Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख
Sat, 02/02/2019 - 02:15
🗣 783 प्रतिसाद
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 542105 views

🗣 चर्चा (783)
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 14:22 नवीन
शलभ, कधीच सुधरणार नाही! सुधरण्यासाठी तुमचा जन्मच झालेला नाही, असेच म्हणावे लागेल! औषधें घेऊनही बरे होण्याचे शक्यता वाटत नाही. 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही' हेच खरे!!!
  • Log in or register to post comments
श
शलभ Sun, 02/10/2019 - 14:58 नवीन
लवकर बरे व्हा.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 15:18 नवीन
आम्ही ठणठणीत आहोत! तुमच्याच तब्बेतीची चिंता वाटत आहे! लवकरात लवकर बरे व्हाल, अशी आशा करतो!!!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 02/09/2019 - 15:46 नवीन
मतदार बघून घेतील! मग बसा बोंबलत!!! बघा शेवटी सत्य आलच ना बाहेर ! तुम्हीच बोंबलत आहात !! मतदार बघुन घेतीलच !!! मतदारांना हे चांगलच माहीत आहे की कोंण चोर / भ्रष्ट आहे आणी कोण ईमानदार !
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 16:04 नवीन
मतदारांना हे चांगलच माहीत आहे की कोंण चोर / भ्रष्ट आहे आणी कोण ईमानदार ! काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात अजिबात फरक उरलेला नाही, हे मतदार ओळखून आहेत! काँग्रेसचे ठग आहेत तर भाजपचे महाठग आहेत! भ्रष्टाचारात कोणीच कोणाला कमी नाही! राजरोसपणे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, पैसे दिल्याखेरीज कोणतेच सरकारी काम होत नाही! नाहीतर सरकारी कामच होत नाही! मतदार 'बोंबलून' आपले प्रश्न मांडत आहेत मात्र मग्रूर सत्ताधारयांकडे त्यांचे प्रश्न सोडवायची कुवतच नाही! मतदार जागे व्हा आणि या दोन्ही पक्षांना त्यांची पायरी दाखवून द्या, घराचा रस्ता दाखवा!!!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/09/2019 - 16:09 नवीन
आणि कोणाला आणायचं? मायावती, ममता, मेहबुबा, ओमर, चंद्राबाबू, अखिलेश कि साहेब? का जिग्नेश आणि कन्हैया? सगळी खोगीरभरती आहे.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 16:12 नवीन
ते मतदार राजावर सोडा! सर्व काही व्यवस्थित होईल! काळजी नसावी!!!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/09/2019 - 16:20 नवीन
१५. या सरकारने राफेल डील संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. या बद्दल आपलीकडे काही पुरावा? का अशीच बेताल बडबड ? सरकार विरोधी पक्षासोबतच देशातील जनतेला सुद्धा फसवीत आहे. एवढी कमी विमाने का घेण्याचा करार झाला? १२६ विमाने काय गुदामात उभी करून ठेवली आहेत? शंभर पेक्षा जास्त विमान खरेदीचा करार का मोडीत काढला? करार कधी झाला होता? एच ए एल ही सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी असताना कंत्राट अनिल अंबानीला देण्यासाठी एवढा आटापिटा का केला? एवढी जास्त तातडीची गरज होती तरी सुद्धा आजपर्यंत एकसुद्धा विमान भारतात का पोहोचू शकलेले नाही? हे काय भाजी बाजारात जाऊन कांदे बटाटे आणण्याइतके सोपे आहे का? सरकार चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. सर्व प्रश्नांना सरकारने देशाच्या सर्वोच्च न्यायासनापुढे उत्तरे लिखित स्वरूपात दिलेली आहेत. होऊ द्या ना एकदा 'दूध का दूध और पानी का पानी' कर नाही त्याला डर कशाला? सरकारने स्वतः हुन जेसीपी तर्फे ताबडतोब संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापून चौकशी करून घेणे अत्यावश्यक आहे. याला काही आधार पुरावा की मी म्हंतो म्हणजे ब्रह्मवाक्य ? अन्यथा मतदार जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात असू द्या!. हे आपले आरोप होते ना? यातील एक तरी नीट पणे सिद्ध करता येतोय का ? सर्व आरोपांचा सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थित समाचार घेतला आहे. एकदा तो वाचून पहा आणि मग बोला.

फुकटची वायफळ बडबड

करत आहात.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 16:30 नवीन
फुकटची वायफळ बडबड कोण करीत आहे, हे निवडणुकीच्या निकालानंतर समजेलच! तोपर्यंत बिनधास्त रहा! हाच राफेल डीलची चौकशी न करण्याचा हट्टीपणा भाजपाला घेऊन डुबणार आहे!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 02/09/2019 - 16:57 नवीन
तुमचे प्रत्येक वाक्य वाचताना राफेल गांधी ची खुप आठवण येत आहे हो !खुप साम्य आहे तुम्हा दोघात .
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 17:15 नवीन
(संपादित)
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Mon, 02/11/2019 - 06:27 नवीन
आणि सत्तापालट नाही झाला तर हे थुंकलेले जाहीररीत्या गिळण्याची तयारी असू द्या म्हणजे झाले .
  • Log in or register to post comments
म
मामाजी Sat, 02/09/2019 - 18:47 नवीन
आपण कशाला या महान ज्योतिषाच्या नादाला लागता. यांचा पोपट जी चिठ्ठी उचलतो त्यात मोदिंच्या सपशेल पराभव होणार आहे असेच लिहीलेले असते. आजच बातमी वाचली की लोकसभा निवडणुकीतून २०१४ साली संन्यास घेतलेल्या बारामतीच्या काकांनी परत बाशिंगे बांधून खास लोक आग्रहास्तव परत निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच तर या ज्योतिष महाशयांना कंठ फूटला आहे. यांच्या भविष्यानुसार महाठगबंधन मोदिंचा पराभव निश्चित करणार आणि या महाठगबंधनाचा नेतृत्व करण्याची पात्रता आणि योग्यता अर्थातच फक्त बारामतीच्या काकांचीच आहे. म्हणून हा सर्व प्रपंच चालु आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 02/10/2019 - 05:53 नवीन
यांचा पोपट ज्या चिठ्ठ्या उचलतो त्या सगळ्यात मोदी हरणार असेच लिहिलेले आहे. त्यामुळे यांची बुद्धी त्याच्यापुढे कशी चालणार. एखादा बधिर सरकारी नोकर कसा कोणत्याही प्रश्नाला एकच उत्तर देतो.:- साहेबाना विचारायला लागेल तसं यांचं आहे.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Sun, 02/10/2019 - 06:36 नवीन
बटाट्याच्या चाळीतल्या प्रा. नागुतात्या आढ्यांची आठवण झाली.
नागुतात्यांंचा कोणत्याही गोष्टीला विरोधच असतो. म्हणजे चाळ गच्चीसह असावी यालाही विरोध, नसावी यालाही विरोध. सर्व चाळकऱ्यांनी चापशीच्या दुकानावर बहिष्कार टाकायचं ठरवलं तर यांनी सर्वांच्या देखत घडाभर कांदे आणि बाटलीभर तेल आणलं. ते पाहून चापशीच्या हस्तकांनी त्यांच्याशी सलगी चालवली तर त्यांच्यावरही डाफरले.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 07:28 नवीन
महेश हतोळकर, अजून एक अंध, मंद, नमोरुग्ण! अजूनही हे लोक 'बटाट्याच्या चाळीतच' अडकून पडलेले दिसत आहेत! सुधरले तर मोदीभक्त कसले?
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 07:20 नवीन
यांचा पोपट ज्या चिठ्ठ्या उचलतो त्या सगळ्यात मोदी हरणार असेच लिहिलेले आहे................. तुमचा मस्तच 'पोपट' झालेला दिसतो आहे! मोदी नाही रे बाबा! एनडीए हरणार आहे! मोदीला करोडों रुपये वाटून निवडून आणतील! बाद पक्षाच्या इज्जतीचा प्रश्न आहे! त्यामुळे यांची बुद्धी त्याच्यापुढे कशी चालणार..................... नमो अर्थात मनोरुगणांनी इतरांच्या बुद्धीबद्दल न बोललेलेच बरे, नाही काय? एखादा बधिर सरकारी नोकर कसा कोणत्याही प्रश्नाला एकच उत्तर देतो.:- साहेबाना विचारायला लागेल तसं यांचं आहे.................. मोदी प्रेमाने डोके चांगलेच 'बधिर' झाले आहे तुमचे! साहेबाना विचारतोय?
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 07:10 नवीन
मामाजी, अजून एक अंध, मंद, नमोरुग्ण! नुसती पोपटपंची करीत बसा, मोदीकडे डोके गहाण ठेवल्यावर, असेच घडणार!!! यांच्या भविष्यानुसार महाठगबंधन मोदिंचा पराभव निश्चित करणार आणि या महाठगबंधनाचा नेतृत्व करण्याची पात्रता आणि योग्यता अर्थातच फक्त बारामतीच्या काकांचीच आहे. म्हणून हा सर्व प्रपंच चालु आहे...................... अतार्किक, बिनबुडाची, विकृत विधाने!!!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 02/09/2019 - 17:19 नवीन
व्ही सी डी. तुम्ही गेल्या जन्मीचे तर्राट जोकर, मोगा खान आहात का.?? कि या जन्मी काळ्या मांजरी चे दूरचे नातेवाईक?? कितीही समजावले तरी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न... सारखे सारखे मतदार बघून घेतील या वाक्याचा जप चालू आहे. हे तुमचे मतदार नेमके आहेत तरी कोण?? आणि काय बघून घेतील?? तुमच्या सगळ्या प्रतिसादावरून तरी असेच वाटतेय कि NOTA हा एवढा एकच बटण दाबतील.. त्यामुळे तुमच्या कॅटेगरी तल्या मतदारांनी मतदान करून नक्की काय बदल होईल...?? आणि ते सर्व जर मतदार असतील तर आम्ही सर्व कोण आहोत?? आमची नावे काय पाकिस्तान च्या मतदार यादीत आहेत काय???
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 17:28 नवीन
(संपादित)
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 02/09/2019 - 17:35 नवीन
ओ बाप्पू !!!! ज्याला त्याला हा डोक फिरलय का ? अस विचारुन विचारुन याच च डोक फिरायच !!! मला वाटतंय हा बाबा आता येड़ा होइन आणि याच्या घरचे आपल्याला शिव्या देत बसतील !!! त्यामुळे जावूद्या आता . काहीही म्हणा विकेंड मस्त चालला आहे .
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 17:43 नवीन
ट्रम्पची सुद्धा परिस्थिती बाप्पू सारखीच झालेली दिसते आहे! झोपा आता, सकाळी लवकर उठायचे आहे, माहीत आहे ना?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 02/09/2019 - 18:34 नवीन
तुमचे ब्रह्मवाक्य "मतदार बघून घेतिल"
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 18:39 नवीन
आगाऊपणा पुरे झाला आता! रात्रीचे सव्वा अकरा व्हायला आले!!!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 02/09/2019 - 18:48 नवीन
पहिल्यांदा दुसरयाची कळ काढायची, पुरावे म्हणून निबंध लिहायचे आणि अंगाशी आले की मतदार बघून घेतिल अस गुळमुळीत विधान करून बाजूला व्हायचे. रच्याकने , सव्वा अकरानंतर पांचटपणाचे दुकान बंद होते क़ाय?
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 06:03 नवीन
पहिल्यांदा दुसरयाची कळ काढायची, पुरावे म्हणून निबंध लिहायचे आणि अंगाशी आले की मतदार बघून घेतिल अस गुळमुळीत विधान करून बाजूला व्हायचे................. भंकस माणसाची चांगलीच फटफजिती झालेली दिसत आहे, कसली कळ? कसला निबंध? अन कोणाच्या अंगाशी आले? खरेच तुमचा बाद मेंदू गहाण ठेवलेला आहे! होय, मतदारच भाजपाला धडा शिकविणार आहेत, हे सांगायला कोण्या जोतिषाची गरज नाही! विधाने मुळमुळीत वाटत आहेत हे तुमच्या अकलेला शोभेल असेच आहे! पुरावे मागायला काय न्यायाधीश लागून पडला काय? भंपकपणा नुसता!!!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 02/10/2019 - 06:21 नवीन
' वेड्या ला सगळे जग वेडे दिसते ' या म्हणीचा प्रत्यय तुमचे प्रतिसाद वाचताना दिसते . क़ाय ती शब्द रचना ! क़ाय ते प्रत्येकाला एकेरित संबोधने !! संस्कार , शिक्षण बद्दल शंका येते हो !!!
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 07:49 नवीन
' वेड्या ला सगळे जग वेडे दिसते ' या म्हणीचा प्रत्यय तुमचे प्रतिसाद वाचताना दिसते ............... वेडे हे फक्त नमोरुग्ण अर्थात मनोरुग्णच असतात! गहाण ठेवलेली डोकी अगोदर मोदी कडून परत आणा! हि म्हण मोदी भक्तांना एकदम चपलख लागू पडते आहे!!! क़ाय ती शब्द रचना ! क़ाय ते प्रत्येकाला एकेरित संबोधने !!............. एवढे शुद्ध, मस्त लिहिले आहे, हे सुद्धा दिसत नाही? कन्नड मध्ये लिहिले आहे काय? अवघड आहे या माणसाचे! सर्वांना एकेरीत संबोधतो हा मोदीभक्ताचा सर्वात मोठा अंधविश्वास आहे!!! संस्कार , शिक्षण बद्दल शंका येते हो !!!............. मला तर तुमचीच शंका येते आहे, तुमच्या भाषेवरून तुमचे संस्कार जगजाहीर झालेलेच आहेत, एका विज्ञान शाखेच्या पदवीधराच्या शिक्षणावर शंका घेताना जराही लाज कशी काय वाटली नाही?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 02/10/2019 - 13:10 नवीन
गोळ्या बंद करू नका , लवकर बरे होउ शकता .
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 14:09 नवीन
ट्रम्प, तुम्हाला गोळ्या चालू आहेत, लवकर बरे व्हा!!!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 02/11/2019 - 04:03 नवीन
ज्यानी छिंदम ला निवडून दिले! बाकी तुमच्या अकलेचे दिवाळे चांगलेच निघालेले दिसते. सिंगल लार्जस्ट पार्टी म्हणून अजूनही भाजपला पसंदी आहे , पण तुम्ही का मानणार हो? तुम्ही तर भविष्यवाणी केलिच आहे की महाठगबंधन जिंकणार! जिंकुदेत बापडे , कपिल शर्माची ट्यारपी लई घटलीय.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 18:24 नवीन
Conrad Sangma : ...तर एनडीए सोडू; मेघालय CMचा इशारा ईशान्य भारतात नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला होणारा विरोध आणखी वाढला आहे. नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यास आमचा पक्ष एनडीएतून बाहेर पडेल, असं संगमा म्हणाले.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 18:27 नवीन
Narendra Modi: आसाम: मोदींना काळे झेंडे दाखवले; नागरिकत्व विधेयकाचा निषेध
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 02/10/2019 - 08:52 नवीन
मा. श्री मोदीजींना काळे झेंडे दाखवणारे बांग्लादेशी घुसखोर होते हे लिहायला विसरले का काय ? काँग्रेसच्याच ६५ वर्षात आसाम मध्ये ४ लाखाच्यावर बांग्लादेशी घुसखोर घुसले होते. ह्या बांग्लादेशी घुसखोरांनी देशात आसाम, वेस्ट बंगाल, बिहार, सकट बर्याच राज्यात आपले हात पाय पसरलेले आहेत. ह्या काँग्रेसवाल्यांनी २०१ ४ च्या अगोदर काश्मिर मध्ये ३०,००० रोहींग्या मुसलमानांना स्थानाम्तर करण्यासाठी आणले होते. काश्मिरमध्ये अजुनही हिंदु समाज आहे व त्या समाजाचा बॅलेंस मोडुन काश्मिर हा पुर्ण पणे मुसलमान बहुल प्रदेश व्हावा ह्या दृष्टीने अर्बन नक्षल लोकांनी काँग्रेसच्या आशिर्वादाने ही कारवाई केल्याचे समोर आलेले आहे. त्या पुर्वी १९९० च्या दशकात काश्मिर मधले हिंदु पंडीत मुसलमानांच्या दहशतीला तोंड देत तिथुन विस्थापित झालेले होते. त्यावेळेला सुद्धा काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी अशी देशद्रोही भुमिका घेतलेली होती.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 02/10/2019 - 13:13 नवीन
त्यांना देशाशी काही घेणे देणे नाही , कुबड्या घेवून इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले आता देशद्रोही लोकांची तळी उचलायला मोकळे .
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 14:16 नवीन
(संपादित)
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 02/10/2019 - 08:36 नवीन
मेन स्ट्रिम मिडीयातले अर्बन नक्षल लोक कसे व किती देशद्रोही आहेत आहेत ते आता समोर आले !! दोन दिवसां अगोदर सकाळी "द हिंदु" ने न्युज ब्रेक केली की "PMO फ्रेंच सरकारशी व दसॉं कंपनीशी संरक्षण विभागाच्या समांतर बोलणी करत होते" ह्याला पुरावा म्हणुन एक Official मेमोचा क्रॉप केलेला फोटो दाखवला ! S L Sharma नावाच्या एका दुय्यम अधिकार्यांने संरक्षण मंत्रालयाला हा मेमो पाठवला होता. ह्या मेमोला संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रीकरांनी उत्तरही दिलेल होत जे ह्याच मेमोच्या खालच्या भागात दिलेल होत ! रफालवर सनसनी निर्माण करुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या नादात "द हिंदु" सारख्या न्युज पेपरने चालाखी करुन मेमोतला काही ( म्हणजे वरचा काही व खालचा काही भाग ज्यात महत्वाची उत्तर आहेत तो ) भाग वगळुन क्रॉप केलेला मेमोचा फोटो छापुन आणला. "द हिंदु" चे एडीटर एन राम ह्यांनी ह्या बातमीत मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. ह्या अर्बन नक्षल लोकांची नेटवर्क ईतकी मजबुत आहे की "द न्युज" ने बातमी छापली. ही न्युज ब्रेक होता होताच "द वायर", " प्रिंट " सारख्या अर्बन नक्षल मिडीयाने ही न्युज उचलुन धरली. अर्ध्या तासात राहुल गांधी प्रेस कॉन्फेरेसं करायला पोहोचले. परत एकदा पंत प्रधान मोदीजींना चौकीदार चोर है सुनावल !! ह्या न्युजच्या एका तासात "द हिंदु" "द वायर", " प्रिंट " व राहुल गांधी सारख्यांची तोंड फोडली गेली कारण ह्या पुर्ण मेमोचा फोटो ज्यात संरक्षण मंत्रीं पर्रीकरांच नोटींग सुद्धा होत त्या मेमोचा फोटो भारतीय न्युज ब्युरो ने प्रसिद्ध केल. "द हिंदु" ने चालाखी केली व त्या आधारावर सरकारची मानहानी केली , त्यातही दुसरा महत्वाचा मुद्दा आता स मोर आलेला आहे की ज्या S L Sharma नावाच्या एका दुय्यम अधिकार्यांने हा मेमो लिहीला होता तो रफाल खरेदी प्रक्रीयेचा भाग नव्हता . त्याचा कोणताही संबंध नसताना पुढे कामाला येईल या विचाराने सरकारच्या व देशद्रोहा पोटी असा मेमो त्याने लिहीला . आता त्याची सुद्धा कसुन चौकशी होईल !
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 02/10/2019 - 09:09 नवीन
लोकसत्तामधे आलय की, प्रियांका गांधींमुळे कॉग्रेसला फायदा होईल. पण महागठबंधनला तोटा झाल्यामुळे भाजपाच्या जागा वाढतील.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 02/10/2019 - 09:48 नवीन
हे मस्त आहे, महागठबंधन ने काँग्रेसला रस्ता दाखवलेला असल्याने दोघे वेगवेगळे लढणार आहेत. त्यात आता काँग्रेसला प्रियांका गांधी वाड्रा मुळे जास्त जागा मिळणार असतील तर त्यामुळे महागठबंधनला मिळणार्या जागा घटतील. पर्यायाने एनडीएचा फायदा होईल !!
  • Log in or register to post comments
C
Chandu Sun, 02/10/2019 - 10:39 नवीन
रात्री 12वाजता सुनावणी घेणे बाबत:- कायद्या प्रमाणे न्यायालय24तास x365 असते. देशातील सर्व कोर्टात सुटीच्या दिवशी सुध्हा एक किंवा दोन न्यायाधीश ऑन ड्यूटी असतात. कायद्याने ठरवू न दिलेली विशीष्ट आणी तात्काळ करावयाची कामे त्या वेळेस केली जातात. त्यामुळे रात्री सुनावणी घेणे यात वावगे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
C
Chandu Sun, 02/10/2019 - 10:53 नवीन
शेती तोट्यात जाते त्यासाठीसरकार ने 100टक्के सरसकट कर्ज माफी द्यावी,दुधाला 50रुपाये लिटर भाव मिळावा,या व अन्य मागण्या साठी अहमदनगर जिल्ह्यातील पुण ताम्बेयेथील4मूलीनी 6दिवस अन्नत्याग केला.. त्याना मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.तिथे त्यान्च्या वर उपचार केल्या वर त्यानीअन्न त्यागआन्दोल न मागे घेतले.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/10/2019 - 11:42 नवीन
माझा हि एक व्यवसाय काही दिवसापूर्वी तोट्यात गेला होता. मी हि अन्नत्याग करून सरकार कडून पूर्ण नुकसान वसुल करून घ्यावे म्हणतो...
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 02/10/2019 - 13:26 नवीन
खराब झालेल्या व्हीसीडी विकायचे का तुम्ही ? लै बेभरवशा चा धंदा व्हता तो = ) = )
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 14:24 नवीन
ट्रम्प, हे तुमचे पूर्णपणे कामातून गेल्याचे लक्षण आहे!!!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/10/2019 - 18:21 नवीन
हो ना.. खराब झालेल्या व्ही सी डी विकायचो.. बहुतेक त्यातलीच एक सध्या मिसळपाव वर बरीच टिवटिव करतेय.. असो.. बाकी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठी कोणी आंदोलन केल कि मग प्रामाणिक पणे इन्कम टॅक्स भरल्याचा पश्चाताप होतो. शेतकऱ्यांना मदत देणे, पायाभूत सुविधा आणि मार्केट उपलब्ध करून देणे इथंपर्यंत ठीक आहे पण कर्जमाफीची भीक देऊ नये. प्रामाणिक टॅक्स पेयर्स चा पैसा असा उधळू नये. शेतकऱ्याने सुद्धा, एकीकडे स्वतःला * बळीराजा * म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे कर्जमाफी ची भीक मागायची असले उद्योग करू नयेत..
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:38 नवीन
खरेच तुमच्या चावटपणा आणि वात्रटपणाची हद्द झाली ! नमोरुग्ण ते मनोरुग्ण ही तुमची वाटचाल झपाट्याने होत आहे! तुमच्या भावी वाटचालीला भरपूर शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/10/2019 - 19:04 नवीन
चावटपणा??? वात्रट पणा... ह ह पु वा... =) असो.. बाकी. शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 14:00 नवीन
आरएसएस पसरवतेय जातीय हिंसा 'समोर दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टींना दिलेली प्रतिक्रिया म्हणून सिव्हील सोसायटी उभ्या राहतात. समोरच्या समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, सिव्हील सोसायटी ही नकारात्मक स्वरूपाची सुद्धा असू शकते. सध्याचे सरकार चालवत असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही आजच्या घडीला देशातील सर्वांत मोठी पण नकारात्मक कार्य प्रसवणारी सिव्हील सोसायटी आहे. ही संघटना बेलाशकपणे मोठीच आहे. पण, ही संघटना काम काय करते तर, देशात जातीय हिंसा पसरवते...एकेकाळी चंबळच्या खोऱ्यात प्रभाव असणारे डाकू हे सुद्धा एका स्वरूपाची सिव्हील सोसायटीच होती, पण नकारात्मक अजेंडा पुढ्यात ठेवून काम करणारी...' अशी मांडणी समाजशास्त्रज्ञ प्रा. नंदिनी सुंदर यांनी केली. ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत 'प्रयास' संस्थेतर्फे 'गिरीश संत स्मृती कार्यक्रम २०१९'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत शनिवारी 'संवाद आणि जनधोरणांना आकार देण्यासाठी नागरी संघटनांची भूमिका' या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यात श्रीमती सुंदर बोलत होत्या. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे निवृत्त सचिव केशव देसीराजू आणि कायदे अभ्यासक उषा रामनाथन याही चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या. समाजातील नागरी संघटनांचे स्थान, जनधोरणांना आकार देण्यात त्यांची भूमिका अशा अनेक विषयांचा चर्चासत्रात उहापोह केला गेला. विनय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 14:01 नवीन
नंदिनी म्हणाल्या, 'सरकारच्या हाती अनिर्बंध ताकद कधीही नसावी. लोकांसाठी ते घातक असते. अगदी आणीबाणीच्यावेळीही सिव्हील सोसायटीची एक विरोधी बाजू नेहमीच उभी राहायला मुभा होती. आज मात्र तीही राहिलेली नाही. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपात एका सिव्हील सोसायटीनेच राज्यकर्त्यांची जागा घेतली आहे. त्यामुळे, विरोधी आवाज जवळपास नाहीसा होऊ पाहत आहे. ही परिस्थिती अधिक गंभीर म्हणायला हवी.' सिव्हील सोसायटीच्या नावातच 'बिगरसरकारी' असा अर्थ आहे. जे सरकारने करणे अपेक्षित आहे, पण सरकार करत मात्र नाही ते करणाऱ्या संघटना म्हणजे नागरी संघटना. इतरेतरांचे हक्क जपण्यासाठी एकत्र येणे आणि प्रसंगी सरकारला विरोध करूनही ते हक्क मिळविणे, हे त्यांचे काम आहे, असे देसीराजू यांनी सांगितले. 'विवेकातून सिव्हील सोसायटी' उषा रामनाथन म्हणाल्या, 'स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची काही वर्षे लोकांना सरकारवर, सरकारी धोरणांवर विश्वास होता. लोक विविध धोरणांना स्वतःहून पुढे येऊन पाठिंबा देत असत. भाक्रानांगल धरणाच्या वेळी तर लोकांनी आपल्या जमिनी सहज दिल्या होत्या. पण पुढे अनेक विकासकामांच्या नावाखाली जेव्हा सर्व सामान्यांना आपण प्रवाहाच्या बाहेर फेकले जात असल्याचे लक्षात येऊ लागले, तेव्हा ते सरकारी धोरणांना विरोध करू लागले. या विरोधाच्या माध्यमातून लोकांचा म्हणून एक सामूहिक असा विवेक जागृत होऊन त्यातून काही लोकचळवळी उभ्या होत गेल्या. सिव्हील सोसायटी अर्थात, नागरी संघटनांची ती त्या अर्थाने एक अनौपचारिक सुरुवातच होती.'
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 14:04 नवीन
Amol Palekar : सरकारवर टीका नको; अमोल पालेकरांचं भाषण रोखलं प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईतील एका कार्यक्रमात वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले. मुंबईत शनिवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्या कार्यक्रमात त्यांनी आपले भाषण सुरू केले. भाषणात सरकारच्या एका निर्णयावर त्यांनी टीका केली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईतील एका कार्यक्रमात वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले. मुंबईत शनिवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्या कार्यक्रमात त्यांनी आपले भाषण सुरू केले. भाषणात सरकारच्या एका निर्णयावर त्यांनी टीका केली. सरकारवर टीका करू नका, असे व्यासपीठावरील एका सदस्याकडून सांगण्यात आल्याने त्यांना आपले भाषण अर्ध्यावरच सोडावे लागले. मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'इनसाइड द एम्प्टी बॉक्स' या विषयवर पालेकर बोलत होते. भाषणात त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा एक निर्णय कसा चुकीचा होता, हे सांगण्यात सुरुवात केली. परंतु, व्यासपीठावर बसलेल्या एनजीएमएच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. केंद्र सरकारवर या कार्यक्रमात टीका करू नका, असे पालेकर यांना बजावले. भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक रोखल्याने पालेकर चांगलेच संतापले. पालेकरांना बऱ्याचदा रोखल्याने अखेर त्यांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले व खूर्चीवर जावून बसले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा