मिशन काश्मीर - ७ - पहलगाम
Book traversal links for मिशन काश्मीर - ७ - पहलगाम
लुटा जो मुसाफिर दिल की सफर मे, है जन्नत ये दुनिया उसकी नजर मे......
१९६३-६४ साली जेव्हा बिहारींनी जेव्हा हे गाणे लिहायले घेतले तेव्हा त्यानी पहलगामला नजरेसमोर ठेवुन कविता लिहायला सुरुवात केली असावी आणि मग नय्यर च्या विनंतीचा मान ठेवुन त्याचे गाण्यात रुपांतर केले असावे. कारण दिल काढुन "पहलगाम" टाकले की एरवी हे वाक्य पहलगामला चपखल लागु पडते,
काश्मीर - पहलगाम ने अनेक चित्रपटांसाठी लोकेशन्स पुरवली. काश्मीर की कली त्यातले एक. बेताब दुसरे. सन्नी देओल आणि अमृता सिंगचा बेताब इथल्यात एका सदाबहार व्हॅलीत शूट झाला. त्यानंतर या जागेला बेताब व्हॅली हेच नाव पडले. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बांधलेल्या हट्स अजुनही इथे जतन करुन ठेवल्या आहेत. एवढ्या सुंदर जागेत रहायला मिळत असेल तर मरो ती अमृता सिंग आणि मरो तो शम्मी कपूर असे होइल आपल्याला. दुर्दैवाने राहुल रवैल ला तिथे आख्खा चित्रपट शूट करायचा असल्यामुळे त्याने तो मोह बाजूला ठेवलेला असावा. जब हम जवा होंगे आणि चित्रपटाच्या इतर बर्याच भागातले शूटिंग याच भागातले

ऐ जिंदगी ये लम्हा जी लेने दे, पहले से लिखा कुछ भी नही रोज नया कुछ लिखती है तु
जो भी लिखा है दिल से जिया है, ये लम्हा फिलहाल जी लेने दे
पहलगाम मधले हवामान हे असेच आहे. इथे पहले से लिखा कुछ भी नही. रोज वेगळे वातावरण, थेट राजकुमार सारखे मूडी. आत्ता पाऊस पदतो आहे तर जानी २ मिनिटात उन सुद्धा पडु शकेल. आम्ही गेलो त्या दिवशी उन पाउसाचा खेळ सुरु होता. दुसर्या दिवशी मात्र मुसळधार पाऊस. निसर्गराजापुढे मान तुकवुन आम्हीदेखील आमच्या होटेलमधुनच निसर्गाचा आस्वाद घेत होतो. अखेर भर पावसात बाहेर पडायचे ठरले.
बर्फानु बाबा की जय म्हणत जिथुन भाविक आपल्या अमरनाथ यात्रेचा शुभारंभ करतात त्या चंदनवाडीला जायचे होते. संततधार पाऊस आणि गोठवणारी थंडी याचा अनोखा संगम चंदनवाडीला होता. अजुनही चंदनवाडी पास बर्फात होता. त्यानंतर १५ एक दिवसात सैन्याची लोक येउन बर्फ काढणार होते आणि मग तो मार्ग यात्रेकरुंसाठी खुला होणार होता. यात्रेकरुंना जायचे असतील तर २ मार्ग आहेत. एक बालताल मार्गे जातो. तो सोप्पा आहे. १ दिवसात यात्रा पुर्ण होते आणि हा दुसरा इथुन यात्रा पुर्ण व्हायला २ दिवस लागतात पण निसर्ग इतका सुंदर आहे की २ दिवसात अमरनाथ बरोबर स्वर्गात जाउन आल्यासारखे वाटते. (मध्येच निसरडा रस्ता असल्याने घोडे दरीत पडतात आणि काही पुण्यश्लोक खरेच स्वर्गात जातात ही गोष्ट वेगळी)
चंदनवाडीवरुन अमरनाथच्या यात्रेला सोबत करणार्या भाविकांना शेषनाग नदीची साथ असते. हे एकमेव हिंदु नाव इथे अजुन कसे टिकुन आहे हे आश्चर्यच आहे. पुढे याच नदीला लिडार (पुर्वीचे नाव लंबोधिरी) नाव पडले आहे. इथल्या पाण्यात ५ मिनिटे हात घालुन बसणार्याला लाखभर रुपयाचे बक्षीस द्यायला हरकत नसावी कारण पाणी प्रचंड थंड आहे. बर्फाचेच पाणी ते.
इथुनच पुढे यात्रेला सुरुवात होते:
चंदनवाडी, बेताब व्हॅली बघुन आम्ही अरु व्हॅलीकडे वळलो. अजुन एक निसर्गरम्य ठिकाण पण जास्त प्रसिद्ध अश्यासाठी की इथे कर्मा आणि अजुन ३-४ चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. निसर्गाला हा चित्रपटांशी जोडण्याचा खटाटोप मला कळत नाही. म्हणजे बेताब व्हॅली ला हे नाव का तर इथे बेताब चे शूटिंग झाले. अवंतिपुरा प्रसिद्ध का तर तिथे आंधी च्या तेरे बिना जिंदगी से चे शूटिंग झाले. वास्तविक ही माहिती दिली नाही तरी त्या जागा डोळ्याचे पारणे फेडणार्या आहेत.
अरु व्हॅलीकडे जाण्याचा रस्ता मात्र पावसाने चिखल झाल्यामुळे एकदम अॅडव्हेंचरस झाला होता. त्यात परत तो जागोजागी पर्यटकांच्या सोयीसाठी तिथे असलेल्या घोड्यांच्या लिदीने पावन झाला होता. चालताना पायाखाली चिखलाचे आणि लिदीचे जे काही मिश्रण झाले होते ते चुकवत चुकवत पाय टाकायचे म्हणजे एक आव्हान होते. उडी थोडी चुकली की पचाक.... एकदम तुमसे मिलकर ऐसा लगाच होणार. पण ते चुकवत चुकवत जेव्हा तुम्ही आत पोचता तेव्हा जी भर के क्लिकक्लिकाट होतो.
अरु व्हॅलीत अजुन एक खुप सुंदर गोष्ट होती ति म्हणजे तिथले दगड. मध्यम आकाराचे जे रंगीबेरंगी गोटे आजकाल घरी कुंड्यांमध्ये शो साठी ठेवण्याची फॅशन आली आहे ते तिथे मुबलक प्रमाणात होते. ते घ्यायचा मोह देखील होत होता. पण दादा कोंडके - जयश्री टी (कदाचित उषा चव्हाण असु शकेल. चुभुद्याघ्या) च्या एका चित्रपटातल्या किश्श्याची आठ्वण झाली. एका चित्रपटात दादा नायिकेला काहितरी चिडवतात आणि नायिका रस्त्यावरचा दगड घेउन दादांना मारतात असा प्रसंग होता. नायिकेने असाच रस्त्यावरचा एक दगड उचलला तसा दादांनी शॉट मध्येच थांबवत नायिकेला सुचना केली की "तो दगड घेउ नये. तो वापरलेला असतोय". आता वापरलेला म्हणजे काय हे काही जयश्रीताईंना कळेना आणि सर्वांसमोर दादांना सांगता येइना. वापरलेला शब्दाचा उलगडा अखेर नायिकेला चित्रपटाच्या प्रिमीयरलाच झाला. त्यानंतर बहुधा त्यांनी रस्त्यावरचा दगड आयुष्यात कधीही उचलला नसावा. आम्हाला वापरलेला शब्दाचा अर्थ माहिती होता आणि तिथला प्रत्येक दगड कसा सगळ्याच घोड्यांनी 'वापरलेला' आहे असे दिसत असल्याने आम्ही त्या भानगडीत पडलो नाही.
परत फिरताना मनात एकच दु:ख होते की ट्रिप संपली पण ज्या आठवणी मनात घेउन आम्ही माघारी येणार होतो त्या चिरकालीन टिकणार्या होत्या.
तळटीपः माझी ट्रिप संपलेली असली तरी तुमचे भोग अजुन संपलेले नाहीत. एक भाग अभी बाकी आहे.
न परत फिरलो तेव्हा खुप इच्छा झाली होती
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments