तुमच्या देशात....
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....
आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो.-- एक वेळ असे मानून चालू की देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांनी देशात सुधारणा घडवण्यात काहीच हातभार लावला नाही, बर मग तुम्ही देशाला नावे ठेवणार्यांनी देशात सुधारणा घडवायला किती हातभार लावलाय ?