भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला आहे. या दौर्यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे
दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
कसोटी सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अॅडलेड येथे
दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे
तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे
चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे
या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे.
या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल.
एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की.
यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे.
२७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.
🗣 चर्चा
(272)
र
रंगीला रतन
Sun, 12/20/2020 - 15:59
नवीन
चुकीचे काहीच नाही. असे धागे मिपावर शोभत नाहीत एवढेच म्हणायचे होते. ज्यांना क्रिकेटची आवड आहे ते सामने बघतात. त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे?
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sun, 12/20/2020 - 15:34
नवीन
बरं झालं क्रिकेटमधला इंटरेस्ट फार आधीच संपला.
मोअर प्रिसाइजली सचिन जेव्हा उतरणीला लागला होता व केवळ विक्रमासाठीच पेन्शनरासारखा खेळत होता तेव्हाच इंटरेस्ट संपला होता. त्यामुळे ह्या पराभवामुळे फार काही दु:ख झाले नाही. नाहीतर मनस्थिती फारे बेक्कार झाली असती.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/25/2020 - 13:57
नवीन
दुसरा कसोटी सामना उद्या शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे सुरू होईल. भारताने संघात ४ बदल केले आहेत. संघ असा आहे.
- मयंक आगरवाल, शुभमन गिल, पुजारा, हनुमा विहारी, रहाणे, पंत, जडेजा, अश्विन, यादव, बुमराह, महंमद सिराज
राहुलला संघात स्थान न देणे व हनुमा विहारी संघात कायम ठेवणे आश्चर्यकारक आहे.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 12/25/2020 - 18:49
नवीन
एक स्पेशालिस्ट फलंदाज सरळ सरळ कमी आहे. विहारी किंवा जडेजाच्या ऐवजी के एल राहुल पाहिजे होता.
ही कसोटी अनिर्णित राहिली तरी भारताच्या दृष्टीने मोठा विजयच म्हणावा लागेल.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 12/25/2020 - 19:28
नवीन
हाल पाहात राहु. माझ्या मनात सर्व वाइटच येत आहे. तरीही उत्तम खेळू असे वाटते.
भारतीय संघाला शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड…
Fri, 12/25/2020 - 20:38
नवीन
मनाचे खेळ लैच वाईट असतात बरेका....
चांगला खेळ करणाऱ्या संघाला शुभेच्छा...!
--ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/26/2020 - 04:05
नवीन
भोजनवेळेपर्यंत ऑस्ट्रेलिया ६७/३. स्मिथला अश्विनने शून्यावर बाद केले. आता १०३/३. लाबूशेन व हेड स्थिरावलेत. पंतचे यष्टीरक्षण चिंताजनक आहे. आतापर्यंत १० बाईज गेल्यात. फिरकी गोलंदाजांंनी लेगच्या बाजूला टाकलेले चेंडू पकडण्यात पंतला समस्या येताना दिसताहेत.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/26/2020 - 05:19
नवीन
अस्ट्रोलिया १३६ - ५, गोलंदाज चांगली गोलंदाजी करीत आहेत, दोनशे आत गुंडाळले पाहिजे असे वाटते, सिराजच्या गोलन्दाजीवर शॉर्ट लेगला घेतलेला झेल मस्त होता.
-दिलीप बिरुटे
-
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/26/2020 - 07:03
नवीन
अष्ट्रोलिया सर्वबाद १९५. आता आपल्या परिक्षेची वेळ आहे, कमीत कमी एक मोठी धावसंख्या उभारावी असे वाटते. एकही भरवशाचा फलंदाज माझ्या नजरेसमोर नाही जो खेळ्पट्टीवर उभा राहील. खेळपट्टीवर दमदारपणे उभे राहीलं की धावा येत राहतील. खेळपट्टीवर संयम आवश्यक आहे. बुमराचा मारा जबरा होता. ४ विकेट्स बळकावल्या. अश्वीन ३, सिराज दोन तर जडेजाला एक विकेट्स मिळाली.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/26/2020 - 07:19
नवीन
भारताची पहिली विकेट पाचव्या चेंडुवर मयंक अग्रवालची पडली. वेगाने चेंडू येत असतांना बॅटलिफ्ट पार डोक्याला लागून येते.बॅट खाली येईपर्यंत कार्यक्रम झालेला असतो अशी चर्चा क्रिकेट समालोचक करत असतांना पायचितचा निर्णयाने मयंक बाद झाला. चेंडु दोन्ही बाजूला वळतोय. रिव्ह्यू वाया गेला. प्रतिसाद प्रकाशित करीत असतांना दोन तीन विकेट पडतील की काय असे वाटत होते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Sat, 12/26/2020 - 07:46
नवीन
प्रतिसाद प्रकाशित करीत असतांना दोन तीन विकेट पडतील की काय असे वाटत होते.
खी खी खी
सर घाबरवू नका हो
मला तर वाटते जडेजा, बुमराह ला वर पाठवून फटकवायला सांगायला पाहिजे. ३० ४० धावा झाल्या तरी ऑसी वर दबाव वाढेल. बाद झाले तरी काही विशेष फरक पडणार नाही.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/26/2020 - 09:03
नवीन
पहिल्या विकेट् नंतर वेगात येणा-या चेंडुना खेळत आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा ०७ तर गिल २८ धावावर खेळत होते. गीलचा कॉन्फिडेंस चांगला होता. उद्या सकाळच्या सत्रात आपण पहिल्या तासभर विकेट गमावली नाही तर आपली धावसंख्या वाढलेली असेल, तसे झाले नाही तर आपण जेव्हा डोळे चोळून उठू तेव्हा शेपुट वळवळ असेल असेही होऊ शकते.
क्रिकेट तज्ञ आजच्या अभ्यासावर ना ड्रॉची शक्यता ३० टक्के म्हणत आहेत. देखेंगे आगे आगे होता है क्या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/26/2020 - 09:54
नवीन
ड्रॉ होण्याची शक्यता नाही. सामना निर्णायक होणार. चौथ्या डावात भारताला फलंदाजी करावी लागणार असल्याने अवघड आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 12/26/2020 - 10:04
नवीन
कमीतकमी ३०० धावा करुन १००ची आघाडी घेतली तरच भारत हा सामना जिंकू शकेल असे वाटते.
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Sat, 12/26/2020 - 11:37
नवीन
भारत हा सामना जिंकू शकेल असे वाटते. ? असे बोलणे खुप घाईचे ठरेल.
राहुल ला विहारीच्या जागी घ्यायला हवे होते अस मलाही वाटत.
उमेश यादव मला अजिबात आश्वासक वाटत नाही. स्ट्रेटेजी करुन गोलंदाजी करतो असे दिसत नाही. विकेट मिळाली तर मिळाली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/26/2020 - 09:53
नवीन
अंपायर्स कॉल ठरल्याने रिव्ह्यू अबाधित राहिला.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/27/2020 - 01:14
नवीन
५७/१ पहिला पाऊण तास तरी उत्तम खेळून काढलाय. कमिन्स उत्कृष्ट बॉलिंग करतोय.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/27/2020 - 01:47
नवीन
लागली गळती. थोड्या वेळाने हजर होतो. ६७ वर तीन. उगा झोपमोड केली. बाय.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/27/2020 - 01:25
नवीन
६१/२
शुभमन गिलने कमिन्सला ड्राइव्ह करायच्या नादात विकेट फेकली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/27/2020 - 01:38
नवीन
६४/३
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/27/2020 - 05:27
नवीन
चहापानापर्यंत भारत १८९/५. आता हलका पाऊस येतोय. महत्त्वाचे म्हणजे रहाणे अर्धशतक करून नाबाद आहे.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Sun, 12/27/2020 - 09:48
नवीन
मस्त खेळले आज.
मागच्या मानहानीकारक पराभवानंतर तर आजची फलंदाजी अजूनच उठून दिसली. राहणेची संयमी फलंदाजी आणि शतक त्याला जडेजाची भक्कम साथ यामुळे ८२ धावांची चांगली आघाडी मिळाली आणि उद्या ती अजून वाढवून १५० किंवा अधिक धावांची व्हायला पाहिजे.
हनुमा विहारी परत अपयशी ठरला, पुढच्या कसोटीत त्याला संधी मिळणे अवघड वाटतेय.
उद्याचा दिवस महत्वाचा आहे, सामना कुठे झुकतोय हे दिवस अखेरीस स्पष्ट होईल असं वाटतंय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/27/2020 - 09:51
नवीन
पुढील सामन्यात रोहीत शर्मा आत येईल व मयंक किंवा विहारी यापैकी एकजण बाहेर जाईल. कदाचित दोघेही बाहेर जातील व राहुलसुद्धा आत येईल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/27/2020 - 09:49
नवीन
दिवसाखेर भारत २७७/५, ८२ धावांची आघाडी, रहाणेचे नाबाद शतक!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 12/28/2020 - 09:49
नवीन
पहिल्या डावात १३१ धावांनी मागे पडल्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात १३३/६. भारताला सामना जिंकण्याची उत्कृष्ट संधी.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/28/2020 - 10:03
नवीन
शेपुट ६०-७० धावांच्या आत गुंडाळले तर विजयाची शक्यता वाटते, शेपुट वळवळत राहिले तर कठीण होईल....!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 12/28/2020 - 12:56
नवीन
प्राडॉ,
तुमच्या तोंडात साखर पाहे. रहाणेची कर्णधारकी आश्वासक वाटते आहे. तो पन्नासच्या आत शेपूट गुंडाळवून देईल. असा माझा अंदाज आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 12/28/2020 - 23:04
नवीन
पाहे नव्हे पडो.
चुकीबद्दल क्षमस्व.
-गा.पै.
- Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक
Mon, 12/28/2020 - 13:50
नवीन
पहिला दिवस ११ विकेट दुसरा दिवस ०५ विकेट तिसरा दिवस ११ विकेट चौथा दिवस ०५ विकेट पडतील म्हणजे भारत ०९ विकेटने जिंकेल माझा अंदाज
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/29/2020 - 04:27
नवीन
आष्ट्रोलियाचा संघाने ७० धावांचं आव्हान दिले आणि त्या धावांचा पाठलाग करतांना आपल्याला दम लागतोय, आपण दोन फलंदाज गमावले. अजिंक्यचा कॉन्फिडंन्स भारी आहे, मस्त खेळतोय. मयंक अग्रवाल आणि पुजारा अनुक्रमे ०५ आणि ०३ वर पॅव्हीलियनमधे जमा झाले. गील आणि अजिंक्य आपल्या जिंकून देतील अशी अपेक्षा करुया. मागच्या सामन्यातील पराभवाची वेदना जरा कमी होईल. ४२ वर दोन जिंकण्यासाठी २८ धावा हव्या आहेत. आता विजय फार दूर नाही.
चिवटपणाने खेळा, अशा शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Tue, 12/29/2020 - 04:45
नवीन
भारताच्या विजयाची औपचारिकता शिल्लक
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Tue, 12/29/2020 - 04:48
नवीन
जिन्कलो :)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 12/29/2020 - 04:48
नवीन
हे हे हे जिंकले हे धड्डड तत्तड, जिंकले,
भारी वाटले बघताना,
विजयाचे सगळे श्रेय रहाणेच्या संयमी खेळीला.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/29/2020 - 04:55
नवीन
सर्व भारतीय संघांचं अभिनंद्न. पाठीराख्याचंही अभिनंदन. मिपा धाग्यावर क्रिकेट सामन्याबद्दल लिहून क्रिकेट सामना पाहण्यास, लिहिण्या बोलण्यास प्रेरीत करणा-या धागा लेखकाचेही आभार आणि अभिनंदन.
पुन्हा भेटू याच धाग्यात ७ जानेवारी २०२१.
सकाळी पावनेपाचला.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 12/29/2020 - 05:16
नवीन
मस्त जिंकलो!
- Log in or register to post comments
स
सुजित जाधव
Tue, 12/29/2020 - 05:21
नवीन
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय... वेल डन राहणे अँड कंपनी...हा विजय खास आहे कारण ह्या सामन्यात विराट, भुवनेश्वर, शमी, ईशांत, रोहित हे अनुभवी खेळाडू नव्हते...गिल आणि सिराज ची कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यातील कामगिरी उल्लेखनीय आहे..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/29/2020 - 05:27
नवीन
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 12/29/2020 - 07:16
नवीन
संघाचे अभिनंदन !
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Tue, 12/29/2020 - 07:20
नवीन
आता पुढील सामन्यात मनोबल सकारात्मक असेल.
पण पंतचे यष्टीरक्षण व शेपटाला लवकर गुंडाळणे यावर लक्ष देण्याची गरज वाटते.
- Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव
Tue, 12/29/2020 - 11:21
नवीन
अभिनंदन
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 12/29/2020 - 11:44
नवीन
माझ्या लहानपणापासून भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याची रड सतत चालू असे. यावेळेस मात्र गोलंदाची अतिशय तिखट आहे. अगदी पहिल्या कसोटीतही गोलंदाजी व्यवस्थित होती. जर शंभरेक धावा आजून मिळाल्या असत्या तर गोलंदाजांनी यजमानांना २०० च्या आत उखडायचा कसोशीने प्रयत्न केला असता.
या कसोटीतही गोलंदाजी एकदम धारदार व सफाईदार होती. क्या जमाना सचमुच इतना सारा बदला है?
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Tue, 12/29/2020 - 11:48
नवीन
संस्मरणीय विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Tue, 12/29/2020 - 11:52
नवीन
अभिनंदन!! पुढच्या दोन्ही कसोटी जिंकण्यास शुभेच्छा!!
एक मजेशीर ढकल या निमित्ताने...
अजिंक्य रहाणे बाबत उद्याचे मुखपत्र
1. अजिंक्यने "करून दाखवले"
2. ऑस्ट्रेलिया को "उखाड दिया"
3. सामनावीर अजिंक्यने कांगारूंचा "कोथळा काढला"
4. लक्षात ठेवा, भारतीय संघ कोणाच्या बापाचा नाही
5. शेवटी विजयी कप्तान महाराष्ट्राचाचं
6. महाराष्ट्राच्या नेतृत्वाशिवाय देशाला गत्यंतर नाही
7. अजिंक्य राहण्यासाठी महाराष्ट्र नेहमीचं दिशादर्शक
8. कांगारूंनो सावधान : आ देखे जरा किसमे कितना हैं दम
9. मराठी रहाणे समोरून वार करतो
10. मर्द मराठा रहाणे
11. एकट्या रहाणेने 11 ऑस्ट्रेलियन घरी बसवले
12. जगातील बेस्ट कप्तान
13. कांगारूरुपी गिधाडांनो रहाणे तुमचा बाप आहे
14. हीच ती वेळ : रहाणेचे कौतुक करण्याची
15. पुढील 50 वर्षे अजिंक्यचं राहणार कप्तान
#IndvsAus2020 #अजिंक्य #राहणे #रहाणे #कोणाचाराहणेतरकोणाचारहाणे
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 12/29/2020 - 15:05
नवीन
जिंकलो असलो तरी संघात काही बदल हवेत
अगरवाल = रोहित शर्मा
विहारी = के एल राहुल
हे बदल गरजेचे आहेत.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Tue, 12/29/2020 - 19:23
नवीन
सहमत
उमेश यादवची दुखापत गंभीर असेल तर नवदीप सैनी किंवा नटराजनला संधी मिळू शकते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 12/29/2020 - 20:40
नवीन
स्विंग ला मिळणारी मदत बघता नटराजनला संधी मिळायला हवी
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Wed, 12/30/2020 - 06:03
नवीन
उमेश तिसर्या सामन्यात खेळु शकणार नाही आहे त्याबदली नटराजन उत्तम पर्याय वाटतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/30/2020 - 06:58
नवीन
नटराजन कसोटी संघात नाही.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 12/30/2020 - 07:05
नवीन
बरोबर आहे, पण बदली खेळाडू म्हणुन तो आत येऊ शकतो. तो अजुन ऑस्ट्रेलियामधेच आहे.
बातमी
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 12/30/2020 - 08:30
नवीन
एखादा खेळाडू जखमी झल्यास बदली खेळाडू मिळू शकतो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »