Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

पोपटवाला

ब
बिपीन सुरेश सांगळे
Sat, 08/10/2024 - 18:33
💬 4 प्रतिसाद

पोपटवाला

सकाळची वेळ. नऊ वाजलेले. आकाश धुरकट रंगाचं. बरसो - ह्या ऑर्डरची वाट पहात थांबलेले ढग . पण नुसतेच .
शनिवार वाड्याचा पूल गजबजलेला होता . मागे आकाशाचा हे विस्तीर्ण पट .
कालच्या अती पावसाचा पूर गायब झालेला .
पुलावर भविष्य सांगणारा शंकरण्णा बसलेला होता .पोपट घेऊन .
गेले दोन दिवस पडण्याऱ्या पावसामुळे तो वैतागला होता. त्याला पुलावर बसता आलं नव्हतं. बरं - पुलासारखा धंदा दुसऱ्या ठिकाणी आणि कुठे नव्हता.
आज पाऊस नव्हता आणि त्याच्या खिशात पैसाही ! त्याला भूक लागली होती. पोटात कावळे कोकलत होते. त्यामुळे तो गिऱ्हाईकांची चातकासारखी वाट पहात होता. पहिलं गिऱ्हाईक झाल्याझाल्या तो एक गरमागरम वडापाव खाणार होता,एक स्पेशल चहा पिणार होता.एकदम कडक ! म्हणजे पुढच्या गिऱ्हाईकाला पटवायला त्याला जोम आला असता .
समोरून एक तरुण येत होता . आनंदात , उत्साहात . हूडी घातलेला . त्याने त्याला थांबवलं. तोही थांबला . शंकरअण्णाने पिंजऱ्याचं दार उघडलं. त्याचा तो लहानसाच पोपट बाहेर आला. त्याने समोर पसरलेल्या चिठ्ठ्यांकडे पाहिलं व डौलात एक चिठ्ठी काढली आणि तो परत त्याच्या पिंजऱ्यात गेला .
काय असेल त्या चिठ्ठीत ? …
आज तुम्हाला जीवनसाथी भेटेल !
तो तरुण खूष झाला त्याने विचारलं , ' किती झाले ?'
‘पन्नास ‘.
‘पन्नास ? पाच मिनिटं थांब शंभर देतो ... ‘
असं म्हणून तो तरुण भरभर कॉर्पोरेशन बसस्टँडच्या दिशेने निघूनही गेला . शंकरअण्णा विचारात पडला .त्याला कळायच्या आत तो गेलाही होता . तो परत येण्याची काही गॅरंटी नव्हतीच .
तो तरुण पुलावरून खाली स्टॅंडकडे जाणाऱ्या लोखंडी जिन्याच्या पायऱ्या पटापट उतरू लागला. तो स्टॅन्ड मोठा होता . अनेक ठिकाणी जाणाऱ्या बसेसचे अनेक स्टॉप तिथे होते .तिथे त्याची आवडती पोरगी थांबलेली असायची . ह्या वेळेला रोज , तिच्या स्टॉपवर . आज तिच्याशी काय ते एकदाचं त्याला बोलून टाकायचंच होतं .
त्यात ती चिठ्ठी !
तो पायऱ्या उतरतच होता . इतक्यात -
ती एका बाइकवाल्याच्या मागे बसून जाताना त्याला दिसली. तिने एक नजर याच्याकडे टाकली . तिला तो तरुण माहिती होता . आणि तिच्या त्या नजरेत सगळं चित्र सामावलेलं होतं… त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना .
तो तिरमिरीत पायऱ्या चढून पुन्हा पुलावर आला. शंकरअण्णाकडे बघत तो जाऊ लागला . शंकरअण्णाने त्याला हात केला; पण तो पोरगा रागाने डोळे मोठे करत, त्याच्या अंगावरून सरळ निघून गेला. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं .
त्या पोराचं काहीतरी बिनसलंय, हे अण्णाच्या लक्षात आलं; पण त्याने मग काही त्याला थांबवलं नाही .
पोरगा लांब गेला .
अण्णा त्याच्या पेरू खाणाऱ्या पोपटाला म्हणाला , ' त्या देवाकडे कुठला पोपट आहे कोणास ठाऊक ? त्याने चुकीचीच चिट्ठी काढलीये साली ! माझ्या नशिबाची !'
तो डोक्याला हात लावून नजर खाली घालून बसला .
त्याच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांचाही आता पोपट झाला होता.
xxx


  • Log in or register to post comments
  • 1529 views


वाचनखूण लावा
| 1529 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (4)
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 08/12/2024 - 20:13 नवीन
वाचक मंडळी खूप आभारी आहे .
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 08/13/2024 - 03:03 नवीन
लहानपणापासून पुणे महानगर पालिकेत समोरच्या शिवाजी पुलावर एक पोपटवाला नेहमीच बसायचा. आता माहीत नाही. तो नेहमीच लोकांचे पोपट करायचा मग देव कधी कधी त्याचा..... कान साफ करणारे,पोपट भविष्य वक्ते, फुगे विकणारे यांचे आयुष्य खरोखरच कठीण आहे. चरितार्थ कसा चालतो ते भगवंतालाच माहीत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 08/14/2024 - 10:46 नवीन
व्वा.. सुंदर ...काहीसं चटका लावणारं ! रस्त्यावर रोज कमाई करुन जगणार्यां विषयी सहानभुती वाटते खरंच कसे कसे जगतात लोक ! एकदा एका वडापाव स्टॉलवर वडापाव खाताना चमकदार लालतांबड्या डगल्यातले वादक गप्पा मारत होते "आयला आज पण वडापाव वर काढावा लागणार दिवस " "हां ना राव गेले दहा बारा दिवस हेच खातोय" "मला तर संडास बी झाली नाय ४-५ दिवस.. आता वडापाव बी नकू झालाय" हे ऐकताना त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बघवत नव्हते !
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 08/14/2024 - 13:40 नवीन
उत्तम जमली आहे छोटीशी कथा. अतिशय संवेदनशील आणि आपल्या आसपासच्या जगातून सदैव काहीतरी टिपण्याची क्षमता असलेले मन आहे तुमचे. त्यातूनच असे लेखन साधते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा