Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

श
श्रीगुरुजी
Wed, 11/25/2020 - 16:28
🗣 272 प्रतिसाद
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला आहे. या दौर्‍यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे कसोटी सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अ‍ॅडलेड येथे दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे. या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल. एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की. यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे. २७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 79691 views

🗣 चर्चा (272)
प
प्रचेतस Mon, 01/11/2021 - 08:57 नवीन
भारतीय संघाचे अभिनंदन. जिद्दीने खेळले.
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Mon, 01/11/2021 - 09:07 नवीन
टिम पेन काय ग्लोव्ह्स ला अमुल बटर चोळून आला होता काय :)
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 01/11/2021 - 09:16 नवीन
मॅच अतिशय रंगतदार झाली! खूप खूप अभिनंदन टीम ब्लू! जिद्दीनं लढले!! आणि पंतचे खास कौतुक! त्यानं सेहवागची आठवण करून दिली. लागोपाठ २ विकेट्स पडल्यानं जिंकण्याच्या आशा बाजुला ठेवाव्या लागल्या, नाहीतर पोरानं मॅच खेचली होती! प्रतिपक्षाला पुढचे डावपेच आखतांना विचार करायला लावणारी खेळी! :-)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/11/2021 - 09:22 नवीन
अश्विन व विहारीने जवळपास ४३ षटके झुंझार फलंदाजी करून पराभव टाळला याबद्दल दोघांचे कौतुक करावे तितके कमीत आहे. या डावात रहाणे वगळता सर्वांनीच चांगली फलंदाजी केली. विशेषतः पुजारा व पंत खेळत असताना एक वेळ भारत जिंकण्याची बरीच शक्यता निर्माण झाली होती. पंतचे ३ व विहारीचा १ झेल सोडणाऱ्या पेनलाही श्रेय दिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 01/11/2021 - 09:56 नवीन
१/१. आता लक्ष पुढील सामन्यावर.जाडेजा पुढील सामन्यात नसेल. पंत वर पण ?.. साहा येईल पण जाडेजा च्या जागेवर कोण ?.. ते बघाव लागेल. सैनी च्या जागी नटराजनला संधी मिळावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/11/2021 - 15:15 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- If You Had My Love... :- Jennifer Lopez
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 01/11/2021 - 18:45 नवीन
भारताची जिगरबाज फलंदाजी. पंतची आक्रमकता आणि विहारी, पुजारा, अश्विनचा संयम. अजून काही वर्षांनी ही कसोटी आठवली की आपण याचे साक्षीदार होतो हे फीलिंग मस्त वाटेल एकदम. दर्शकाची वंशभेदी टिप्पणी, जडेजा, विहारीची दुखापत, पहिल्या डावतील मोठी पिछाडी अशी अनेक आव्हाने असून सामना अनिर्णित राखला. आजच राहुल द्राविडचा वाढदिवस, त्याला पण हा वाढदिवस चांगलाच लक्षात राहील. आणि आजच विराट कोहलीला कन्या रत्न झाले. एकंदरीत भारतीय क्रिकेट संघासाठी जल्लोषाचा दिवस.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/12/2021 - 05:44 नवीन
जडेजा, विहारी पाठोपाठ दुखापतीमुळे बुमराह सुद्धा चौथ्या कसोटीतून बाहेर.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/12/2021 - 07:13 नवीन
अरे कोणी उरणार आहे की नाही शेवटची टेस्ट खेळायला..?? माहित नाही कोणाला बोलवतील बुमराहच्या ऐवजी.. कमलेश नागरकोटी खरंतर मला खूप आवडलेला खेळाडू आहे. वाटलं होतं त्याला घेतील या टूर मधे सोबत म्हणून तरी.. बघू.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/12/2021 - 09:57 नवीन
विहारीऐवजी मयंक आगरवाल आणि जडेजा व बुमराहच्या जागी कुलदीप, शार्दूल ठाकूर व नटराजन यापैकी कोणतेही दोघे येतील. कदाचित सैनीसुद्धा बाहेर असेल. शार्दूल बऱ्यापैकी फलंदाजी करतो. त्यामुळे तो संघात असेल तर फायदाच होईल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/12/2021 - 10:00 नवीन
सामना कसोशीने अनिर्णीत राखल्याबद्दल बक्कीच्या संघाचं अभिनंदन. पण ही वेळ यायला नको होती. खूप खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. आयपीएल पण खेळा, एकदिवशीय सामनेही खेळा वर पाचदिवशीय कसोटीही खेळा. पुरेशी विश्रांती कोणी घ्यायची? पाचव्या दिवशी अश्विनला तर सरळ उभंही राहता येत नव्हतं : https://www.loksatta.com/trending-news/india-vs-australia-3rd-test-ravichandran-ashwin-wife-emotional-post-after-his-performance-sas-89-2377789/ काय म्हणणार यावर ....! -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/12/2021 - 10:55 नवीन
ज्या निर्धाराने अश्विन व विहारी तब्बल ४३ षटके उसळते चेंडू अंगावर झेलत पाय रोवून खेळपट्टीवर उभे राहिले व पराभव वाचविला, त्या प्रयत्नांना तोड नाही. कालचा खेळ पाहून १९७६ मध्ये वेस्ट इंडीजमधील अंशुमन गायकवाडची खेळी आठवली.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 01/15/2021 - 02:02 नवीन
ऑस्ट्रेलिया १० षटकात २/२२ वॉर्नर अन हॅरिस माघारी परतले. शार्दुल अन सिराज टिच्चून मारा करताहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/15/2021 - 04:08 नवीन
भालताचे प्रमुख गोलंदाज सैनी, सिराज, ठाकूर, नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर एकत्रित फक्त ६ कसोटी सामने खेळले आहेत. संपूर्ण गोलंदाजांचा चमू इतका नवोदित असणे बहुधा पहिल्यांंदाच घडले असावे (अपवाद म्हणजे १९३० च्या दशकातील भारतीय संघ).
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/15/2021 - 04:52 नवीन
खरं तर ४ कसोटी सामनेच खेळलेत. या सामन्यापूर्वी सिराज २, सैनी १, ठाकूर १ व नटराजन आणि सुंदर शून्य कसोटी सामने खेळलेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 01/15/2021 - 04:31 नवीन
स्मिथ गेला. सुदैवाने! सुंदरची पहिली टेस्ट विकेट. दीड तासापूर्वी त्याने शार्दुलला लागोपाठ चौकार ठोकले तेव्हा वाटलं, आज शतक, उद्या द्विशतक करतो हा. ३६ षटके, ३/९३. लबुशन चालू आहे अजून.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/15/2021 - 04:53 नवीन
रहाणेने लाबुशेनचा सोपा झेल सोडला. १०९/३.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 01/15/2021 - 07:46 नवीन
७६ षटके ५/२३६ लबुशेन शतक झाल्यावर लगेच आउट झाला ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट. सैनीने त्याच्या आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूनंतर गोलंदाजी थांबवली. त्याच्या मांडीमध्ये वेदना होत होत्या. रोहितने एक चेंडू टाकून ते षटक पूर्ण केले. शेवटचा फलंदाज टीम पेन खेळतोय. पण भारतीय संघाची गोलंदाजी कितीही भेदक झाली अन समोर कोणताही संघ असला तरी शेपूट वळवळतेच. २७५-३००?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/15/2021 - 08:54 नवीन
४००+
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/15/2021 - 16:17 नवीन
तसेच वाटत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 01/15/2021 - 09:51 नवीन
पहिल्याच दिवशी क्षेत्ररक्षण खुप लुज वाटले. अनुभव बघता गोलंदाजांची कामगीरी चांगली झाली.३५० च्या आत थांबवले पाहीजे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/16/2021 - 04:16 नवीन
ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३६९. भारत ११/१. गिल गेला. पुढच्या चेंडूवर पुजारा थोडक्यात वाचला. ३६९ ही धावसंख्या आपल्याला झेपेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 01/16/2021 - 05:25 नवीन
गिल व रोहित दोघेही स्व. चुका करुन आउट झाले. मानसिक कमकुवतपणा यात दिसुन येतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/16/2021 - 05:31 नवीन
नविन स्लोगन
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 01/16/2021 - 10:40 नवीन
दुसऱ्या दिवसा अखेर पावसामुळे खेळ लवकर थांबवला. उद्या पुजारा आणि रहाणे वर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. दुखापती वाढत चालल्या आहेत. सैनी पुन्हा खेळेल असं वाटत नाही. त्यामुळे ३६९ च्या शक्य तितकं जवळ जाणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने डाव घोषित करून सामना निकाली होईल हे पाहिलं. पण एक वेळ भारत जिंकतो की काय अशी स्थिती होती. यावेळी पुन्हा ते अशी रिस्क घेतील? त्यात आपल्याकडे एक गोलंदाज कमी. उद्या सर्वबाद न झाल्यास , हार होणार नाही अशी आशा आहे. नाहीतर ड्रॉ करण्यासाठी सुद्धा पावसाच्या धावा कराव्या लागतील. त्यापेक्षा फलंदाजांनी धावा करणं जास्त चांगलं.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/16/2021 - 10:51 नवीन
चौथ्या दिवशी सोमवारी दिवसभर पाऊस येण्याची शक्यता ६०% आहे, तर पाचव्या दिवशी मंगळवारी दिवसभर पावसाची शक्यता ५०% आहे. फक्त उद्याचा तिसरा दिवस संपूर्ण दिवस खेळून काढला पाहिजे. त्यामुळे भारत सामना वाचवू शकेल असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 01/17/2021 - 07:18 नवीन
कालच्या दोन विकेट्स नंतर आज पुजारा, रहाणे, अगरवाल, पंत यांनी चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या खेळी केल्या नाहीत. १८६/६ असताना सगळं संपलं असं वाटलं. पण अनपेक्षित पद्धतीने शार्दुल आणि सुंदर यांनी अर्ध शतके करत १२३ धावांची भागीदारी केली. हा प्रतिसाद लिहीत असताना शार्दुल ६७वर आऊट झाला आहे. जिगरबाज भागीदारी. भारत ३०९/७ अजून फार धावा होतील असं वाटत नाही. भारत तीस चाळीस धावा पिछाडी वर असेल. ऑस्ट्रेलियाला रिस्क घ्यायची असेल (जे ते घेण्याची शक्यता जास्त आहे) तर अडीचशे च्या आसपास घोषित करून २८०-३०० लक्ष्य ठेवतील. पण त्यासाठी ७०-८० षटके खेळावी लागतील. आणि त्यानंतर भारतीय संघाला पाचव्या दिवशी चौथ्या डावात सर्वाबाद करावे लागेल. पावसावर बरच काही असेल. ऑस्ट्रेलिया बचावात्मक खेळेल असं वाटत नाही, पण सामना वाचवण्यासाठी खेळले तर ३५० च्या जवळ जातील, पण त्याला १२० षटके लागतील. तिसऱ्या डावात भारतीय गोलंदाज थकलेले आणि दुखापतग्रस्त असले तरी ऑस्ट्रेलिया ला ते कठीणच जाईल.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 01/18/2021 - 03:27 नवीन
लंच ऑस्ट्रेलिया ४/१४९ स्मिथ २८. जम बसला तर अवघड आहे. एकूण आघाडी १८२. अजून ११८ झाले तरी टार्गेट ३००. अवघड असेल. पण आवाक्यात. ऑस्ट्रेलिया टार्गेट ३५० च्या आत असताना घोषित करणार नाहीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/18/2021 - 04:38 नवीन
१९६/५, स्मिभ ५५ वर बाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/18/2021 - 04:57 नवीन
महत्वाची भुमिका बजावणार
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/18/2021 - 05:45 नवीन
ब्रिस्बेनवर ४ थ्या डावात धावा करणे फारसे अवघड नसावे. पूर्वी याच मैदानावर धावांचा पाठलाग करताना ४ थ्या डावात भारताने ३५५, इंग्लंडने ३७० तर २०१६ मध्ये पाकड्यांनी ४५० धावा केल्या होत्या. अर्थात हे संघ सामना हरले होते. भारताने १९७७ मध्ये ४ थ्या डावात ३२४ धावा केल्या होत्या, परंतु पराभव झाला होता. या मैदानावर ४ थ्या डावात यशस्वी पाठलाग करून सामना जिंकलेली सर्वोच्च धावसंख्या २३६ आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने २४३/७ धावा करून २७६ धावांची आघाडी घेतली आहे. परंतु आता पाऊस आला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/18/2021 - 08:21 नवीन
तर अशा त-हेने आपल्याला पुन्हा एकदा जिंकण्यासाठी ३२४ धावांची आवश्यकता आहे. बीनबाद चार धावा झाल्या आहेत. रोहीत शर्मा चार धावांवर तर गील शुन्यांवर खेळत आहेत. आता आपल्याला सामना वाचवणेच हातात आहे. सामना जिंकू असे वाटावी अशी परिस्थिती नाही. पीच गोलंदाजांना साथ देईल अशीच आहे, त्यामुळे उद्या आपले फलंदाज पीचमधे किती रुतून राहतील त्यावर आपलं उद्याचा सामना वाचवणे हातात राहील असे वाटते. हे देवांनो, उद्या आपल्या भारतीय फलंदाजांना टीकून खेळण्याचं सामर्थ्य दे. आपली फलंदाजी तुझ्यासारखीच बेभरवशाची आहे तरीही काही चमत्कार होऊ दे अशी मनोमन प्रार्थना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 01/18/2021 - 08:24 नवीन
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात २९४ धावा, चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारताला हव्यात ३२८ धावा. शक्य आहे का हे ? आज एकही विकेट न टाकता, उद्याचा संपूर्ण दिवस खेळून काढावा लागेल भारताला.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 01/18/2021 - 08:55 नवीन
सामना ड्रॉ होइल पण रोहीत व गील हे १००/१५० पर्यंत टिकले आपण जिंकुही शकतो अस वाटतय. निदान रोहीत ने तरी उभ रहाव मग मागे पंत आहेच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/18/2021 - 13:01 नवीन
80-90 षटकांत, 320 धावा हव्या आहेत इतक्या रन्स तर आपण, 50 षटकांत काढतो हरलो तरी हरकत नाही, प्रयत्न जिंकण्यासाठीच करायचा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/18/2021 - 13:28 नवीन
कसोटी सामन्यात पॉवरप्ले, ३० यार्डांंच्या वर्तुळाबाहेरील क्षेत्ररक्षकांच्या संख्येवर मर्यादा, गोलंदाजांच्या षटकसंख्येवर मर्यादा असे फलंदाजांना अनुकुल असणारे नियम नसतात. वाईड चेंडूसाठी कडक नियम नसतो. नोबॉलवर मुक्त फटका मिळत नाही. त्यामुळे कसोटी सामन्यात इतक्या धावा करणे खूप अवघड असते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/18/2021 - 14:23 नवीन
अशक्य नक्कीच नाही शिवाय, आता गमावण्या सारखे काहीही शिल्लक नाही
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 01/18/2021 - 15:34 नवीन
असहमत, या कसोटी मालिकेबद्दल बरोबर आहे तुमचे पण वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप चालु आहे. त्याचा विचार केला तर आपल्याला ही कसोटी अनिर्णित राहिली तरी चालेल (जिंकलो तर मस्तच होइल) पण हरलो तर फटका बसेल.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 01/18/2021 - 14:52 नवीन
जवळपास ३.५ च्या रनरेटनं धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. हे कसोटी सामन्यात अन् तेही चवथ्या डावात साधारणपणे कठीण असतं. जिंकण्यासाठी प्रयत्न करणे योग्यच आणि ते आपल्या टीमलाही नक्कीच समजत असेल. पण जोखीम किती आणि कोणी घ्यायची, पहिल्या चारनं किती रनरेटनं धावा गोळा करायच्या, पिचचा अंदाज... आणि जोडीला पाऊस. हे आणि असेच अनेक पैलू लक्षात घेऊन पुढची रणनीती राहील. अर्थात् जिंकलेले बघायला कधीही आवडेल, पण मॅच वाचवण्याची वेळ ६-७ व्या क्रमांकावर येणार्‍या फलंदाजांवर येऊ नये असं वाटतं.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 01/18/2021 - 15:14 नवीन
बरोबरै. आणि पहिल्या सामन्यातली नीचांकी धावसंख्या कसे बरे विसरु? एखादी दुसरी जम बसलेली विकिट पडली कि हगवण लागायची.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/18/2021 - 17:38 नवीन
सामना जिंकणे अत्यंत अवघड आहे. भारत सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल असे वाटत नाही. सामना अनिर्णित ठेवण्यासाठीच भारत प्रयत्न करेल. सामना अनिर्णित राहण्यासाठी पावसाची सुद्धा मदत होईल. सामना हरू नये हीच इच्छा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 01/18/2021 - 19:14 नवीन
उद्या सकाळी पावसाची शक्यता जास्त आहे , दुपार नंतर हवेचा वेग वाढणार आहे . म्हणजे उद्या ७० षटकांचा खेळ होइल , ड्रॉ करावी लागणार आहे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 01/19/2021 - 03:28 नवीन
लंच भारत १/८३ रोहित सकाळीच माघारी गेला. सध्या पुजारा आणि गिल टिकून आहेत. लक्ष्य साठ षटकात २४५. इथून जिंकण्याची शक्यता कमी आहे किंवा नाहीच. अनिर्णित राहण्याची शक्यता जास्त. पण शेवटच्या दिवशी पडझड होऊन साठ सत्तर धावात नऊ बाद होणे, सामान्य आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 04:04 नवीन
सामना अनिर्णीत राहील असेच डावपेच. पुजारा १०५ चेंडू १५ धावा तर गील १२८ चेंडूत ७३ धावा. गोलंदाजामधे काही ख़ास जादूही दिसली नाही. त्यामुळे विकेट्स पड़त नाही. चला ही मालिका चांगली झाली. मजा आली. उरलेला सामना बोल टू बोल पाहतोय धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 05:46 नवीन
भारतीय फलंदाज सध्या आता आक्रमकपणे खेळत आहेत, शुभम गील ९१ वर बाद झाल्यानंतर आता १४५ धावा हव्या आहेत. धावांची गती पाहता टार्गेट जवळ जवळ पोहोचेल असे वाटत आहे. राहणे आणि पुजारा कितीकाळ उभे राहतात त्यावर निर्णय अवलंबून असेल. सामना अभीबी बाकी है. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/19/2021 - 05:03 नवीन
काही चमत्कार घडला तरच सामना निकाली होईल. कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, शमी, उमेश यादव व बुमराह असे ९ प्रमुख खेळाडू संघात नसताना सामना व मालिका न हरणे कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/19/2021 - 06:13 नवीन
३७ षटकात हव्यात १४५ धावा. सात विकेट बाकी आहेत. विजय कठीण आहे मात्र अशक्य नाही. भारताने आता जिंकायसाठी खेळायला हवे.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/19/2021 - 07:04 नवीन
२१ षटकांत १०४ धावा. जवळपास ५ चा रनरेट हवा जिंकण्यासाठी. ३० एक रन्स उरलेले असतांना रिस्क घेऊ शकतात. सध्या तरी नाहीच.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 07:46 नवीन
मंडळी, आता १५ षटकात केवळ ६३ धावा हव्या आहेत. एक मोठा रेकॉर्ड मला येथून दिसत आहे. २६५ वर चार फलंदाज बाद झालेले आहेत आणि ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल आता खेळत आहेत, देहबोली सामना जिंकू असाच वाटत आहे. मला वाटतं सामना जिंकण्याची संधी येथून दिसत आहे. धावसंख्या कठीण नाही. आता येथून फलंदाज बाद होऊ नये. मग सामना आपलाच आहे. सपना कुछ बुरा नही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 07:49 नवीन
मयंक अग्रवाल ९ धावांवर झेल देऊन परतला. आता वाशिंग्टन सुंदर वर भरवसा आहे. पण जिंकण्यासाठीच खेळावे. सामना अनिर्नित राखता येईल....पण जिंकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, अशी संधी पुन्हा येणे नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा