Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तुमच्या देशात....

श
शिव कन्या
Fri, 04/13/2018 - 10:03
💬 212 प्रतिसाद
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं. मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.' मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.' मी दरवाजे लावून बसते. .....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 60073 views

💬 प्रतिसाद (212)
स
सुबोध खरे Tue, 04/17/2018 - 09:27 नवीन
@nanaba आपल्यावर बलात्कार होऊ शकतो हि भीती देशातीत आहे. (जगातील प्रत्येक देशातील स्त्रीच्या अंतर्मनातील असलेली भीती). जिथे जितकी जास्त यौनशुचिता तितकी भीती जास्त. आणि या भीतीतुन ८० वर्षाची स्त्री सुद्धा सुटलेली नाही. म्हणूनच मी ८ ते ८० हे वय लिहिले आहे (अर्थात ८ वर्षापेक्षा लहान मुलीला बलात्कार म्हणजे काय हे समजतच नाही)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 09:48 नवीन
आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर्‍या.नी नमूद केलेली भीती, हतबलता, सन्ताप अनुभवतोय. तुम्ही समस्या सोडवण्यावर चर्चा भारताबाहेरील लेखिका विरुद्ध भारतातील घटना इकडे नेलीत. आअमच्या मनात , आमच्या देशात कुठल्याही क्शणी आम्ही सुरक्शित नाही ह्या ब द्दल जे वाटते ते तुमच्या प्॑र्यन्त पोचतच नहिये.
अहो मॅड म , भारतात होणार्‍या अत्याचारांबाबत मी स्वतः सुद्धा मागे मिपावर लिहिले आहे याचा वर उल्लेख केला आहे ते काय काही ना पोहोचता शो पीस म्हणून लिहिले होते , काही शेंडा बुडुख ? स्त्री समस्या ते कायदे बरेच लेखन आहे माझे मिपावर . - अगदी मेघालयतील स्त्रीला पोषाखावरून दिल्ली क्लब बाहेर काढले ते तृप्ती देसाईंचे आंदोलन चालू असताना शनी मंदिर प्रवेशाची बाजू उचलून धरली आहे ते मनुस्म्र्तीतील स्त्री विषमते बद्दलही आवर्जून लिहिले आहे . तर त्याबद्दलही मी लिहिले आहे -मंदिरात स्त्रियांना पो शाखा सक्ती नसावी वादलो आहे शाखा सक्ती असू नये या बद्दल डॉ खर्यांशी वादलो आहे , आणि स्त्रियांच्या बाजूने मिपावर अनेक वेळा वादलो आहे . स्त्रिया नां जे वाटते पर्यंत पोहोचत नाही ह्या दाव्याला आपल्या कडे नेमके काय आधार आहेत ? दाव्याला काही बूड आहे की नाही ? आणि केवळ भीती घालू नका सुरक्षे बद्दल विचार करा हा रचनात्मक विचार तुमच्या पर्यंत पोहोचतोय कि नाही ? इतर देशातील स्त्रियांच्या वेदना तुमच्या पर्यंत पोहोचतात कि नाही ? माझ्या पर्यंत इतर सर्व देशातील स्त्रियांच्या वेदना पोहोचू शकता असतील तर भारतीय स्त्री बद्दलच्य वेदना पोहोचत नाहीत हा जावई शोध आपण परस्पर कसा काय लावता ? या बद्दल सर्टिफिकेटची माझ्या कडुन अपेक्षेत नेमका पॉईंट काय आहे ? त्या पिरा ताई म्हणतात गुगल शोधून माहिती देतोय पण त्याने परदेशातील वस्तुस्थिती परदेशी स्त्रीच्या वेदनांचे गांभीर्य कसे कमी होते ? बाया द वे माझे ज्ञानकोशीय लेखन वाचन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वाचन अत्यंत जुने आहे . चिलीच्या चर्च मधील स्त्रियांवरील अन्याय हा हा धागा पाहिल्या नंतर वाचलेला नसतो तो आधीच वाचून झालेला असतो . ओमानच्या पोलीस दलाचा मी अतिथी राहून आलेला असतो तरीही त्यान्चे खाल्ले म्हणुन आन्धळी भूमिका घेत नाही. मी पिराताईंना त्या च बरोबर आहेत याचे सर्टिफिकेट कालच दिले आहे ते आपल्या प्रमाणे इतरांनाही ज्यांना हवे त्यांनी घेऊन जावे . असो
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 19:16 नवीन
हे पहा माझ्या धाग्यावर salishi sabha खाप आणि जात पंचायत मी वर उल्लेख केलेल्या पश्चिम बंगाल मधील एका आदीवासी स्त्रीवरील सामुहीक अत्याचाराच्या केसचा उल्लेख केला आहे. त्यावर केवळ पैसा ताईंचा प्रतिसाद आहे. मी उपस्थित केलेल्या प्रतिसादाची तारीख आणि त्याच तारखेच्या आसपास उर्वरीत चर्चेत सहभागी माननीय सदस्यांची नावे पहा. आताचे सोईस्कर मापदंड किती खुजे आहेत आपण कसे केवळ टिव्हीच्य बातम्यांनुसार रिअ‍ॅक्ट होतो हे लक्षात येण्यास फारसा वेळ न लागावा. पण एका माननीय सदस्या महोदयांनी म्हटलेच आहे धागा प्रतिसाद लेखक स्त्री असेल तरच कनेक्ट येतो , अत्याचार झालेल्या व्यक्तींशी देणे घेणे नसावे . अजून कुठे खीस पाडायचा ? असो चालायचेच .
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/17/2018 - 09:37 नवीन
एकन्दरीत भारताबाहेर सेफ जागी पोहोचू शकलेल्या इंडियन ओरिजिन नागरिकांनी आहे तिथेच कायम सेफ राहावं. उगीच भारतात परत येऊन जिवाला जोखमीत टाकू नये असं कन्क्लूजन करता यावं.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/17/2018 - 09:42 नवीन
गवि द ग्रेट. . . . कधीपासून येऊ ट्युशनला?
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Tue, 04/17/2018 - 09:43 नवीन
थेट लिहायचं टाळत होते ते लिहीतेच. माहितगार, गापै आणि इतर काही यांचा सात्विक संताप समजला. कोणतं सोल्युशन शोधताय? स्त्री हे सॉफ्ट टार्गेट आहे, काही प्रमाणात असणार. त्यामुळेच सक्षम राज्य आणि न्यायव्यवस्थेचा तिला आधार वाटतो. लोकशाही देशात ही व्यवस्था नामक काही चीज असते. ती कुठे हरवलीय ते शोधा. कठुआ इथल्या घटनेत वकीलांनी आरोपींवर गुन्हा दाखल होताना घातलेला हैदोस थोर वाटतोय का? का, जगात असंही कुठे कुठे होतं त्याचीही आकडेवारी फेकणार आहात? भले ते निरपराध असतील , मग न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का वकीलांचाच? हे धोकादायक नाही वाटत? आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा निघणे त्यात राज्यातील दोन मंत्र्यांनी सहभागी होणे हे व्यवस्थेचे काय बारा वाजलेत हे दाखवतं आणि माझ्या दृष्टीने हे जास्त भीतिदायक आहे. (प्रकरण फार गाजल्यावर त्यांना राजीनामे द्यावे लागले ते गाजलं नसतं तर या मंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात आजून काय काय केलं असतं?) उन्नावमध्ये पिडीतेच्या वडिलांचाच पोलिस कोठडीत झालेला मृत्यू, हे माझ्या दृष्टीने जास्त धोकादायक आहे. कुठली उदाहरणं देताय? कुठेय ते सुशासन? (भले गेली साठ वर्षही ते विजनवासातच होतं असं मानूया) कुणाची पाठराखण करताय? का, कश्यासाठी? कुठे नेताय विषय? घाणेरड्या गुन्ह्याला, गुन्हा करणार्‍याला राज्यव्यवस्थेत कळीच्या पदावर असणार्‍यांनी पाठीशी घालायचा, उघड गुंडागर्दीच्या जोरावर वाचवायचा प्रयत्न करणं हे फार फार धोकादायक नाही वाटत का? आणि या अश्या गोष्टी माझ्या देशात घडाव्यात हे पुरेसं वेदनादायक नाही का? अश्यावेळी इतर देशातही महिलांवर अत्याचार होतात, उघड खून पडतात ह्याची भली थोरली आकडेवारी वाचून आम्ही मेरा देश महान गाणं गात बसायचं का? गुन्हा हीणकस आहेच पण तो करणार्‍याला निव्वळ गुंडागर्दीच्या जोरावर वाचवणारे जास्त गुन्हेगार आहेत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्याची तीव्रता कमी दाखवण्याचे प्रयत्न करणारेही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 09:51 नवीन
एक मिनीट इथे कुणीही कशाची पाठराखण करत नाहीए . हा गोड गैरसमज डॉक्यातून लौकरात लौकर काढून टाकावा हि नम्र विनन्ती
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 04/17/2018 - 10:21 नवीन
एक मिनीट इथे कुणीही कशाची पाठराखण करत नाहीए .
याला अनुमोदन, वरही मी हेच विचारले आहे कि एखादा (कोणाचाही) प्रतिसाद समर्थनार्थ असेल तर तो दाखवून द्यावा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/17/2018 - 10:44 नवीन
हो ना, आणि सोल्युशन कसले हुडकताय म्हणजे? सक्षम न्यायव्यवस्था हा फक्त सॉफ्ट टार्गेट असल्याने स्त्रियांनाच नव्हे तर सर्वच गरीब, पीडीत, शोषित, पापभिरुंना हक्काचा न्याय मार्ग वाटतो ह्यात वेगळे काही नाही. किंबहुना ह्या सर्वानाच का वाटतो हे महत्त्वाचे आहे. ह्या सर्वांवरचे अन्याय, अत्याचार, शोषण हे काही नवीन नाही पण त्यावरचा मार्ग आपल्यालाच काढावा लागेल ना? न्यायव्यवस्था ही किती सक्षम आहे, ती कशी स्व समर्थ होईल हे पाहणे महत्वाचे आहे. झुंडशाही, अधिकार, पैशाची मस्ती, राजकीय फायदे ह्या सर्वांपेक्षा न्यायव्यवस्था परे असली पाहिजे. उलट ह्या सर्वांना न्यायव्यवस्थेचाच धाक असला पाहिजे. आपापल्या सोयीने कायदा वाकवणारा प्रत्येक जण गुन्हेगारच असतो. लोकशाही, न्यायव्यवस्था, दंडव्यवस्था ह्या काही समाजापेक्षा वेगळ्या नाहीत. भले स्त्रीपुरुषांसाठी काही कायदे वेगळे असतील पण अंतिमतः माणुस हे सर्वोच्च मुल्य मानून कायदे तयार करुन त्याची सर्व निरपेक्ष अंमलबजावणी होणे हेच समाजासाठी हितकर आहे. हे करताना स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, सबल/दुर्बल असा भेद न करता जे आतापर्यंत झालेय ते आपणच केलेय, होतेय त्यामध्ये पण आपला सहभाग होता आणि जे काही करायचेय ते आपल्याहातूनच होणारे इतका विश्वास असला तरी बस्स. तात्पुरता फायदा पाहून स्वताडनापेक्षा कठोर स्वपरिक्षण आणि सुजाणत्व अंगी बाण्वणे व ते आपण जिथे बदल घडवू शकतो त्या येणार्‍या पिढीत जास्त रुजवणे जास्त महत्वाचे आहे. निदान ह्या गोष्टींसाठी तरी स्त्रियांचा रोल खूपच महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Tue, 04/17/2018 - 11:02 नवीन
न्यायव्यवस्था ही किती सक्षम आहे, ती कशी स्व समर्थ होईल हे पाहणे महत्वाचे आहे. झुंडशाही, अधिकार, पैशाची मस्ती, राजकीय फायदे ह्या सर्वांपेक्षा न्यायव्यवस्था परे असली पाहिजे. उलट ह्या सर्वांना न्यायव्यवस्थेचाच धाक असला पाहिजे.
हेच म्हणतेय मी. पण 'इथेही असं होतं तिथेही असं होतं', ह्या सगळ्यामध्ये ही चर्चा भलतीकडेच जाते आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 04/17/2018 - 11:25 नवीन
ती चर्चा कोणीही भलतीकडे घेऊन गेलेलं नाही हे नम्रपणे नमूद करतो. धागाकर्त्याने मुळात भारतात जाऊ नका इथूनच सुरुवात केलेली आहे आणि म्हणून इतर लोक हा भारत आहे म्हणून असे आहे असे नसून इतर देशातही घडते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परत एकदा वरपासून धागा आणि प्रतिसाद (क्रमाक्रमाने) वाचा असे सुचवेन म्हणजे लक्षात येईल कि सगळे मुद्दे कसे एकमेकांशी निगडित आहेत. --------------------------------------- राहता राहिला प्रश्न व्यवस्थेचा, लोकशाहीचा तर मोर्चे काढणारे जोपर्यंत - गुन्हा सिद्ध न झालेल्या आरोपींसाठी लोकशाही मार्गाने मोर्चे काढत आहेत तोपर्यंत त्याला आक्षेप व्यवस्था कोणत्या आधारावर घेईल? कृपया इथे मुद्दा नीट समजून घ्यावा, हे आरोपींचे समर्थन नाही. न्यायालयाने फाशी दिलेल्या, राष्ट्र्पतीने दयाअर्ज फेटाळलेल्या गुन्हेगारांसाठी सुद्धा इथे मोर्चे निघतात आणि ते नक्कीच गैर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पण लोकशाही मार्गाने मोर्चे काढले तर त्रास काय असा प्रश्न विचारला जातो. इथे अजून त्यांचे गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत. ते गुन्हेगार असतील तर ते नक्की सिद्ध व्हावं आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी हि कुठल्याही सामान्य माणसाची मनोमन इच्छा असणारच, याबद्दल शंका बाळगू नये. पण म्हणून कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये हेही व्यवस्थेने पाहणे गरजेचे आहे. गुन्हेगारांच्या कायदेशीर कारवाईत कोणी आड येत असेल तर कायदा त्याची काळजी घेत आहेच. ----------------------------------------- कठोर शिक्षांमुळे समाज बदलेल याबाबत मी वैयक्तिकरित्या साशंक आहे. माझ्यामते तरी प्रत्येकाने स्वतःच्या घरातील स्त्री-पुरुष यांना याबाबीतीत जागरूक आणि सुसंस्कृत करणं हा वर आलेला उपाय जास्त परिणामकारक वाटतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 10:03 नवीन
आणि परदेशातील अत्याचारांवर वेगळी अभ्यासपूर्ण धागा लेख चर्चा आता नक्कीच लावणार आहे .
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/17/2018 - 10:10 नवीन
लावणार आहे .
काय समर्पक शब्दरचना आहे... !!!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 10:13 नवीन
हेच आहे ना , तोंड देखले समर्थ करुन प्रत्यक्षात मनात वेगळे विचार आणावेत नाही का ? चालु द्या !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/17/2018 - 11:27 नवीन
अहो.. विनोदनिर्मितीचा एक क्षीण प्रयत्न करुन पाहिला बस्स. पण तो विनोद चोच वासून उताणा पडला.. इ.मृ.शां.दे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 11:33 नवीन
माझ्या डोक्यावरुन गेले असल्यास क्षमस्व
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/17/2018 - 11:37 नवीन
तुम्ही "अभ्या पिंक टाकतो" ह्या विधानाबाबत अद्याप काही बोललेला नाही आहात.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 11:56 नवीन
१ ) अभ्या नव्हे अभ्याराव म्हटले आहे . आदर यथास्थित आहे . २) पिंक टाकली गेली वाटळ्याचे कारण उपप्रतिसाद देऊन नमुद केले आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 11:57 नवीन
* वाटण्याचे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/17/2018 - 13:13 नवीन
यथास्थित आदराबद्दल धन्यवाद, पण पिंक नव्हती ना ती. जरी तुम्हाला वाटली तरी. त्याचे काय?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/17/2018 - 16:07 नवीन
@अंतरा ताई लोकशाही देशात ही व्यवस्था नामक काही चीज असते. ती कुठे हरवलीय ते शोधा. आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा निघणे त्यात राज्यातील दोन मंत्र्यांनी सहभागी होणे हे व्यवस्थेचे काय बारा वाजलेत हे दाखवतं आणि माझ्या दृष्टीने हे जास्त भीतिदायक आहे. सलमान खान काळवीट प्रकरणापासून ते झोपलेल्या लोकांकर गाडी चालवून त्यांना जीवे मारण्याच्या खटल्यात आरोपी होता तेंव्हा हि असेच मेणबत्त्या लावून बॉलिवूड मधील गणंग आणि उदारमतवादी लोक मोर्चे काढले होते तेंव्हा काही कुणाचा संताप अनावर झाल्याचे वाचले नव्हते किंवा लोकशाहीला खतरा असल्याचे वाचले नव्हते. आणि याच सलमान खान ने याकूब मेमनला पाठिंबा दिला होता हे हि हेच लोक विसरले होते. http://www.india.com/showbiz/salman-khan-defends-yakub-memon-morcha-ouside-salmans-bandra-residence-477904/ https://www.thequint.com/news/india/under-attack-salman-khan-retracts-his-support-for-yakub-memon शेवटी माणसे आपल्याला पाहिजे तोच अर्थ काढत असतात हे खरे. आणि याचा राजकारणी पुरेपूर फायदा घेतात हेही तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 04/17/2018 - 16:35 नवीन
काळवीट प्रकरण आणी सदर अत्याचार प्रकरणाची ग्रॅव्हिटी समान आहे का? घटनेच्या पालनाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी रेपच्या आरोपींना अटक होऊ नये, साधी केसदेखिल रजिस्टर होऊ नये यासाट्।ई मोर्चे काढणे, प्रशासनावर दबाव आणणे हे लोकशाहीला खतरा मध्ये येत नाही का?
असेच मेणबत्त्या लावून बॉलिवूड मधील गणंग आणि उदारमतवादी लोक मोर्चे काढले होते
याचा काही पुरावा? की आपलं असंच ठोकून दिलंत? सदर प्रकरणात हिंदूत्ववादी संघटना आणी जम्मुतील भाजपच्या आमदारांनी जे केलं त्याला सुद्धा समर्थन करायचे असेल तर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.
तेंव्हा काही कुणाचा संताप अनावर झाल्याचे वाचले नव्हते किंवा लोकशाहीला खतरा असल्याचे वाचले नव्हते.
तुम्ही सिलेक्टिव्ह रीडींग करता त्यात बाकीच्यांचा काय दोष? त्यावेळीदेखिल सलमानच्या विरोधात प्रचंड रोष सोशल मिडियात दिसला होता. न्यायालयाच्या निकालातील कमजोर मुद्दे दाखवून देणारे वृत्तांकन कित्येक माध्यमातून झाले होते.
आणि याच सलमान खान ने याकूब मेमनला पाठिंबा दिला होता हे हि हेच लोक विसरले होते.
झालं आणलंत याकुब मेमनला? आता कुठल्याही प्रतिवादाला देशद्रोही ठरवण्याची सोय झाली. नाही?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/17/2018 - 16:53 नवीन
याकूब मेमन ला न्यायालयाने खालील गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले होते आणि ते खालच्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत ग्राह्य धरले गेले होते म्हणूनच त्याला फाशी झाली होती. संशयाचा फायदा सुद्धा न देता ते सुद्धा रात्री ३ वाजता सर्वोच्च न्यायालय चालू ठेवून . Criminal conspiracy to carry out terrorist act and disruptive activities, and murder -- Death Aiding and abetting and facilitating in a terrorist act -- Life imprisonment Illegal possession and transportation of arms and ammunition --- Rigorous imprisonment for 14 years Possessing explosives with intent to endanger lives ---- Rigorous imprisonment for 10 years तेंव्हा याकूब मेमन हा दोषी आणि देशद्रोहीच आहे आणि त्याला पाठिंबा देणारा कोणीही माणूस हा देशद्रोहाच्या गुन्ह्यात सामील आहे असेच मझे स्पष्ट मत आहे. बाकी गुन्ह्यांच्या गंभीरतेचा आणि मोर्चांचा संबंध आपण लावला आहे. आणि तेच बॉलिवूड मधील गणंग तेंव्हा "लोकशाहीला धोका" म्हजणून टाहो फोडत होते त्यांनी तर आता लोकशाही मृत जाहीर करून तिचे श्राद्धहि घालायला पाहिजे. की आपलं असंच ठोकून दिलंत? असंच ठोकून दिलं समजा. http://zeenews.india.com/people/salman-khan-convicted-b-town-celebs-extend-their-support-to-the-superstar-2097027.html https://tribune.com.pk/story/1678105/4-salman-khans-jail-sentence-sends-twitter-users-frenzy/ सध्या त्याला ५ वर्षाची शिक्षा झाली आहे तरी हे बोकड त्याला "SUPPORT"करत आहेत. त्यांच्या दृष्टीने कायदा न्यायालये यांची काहीच किंमत नाही. पैसे हेच सर्वस्व असणाऱ्या संस्थेबद्दल( बॉलिवूड) मला तिळमात्र आदर नाही. In his book Being Salman Khan, journalist and writer Jasim Khan investigates the incident in some detail, but finally decides the only thing bhai is really guilty of is his own bad boy image. Khan the writer offers up several theories to bolster Khan the actor's innocence – Salman has Pashtun ancestors, and ... https://thewire.in/culture/the-toxic-masculinity-of-salman-khan खणलं तर जुनं सुद्धा भरपूर सापडेल पण जाऊ द्या मी वरच म्हटलं आहे कि

शेवटी माणसे आपल्याला पाहिजे तोच अर्थ काढत असतात हे खरे.

  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/17/2018 - 17:01 नवीन
माझ्यापुरता वाद मी इथेच थांबवत आहे कारण मूळ विषय जास्त गंभीर आहे आणि श्री पुम्बा यांच्याशी वितंडवाद घालण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. त्यांचा प्रतिसाद शेवटचा असला तरी चालेल आणि मी चूक आहे असे त्यांनी म्हटले तरी चालेल. माझा अंतरा ताईंना प्रतिसाद एवढाच होता कि असे मोर्चे स्वतःच्या अजेंड्यासाठी निघत आले आहेत. त्याला घाबरून लोकशाही हरवली वगैरे म्हणण्याचे कारण नाही. अफझल तेरे कातिल जिंदा है सारख्या घोषणा भर दिल्लीत देऊनही लोकशाही एक मायक्रॉन सुद्धा हलणार नाही. आपल्या माहितीसाठी लिहीत आहे कि श्री राहुल गांधी यांच्यावर सुद्धा बलात्काराचा आरोप आहे आणि तो समाजवादी पक्षाच्या आमदाराने केलेला आहे आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.श्री राहुल गांधींना अजामीनपात्र गुन्ह्यात अटक का झाली नाही यासाठी मोर्चा काढल्याचे मला तरी आठवत नाही. दुवा पाहून घ्या नाही तर परत म्हणतील असेच ठोकून दिले. https://www.firstpost.com/politics/rahul-gandhi-asks-sc-to-dismiss-baseless-rape-charge-370730.html
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/17/2018 - 18:28 नवीन
डॉक, मायनर करेक्शन ,, शेवटच्या परिच्छेदात क्रियापद आहे एवजी होता असे करुन घ्यावे . (बाकी अमुक एका =कोणत्याही अ ते ज्ञ -पक्षाचे राजकारणी धुतल्या तांदळा सारखे आहेत अशी स्थिती दुर्दैवाने भारतात नसावी असे वाटते असो.)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/17/2018 - 19:47 नवीन
डॉक्टर , हा दुवा सुद्धा वाचून घ्या आणि पुढच्या वेळी आरोप करताना माहिती पडताळून घेत चला .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/18/2018 - 07:09 नवीन
मुनीवर पुढच्या वेळी आरोप करताना माहिती पडताळून घेत चला . आपला दुवा पाहिला श्री राजीव गांधी याना आरोपातून मुक्त केले आहे हे बरोबरच आहे. मीच काय कोणीही सामान्य माणूसच काय अगदी टोकाचा त्यांचा द्वेष्टा असला तरी श्री राजीव गांधी यांनी बलात्कार केला असेल असे म्हणणार / मानणार नाही. मुळात मी आरोप केलेलाच नाही. मी त्यांच्यावर आरोप आहे आणि तो एका आमदाराने केला आहे असेच लिहिलेले आहे. हि माहीती देण्याचे कारण एवढेच कि श्री राहुल गांधींना अजामीनपात्र गुन्ह्यात अटक का झाली नाही यासाठी मोर्चा काढल्याचे मला तरी आठवत नाही. पुरोगामी, समाजवादी साम्यवादी आणि उदारमतवादी याना कुठेही "हिंदुत्व" दिसले कि काही तरी जळल्याचाच वास येतो. आणि
मग भारत कसा असहिष्णू झाला आहे याबद्दल त्यांचा टाहो फोडणे सुरु होते
यावर हि टिप्पणी होती. खाली श्री ट्रेंड मार्क यांनी लिहिलेला प्रतिसाद जसाच्या तसा देत आहे. राहुल गांधी वरही बलात्काराची केस चालू आहे म्हणल्यावर तत्परतेने कोर्टानी बाइज्जत बरी केलंय म्हणून दाखवणारे हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतात की आसिफाच्या घटनेत पण पुजाऱ्यावर फक्त पोलिसांनी आरोप ठेवलेत. पण संपूर्ण देश, समस्त भारतीय पुरुष आणि हिंदू धर्म बदनाम करायला फक्त पोलिसांचे आरोपच पुरेसे आहेत नाही का?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 04/18/2018 - 07:15 नवीन
कायतर गडबड हाय काय? तुमाला राहुल गांधी म्हणायचे असेल बहुतेक. **************************************** प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे यावर स्पष्टीकरण म्हणून त्यांचा दुवा असेल असे घ्या. अर्थात तुमच्या आणि ट्रेडमार्क यांच्या नुसत्या आरोपांवरून केल्या जाणाऱ्या दांभिक प्रचाराच्या मुद्द्याशी सहमत!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/18/2018 - 08:13 नवीन
हो राहुल गांधी च. टायपो बद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 04/17/2018 - 16:47 नवीन
संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या जोरावर कायद्याला आपले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न बार असोशिएशन, हिंदू एकता मंच आणी भाजपाच्या आमदारांनी केला आहे. आज सोशल मिडियावर पाहिले तरी भाजपाचे पेड ट्रोल्स ज्या प्रकारे पिडितेवरच चिखलफेक करत आहेत, आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन करत आहेत, कित्येकजन तर बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करत आहेत ते तीव्र संताप आणणारे आहे. जिकडे तिकडे धर्म घुसडणारे आज इतक्या क्रूर घटनेवर सुद्धा धर्माच्या आधारे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न्म करताहेत. शेम! शेम! शेम!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/17/2018 - 16:56 नवीन
हे आरोप सिद्ध करणारा सज्जड पुरावा आहे का? क्रेडिबल न्यूज चॅनेलची बातमी, एडिट न केलेले व्हिडीओ आणि फोटोशॉप न केलेले फोटो टाका.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 09:36 नवीन
पुरावा मागितल्यानंतर पुंबामहाराज धाग्यावरून गायब झालेले दिसताहेत.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 04/18/2018 - 11:25 नवीन
१.
http://indianexpress.com/article/india/kathua-gangrape-jk-bjp-ministers-support-rally-accused-5136857/
२. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/kathua-rape-two-bjp-cabinet-ministers-quit/articleshow/63752377.cms ३. https://qz.com/1252951/the-kathua-gang-rape-and-murder-is-a-cause-of-celebration-for-some-in-india/ ४. https://www.ndtv.com/india-news/kathua-rape-murder-bandh-called-by-lawyers-supporting-the-accused-in-the-case-1835770 ५. https://timesofindia.indiatimes.com/india/kathua-minor-rape-murder-lawyers-stop-cops-from-filing-chargesheet/articleshow/63687244.cms फेबुवर या विषयीच्या बातम्यांवर येणार्‍या विषारी कमेंट्सची लिंक इथे देऊ शकत नाही. आपण स्वत: पहाल तर रक्त उकळवणार्‍या टिप्पण्ण्या पिडितेबद्दल, तिच्या कुटुंबावर केलेल्या आढळतील. माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की..
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 04/18/2018 - 11:46 नवीन
धार्मिक आणि राजकीय अँगलने बघू नये हेच खरे ,
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 13:26 नवीन
सर्व लिंक्स व त्याखालील प्रतिक्रिया वाचल्या. सर्व प्रतिक्रियांमध्ये या घटनेचा भरपूर निंदा करून गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. मग कोठे आहे पिडितेवरच चिखलफेककरत व आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन? कोठे आहे बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करणारे? कोठे आहेत क्रूर घटनेवर सुद्धा धर्माच्या आधारे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न्म करणारे? जर तुम्हाला वरील लिंक्स मध्ये हे दिसले असतील तर दाखवा आणि ते १) भाजपचा, २) पेड आणि ३) ट्रोल्स आहेत हे सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/19/2018 - 06:31 नवीन
पुराव्यांची वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/20/2018 - 07:12 नवीन
पुंबा, आपला तीव्र संताप ओसरला असेल तर आपण जे आरोप केलेत त्याच्या समर्थनार्थ पुरावे द्याल का? आपण आधी ज्या लिंका दिल्यात त्यात आपण जे आरोप केलेत तसे काहीही आढळले नाही. धन्यवाद. आपला नम्र, श्री गुरूजी
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/23/2018 - 13:35 नवीन
पुंबमहाराजांकडे पुरावे नव्हतेच. तसंही त्यांना बलात्काराची शिकार झालेल्या मुलीविषयी काही देणंघेणं दिसत नाही. फक्त या घटनेचा वापर करून भाजपबद्दल असलेला आपला राग व्यक्त करण्याची संधी साधून घेतली. त्यासाठी अर्थातच भाजपवर खोटेनाटे आरोप करून आगपाखड करावी लागली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 13:40 नवीन
माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की.. बरोबर आहे. पण कोण हिंदू-मुस्लिम करतंय ते दाखवा आणि ते १) भाजपचे, २) पेड व ३) ट्रोल्स आहेत हे तीनही आरोप सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 04/18/2018 - 13:53 नवीन
अशा प्रकारे हे ही प्रकरण टिपिकल मोडवर गेलेले आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. . ठयांकस मोदीकाका, आज नाश्ता सुरेख होता. मिपा मात्र अधून मधून बंद पडू देऊ नकात. थ्यांक्स अ लॉट
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 14:11 नवीन
जेव्हा पुंबा महाराजांनी भाजप, पेड, ट्रोल्स इ. फेकायला सुरूवात केली, तेव्हा हे होणारच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/17/2018 - 17:06 नवीन
आज सोशल मिडियावर पाहिले तरी भाजपाचे पेड ट्रोल्स ज्या प्रकारे पिडितेवरच चिखलफेक करत आहेत, आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन करत आहेत, कित्येकजन तर बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करत आहेत ते तीव्र संताप आणणारे आहे. याला काही पुरावा? का आपलं दिलं ठोकून?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/17/2018 - 22:52 नवीन
ही कठुआची घटना जानेवारीमध्ये घडली, स्थानिक लोक तेव्हापासून निष्पक्ष तपासाची मागणी करत आहेत. कठुआ मधील स्थानिकांचं काय म्हणणं आहे बघा. केस CBI कडे द्यावी म्हणून लोक आधीपासून निदर्शनं करत होते पण आता आवई अशी उठवण्यात आली की बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ लोक निदर्शन करत आहेत. आता ३ महिन्यानंतर अशी काय चक्र फिरली की एकदम सगळ्यांना जाग आली? नवीन बनवलेल्या SIT ने एका पुजाऱ्याला आरोपी केल्यानंतर कलाकारांपासून ते राहुल गांधीपर्यंत सगळे एकदम ऍक्टिव्ह झाले? आश्चर्याची गोष्ट म्हणजे कठुआनंतर लहान मुलींवरच्या तितक्याच घृणास्पद अत्याचाराच्या ६ घटना भारतातच घडल्या आहेत. पण त्यातल्या सुद्धा फक्त युपी मधल्या बातमीवर फोकस केला गेला. बाकी मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल कोणाला फारसं काही वाटलेलं दिसत नाही. याचं कारण काय असावं? असं विचारलं की फक्त सारवासारव म्हणून काहीतरी उत्तर द्यायचं की झालं. पण असिफा सोडून बाकी कुठल्या घटना, त्यात नक्की काय झालं, कोण आरोपी, कोण पीडित हे पण बहुतेकांना माहित नसेल. राहुल गांधी वरही बलात्काराची केस चालू आहे म्हणल्यावर तत्परतेने कोर्टानी बाइज्जत बरी केलंय म्हणून दाखवणारे हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतात की आसिफाच्या घटनेत पण पुजाऱ्यावर फक्त पोलिसांनी आरोप ठेवलेत. पण संपूर्ण देश, समस्त भारतीय पुरुष आणि हिंदू धर्म बदनाम करायला फक्त पोलिसांचे आरोपच पुरेसे आहेत नाही का?
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 04/18/2018 - 11:32 नवीन
On February 15, Chander Prakash along with another BJP leader Lal Singh had participated in a rally organised by right-wing Hindu Ekta Manch to demand the release of a special police officer, Deepak Khajuria, who is accused in the rape and murder case.
हे वाचा. पोलिसास सोडून द्या यासाठी काढलेला मोर्चा होता तो.
https://thewire.in/politics/hindu-ekta-manch-bjp-protest-support-spo-arrested-rape-jammu
हे आरोपी पोलिसाच्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा मार्चबद्दल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 13:35 नवीन
घटना जानेवारीत घडल्यानंतर लगेच बलात्कार व खुनासाठी एका १५ वर्षीय मुलाला अटक झाली होती. त्याचे पुढे काय झाले ते समजलेले नाही. http://m.greaterkashmir.com/news/jammu/15-year-old-boy-accused-of-murdering-kathua-girl-arrested-govt/272787.html
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Wed, 04/18/2018 - 16:23 नवीन
वायर हे घटना ट्विस्ट करून बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही वायर सोडून अजून कोणाच्या बातम्या बघितल्यात? ही बातमी वाचा. तिथल्या लोकल पेपरने दिलेली आहे आणि तुमचा पुढचा संशय फिटवण्यासाठी बातमीदाराचं नाव बघा. हिंदू एकता मंचमध्ये आणि सगळ्या निदर्शनांमध्ये भाजप, काँग्रेस सहित सगळ्या पक्षांचे लोक सामील होते. सगळ्यांची मागणी एवढीच आहे की सीबीआय चौकशी व्हावी. कोणीही गुन्हेगाराला सोडून द्या म्हणून म्हणत नाहीये. त्या देवळाचे फोटो, व्हिडिओ आंतरजालावर उपलब्ध आहेत. फक्त एक खोली असलेल्या देवळाला तीन दारं, त्यातली दोन अर्धी जाळी असलेली, बंद न होणाऱ्या खिडक्या आहेत. कोणाला लपण्यासाठी/ लपवण्यासाठी योग्य जागाही नाहीये. त्यात ३ गावातले लोक रोज सकाळ संध्याकाळ पूजेसाठी आणि दर्शनासाठी येत असताना, त्या मुलीला ३ दिवस देवळात कोंडून ठेवणं आणि अत्याचार करणं कसं शक्य आहे? शेकडो लोकांपैकी कोणालाच ना आवाज आला ना मुलगी दिसली. नंतर त्या मुलीला मारून देवळापासून थोडं दूर आणून टाकलं, ते पण कुठे? तर स्वतःच्याच घरापासून १० फुटावर? म्हणजे एवढं ३ दिवस शेकडो लोकांपासून लपवून ठेवलं आणि मग मृतदेह टाकायची वेळ आली तर स्वतःच्या घराजवळ टाकला? त्यावर कडी म्हणजे आरोपींमधला मुलगा गुन्हे घडले त्यावेळेला कठुआ पासून ११०० किमी दूर परीक्षा देत होता. याचे साक्षीदार प्रोफेसर आणि विद्यार्थी आहेत पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हॉल तिकीट आणि उत्तर पत्रिका दाखवल्या तर दुसरंच कोणीतरी परीक्षा देत होता असा आरोप होतो? यात तुम्हाला काहीच संशयास्पद वाटत नाही? घडलेली घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे, जो दोषी असेल त्याला चौरंगा करून म्हणजे हातपाय तोडून सोडून द्यावे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. फाशी देऊन एवढं पटकन यातनांतून सुटका का करावी? पण निष्पक्ष तपास होऊन गुन्हेगार कोण हे तर सिद्ध होउ दे. त्याच्या आधीच संपूर्ण देश आणि हिंदू धर्माला/ लोकांना बदनाम का करताय?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 16:31 नवीन
जानेवारीत घटना घडल्यानंतर लगेचच एका १५ वर्षीय मुस्लिम मुलाला पकडले होते. नंतर तपासणीत त्याचे वय १९ असल्याचे दिसले होते. त्या मुलाचे पुढे काय झाले ते अजून समजले नाही.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 04/17/2018 - 13:39 नवीन
एवढी चर्चा इथे करण्यापेक्षा माहितगार यांनी भारत हा स्त्रियांसाठी अवघड बनत चाललाय यावर काहीच प्रतिक्रीया दिलेल्या नाहीत याचं आश्चर्य वाटतं. (मी तीथेही व्यक्त होणारच आहे.) केवळ 5-6 प्रतिसाद आहेत त्यावर.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 04/17/2018 - 19:14 नवीन
अलिकडे बलात्कारांच्या संख्येत आणि त्यातील निर्घृणपणात जी वाढ झालेली दिसून येत आहे, त्यामागचे एक महत्वाचे कारण जे असावे असे वाटते, त्याकडे फारसे कुणी लक्ष दिल्याचे दिसत नाही. हल्ली प्रत्येकाच्या खिशात मोबाईल, त्यात अगदी स्वस्त इंटरनेट आणि त्यामुळे केंव्हाही, कुठेही, कितीही पोर्न बघण्याची झालेली सोय, यामुळे शाळकरी मुलापासून ते तथाकथित थोर आदरणीय स्वामी बापू इ. पर्यंत पुरुषांमधील बेछूट सुटलेली कामांधता ... हे एक महत्वाचे कारण असावे. काट्याने काटा निघतो तसे आधुनिक तंत्राज्ञानानेच यावर मात करण्यासाठी सरकारने नेट संबंधी जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणे अगत्याचे आहे. भलेही यामुळे तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आल्याची हाकाटी पिटली जावो.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 04/17/2018 - 19:47 नवीन
सरकारने नेट संबंधी जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणे अगत्याचे आहे. नका हो असा अत्याचार करू ,'त्या'साठीच तर अनलिमिटेड नेटपॅक घेतो की राव आम्ही. जियो और जिने दो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा