Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कलिन्दर या प्राण्या बद्दल कोणाला काही माहित आहे का?

व
विजुभाऊ
Mon, 02/25/2008 - 10:42
💬 18 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14093 views

💬 प्रतिसाद (18)
ध
ध्रुव Mon, 02/25/2008 - 12:32 नवीन
याला उदमांजर सुद्धा म्हणतात का??
-- ध्रुव
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 12/09/2008 - 10:31 नवीन
बहुधा उदमांजरच असे वाटते. Image removed. इंग्रजी मध्ये सिवेट कॅट असे म्हणतात. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 12/09/2008 - 12:43 नवीन
अगदी सहमत. याला कोल्हापुरी प्रतिशब्द 'इजाट' असाही आहे. आमची आजी म्हनायची, "....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/25/2008 - 18:16 नवीन

हा प्राणी आणि शब्द मी मिरजेत पहिल्यांदा पाहिला आणि ऐकला. हे प्राणी गूळ फार खातात असे ऐकले आहे. फार म्हणजे किती तर एका वेळेला संपूर्ण मोठी ढेपच्या ढेप फस्त करतात म्हणे! :)

चतुरंग

  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 12/09/2008 - 11:07 नवीन
गुळाची चव असलेल्या काही विशिष्ट प्रजातींपैकी एक म्हणायचं म्हणजे हे जनावर....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 12/09/2008 - 13:03 नवीन
=)) भटोबा काय सोडत नाय बॉ... फुल्ल फॉर्मात बॅटिंग!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 18:26 नवीन

मी तर हा शब्द आणि हा प्राणी दोन्हीही पहिल्यांदाच ऐकते आहे. आणि इतका गूळ खाणारा हा प्राणी घरात असणे म्हणजे घरमालकाला गुर्‍हाळच सुरू करावं लागेल..:)

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 02/26/2008 - 06:36 नवीन

चतुरंग तुम्ही बरोबर आहात. मी हा प्राणी सातारा भागात पाहिला

प्राजु मल वाटते मिरजेत सातार्यात गुर्हाळे भरपुर आहेत.

  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 12/09/2008 - 09:29 नवीन
मला वाटतं कलिंदर म्हणजे रानमांजर. मीही सातार्‍यात पाहिलं आहे आणि कलिंदर हे नावही तिथलंच. पण सातार्‍याबाहेर या नावाने कोणाला हा प्राणी माहीत नसावा. लहानपणी भीती दाखवायला सांगायचे की कलिंदर येइल :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/09/2008 - 09:44 नवीन
कलंदर माहित आहे. त्याचा याचा काही संबंध असावा असे वाटत नाही -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 12/09/2008 - 12:46 नवीन
आणि कलींदर च्या ऐवजी गिलींडर राह्यला आले.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 12/09/2008 - 13:20 नवीन
ह्याला ईझाट हेच नाव इकडे कोल्हापुर भागात आहे.ज्यादा करुन अंधार्‍या भागात हे राहतात.खाण्याबद्दल ज्यादा माहिती नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 12/09/2008 - 15:48 नवीन
हे रानमांजरच आहे त्याच्या आणखी दोनतीन जाती आहेत, एकाचा रंग फिकट खाकी असतो शेपटीवर काळे आडवे पट्टे असतात, एक नुसतेच फिकट खाकी असते आणि एक वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे काळेकुट्ट असते. अजूनही कोकणात ह्या जाती आढळतात. आमच्या घराजवळ असलेल्या सुरमाडावर येणारी फळे खाण्यासाठी रात्री काळ्या रानमांजरांची एक जोडी आजही नित्यनेमाने येते.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 12/10/2008 - 23:55 नवीन
काय खबर नाय बॉ!!! आमी शाला मुंबयकर.... आमाला ते गॅसचा "सिलिंडर" मालूम हाय..... ते घराघरामदी ओटेच्याखाली दडून बसते.... कवा पायला होता के? -दांबिसअंकल
  • Log in or register to post comments
प
प्रिती करन्दिकर गुरुवार, 12/11/2008 - 03:38 नवीन
मला हा प्राणी अगदी चा॑गलाच महीत आहे. मी मुळची साताराचीच असल्यामुळे मला हेच नाव महीत आहे. अमच्या घरी प्रच॑ड कली॑दर॑ होती वरच्या माळ्यावर , आम्ही त्याला 'कली॑दराची खोली 'च म्हणायचो. आणि अम्हाला शिक्षा म्हणजे कली॑दराच्या खोलीत को॑डणे! :( हा प्राणी नुसता गुळ नही सगळ गोड खातो. आणखीन एक गोष्ट अशी की हा प्राणी आपल्या साध्या मा॑जरा॑ना प्रच॑ड घाबरतो. त्यामुळे आम्ही नेहमी झोपताना अमच्या माऊला जवळ घेउनच झोपायचो :)
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 12/11/2008 - 11:34 नवीन
तुमचे नाव करंदिकर ऐवजी कलींदरकर असे असायला पाहिजे होते.. आणि एक गोष्ट...माझ्या नावात पण माऊ आहे.. (हलकेच घ्या).. ;) आपलाच खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 12/11/2008 - 10:50 नवीन
माझा मित्र सुयोग प्रभुणे ( हा मिपा सदस्य देखील आहे ) हा वाईचा (सातारा जिल्हा ) आहे. त्याने कलींदराबद्दल सांगितलेली माहिती. एकतर कलींदर म्हणजे उदमांजर नव्हे. कलींदर हा प्राणी आस्तित्वात होता. वाईला खूप कलींदर होती. आकार साधारणपणे मांजरीएवढा, रंग काळा, ह्याला गूळ आवड्तो. विशेष म्हणजे ह्याच्या शेपटीच्या टोकाशी धोत्र्याच्या फळासारखा गुंडा असतो. लहानमुलांना भिती दाखवायला कलिंदर येइल असं सांगत असत.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव गुरुवार, 12/11/2008 - 11:43 नवीन
कलींदराला न घाबरणारा म्हणून 'बिलंदर' शब्द आला का?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 6 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा