Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

[स्वैर] वाळवी वि० बुरशी

य
युयुत्सु
Sat, 04/19/2025 - 08:25
💬 34 प्रतिसाद

डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत...

ज्यांना समूहात आणि परंपरेत सुरक्षित वाटते ते सहसा उजवीकडे झुकलेले असतात. त्यांना मुक्तपणा म्ह० स्वैराचार वाटतो. त्यांना समूहाचा व्यक्तीच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे महत्त्व आणि भवितव्य घडवते. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. उजव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे. त्यामुळे मुक्त स्त्री त्यांना संस्कृती भ्रष्ट करणारी वाटते. मग मुलांची लग्ने होत नाहीत म्हणून स्त्रियांनी जास्त शिकू नये, कमी शिकलेला नवरा पत्करावा वगैरे, शहर सोडून खेड्यात जावे हे तत्त्वज्ञान उगाळले जाते.

नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या कुटुंबात एखादी व्यक्ती जितकी बुद्धीमान तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते. हा सहसबंध आहे, कार्यकारण भाव नाही. डाव्या बुद्धीमत्तेच्या श्रेष्ठत्वाचे उत्तम उदा० म्हणजे चीन.

मग लक्षात आले आतापर्यंत विकसित झालेले सर्व यशस्वी ए०आय० डावीकडे झुकलेले आहेत. उजवीकडे झुकलेला ए०आय० कसा असेल याची मला उत्सूकता आहे. मुळात उजवी कडे झुकलेला ए०आय० अस्तित्वात येईल का, याचीच शंका आहे.

तारतम्य मध्यममार्गात असते याचा डाव्यांना आणि उजव्यांना विसर पडलेला असतो.


  • Log in or register to post comments
  • 6082 views


वाचनखूण लावा
| 6082 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (34)
य
युयुत्सु Sat, 04/19/2025 - 13:17 नवीन
फक्त वानगीदाखल - १. https://www.theatlantic.com/politics/archive/2013/10/can-your-genes-predict-whether-youll-be-a-conservative-or-a-liberal/280677/ २. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0160289624000254 " Intelligence is correlated with a range of left-wing and liberal political beliefs. This may suggest intelligence directly alters our political views. Alternatively, the association may be confounded or mediated by socioeconomic and environmental factors. We studied the effect of intelligence within a sample of over 300 biological and adoptive families, using both measured IQ and polygenic scores for cognitive performance and educational attainment. We found both IQ and polygenic scores significantly predicted all six of our political scales. Polygenic scores predicted social liberalism and lower authoritarianism, within-families. Intelligence was able to significantly predict social liberalism and lower authoritarianism, within families, even after controlling for socioeconomic variables. Our findings may provide the strongest causal inference to date of intelligence directly affecting political beliefs."
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sun, 04/27/2025 - 13:16 नवीन
Image removed. १. https://www.eurekalert.org/news-releases/1057834 २. "Brain scans remarkably good at predicting political ideology" https://news.osu.edu/brain-scans-remarkably-good-at-predicting-political-ideology/
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 04/19/2025 - 15:17 नवीन
मी काय म्हणतो, एकदा तुम्ही "उजवे आणि डावे : माझ्या व्याख्या " असा लेख लिहा की.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/19/2025 - 15:20 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 04/19/2025 - 16:54 नवीन
श्री गोडबोले तुमची कल्पना चांगली आहे आवडली
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 06/30/2025 - 15:25 नवीन
तुमची विच्छा याच धाग्यात पूर्ण केली आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 04/21/2025 - 14:58 नवीन
आता पर्यन्त वाचलेला सर्वात विनोदी लेख. बुद्धिमान व्यक्ति नेहमी सकारात्मक विचार करतात. ते स्वत: आणि समाजाचा विकास करतात. ते उजव्या विचार सरणीचे असतात. नकारात्मक विचाराने ग्रसित व्यक्ति डाव्या विचारसरणीचे होतात. स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान करतात. भारताचे उदा. घ्या. प. बंगाल आणि बिहारचे उद्योग डाव्या विचारसरणीच्या नेत्याने उध्वस्त केले. ज्या राज्यांत डाव्यांचा प्रभाव कमी होता तिथे उद्योगांचा विकास झाला. कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. डाव्या विचारांचे शेतकरी नेता. चक्का जाम करतात. आंदोलन करून राज्याचे नुकसान करतात. उजव्या विचारधारेचे शेतकरी नेता आता पर्यन्त तीन फूड पार्क सहित 80 जास्ती प्रोसेसिंग यूनिट स्थापित करून काही लाख लोकांना रोजगार आणि लाखो शेतकर्‍यांना शेतीचे नवीन विकल्प उपलब्ध करून देतात. उजव्यानी स्त्री वर अत्याचार केले याचे प्रमाण नाही. उजव्या देशांत स्त्री शोषण कमी आहे. भारतात तर 498 किंवा स्त्री शोषण आरोपला घाबरून पुरूष आत्महत्या करतात. पण डाव्या देशांत स्त्रीयांचे शोषण सामान्य आहे कारण सत्तेवर असलेले डाव्यांची इच्छा म्हणजे न्याय. मानसिक रूपेण विकृत आणि पुरुषार्थहीन व्यक्ति डाव्या विचारधारेचे होतात.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 04/21/2025 - 16:44 नवीन
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 04/22/2025 - 08:50 नवीन
संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून समाज सेवेचे कार्य करणे शिकविले जाते. बाकी डावे मुळातच आळशी असतात. बिना काम करता फक्त प्रचार करून पैसा कमवायची मनोवृती त्यांच्यात ठासलेली असते. दिल्लीत काळे पांढरे कपडे घालून डावे पथ नाट्य कलाकार ही हजारपेक्षा जास्त रोजचे घेतात. शिवाय "खाना-पींना".
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 05/01/2025 - 16:53 नवीन
>> संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून संघात 'प्रचारक' म्हणून पदच असते ना? त्यांचे कामच मुळी संघाचा व त्याच्या विचारांचा प्रचार करणे हे असते, नाही का?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 04/21/2025 - 16:45 नवीन
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 13:33 नवीन
ह्यावर पण एक लेख लिहा की...
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sun, 04/27/2025 - 13:52 नवीन
@ मुक्त विहारि मी सर्व विचारसरणींचे आदर करणार्‍या वातावरणात वाढलो. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत मला संघाबद्दल बर्‍यापैकी आदर होता. निवडणूक ज्वर जसा शिगेला पोचला तसा संघाच्या तळागातल्या कार्यकर्त्यांचा उन्माद त्रासदायक ठरला. त्यात संघ कार्य्कर्त्यांच्या बालीश आणि विकृत मानसिकतेचे जवळून दर्शन झाले. फार काय भारत हे कधिच "हिंदुराष्ट्र" होऊ शकणार नाही, या कडवट सत्याचे यथार्थ ज्ञान झाले (याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही). मोदी सत्तेवर येण्यापूर्वीचा संघ आणि नंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 14:31 नवीन
तुम्हाला खरोखरच संघाचे कार्य समजावून घ्यायचे असेल तर, खालील काही साईट देतो. https://www.rss.org/hindi/ https://vanvasi.org/ ह्या साईटला भेट द्या आणि त्यांच्या एखाद्या सामाजिक उपक्रमात जरूर भाग घ्या. आणि ते पण नाही जमले तर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या जिल्ह्यातील प्रचारकाला जरूर भेटा. संघटन में शक्ती हैं..... आणि राष्ट्र उभारणी साठी, त्याचीच तर गरज असते...
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sun, 04/27/2025 - 15:32 नवीन
वेबसाईट पाहून एखाद्या व्यक्तीचे वा संघटनेचे मूल्यमापन/ओळ्ख इ० करायला मी काल भाऊच्या धक्क्यावर उतरलो नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 16:15 नवीन
RSS च्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घ्या... मी RSS च्या शाखेत जात नाही. पण RSS च्या दोन उपक्रमांना आर्थिक मदत जरूर करतो.... स्वतः भाग न घेता, तुम्ही एकांगी विचार कसा काय करू शकता? असो, तुम्ही खूप शिकलेले दिसता.... आनंद आहे....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/27/2025 - 17:21 नवीन
सोडा हो. संघावर जन्मापासून टीका होतेय. ३ वेळा बंदी सुद्धा आणली होती. संघाचे नेते, प्रचारक व स्वयंसेवक तुरूंगात डांबले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना संघाशी कोणताही संबंध ठेवण्यास बंदी होती. एखादा संघाशी संबंधित आहे असे समजले की त्याला झुरळासारखे लांब ढकलले जायचे. परंतु ९९ वर्षांनतरही संघ नुसताच टिकला नाही तर अधिकाधिक बलवान होऊन सर्व क्षेत्रात पसरला आहे व उत्तरोत्तर अजून बलवान होईल. संघाला संपवायला निघालेले केव्हाच बाराच्या भावात गेले, पण संघाला साधा ओरखडा सुद्धा काढू शकले नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 19:18 नवीन
कुठल्याही संघटनेची माहिती घ्यायची असेल तर त्या संघटनेत स्वतः सामील व्हा किंवा आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत ती माहिती जाणून घ्या.... संदर्भ... "कौटिल्याचे अर्थशास्त्र.." तुम्ही जर, "मुसाफिर" हे पुस्तक, लेखक अच्युत गोडबोले,वाचले असेल तर, मी काय म्हणत आहे, ते पण नक्की समजेल... ते पण हुकलेलेच होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 19:11 नवीन
https://vanvasi.org/our-team/ ह्यात पत्ते आणि फोन नंबर दिले आहेत. स्वतः जा, चौकशी करा, त्यांचे कार्य स्वतः बघा आणि मग जे काही बरे वाईट समजेल ते इथे जरूर सांगा...
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 04/28/2025 - 03:54 नवीन
As the researchers defined them, right-wing authoritarians are people who ascribe to conservative ideologies and so-called "traditional values" who advocate for "punitive measures for social control," while left-wing authoritarians are interested in "violently overthrow[ing] and [penalizing] the current structures of authority and power in society." https://futurism.com/neoscope/authoritarian-brain-scans
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/01/2025 - 07:01 नवीन
कशाला चर्चा करायची? जगात असलेली सर्व डावी राष्ट्रे रसातळाला गेली किंवा त्यांनी डावी विचारसरणी सोडून दिली म्हणून प्रगती करू शकले. बाकी (तथाकथित)अति उच्च बुद्धिमत्ता असलेले डावे लोक लोकशाही राष्ट्रांत मोठा पगार घेऊन उजव्या विचारसरणी वर गरळ ओकताना सर्वच लोकशाही राष्ट्रांत दिसतात. खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक जगात कमी आहेत का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2025 - 07:42 नवीन
RSSच्या विरोधात ह्यांची वैचारिक भूमिका आहे... आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 05/02/2025 - 06:32 नवीन
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 05/02/2025 - 06:49 नवीन
आज संघाच्या लोकांची मदत घेणं म्हणजे - "आवळा देऊन कोहळा काढायचा" किंवा "चवलीची मदत आणि रुपयाची वसुली" असा प्रकार असतो. एकवेळ सावकाराचं कर्ज फिटेल पण संघाचे "उपकार" फिटत नाहीत. घरात घुसून घरातल्या व्यवहारात नाकं खुपसणे, आणी सतत दिशाभूल, चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे, हे वेगळेच असते. भाजपा अजून संघा इतका नतद्रष्ट बनला नाहीये, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 05/02/2025 - 16:48 नवीन
+1 त्यामुळेच मोदी शहा संघाला चार हात लांब ठेवत असावेत!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/02/2025 - 07:27 नवीन
चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे हि काही हुच्च लोकांची मक्तेदारी असते त्यात दुसर्यांनी नाक खुपसलेले अजिबात चालत नाही. लोल
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 06/30/2025 - 08:36 नवीन
https://www.youtube.com/watch?v=962u6MAwp2I कालच हा व्हिडीओ बघितला आणि माझी वर घेतलेली भूमिका परत एकदा तपासली (जी बरोबर होती). सदर गृहस्थ युपिएससी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत शांतपणे, अभिनिवेश मध्ये न आणता शिकवतात म्हणुन मी अधून्मधून यांचे व्हीडीओ बघत असतो. परिवर्तनाची मागणी करणारे, त्याच्या बाजूने उभे राहणारे ते डावे आणि "जैसे थे" वादी/परंपरावादी उजवे अशी ही मांडणी आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/30/2025 - 09:14 नवीन
मीच बरोबर असतो मी बरोबरच असतो मी बरोबर असतोच बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 06/30/2025 - 14:59 नवीन
युयुत्सु,
(याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही)
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला? जीवन म्हणजे life याची निश्चित व सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. तरीपण जिवंत आणि मृत असा फरक सर्वत्र केला जातो. अगदी कोर्टातही केला जातो. तिथेही खुनाच्या केसेस उभ्या राहतातच ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 06/30/2025 - 15:18 नवीन
<सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला?> समजा अ ही एक व्यक्ती आहे. तीने दावा केला की "मी सनातनी" आहे आणि समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?" तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टात दोन्ही पक्ष काय उत्तर देणार, याची मला उत्सूकता आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/30/2025 - 15:26 नवीन
मुळात कोर्टात टिकेल अशी व्याख्या देण्याचा प्रसंग उद्भवला आहे का? साधं सरळ आहे ज्या व्यक्ती ने दावा केला की "मी सनातनी" आहे तिला तो दावा सिद्ध करायला सांगतात. त्या व्यक्तीने दिलेले संदर्भ किंवा पुरावे आणि सध्या कायदयात असेलल्या तरतुदीप्रमाणे न्यायालय निर्णय देतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 06/30/2025 - 15:57 नवीन
सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 06/30/2025 - 16:21 नवीन
<सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?> अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला नि:संदिग्ध व्याख्या असणे आवश्यक ठरते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 06/30/2025 - 20:30 नवीन
युयुत्सु,
समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?"
सनातन धर्मावर कोणाचीही मालकी नाही. त्यामुळे कोणी सनातनी असल्याचा दावा मान्य वा अमान्य करायचा प्रश्न येतंच नाही. ज्याला पाहिजे तो आपखुशीने सनातन धर्माचा अंगीकार करतो व सनातनी म्हणवून घेतो. बाकी, हाच प्रश्न मुस्लिम वा ईसाई यांच्याविषयीही विचारता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डाव्या / उजव्या वगैरे विचारांचा असणाऱ्या व्यक्तीबाबतही हा प्रश्न करता येतो. माझ्या मते हे स्वेच्छेने पालन करण्याविषयीचे प्रश्न कोर्टात न्यायचे नसतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा