भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला आहे. या दौर्यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे
दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
कसोटी सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अॅडलेड येथे
दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे
तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे
चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे
या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे.
या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल.
एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की.
यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे.
२७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.
🗣 चर्चा
(272)
स
स्पार्टाकस
Wed, 11/25/2020 - 18:37
नवीन
भारताने पहिली डे-नाईट टेस्ट ऑलरेडी ईडन गार्डन्सला बांग्लादेशविरुद्ध खेळलेली आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/25/2020 - 18:41
नवीन
हो. भारताबाहेर पहिल्यांदाच खेळणार.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 11/25/2020 - 19:05
नवीन
२००४ मध्ये बकनर नावाचा धटिंगण नसता तर आपण ती सिरीज नक्की जिंकलो असतो. या बकनर च्या लीलांवर एक वेगळाच लेख होईल आणि या सिरीजवर पण. असो
विराट बाबा होणार म्हणून कदाचित काही कसोटीसाठी उपलब्ध नाही.
रहाणेकडून खूप अपेक्षा आहेत पण IPL मधला त्याचा फॉर्म एकदमच बकवास होता. ऑस्ट्रेलियामध्ये त्याला लवकर लय सापडणे महत्वाचे आहे.
फलंदाजी खूपच कमकुवत वाटत आहे. बघू पुढच्या आठवड्यात. गुरुजी हाच धागा अपडेट करावा ही विनंती, जमेल तशी हजेरी लावेन.
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
Wed, 11/25/2020 - 19:14
नवीन
स्टीव्ह बकनरच्या लीलांवर मी लेख लिहीलेला आहे ऑलरेडी.
http://www.misalpav.com/node/38364
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 11/25/2020 - 19:26
नवीन
येस्स, पूर्वी वाचला होता आणि आता विसम्रारणात गेला होता.
तुमचे मिपावरील सर्व लेख वाचले आहेत आणि नवीन लेखांची बरेच दिवसांपासून वाट बघतोय.
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
Wed, 11/25/2020 - 19:13
नवीन
मॅरेनस लबुशेन - मूळ दक्षिण आफ्रीकन उच्चार लबुस्काग्ने - गेल्या सिरीजला सिडनीच्या टेस्टमध्ये खेळला आहे भारताविरुद्ध.
२०१८ ऑक्टोबरपासूनच टेस्टमध्ये खेळतोय, गेल्या वर्षी नाही.
कन्कशन सब्स्टीट्यूट म्हणून खेळलेला पहिला बॅट्समन लबुशेनच आहे गेल्या अॅशेस सिरीजमध्ये.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/25/2020 - 19:26
नवीन
२००४ मध्ये बकनर नावाचा धटिंगण नसता तर आपण ती सिरीज नक्की जिंकलो असतो.
ते २००७-०८ मध्ये. तेव्हा मालिका हरण्याऐवजी बरोबरीत सुटली असती.
मालिका जिंकण्याची सर्वोत्कृष्ट संधी १९८६ मध्येय होती. एका कसोटीत भारताला विजयासाठी ५ व्या दिवशी भोजनानंतरच्या खेळात १२६ धावा करायच्या होत्या व गावस्कर, श्रीकांत, मोहिंदर, अझरूद्दीन, वेंगसरकर असे तगडे फलंदाज संघात होते. चहापानानंतर तासाभरात पाऊस येईल असा अंदाज होता. त्यामुळे भारताने दुसऱ्या सत्रातच १२६ धावा करून सामना व मालिका जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु दुसऱ्या सत्रात गावसकर (५४ चेंडूत ८), मोहिंदर (२७ चेंडूत ३) व वेंगसरकर (१२ चेंडूत १) यांनी अत्यंत संथ फलंदाजी केल्याने २५ षटकात फक्त २ बाद ५९ धावा झाल्या. चहापानानंतर लगेच पाऊस आल्याने पुढे खेळ न होता सामना अनिर्णित राहिला. श्रीकांतने ६१ चेंंडूत ३८ धावा केल्या होत्या. कपिल आधी आला असता तर १२६ धावांसाठी २५ षटके पुरेशी होती.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Sat, 11/28/2020 - 09:11
नवीन
छान माहिति
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 11/25/2020 - 19:31
नवीन
पृथ्वी शॉ ला कसोटीत संधी मिळायला पाहिजे, मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामन्यात त्याचा पाय मुरगळला आणि तो बाहेर पडला. पण त्याआधी त्याने चमकदार कामगिरी केली होती.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/25/2020 - 19:37
नवीन
नको. सध्या तो अत्यंत वाईट फॉर्म मध्ये आहे.
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
Wed, 11/25/2020 - 19:49
नवीन
बकनर २००४ मध्येही भारताला नडला होता.
ब्रिस्बेनच्या टेस्टमध्ये बॉल स्टंपच्या किमान फूटभर वरुन जात असताना त्याने सचिनला ढापला होता.
त्यापेक्षाही सिडनी टेस्टच्या चौथ्या इनिंग्जमध्ये आगरकर आणि कुंबळेच्या बॉलिंगवर जस्टीन लँगरला आणि इरफान पठाणच्या बॉलिंगवर डॅमियन मार्टीनला प्लम्ब एलबीडब्ल्यू असताना बकनरने नॉटआऊट दिलं होतं. कुंबळेच्याच बॉलिंगवर सायमन कॅटीचलाही बकनरने एलबीडब्ल्यू दिलेलं नव्हतं आणि टेस्ट ड्रॉ झाली होती नाहीतर स्टीव्ह वॉची शेवटची तीच सिरीज भारताने २-१ जिंकली असती.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/26/2020 - 05:43
नवीन
बकनर पक्षपाती होतेच. पूर्वी श्रीलंका व न्यूझीलंडचे पंच सुद्धा पक्षपाती निर्णय द्यायचे. शकूर राणा व खिजर हयात ही पक्षपाती पाकड्या पंचांची जोडी तर क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक कुप्रसिद्ध पंच असावे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 11/26/2020 - 13:27
नवीन
केवळ भारतातील प्रेक्षकवर्ग प्रक्षेपण करणार्या वाहिनीला मिळावा म्हणून सामने दीड दोन तास उशीरा सुरू होणारेत!
म्हणजे कसोटी स्थानिक वेळ ११.३० आणि दिवस रात्र सामने पावणे चारला!
आणि यंदा पर्थ - वाका मध्ये एकही सामना नाही!
ताजा कलमः इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात सामने कधी सुरू होतात?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/26/2020 - 14:19
नवीन
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असल्याने स्थानिक वेळेनुसार दुपारी १:४० वाजता सुरू होतील.
ट-२० सामने कमी वेळ चालत असल्याने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:१० वाजता सुरू होतील.
एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल. उर्वरीत ३ कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होतील.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 11/26/2020 - 15:24
नवीन
आता इथे 7.55 pm झालेत.
सिडनी मध्ये 1.25 am झालेत.
सिडनी मध्ये सकाळी 9.30 म्हणजे आपल्याकडे पहाटे 4.00 ना?
अन् दुपारी 1.40 म्हणजे आपल्याकडे सकाळी 8.10 ना?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/26/2020 - 15:29
नवीन
हो. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घड्याळ बदललं हे विसरलोच.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/26/2020 - 15:44
नवीन
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असल्याने स्थानिक वेळेनुसार दुपारी २:४० वाजता सुरू होतील.
ट-२० सामने कमी वेळ चालत असल्याने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७:१० वाजता सुरू होतील.
एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. उर्वरीत ३ कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होतील.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/26/2020 - 14:21
नवीन
ताजा कलमः इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात सामने कधी सुरू होतात?
याच वेळी सामने सुरू होतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 11/26/2020 - 15:58
नवीन
काही तरी गल्लत होते आहे का?
उद्याचा एक दिवसीय सामना
GMT ३. ४० AM ला सुरु होत आहे म्हणजेच भारतीय प्रमाण वेळ ०९. ४० ला
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 11/26/2020 - 15:59
नवीन
क्षमा करा
सकाळी ०९. १० वाजता
०९.४० ला नव्हे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/26/2020 - 17:49
नवीन
बरोबर आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:१० वाजता सुरू होईल.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Fri, 11/27/2020 - 09:23
नवीन
आज ऑस्ट्रेलियन फलंदाजानी, भारतीय बोलर्सची येथेच्छ धुलाई करत,
भारताला जिंकण्यासाठी ३७५ धावांचे आव्हान दिले आहे.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 11/27/2020 - 09:26
नवीन
ईथे रोज अपडेट आणि सामन्याचे विश्लेषण येत राहो. सामने बघणे शक्य होणार नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/27/2020 - 09:37
नवीन
भारतीय गोलंदाजाची प्रचंड धुलाई झाली. स्मिथचे भारताविरुद्ध अजून एक शतक.
ऑस्ट्रेलिया ३७४/६ (५०), भारत ३९/० (३)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/27/2020 - 10:11
नवीन
८०/३ (९.५)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/27/2020 - 10:37
नवीन
राहुल गेला. १०४/४ (१४). फलंदाजांनी सुद्धा निराशा केली.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Fri, 11/27/2020 - 12:40
नवीन
हातातून गेल्यात जमा आहे. संघर्ष करणारा हार्दीक पंड्या ९० वर आऊट झाला.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 11/27/2020 - 19:59
नवीन
भारताच्या गोलंदाजांची पिसे काढली. नवदीप सैनी आणि चहलला खूपच फोडून काढलं. पंड्या हल्ली दुखपतीनंतर गोलंदाजी का करत नाही? ऑस्ट्रेलियामध्ये तो चांगला विकल्प होऊ शकतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 11/28/2020 - 18:36
नवीन
उद्या सकाळी ९:१० वाजता सिडने येथेच दुसरा एकदिवसीय सामना आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/29/2020 - 05:31
नवीन
ऑस्ट्रेलिया ६६/० (१०.२)
आजही वाट लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 11/29/2020 - 07:12
नवीन
२१८/२ आपल्या खेळांडूच्या देहबोलीत कमालीची नकारात्मकता दिसत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/29/2020 - 07:47
नवीन
२९२/२ (४१.१)
या सामन्यात सुद्धा स्मिथचे बरोबर ६२ चेंडूत शतक.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Sun, 11/29/2020 - 09:43
नवीन
३९० चे टारगेट आहे आज.
भारत : ५८/१
--
कठीण आहे आज भारताचे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/29/2020 - 15:22
नवीन
दुसऱ्या सामन्यातही पराभव. गोलंदाजी अत्यंत प्रभावहीन आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज बुमराह आणि ऑस्ट्रेलियचा प्रमुख गोलंदाज स्टार्क अत्यंत वाईट गोलंदाजी करताहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज चंगळ करताहेत तर भारतीय फलंदाज चांगली सुरूवात करून बाद होताहेत. आज जडेजाने सुद्धा अतिशय सोपा झेल सोडला.
एकदिवसीय सामन्यांची मालिका गेली. कसोटी मालिका जिंकणे जवळपास अशक्य आहे. ट-२० मालिका जिंकण्याची बरीच शक्यता आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 12/01/2020 - 16:04
नवीन
श्रीगुरुजी,
हे दोन एकदिवसीय सामने खेळण्यापूर्वी भारतीय संघ सराव सामने खेळला का?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 12/01/2020 - 16:41
नवीन
नाही
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/02/2020 - 09:22
नवीन
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून ५९ षटकांंत ३०२/५ धावा केल्या. भारताने सलग ३ सामन्यात ३००+ धावा केल्या. म्हणजे मालिकेत फलंदाजी चांगली झाली. बरेच फलंदाज जम बसल्यानंतर बाद झाले.
ऑस्ट्रेलियाने सलग २ सामन्यात ३७४+ धावा केल्या. म्हणजे भारताची गोलंदाजी अत्यंत वाईट झाली. परदेशी भूमीवर ३७४+ धावांचा यशस्वी पाठलाग करणे कोणत्याही संघासाठी जवळपास अशक्य असते. त्यामुळे भारत सामने हरला यात आश्चर्य नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/02/2020 - 09:22
नवीन
५० षटकांंत
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/02/2020 - 09:23
नवीन
धवनने स्लिपमध्ये फिंचचा सोपा झेल सोडला. पंड्याने स्मिथला धावबाद करण्याची सोपी संधी सोडली. स्मिथ खेळपट्टीच्या मध्यात असताना शॉर्ट मिडविकेटवरून यष्टीवर चेंडू मारता आला नाही (लहानपणी बैदूल खेळला नसावा). आता बुमराहने स्वतःच्या गोलंदाजीवर फिंचचा सोपा झेल सोडला.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 12/02/2020 - 11:24
नवीन
सामना रंगतदार स्थितीत आहे.
ऑस्ट्रेलियाला ८४ चेंडूत १०६ धावा करायच्या आहेत, अजून ५ विकेट बाकी आहेत, मॅक्सवेल अजून बाकी आहे.
पंड्या आणि जडेजाच्या फटकेबाजी मुळे ३०० चा आकडा कसाबसा पार झाला. रोहीतची उणीव खूपच जाणवत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/02/2020 - 12:14
नवीन
२७८/८ (४७)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/02/2020 - 12:14
नवीन
२७९/९ (४७.१)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/02/2020 - 12:39
नवीन
भारत जिंकला. ऑस्ट्रेलिया सर्वबाद २८९.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 12/02/2020 - 17:06
नवीन
श्रीगुश्री,
हा बक्कीचा हावरटपणा आहे. सराव सामने खेळवले नाहीत तर खेळाडू तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणार कधी? पहिल्या दोन सामन्यांत? ही साधी गोष्ट बक्कीला निश्चितच कळते. पण पैशांवर पाणी सोडणार कोण!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 12/02/2020 - 17:07
नवीन
श्रीगुरुजी म्हणायचं होतं. चुकून श्रीगुश्री टंकलं. क्षमा असावी.
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/04/2020 - 11:49
नवीन
पहिला ट-२० सामना
भारत १६१/७ (२०)
ऑस्ट्रेलिया ५४/० (७)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/04/2020 - 15:30
नवीन
भारताने ११ धावांनी सामना जिंकला. भारत ही मालिका २-१ अशी जिंकेल असं वाटतंय.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 12/09/2020 - 05:14
नवीन
तुमचा अंदाज बरोब्बर आला.
सराव कसोटी सामन्यात रहाणे, पुजारा सोडून सर्व ढेपाळले.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 12/04/2020 - 16:45
नवीन
रविंद्र जडेजाला फलंदाजीत चांगला सूर मिळालाय.
कसोटी खेळला तर भारताला चांगला फायदा होईल
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 12/04/2020 - 21:11
नवीन
दुखापतीमुळे जडेजा सध्या ट २० मधून बाहेर
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »