Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तुमच्या देशात....

श
शिव कन्या
Fri, 04/13/2018 - 10:03
💬 212 प्रतिसाद
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं. मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.' मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.' मी दरवाजे लावून बसते. .....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 60073 views

💬 प्रतिसाद (212)
ए
एस Fri, 04/13/2018 - 11:17 नवीन
सहवेदना पोहोचली. इतका संताप आलाय की आता अशा वांझोट्या संतापाचाही संताप वाटू लागला आहे.
  • Log in or register to post comments
म
मर्द मराठा Fri, 04/13/2018 - 11:22 नवीन
कोर्‍या बातमी नुसार.. फाशीची शिक्षा होणारेय.. कायद्यात बदल वगैरे वगैरे .. होय शिवाय 'केन्डल मार्च' आहेच. फाशी देणार म्हणजे.. ज्याने 'तिला' मरणप्राय यातना दिल्या सलग काही दिवस..मग तिच्या कुटुंबाला... त्याला फक्त ५-१० सेकन्दात संपवणार ?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 04/13/2018 - 17:49 नवीन
माझं पिल्लू जर अशा परिस्थितीत सापडलं तर... कल्पना देखील करवत नाहि. व्हिक्टीम कुटुंबाला कुठल्या तोंडाने कायद्याच्या गोष्टी सांगणार आपण :( आपले भिकारचोट राजकारणी या परिस्थितीचासुद्धा फायदा करुन घ्यायला बघतील. खरच मेरा भारत महान.
  • Log in or register to post comments
स
सांरा Sat, 04/14/2018 - 08:22 नवीन
जेव्हा या अत्याचाराचा बदला म्हणून लहान मुलांना तुरुंगात छळले जाते, कुटुंबांना घर सोडून पळून जावे लागते तेव्हाही मला असाच संताप येतो.... जेव्हा एका बलात्कारी पुरुषालाच तपासाची सूत्रे देण्यात येतात तेव्हाही मला असाच संताप येतो... आसामात एका महिन्या पूर्वीच एका पाचवीतल्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले होते तेव्हा मला पण असाच संताप आला होता... जेव्हा लोक मुलींमुलींमध्ये भेदभाव करतात आणि दुसऱ्यांना दांभिक म्हणतात तेव्हाही मला असाच संताप येतो....
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 04/14/2018 - 09:24 नवीन
शिवकन्या, वेदना पोहोचली. आयसिसवाल्यांचे हातपाय तोडायला हवेत. बघा ना त्यांचीच अवलाद कशी फोफावलीये अल हिंद मध्ये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 04/15/2018 - 08:39 नवीन
हो ना गामा पैलवान. त्यांचे तर आधी तोडायला पाहिजेत. त्यांचेच काय, जगभरात वेगवेगळ्या नावाने पसरलेल्या अशा सगळ्यांच्याच अवलादी नामशेष व्हायला पाहिजेत बघा.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 04/14/2018 - 14:11 नवीन
भारतात घडताहेत त्या घटना भयंकरच पण अरब राष्ट्रांमध्ये स्त्रिया मुली सुरक्षीत आहेत असं म्हणायचं आहे का?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 04/14/2018 - 14:38 नवीन
जे झाले ते फार वाईट, पण isis active असलेल्या देशात मुली जास्त सुरक्षित आहेत आणि भारतात मात्र रस्तोरस्ती बायकांवर अत्याचार होत आहेत असा काहीसा अर्थ लेखातून निघतो आहे. त्याशिवाय लेखाचे शीर्षक सुद्धा जरा खटकले. मान्य की समोरच्या मुलीच्या नजरेतून अल हिंद "तुमचा देश" आहे, तरी...
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 04/15/2018 - 09:20 नवीन
माझ्या लेखनात एक चुकले. मी ज्या देशात राहते, त्या ओमानचा उल्लेख केला नाही. हा अरब राष्ट्रातील सर्वात शांतता प्रिय, आणि मध्य आशियातील घडोघडीला युद्ध उकरून काढणाऱ्या देशांमध्ये शांतीदूताची भूमिका बजावणारा देश म्हणून ओळखला जातो. सध्याचे सुल्तान असेपर्यंत तरी हे आहे (हे सुल्तान १९७५ पासून आजपर्यंत कार्यरत आहेत).... पुढचे माहित नाही. बाकी सरसकट सगळ्याच अरब राष्ट्रांना ईसीसच्या रांगेत बसवणे गैर. त्यातून कुणी कसा अर्थ काढायचा याची मोकळीक ज्याला त्याला आहेच. दुसऱ्याच्या नजरेतून बघताना, कितीही कळले तरी आपल्या देशावरचे प्रेम आपल्याला तसे वळू देत नाही, हे ही समजण्या सारखेच. माझे हेच झाले, आणि अगतिकतेने शेवटी त्या शाळकरी मुलीला सांगितले, 'कुठेही जा, पण माझ्या देशात जाऊ नको.' खाली एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे , आत्मताडनात आपला हात धरणारे कुणी नाही. नसावेच. शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/15/2018 - 10:25 नवीन
शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो. हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही. एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ? प्रत्येक प्रवासी/अनिवासी व्यक्ती, प्रवास/वास्तव्य करत असलेल्या देशात, आपापल्या देशाची अनधिकृत (unofficial) प्रतिनिधी असते. तिच्या वागण्या-बोलण्यावरून इतरांच्या मनात तिच्या देशाची भली-बुरी प्रतिमा तयार होत असते. या जबाबदारीची जाणीव असणे ही सुजाण नागरीकत्वाची खूण आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 04/15/2018 - 15:20 नवीन
+११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 04/15/2018 - 17:08 नवीन
शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो. हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही. एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ? अनंत वेळा सहमत
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 04/15/2018 - 20:28 नवीन
पण ओमान gender ineqality इंडेक्स मध्ये युनो आकडेवारीत भारताहून वरच्या नंबरला आहे. एकूण लोकसंख्या फक्त ४४ लाख. याहून जास्त लोक मुंबईत राहतात. गुन्ह्यांच्या प्रमाणात तुलना अशक्य आहे. तुम्ही ओमानला गेलात. तुमच्या बाकी नातेवाईक मित्र मैत्रिणींचे काय? त्यातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या तुमच्या मते या नरकात राहत आहेत. कोणी सुहृद पुरुष असतील त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार का? आरोपी पकडले गेलेत. तपास करणारा स्वतः बेघर झालेला हिंदू पंडित आहे. जात धर्म मध्ये कोण आणतोय? गुन्हेगारांना शिक्षा होईल. एवढी वाट तर न्यायपालिकेवर विश्वास ठेवून बघितली पाहिजे. आपल्या देशात कसाबला सुद्धा बचावाची संधी पुरेपूर दिली गेली होती.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 04/16/2018 - 14:34 नवीन
+1
  • Log in or register to post comments
P
prasanna_kop गुरुवार, 04/19/2018 - 13:21 नवीन
शिव कन्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे ओमान शांती प्रिय आहे हे ठीक तसेच शांतिदूतांची भूमिका साकारणारा देश आहे तेही योग्य आहे पण ओमान मध्येही मुली आणि विशेषतः स्थानिक सोडून इतर देशीय स्त्रिया सुरक्षित नाहीत. तेथे हुकूमशाही असल्यामुळे असले झालेले प्रकार वार्तापात्रात चर्चिले जात नाहीत. सलालाह च्या नर्सची हत्या व बलात्कार विसरलात का? तिच्या हत्येवरून तिच्या नवऱ्यालाच ६ महिने कैदेत ठेवले होते शेवटी सुषमा स्वराज ना मध्यस्थी करून त्याला सोडवावे लागले. घाला मधील फिलिपिनो हत्या व बलात्कारासाठी तिच्या मित्रालाच अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला. मुक्त विचारांच्या फिलिपिनो स्त्री पुरुषांना बलात्कार करायची गरज नसते, सर्वाना माहित आहे कि हे गुन्हे स्थानिकांनी केले होते पण देशाचे नाव खराब होते म्हणून भारतीय/बांगलादेशी/पाकिस्तानी इत्यादींवर हे गुन्हे टाकले जातात दगडाने चेचणे हात पाय छाटणे तर दूरच राहिले तुम्ही तुमच्या ओमानी मैत्रिणीला एक गोष्ट जरूर विचारा कि ओमानमध्ये असली शिक्षा किती वर्षांपूर्वी दिली होती. तुम्ही कधी ओमान मध्ये ऑरेंज टॅक्सीने ड्राइवर च्या बाजूला बसून प्रवास केला आहे का? अशावेळी ९०% टॅक्सीवाले स्त्रीवर हात फिरवतातच यामध्ये त्यांना स्वतःच्या (८० +) किंवा स्त्री व मुलगी हिच्या वयाचहि (५ ते ६०) बंधन नसते कधी कधी तर जाणून बुजून आडबाजूला घेऊन जातात अशा वेळी कित्येक भगिनींनी चालत्या गाडीतून उडया घेतल्या आहेत. कधीतरी रुवी मध्ये शुक्रवारी फिरणाऱ्या घरकाम करणाऱ्या स्त्रियांची कैफियत ऐका म्हणजे येथे या बायकांवर त्यांचे स्थानिक मालक कोणत्या थराचे अत्याचार करतात ते समजेल बिचार्या भारतातील कुटुंब सांभाळायचे असते म्हणून मुकाट्याने सहन करत असतात. अशा दुधाने न्हालेल्या देशात (येथे मला ओमानची बदनामी करायची नाही आहे) स्वतःच्या सवंग प्रसिद्धी साठी तुम्ही आपल्या देशाची बदनामी करत फिरत आहात . मान्य आहे कि आसिफावर झालेला अत्याचार घृणास्पद व निंदनीय आहे व कायदा तिला योग्य न्याय मिळवून देईल व अपराध्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या देशाचे नाव बदनाम करत फिरणे मलातरी योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 13:36 नवीन
मान्य आहे कि आसिफावर झालेला अत्याचार घृणास्पद व निंदनीय आहे व कायदा तिला योग्य न्याय मिळवून देईल व अपराध्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या देशाचे नाव बदनाम करत फिरणे मलातरी योग्य वाटत नाही.
+११ =============== ही सर्व मंडळी शुद्ध कांगावेखोर आहे. भारतात दरवर्षी अमानुष बलात्कारांच्या घटना शेकडोंनी होतात, यांना नेमकी स्वतःची परंपरा, संस्कृती, देव, धर्म आणि देश बदनाम करायला पुरेशी संधी असते त्यावेळीच जाग येते. आणि इतके भावनात्मक लोक होतात कि .... बस्स..... समस्येबद्दल बोलायचंच नाही.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 04/15/2018 - 09:02 नवीन
जरा उलटा प्रवास .... मी जेव्हा इकडे (ओमान) यायचे ठरवत होते, तेव्हा 'अय्या, नको बाई तिकडे जाऊ, फार बंधने बायकांवर !' असे भारताची हद्द कधीच न ओलांडलेली मंडळी सांगत होती. तर आधीच या देशात राहणारे, नेट वरून जोडलेली मंडळी सांगत होती, 'या, काहीच problem नाही. सौदीसारखी बंधने नाहीत. ओमान लिबरल आहे.' मला ठरवता येत नव्हते बरेच दिवस. पण शेवटी विचार केला, 'नाही पटले तर निघून येऊ.' आले , राहिले , अजून रहात आहे. होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा. एकूण सुरक्षेची आकडेवारी मला मिळाली तर इथे नक्कीच टाकेन. म्हणजे तुलनेला बरे जाईल. भारतच काय पण जगातल्या कोणत्याही देशातली मुलींच्या सुरक्षितेतची टक्केवारी वाढती रहावी यासाठी त्या त्या देशातील महिला संघटना, सरकारे कायकाय करतात, ते पाहणेही या निमित्ताने मोलाचे ठरेल. पण शेवटी, आपल्या घरात जळत असेल, तर जास्त दुखते, प्राची.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 04/15/2018 - 19:53 नवीन
हे आधीचे संदर्भ लेखात स्पष्ट होत नसल्याने सद्ध्याच्या घटनेशी तुलना होते. असो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे freedom of expression. रेप किंवा स्त्रियांवरील अत्याचारांच्या किती घटना गुन्हा म्हणून नोंदवल्या जातात आणि किती प्रत्यक्ष घडतात यात प्रचंड तफावत असू शकते. ज्या देशात धर्माधिष्ठित सत्ता आहे. आणि मिडीयाला freedom of expression नाही तिथे हे गुन्हे बाहेर येतील का याबाबत शंकाच आहे. त्यामुळे अशा अमानुष घटना घडूनही भारत आणि इतर अरब देश यामध्ये स्त्रियांची सुरक्षितता incomparable आहे.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 04/16/2018 - 14:35 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Sat, 04/14/2018 - 16:31 नवीन
लेख पटला नाही. घडलेली घटना वाईट आहे पण त्यासंबंधित ह्या लेखातले चित्रण एकांगी आहे.तुम्ही कळत नकळत काळे/पांढरे अशी विभागणी करून टाकली आहे असं वाटतंय.दुसऱ्या कुठल्याही देशात जा म्हणताय तर असं एखादा देश सांगू शकाल का की जिथे सगळे काही आलबेल आहे ?बरं हे सगळं एका अश्या देशातल्या मुलीला तुम्हाला सांगावसं वाटतंय की ज्या देशाच्या अधिकृत धर्मात एक स्त्री म्हणून तिचं स्थान नगण्य आहे ?नात्यातल्या पुरुषाला बरोबर घेतल्याशिवाय तिला घराबाहेरही पडता येत नाही का तिला कसलेही अधिकार नाहीत. बलात्कारासारख्या गुन्ह्यात साक्ष देताना तिची एकटीची साक्ष पुरी ठरू शकत नाही? माझा हा प्रतिसाद सरसकटीकरण करणारा वाटत असला तर तुमच्या ह्या लेखात पण असेच सरसकटीकरण होते आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 04/14/2018 - 18:13 नवीन
"एखाद्या एकेरी मुद्द्याचा पर्वत बनवून स्वताडन करणे" या प्रकारात भारतियांचा हात धरणारा दुसरा जनसमुदाय जगभरात सापडणे कठीण आहे. (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) :(
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 04/14/2018 - 18:57 नवीन
इथं सगळं आलबेल आणि सुसंस्कृत आहे असं भाबडा आशावाद व्यक्त करणं जितकं बिनडोक आणि शहामृगावस्था आहे, तितकं किंबहुना काकणभर अधिकच सगळं नासल्यात जमा करणे आणि अतिरंजित प्रकटीकरण करणे आहे वास्तव या दोन्हींच्या मध्ये अगदी अंग चोरुन उभं राहिलं आहे,ते ना कुणाला दिसत नाही का दखलपात्र नाही हेच कळेना. अदखलपात्र नाखु खिजगणतीतही नसलेला
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 04/15/2018 - 09:31 नवीन
जे मधलं चांगलं वास्तव आहे, ते तरी कुठं समोर येतं? भाबड्या आशावादातून बाहेर येईना आणि शहामृग अवस्थेतून कोण डोकं वर काढेना, ही गत अशा प्रसंगी आणखी बळजोर होते.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 04/16/2018 - 05:51 नवीन
प्रत्यक्ष आरोपी असलेल्या व्यक्तीच्या मुलीची प्रतिक्रिया आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आली आहे.ती वाचली तर कदाचित या प्रकरणी आणखी काही बाजू असेलही असे वाटते

आरोपी कोणीही , कुठल्याही धर्माचे, पक्षाचे असो तरी कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तीही जलदगतीने निकाली निघाली पाहिजे हीच मनापासून इच्छा.

नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 04/16/2018 - 14:39 नवीन
मधलं चांगलं वास्तव हे बारा पानी वर्तमानपत्रात आठव्या-नवव्या पानावर कोपऱ्यात अंग चोरून उभं असतं.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 04/15/2018 - 03:35 नवीन
डॉक्टर म्हात्रे वर म्हणालेत तसं स्वताडन करण्यात भारतीयांचा हात धरणारे दुसरे कोणी नाही. घडलेली घटना नक्कीच दुर्दैवी आणि संतापजनक आहे. पण लगेच हिंदू असल्याची लाज वाटते, भारत स्त्रियांसाठी कसा असुरक्षित आहे याची चर्चा जोरात होते. तरी अजून गुन्हा सिद्ध व्हायचाय. पण नेहमीप्रमाणे आरोपी मुस्लिम असले की गुन्हा सिद्ध झाला तरी त्यात धर्म आणला जात नाही. पण हिंदू आरोपी असले की मात्र संपूर्ण हिंदू धर्मच दोषी असतो. जगातले कुठले देश स्त्रियांसाठी सुरक्षित आहेत? स्त्रियांना अगदी नखशिखांत झाकून ठेवणाऱ्या देशांमध्ये स्त्रिया अगदी सुरक्षित आहेत का? इंग्लंड सारख्या देशात झालेले Rotherham Scandal आणि Rochdale Grooming Scandal हे माहित आहेत का? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या दोन आणि इतरही काउंटीमधल्या वय वर्षे ८ ते ५० मधील एकही स्त्री अशी नव्हती की जिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नव्हता. अमेरिकेत ओप्रा विन्फ्रे, मॅडोना सारख्या प्रथितयश स्त्रियांनी जाहीरपणे त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी सांगितलंय. सामान्य स्त्रियांची परिस्थिती काय असेल बघा. जगात कुठेही कुठल्याही वयाच्या मुली/ स्त्रियांवर सतत अत्याचार होत असतात, पण त्याला इतर कुठल्याही देशात धार्मिक किंवा देशाशी संबंधित रंग दिला जात नाही. पण जर वर दिलेल्या बातम्या नीट वाचल्यात तर त्यात अत्याचार करणारे पाकिस्तानी/ बांग्लादेशी आहेत. पण बातमीत मात्र एशियन म्हणलं गेलंय. आता समस्त भारतीय हिंदू पण एशियन आहेत, मग म्हणजे त्यांचा पण सहभाग गृहीत धरला गेलाय का? या बाबतीत पाकिस्तानी मुस्लिम असं का नीट म्हणलं गेलं नाही? या घटनेबद्दल भारतातील किंवा इतर देशातील मुस्लिमांनी काही बोलल्याचं सुद्धा आठवत नाही. जर्मनी सारख्या स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देशात सुद्धा घडलेली ही घटना बघा. अगदी अँजेला मर्केलनी सुद्धा या घटनेबाबत पुरोगामी पवित्र घेतला. हे आणि हे वाचा. यात उल्लेखलेल्या इतर घटना गेल्या २-३ महिन्यातल्याच आहेत आणि तितक्याच घृणास्पद आहेत. मग फक्त मुस्लिम मुलीवर हिंदू पुरुषांनी केलेल्या अत्याचाराची घटना का सगळीकडे एवढी पुढे आणली जातेय? फक्त काश्मीर मध्ये घडलेल्या घटनेची या पुरोगाम्यांना आणि कलाकारांना लाज वाटते? जिथे हिंदू मुलगी आणि मुस्लिम बलात्कारी आहेत तिथे एकाही मुस्लिम कलाकाराने किंवा विचारवंताने मुस्लिम असल्याची लाज वाटते म्हणलं नाही. किंवा हिंदूंना नावं ठेवणाऱ्या एकही हिंदू पुरोगाम्याने मुस्लिम धर्मावर निशाणा साधला नाही. आहे काही स्पष्टीकरण?
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 04/15/2018 - 09:27 नवीन
आपण विपुल माहिती पुरवलीत. धन्यवाद. माझ्या स्वतः च्या लेखात मी कुठेही हिंदू असल्याची लाज म्हटलेले नाही, वा अमुक एक आहे, त्याचा अभिमान आहे असे म्हटलेलं नाही..... पण स्वतः च्या घरात जळत असले कि कुणाचे जळते, यापेक्षा घरचे जळते, हे जास्त सलते बघा साहेब. आणि, बाई म्हणून जास्त दुखते. म्हणून इरीशिरीत सांगते, जा बाई कुठेही, पण जाऊ नको माझ्या देशात. बाकी चर्चा, वाद चालू द्या.....
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 04/16/2018 - 01:31 नवीन
तुम्ही म्हणताय ओमान तुम्हाला सगळ्यात सुरक्षित देश वाटतोय. ४४ लाख लोकसंख्या असणाऱ्या देशाची तुलना तुम्ही १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाबरोबर करताय. ओमान मध्ये गुन्हे होत नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? गूगल सर्च केलात तरी कळेल. त्यातूनही किती घटना रिपोर्ट होतात आणि किती बाहेर येतात ही अजूनच वेगळी गोष्ट आहे. या रिपोर्ट मधील ओमान मधलेच स्त्रियांचे हक्क बघा. ओमान मध्ये तर घरगुती हिंसा आणि मॅरिटल रेप साठी काही कायदा सुद्धा नाहीये. याच रिपोर्ट मध्ये ओमान मधील १४०००० स्थलांतरित घरगुती काम करणाऱ्या (मुख्यतः स्त्रिया) या अत्याचाराच्या बळी आहेत, ज्यात लैंगिक अत्याचार सुद्धा आला. इथे वाचा. मग आता ओमान सुद्धा असुरक्षित मानायचा का? एखाद्या अर्धवट वयाच्या मुलीला तुम्ही ज्या देशात जन्माला, वाढलात त्याच देशाबद्दल इतकी निगेटिव्ह इन्फॉर्मेशन देताय. घटना घृणास्पद आहे हे मान्यच आहे, पण म्हणून संपूर्ण देश इतका वाईट आहे का? पुढचा प्रश्न विचारायला सुद्धा मला अप्रशस्त वाटतंय, पण मुद्दा सिद्ध करण्यासाठी नाईलाजाने विचारायला लागतोय, त्याबद्दल आधीच माफी मागतो. तुमच्या ओळखीच्या भारतात राहणाऱ्या सगळ्या स्त्रियानी असा कुठला अत्याचार प्रत्यक्ष अनुभवलाय का? आता तुम्ही या एका घटनेवरून भारत असुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढलात. तर तोच तर्क पुढे वाढवून मी म्हणतो की भारतात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये मुस्लिम पुढे आहेत. सन २०१८ मध्ये आत्तापर्यंत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या ६-७ घटना बघितल्या तर किमान ५ घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहेत. तसेच जगभरात झालेल्या बहुतांशी अतिरेकी कारवाया मुस्लिमांनीच केलेल्या आहेत. मग ओमान मध्ये हे उघडपणे तुम्ही तिथल्या लोकांना सांगू शकता का? या मुलीच्या पालकांना तुम्ही सांगितलं का की सन २०१८ मध्ये आत्तापर्यंत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या बहुतांश घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहेत. भारत असुरक्षित झालाय कारण मुस्लिमांची संख्या वाढते आहे? असो, आता तुम्ही भारत असुरक्षित असल्याचा निर्णय देऊनच टाकलाय तर तुमचे मत बदलणे अवघड दिसते आहे.
  • Log in or register to post comments
T
Topi Sun, 04/15/2018 - 08:25 नवीन
As a Hindu I'm scared of Muslim in India. I'm sad my Religion Hinduism is declining and other religion are growing. I'm sad that people can nowadays can mock Hinduism and get away with that. Yes you heard it right this is thought of Most of Hindus nowadays. In name of Secularism Hinduism will die soon. Islam is taking over watch and see. All the Muslim actors are marrying Hindu girls that is nothing more than a love jihad. Islam is taking over India making me sad. Nobody can speak against Islam in India. So many rape happened against Hindu girls but no Bollywood and Tv serial actors can hold a sheet of paper or do Candle march. It's sad whatever happened to Asifa i condemned it. I'm worry about my children who will suffer in future because of this so called politician who are mocking Hinduism. Islam is taking over India sooner you realize would be better. Not only Islam I'm scared of every religion because every other religion is growing but Hinduism not. A Muslim guy us mocking Hinduism by this Post. But no one can do anything. Actors like SRK, Salman, Aamir can't attend Event when Netanyahu came. Reason Religion is more important. There is page called Humans of Hinduism in FB where so many jokes are made even my hindu friends are liking and laughing. I reported that page guess what my appeal rejected. I see many Anti Islam page are getting banned.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 04/15/2018 - 08:43 नवीन
बलात्काराच्या केसमधे पिडीत व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तींची ओळख उघड करीत असतात का ? यासंबंधी काही लिखीत वा स्विकृत नियम आहेत का ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/15/2018 - 08:56 नवीन
Section 228 A of the Indian Penal Code lays down the provisions barring the disclosure of identity of the victim of certain offences. It say that: “Whoever prints or publishes the name or any matter which may make known the identity of any person against whom an offence under section 376 (rape), section 376A (rape leading to death or making victim go into a permanent vegetative state), section 376B (sexual intercourse by husband upon his wife during separation) , section 376C (sexual intercourse by person in authority) or section 376D (gang rape) is alleged or found to have been committed (hereafter in this section referred to as the victim) shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years and shall also be liable to fine.” The only circumstances under which the identity can be revealed is either (a) by or under the order in writing of the officer-in-charge of the police station or the police officer making the investigation into such offence acting in good faith for the purposes of such investigation; or (b) by, or with the authorisation in writing of, the victim; or (c) where the victim is dead or minor or of unsound mind, by, or with the authorisation in writing of, the next of kin of the victim. In the case of the third exception it is further stated that it only applies “provided that no such authorisation shall be given by the next of kin to anybody other than the chairman or the secretary, by whatever name called, of any recognised welfare institution or organization”. Even in the case of printing or publishing “any matter in relation to any proceeding before a court” in these offences, without the previous permission of the court, punishment can mean imprisonment of up to two years along and a fine. As these sections clearly lay out, it is wiser not to report the name of a rape victim or a victim of any kind of sexual assault under any circumstances. दुवा : https://thewire.in/law/identity-of-rape-victims
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 04/15/2018 - 09:42 नवीन
धन्यवाद म्हात्रेसाहेब.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/15/2018 - 14:37 नवीन
ईतर इस्लामिक देशांपेक्षा अल्पसंख्य धर्मीयांशी चांगली वागणूक ठेवणारा देश म्हणून ओमान कौतुकास पात्र आहेच. प्रोटेस्टन्ट जसे इतरांशी वागताना जसे अधिक सौजन्यपूर्ण असतात पण तत्वज्ञानानी कदाचित कॅथॉलिकांपेक्षा कट्टर असत (चुभूदेघे प्रोटेस्टन्ट तत्वज्ञानाबद्दल हे माझे व्यक्तीगत इम्प्रेशन आहे) तसेच काहीसे ओमानीन्चे असावे . त्यांच्या स्वतःच्या नागरीक मुस्लीम लोकांसाठी ते कट्टरच असावेत. (एकदा कट्टरतेची सवय झाली की कट्टरता वाटत नाही) पण लेखिकेने लेख टाकण्या आधी गूगलवर पुरेसा अभ्याकरुन लेख टाकला की बातम्यांच्या प्रभावात भावनेने ?
शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
लेखिका नेमकी कसली फेकुगिरी करत आहेत ? ओमान मध्ये 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' ह्या जावई शोधाचा नेमका संदर्भ कोणता ? गूगलल्यावर मला दिसणारी माहिती ओमान मध्ये ओमान पिनल कोड आहे, कोर्ट आहे आणि बलात्काराच्या गुन्ह्यास अधिकतम शिक्षा १५ वर्षान्ची जेल आहे. तुर्तास तरी भारतात अधिक शिक्षेची तरतूद असावी. इंग्रजी विकिपीडियातील Human rights in Oman लेखातून
Rape is punishable by up to 15 years in prison, and for cultural and social reasons many rapes probably go unreported. Domestic violence complaints are generally handled by authorities. Female genital mutilation is permitted and widely accepted and practiced, सम्दर्भ Human rights in Oman. In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 12:36, April 15, 2018, from https://en.wikipedia.org/w/index.php?title=Human_rights_in_Oman&oldid=828306826
खालील बातम्यांच्या लिन्का आपल्या अभ्यासासाठी * Oman crime: Filipina expat body found, rape and murder suspected * Rape in Oman * Omani national arrested for raping expat woman * RAPE IN OMAN: Men Pretend to be ROP and Kidnap a Woman for the Purposes of Rape * Outrage erupts in Oman after judge gives child rapist minimum sentence * Oman police arrest 20 expat women for wearing 'inappropriate' clothes * Ugandan women recount ordeal in Oman. भारतीय हैदराबादेत दुसरी पत्नी ठेऊन ओमानी शेखाने फोनवर ट्रिपल तलाक दिल्याचे उदाहरनाची बातमी मागे होती जरा अधिक गूगलल्यास मिळून जाईल . *
  • Log in or register to post comments
N
nanaba Sun, 04/15/2018 - 19:59 नवीन
I am a Hindu. I love my religion. But a 8 Ur old gets gang raped. Is tortured.. killed.. and people talk abt religion? This is beyond me! She is 8 Ur old defense less child bloody hell. Stop defending what has happened.what happens in Oman or other countries doesn't make it better in India. Any lady & parents of any kids that step out of home have constant fear in their mind. Isn't that bad enough? What will make u say - it's not that bad? Just because this lady is staying abroad? I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/15/2018 - 20:40 नवीन
अहो मॅकॉले पूत्र आम्ही म्राठीतन लिवा विन्ग्रजीतन लिवून आपण शाने हो नाई, असल्ये पाष्कळ इचार आपल्या पाशीच ठिवा . वाईट गोष्टीला कोणी बी डिफेंड केल नाय . धागा लेखिकेनेच धर्माचे नाव न घेता फसवा धार्मीक आधार घेतल्याचे संदर्भा सहित सिद्ध केले हाय. आमचा देश इतरांपेक्षा लाखपटीने चांगला हाय हे आकडेवारीने बी सिद्ध व्हतय .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/15/2018 - 21:09 नवीन
छ्या, छ्या ! विंग्लिशम्द्ये लिवलं म्हंजे कसं एकदम इम्प्रेशिव वाट्टं नाय का ? विंग्लिशम्दी आणि वर उद्धट भाषेत काहीही दामटून सांगितले व त्यात आस्तित्वात नसलेले आरोप बेमालूमपणे मिसळले (दुसर्‍या कोणी असे केले की त्याला, गोल पोस्ट बदलणे, असे म्हटले जाते, ती गोष्ट वेगळी) की मग एकदम भारी वैश्विक सत्य सांगण्याचा आव आणता येतो ! ;) :)
  • Log in or register to post comments
N
nanaba Mon, 04/16/2018 - 07:14 नवीन
अहो, असे वैयक्तिक होण्या पूर्वी इतर शक्य तांचा विचार केलात का? ब्राऊजर इश्युज वगैरे ऐकलेत का? वर २-३ इन्ग्रंजी प्रतिसाद आहेत, त्यां च्या अंगावर तुटून पडलात का? असो,वि षयांतर नको. तुम्ही स्त्री आहात का? तुम्हाला लहान मुले आहेत का? घरातील स्त्री शी बोलून बघा. जाऊन निवांत टेकडीवर एकटं बसलीये, नदीकिनारी बसलीये, हे करण्याची हिम्मत आज त्या करू शकतात का? किती बेसिक गोष्ट आहे ही! ओमान मधे काय घडतय ह्याच्या शी मला काय घेणं देणं आहे? माझ्या देशात मला सुरक्षित वाटत नाही हे सत्य पुरेसं त्रासदायक आहे. रोजच्या बेसिस वर. ह्यात धर्म, देश हे मुद्दे ये ऊच शकत नाहीत. एका प्रति कारासाठी सक्षम नसलेल्या जीवाब रोबर असे ८ -८ जण एकत्र ये ऊन वागतात तेव्हा लाज, वाझोंटा संताप, ते आपण /आपल्या घ रातलं नसावं म्हणून प्रार्थ ना, सततची काळजी, खबरदारी - हे किती भया नक आहे, हे एखाद्याला का कळू नये? मिपा सोडा, बाहेर तरी धार्मिक समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरली आहेत ना? हे तरी पुरेसं लाजीरवाणं वाटतं का नाही? अशांना (ब लात्कारी) खरोखरच दगडाने ठेचून मारावे , ती ही शिक्षा कमीच होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Mon, 04/16/2018 - 07:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/15/2018 - 21:00 नवीन
I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead. तुमची गल्ली पार चुकली आहे (पक्षी: मुद्दा ध्यानात आलेला नाही) हे खेदाने सांगत आहे. बालकांवर अत्याचार आणि तेही लैंगीक अत्याचार असलेल्या निर्घृण गुन्ह्याचे समर्थन होऊच शकत नाही, याबद्दल इथेतरी कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. अश्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कायद्यांत अनुकरणीय (exemplary) शिक्षेची तरतूद करावी असे मला स्वतःला वाटते. याशिवाय, धर्म हा मुद्दा तर इथे तरी, एखादा चुकार प्रतिसाद सोडता, तुम्हीच इतक्या टोकाच्या स्वरूपात अध्याहृत धरून घुसवलेला आहे ! तुमच्या ध्यानात आले नसले तर... मुख्य मुद्दा असा आहे की, "एखादा गुन्हा घडला म्हणून सगळ्या देशाला वेठीस धरण्याचा आणि सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, असे म्हणणे चूक आहे." कारण तसे करणे, देशाची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) बदनामी होईल इतपत अतिशयोक्ती करणे होते. जणू काय, त्या मुलीने "ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असलं" तरी तिला भारतात निर्घृण गुन्ह्यांशिवाय इतर काहीच बघायला मिळणार नाही, अशी लेखिकेची खात्री झालेली आहे ! अश्या एखाद्या दुर्दैवी घटनेच्या पायावर परदेशप्रवासाचे निर्णय केले तर सर्व जगभरचे आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद करावे लागेल, नाही का ?! तसेही, "काहीही कारण असो वा नसो, आपल्या देशाबद्दल अपमानास्पद लिहिणे-बोलणे हा भारतीय घटनेने दिलेला अधिकार आहे" असे म्हणणारे बरेच उदारमतवादी लोक भारतात आहेतच, तर मग परदेशात राहून असे केले तर काय बिघडले !" :( ================== अवांतर : मी स्वतः ओमानमध्ये १४ वर्षे वास्तव्य केलेले आहे. तेथिल जमिनी वस्तूस्थितीबद्दल मला चांगली माहिती आहे. सर्व स्तरांच्या ओमानी नागरिकांबरोबर माझे व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर सौहार्दाचे संबंध होते/आहेत. सर्वसाधारण ओमानी माणसाला भारताबद्दल आणि भारतिय माणसाबद्दल ममत्व व आदर आहे... आणि त्यांचे ते मत ओमानमध्ये काम करणार्‍या भारतिय नागरिकांशी आलेल्या संबंधातून आणि त्यांच्या भारतभेटींच्या अनुभवातून बनलेले आहे. तसेही भारत देशाशी ओमानचे व्यापारी संबंध आजचे नसून, शेकडो वर्षांचे आहेत... ब्रिटिश भारतात येण्याच्या बर्‍याच अगोदरपासूनचे. किंबहुना, ओमानमध्ये खनिज तेलाचा शोध लागण्याअगोदर भारतात येऊन काम करणारे अनेक ओमानी लोक (किंवा त्याचे पालक) मला तेथे भेटले आहेत. त्यामुळे, जेव्हा लेखिकेने "एक आडनीड्या वयातली शाळकरी पोरीला" भारताबद्दल प्रतिकुल मत सांगितले तेव्हा, इतर कोणापेक्षा, तिला आणि तिच्या पालकांना जास्त आश्चर्य वाटले असेल, असे मला वाटते. तरीही, 'कुर्‍हाडीचा दांडा...' बनणे टाळणे तर बरे होईल, असेच वाटते.
  • Log in or register to post comments
N
nanaba Mon, 04/16/2018 - 07:16 नवीन
सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, >> अहो परदेशी सोडा हो. देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/16/2018 - 08:39 नवीन
परत गल्ली चुकली ! देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा! १, पर्यटनासाठी भारतात आलेले किती परदेशी लोक पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करतात ? २. पब्लिक ट्रांसपोर्टमधल्या समस्येचा उपाय काय ? इथे देशात असे प्रसंग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे, की त्याचे सरसकटीकरण करून आपला देश अत्यंत धोकादायक आहे अशी परदेशात जाहिरात करायची ? "आग रामेश्वरी सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी" असा प्रकार नाही काय हा ?! विकृत लोक ही काही केवळ भारताची खासियत नाही. अश्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वच सुजाण लोकांच्या मनात चीड आहे, परंतू, त्यामुळे सर्व देशाची (आणि पर्यायाने सर्व भारतियांची ज्यात लेखिका, तुम्ही व आम्ही सर्वच गणले जातो) प्रतिमा मलिन करण्याने काय साधणार आहे ??? तसे करणे समतोल विचार/कृती करणे होईल का ? भारताची परदेशात नाचक्की करून परिस्थिती सुधारणार आहे की मुळ समस्या तशीच राहील आणि त्यावर अजून भारताची प्रतिमा खराब झाल्यामुळे अनेक नवीन समस्या निर्माण होतील ? किंबहुना, अशी नाचक्की करणार्‍या भारतियांकडे परदेशी लोकांनी संशयाने/तिरस्काराने/चेष्टेने पहायला सुरुवात केली तर ते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे असेल... पण अश्या कृतीमुळे इतर भारतियांना झळ पोचली तर त्याची जबाबदारीही नि:संशय नाचक्की करणार्‍यांवरच असेल. विशेषतः, संस्कारक्षम वयाच्या परदेशी नागरिक मुलीसमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्याच्या कृतीत कितीसा समतोलपणा आहे ? अशी अस्थायी आणि अप्रमाणबध्द (out of proportion) स्वताडन कृती करून वर तिची प्रसिद्धी करणे व तिचे समर्थन करत राहणे, यामुळे अश्या कृतीमागच्या कारणपरंपरेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर आश्चर्य वाटू नये !
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 04/16/2018 - 08:48 नवीन
इथे धर्माचा इश्यु मध्ये आणला गेला नाही हे खरे आहे. परंतू, जर बातम्या नीट वाचल्या तर या घृणास्पद गुन्ह्याचं समर्थन करणारे कुठल्या आधारे करताहेत हे लगेच कळून येईल. गेले अनेक दिवस हिंदू एकता मंच नावाची संघटना गुन्हा दडपून टाकण्याचा, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न करते आहे, सत्ताधारी भाजपचे लोक ज्या घाणेरड्या प्रकारे पिडितेवर जरासुद्धा सहानुभुती न दाखवता गुन्हेगारांना अटक न करावी यासाठी प्रयत्न करताहेत त्याचा निषेध इथे करायचा नाही? ८ वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर इतक्या अमानुष पद्धतीने बलात्कार करणार्‍या नराधमाचे समर्थन धर्माच्या आधारे केलं जात असेल तर त्याची प्रतिक्रिया उमटणार नाही का? आज चक्क तिला न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढणार्‍यांना पाकिस्तानी म्हटले जात आहे पेड ट्रोलांकडून हे सगळं खरंच इतकं लाईटली घेण्यासारखं वाटतं तुम्हाला? माझ्या मते नानबांच्या म्हणण्यावर इतकी टोकाची प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे..
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/16/2018 - 08:51 नवीन
बाकी मुद्द्यांबद्दल मतभेत नाहीतच. पण... मात्र, "परदेशात भारताची नाचक्की करणे हा त्यावरचा दुरान्वयानेही उपाय होऊ शकत नाही" हे माझे म्हणणे आहे. त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.
  • Log in or register to post comments
N
nanaba Tue, 04/17/2018 - 04:08 नवीन
मी एक स्त्री आहे. हे होताना दिसत तेव्हा आतून काय वाटत ते कदाचित पुरुषान्ना त्या प्रमाणात कळत नसाव अस वरच्या रिअ‍ॅक्शन्स वरून वाट ले. उद्वी ग्न. I read this need first when I read this article (limited tv, news paper). Felt so devastated,couldn't sleep! Irrespective of what they do in Oman, irrespective of any details about involved , this is terrible. Can't express what I feel.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 04/15/2018 - 20:50 नवीन
मला कोणत्याही आकडेवारी मध्ये आणि राजकारणात पडायचं नाही, पण आपला देश बायकांसाठी फार बेक्कार होत चालला आहे हे माझंही मत आहे. प्रश्न स्वातंत्र्य वगैरे नसून एकंदरीत बायकांना बघण्याची, वागवण्याची पद्धत गचाळ आहे. फेसबुक वगैरे वर कित्येकदा कुणी पुरुषाने काही केलं की ट्रॉल्स असतील भले, पण ह्याच्या घरातल्या बायकांचा रेप केला पाहिजे असं लोक खुले आम लिहितात. गर्दीच्या जागी काय प्रकार होतात हे वेगळं लिहायला नको. कपडे हा तर भलता सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. फॉरेनर येतात त्या बायकांच्या मागे कसे लागतात ह्या बातम्या आता दुर्मिळ नाहीत. रात्री बेरात्री निर्धास्त फिरण्याची सोय नाही. कुठं एकटं असण्याची सोय नाही. रेप हा फिजकली दिसतो, पण रोजच्या आयुष्यात जे घडतं ते सांगताही येत नाही. त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Mon, 04/16/2018 - 03:03 नवीन
योग्य प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/16/2018 - 08:49 नवीन
अशी मानसिकता ही भारतात एक मोठी समस्या आहे यात वाद नाहीच. त्यासाठी भारतातच काही कडक उपाय करणे योग्य असेल. मात्र, "परदेशात भारताची नाचक्की करणे हा त्यावरचा दुरान्वयानेही उपाय होऊ शकत नाही" हे माझे म्हणणे आहे. त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 09:01 नवीन
<<त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.>> ==>> म्हात्रे साहेब, परदेशात जाऊन संस्कारक्षम पब्लिक समोर देशाची नाच्चकी करण्यात "एक" व्यक्ती अव्वल स्थानी आहे. उगाच एक आठवण आली. असो..
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/16/2018 - 09:13 नवीन
गाडी नको नको म्हणता राजकारणावर आलीच ना शेवटी ?! (कपाळावर हात मारणारी स्मायली) वादासाठी तुमच्या मनात काय आहे ते खरे मानले तरी, दुसर्‍या चुकीने पहिली चुक सुधारते का... विशेषतः त्यांचे संदर्भ फार वेगवेगळे असले तरी केवळ मुद्दा जिंकण्यासाठी त्यांची तुलना करण्याच्या मोहात पडावे काय ? नाही असे माझे मत आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 09:25 नवीन
<<<गाडी नको नको म्हणता राजकारणावर आलीच ना शेवटी ?>> ==>> ह्या प्रकरणावर राजकारण सुरु झाले म्हणूनच तर देशातील सर्व स्तरातून लोक पेटून उठून आवाज उठवायला लागले. नाहीतर ही चर्चा कठुआ आणि जम्मू पुरतीच सीमित राहिली असती. === <<<वादासाठी तुमच्या मनात काय आहे ते खरे मानले तरी,>> ==>> ह्या वादात काहीच हाशील नाही हे मला चांगले ठाऊक आहे. === <<< विशेषतः त्यांचे संदर्भ फार वेगवेगळे असले तरी केवळ मुद्दा जिंकण्यासाठी त्यांची तुलना करण्याच्या मोहात पडावे काय ? नाही असे माझे मत आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?>> ==>> मुद्दा जिंकण्यासाठी तुलनात्मक मतमतांतरे कोठून सुरु झाली हे वाचकांना अगदी स्पष्ट दिसत आहे. माझे म्हणणे मांडण्याची आवशक्यता वाटत नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा