तुमच्या देशात....
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....
शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो.हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही. एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ? प्रत्येक प्रवासी/अनिवासी व्यक्ती, प्रवास/वास्तव्य करत असलेल्या देशात, आपापल्या देशाची अनधिकृत (unofficial) प्रतिनिधी असते. तिच्या वागण्या-बोलण्यावरून इतरांच्या मनात तिच्या देशाची भली-बुरी प्रतिमा तयार होत असते. या जबाबदारीची जाणीव असणे ही सुजाण नागरीकत्वाची खूण आहे.आरोपी कोणीही , कुठल्याही धर्माचे, पक्षाचे असो तरी कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तीही जलदगतीने निकाली निघाली पाहिजे हीच मनापासून इच्छा.
नाखु पांढरपेशाI live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead.तुमची गल्ली पार चुकली आहे (पक्षी: मुद्दा ध्यानात आलेला नाही) हे खेदाने सांगत आहे. बालकांवर अत्याचार आणि तेही लैंगीक अत्याचार असलेल्या निर्घृण गुन्ह्याचे समर्थन होऊच शकत नाही, याबद्दल इथेतरी कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. अश्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कायद्यांत अनुकरणीय (exemplary) शिक्षेची तरतूद करावी असे मला स्वतःला वाटते. याशिवाय, धर्म हा मुद्दा तर इथे तरी, एखादा चुकार प्रतिसाद सोडता, तुम्हीच इतक्या टोकाच्या स्वरूपात अध्याहृत धरून घुसवलेला आहे ! तुमच्या ध्यानात आले नसले तर... मुख्य मुद्दा असा आहे की, "एखादा गुन्हा घडला म्हणून सगळ्या देशाला वेठीस धरण्याचा आणि सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, असे म्हणणे चूक आहे." कारण तसे करणे, देशाची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) बदनामी होईल इतपत अतिशयोक्ती करणे होते. जणू काय, त्या मुलीने "ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असलं" तरी तिला भारतात निर्घृण गुन्ह्यांशिवाय इतर काहीच बघायला मिळणार नाही, अशी लेखिकेची खात्री झालेली आहे ! अश्या एखाद्या दुर्दैवी घटनेच्या पायावर परदेशप्रवासाचे निर्णय केले तर सर्व जगभरचे आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद करावे लागेल, नाही का ?! तसेही, "काहीही कारण असो वा नसो, आपल्या देशाबद्दल अपमानास्पद लिहिणे-बोलणे हा भारतीय घटनेने दिलेला अधिकार आहे" असे म्हणणारे बरेच उदारमतवादी लोक भारतात आहेतच, तर मग परदेशात राहून असे केले तर काय बिघडले !" :( ================== अवांतर : मी स्वतः ओमानमध्ये १४ वर्षे वास्तव्य केलेले आहे. तेथिल जमिनी वस्तूस्थितीबद्दल मला चांगली माहिती आहे. सर्व स्तरांच्या ओमानी नागरिकांबरोबर माझे व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर सौहार्दाचे संबंध होते/आहेत. सर्वसाधारण ओमानी माणसाला भारताबद्दल आणि भारतिय माणसाबद्दल ममत्व व आदर आहे... आणि त्यांचे ते मत ओमानमध्ये काम करणार्या भारतिय नागरिकांशी आलेल्या संबंधातून आणि त्यांच्या भारतभेटींच्या अनुभवातून बनलेले आहे. तसेही भारत देशाशी ओमानचे व्यापारी संबंध आजचे नसून, शेकडो वर्षांचे आहेत... ब्रिटिश भारतात येण्याच्या बर्याच अगोदरपासूनचे. किंबहुना, ओमानमध्ये खनिज तेलाचा शोध लागण्याअगोदर भारतात येऊन काम करणारे अनेक ओमानी लोक (किंवा त्याचे पालक) मला तेथे भेटले आहेत. त्यामुळे, जेव्हा लेखिकेने "एक आडनीड्या वयातली शाळकरी पोरीला" भारताबद्दल प्रतिकुल मत सांगितले तेव्हा, इतर कोणापेक्षा, तिला आणि तिच्या पालकांना जास्त आश्चर्य वाटले असेल, असे मला वाटते. तरीही, 'कुर्हाडीचा दांडा...' बनणे टाळणे तर बरे होईल, असेच वाटते.देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा!१, पर्यटनासाठी भारतात आलेले किती परदेशी लोक पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करतात ? २. पब्लिक ट्रांसपोर्टमधल्या समस्येचा उपाय काय ? इथे देशात असे प्रसंग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे, की त्याचे सरसकटीकरण करून आपला देश अत्यंत धोकादायक आहे अशी परदेशात जाहिरात करायची ? "आग रामेश्वरी सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी" असा प्रकार नाही काय हा ?! विकृत लोक ही काही केवळ भारताची खासियत नाही. अश्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वच सुजाण लोकांच्या मनात चीड आहे, परंतू, त्यामुळे सर्व देशाची (आणि पर्यायाने सर्व भारतियांची ज्यात लेखिका, तुम्ही व आम्ही सर्वच गणले जातो) प्रतिमा मलिन करण्याने काय साधणार आहे ??? तसे करणे समतोल विचार/कृती करणे होईल का ? भारताची परदेशात नाचक्की करून परिस्थिती सुधारणार आहे की मुळ समस्या तशीच राहील आणि त्यावर अजून भारताची प्रतिमा खराब झाल्यामुळे अनेक नवीन समस्या निर्माण होतील ? किंबहुना, अशी नाचक्की करणार्या भारतियांकडे परदेशी लोकांनी संशयाने/तिरस्काराने/चेष्टेने पहायला सुरुवात केली तर ते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे असेल... पण अश्या कृतीमुळे इतर भारतियांना झळ पोचली तर त्याची जबाबदारीही नि:संशय नाचक्की करणार्यांवरच असेल. विशेषतः, संस्कारक्षम वयाच्या परदेशी नागरिक मुलीसमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्याच्या कृतीत कितीसा समतोलपणा आहे ? अशी अस्थायी आणि अप्रमाणबध्द (out of proportion) स्वताडन कृती करून वर तिची प्रसिद्धी करणे व तिचे समर्थन करत राहणे, यामुळे अश्या कृतीमागच्या कारणपरंपरेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर आश्चर्य वाटू नये !