेला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 08:38 नवीन
हिपीप हुर्रे हिपीप हुर्रे.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 01/19/2021 - 08:38 नवीन
जिंकलो बे आपण....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/19/2021 - 08:39 नवीन
जिंंकलो. मस्त जिंकलो.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/19/2021 - 08:46 नवीन
३० धावांपर्यंत येईतोवर जिवात जीव नव्हता... मग मात्र जिंकणार असे वाटायला लागले. हॅट्स ऑफ् टीम ब्लू! मालिका विजयाचा आनंद काही औरच!! :-)
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 01/19/2021 - 08:47 नवीन
संस्मरणीय विजय आणि दीर्घकाळ लक्षात राहणारी मालिका. भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 01/19/2021 - 08:52 नवीन
पहिली एकदिवसीय मालिका गमावली. मग T 20 जिंकली. मग पहिल्या कसोटीत दारुण पराभव. मग दौऱ्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत मालिका विजय. विराट नाही. साडेतीन गोलंदाज - एक सैनी जखमी. त्यांच्यात एकूण दहापेक्षा कसोटीचा अनुभव. बेभरवशाचा यष्टी रक्षक. ' अजिंक्य ' विजय.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/19/2021 - 08:56 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 01/19/2021 - 09:26 नवीन
इंग्लंड विरुध्द च्या कसोटी मालिके साठी सगळ्या सिनियर लोकांना नारळ द्यावा आणि पंतला टिम मधे ठेवून दुस्रा विकेट किपर घ्यावा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/19/2021 - 10:58 नवीन
पंतचे यष्टीरक्षण सुमार आहे. संघात चांगला यष्टीरक्षक हवा.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 01/19/2021 - 10:54 नवीन
पहिल्या डावात नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ४०० च्या आत रोखल. नंतर सुंदर व ठाकुर च्या १२१ रन्स च्या भागीदारीमुळे आव्हान कायम ठेवल. दुसर्या डावातही आपल्या गोलंदाजांनी जास्त धावा करु दिल्या नाहीत. ३२८ लक्ष्य गाठ्ण्यासाठी चांगली सुरुवात मिळणे गरजेचे होते. रोहीत लवकर बाद झाला पण गील व पुजारा यांच्या ११४ धावांच्या भागीदारीने विजयाचा पाया रचला. अखेर सुंदरच्या साथीने पंतने अपेक्षे प्रमाणे खेळुन विजय मिळवला. सुरुवातीला कोणालाही वाटले नव्हते की आपण ही मालिका जिंकु. पण युवा क्रिकेटपटुंनी चांगली कामगीरी करुन दाखवली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/19/2021 - 11:03 नवीन
आता बहुतेक स्मिथ पुन्हा एकदा कर्णधार होईल. पेनला काढून त्याच्या जागी मॅथ्यू वडे यष्टीरक्षक होईल.
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Tue, 01/19/2021 - 11:13 नवीन
याहू !!! लै म्हन्जी लैच खूष आज !! ऑस्ट्रेलिया दौरा म्हणल की अनेक वर्षे एकटा सचिन लढत आहे, अन बाकी सगळे आजु बाजुचे हजेरी लावुन जात आहेत असच चित्र असायचं... २००० पासुन बदलाला सुरुवात झालेली पण तेव्हाही कधी अटीतटीच्या सामन्यात आपण कमी पडायचो किंवा वादग्रस्त पंच निर्णयाने कमी पडलो... किती तास घालवले असतील हे सगळे पाहण्यात ह्याची काहीच गिनती नाही... अगदी पहाटे गजर लावुन ऊठुन मार खाल्लेले पाहिले आहे.... आज सगळा हिशोब परतरवुन दिला..... कमाल मजा आली... कप्तान अन बेस्ट बॅट्समन नाही, ६ ते ७ गोलंदाज जखमी.. तरी तिसर्‍या फळीतील गोलंदाज घेउन २० बळी घेण अन शेवटच्या दिवशी अन ४थ्या डावात ३०० + चेज करुन जिंकणे !!!! Cant get better than this !!! Hats off to Team India and especially Pant, Gill and the Rock of Gibraltar MR CHEPU for today's performance !!!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/20/2021 - 10:45 नवीन
सुरूवातीचे २ एकदिवसीय सामने भारत हरल्याने दौऱ्याची सुरूवात वाईट झाली, परंतु शेवट गोड झाला. या धाग्याचे अवतारकार्य संपले. सर्व प्रतिसादकांचे आभार! ५ फेब्रुवारीपासून भारतात इंग्लंडविरूद्ध पहिला कसोटी सामना सुरू होतोय. त्या मालिकेसाठी कोणीतरी नवीन धागा काढा. कोणी न काढल्यास मी काढीन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा