Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तुमच्या देशात....

श
शिव कन्या
Fri, 04/13/2018 - 10:03
💬 212 प्रतिसाद
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं. मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.' मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.' मी दरवाजे लावून बसते. .....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 60073 views

💬 प्रतिसाद (212)
ट
टवाळ कार्टा Tue, 04/17/2018 - 20:05 नवीन
https://mariawirthblog.wordpress.com/2014/01/27/why-this-focus-on-rapes-in-india-by-world-media/amp/?__twitter_impression=true
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/17/2018 - 22:50 नवीन
मारिया बाईंनी अतिशय मुद्देसूद मांडलं आहे. काही लोकांचा भारताला बदनाम करायचा अजेंडा आहेच आणि आपण एक सामान्य माणूस म्हणून त्याला किती बळी पडायचं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. नशीब हा ब्लॉग एका गोऱ्या आणि त्यातून स्त्रीने लिहिलाय. पण आता लोक तिच्यावरही आरोप करू नये म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/17/2018 - 22:50 नवीन
मारिया बाईंनी अतिशय मुद्देसूद मांडलं आहे. काही लोकांचा भारताला बदनाम करायचा अजेंडा आहेच आणि आपण एक सामान्य माणूस म्हणून त्याला किती बळी पडायचं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. नशीब हा ब्लॉग एका गोऱ्या आणि त्यातून स्त्रीने लिहिलाय. पण आता लोक तिच्यावरही आरोप करू नये म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/18/2018 - 08:40 नवीन
John Swinton,  former Chief of Staff of the most powerful and prestigious newspaper on earth, The New York Times, when asked to give a toast to the "free press" at the New York Press Club stated: "There is no such thing, at this date of the world's history, in America, as an independent press. You know it and I know it. There is not one of you who dares to write your honest opinions, and if you did, you know beforehand that it would never appear in print. I am paid weekly for keeping my honest opinion out of the paper I am connected with.  Others of you are paid similar salaries for similar things, and any of you who would be so foolish as to write honest opinions would be out on the streets looking for another job. If I allowed my honest opinions to appear in one issue of my paper, before twenty-four hours my occupation would be gone.  The business of the journalists is to destroy the truth; to lie outright; to pervert; to vilify; to fawn at the feet of mammon, and to sell his country and his race for his daily bread. You know it and I know it and what folly is this toasting an independent press? We are the tools and vassals of rich men behind the scenes. We are the jumping jacks, they pull the strings and we dance. Our talents, our possibilities and our lives are all the property of other men.  *"We are intellectual prostitutes."*
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 04/18/2018 - 10:40 नवीन
मीडियाच्या रोल बद्दल वरच्या पत्रकारिय प्रांजळ कबुलीस हसण्याचा स्मायली द्यावा कि खेदाचा हे ठरवणे कठीण आहे . ट. का. नि दिलेला मारियांच्या ब्लॉगचा दुवा मुख्यत्वे तुलनेच्या संदर्भाने असल्याने एका घटक वगळता https://mariawirthblog.wordpress.com/2014/01/27/why-this-focus-on-rapes-... बाकी मत या चर्चेत व्यक्त करणे सयुक्तिक असावे . सालेक्टीव्ह बातमीदारी मागे काही अजेंडा असला तरी सिद्ध करणे तसे जिकिरीचे असते . कारण मूळ कारणातही तथ्य असते , माध्यमे केवळ कोणत्या बातमीला वर आणायचे त्यावर खेळतात . भारतात माध्यमांना पहले लक्ष वाचक वर्ग श्रोता वर्ग टिकवण्याचा असतो आणि मालकांच्या जाहिराती उत्पन्नाची काळजी घेणे आणि सोबत जमले तर पत्रकार आपले व्यक्तिगत हितसंबंध आणि मतप्रवाह जपत असतात . दक्षिण आशिया आणि विकसनशील संसदीय लोकशाहीत दुसरा सरळ प्रभाव सत्तेतील राजकीय पक्ष मग कॊणताही असो कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रश्टाचार या दोन पैकी एका समस्येवर रान उठवण्याची संधी सत्ताधारीपक्षाअंतर्गतच बऱ्याचदा पाहिली जाते कारण लक्ष्य अकार्यक्षम ठरवून मंत्री/मुख्यमंत्री / पंतप्रधान बदलण्याचे असते . या अंतर्गत गटबाजीला साथ देण्यात विरोधीपक्षांचा लॉंग टर्म फायदा असतो . सोबतीला पडद्या मागे बर्याचदा कोट्यावधीची कंत्राटे नेमकी कोणत्या गटा च्या कंत्राटदाराला मिळणार यावर बरेच हिशेब असतात आणि हे साटेलोटे ना सिद्ध करता येते ना जाणते समोर येते . हा देशांतर्गत मामला झाला . परदेशातील शत्रूराष्ट्रांचे तुमची व्यवस्था ढळमळीत करण्याचे लक्ष्य असते जसे रशियाच्या पुतिनने अमेरिकेत ढवळाढवळ करून जशास ताशाचा प्रत्यय दिला हे शत्रूराष्ट्रांचे कारनामे वेगळे . पण युरोमेरीकी विकसित देशांचे सामरिक आणि त्यांच्या संरक्षण आणि व्यापारी आस्थापनांचेही हितसंबंध असतात त्यावर दुसर्या देशातील ढवळाढवळ योग्य वेळी अस्थिरता आंदोलने छेडून केली जाते (आताशा शीत युद्धातल्या काळाप्रमाणे सीआयए आणि केजीबी तेवढा सरळ हस्तक्षेप करण्याचे अतिरेकी कारवायांना समर्थन देण्याचे टाळतात पण तरीही सिरीयात होणाऱ्या हस्तक्षेपासारखे प्रकार होतातच पण आताच्या काळात हे अपवाद झाले ) आता नव्या काळात सरळ हस्तक्षेप तर करता येत नाही मग एन.जी. ओ नामक प्रकरणे हाताशी धरली जातात . (आता मिपावरच महिन्याकाठी दीडलाख पेकेज ची एका धाग्यावर चर्चा चालू आहे . त्याचे करते करविते कोना आहेत फन्डिंग कुठंन येते याची काहीही माहिती नाही -हे एका जस्ट उदाहरण म्हणून काही अनुचित असेलच असे नाही ) एनजीओचे फँन्डीन्ग परदेशातून कुठून तरी होता असते मल्टि नॅशनलचे अप्रत्यक्ष लागे बांधे असतात . सोईचे लोक पुढे आणले जातात हि मंडळी बातम्या लिहिण्यात अथवा बातमीदारांशी संवादात प्रशिक्षित असतात . मग आपल्याला अपेक्षित नकारात्मक बातम्या परदेशी मीडियात छापून आणल्या कि संबंधित कॉज साठी यरोमेरिकाना माणूस क्रेडिट कार्डावरून पैसे देतो तर शिवाय मल्टीनेशनल पैसा मागे उभा ठेवतात देखाव्यासाठी थोडाफार स्थानिक पैसाही उभा केला जातो . या समाजसेवी एनजीओनाही पैसे सोयीच्या बातम्या पसरवून फन्डिंग मिळवण्याच्या टेक्निकची सवय होऊन व्हीसीएस सर्कल तयार होते . पण यातील एनजीओत जॉईन होणारे बरेचसे पब्लिक लौकराच ऐय्याशी आणि उंची कार उंची हॉटेले विमान प्रवास उंची जीवनशैली आणि बऱ्याचदा अगदी भ्रष्टाचारासही सरावते याचा एका फायदा असा कि थातुरमातुर कामे आणि परदेशी मीडियासाठी चकचकीत रिपोर्ट पलीकडे काही होत नाही तेवढा सरकारलाही त्रास कमी :) मीडियाच्या प्रभावाखाली बरेच स्थानिकही काळाची उबळ आलेल्या मानसिक अवस्थेस पोहोचतात , निवडणूक आली कि नवी सरकारे नित्य नवे डाव !!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 04/18/2018 - 11:29 नवीन
काही तरी चुकतंय असं वाटत होतंच... आता ही बातमी .. आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय हे असं नाव , ओळख जाणिवपुर्वक उघड केली त्यांनाही शिक्षा व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/19/2018 - 06:39 नवीन
सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
हे काही पटलं नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/19/2018 - 07:50 नवीन
हे तर आहेच, पण सुरुवातीचा... मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' ...हा सगळा मजकूर विचारात घेतला तर धागाकर्तीने कोर्टाच्या प्रक्रियेचा उपहास केला आहे आणि तिच्या मते कोर्टाच्या प्रक्रियेपेक्षा, 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?', ही प्रक्रिया जास्त योग्य आणि न्याय्य आहे असे सूचीत केले आहे. भावनेच्या भरात इकडे बहुतेक जणांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. :(
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Fri, 04/20/2018 - 08:12 नवीन
Police deployed in UP village fearing communal tensions after Muslim ‘pradhan’ rapes a minor girl Kerala priest who spoke against child abuse arrested for raping minor girl ब्वोला मंडली लंडनमदी म्येणबत्तीमोर्चा कवा काडायचा ?!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/20/2018 - 09:34 नवीन
हा 'सेक्युलर' रेप असल्याने मेणबत्ती मोर्चा, निषेध इ. ची गरज नाही.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/20/2018 - 14:25 नवीन
'सेक्युलर' रेप .. आणि 'निधर्मांध' हे दोन्ही शब्द आवडले.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 04/23/2018 - 14:15 नवीन
खरंच कि, जम्मूच्या प्रकरणाबद्दल दाब्बून भावना उचंबळून आलेली मंडळी तीन दिवसांपासून गप्प आहेत. ================================== कालची मध्य प्रदेशातली ४ महीन्यांची (टाईप करायला सुद्धा शहारे येतात हे वय) केस आहे. आणि सन्नाटा आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा