Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तुमच्या देशात....

श
शिव कन्या
Fri, 04/13/2018 - 10:03
💬 212 प्रतिसाद
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं. मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.' मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.' मी दरवाजे लावून बसते. .....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 60073 views

💬 प्रतिसाद (212)
प
पिलीयन रायडर Mon, 04/16/2018 - 15:13 नवीन
नाही हो गवि! तो ही देश चांगला आहे पण अनेक कारणांसाठी मला भारत जास्त योग्य वाटला. म्हणून मग जास्त ताण न वाढवता परत आले.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 04/16/2018 - 14:34 नवीन
तुम्ही वीतभर कपडे घालून फिरलात तरी कुणी नजरही वर करून बघत नाही. स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल.
याबाबत तुम्ही चूक आहात....तुम्ही कितीवेळा अमेरिकन पुरुषांचे boys talk ऐकले आहे? मी ऐकले आहेत....तेही बर्याच्दा बहुतेकवेळा (प्रत्येकवेळा नाही) प्रत्येक पुरुष कोणत्याही स्त्रीशी बोलताना एकदातरी "natural attraction to opposite sex" या नजरेने बघतोच....फक्त ते बघणे "काही सेकंद ते नजरेसमोर असेपर्यंत" यामध्ये कुठेही असू शकते...पाश्चात्य देशांत लोकांना शारिरीक जवळीक फार लवकर आणि जास्त वारंवारीतेने मिळते त्यामुळे "तसे" बघणे जास्त वेळ लांबत नाही...मध्य-पुर्वेत किंवा आशियायी देशांत (Indian subcontinent) असा प्रकार नसल्याने बहुतेकदा "जमेल तितके आणि जमेल तेव्हा" काहीतरी बघावे/मिळावे याची तीव्रता जास्त असते जाता जाता....कसे बघावे हि एक कला आहे....जी स्त्रीयांकडे जन्मजात असते....आणि बहुतांश पुरुषांना शिकवण्याची नितांत गरज आहे
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/16/2018 - 15:17 नवीन
तुझा घोळ होतोय. Boys talk भारतात होत नाहीत? बादवे गर्ल्स talk सुद्धा अस्तित्वात आहेत. पण तो मुद्दा आहे का? तर नाही. एक तर मी आधीच वर म्हणलं आहे की सरसकटीकरण होऊच शकत नाही. पण तरीही ओव्हरॉल बायकांकडे बघण्यातली वखवख बरीच कमी आहे. भारतात मात्र सर्रास लोक विचित्र बघतात. तुझ्या लॉजिकची गल्ली किंचित चुकली आहे असं मला वाटतंय.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 04/17/2018 - 15:33 नवीन
आपणांस मुद्दा समजलेला नाही* तुमच्या वाक्यातून सरसकटपणे अमेरिकन पुरुषांना सोज्वळतेचे सर्टिफिकेट दिले गेलेय त्याबद्दल माझा आक्षेप होता....त्या अनुषंगाने Boys talk चा विषय काढलेला (मुली गर्ल्स टॉक करतात हे जगजाहिर आहे आणि त्याबद्दल काहिच म्हणणे नाहीये) ओव्हरॉल बायकांकडे बघण्यातली वखवख बरीच कमी आहे. भारतात मात्र सर्रास लोक विचित्र बघतात. याबद्दलच मी म्हणालेलो कि "कसे बघावे"** ही एक कला आहे जी स्त्रीयांकडे जन्मजात असते आणि पुरुषांना शिकण्याची नितांत गरज आहे * कित्ती दिवसांनी गुर्जींचे कॉपीराईट असलेले वाक्य वापरले =)) ** देखो मगर प्यार से
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 18:54 नवीन
या विषयावर माझ्या या (जाने २०१६) धाग्यावर आदिती तै नी त्यांचे विचार मोकळेपणाने मांडलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 13:15 नवीन
पण तरीही ओव्हरॉल बायकांकडे बघण्यातली वखवख बरीच कमी आहे.
भारतात स्वतःस सुंदर मानणार्‍या वा सर्व तसे मानत असलेल्या स्त्रीयांस पाश्चात्य देशांत काळ्या नि खालच्या वंशाच्या मानतात. उदा. नाशिकवरून आलेल्या मोर्च्यातल्या आदिवासी स्त्रीयांस अप्पर क्लास मुंबईकर वखवखलेल्या नजरेनं पाहत नाहीत तसं काहीसं. भारतात असणार्‍या आफ्रिकन स्त्रीयांत भारतीयांचा रस नसतो, तेच गोर्‍या स्त्रीयांत खूप जास्त रस असतो. त्या खालोखाल स्वतःच्या देशातल्या स्त्रीयांत. (हा रस केवळ सार्वजनिक स्थळांवरील नजरा, इ वरून ठरवला आहे.) हेच अमेरिकन लोकांना लागू आहे. ====================================== स्त्रीयांचा सन्मान कोणत्या देशात किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या देशातले पॉर्नचे प्रकार पाहावेत. प्रकारांची नावे आणि पाहणारांची संख्या, दिलेली रेटींग वरून त्या देशाबद्दल बरेच काही सांगता येईल. जितकं विकृत पॉर्न तितका वाईट देश हे साधं सूत्र लावावं. ==================== भारत सर्वात सोज्वळ देश असेल याबद्दल दुमत नाही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/19/2018 - 15:26 नवीन
====================================== स्त्रीयांचा सन्मान कोणत्या देशात किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या देशातले पॉर्नचे प्रकार पाहावेत. प्रकारांची नावे आणि पाहणारांची संख्या, दिलेली रेटींग वरून त्या देशाबद्दल बरेच काही सांगता येईल. जितकं विकृत पॉर्न तितका वाईट देश हे साधं सूत्र लावावं. ==================== भारत सर्वात सोज्वळ देश असेल याबद्दल दुमत नाही.
Image removed. कसले पोर्न बनवले जाते यावरून कोणत्याही देशाचे मुल्यमापन करायची वेळ आलीये? प्रत्येक देशात लोकसंख्येच्या प्रमाणात किती लोक पोर्न बनवतात? आणि पोर्न बनवणार्यांमध्येसुद्धा विकृत पोर्न बनवणारे किती असतील? तितक्या लोकांवरुन अख्ख्या देशाचे मुल्यमापन? आणि भारताच्या सोज्वळपणाबद्दल बोलायचे झाल्यास कोणत्याही पोर्न साईट्सवर MMS video असे शोधून बघितल्यावर रिझल्टमध्ये भारतीय स्त्रीयांचे किती व्हिडिओ येतात ते बघा जरा....मग भारत हा "स्त्रीयांचे चोरुन व्हिडिओ बनवणार्यांचा" देश असे म्हणायचे का? हाच सोज्वळपणा का?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/19/2018 - 16:18 नवीन
निकषांमध्ये पाहणाऱ्यांची संख्या याचा उल्लेख आपल्या नजरेतून सुटला असेल कदाचित म्हणून..... ******************* अवांतर शंका - एमएमएस याचा सार्वत्रिक अर्थ शूट केलेला घाणेरडा विडिओ असा होतो का? किंवा आपल्याकडे तो तसा कोडवर्ड वापरतात तास तो जगभरात वापरतात का?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 04/20/2018 - 14:58 नवीन
एमएमएस म्हणजे Multimedia Messaging Service. कुठलाही व्हिडिओ, फोटो (फक्त अश्लीलच नव्हे) जेव्हा तुम्ही फोनमधले Messaging App (कायप्पा किंवा तत्सम नव्हे) वापरून पाठवता तेव्हा तो एमएमएस मध्ये जातो. तर लिखित स्वरूपातलं (type करून/ Text) जेव्हा पाठवता ते एसएमएस प्रकारात मोडतो. अमेरिकेत अश्या चोरून काढलेल्या व्हिडिओजला बहुतेक Voyeur व्हिडीओ म्हणतात. नक्की माहित नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 12:53 नवीन
स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल.
बे वॉच खास भारतीयांसाठी बनवलेला कार्यक्रम दिसतो. ==================================== शिवाय पॅरिसमधे फॅशन शोज मध्ये अत्यंत वैराग्यपूर्ण दृष्टीने अंतवस्त्रधारी स्त्रीयांचे फोटो काढणं चाललेलं असतं.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 04/16/2018 - 10:31 नवीन
मेरा भारत महान वगैरे भ्रम मला तसेही नाहीचेत, आणि स्त्री असणं हे माझ्यासाठी जास्त मोठं कनेक्शन आहे. +१११११११
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 04/16/2018 - 10:51 नवीन
देशा बद्दल अभिमान नसलेल्यांनी, देशाची चिन्ता अभिमान असणार्‍यांवर सोडून देणे अधिक श्रेयस्कर असेल का ? आम्ही देशा बद्दल आभिमान आहे , देशास महान ठेवण्याचि आस आहे म्हणूनच सकारात्मक योगदान देतो . अभिमान नसलेलीच मंडळी कुकृत्ये करण्यात पुढे आणि अभिमान नसलेल्यांचीच भावंडे असतात का अशी साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 04/16/2018 - 12:08 नवीन
देशाभिमान बाळगत २४*७ अत्याचार सहन करायचे काय? उलट थोडी नाचक्की केल्याने उरली सुरली लाज शिल्लक असेल तर निदान वठणीवर तरी येतील.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 04/16/2018 - 12:23 नवीन
देशाभिमान शिल्लक असेल किंवा वापस आला तरच शक्य व्हावे. खरा देशाभिमान असलेले अत्याचार करतही नाहीत आणि सहनही करत नाहीत. अत्याचार सहन न करण्यासाठी देशाभिमानाशी तडजोड करण्याची गरज नसते.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 04/16/2018 - 12:34 नवीन
मेरा भारत महान वगैरे भ्रम मला तसेही , आणि स्त्री असणं हे माझ्यासाठी जास्त मोठं कनेक्शन आहे. मग लेखिकेने खरी वस्तुस्थिती समोर आणली तर ती देशाची नाचक्की कशी होते ब्बॉ?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 04/16/2018 - 12:41 नवीन
खरा देशाभिमान असलेले अत्याचार करतही नाहीत आणि सहनही करत नाहीत. मग लेखिकेने खरी वस्तुस्थिती समोर आणली तर ती देशाची नाचक्की कशी होते ब्बॉ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 04/16/2018 - 12:55 नवीन
मग लेखिकेने खरी वस्तुस्थिती समोर आणली तर ती देशाची नाचक्की कशी होते ब्बॉ?
एक मिनीट , किमान मी स्वतः देशाची नाचक्की वाली भूमिका कोणत्याही प्रतिसादातून मांडलेली नाही, तुलनेचा गोलपोस्ट नसलेला धागालेख मी स्वतःही काढला आहे. तो न पहाता आपण माझ्यासमोर प्रश्न ठेवता याचे आश्चर्य वाटते. आपले त्या धागा चर्चेत स्वागत आहे. त्याच वेळी ओमान इस्लामी देश असोत जी युरोमीरेक्चे समर्थक त्यांचे तुलनेचे दावे गोलपोस्ट कमकुवत आधारावर व वस्तुनिष्ठ माहितीवर आधारलेले नाहीत हा माझा पहिला आक्षेप आहे . दुसरा आक्षेप सुरक्षा वाढवण्या बद्दल चर्चा करण्या एवजी स्वतः भ्यावे दुसर्‍यां स्त्रीयांनाही भिती घालावी यास आ़षेप आहे. समस्या थोड्या फार फरकाने सर्वच देशात आहेत तशाच आपल्याही देशात आहेत . त्या बद्दल भितीचे वातावरण निर्माण करणे स्त्रीयांच्या स्वतंच्या फायद्याचे आहे का या बाबत साशंक ता आहे. ओमानी किंवा परदेशी किंवा भारतीय स्त्रीस भारतात फिरताना कोणती काळजी कशी घ्यावी . भारतात उपलब्ध सुरक्षेचे उपाय कोणते , काय सुधारणा करता येतील अशी रचनात्मक चर्चा न करता केवळ मानसीक भिती वाढवत नेणारे वातावरण निर्मिती बद्दल साशंकता आहे.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Mon, 04/16/2018 - 10:33 नवीन
मुसलमान बायका बुरखा घालतात हे अगदी योग्य आहे. किती सुरक्षित असतात ना त्या!! आपल्या हिन्दु/ ख्रिश्चन /बौद्ध/शीख स्त्रिया फार पुढारलेल्या आहेत. तोकडे कपडे घालताहेत आणि अनर्थ होतोय. चला पुढच्या काही वर्षात आख्खा भारत बुरख्यात आणू शरियत कायदे आणू मग स्त्रिया एकदम सुरक्षित आणि दुय्यम वागणुक मिळाली तरी सुरक्षितता किती महत्वाची!! तेव्हा भारतीय स्त्रियानो परंपरा पाळा मग तुम्ही भारताबाहेर असलेल्या स्त्रियान्सारख्या सुरक्षित राहाल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 04/16/2018 - 13:27 नवीन
कवयित्रीच्या भावना समजावून न घेता शब्दांचा काहीही किस पाडणे चालू आहे ह्या धाग्यावर
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 04/16/2018 - 13:36 नवीन
@ प्रचेतस , भावनांच्या भांडवलावर वस्तुनिष्ठता आणि तर्कसुसंगतते शी तडजोडीची भलावण कशा साठी. याच लेखीकेच्या एका कवितेची बाजू तर्कसुसंगत विश्लेषणाने मी स्वतः लावून धरलेली आहे म्हणजे व्यक्तिगत आकसाचे प्रश्न नाहीत. स्त्री विषयक प्रश्नावर दुसर्‍या धाग्याचा पर्यायही उभा केला आहे. भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... तिथे आपापले इगो बाजूस ठेऊन हा धागा लेख वस्तुनिष्ठतेच्या प्रश्नावर फसला आहे हे ईगो बाजूस ठेऊन स्विकारावे अथवा न स्विकारता इथला चुकीचा तुलनेचा गोलपोस्ट सांभाळत ही का असेना दुसर्‍या रचनात्मक चर्चेत सहभागी का होता येणार नाही ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/16/2018 - 13:44 नवीन
माहीतगारसाहेब डोंट माइंड, पण आपल्याइतके सुसंगत, विषयाच्या परफेक्ट चाकोरीतून जाणारे, व्याकरणदृष्ट्या, राजकीय, सामाजिक, वैज्ञानिकदॄष्ट्या परफेक्ट वाचायचे असते तर मिपावर कशाला आलो असतो? मिपा हा कट्टा आहे, जड विचारवंतांचा अतिजड शब्दातला बोजड परिसंवाद नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 04/16/2018 - 13:46 नवीन
साहेब परिसंवाद हरला आहे हे मन मोकळ्या मनाने स्विकारुन द्राक्षांना आंबट म्हणायचे सोडून चर्चा तुलने सोडून कन्स्ट्रक्टीव्ह सुधारणांकडे न्यावी
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/16/2018 - 13:52 नवीन
कन्स्ट्रक्टिव्ह सुधार्णा अशा प्रकारच्या परिसंवादातून कशा निर्माण होतात आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात कितपत परिणाम होतो ह्याचे सध्याच्या बघण्यातले एखादे दुसरे उदाहरण दिले तर फार आभारी राहीन साहेब. उदाहरणांसाठी आगामी धन्यवाद. पटणार्‍या उदाहरणांचा उल्लेख न करुन, न पटणार्‍या उदाहरणाकडे दुर्लक्ष करण्याचा हक्क राखून ठेवित आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 04/16/2018 - 13:29 नवीन

Very Shameful
These pictures are taken at Istanbul Airport. @narendramodi@RahulGandhi pic.twitter.com/WAqmVauqgh

— D The Praveen (@d_9249) April 16, 2018
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 04/16/2018 - 13:44 नवीन
हे असले उद्योग कन्स्ट्रक्टीव्ह नाहीत , पाकीस्तानसारखे शत्रुरास्।ट्र उत्साहात असे टि शर्ट तयार करुन वाटेल आणि असे टिशर्ट असे टि शर्ट दुसर्‍या देशांबद्दलही तयार करुन भारतीयांना वितरीत करता येतील . कन्स्ट्रक्टीव्ह चर्चेच्या धाग्यात चर्चेचे आवाहन अहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/16/2018 - 17:37 नवीन
धागा लेखिकेच्या भावना समजू शकतो. हा अत्यंत घृणास्पद व गंभीर गुन्हा घडला आहे. या गुन्हेगारांना फाशीच शिक्शा सुद्धा सौम्य ठरेल. या प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. त्याचे कारण आपली अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर न्यायव्यवस्था आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 04/16/2018 - 17:52 नवीन
त्याचे कारण आपली अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर न्यायव्यवस्था आहे.
ऊपाय योजना ?
या गुन्हेगारांना फाशीच शिक्शा सुद्धा सौम्य ठरेल.
फाशीच्या पुढे काय काय शिक्षा वाढवता येतील ?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 04/16/2018 - 18:14 नवीन
पुरुषांची मानसिकता एका रात्रीत बदलणार नाही. कदाचित ह्या बातमीत दाखविल्याप्रमाणे उपाय केले तर काही होऊ शकेल. राज्यात आणि केंद्रात १००% स्त्रियांचं सरकार आणावं. आपल्या लोकसंखेच्या जवळपास ४८-४९% स्त्रिया आहेत. शिवाय त्यांना सपोर्ट करणारे ५-२५% पुरुष सहजच मिळू शकतील. स्त्रियांना स्त्रियांचं दु:ख चांगल्या प्रकारे कळत असं म्हणतात त्यामुळे काही सुधारणा होऊ शकेल. आणि हो, हे सगळे होईपर्यंत सगळ्या पुरुषांनी घराबाहेर पडताना गॉगल घालणे बंधनकारक करावे, कमीतकमी स्त्रियांना वाईट नजरांचा सामना करावा लागणार नाही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/19/2018 - 15:27 नवीन
शेवटच्या वाक्यासाठी सहमती
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/16/2018 - 18:45 नवीन
चर्चा ही भारतातली स्त्रियांची सुरक्षितता ह्या सर्वसाधारण मुद्द्यावर होती. आणि माझं मत काय आहे हे मी विस्ताराने वर लिहिलं आहे. एक दोन मिनिटांसाठी भारतीय असणं, पुरुष किंवा स्त्री असणं विसरून विचार केला तर घडलेल्या घटना कोणत्याही व्यक्तीला हादरवून टाकतील इतक्या क्रूर आहेत. मला वाटतं त्याचं गांभीर्य मिपाच्या स्वभावाप्रमाणे धागा पुढे गेला तर नक्कीच हरवून जाईल आणि धागा स्त्री वि पुरुष, भारत वि अमेरिका वगैरे नेहमीच्या मुद्द्यावर घसरेल. किमान मला त्यात पडण्याची इच्छा नाही. मुद्दाम ओढल्या जाण्याची तर अजिबात नाही. माझ्या कडून संपूर्ण चर्चेस इथेच पूर्णविराम. जे घडलं त्याच्या उद्वेगातून स्त्रिया बोलणार हे सत्य आहे. लेख त्याच भावनेतून आला आहे. किमान त्याचा आदर केला जावा इतकीच इच्छा.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 04/16/2018 - 18:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/17/2018 - 00:05 नवीन
आक्षेप या वाक्याला आहे - मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'. यातून एका अडनिड्या वयातल्या शाळकरी मुलीच्या मनात काय प्रतिमा निर्माण होत असेल? एक स्त्री म्हणून तुम्हाला आलेली उद्विग्नता मान्य आहे पण म्हणून संपूर्ण देशाला आणि पर्यायाने समस्त भारतीय पुरुष स्त्रियांवर अत्याचार करतात असं चित्र उभं करण्यावर आक्षेप आहे. भारतात किती परदेशी पर्यटक दर वर्षी येतात याचे स्टॅटिस्टिक्स या रिपोर्ट मध्ये आणि या बातमी मध्ये बघा. रिपोर्ट प्रमाणे ८-१० मिलियन परदेशी लोक भारतात दर वर्षी येतात. यात अगदी ३०-३५ टक्के स्त्रिया धरल्या तरी या सगळ्या स्त्रियांवर बलात्कार होतात काय? जरा इंटरनेट वर ट्रॅव्हल ब्लॉग्स धुंडाळलेत तरी सोलो फिमेल ट्रॅव्हलर्सचे भारतातले अनुभव वाचायला मिळतील. काही अपवाद वगळता बहुतेक स्त्रिया म्हणतात की त्यांना चांगला अनुभव आला आहे. अर्थात टॅक्सीवाले फसवतात किंवा गाईड मागे लागतात हे आहेच पण ते बहुतांशी आर्थिक फायद्यासाठी असतं. या स्त्रियांच्या मते लोक त्यांच्याकडे बघत बसतात किंवा त्यांच्याबरोबर फोटो काढायला येतात, पण त्यात त्या स्त्रियांना फार काही वावगं वाटत नाही. अर्थात बार किंवा पब मध्ये गेल्यावर सावध राहावं असा सल्ला पण या स्त्रिया देतात. पण बार/ पब सारख्या ठिकाणी हे प्रकार तर कुठल्याही देशात घडतात. इतर ठिकाणी होणाऱ्या sexual abuse बद्दल नुकतेच झालेले #metoo campaign बघा. अमेरिकेसारख्या देशात हायस्कुल आणि कॉलेजमध्ये एकदा जाऊन बघाच. या देशांमध्ये तरी सेक्स हा taboo मानला जात नाही तसेच स्ट्रीप क्लब वगैरेसारख्या ठिकाणी लोक्स हौस भागवून घेऊ शकतात तरीही बलात्काराचे, कुमारी मातांचे तसेच अल्पवयात झालेल्या लैंगिक आजारांचे स्टॅटिस्टिक्स बघा. बाकी देशांची तुलना होणं स्वाभाविक आहे कारण धागालेखिका दुसऱ्या देशातील मुलीला भारताबद्दल सांगत आहेत. बरं कौतुक कशाचं तर दगडाने ठेचून किंवा हात पाय तोडून मारतात याचं? तिथे तर स्त्रीने बलात्कार झाला हे स्वतः सांगून मानत नाहीत, त्यासाठी २ पुरुषांची साक्ष लागते. वर ती सिद्ध करू शकली नाही तर दगडाने ठेचून मरण तिच्या वाट्याला पण येऊ शकतं. त्यामुळे असं सरसकट विधान करण्यापेक्षा त्या मुलीला खालील प्रमाणे सांगणं उचित ठरलं असतं - - भारतात बहुतेक सर्व ठिकाणी गर्दी असते, त्यामुळे चुकामुक होण्याची शक्यता आहे. तरी सतत आपल्या कुटुंबाबरोबर रहा. - आईवडिलांना सोडून एकटं कुठेही जाऊ नकोस. - प्रवासात अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या गोष्टी स्वीकारू नकोस/ खाऊ नकोस. - जर आपल्या कुटुंबाबरोबर चुकामुक झालीच तर काय करावं. या आणि अश्या सारख्या सूचना दिल्या असत्या तर योग्य ठरलं असतं. भारतात सगळं आलबेल आहे असं मुळीच म्हणणं नाहीये पण म्हणून अगदी सरसकट सगळ्या मुलींवर बलात्कार होतात किंवा सगळे पुरुष वासनांध आहेत आणि संधी मिळेल तेव्हा लैंगिक अत्याचार करतात हे सांगणं पण चुकीचंच आहे. माझ्या आधीच्या प्रतिसादात युरोपात आणि अमेरिकेत घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्याचं कारण हेच होतं की स्त्रियांवर अत्याचार या प्रगत देशातही होतातच. अमेरिकेत तर इतकी मस्त गोंडस लहान मुलं दिसतात सहज नुसता गालाला हात लावायची इच्छा होते. पण नुसतं बोट जरी लावलं तरी पेडोफाईल म्हणून तुमच्यावर संशय घेतला जातो. हे काय अकारण होतं का? तशी लोक होती आणि आहेत म्हणून तर असे कायदे बनवलेत. पण म्हणून काय अश्या लोकांची संख्या आणि असे गुन्हे कमी झाले का? तुमच्या आसपास कुठले गुन्हे घडले आणि किती गुन्हेगार राहतात याची माहिती देणारी मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. न्यू यॉर्क, जर्सी सारख्या भागात पहिल्यांदा जेव्हा मी ऍप डाऊन्लोड केलं तेव्हा मला धक्का बसला. बरं अमेरिकेत तर काय गन सहज मिळते आणि वापरता येते. पण म्हणून अजून तरी कुठल्या अमेरिकनाने त्याच्या देशात फिरायला येऊ पाहणाऱ्याला माझा देश असुरक्षित आहे आणि तू येऊ नकोस असं सांगितल्याचं ऐकिवात नाही. इंग्लंड मधली उदाहरणं दिली आहेत, संपूर्ण एका काउंटी मधल्या वय ८ ते ५० मधल्या एकूण एक मुली/ स्त्रिया लैंगिक अत्याचाराच्या बळी आहेत. नुसता एकदा एका नराधमाने केलेला बलात्कार नाही, तर वर्षानुवर्षे सतत होणारे गँगरेप आणि त्यातून या मुलींना लावलेली ड्रग्सची सवय. जवळपास १५ वर्ष हे चालू होतं आणि पोलिसांनाही माहित असून त्यांनी काही केलं नाही. कुठल्या ब्रिटिश व्यक्तीने, वर्तमान पत्राने किंवा न्यूज चॅनेलने ब्रिटन महिलांसाठी धोकादायक आहे असं सरसकट विधान केलं? या उलट निर्भयाच्या केसच्या वेळेला BBC ने India's Daughter प्रसारित केली. या अश्या घटना जश्या उद्विग्नजनक आहेत त्याचप्रमाणे अश्या घटनांचा कुठल्यातरी अजेंड्यासाठी होणारा वापरसुद्धा उद्विग्नजनक आहे. तुम्ही तसा वापर करताय असं म्हणणं नाहीये पण या अश्या विधानांनी त्या अजेंड्याला पुष्टी कशाला द्यायची?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 04/17/2018 - 04:35 नवीन
बहुतेक मुद्द्यांशी सहमत!!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/17/2018 - 06:28 नवीन
एक अनुभव -- एका तरुण बलात्कारित मुलीची तपासणी करण्याचा प्रसंग. तिला बेदम मारहाण करून तिच्या वर बलात्कार झाला होता त्यामुळे तिच्या पोटातील अवयवांना काही इजा झाली आहे का हे तपासण्यासाठी सोनोग्राफी करत होतो. त्या दुर्दैवी मुलीशी बोलताना किंवा तिच्या यावर उपचार करताना लक्षात आलेला एक अतिशय महत्त्वाचा फरक असा आहे. तिच्या बरोबर असणारी स्त्री डॉक्टर आणि नर्स तिच्याशी अतिशय जवळीकीने वागत होत्या आणि त्याच इतर पुरुष डॉक्टरांबरोबर "थोड्याशा" विचित्र वागत होत्या. या वागण्याचे विश्लेषण स्वतःशी करत असताना एक लखलखीत सत्य माझ्या समोर आले ते म्हणजे

प्रत्येक स्त्रीच्या मनात "आपल्यावरसुद्धा" केंव्हाही बलात्कार होऊ शकतो हा विचार असतो. हा विचार ८ ते ८० वयाच्या स्त्रीमध्ये कायम असतोच.

या विचारामुळेच कदाचित अशा मुलीशी अतिशय सहानुभूतीने ( सह + अनुभूती) वागत होत्या. त्याच जागी माझ्या मनात असा कोणताच विचार( आपल्यावरसुद्धा" बलात्कार होऊ शकतो ) नव्हता त्यामुळे मी तिला दाखवत होतो ती एक "कणव" म्हणता येईल. व्याख्येप्रमाणे "सहानुभूती" म्हणता येणार नाही. अशा प्रसंगी स्त्रिया या "आपण आणि ते (पुरुष) असा भेदभाव नैसर्गिक रीत्या करत होत्या. याबद्दल वाचन करत असताना असाच अनुभव पाश्चात्य देशातील अनेक पुरुष डॉक्टरांना आल्याचे वाचनात आले. या धाग्यावर मला हा फरक परत एकदा स्पष्टपणे जाणवतो आहे. स्त्रिया बलात्काराबद्दल आणि एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूती ने लिहीत आहेत. त्यात परत आपण आणि ते( पुरुष) यातील फरक जाणवतो आहे. येथे आपला बाप भाऊ आणि मुलगा याबद्दल भवन कशा व्यक्त कराव्या याची शंका दिसते आणि पुरुष "कणव" असल्याने लिहीत आहेत. त्यात भावनाप्रधानता कमी आणि वस्तुनिष्ठता जास्त जाणवते. पहा विचार करून परत एकदा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 08:59 नवीन
स्त्रिया बलात्काराबद्दल आणि एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूती ने लिहीत आहेत.
डॉक्टर , काल पिरा ताई सोबतच्या चर्चेत वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे केवळ मन मोकळे करण्याच्या गरजेचा अनुभव आला , ज्यात परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याही सोल्युशन्सची त्यांची अपेक्षा नसते , आणि पुरुष मंडळी सहसा सोल्युशन्स शोधण्यावर भर देतात . मन मोकळे करणे संताप व्यक्त करणे, एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूतीने व्यक्त होणे या कशा बद्दलच आक्षेप नाही . पण त्यासाठी वास्तुनिष्ठतेशी फारकत करण्याची काय जरुरी आहे . धागा लेखिके साहित काही जण आले पिंक टाकल्यासारखे निव्वळ सहानुभूती दाखवणे औपचारिकतेसारखे पूर्ण करून गेले . आपण पॉलिटिकली करेक्ट लिहिले कि संपले , नसता झमेला कशाला ? वाला हा एटीट्युड नाहीना याची बर्याच ठिकाणी शंका आली . स्त्रीची स्त्रीला अमुक कारणाने सहानुभूती असते असे आपण म्हणता , भारताचे क्षण भर बाजूस ठेऊन बॉईज टॉक करणाऱ्या ट्रम्प महोदयांना स्त्रियांची मते कशी मिळतात ? अमेरिकेत कुणासही काहीही बोलले तरी त्यांची पहिली घटना दुरुस्ती १०१ टक्के भाषण स्वातंत्र्य म्हणजे वाईट संभाषणाचे स्वातंत्र्यही देते , कुणी स्त्रीस अपशब्द बोलले तर त्या बद्दल न्यायालयात दाद मिळण्याची कायद्यात काहीच व्यवस्था नाही , त्या मुले ट्रम्प किंवा अजून कुणी काही बोलले तर कायद्यात व्यवस्थेचा अभाव आहे . आता भारतात येऊ अमेरिकेचे गुणगान करणारी मंडळी या बाबत आपल्याकडे विशेष कायदा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा वेळी मर्यादाही अंशतः का होईना उपलब्ध आहेत . आणि हा कायदा वापरता येतो हे सोईस्कर विसरू इच्छितात . भारतात महिला आयोग आहेत , राष्ट्रपती ते पंतप्रधान सर्व राजकीय पदावर थोड्या फार प्रमाणात का होईना महिला येऊन गेल्या आहेत . सध्या ज्या केसबाबत गवगवा होतो आहे तिथे हि मुख्यमंत्री एक महिलाच आहे. अमेरिकेत अद्याप एक हि महिला अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकलेली नाही . एवढेच नाही अमेरिकी संसदेच्या स्त्री स्थानिक स्वराज्य संस्थात ३३ टक्के आरक्षण आहे . संसदेत स्त्रियांना आरक्षण मिळावे म्हणून मतदार पातळीवरून दबाव टाकण्याचा किती स्त्री संघटनांनी प्रयत्न केला आणि किती स्त्रियांनी साथ दिली असेल. या सर्व दूरच्या गोष्टी आहेत . मी स्वतः: स्त्री विषयक कायद्याबद्दल किंवा अगदी स्त्रियांसाठी कॉपीराईट अशा विषयावर लिहिले आहे. - तेथील चर्चेत महिलांनी सहभाग धागा लेखक पुरुष आहे म्हणून टाळणे हास्ययास्पद ठरणार नाही का ? माझे लेखन क्लिष्ट असल्याची तक्रार असते पण कमीत कमी प्रयत्न तर केला . ( एका धाग्यात आदिवासी स्त्रीवर झालेल्या सामूहिक अत्याचारा बद्दल मी स्वतः लिहिले , संबंधित आदिवासी स्त्री दुसरा विवाह करू इचछीत मुस्लीमा सोबत पळून गेलेली आहे हे माहीत असूनही तिच्या त्या निवडी बद्दल तिला घरणास्पद शिक्षा देणे आणि त्या पुरुषी वागण्याचे त्या गावातील स्त्रियांकडून कड घेतली जाणे चुकीचेच वाटले . टीकाकारताना त्या अत्याचार भोगलेल्या स्त्रीचा मित्र मुसलमान आहे का अजून कोण हा विचार डोक्यातही आला नाही आणि त्या धाग्यात मी उल्लेखही केला नाही , पण पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव असोत अथवा स्त्रियांची बाजू फक्त स्त्रियाच घेऊ शकतात याचे पोकळ प्रदर्शन करणारे असोत त्यांना काही सोयर सुतक दिसत नाही ) मी स्त्री आहे , या धागा लेखाची लेखिका स्त्री आहे म्हणून आम्ही तिची बाजू घेतो , हे वरकरणी आकर्षक दिसणारे गृहीतक आहे . याझिदी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारां बद्दल मी लिहितो तेव्हा त्या अत्याचार झालेल्या स्त्रियांबाबत आपल्याला म्हणजे स्त्रियांना सहानु भुतीची गरज नाही कारण याझिदी स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल लिहिणारा पुरुष आहे , कोणते लॉजिक आहे हे ? आम्ही ओमान , गल्फ किंवा युरोमेरिकेत होणाऱ्या स्त्रीवरील अत्याचाराबाबत उल्लेख करतो ते, पुरुषांनी लिहिले म्हणून ते अत्याचार झेलणार्या स्त्रिया नसतात कि भारता बाहेर च्या असल्यामुळे त्यांच्या वेदना कमी असतात ? दहा पुरुष आले भावनेच्या भरात वस्तुनिष्ठ नसलेल्या पिंका टाकून गेले स्त्रियांना चालते का ? मग त्यांनी त्यांच्या वस्तुनिष्ठता साशंकित आहेत तिथे इतरांनी तडजोड करावी अशी अपेक्षा पुरुषांसाठी असणे नसणे दूर ठेवा . सुरक्षे ऐवजी भीतीच्या वातावरणाची निर्मिती स्त्रियांसाठी योग्य आहे का ? किमान याचा विचार करून काही कंस्ट्रक्टिव्ह विचार विमर्षातही सहभागी होण्यास तयार असू नये याचे आश्चर्य नाही कारण प कारण बर्याचदा पुरुषाचे दृष्टिकोन स्त्रियांपेक्षा अधिक पुरोगामी असू शकतात हे असंख्य वेळा सिद्ध झालेले असावे. असो. इराण मधील अन्याझ ऐनी सायरस हिचा इराण मध्ये तिला कोणत्या दिव्यातून जावे लागले या बद्दलचा व्हिडीओ पण येथील काहींच्या लेखी त्यांच्या वेदना वेदना नसाव्यात कारण त्या भारतीय नाहीत .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 09:05 नवीन
इराण मधील अन्याझ ऐनी सायरस हिचा इराण मध्ये तिला कोणत्या दिव्यातून जावे लागले या बद्दलचा व्हिडीओ पण येथील काहींच्या लेखी त्यांच्या वेदना वेदना नसाव्यात कारण त्या भारतीय नाहीत .
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/17/2018 - 09:33 नवीन
वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे केवळ मन मोकळे करण्याच्या गरजेचा अनुभव आला , ज्यात परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याही सोल्युशन्सची त्यांची अपेक्षा नसते , आणि पुरुष मंडळी सहसा सोल्युशन्स शोधण्यावर भर देतात .
कुडंट एग्री मोअर.. इन जनरल स्त्रियांना सॉल्यूशन नको असतं, फक्त काहीही न बोलता ऐकणारा "लिसनर" हवा असतो. Sad but true...
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 11:21 नवीन
सॉरी आपल्या खालच्या प्रतिसादात डिस अ‍ॅग्रीमेंट होता ना हे अ‍ॅग्रीमेंट पाहिले नव्हते . प्रतिसादासाठी अनेक आभार
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/19/2018 - 15:30 नवीन
लय राडा होउ शकतो या वाक्यामुळे =))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/17/2018 - 11:00 नवीन
पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव असोत अथवा स्त्रियांची बाजू फक्त स्त्रियाच घेऊ शकतात याचे पोकळ प्रदर्शन करणारे असोत त्यांना काही सोयर सुतक दिसत नाही
माहीतगारजी आपण अद्याप सुतकात असलात तर ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायची कृपा करावी अथवा अभ्या पिंक टाकतो हा आरोप मागे घ्यावा हि नम्र विनंती. https://misalpav.com/comment/991489#comment-991489
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 11:18 नवीन
...पटणार्‍या उदाहरणांचा उल्लेख न करुन, न पटणार्‍या उदाहरणाकडे दुर्लक्ष करण्याचा हक्क राखून ठेवित आहे.
या वाक्याचे दोन दिशांनी वेगवेगळे अर्थ निघू शकतात.
.....कन्स्ट्रक्टिव्ह सुधार्णा अशा प्रकारच्या परिसंवादातून कशा निर्माण होतात आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात कितपत परिणाम होतो ह्याचे सध्याच्या बघण्यातले एखादे दुसरे उदाहरण दिले तर फार आभारी राहीन साहेब.
ह्या वाक्याचा सर्वसाधारण कल पुर्व गृहीत होत नाही असा आहे . आज चांगले लेख सोशल मिडीयावर सहज फॉर्वर्ड होऊ शकतात. आजचीच कुणाचि पोस्ट आहे ' आंब्याची पारख कशी करावी या संदर्भातला लेख सोशल मिडीयावर फिरत असल्याची. अजून एक उदाहरण सामाजिक - राजकीय विवाद टाळायचा म्हणून उल्लेख करत नाही , पण मी मिपावर अभ्यासपूर्ण पणे प्रथमच संकलीत केलेली माहिती गैरसमज दूर करण्यासाठी वापरली गेलेली स्वतः पाहिली आहे. स्गळ्यात महत्वाचे सकारात्मक दृष्टीकोण . आणि सकारात्मक दृष्टीकोण नसेल तर समजा मी म्हणतो तशी रचनात्मक सुधारना नाही सुचवल्या आणि केवळ भावनाम्चे प्रदर्शन केले तरी शेवटी साध्य काय आहे ? पुढच्या अत्याचारानंतर आधीच्याच प्रतिक्रीया कॉपीपेस्ट मारायच्या ? मधल्या काळात काही सुधारणेची इच्छा हवी की नको . एनी वे आपली आणि अंतरा आनंदाम्ची न्याय व्यवस्थे बाबतची रचनात्मक चर्चा आवडली गेलि आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 04/17/2018 - 08:22 नवीन
खरे डॉक्टर,
आणि पुरुष "कणव" असल्याने लिहीत आहेत. त्यात भावनाप्रधानता कमी आणि वस्तुनिष्ठता जास्त जाणवते.
अगदी अगदी. याचं कारण म्हणजे बलात्काराच्या घटना ऐकल्या की पुरुषांचा कल ती समस्या सोडवण्याकडे असतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
झ
झेन Tue, 04/17/2018 - 08:39 नवीन
वारंवार घडणा-या या प्रकारच्या घटना मनाला अत्यंत क्लेश देतात. यात पीड़ित कोण आहे आणि देश कुठला आहे यानि काय फरक पडतो व्यक्ति तर माणूसच आहे. पण या परिस्थित मी काय करू शकतो. कैंडल घेवून मोर्चात जावू की whatsaap चा DP बदलू की सोशल मिडिया वर राग व्यक्त करू ? "मी माझ्या कुटुम्बामधले पुरुष, स्त्री कड़े वस्तु म्हणून बघणार नाहीं हे आणि कुटुम्बातली स्त्री, स्वत: वस्तू बनुन गैरफायदा घेणार नाहीं/घेवू देणार नाही याची खात्री करेन. मला नाहीं वाटत हे अवघड आहे कारण मी माणूस असल्याने स्वत: हे नैसर्गिकपणे पाळतो कुणावर उपकार करत नाही." नुसतं “metoo” म्हणून प्रश्न सुटणार नाहीं आणि दुस-याकडे बोट दाखवून मी जबाबदारी टाळू शकत नाही. बाकी “तुमच्या देशात” नी होणारी सुरवात आणि “दरवाजे लावून बसण्याचा” शेवट फ़क्त दुस्र्याकडे बोट दाखवून आपली उद्विग्नता दाखवणे वाटते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 04/17/2018 - 09:48 नवीन
"मी माझ्या कुटुम्बामधले पुरुष, स्त्री कड़े वस्तु म्हणून बघणार नाहीं हे आणि कुटुम्बातली स्त्री, स्वत: वस्तू बनुन गैरफायदा घेणार नाहीं/घेवू देणार नाही याची खात्री करेन. मला नाहीं वाटत हे अवघड आहे कारण मी माणूस असल्याने स्वत: हे नैसर्गिकपणे पाळतो कुणावर उपकार करत नाही."
आवडले. यानंतर आपल्या मुलग्यांना स्त्रियांशी माणूस म्हणून वागायला शिकवणे आणि मुलींना स्वसंरक्षणाचे मार्ग शिकवणे हे झाले पाहिजे. एखादी दुर्दैवी घटना तरीही घडली तर ती लपवून, त्यावर पांघरूण न घालता संवाद झाला पाहिजे. प्रत्येक घरात, नात्यात संवाद असला पाहिजे हे महत्त्वाचे आहे. आरोपीना तत्काळ फाशी द्या म्हणून मोकळे होउन आपण आपल्या कामाला लागतो. कोणी असा विचार करत नाही की एखाद्या निरपराधाला त्यात शिक्षा होउ नये. एकांगी कायदे झाले आणि त्याचा फायदा घेऊन उद्या कोणी तुमच्या मुलाला अडकवले तर त्याला फाशी द्या म्हणून तुमच्याकडून मागणी होईल का? या धाग्यावर सुरुवातीला ठीकठाक असलेली चर्चा नंतर आक्रस्ताळी होत गेली. ते अपेक्षित होतेच. धागालेखिकाही सुरुवातीला चर्चेत भाग घेत होत्या नंतर त्या दिसेनाशा झाल्या. कदाचित धाग्याची हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहून असेल. प्रत्येकाने आपल्यापुरते बोला ना! ते आणि आम्ही असे सरसकटीकरण कशाला? मागे दिल्ली बलात्कारानंतर हे म्हटले होते की पुन्हा असे काही घडले की मेणबत्त्या मोर्चे वगैरे होईल आणि पुन्हा सगळे थंड होईल. तेव्हा राजकारणासाठी फायदा उठवणे ही गोष्ट विचारात घेतली नव्हती. आता तेही सगळ्यांकडून पुरेपूर होताना दिसत आहे. न्यायालयांच्या आणि पोलिसांच्या नावे बोटे मोडताना ते किती कमी संख्येने आहेत, त्यांच्यावर किती प्रकारचे किती दबाव आहेत याचा कोणी विचार करत नाही. सगळे जे जसे आहे ते तसे माझे आहे. माझा देश आहे. त्यात कितीही कमतरता असो, वैगुण्य असो. "आम्ही घरात आपसात भांडू पण बाहेरच्यांशी वागताना आम्ही १०५" हे जुने शहाणपण आता लोकांना का आठवत नाही?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 11:30 नवीन
+१ राजकारण्यांचे म्हणाल तर बहुतांश सर्वच राजकीय पक्षात स्थिती वाईट असावी. मी अगदी लहानपणी राज्याच्या गृहमंत्र्याने त्याच्या पाठीराख्यांना पाठीशी घातलेले अनुभवले आहे आणि ती व्यक्ती पुढे गृहमंत्री झाली. अनेक किस्से आहेत कोणत्याच राजकारण्यांची बाजु घेण्यात पॉईंट नाही. ३३ % सम्सदीय आरक्षणासाठी प्र्यत्न करणेही पुरेसे नाही घराणेशाहीला आणि मतदानातील वोट बॅन्क प्रकार बंद व्हावयास हवेत. राजस्थानातील एक व्यक्ती सध्या केंद्रीय मंत्रीपदावर असणे खटकते . पण वोट बॅन्क लूज न करणे प्रत्येक पक्ष करत आला आहे. मला वाटते हा विषय सिंहासन या सुपरिचीत मराठी ग्रन्थातही चर्चीत आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 11:31 नवीन
* ती व्यक्ती पुढे मुख्यमंत्री झाली.
  • Log in or register to post comments
ज
जूलिया Tue, 04/17/2018 - 11:34 नवीन
+१.............. नूसता भीती, हतबलता, सन्ताप येवून काहिच होणार नाहिये. भावनिक स्वातंत्र्य शिकवणे खूप महत्वाचे आहे. स्त्री नेच स्त्री ला मदत करायला हवी, judgemental न होता.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 04/17/2018 - 11:37 नवीन
स्त्री नेच स्त्री ला मदत करायला हवी, judgemental न होता.
लाख वेळा सहमत. आणि या प्रक्रियेत पुरुषांनी स्त्रियांसोबत खांद्याला खांदा लावून भक्कम उभे राहावे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 04/17/2018 - 11:37 नवीन
+१००००.
  • Log in or register to post comments
N
nanaba Tue, 04/17/2018 - 09:11 नवीन
पुन्हा पुन्हा चुकतेय. धागा स्त्रीचा आहे, म्हनून कुणीच सपोर्ट करत नाहिये. आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर्‍या.नी नमूद केलेली भीती, हतबलता, सन्ताप अनुभवतोय. तुम्ही समस्या सोडवण्यावर चर्चा भारताबाहेरील लेखिका विरुद्ध भारतातील घटना इकडे नेलीत. आअमच्या मनात , आमच्या देशात कुठल्याही क्शणी आम्ही सुरक्शित नाही ह्याब द्दल जे वाटते ते तुमच्या प्॑र्यन्त पोचतच नहिये.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा