हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण
गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली.
https://hindenburgresearch.com/adani/
Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History
तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती.
The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies.
एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते.
मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया.
निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!
- या प्रकाराला अजूनही कोणी भ्रष्टाचार म्हणायला तयार नाही
- २०१४ पूर्वी उठसूट कुठल्याही गोष्टीला काँग्रेसची नीती आणि भ्रष्टाचार कसा जबाबदार आहे हे सांगणारे सर्वजण व्यवस्थित मुग गिळून गप्प आहेत
सरते शेवटी, भाजपानंतर सत्ता पालट होईल तेव्हा मुस्लिमांना कसं ठेचलं या आनंदाखेरीज सामान्य माणसाच्या हाती काहीही लागलेलं नसणार.खरे तर ह्या मारामारीत पडायचे नव्हते.पडु पण नका :=) तुमच्या आनि माझ्या वकुबाबाहेरचा विषय आहे :=):=):=)