चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
🗣 चर्चा
(783)
ड
डँबिस००७
Wed, 02/06/2019 - 18:50
नवीन
लोक महात्मा गांधीजींच्या हत्येचा मातम ७० वर्षांनंतर अजुनही मनवतात !!
पण ,
फाळणीच्या वेळेला मारले गेलेल्या लाखो लोकांना, निर्वासित झालेल्या लाखो लोकांच्या दुःखाच काय !! त्या
निष्पाप निरपराध लोकांच्या मृृृत्युला जवाबदार असलेल्यांना जाब विचारणे सोडा, त्याच्या आत्म्याच्या शांतीची कामना सुद्धा कोण करताना दिसत नाही !!
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/06/2019 - 21:45
नवीन
त्या दुखीताना पक्ष श्राद्ध करा,
जिवन्त असलेल्याना मदत करा,
आणि जाब कुणाला विचारणार ? माउंटबेटन , जिना , नेहरू , गांधी सगळे केव्हाच वर गेलेत,
आणि इतके दुःख होते पाक , बांगला भूमी तुटली म्हणून , तर तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा सुरू करा.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 02/06/2019 - 21:59
नवीन
तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा सुरू करा.
हे तुम्हाला जास्त लागु होतय !!
तुमच्याच भाउ बंधुंनी वेगळा देश पाकिस्तान मागीतला होता ना ?
तुम्ही भारतात कश्याला उरलात ? एक तर मोगा मिया, वर हिंदुची ईतकी अँलर्जी !! पाकिस्तान तुमच्या स्वभावाला खुप मानवेल ! तिथे कोण्या काफिराची सावली सुद्धा पडणार नाही तुमच्यावर ! आणी बोनस म्हणजे गाढवाच्या मटणावर मेजवानी करता येईल !!
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/07/2019 - 02:11
नवीन
ज्यांनी स्वतंत्र देश मागितला , ते गेले ,
उरलेले इथलेच आहेत , इथेच आहेत .
गांधीबद्दल इतकी वर्षे खोटे नाटे लिहून झाले , आता पुतळा उभा करून गोळी घालणे , हा सण हिंदुत्ववादी मोदी सरकारात सुरू झाला,
मग पूर्वी इतिहासात नरकासुर , हिरण्यकश्यपू , रावण , बाबर वगैरे वाईट म्हणून चितारले आहेत , ते कितपत खरे मानायचे ?
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
गुरुवार, 02/07/2019 - 02:59
नवीन
पौराणिक कथा मध्ये इतिहास ?
खर म्हणजे ही सगळी संत मंडळी होती , त्यांनी त्यांच्या सात्विक विचारानी ब्लैककैट सारख्या जनतेला सन्मार्ग दाखविला !!!!
बाबर सोडला तर बाकीचे पौराणिक कथामधील होते , फक्त श्री बाबर यांनी श्री ब्लैककैट सारख्या भक्तांना पूण्य मार्ग दाखविन्या साठी काहीशे वर्षापूर्वी जन्म घेतला . त्यांनी त्यांच्या काळात भक्तांच्या सुवर्ण भविष्यासाठी हिंदू राजे व जनतेला मोक्ष प्राप्ति दिली .तसे पाहता बाबर च्या आधी व नंतर चे सगळे त्यांच्या कार्य महात्म्या मुळे संतपदी पोहोचले आहेत .
भारतातीय व परदेशी इतिहासकारानीं त्या सगळ्या संतानां जुलमी , आक्रमक , निर्दयी , धर्मांध असे संबोधुन त्यांच्यावर केलेला अन्याय वर्तमान काळातील त्यांचे भक्त श्री ब्लैककैट दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत .
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/07/2019 - 06:35
नवीन
बाबरजन्म झाला नव्हता , तेंव्हाही हिंदू राजे इतर राजे व प्रजा ह्यांना मोक्ष देतच होते ,
युद्धामध्ये सैनिकांना मोक्ष माझ्यामुळे मिळतो , तू फक्त निमित्त रे !
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/07/2019 - 06:49
नवीन
जगभरचे सगळे राजे हेच करत होते , irrespective of any factor like name , age , gender , religion etc,
काँग्रेसने व बाबासाहेबानी आम्हाला लोकशाहीचे वरदान दिले.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 02/07/2019 - 07:23
नवीन
मोगा खान
स्वातंत्र्याच्या अगोदर काँग्रेस हि सर्वसामान्य माणसांची चळवळ होती.
स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसचे काम संपले आहे तेंव्हा ती विसर्जित करावी असे खुद्द महात्मा गांधी यांनी सांगितले होते
तेंव्हा ती काँग्रेस आणि स्वातंत्र्याच्या नंतरची काँग्रेस यात काहीच साम्य नाही नाव सोडले तर.
आताची काँग्रेस म्हणजे नेहरू खानदानाची पिढीजात जहागीरी आहे.
तेंव्हा आताची काँग्रेस हि इंदिरा काँग्रेसची पिलावळ आहे आणि त्यांच्या नतद्रष्ट वारसांच्या पुढे लोटांगण घालणाऱ्या अक्कल विकलेल्या गुलामांची खोगीरभरती आहे.
केवळ नावासाठी स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काँग्रेसचा वारसा सांगायचा त्यांना कोणताही हक्क पोचत नाही.
जाता जाता --लोकशाहीसुद्धा केवळ डॉ आंबेडकरांनी दिलेली देणगी नसून त्यांच्या बरोबर असलेल्या असंख्य नेत्यांची आणि कायदेतज्ञांच्या प्रयत्नांचे फळ आहे.
घटना समिती (Constituent Assembly of India) हि मुळात श्री मानवेंद्रनाथ रॉय या साम्यवादी चळवळीच्या प्रणेत्याने सुचवलेली मूलभूत लोकशाहीची कल्पना आहे.(१९३४)
घटनेचा मूळ मसुदा श्री बी एन राव यांनी असंख्य वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून तयार केला
घटना समिती (Constituent Assembly of India)च्या एकंदर १३ उपसमित्या होत्या
त्यातील मसुदा तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा विस्तृत मुद्दा तयार केला गेला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख असले तरी इतर असंख्य कायदेतज्ञांचे योगदान तितकेच (किंवा जास्त महत्त्वाचे) होते.
आपल्या वाचनासाठी खाली दुवा देत आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Constituent_Assembly_of_India
तेंव्हा स्वातंत्र्य मिळवले आणि घटना तयार केली म्हणून कोणतेही श्रेय ढापण्याचे आजच्या इंदिरा (आणि पिलावळ) काँग्रेसला काहीही कारण नाही.
नुसती पचपच करण्यापेक्षा आपण अभ्यास वाढवा
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 02/07/2019 - 07:31
नवीन
जाता जाता -- शांतताप्रिय धर्मात लोकशाहीला कोणतेही स्थान नाही.
फक्त खलिफाच्या नेतृत्वाखाली शरियत प्रमाणे चालणारी सल्तनत असू शकते बाकी सगळे काफिर आहे.
इस्लामच्या शिकवणी प्रमाणे भारत हा दार अस स्सलाम (house/abode of Peace) नसून दार अल हरब "house of war" आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Divisions_of_the_world_in_Islam#Dar_al-Islam
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
गुरुवार, 02/07/2019 - 14:11
नवीन
अहो, त्यांचा सगळाच गोंधळ आहे.ते हिंदू ब्राह्मण म्हणून जन्मले. मग आयुष्यातील काही वैयक्तिक अडचणींचे खापर हिंदू धर्मावर फोडून मनोमन मुसलमान झाले. कायदेशीररित्या नाही, मनातल्या मनात. हरकत नाही. मग आता जिकडे तिकडे हिंदू धर्मावर घाण उडवत असतात. त्यांच्या चिखलातून काही सकारात्मक हाती लागले तर घ्यावे.हिंदू धर्मातल्या सुधारणांना त्यांच्या कडून काही हातभार लागत असला तर चांगलेच आहे की, त्यांच्या सध्याच्या धर्मात सुधारणा हा शब्दच नाही. ह्यांना मिपाचे झाकीर नाईक म्हणायला हरकत नाही.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 02/07/2019 - 07:09
नवीन
त्यांनी वेगळा देश मागीतला आणि ह्यांनी देशाचे तुकडे केले ! वेगळा देश मागीतला आणी ते गेले तरी ईथे ह्यांनी ईथल्या रस्त्यांना नाव दिली " औरंगजेब रोड", "बाबर रोड !!
पाकिस्तानच्या निर्मिती बरोबरच त्यांनी आपले रंग दाखवायला सुरु केले ! ब्रिटीशांना अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावणार्यांना पाकिस्तानला सरळ करता आल नाही !!
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
गुरुवार, 02/07/2019 - 05:02
नवीन
काहीही बोलता राव तुम्ही ! उघड उघड धर्म बदल करणे हि क्षुल्लक गोष्ट आणि तिची तुलना उठसूट कळफलक बडवण्या सारख्या प्रचंड अवघड ,धारिष्ट्याच्या आणि जोखमीच्या कामाशी कशी करू शकता तुम्ही ?
त्यासाठी लागणार दम अंगात आणि इतर ठिकाणी नाही असा आरोप तुम्ही अप्रत्यक्षरीत्या करत आहात. एवढ्या विद्वान माणसाला या अशा पातळीवर आणून ठेवलेत तुम्ही??
छे छे !! असहिष्णुता वाढली आहे हेच खरे.
जामोप्या राव, व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते.
मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ?
तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/07/2019 - 02:33
नवीन
मला काय वाटतं आहे ह्या कांग्रेसवाल्यांना देशात दुसरा कोणी गांधी बनून द्यायचा नाही आहे. गांधींविचार पुढे घेऊन जाणार्याला गोळ्या घातल्या जातील मग गांधीना कोण लक्ष्यात ठेवतय! त्यांचा इतिहासच पुसला जाईल.
===
बाकी छान प्रतिवाद करत आहात.
येऊ द्या आणखी. मोदींना 2019 ला निवडून आणायचे असेल तर असेच धडाडीने झटले पाहिजे. विजय सोपा होईल.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 02/07/2019 - 19:43
नवीन
गांधीना कोण लक्ष्यात ठेवतय! त्यांचा इतिहासच पुसला जाईल
गांधी म्हणजे भारत आणी भारत म्हणजे गांधी अस काही आहे का ??
बाकी इतिहास पुसला जाईल ह्या बद्दल म्हणाल तर भारताचा ईतिहास ईतका पुसलेला आहे की भारतीय लोकांना पक्षी वतने-हिंद च्या लोकांना ईतिहास असा शिकवला गेला की भारतात फक्त मोघल राजे ग्रेट होते !! भारतातील हिंदु राजे जसे की राजा दाहिर व राजा हेमु हे होउन गेले व त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवल हे भारताच्या ईतिहासातुन गायब केले गेलय ! भारतीय ईतिहासाशी खेळण्यात नेहरु सुद्धा सर्वांत पुढे होते ! राजे शिवाजी बद्दल त्यांचे वाईट उद्गार थोड्या लोकांना ज्ञात आहे! त्यांनीच अशोका सारख्या एका हिंदु धर्म त्याजुन बौद्ध धर्म स्विकारणार्या राजाला ईतिहास तोडुन मोडुन, ग्रेट करुन ठेवल !
भारताच्या त्यावेळच्या गरीब अशिक्षित लोकांनी ग्रेट नेत्यांवर विश्वास ठेउन सिंधु प्रदेशा शिवाय उरलेल्या भारताला कबुल केल !! आयुष्य भर वैष्णव जन तो गाणार्या नेत्याला त्यांनी भारताशी दगा केला आहे ह्याची जाणिव ठेवली नाही !
ह्याच नेत्यांनी भारताची पहिली ओळख पुसुन टाकली व त्या जागी गंगा नदीला ती जागा दिली !
जो प्रदेश पाकिस्तानला दिला तिथल्या लोकांनी मुस्लिम लीगला कधीही निवडुन आणलेल नव्हत ! त्यांना सर्वात मोठा त्याग करावा लागला !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 02/07/2019 - 05:47
नवीन
गांधीजी डॉ आंबेडकर याना देवत्व दिले गेले असल्यामुळे त्यांच्या विचारांची वास्तववादी चिकित्सा करणे कठीणच नव्हे तर अशक्य होऊन बसले आहे.
गांधीजींच्या विचाराना सर्व राजकारण्यांनी एवढेच नव्हे तर सामान्य माणसांनी सुद्धा कधीच तिलांजली दिली आहे त्यामुळे गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालणे हि एक भंपक गोष्ट आहे. त्याला इतकी प्रसिद्धी दिलीच नसती तर त्याचा एवढा गवगवा झाला नसता.
श्री मोदी, श्री शाह, श्री केजरीवाल (किंवा इतर राजकारणी) यांचे पुतळे किती ठिकाणी जाळले जात आहेत त्यावर कोणी पत्रकार गदारोळ करताना दिसत नाही.
पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी आणि आपलाच अजेंडा रेटण्यासाठी पत्रकारांचा आटापिटा किती होत आहे साठी आणि त्याला तथाकथित सुशिक्षित आणि पुरोगामी कसे बळी पडत आहेत याचा हा उत्तम पुरावा आहे.
दांभिकपणाचा कळस आहे.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 02/07/2019 - 06:26
नवीन
गांधी पटो वा ना पटो असे पुतळ्याला गोळ्या घालणे वगैरे नाही आवडलं. फारच बाळबोध वाटलं ते सगळं .
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 02/07/2019 - 07:31
नवीन
गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालणे हि एक भंपक गोष्ट आहे
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 02/07/2019 - 08:11
नवीन
गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालणे हि एक भंपक गोष्ट आहे ,..................... १००% सहमत !!
- Log in or register to post comments
म
मामाजी
गुरुवार, 02/07/2019 - 18:48
नवीन
मला तर हा माध्यमांचा खोडसळपणा वाटतो. हिंदुमहासभेच्या वेबसाइट वर या संबंधित कोणतीही बातमी नाही. जी माध्यमे सनसनीखेजच्या नावाखाली शेतकर्यांच्या आत्महत्येच लाईव्ह प्रक्षेपण घडवून आणू शकतात त्यांच्या साठी तर हा पोरखेळ आहे. ना आगा ना पीछा, चार सोंग जमवून यासारखी नौटंकी मोबाइल वर शूट करायची आणि ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसारित करून धूराळा उडवुन द्यायचा. मग त्यावर आधी मर्कट त्यात मद्य प्याला ही उक्ती सार्थ करत कृष्णमार्जारे धिंगाणा घालायला लागतात.
- Log in or register to post comments
म
मामाजी
गुरुवार, 02/07/2019 - 19:38
नवीन
गांधीजींंच्या पुतळ्याला असे वाचावे
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
गुरुवार, 02/07/2019 - 07:38
नवीन
नथूराम गोडसेचे समर्थक या भुतलावरुन जय दिवशी नष्ट होतील तो दिवस भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने सुदीन म्हणावा लागेल!
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
गुरुवार, 02/07/2019 - 07:39
नवीन
नथूराम गोडसेचे समर्थक या भुतलावरुन ज्या दिवशी नष्ट होतील तो दिवस भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने सुदीन म्हणावा लागेल!
- Log in or register to post comments
M
mayu4u
गुरुवार, 02/07/2019 - 08:34
नवीन
तो दिवस तुम्हाला बघायला मिळणार नाही.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
गुरुवार, 02/07/2019 - 11:04
नवीन
हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
गुरुवार, 02/07/2019 - 13:08
नवीन
आणि हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे .
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 04:39
नवीन
सर्वात मोठा गैरसमज कोणाचा होतो आहे हे सुज्ञास सांगणे न लगे!
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Fri, 02/08/2019 - 03:59
नवीन
गांधी पुतळ्याला गोळी घालणाऱ्याला कोण्या कलमाखाली खटला चालवणार हे जरा सांगाल क़ाय? तोंड फोडून घेणार त्यांना अटक करणारे !
चरखा चला चला के स्वराज लिया ही शिकवण ज्या दिवशी भारत देश विसरेल तो खरा सुदिन
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 04:36
नवीन
मूर्खपणाची वायफळ बडबड, नव्हे तर काय?
पूजा पांडेने केलेल्या कृत्याचे तुम्ही समर्थन करीत असाल तर तुमचे विचार तुम्हाला लखलाभ!
- Log in or register to post comments
M
mayu4u
Fri, 02/08/2019 - 06:36
नवीन
गांधीहत्येच्या समर्थनाला, नथुरामच्या समर्थनाला की गांधींच्या मूर्तीला गोळी मारली त्याला. मग पुढे चर्चा करू. प्रत्येक प्रतिसादात तुम्ही नवी कोलांटीउडी मारताय. पवार समर्थक का? :D
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 02/08/2019 - 11:44
नवीन
तुम्ही तीर बरोबर सोडला आहे !!!
100 % पवारसमर्थक = ) = )
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/08/2019 - 08:22
नवीन
15 दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे म्हणे,
म्हणजे काहीतरी कलम असणार
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 02/08/2019 - 05:11
नवीन
अगदी अगदी...!!
हे समर्थक जगभरातील सगळयाच चांगल्या वाईट गोष्टींचा,
परंपरांचा आणि विचारसरणींचा यथेच्छ उपभोग घेतील, पण मूळ अन् कुळ कधी सोडणार नाहीत. वरून तिच परंपरा पुढच्या पिढीला पास ऑन करतील. जी अजून फरलांग भर पुढे गेलेली असेल.
त्याच्यात अशा शाखाकर्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे.
- Log in or register to post comments
M
mayu4u
Fri, 02/08/2019 - 06:40
नवीन
परंपरा पुढच्या पिढीला पास ऑन करायचं म्हणाल, तर काँग्रेस मध्ये तेच सुरु आहे. ब्रिगेड ब्राह्मण द्वेष पिढ्यानपिढ्या पोसतेय. काही लोक नथुरामद्वेष पिढ्यानपिढ्या पोसतायत. नथुरामच्या न्यायालयातल्या प्रतिपादनाचं खण्डन मात्र करता येत नाही. मग बिनबुडाची, विनापुराव्याची विधानं करत सुटायचं. चालू द्या,
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/08/2019 - 08:30
नवीन
नथुरामाला फाशी दिली , म्हणजे त्याचा ( व त्याच्या गुरूंनी लिहून दिलेल्या) सगळ्या प्रतिवादांचे खंडन झाले,
नैतर कोर्टाने त्याला सोडून दिले असते,
- Log in or register to post comments
M
mayu4u
Fri, 02/08/2019 - 10:54
नवीन
नथुराम ला फाशी झाली ती खुनाची शिक्षा म्हणून. त्याविरोधात नथुराम ने पण काही म्हटलं नव्हतं.
आता त्याला फाशी झाली म्हणजे त्यानं केलेलं सत्यकथन चूक कसं? कुठल्या धर्मग्रन्थातलं तर्कशास्त्र म्हणे हे?
आणि अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या आणि "An eye for an eye makes the whole world blind" म्हणणाऱ्या महात्म्यांच्या खुन्याला देहांताची शिक्षा यातला विरोधाभास कळतोय का?
र च्या क ने, भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फेकले, ते त्यांचं प्रतिपादन न्यायालयात आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध व्हावं म्हणून. मदनलाल धिंग्रांनी त्यांना अटक झाल्यावर त्यांचं प्रतिपादन प्रसिद्ध करा ही मागणी केली होती. तसेच, इथं नथुरामचं प्रतिपादन प्रसिद्ध होणं महत्वाचं होतं.
बथ्थड डोक्यात काही प्रकाश पडला का? का आता पुन्हा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार?
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/08/2019 - 13:08
नवीन
कसले बतथड डोके ?
अपवादात्मक परिस्थितीत खून करणे , हे तर कायदाही मान्य करतो , उदा , स्त्रीने बलात्कार करायला आलेल्याचा खून करणे,
नथुरामाणे दिलेले ( किंवा त्याच्या गुरूने लिहून दिलेले ) जस्टीफिकेशन महात्मा नीच व खुनास योग्य व्यक्ती आहे , हे सांगण्यासाठीच होते ना ?
कोर्टाला ते पटले नाही , म्हणूनच फाशी झाली ना ?
मग आता त्याने कोर्टास काय सांगितले , ह्याचे रडगाणे कशाला ?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Fri, 02/08/2019 - 10:58
नवीन
ते रागा पण दुसर्याने लिहून दिलेले वाचतात , मग गोंधळ उडतो आणि टैमपास शो फुकटात बघायला मिळतो .
गोंधळ पण असा की कैलासमांनसरोवरला जाउंन नक्की क़ाय करायचे हेच ठाऊक नव्हते राजकुमाराना !
नथुरामाचा असा गोंधळ नक्कीच उडाला नव्हता
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 02/08/2019 - 09:31
नवीन
अहो मी कौतूक केले आहे. उलट मला हेवा वाटतो, या लोकांचा!
...
बाकी पुरावे द्याच्यचे ठरवले तर काही सन्माननीय मला लगेच कांग्रेसी, ब्रिगेडी असेले शिक्के मारायला सुरुवात करतील. त्यात मला रस ही नाही आणि वेळ देखील नाही. कारण सगळं करून शेवटी पालथ्या घड्यावर पाणीच पडणार. त्यामुळे थोडक्यात सारांशरुपात मला काय म्हणायचं ते सांगितलं आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 02/07/2019 - 12:44
नवीन
नितीन गडकरीच्या कामाची सोनिया गांधींकडुन प्रशंसा !!
https://timesofindia.indiatimes.com/india/sonia-gandhi-appreciates-nitin-gadkaris-performance/articleshow/67882217.cms
"नितीन गडकरी हे देशाच्या विकासात महत्वाचे काम करत आहेत व देशाच्या विकासात ते महत्वाचे आहे. तो विकास आता सत्यात उतरलेला आहे !!" असे उद्गार सोनिया गांधींनी प्रश्नोत्तराच्या वेळेला सदनाच्या पटलावर काढले !!
विरोधी पक्ष नेत्या सुद्धा मानायला लागलेल्या आहेत पण मिसळपाव वरच्या भक्तांना कोण सांगणार ?
- Log in or register to post comments
म
मोहन
गुरुवार, 02/07/2019 - 13:19
नवीन
२०१९ निवडणूकांत भाजप सगळ्यात मोठा पक्ष राहणार हे तर विरोधकही मान्य करत आहेत. जर आघाडीची वेळ आलीच तर मोदींना तरी हटवता आले पाहीजे. ह्या करता गडकरींना Prop-Up करणे चालू झाले असावे. हेच Narretive पुढ्ल्या काही दिवसात सगळी कडे दिसू लागल्यास आश्चर्य वाटायला नको.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 02/07/2019 - 14:35
नवीन
सध्याच्या पंत प्रधानांनीच नितीन गडकरी याम्ना फ्री हँड देऊन त्यांना हे महत्वाचे पोर्ट फोलियो दिलेला आहे. सध्या पंत प्रधानाच्या खालोखाल सध्या तरी तीन चारच मंत्री विषेश कामगीरी बजावताना दिसत आहेत. त्यात नितीन गडकरी, सुशमा स्वराज, पियुश गोयल, धर्मेंद्र प्रधान ईत्यादीचा सामावेश होतो. बाकी बरीच मंत्री पद ही वेगवेगळे मंत्री भुषवत असली तरीही लोकांच्या डोळ्यात भरेल अस काम होताना दिसत नाही. त्यामुळे वेळोवेळी खाते बदल ही होत होते.
रेल्वे , रस्ते विकास हा असा पोर्ट फोलियो आहे जिथे विकास समोर दिसु शकतो, मोजता येऊ शकतो. नितीनजीच्या पुर्वानुभवाच्या आधारे त्यांना हा महत्वाच काम देण्यात आलेल आहे आणी २०१९ च्या निवडणुकीत हक्काने व्होट माग ण्या करता याचा खुप उपयोग
होणार आहे.
मुळातच पंत प्रधान पद हे मॅनेजमेंट करणार्या कॅप्टनच पद आहे त्यांना सर्व खात्याच्या कामतली जुजबी माहीती असावी लागते पण त्यातल्या कोणत्याही खात्याचा एक्सपर्ट असण्याची गरज नसते. कारण त्या त्या खात्याला एक असा डेडीकेटेड मंत्री असतो जो त्या खात्याला सांभाळुन घेत असतो. सध्याचे पंत प्रधान, त्यांच्यावरचे आरोप, कामाच प्रेशर सहज स्वतःवर घेत असतात त्यामुळे ईतर मंत्र्ञांवर त्याचा लोड जात नाही. त्यामुळेच मंत्री आपले दिलेले काम यशस्वी पुर्ण करु शकतात.
त्यामुळे नितीनजीनी पंत प्रधानपद स्विकारल तर मात्र ज्या डेडीकेशनने ते आताच्या खात्याच्या कामातुन विकास घडवत आहेत ते करु शकणार नाही.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 04:54
नवीन
भक्त हे साधेसुधे भक्त नसून मतिमंद, अंधभक्त आहेत त्याचबरोबर नमोरुग्ण देखील आहेत.....
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Fri, 02/08/2019 - 09:44
नवीन
भक्त हे साधेसुधे भक्त नसून मतिमंद, अंधभक्त आहेत त्याचबरोबर नमोरुग्ण देखील आहेत.....
६५ वर्षे कॉंग्रेसची जुलमी राजवट सहन करुन वर अजुन त्यांचीच सत्ता असावी अशी आशा करणारे ह्या सर्व विषेशणा पलिकडचे असावेत !!
६५ वर्षे गरीब जनतेला नाडणार्यांना आता जनता माफ करणार नाही ! जे सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करेल ते सरकार जनता पुन्हा पुन्हा निवडणार !!
२ रु चा रेशन वर चा तांदुळ व गावठी दारुची बाटली ह्या वर आता गरीब जनता भुलणार नाही !
ह्या सरकारने ५५ महिन्यात जे करुन दाखवलय ते कॉंग्रेस, जनता दल व कम्युनिस्ट पक्षाला ५५ वर्षांत जमल नाही . खरतर त्यांची ईच्छाच नव्हती जनते साठी काही करायची ! जनतेच्या उपक्रमासाठी आलेले प्रत्येक रु व $ चा अपहार ह्या पक्षांनी आपली तुंबडी भरण्यासाठी केला ! आज सोनिया गांधी जगातील सर्वाधीक श्रीमंत महिलांच्या यादीत सर्वात वर आहे ! छगन भुजबळां सारखे थोड्याच काळात आपल साम्राज्य उभे करणारे मग्रुर नेते तर आपल्या डोळ्या समोर आहेत ! त्याच्या विपरीत दर रोज १८-१९ तास जनतेसाठी न थकता काम करणारे, दर दिवाळी देशाच्या सिमेवर सैनिकांबरोबर साजरी करणारे जनतेचे लाडके नेते श्री मोदीजी !!
अश्या ह्या आपल्या लाडक्या नेत्याला फॉलो करणार्या ९९% जनतेला तुम्ही अंध भक्त ठरवणारे तुम्ही कोण ??
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 12:24
नवीन
एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले?
१. गाईला आई म्हटले, बैल त्यांचा बाप झाला. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी सारख्या संवेदनाशील विषयांना चिथावणी दिली. धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले. अनेक लोक 'मॉब लिंचिंग' चे बळी ठरले. भारतावर असहिष्णुतेचा ठपका बसला. अनेक विचारवंतांनी मिळालेले पुरस्कार परत केले. काहींना पाकिस्तानात जाण्याचा अविवेकी सल्ले देण्यात आले. विरोध करणाऱ्या लोकांवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवण्यात आला, मूर्खपणाचा कळस झाला.
२. नोटाबंदीचा किंवा नोटा बदलीचा (५०० आणि १००० च्या नोटा) अर्थतज्ञ् व्यक्तींशी सल्ला न घेताच आततायीपणे निर्णय घेतला. निर्णय चुकीचा झाला तर चौकात फाशी द्या, असे सांगितले गेले. शब्दाला जागणे यांना मान्य नाही, हे सिद्ध झाले. १०० पेक्षा जास्त लोक बँकांच्या रांगेत राहून मरण पावले, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतली नाही, बँकांचे सुद्धा काही कर्मचारी दगावले गेले. काळा पैसा चलनात येणार अशी हमी दिली गेली मात्र प्रत्यक्षात 'डोंगर पोखरून उंदीर' सुद्धा मिळाला नाही. २००० ची नोट छापण्यामागचे कारण सांगण्यात अपयश आले. ५००० कोटी पेक्षा जास्त पैसा नव्या ५०० आणि २००० च्या नोटा छापण्यात व्यर्थ घालविले. देशवासियांना प्रचंड मानसिक त्रास झाला, ते वेगळेच. भारतीय अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली. अनेक लहान लहान उद्योग बंद पडले, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. चाय-पकोडे विका असे सल्ले देऊन बेरोजगार तरुणांच्या जखमेवरती मीठ चोळले गेले. देशवासीयांच्या मनातून कायमचे उतरले! चूक मान्य केली नाही, जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजतागायत चालू आहे.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 12:50
नवीन
३. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही उदा. परदेशातला काळा पैसा ९० दिवसात भारतात परत आणणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करणार, दाऊद इब्राहिमला लगेच भारतात परत आणणार, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आमलात आणणार, तरुणांना प्रत्येक वर्षी २ कॊटी नोकऱ्या देणार (पाच वर्षात १० कोटी नोकऱ्या), शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणार, प्रत्यक्षात तो 'चुनावी जुमला' होता म्हणून निर्लज्जपणे मुलाखती दिल्या.
४. राम मंदिर बांधू म्हणून निवडणुकीपूर्वी हिंदू मतदारांना शब्द दिला, आता म्हणत आहेत कि सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहणार, कायदा करून राम मंदिर बांधण्याचे सर्व प्रस्थाव फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जाईल असे घोषणापत्रात कुठेच लिहिलेले नव्हते. राम मंदिर बांधण्यासाठी एक पाऊल सुद्धा पुढे टाकले नाही. अनेक कंगोरे काढून जनतेला फसविण्याचा काम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 13:23
नवीन
५. विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक लोक चौकीदाराच्या नाकावर टिच्चून बँकांचे हजारों कोटी रुपये घेऊन भारतातून फरार झाले. हे हातावर हात ठेऊन नुसते बघत बसले. बँका 'लो बॅलन्स ' च्या नावाखाली जनतेकडून त्याची भरपाई करण्याचा वेडगळ प्रयत्न करीत आहेत. 'ना खाऊंगा , ना खाणे दूंगा' हि वल्गना साफ खोटी ठरली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले. जी डी पी, बेरोजगारीची खोटी आकडेवारी जनतेसमोर ठेऊन जनतेला मूर्ख बनविले.
६. जी एस टी ची अंमल बजावणी करण्यात नोटबंदी प्रमाणेच प्रचंड अपयश आले. व्यवस्थित पूर्वतयारी न करताच जी एस टी सुरु करण्यात आली. वेगवेगळ्या पदार्थांवरील कर प्रणाली वारंवार बदलण्यात आली, ते अजूनही चालूच आहे. व्यापारी तसेच ग्राहक या दोघांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. व्यापारी वर्गाला मोठं-मोठे मोर्चे काढायला भाग पाडले. अनेक व्यापाऱ्याना व्यापार बंद करावे लागले, बहुतांश लोक व्यापारी व्यवसायातून बाहेर पडले. हे सर्व अनर्थ या सरकार मुळे झाले.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 14:00
नवीन
७. देशात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम या सरकारने (भाजपच्या मंत्री आणि नेत्यांनी) केले. परधर्मीय लोकांची हेटाळणी केली गेली. रामाला कोणी दलित, कोणी आदिवासी, कोणी ब्राह्मण, कोणी मुस्लिम होता अशी निरर्थक शेरेबाजी केली. गणपतीला 'प्लास्टिक सर्जरी' चे उदाहरण असल्याची कोल्हे-कुई केली. व्यर्थ अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले. घरात गाईचे मांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम लोकांच्या हत्या घडवून आणल्या. स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात अक्षरशः हैदोस घातला. या सरकारने योग्य ती कारवाई न केल्याने ते चांगलेच मस्तवाल बनले.
८. बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते सापडले मात्र तात्काळ कारवाई न करता सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचे मूर्खपणाचे वर्तन केले. जनतेचा जास्त दबाव वाढल्यानंतरच कारवाईचे करण्याचा चुकीचा पायंडा पडला. कट्टर धार्मिक संघटना स्वतः च सत्तेस असल्यासारखे वागू लागले, आमचे सरकार आहे, आम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही, अशा गुर्मीने बोलू लागले. स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करून इतर लोकांना देशद्रोही असल्याची प्रमाणपत्रे जाहीरपणे वाटू लागले. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणू लागले, एवढी यांची पातळी घसरली कि उठसूट कोणालाही पाकिस्थानात जाऊन राहण्याचे सल्ले निर्लज्जपणे देऊ लागले.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 14:17
नवीन
९. 'स्मार्ट सिटी' च्या नावे दिंडोरा पिटण्यात आला, हजारों कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले, आजतागायत संपूर्ण भारतात एक सुद्धा शहर 'स्मार्ट सिटी' म्हणून उदयास आलेले नाही.
१०. 'स्वछ भारत' योजना चालू केली, हातात झाडू घेऊन छायाचित्रे काढून घेतली, प्रसार माध्यमात झळकले, नंतर हि योजना कुठे गायब झाली कोणालाच कळाले नाही. लोखों - कोटी (खोटे आकडे) संडास बांधल्याचे नाटक केले गेले, प्रत्यक्षात योजनेचे तीन-तेरा वाजले. गावेच्या गावे हागणदारी मुक्त केल्याचे जाहीर केले, मीडियाने त्या गावांना भेट दिल्यावर सरकारचे पितळ उघडे पडले. गंगा साफ करण्यासाठी केंद्रात स्वतंत्र खाते तयार करण्यात आले, कोटी-कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले मात्र गंगेची अवस्था 'जैसे थे' च राहिली.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 14:38
नवीन
११. 'स्टार्ट अप' इंडिया, 'मेक इन इंडिया', 'स्किल इंडिया' या योजनांची पुरती वाट लागलेली आहे, त्या फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत. एवढी गावांत वीज पोहोचली तेवढ्या गावांत वीज पोहोचली अशा आरोळ्या ऐकण्यात आल्या तथापि प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याचे सिद्ध झाले.
१२. लोकांना गॅस देण्याची योजना आणली ती सुद्धा फसली. गरिबी रेषेखालील (मासिक उत्पन्न १०२० रुपये) करोडो महिलांना गॅस दिल्याचे सांगण्यात आले, गॅस धारकांची संख्या फुगवून सांगितली गेली. तो नुसताच फार्स ठरला, सिलेंडर चे दर एवढे जास्त करून ठेवले की जवळपास ९०% लोकांनी दुसरा सिलेंडर विकत घेताच आला नाही. सिलेंडरचे दर ९२० रुपयांवर (मासिक उत्पन्न १०२० रुपये) पोहोचले होते. गॅस आल्यामुळे रॉकेल मिळणे सुद्धा बंद झाले आता ती कुटुंबे सरपणावर (लाकडे, पालापाचोळा) जेवण बनवीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
- Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी.
Fri, 02/08/2019 - 15:05
नवीन
१३. कच्चा तेलाचे जागतिक बाजारपेठेत दर एकदम कमी असताना सुद्धा प्रचंड नफा कमवून (भरमसाठ कर लादून) या सरकारने देशातील जनतेला अक्षरशः लुटले. पेट्रोलियम पदार्थ [पेट्रोलियम पदार्थ (पेट्रोल, डिझेल, गॅस इ.)] जी एस टी च्या अंतर्गत आणता आले असते मात्र या सरकारने तसे न करता करांमध्ये खूप वाढ करून जनतेला लुबाडले. पेट्रोल तर काही ठिकाणी शंभरी पार झाले होते. निवडणूक (कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड) जवळ आल्या कि दर वाढवायचे नाहीत अन निवडणुका संपल्या कि पुन्हा लुबाडणे चालू, हे सामान्य जनतेने अनुभवलेले आहे. या सरकारने यातून प्रचंड माया जमा केलेली आहे.
१४. स्वायत्त संस्था (सीबीआय, ईडी इ. ) या सरकारने आपल्या मुठीत ठेवल्या आहेत. त्यांची स्वायत्तता सरकारने धुळीस मिळविली आहे. त्या संस्थाचा वापर विरोधकांना वेगवेगळ्या चौकशांत अडकविण्यात करण्यात येत आहे. हा खूप मोठा दुरुपयोग आहे. जनता सर्व बघत आहे, ती जेवढ्या तत्परतेने डोक्यावर घेते त्याच्या कितीतरी पटीने जातात जमिनीवर आपटायला कमी करीत नसते.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »