Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख
Sat, 02/02/2019 - 02:15
🗣 783 प्रतिसाद
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 542105 views

🗣 चर्चा (783)
ब
बाप्पू Sun, 02/10/2019 - 19:23 नवीन
व्ही सी डी.. भाषण रोखणे गरजेचे होते.. पालेकर यांना कळायला हवे होते कि आपल्याला तिथे कश्याबद्दल बोलायला बोलावले आहे. पण विषय सोडून ते आपल्या मनातली मळमळ ओकायाचा प्रयत्न करत होते. उद्या तुमच्या इथे वास्तुशांती पूजेला बोलावलेले भटजी दशक्रिये चे मंत्र म्हणू लागले तर चालेल का तुम्हाला??
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 06:50 नवीन
एनजीएमए मेल्याबद्दल दशक्रियेचेच मंत्र म्हणत होते पालेकर; पण अभिव्यक्तिच्या खुन्यांना तिचं मढं नाचवायचं आहे म्हणून अडवलं. बाकी वास्तुशांती व मंत्र-बिंत्राचीच उपमा का सुचली बरे तुम्हाला? जो कलाकार मरून २४ वर्षे झाली त्याच्या कलाकृतींच्या प्रदर्शनात ती शोकसभा असल्याचा आव आणून बळंच औचित्याचा मुद्दा आणण्याची धडपड नक्की कोणत्या पिंडाला शिवायच्या घाईमुळे हो बाप्पू?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 02/10/2019 - 14:26 नवीन
भ्रष्ट काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान मध्ये दंगल सुरु झालेली आहे. गुर्जर समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर काँग्रेसने केलेल्या डोळे झाक मुळे दंगल सुरु होऊन जाळ पोळ व पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या फायर केलेल्या आहेत. https://timesofindia.indiatimes.com/city/jaipur/shots-fired-police-vehicles-torched-gujjar-agitation-in-rajasthan-turns-violent/articleshow/67928814.cms
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/10/2019 - 18:34 नवीन
व्ही सी डी.. तुम्ही काँग्रेस च्या देखील विरोधात आहात असे म्हणता.. या बातमी वर तुमची व्ही सी डी वाजवा कि जरा. का आता राजस्थान मध्ये देखील मोदी च गेले दंगल घडवायला..
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:44 नवीन
तुमच्या (पादे बाप्पू ) म्हणण्यात तथ्य असू शकते, शक्यता नाकारता येत नाही!!!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/10/2019 - 19:15 नवीन
तुम्ही खांग्रेस बद्दल मौनमोहन सिंग यांच्या सारखे मौन बाळगता आणि भाजप किंवा मोदी यांना जिथे तिथे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्त्न करता.. आणि तरीही म्हणता कि खान्ग्रेस आणि bjp मी दोघांचाही नाहीये.. चर्चा करताना असे नाही चालत हो.. .. आपले प्रतिसाद वाचून समजतेय कि आपली व्ही सी डी म्हणजे वरून स्टिकर कीर्तनकराचे पण आतले कंटेंट "तसले" आहे..
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 02/10/2019 - 18:37 नवीन
त्या मानाने महाराष्ट्रातील लोक खरच समजूतदार आहेत हरियाणा मधील जाट लोकांनी सुद्धा आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून राष्ट्रीय संपत्ति ची जाळपोळ करायला सुरवात केली होती , त्यांच्या नंतर आता गुर्जर पेटले आहेत . गुर्जर है समाज राजस्थान ,हरियाणा , ऊ प्र , म प अशा चार पाच राज्यात विभागला गेला आहे .
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 14:41 नवीन
भाजप नेते, कार्यकर्ते व अंध, मंद, नमोरुग्ण लोकांसाठी चांगली सोय!!! स्मृतीभ्रंशावर उपचार; २८ जिल्ह्यांत मेमरी क्लिनिक मुंबई: अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समुपदेशनासाठी राज्यातील २८ जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे २२०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, ३०० रुग्णांवर स्मृतीभ्रंशाचे उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 02/10/2019 - 16:57 नवीन
खरंच मोगा किंवा तर्राट जोकर यांनी पुनर्जन्म घेतल्यासारखं वाटतंय. मुद्देसूद प्रतिवाद करण्याची त्यांची इच्छा दिसत नाहीये. अथवा माझ्या या प्रतिसादाला त्यांनी प्रतिवाद केला असता. नुसतं मी तटस्थ आहे, काँग्रेस आणि भाजप दोन्हींचा पाठीराखा नाही म्हणायचं पण जर त्यांनी स्वतःचेच प्रतिसाद वाचले तर कदाचित त्यांना कळेल की आपल्या सगळ्या प्रतिसादांमध्ये काँग्रेस भाजपवर जे आरोप करते तेच लिहिले आहेत. इतरांना अंधभक्त म्हणताना ते स्वतः मंदभक्त झाले याची त्यांना जाणीवच झाली नाही अर्थात ते राहुलसारख्याला फॉलो करतात म्हणून हे साहजिकच आहे. त्यामुळे अश्या लोकांना इग्नोर मारणे श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 02/10/2019 - 17:57 नवीन
धन्यवाद !!! मी आज अत्तापासून सुरवात करतोय !! चिखलात दगड मारून चिखल अंगावर कशासाठी उडवून घ्यायचा ?
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:12 नवीन
अंध, गतिमंद, नमोरुग्ण, मोदीभक्त ट्रम्प, चिखलात दगड मारून माझ्या अंगावर उडवायला तुम्हाला कोणी सांगितले आहे???? सुमडीत रहा!!!
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:05 नवीन
अंध, गतिमंद, नमोरुग्ण, मोदीभक्त, खरेच ट्रेड मार्कचा मेंदू मोदीकडे गहाण ठेवलेला आहे, यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. ट्रेंड मार्क चे पूर्ण घराणे मोगा किंवा तर्राट जोकर यांनी पुनर्जन्म असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काँगेस संदर्भातील कोणत्याही प्रतिवादाला मी बांधील नाही. काँग्रेस चे आरोप आणि माझे आरोप यात साम्य जाणवले म्हणून मी नीच काँगेसची बाजू घेतो व नीच भाजप वर टीका करतो असा तुमचा खूप मोठा भ्रम झालेला आहे. काँगेस आणि भाजप दोन्ही खड्यात गेले तरी मला काहीही फरक पडणार नाही. मी तुमच्या सारख्या भुरटयांना अजिबात महत्व देत नाही, हे आवर्जून सांगावेसे वाटते! माझ्या प्रतिक्रियांना तुम्ही उत्तर नाही दिले तरी मुळीच हरकत नाही, हे जरा लक्षात असू द्या, नाहीतर पुन्हा तोंड वर करून बकबक कर नये, ही माफक अपेक्षा!!!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 02/10/2019 - 20:48 नवीन
नुसते बोल्ड मध्ये प्रतिसाद टाकले आणि वैयक्तिक टीका, अपशब्द वापरले म्हणजे आपण शहाणे होत नसतो. मोदी/ भाजप आणि काँग्रेस यांना शिव्या घालण्याच्या नादात तुम्ही इतर मिपाकरांना का शिव्या घालताय? इथल्या काही सदस्यांच्या समोर उभं राहायची पण तुमची लायकी नाहीये. खुले संस्थळ आहे म्हणून मनाला वाटेल ते बोलून आपले संस्कार दाखवू नयेत. तुम्ही मिपावर आलाच नाहीत तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 17:43 नवीन
★भक्त सध्या मोदीच्या काळात लडाख नॅशनल पॉवर पॉवर ग्रीड ला जोडले गेले ★70 वर्षांत कधी झाले नाही ते आता झाले म्हणून नेहमीप्रमाणे रेशीमरेघी मंदबुद्धी प्रचार करत आहेत. ★नॅशनल पॉवर ग्रीड कधी चालू झाले ह्याची त्यांना माहीतीच नाही. ★भारतात मुख्य 1)नॉर्थ, 2)नॉर्थ ईस्टर्न, 3) वेस्टर्न, 4) साऊथर्न ग्रीड ह्या विजेसाठी आहेत. ★1991 साली नॉर्थ, नॉर्थ ईस्टर्न जोडले गेले. ★वेस्टर्न ग्रीड 2003 साली वरच्या ग्रीड ला जोडले गेले व ह्या सर्वांचा मिळून सेंट्रल ग्रीड बनवले गेले. ★2003 साली दक्षिण ग्रीड ह्या सर्वांना जोडून नॅशनल ग्रीड बनवले गेले. ★गांजा पिऊन काहीही फेक पोस्ट, अप्रचारापासून सामान्य नागरिकांनी सावध राहावे हेच उत्तम. ★काँग्रेस ने 2019 साली सत्तेत आल्यावर अश्या फेक प्रचार करणार्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट बनवून, नवीन कायदा बनवून ह्यांना व ह्यांच्या मास्टर माईंड ना तुरुंगात सडवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 17:53 नवीन
गेली साठ वर्षे , sorry , 1925 पासून ह्यांना देश सेवेची संधी मिळाली नाही , म्हणून आता लहान गोष्टीनीही ह्यांना नाचावेसे वाटत आहे. पियुष गोयलने रेल्वेचा व्हिडीओ डबल स्पीडने टाकला आहे अन 70 वर्षात प्रथमच इतका स्पीड म्हणून नाचानाच सुरू आहे ! Image removed.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:19 नवीन
खोटारड्या, थापाड्या, जुमलेबाज केंद्र सरकारचा (मोदी सरकारचा) व विकृत मंत्र्याचा जाहीर धिक्कार! धिक्कार! धिक्कार! ! !
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/10/2019 - 18:31 नवीन
काळी मांजर आणि व्ही सी डी, इतका राग असेल तर त्या रेल्वेत बसू नका.. त्याच जुन्या इंग्रजांच्या काळातल्या रेल्वेत बसून प्रवास करा तुम्ही लोक... मला तरी स्वतःला रेलवे मंत्रालयाचे काम आवडले. नवीन आलेल्या रेल्वे अत्यंत सुंदर आणि अराम दायक आहेत. आणि हे दिसतेय कि आधीच्या रेल्वेमंत्रांनी रेल्वे बजेट म्हणजे नवीन मार्ग आणि रेल्वे रुल बांधण्याचे पोकळ आश्वासन जाहीर करण्याचा व्यासपीठ एवढाच उपयोग केला.. मोदी सरकार ने रेल्वे बजेट नावाचे बिनकामाचे काम बंद करून प्रत्यक्षात ग्राउंड लेवल वर निश्चितच चांगले काम केले.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:47 नवीन
पादे बाप्पू , ठीक आहे! रेल्वेने प्रवास बंद!!!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/10/2019 - 19:18 नवीन
धन्यवाद.. कोना एका गरजूला रेलवेतील सीट दिल्याबद्दल...
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 19:37 नवीन
रेल्वेत सुधारणा करणे अन खोटी जाहिरात करणे , यात फरक आहे,
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 02/10/2019 - 19:41 नवीन
काय फरक आहे?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 05:47 नवीन
गेली साठ वर्षे , sorry , 1925 पासून ह्यांना देश सेवेची संधी मिळाली नाही , म्हणून आता लहान गोष्टीनीही ह्यांना नाचावेसे वाटत आहे. तुमच्या भ्रष्ट काँग्रेस १९२५ पासुन देश सेवा करत होती की काय ? संध्याकाळी उडालेल तुमच विमान अजुन उतरलेल दिसत नाही. ईंग्रजांनी ९० वर्षांत ९०,००० किमीची रेल्वे बांधली , भ्रष्ट काँग्रेसने ५५ वर्षांत स्वतः च्या देशात पुर्ण बहुमताच्या सरकार असताना केवळ ९,००० किमी रेल्वे बांधली आणी आता हे तोंड वर करुन रेल्वेच्या विकासा बद्दल बोलणार !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/14/2019 - 13:51 नवीन
आमची काँग्रेस 1884 पासून आहे.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sun, 02/10/2019 - 18:31 नवीन
तुमचा आवेश बघून आपण पंखा झालो राव तुमचा! येत्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या मार्गदर्शनाखाली मतदान करायचे ठरवले आहे. तरी कोणाला मत द्यावे याविषयी मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
व
व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:52 नवीन
फिरकी घ्यायला आम्हीच भेटलो काय तुम्हाला? मतदान कोणालाही करा राव! ते सुद्धा पूर्ण विचाराअंती!!!
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sun, 02/10/2019 - 19:22 नवीन
गंभीरपणे विचारतोय. भाजप पण नको आणि काँग्रेस पण नको तर निवडायचं कुणाला?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 02/10/2019 - 19:41 नवीन
एम आय एम ला इति श्री मोगा खान
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 05:51 नवीन
एम आय एम ला वाले सुद्धा परवडले, हे तर मोदीजींना हटवण्यासाठी सरळ पाकिस्तानचेच पाय धरणार्यातले आहेत.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 02/10/2019 - 20:48 नवीन
डी व्ही सी या आयडी ला जरा समज द्यावी अशी विनंती आहे. इतर सदस्यांचा अपमान आणि वैयक्तिक टीका करण्याचा अधिकार यांना कोणी दिला आहे? जर संयत चर्चा करता येणार नसेल तर या आयडींना बॅन का केले जात नाही?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 02/10/2019 - 21:06 नवीन
राफेल प्रकरण आता बघितले तर "कुछ तो गडबड है द या!" असे म्हणावेसे वाटते. राफेल प्रकरण सरळ साधे असेल असे आम्हाला वाटले होते. हिंदूने पर्रीकरांचा प्रतिसाद लपवला पण काही प्रश्न उरतात. १) "पंतप्रधानांचे कार्यालय राफेल बोलणीत हस्तक्षेप करत आहे. " असा सरळ शेरा संरक्षण सचिवाने मारला आहे. २) दोन महिन्यांनी पर्रिकरांनी शेरा लिहिला आहे. "It appears that PMO and French President are monitoring the progress of the issue" म्हणजे पर्रेकरांनादेखील पंतप्रधान कार्यालय नक्की काय करत आहे हे माहित नाही. एन.राम. ह्यांच्या भात्यात अजून बाण आहेत असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते. https://www.youtube.com/watch?v=lE9Bhu141mo&t=323s बोफोर्स प्रकरण एन.राम व निरूपमा सुब्रमण्यम ह्यांनी अशाच प्रकारे बाहेर काढल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 02/11/2019 - 00:07 नवीन
१) "पंतप्रधानांचे कार्यालय राफेल बोलणीत हस्तक्षेप करत आहे. " असा सरळ शेरा संरक्षण सचिवाने मारला आहे. या सचिवांचा राफेलच्या कुठल्याच चर्चेत काहीच संबंध नव्हता असे "Pricing Negotiation Committee" चे प्रमुख असणाऱ्या (नि) एअर मार्शल एसबीपी सिन्हा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मग अश्या संबंध नसलेल्या व्यक्तीने या चौकश्या का कराव्या आणि असे पत्र का पाठवावे? २) दोन महिन्यांनी पर्रिकरांनी शेरा लिहिला आहे. "It appears that PMO and French President are monitoring the progress of the issue" म्हणजे पर्रेकरांनादेखील पंतप्रधान कार्यालय नक्की काय करत आहे हे माहित नाही. अश्या संबंध नसलेल्या व्यक्तीने पाठवलेल्या पत्रावर पर्रीकरांनी काहीतरी शेरा मारला म्हणून हा सौदा का संशयास्पद आहे? पत्र पाठवायचा अधिकार आहे म्हणून त्याने पत्र पाठवले पण पर्रीकरांनी थातुरमातुर उत्तर देऊन त्याला वाटेल लावले असे असू शकेल ना? का म्हणून संबंध नसलेल्या त्या व्यक्तीला आतल्या गोटातली खरी बातमी सांगावी? मुळात G२G सौदा असल्याने संशयच घ्यायचा झाला तर दोन्ही सरकारांवर घ्यावा लागेल ना? का मोदींनी फ्रांस सरकारला अंधारात ठेऊन घोटाळा केला? यात कोणी मध्यस्थ आहे असे समोर आले आहे का? मध्यस्थ असेल तर त्याचे नाव काय आहे? संपूर्ण सौदाच ५९००० कोटींचा असल्याने ३०००० कोटी रुपये रिलायन्सला द्यायचा प्रश्नच येत नाही. ऑफसेट म्हणून भारतीय कंपन्यांना काम द्यायची अट काँग्रेसच्याच काळात टाकली गेली आहे. त्यानुसार ५०% ऑफसेट म्हणून भारतीय कंपन्यांनाच काम द्यावे असे करारात ठरले असेल तर त्यात चुकीचे काय आहे? २९००० कोटींचे काम ऑफसेट म्हणून जवळपास ७५ कंपन्यांमध्ये विभागून देण्यात आले आहे, त्यातीलच एक रिलायन्स आहे. जवळपास ८५० कोटींचा प्रकल्प Dassault Reliance Aerospace या नावाने टाकला आहे आणि त्यात Falcon विमानाचे कॉकपिट बनवण्याचे कामही सुरु झाले आहे. तसेच राफेल विमाने पूर्ण तयार होऊनच येणार आहेत त्यामुळे रिलायन्सचा या विमानांमध्ये काहीच सहभाग नसणार. पुढचा प्रश्न फक्त ३६ विमानच का घेतली? तर तातडीची गरज म्हणून आत्ता ३६ विमाने (२ Squadrans) घेण्यात आली. याचा अर्थ पुढे काहीच व्यवहार होणार नाही असा आहे का? २०१४ आधीचा व्यवहार Technology Transfer च्या अटी मान्य होत नव्हत्या म्हणून थांबला होता. पण त्यासाठी संपूर्ण व्यवहार थांबवणे कितपत शहाणपणाचे होते? ३६ विमाने घेतलीच आहेत आता पुढील चर्चा होतच राहील. शेवटचा प्रश्न म्हणजे HAL चे हाल का करतात? युपीए च्या काळात २६ विमाने फ्रान्समध्येच तयार होऊन येणार होती (अशी चर्चा चालू होती). आता २६ च्या ऐवजी ३६ येणार आहेत. मुळात प्रश्न हा आहे की HAL कडे एवढे हाय टेक विमान तयार करण्याइतके स्किल आहे का? तेजसची काय परिस्थिती आहे आपण बघतोय. सुखोई आणि मिग यांचा मेंटेनन्स HAL करते त्यांची काय अवस्था आहे हे पण आपल्याला माहित आहे. उगाच त्यांना जमणार नाही असे काम कशाला त्यांच्या डोक्यावर थापायचे? असे प्रयोग करण्याइतका वेळ आणि पैसे आपल्याकडे आहे का? आणि जरी वेळ आणि पैसे असेल तरी सैनिकांचा अमूल्य जीव का म्हणून धोक्यात घालायचा?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 02/11/2019 - 05:17 नवीन
"मग अश्या संबंध नसलेल्या व्यक्तीने या चौकश्या का कराव्या आणि असे पत्र का पाठवावे?" ह्याचे उत्तर संरक्षण खात्याने वा तत्कालिन संऱक्षण मंत्र्यानी द्यायला नको का? "तुम्ही वाटाघाटी समीतीत नाही.. तुमचा काय संबंध?" असे पर्रीकरांनी विचारायला नको का त्या अधिकार्याला? पण पर्रीकर त्यासाठी दोन महिने लावतात व शेरा मारतात की ""It appears that PMO.." म्हणजे पर्रीकरांना देखील नक्की काय चालले आहे माहित नाही. येथे भ्रष्टाचार झाला आहे असे म्हणत नाही पण पंतप्रधान कार्यालय चर्चेत सामील होते.. जर हे सरळ आहे तर मग तसे सांगायला काय हरकत आहे? "We may advise PMO that any Officers who are not part of Indian Negotiating Team may refrain from having parallel parlays (parleys) with the officers of French Government" महत्वाच्या फायलीवर असे लिहिणारा अधिकारी कोणी सोम्यागोम्या नाही तर संरक्ष्ण खात्यात डेप्युटी सेक्रेटरी आहे. ह्या शेर्यावर पर्रीकर तब्बल दोन महिन्यांनी शेरा मारतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 02/11/2019 - 06:40 नवीन
माईसाहेबांचं रफालचा "बेंड" परत फुटलं वाटतं. अरेरे
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 02/11/2019 - 01:08 नवीन
फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री एके अँटनी म्हणले की कुठलेही मोठे करार, उदा. राफेल वगैरे, करण्यासाठी पैसेच नाहीयेत. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ् पंतप्रधान असताना भारताची एवढी वाईट अवस्था झाली होती. पण मे २०१४ मधे एक चहावाला पंतप्रधान झाला आणि २०१५ मध्ये लगेच ५९००० कोटींचा करार कसा काय झाला? नुसता करारच नव्हे तर २५% पैसे सुद्धा अदा झाले आहेत. हे पैसे कुठून आले असावेत? मोदींनी राफेलशिवाय अजून कितीतरी संरक्षणविषयक करार केले आहेत. रशिया बरोबर झालेला S ४०० चा करार $५.५ बिलियनचा आहे. अमेरिकेबरोबर $३ बिलियनचा २२ अपाचे आणि १५ चिनूक हेलिकॉप्टर्सचा करार झाला. यातला चिनूक हेलिकॉप्टर्सचा पहिला लॉट भारतात आला सुद्धा. इस्रायल कडून $७७७ मिलियनचे क्षेपणास्त्र घेतले. आता प्रश्न हा आहे की मोदींनी एवढे पैसे कुठून आणले? जरी अगदी सगळे पैसे अदा झाले नसतील तरी थोडे तरी पैसे दिले गेले असतील आणि पुढे द्यायचा प्लॅन तर असेल? गेलाबाजार निकड ओळखून करार तरी केलेत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की फक्त राफेल बद्दलच का आरडाओरडा होतोय? आता कुठलीतरी पत्र शोधून काढून किंवा केवळ कोणालातरी काहीतरी गडबड वाटतीये म्हणून आपण संशय घेत बसायचं का ते आपण आपले ठरवावे. मोदींना परत नसेल निवडून द्यायचं तर नका देऊ. मोदींना वैयक्तिरित्या फार काही फरक पडेल असं वाटत नाही. हे सगळे करार कदाचित परत थांबवले जातील किंवा मध्यस्थ मध्ये घेता यावा म्हणून बदलले जातील. पण त्याचा परिणाम फक्त पैसे जास्त मोजण्यात होणार नसून आपल्या देशाची शस्त्रसज्जता आणि पर्यायाने संरक्षण धोक्यात येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नुसते प्रत्यक्ष आक्रमण हा एक धोका झाला पण अवैधरित्या दाखल झालेले बांगलादेशी आणि इतर नागरिक, चीनचा पूर्वोत्तर राज्यांमधील वाढता हस्तक्षेप ह्या सर्वच काळजीच्या गोष्टी आहेत. त्यासाठी पण मोदी बांगलादेश बॉर्डर आणि पाकिस्तान बॉर्डर सील करत आहेत.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 02/11/2019 - 04:33 नवीन
फक्त राफेलबद्दल बोंबाबोम्ब का होते? लढाउ विमान विकण्याच्या झटापटीत अनेक देश होते आणि गंमत अशी आहे की ज्याचे विमान खरीदीचे करार नाकारले त्यांच्याबरोबर दूसरे करार केले गेले. यात रशिया व अमेरिका हे देश येतात. पण फक्त आणि फक्त राफेलवर आरोप झाले. का बाकीच्या करारात सरकारने कमीशन घेतले नाही? का पप्पूशेटना पुरावे मिळाले नाही? का महाठगबंधन केजीबी, मोसाद, एफबीआई ला घाबरले? घाबरल्याची शक्यता जास्त ( कारण आपल्याकडील एक महाविद्वान आयडी व्हिसिडी (योग्य नामकरण, घासलेली व्हिसिडी है जास्त योग्य ठरेल) देखील फक्त राफेल राफेल करत असतात, कारण फ्रांन्सचे इंटेलिजन्स ब्यूरो कार्यक्षम आहे असे कधी ऐकले नव्हते.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 02/11/2019 - 05:22 नवीन
"पण फक्त आणि फक्त राफेलवर आरोप झाले. का बाकीच्या करारात सरकारने कमीशन घेतले नाही?" म्हणजे राफेलमध्ये कमीशन घेतले आहे? असे बोलून भाजपावाले बॅक्फूटवर गेले तर काँग्रेसचे आणखी फावेल असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 02/11/2019 - 05:56 नवीन
उलट दूसरी आघाडी उघड़ली आहे, आता या चर्चेला , गुगलबाबा सगळीकडे नजर ठेऊन असतो , तुमच्या सोशल मीडिया कंटेंट मधे अमेरिका वा इज्राइल विरोधी मजकूर आला की तुमची कोटचड्डि काढून चौकशी होते विमानतळावर! पाहिजे तर शाहरुखबाबाना विचारा . अमेरिकेतला पैसा पाहिजे आणि आपली चमडी पण वाचवली पाहिजे . बघा आपले शाहरुख वा आमिर कुठेही पैलेस्टाइन लोकांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलत नाही. तसेच आपले व्हिसिडी आणि रागापण! ये पैसा बोलता है।
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/11/2019 - 10:22 नवीन
तुम्ही गोराक्षस ते होनोलुलु आदिवासी हत्या , सर्व अत्याचारांचा निषेध नोंदवता का ?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 02/11/2019 - 11:53 नवीन
पण तुमची कोंग्रेस मात्र काश्मीरी पंडित या देशाचेच नव्हेत असा बाणा दाखवते, वार वर्मी लागला आहे .
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 02/11/2019 - 14:47 नवीन
इशरत जहां , अफजल , मेनन , आणि रोहिंगे साठी राडणाऱ्या खान्ग्रेस ने काश्मीरी पंडिता च्या दयनीय परिस्थितीत बघ्याची भूमिका घेवूण त्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते व आज पर्यन्त खान्ग्रेस ला खंत ना खेद . एवढा निर्लज्जपणा खान्ग्रेस मध्ये ठासुन भरलेला आहे . मतदार सुद्धा दारू , मटन , 15 लाख या असल्या विषया ला भूलून निकाल फिरवतील अस वाटतंय , कारण तो वर्ग आपल्या भारतात मोठ्या प्रमाणावर आहे .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 02/11/2019 - 18:52 नवीन
बाजपेयीं मोदींनी काय केले ? अन 2014 ला मते दिली तीही 15 लाख अन दारुसाठीच का ?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 02/11/2019 - 17:18 नवीन
राफेल.. शब्द सोपा आहे.. आणि भारतातील लोकांना उल्लू बनवण्यासाठी विमान खरेदी घोटाळा झालाय अशी राळ उडवून त्याचा धिंडोरा पिटणे तुलनात्मक दृष्ट्या सोपे आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 07:18 नवीन
संरक्षण सामग्री खरेदी करणार्या भारताची परिस्थीती वेगळीच आहे, १. भारताची संरक्षण सामुग्रीची गरज खुप मोठी आहे. एकाच वेळेला दोन शत्रुंशी लढायची तयारी ठेवावी लागते. भारताला मो ठा सागर किनारा असल्याने त्याचे संरक्षण सुद्धा करावे लागते व त्यासाठी मोठी नौसेना सांभाळावी लागते. २. शत्रु किती बलवान आहे, त्याच्या कडे कोणत्या प्रकारचे वेपन्स आहेत त्यावरुन आपली सज्जता ठरवावी लागते. ३. भारत हा संरक्षण सामुग्रीचा मोठा ग्राहक आहे व खरेदी करण्या करता त्याच्याजवळ पैसा सुद्धा आहे. ४. भारताला आपली वेपन्स प्रणाली विकावी असा प्रयत्न सर्वच करत असतात. त्यासाठी श्याम , दाम , दंड , भेद ह्या सर्वांचा प्रयोग विक्रेते करत असतात. ५. भारतात प्रणाली विकत घेण्या अगोदर स्वतः त्या प्रणालीची चाचणी करण्याची कॅपॅबिलीटी सुद्धा आहे. ६. भारतात डेमोक्रेसी आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 07:26 नवीन
केजरीवाल २०१३ साली म्हणत होता की रॉबर्ट वाड्राच्या विरुद्ध सर्व पुरावे त्यांच्या हातात आहेत. पण रॉबर्ट वाड्राच्या विरुद्ध सोनिया गांधीच्या विरुद्ध कारवाई तर सोडाच चौकशी सुद्धा कोणी ही करणार नाही कारण हे सर्व लोक खुप पॉवरफुल आहेत. आज रफालवर "द हिंदु" सारख्या कम्युनिस्ट धार्जीण्या वर्तमानपत्रात लेख आला की केजरीवाल ला मो दीजींच्या पीएमओ मध्ये सीबीआय ने रेड टाकली पाहीजे अस वाटत पण रॉबर्ट वाड्रा ज्याच्या वर गेले महीना भर चौकशी चालु आहे त्याविरुद्ध एक शब्द बोलायला वेळ नाही ! https://youtu.be/BqUHrtzXTw4 kejriwal
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 02/11/2019 - 08:04 नवीन
https://d3fy651gv2fhd3.cloudfront.net/charts/india-inflation-cpi@2x.png?s=incpiiny&v=201901141231a1&d1=19190101&d2=20191231
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 02/11/2019 - 08:12 नवीन
https://d3fy651gv2fhd3.cloudfront.net/charts/india-inflation-cpi@2x.png?s=incpiiny&v=201901141231a1&d1=19190101&d2=20191231 २०१२ पासूनचा महागाी दाखवणारा आलेख आहे. भारतातील निम्मी जनता या नुसार मतदार करण्याची शक्यता आहे. या जनतेला राफेल वगैरे फारच गौण विषय आहेत. अन्यथा लालू प्रसाद यांचा चारा घोटाळा कोर्टात सिध्द झाल्यावर त्यांची राजकीय कारकीर्द संपली असती. असो.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 02/11/2019 - 09:14 नवीन
बरोबर बोललास रे शाम. महागाईचा दर आटोक्यात आहे त्याबद्दल आर.बी.आय. व सरकारचे अभिनंदन. पण महागाईचा दर व नोकर्या ह्या व्यस्तप्रमाणात असतात असे म्हंटले जाते. "You can't kill two birds with one stone. You need two stones in Central Bank to kill two birds" त्यामुळे नोकर्या कमी होणे अपेक्षित होतेच. सध्या जे नोकर्यांवरून जो गदारोळ चालू आहे त्याचे हे मूळ कारण आहे. पण त्याला ईलाज नाही. काही गोष्टी सरकारच्या/आर.बी.आय.च्या आवाक्याबाहेर असतात. उ.दा. घटणारी निर्यात व चीनी मालाचा स्वस्त पुरवठा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 02/11/2019 - 10:08 नवीन
बेरोजगारीचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे लोकसंख्यावाढ. त्यात परत भारताच्या लोकसंख्येचे वय कमीकमी होत चाललय. आत्ताच ते ३० पेक्षा कमी झालय व २०५० पर्यंत हे वय १९-२० असण्याची शक्यता आहे. लोकसंख्येत तरूणांची संख्या जेवढी जास्त त्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न उग्र बनत जातो. पण यावर जास्त चर्चा होतच नाही. रस्ते, धरणे, कालवे, शेततळी, गरीबांसाठीची गृहबांधणी, नवीन रेल्वेलाईन्स वगैरेतून सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. पण अशा घोषणा करून मते मिळणे कस शक्य आहे? मग कर्जमाफी वगैरे मुद्देच महत्वाचे ठरतात किंवा राफेलसारखे मुद्दे ऐरणीवर घेतले जातात. पण असा मुद्दा घेण्यासाठी स्वच्छ चारीत्र्याच्या नेत्याची जरूरी असते हे विसरून कसे चालेल? इंदिरा गांधींविरोधात जयप्रकाश नारायण, बोफोर्समधे व्हीपी सिंग, लोकपाल आंदोलनात अण्णा हजारे वगैरे. जर नितिशकुमार तिसऱ्या आघाडीत असते व त्यांनी राफेलचा मुद्दा उचलून धरला असता तर बोफोर्स सारखा फायदा झाला असता. ५० टक्के सर्वसामान्य लोकांची मते मिळवताना राफेलचा मुद्दा खरा आहे की खोटा हा मुद्दाच इथे उपस्थीत होत नाही. असो.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 02/11/2019 - 19:01 नवीन
दुर्दैवाने भारतीय जनता "माझा आत्ता काय फायदा" या दृष्टीने निवडणुकांकडे बघते. थोडे पैसे अथवा दारू आणि कोंबडी यासाठी मते फिरतात. ते नसेल तर स्थानिक दादागिरी आहेच. कर्नाटक, मप्र, राजस्थान इथल्या निवडणुका शेतकरी कर्जमाफी यावर फिरल्या. लोकांना जरी काँग्रेसचा आधीचा कर्जमाफीमध्ये कसा भ्रष्टाचार केला हा इतिहास माहित असला तरी बहुतेक लोक परत वायद्याला भुलले हे स्पष्ट दिसतंय. निवडणूक जिंकल्यानंतर घोळ घातला आहेच पण आता लोकांना पर्याय नाही. लोकसभा निवडणूक हे जरी वेगळे मैदान असले तरी परत शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी हे मुद्दे काँग्रेसने पेटवलेच आहेत. सर्वसामान्य जनतेला हे सर्व सरकारने करावे असे वाटत असतेच. माझ्या स्वप्नातली नोकरी म्हणजे काम कमी, भरपूर पगार, डोक्याला त्रास नसलेली आणि एसी ऑफिस मध्ये नोकरी मिळावी हे बहुतेक तरुणांचे स्वप्न असते. ती मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत का किंवा तशी पात्रता येण्यासाठी आपण काय प्रयत्न केले हा विषय बाजूला राहून सरकारने नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत असा आरडाओरडा होतो. शहरी पण गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांसाठी राफेलचा मुद्दा पेटवत ठेवलेला आहे. त्यात अंबानीसारख्या श्रीमंताला मदत केली असा आरोप आहेच. १९९९ च्या निवडणुकीत (नसलेला) शवपेटिका घोटाळा वाजपेयींना भोवला. त्यामुळे भाजप सोडाच पण एनडीएला सुद्धा बहुमत मिळेल की नाही याची शंका आहे. १९७७ (मोरारजी देसाई), १९८९ (व्हीपी सिंग), १९९१ (चंद्रशेखर), १९९६ देवे गौडा, १९९६ (१३ दिवस), १९९८ (१३ महिने) (वाजपेयी) हे खिचडी सरकार आले तर काय होते याची ठळक उदाहरणे आहेत. या पलीकडे बहुमताच्या जवळ पण सरकार बनवायला इतर पक्षांचा आधार घ्यावा लागल्याने कश्या तडजोडी कराव्या लागल्या याचे इतर सरकारे ही पण उदाहरणे समोर आहेत. एकीकडे बीजेपी/ एनडीए, दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडे महाठगबंधन अशी तीन टोकांची निवडणूक आहे. महागठबंधांमधल्या बऱ्याच पक्षांना त्यांच्या त्यांच्या जातीतील ठराविक मते बांधलेली आहेत. सगळी एकत्र केली तर बऱ्यापैकी सीट मिळू शकतात. नोटबंदी आणि जीएसटी मुले नाराज झालेले व्यापारी काँग्रेसकडे वळतील आणि त्यामुळे कदाचित काँग्रेसला पण बऱ्यापैकी सीट मिळू शकतील. म्हणजे १००-१२५ म.ग., १००-१५० काँग्रेस आणि भाजप २०० च्या आसपास अश्या सीटा मिळाल्या तर अवघड परिस्थिती होईल. पुढे स्थापन होणारे खिचडी सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. पण या सगळ्यात जनतेचे काय होईल? हा विचार जनता मात्र निवडणुकीआधी करेल तर बरं! डिसकलेमर: याचा अर्थ लोकांनी भाजपाला मतदान करावे असा माझा आग्रह नाही. फक्त कोणत्या एका पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय परिस्थिती होईल हे सांगणे हा उद्देश आहे. भाजपाला बहुमत म्हणजे मोदी, काँग्रेसला बहुमत म्हणजे राहुल गांधी आणि म.ग. ला बहुमत म्हणजे दरवर्षी वेगळा पंतप्रधान हे मात्र लक्षात घ्यावे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 02/11/2019 - 12:33 नवीन
बरं झालं, कट्कट गेली. मला तर सारखं ते चिखलात डुकराबरोबर लढाई का कायसा एक प्रकार आहे तेच आठवत होतं.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा