हा प्राणी आणि शब्द मी मिरजेत पहिल्यांदा पाहिला आणि ऐकला. हे प्राणी गूळ फार खातात असे ऐकले आहे. फार म्हणजे किती तर एका वेळेला संपूर्ण मोठी ढेपच्या ढेप फस्त करतात म्हणे! :)
मला वाटतं कलिंदर म्हणजे रानमांजर. मीही सातार्यात पाहिलं आहे आणि कलिंदर हे नावही तिथलंच.
पण सातार्याबाहेर या नावाने कोणाला हा प्राणी माहीत नसावा. लहानपणी भीती दाखवायला सांगायचे की कलिंदर येइल :)
हे रानमांजरच आहे त्याच्या आणखी दोनतीन जाती आहेत, एकाचा रंग फिकट खाकी असतो शेपटीवर काळे आडवे पट्टे असतात, एक नुसतेच फिकट खाकी असते आणि एक वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे काळेकुट्ट असते. अजूनही कोकणात ह्या जाती आढळतात. आमच्या घराजवळ असलेल्या सुरमाडावर येणारी फळे खाण्यासाठी रात्री काळ्या रानमांजरांची एक जोडी आजही नित्यनेमाने येते.
मला हा प्राणी अगदी चा॑गलाच महीत आहे. मी मुळची साताराचीच असल्यामुळे मला हेच नाव महीत आहे. अमच्या घरी प्रच॑ड कली॑दर॑ होती वरच्या माळ्यावर , आम्ही त्याला 'कली॑दराची खोली 'च म्हणायचो.
आणि अम्हाला शिक्षा म्हणजे कली॑दराच्या खोलीत को॑डणे! :(
हा प्राणी नुसता गुळ नही सगळ गोड खातो. आणखीन एक गोष्ट अशी की हा प्राणी आपल्या साध्या मा॑जरा॑ना प्रच॑ड घाबरतो.
त्यामुळे आम्ही नेहमी झोपताना अमच्या माऊला जवळ घेउनच झोपायचो :)
माझा मित्र सुयोग प्रभुणे ( हा मिपा सदस्य देखील आहे ) हा वाईचा (सातारा जिल्हा ) आहे. त्याने कलींदराबद्दल सांगितलेली माहिती.
एकतर कलींदर म्हणजे उदमांजर नव्हे. कलींदर हा प्राणी आस्तित्वात होता. वाईला खूप कलींदर होती.
आकार साधारणपणे मांजरीएवढा, रंग काळा, ह्याला गूळ आवड्तो. विशेष म्हणजे ह्याच्या शेपटीच्या टोकाशी धोत्र्याच्या फळासारखा गुंडा असतो.
लहानमुलांना भिती दाखवायला कलिंदर येइल असं सांगत असत.
-- ध्रुव
हा प्राणी आणि शब्द मी मिरजेत पहिल्यांदा पाहिला आणि ऐकला. हे प्राणी गूळ फार खातात असे ऐकले आहे. फार म्हणजे किती तर एका वेळेला संपूर्ण मोठी ढेपच्या ढेप फस्त करतात म्हणे! :)
चतुरंग
मी तर हा शब्द आणि हा प्राणी दोन्हीही पहिल्यांदाच ऐकते आहे. आणि इतका गूळ खाणारा हा प्राणी घरात असणे म्हणजे घरमालकाला गुर्हाळच सुरू करावं लागेल..:)
- (सर्वव्यापी)प्राजु
चतुरंग तुम्ही बरोबर आहात. मी हा प्राणी सातारा भागात पाहिला
प्राजु मल वाटते मिरजेत सातार्यात गुर्हाळे भरपुर आहेत.