भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला आहे. या दौर्यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे
दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
कसोटी सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अॅडलेड येथे
दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे
तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे
चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे
या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे.
या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल.
एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की.
यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे.
२७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.
🗣 चर्चा
(272)
श
श्रीगुरुजी
Sun, 12/06/2020 - 13:27
नवीन
भारताने दुसरा ट-२० सामना जिंकून ३ सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 12/08/2020 - 10:43
नवीन
तृतीय ट-२० सामना -
ऑस्ट्रेलिया १६१/२ (१७.३)
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Wed, 12/09/2020 - 05:59
नवीन
ऑस्ट्रेलिया ही नेहमीच माझी फेवरेट टिम राहीली आहे. १९९९ ते २०१८/१९(ऑस्ट्रेलियात) पर्यंत ६ टेस्ट सिरीज मध्ये आपण फक्त १ जिंकलो आहोत तर ते ४ वेळा. त्यात दोन सिरीज मध्ये आपल्याला व्हाईटवॉश दिला आहे. स्टार्क,कमिंस,हेजल्वुड हे त्रिकूट व आता वॉरनर , स्मिथ हि आहेत. स्मिथच्या वेगळ्या शैलीमुळे त्याला आउट करण आपल्या गोलंदाजाना नेहमी कठीण जात.
मला तरी ही टेस्ट सिरीज ऑस्ट्रेलिया जिंकेल असे वाट्ते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/09/2020 - 08:06
नवीन
मला तरी ही टेस्ट सिरीज ऑस्ट्रेलिया जिंकेल असे वाट्ते.
ऑस्ट्रेलिया ही कसोटी मालिका किमान २-० या फरकाने जिंकेल. ४-० या फरकाने सुद्धा जिंकण्याची बरीच शक्यता आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/09/2020 - 08:08
नवीन
पार्थिव पटेलने निवृत्ती जाहीर केली.
https://www.lokmat.com/cricket/parthiv-patel-retires-all-forms-cricket-a601/
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/16/2020 - 16:12
नवीन
उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता ऍडलेड येथे भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र असा खेळला जाईल. या सामन्यासाठी भारताने खालील ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
१) शॉ
२) मयंक आगरवाल
३) पुजारा
४) कोहली
५) रहाणे
६) हनुमा विहारी
७) साहा
८) अश्विन
९) उमेश यादव
१०) शमी
११) बुमराह
मागील बहुसंख्य सामन्यात पूर्ण अपयशी ठरलेल्या शॉला संघात घेणे धक्कादायक आहे. विशेषतः राहुल व गिल या दोघांना बाहेर बसवून शॉ कसा काय संघात येऊ शकतो? तसेच हनुमा विहारी हा कामचलाऊ गोलंदाज आहे. त्याच्याऐवजी कुलदीप यादव किंवा जडेजा योग्य ठरले असते.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 12/16/2020 - 16:29
नवीन
शॉ कडून मला अपेक्षा आहेत. मी आधी पण म्हणालो होतो, कसोटीसाठी शॉ पाहिजे.
विहारी बाबत सहमत. त्याच्या ऐवजी जडेजा पाहिजे होता असं माझं मत.
बघू उद्या काय होतंय.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 12/16/2020 - 20:11
नवीन
जडेजा फिट नाही
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/17/2020 - 04:44
नवीन
शॉ खेळला तर चांगलेच आहे.
आज भारत प्रथम फलंदाजी करतोय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/17/2020 - 05:04
नवीन
शॉ केवळ दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाबाद.
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
गुरुवार, 12/17/2020 - 05:09
नवीन
शॉ ला फक्त शॉ गिरीच येते. त्याच्या पेक्षा राहुल ला घेतल पाहीजे होते.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 12/17/2020 - 06:05
नवीन
शॉ दुसऱ्या चेंडूवर ड्राइव्ह करायला गेला, अति उतावळेपणा
मयंक आणि पुजारा तग धरून उभे आहेत
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/17/2020 - 09:17
नवीन
ऑस्ट्रेलियातील मालिकेत १९७७ पासून एक विशिष्ट सातत्य (१९८३ चा अपवाद सोडून) दिसले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याचा निकाल हाच मालिकेचा अंतिम निकाल असतो.
१९७७, १९९१, १९९९, २००७, २०११, २०१५ - ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला व मालिकाही जिंकली.
२०१८ - भारताने पहिला सामना जिंकला व मालिकाही जिंकली.
१९८६, २००३ - पहिला सामना अनिर्णित व मालिकाही अनिर्णित
अपवाद १९८३ - पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला पण मालिका अनिर्णित
(चूभूदेघे)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/17/2020 - 09:18
नवीन
१९८३ चुकुन लिहिले. ते १९८१ असे वाचावे.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 12/17/2020 - 09:38
नवीन
पुजारा बाद, रहाणे आलाय, सराव सामन्यातील फॉर्म पुढे चालू राहिला तर बरं.
पहिल्या सत्रात ऑसी गोलंदाजांनी खूपच भेदक मारा केला. पुजारा कोहलीची भागीदारी होतेय असे वाटत असतानाच पुजारा बाद झाला.
आता चांगल्या फलंदाजांची ही शेवटची जोडी. मोठी भागीदारी व्हायलाच पाहिजे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/17/2020 - 12:55
नवीन
दिवसाखेर २३३/६ अशी बरी धावसंख्या झाली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/18/2020 - 05:38
नवीन
२५ चेंडूत खेळ आटोपला. भारत सर्वबाद २४४.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 12/18/2020 - 08:13
नवीन
कसोटीत भारताचे फलंदाजीतले शेपूट नेहमीच ठेचले जाते आणि प्रतिस्पर्ध्याचे (कोणीही असो) नेहमीच वळवळ करते.
बुमराहने दोन बळी घेतले आहेत बघू आता काय होतंय. महत्वाचा दिवस आज आणि उद्या.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/18/2020 - 10:28
नवीन
१११/६.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/18/2020 - 10:30
नवीन
१११/७
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/18/2020 - 10:33
नवीन
१११/७
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Fri, 12/18/2020 - 11:41
नवीन
मस्त चालु आहे सामना
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/18/2020 - 11:58
नवीन
१९१/१०
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Fri, 12/18/2020 - 13:07
नवीन
प्रुथ्वि ४ वर बाद
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Fri, 12/18/2020 - 16:31
नवीन
जिंकायची संधी आहे. बघुया काय होत ते.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 12/18/2020 - 16:36
नवीन
अगदी खरंय. बक्कीने उद्या दिवसभर खेळून फक्त २०० धावा काढल्या तरी चालेल. २६३ चं आव्हान ऑस्ट्रेलियाला पार करणं अवघड आहे.
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 12/18/2020 - 17:56
नवीन
कमीत कमी ३०० धावांचे टार्गेट दिले पाहिजे आणि स्मिथ लवकर बाद झाला पाहिजे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/18/2020 - 18:43
नवीन
आज स्मिथ लवकर सापडला, पण असे क्वचितच होते. तो दुसऱ्या डावात शतक करू शकतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/18/2020 - 19:09
नवीन
आज स्मिथ लवकर सापडला, पण असे क्वचितच होते. तो दुसऱ्या डावात शतक करू शकतो.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Sat, 12/19/2020 - 05:33
नवीन
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांची नांगी. १५/४
आता कोहली रहाणे शेवटची जोडी
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Sat, 12/19/2020 - 05:37
नवीन
रहाणे शून्यावर बाद
१५/५
चला आता वेब सिरीज बघतो कोणती तरी
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/19/2020 - 05:37
नवीन
१५/५
रहाणे व पुजारा शून्यावर बाद.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/19/2020 - 05:42
नवीन
कोहली गेला. १९/६. सामना आजच संपणार बहुतेक.
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Sat, 12/19/2020 - 05:51
नवीन
कठीण आहे.
ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना __/\__
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Sat, 12/19/2020 - 06:14
नवीन
खुपच वाईट हारणार :(
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Sat, 12/19/2020 - 08:21
नवीन
अवघ्या ३६ धावात संपूर्ण भारतीय संघ गारद.
निचांकी धावांचा विक्रम असावा बहुतेक हा. सामन्याचा निकाल आजच लागणार बहुतेक. फक्त ९० धावा हव्यात ऑस्ट्रेलियाला जिंकायला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/19/2020 - 10:42
नवीन
अत्यंत वाईट पद्धतीने हरले.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 12/19/2020 - 18:29
नवीन
श्रीगुरुजी,
कोण म्हणतो आयपीएल प्रभावशाली नाही? आयपीएल नामे चेंडूफळी खेळाने क्रिकेटची वाट लावलीये. गोलंदाजीवर असलेले अतिरिक्त निर्बंध हटवले की फलंदाजांची भंबेरी उडते. तिचा सामना कसा करायचा ते शिकण्यासाठी परिश्रम व विश्रांती दोन्हींची निकड असते. पण पैसे हापसायच्या नादात तिथं लक्ष देणार कोण.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/19/2020 - 10:47
नवीन
आज ३६ धावांवर उजेड पडला तेव्हाच आपलं सर्व संपलं. दुस-या इनिंगला एकेक महारथी धारातीर्थ पडले तेव्हा सामना बघावा सुद्धा वाटत नव्हते. लैच बेक्कार हरले. हारजीत चालायचीच म्हणून तान हलका करुया.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/19/2020 - 18:12
नवीन
शमीच्या हाताचे हाड मोडल्याने दौऱ्यातून बाहेर. कोहली पुढील सामने खेळणार नाही. ०-४ असा मार खाण्याची बरीच शक्यता आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 12/20/2020 - 04:55
नवीन
1 0 0 0 0 0 0 3 0 2 0 1 0 0 0 0 0 0 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 4 0 0 2 0 0 0 0 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 W 0 0 0 0 W 0 0 0 W 0 0 0 4 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 0 0 0 0 1 0 0 2 0 0 2 0 0 0 0 0 0 W W 0 0 4 0 0 1 0 W 0 1 0 4 0 0 0
And That's All Folks!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/20/2020 - 05:21
नवीन
चालायचंच. प्रत्येक देशाचा संघ कधीतरी अशा परिस्थितीतून गेला आहे.
केपटाऊन येथे २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाची स्थिती दुसऱ्या डावात २१/९ व नंतर सर्वबाद ४७ अशी दारूण होती. पॉंटिंग, मायकेल हसी, मायकेल क्लार्क, शेन वॉटसन, शॉन मार्श असे दिग्गज फलंदाज संघात असूनही वाट लागली होती.
https://www.espncricinfo.com/series/australia-tour-of-south-africa-2011-12-514013/south-africa-vs-australia-1st-test-514029/full-scorecard
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/20/2020 - 07:23
नवीन
द्वारकानाथ संझगिरीचा आज लेख आहे दै. सामनात. त्यांनीही अशीच आठवण दिली आहे. १९७४ मधे इग्लंडविरुद्ध लॉर्डसवर खेळतांना तेव्हा भारतीय दुसरा डाव असाच ४२ धावात गुंडाळला गेला होता. लाजीरवाणा पराभव झाला. तेव्हाही अशीच हाराकिरीवर चर्चा झाली. हायकमिशन बी.के.नेहरुंनी त्यांना बोलावलं तेव्हा संघ उशिरा पोहचला तेव्हा ते भडकले आणि कर्णधार वाडेकरला अद्वात्द्वा बोलले ''तुम्हाला बॅटींग करता येत नाहीच, पण तुम्हाला वेळेवर कार्यक्रमालासुद्धा येता येत नाही'' हे शब्द संघाला फार झोंबले वाडेकर आपली टीम घेऊन पुन्हा बसमधे येऊन बसला. भडकलेली माथी थंड झाल्यावर संघाची समजूत घालण्यात आली पुढे अनेक दिवस संघावर टीका होत होती. इग्लंडमधे तेव्हा एक चित्रपट येऊन गेला ''समर ऑफ ४२ टू '' हिंदुस्थानच्या संघाला समर ऑफ ४२ टू म्हटल्या जात होते. ( सामनाच्या लेखातून साभार)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 12/20/2020 - 11:22
नवीन
डाव ट्विटरवर मावतो : https://twitter.com/ESPNcricinfo/status/1340181317950951424
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/20/2020 - 07:33
नवीन
एक बेशरमाचं ओलं फोक घेऊन भारतीय फलंदाजी ज्या अनुक्रमाने आले त्या अनुक्रमे एकेक फलंदाजाच्या ढुंगावर चार-चार निब्बर फटके द्यावेत असा विचार येत आहे.
-दिलीप बिरुटे
(भडकलेला भारतीय क्रिकेट फॅन)
-
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/20/2020 - 10:26
नवीन
शांत व्हा डॉक्टरसाहेब. होतं असं कधीतरी. सर्वच देश या परिस्थितीतून गेलेत.
कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या नीचांकी धावा २६ आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या नीचांकी धावा ३०, ३०, ३५, ३६, ४३, ४५, ४७ अशा आहेत. ऑस्ट्रेलियाची नीचांकी धावसंख्या ३६ व ४२ आहे. विंडीज व इंग्लंडची ४७ तर पाकड्यांची ४९ आहे. श्रीलंका वगळता सर्व प्रमुख देश कधी ना कधी ५० धावांच्या आत आटोपले आहेत.
दु:ख होणे स्वाभाविक आहे. परंतु हा खेळाचाच भाग आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 12/20/2020 - 09:13
नवीन
जर सहा वर्षांनी त्याच संघासाठी, त्याच संघाविरुद्ध, तोच लेख जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून चालत असेल तर..
ये रे माझ्या मागल्या........
- जे पी मॉर्गन
बाबांनो आम्हाला क्रिकेटमधलं काही कळत नाही. पण जीव तोडून केलेला प्रयत्न नक्कीच कळतो. तुम्ही वर्षातले तीनशे दिवस क्रिकेटच खेळत असता, प्रेशर असतं सगळं मान्य.... आयपीएल खेळा, जाहिराती करा... आमचं काही म्हणणं नाही. पण ज्यासाठी आम्ही क्रिकेट बघतो ती मजा नका हिरावून घेऊ! तुम्ही पण लाइव्ह कार्यक्रमात lip synch करणार्या त्या चिर्कुट महागायकांसारखे आयपीएलच्या तमाश्यात नाचण्यात खुश असाल तर लक्षात ठेवा.... अजून ५ - ७ वर्षांत ते खूळ उतरेल आणि दुसर कुठलंतरी वेड लागेल क्रिकेटला. पण अजून दोन पिढ्यांनी तेव्हाचे आजोबा त्यांच्या नातवंडांना क्रिकेटच्या गोष्टी सांगतील तेव्हा तुम्ही त्यात असाल का हा विचार करा. हरायला आमची ना नाही... पण हरलात तरी अभिमानाने दाखवण्यासारखे घाव तरी अंगावर असले पाहिजेत रे! पहिल्या कसोटीत पहिल्या दोन दिवसातच माना नका टाकू! डोळ्यांला डोळे भिडवून लढा रे....दात ओठ खाऊन तुटून पडा....धीरोदात्तपणे त्यांच्या आक्रमणाचा सामना करा.....नवे डावपेच लढवा.... झोकून द्या स्वतःला.
बाकी काही नाही... तुम्ही असं केलंत ना तरच मी माझ्या पोराला सांगू शकीन "लेका ठेव ते पुस्तक बाजूला.... आपली लोकं बघ काय लढताहेत! ह्यांच्याकडून जास्त शिकशील!"
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 12/21/2020 - 16:52
नवीन
बैलाचा डोळा. बेक्कार हरलेत...
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Sun, 12/20/2020 - 09:44
नवीन
अशा धाग्यांनी मिपाची माबो कडे वाटचाल होत असल्याचे बघून वाईट वाटले :(
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Sun, 12/20/2020 - 10:46
नवीन
ह्या धाग्यात काही चुकीचे आहे का? सध्या चालू असलेल्या मालिके विषयी चर्चा चालु आहे. ह्या मध्ये वाईट वाटण्याचं काय कारण आहे?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »