Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण

म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 01/30/2023 - 08:01
🗣 273 प्रतिसाद
गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली. https://hindenburgresearch.com/adani/ Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती. The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies. एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते. मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया. निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 64534 views

🗣 चर्चा (273)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/22/2023 - 11:47 नवीन
हिंदेनबर्ग प्रकरणामुळे अदाणी श्रीमंतीच्या तिस-या क्रमांकावरुन आता पंचवीसाव्या क्रमांकावर गेले आहेत,असे समजायला हरकत नाही. बाकी सरकारचं मौन, सरकारने दिलेली उत्तरं तर, जगातली जी काही आश्चर्य समजली जातात त्याच दर्जाची वाटावी इतकी उच्च आणि अनाकलनीय होती. सरकारने सहिसलामत या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. आपल्याशी त्याचा काहीही संबंध नाही, दूर डोंगरावर बसून ते या हिंदेनबर्ग आणि अदाणी प्रकरणाकडे बघत आहेत. राजकारणात इतका निब्बरपणा असावा लागतो. बाकी, गल्ली ते दिल्ली या अदानीच्या विषयावर खल सुरु असतांना इ नवं वळण यात घुसलं अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी 'अदाणी प्रकरणामुळे भारताच्या विश्वासार्हतेला तडा गेलाय, मोदी हे लोकशाहीचे पुरस्कर्ते नाहीत. मोदींना उत्तर द्यावे लागेल वगैरे पण, सर्वच पक्ष नेत्यांनी त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. सर्वच पक्ष नेत्यांनी आमची लोकशाही मजबूत आहे, ही भूमिका घेऊन सोरोसवर चौफेर टीका केली. राजकारण वेगळं आणि देशप्रेम वेगळं. देशाला कोणत्या बाह्य शक्ती कमकूवत ठरवण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याला योग्य धडा दिला जाईल या निमित्ताने एक संदेश दिला गेला. जय हिंद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 02/27/2023 - 02:57 नवीन
राजकारण वेगळं आणि देशप्रेम वेगळं. देशाला कोणत्या बाह्य शक्ती कमकूवत ठरवण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याला योग्य धडा दिला जाईल ज्यादिवशी हे सगळे त्या महान काँग्रेस ला सर्व डावखुर्याना आणि कुंपणावर तेल लावून बसलेल्या बारामतीच्या पहिलवानाला ( ओह सॉरी "जाणत्या राज्यांना") समजेल तो दिवस भाग्याचा मग भाजपची गरजच उरणार नाही
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/25/2023 - 15:35 नवीन
जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, असे ब्रीद असलेल्या आणि देशातल्या मोठ्या सरकारी कंपनीचं एल आयसीचं कंबर्ड मात्र हिंदेनबर्गने मोडलं असे म्हणायला हरकत नाही. पन्नास दिवसात पन्नास हजार कोटी रुपयाचं नुकसान झालंय म्हणे. अवघड आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 02/27/2023 - 07:23 नवीन
LIC has said it has exposure of Rs 36,474.78 crore to Adani .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/97632672.cms?from=mdr&utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst असे असताना पन्नास हजार कोटींचे नुकसान कसे काय होईल बरे ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 02/27/2023 - 07:56 नवीन
असे असताना पन्नास हजार कोटींचे नुकसान कसे काय होईल बरे ? त्याला ' नोशनल ' लॉस म्हणतात. अदानी ग्रुपमध्ये एल आय सीच्या गुंतवणुकीची मार्केट वॅल्यू ८२,००० कोटीवरून ३२,००० कोटी इतकी झाल्याने नोशनल लॉस ५०,००० कोटी इतका झाला. मुळ गुंतवणुकीवर अंदाजे ५००० कोटी तोटा होऊ शकतो ( भविष्यात तो कमी जास्त होऊ शकतो )
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 02/27/2023 - 08:34 नवीन
मुळात "LIC चे कंबरडे मोडले" किंवा "५० हजार कोटींचे नुकसान" हे वाचून गम्मत वाटली .. त्यात हा "नोशनल" प्रतिसाद ... कालचीच बातमी आहे ... Rs 30,127 crore ची ओरिजनल इनेव्हस्टमेन्ट .. आणि lowest value ३३ हजार करोड ... म्हणजे कंबरडे मोडणे कसे ? आणि आग्या१९९० नी लिहिलेच आहे कि हि नोशनल व्हॅल्यू भविष्यात बदलू शकते ... मग नक्की कंबरडे मोडले कधी आणि दुरुस्त कधी होणार हे जाणकार लोकच सांगू शकतील
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/27/2023 - 12:19 नवीन
>>>> अदानी ग्रुपमध्ये एल आय सीच्या गुंतवणुकीची मार्केट वॅल्यू ८२,००० कोटीवरून ३२,००० कोटी इतकी झाल्याने नोशनल लॉस ५०,००० कोटी इतका झाला. बरोबर. दोन दिवसांपूर्वीच बातमी होती की एलआयसीचं अदानी उद्योगसमुहातील गुंतवणुकीचं एकत्रित बाजारमूल्य ८२,९७० कोटी रूपये होते, मात्र हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर त्यांचे बाजारमूल्य ३३,२४२ कोटीपर्यन्त घसरले. आणि पुढे त्याचा तो नुकसानीचा ५० हजार कोटीच्या पुढे तो आकड़ा गेला. यातला मी काही जाणकार नाही, पण आपण म्हणता तो 'नोशनल लॉस' भविष्यात जरी कमी जास्त होत असला तरी तो अदानीच्या नादी लागल्यामुळे झाला, हे स्वीकारावेच लागते. आपण सामान्य माणसं नफ्याच्या आशेने वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर घेतो. एल आयसीने अदानी इंटरप्रायझेस, ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी गॅस, अदानी ट्रांसमिशन आणि इतर त्यात एल आयसीने कोणाच्या सांगण्यावरुन इतके कोटीची कोटी गुंतवणुक केली ते पुढे येणा-या चौकशीत येईलच किंवा येणारही नाही. चालायचंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 02/27/2023 - 12:52 नवीन
यातला मी काही जाणकार नाही, पण आपण म्हणता तो 'नोशनल लॉस' भविष्यात जरी कमी जास्त होत असला नोशनल लॉस हा नोशनलच असतो. शेअर मार्केटमध्ये रोज कोणाचा ना कोणाचा नोशनल लॉस होतंच असतो. एखाद दिवशी मार्केट जोरदार कोसळले कि,आपली प्रसार माध्यमे ' गुंतवणूकदारांचे अमूक लाख कोटींचे नुकसान ' अशा बातम्या देतात आणि लोकांना ते खरं वाटते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/28/2023 - 01:13 नवीन
आग्या .... हो बरोअबर आहे हा कागदी तोटा आहे ... तो उद्या कागदी नफा हि होऊ शकतो ... किंवा नाही हि होणार कदाचित एल आय सी चे धोरण चुकले असेल या गुंतवणुकीत .. ... पण हि बाजारातील जोखीम आहे हे ज्या "सरकारी नोकरांना" कळत नाही त्यांना काय कोण समजवणार महिन्याचा महिन्याला "ग्यारंटीड पगार" + " ग्यारंटीड निवृत्ती फंडाचे पैसे " मिळालेच पाहिजेत हेच बाळकडू असल्यावर काय होणार !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/28/2023 - 03:06 नवीन
नोशनल लॉस हा नोशनलच असतो. शेअर मार्केटमध्ये रोज कोणाचा ना कोणाचा नोशनल लॉस होतंच असतो. माहितीबद्दल धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/28/2023 - 01:07 नवीन
आपण सामान्य माणसं नफ्याच्या आशेने वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर घेतो आणि हेच काम गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांचे असते ,,, ( म्युचल फंड / निवृत्ती फंड ) हा बाजार चा धोका घयावा लागतो .. मग एवढा खळखळाट का? एल आय सी मुळात इन्शुरन्स कंपनी २ पद्धीतीने पैसे मिळवते , एकूण जमलेला प्रीमियम आणि द्वावे लागणारे क्लेम यातील होणार फायदा आणि २) बाजारातील इतर गुंतवणूक... अहो " सरकारी प्रॉव्हिडंट फंड गॅरंटीड परतावा " ज्या समाजाला सवय झालीय त्यांना "बाजारातील जोखीम " पचत नाही .. त्यात सध्या नावडतीचे सरकार मग काय .. वापर टूल किट आणि फेक चिखल अडानि नि जर काही घोटाळा केला असले तर त्याची चहवकाशी हि झालीच पाहिजे यात शंका नाही पण म्हणून नुसत्या राजकीय द्वेष पै काय वाटेल ते बोलायचे ते तरी थांबवा सरकार चा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे तुम्ही सरकार ला पैसे उसने देता... ते सरकार मग तो पैसे कसा परत करत याचा कधी विचार केलाय ... जगात फुकट काहीच नसते
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/28/2023 - 01:25 नवीन
तरी तो अदानीच्या नादी लागल्यामुळे झाला, हे स्वीकारावेच लागते. ठीक आहे मग व्हा शेर होल्डर आक्टिविस्ट आणि काढा शोधून पण प्रोफेश्वर आपण ज्याला "ना दी लागून " म्हणता त्याला बाजारातील जोखीम . गुंतवणुकीतीळ धोके पत्करणे असे म्हणतात आणि ती घेतली नाही तर परतावा काय हवेतून देणार ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 02/28/2023 - 06:06 नवीन
देशाचा एक नागरिक म्हणून मर्यादित माहिती स्रोताच्या आधारे कोणीही सरकारवर शंका उपस्थित करू शकतो. आपल्याला अधिक माहिती असल्यास त्याच्या शंकचे निरसन करण्याचा प्रयत्न करावा, भले त्याची राजकीय मते पटत नसली तरी. बोफोर्स प्रकरणात आरोप करून काय निकाल लागला? 2G spectrum घोटाळ्याच्या चौकशीत विरोधी पक्षांच्या हाती काय लागले? कपिल सिब्बल जीव तोडून सांगत होते, " सरकारी तिजोरीचा एक पैशाचेही नुकसान झाले नाही." CAG ची नुकसान काढण्याची पद्धत चुकीची होती. निकालात तेच सिद्ध झाले. १.७ लाख कोटीच्या नुकसानीचे आरोप करून सत्तेत आलेल्या सरकारने ५जी च्या लिलावत फक्त १.५ लाख कोटीच मिळाले. अशा सरकारवर कोणी शंका का उपस्थित करू नये? LIC वर सरकारने दबाव आणला कि नाही हे चौकशीत सापडेल, त्यासाठी तशी चौकशी होणे गरजेचे आहे. सरकार नेमके तेच टाळत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/28/2023 - 10:05 नवीन
१.७ लाख कोटीच्या नुकसानीचे आरोप करून सत्तेत आलेल्या सरकारने ५जी च्या लिलावत फक्त १.५ लाख कोटीच मिळाले. मुळात CAG ने हे अंदाजे नुकसान असल्याचे अगदी प्रारंभापासून सांगितले होते व तो अंदाज बराचसा बरोबर होता हे नंतर सिद्ध झाले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/03/2023 - 06:11 नवीन
निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षेतेखाली हिंदेनबर्ग अहवालानंतर, अदानी उद्योग समूहाचे समभागांमध्ये झालेल्या पडझडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे निर्देश गुरुवारी दिले, हिंदेनबर्गच्या नंतरच्या अहवालानंतर सध्या अगा काहीच घडले नाही, असे वातावरण दिसत आहे. ( दुवा ) उद्योग समूहाची चौकशी होईलच पण अदानी उद्योग समूह इतक्या श्रीमंतीच्या टॉपवर कसा गेला ? त्याचीही चौकशी होईल की कसे ? सध्या काही अंदाज नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 03/03/2023 - 10:38 नवीन
निराशेचे मळभ हटले! अदानींसाठी दुसरी गुड न्यूज, १२० मिनिटांत ३,९४,७६,४०,००,००० कोटींची कमाई - महाराष्ट्र टाइम्स सगळ नोशनल आहे .... त्या LIC च्या ५० हजार कोटींच्या लॉस सारखेच https://maharashtratimes.com/business/business-news/another-relief-for-gautam-adani-net-worth-jumps-by-5-billion-dollar-in-just-2-hours-today/articleshow/98386079.cms
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/03/2023 - 10:44 नवीन
१० एप्रिलला दिवाळी किंवा दिवाळं.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 03/07/2023 - 11:53 नवीन
ध्रुव राठीची चित्रफीत बघायला हरकत नसावी. (अर्थात ध्रुव राठीच्या चित्रफिती बघणं म्हणजे राष्ट्रविरोधी काम असं मानत नसाल तर !!)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 03/08/2023 - 05:37 नवीन
काय म्हणल आहे यापेक्षा कोणी म्हणल आहे ? याला महत्व देतात. त्यामुळे अंडभक्त हा व्हिडिओ बघण्याची शक्यता शून्य आहे..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/09/2023 - 01:35 नवीन
प्रश्न कोणी म्हणलं हा नाहीये तर "निपक्षपाती" अशी पाटी लावयायाची आणि एकांगी बोलायचे हा आहे पण काय आहे अंधभक्त असल्यामुळे आम्ही असे म्हण्णारच त्यामुळे आपण इगनॉर मारावे .. ध्रुव राठी आरती सुरु ठेवावी तसेच निखिल वागले आरती पण म्हणत जावा
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 03/09/2023 - 09:59 नवीन
"एकांगी बोलणे ही पोटार्थी प्रतिसादकांची मजबुरी असते." आणि हे पुराव्यासह केलेले विधान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/08/2023 - 06:00 नवीन
'सबसे बडा स्कॅम लोगोके दिमाख साथ किया गया है' अगदी पटणारं आहे, बाकी व्हीडीयो आवड्ला. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/09/2023 - 01:33 नवीन
मेहनत, नशीब आणि इतर जे करतात ते "जुगाड " काँग्रेस च्या काळातच धीरूभाई मोठे झाले तेव्हा त्यांनी जे काय केलं "सरकार" सोबत मिळून तेच मग का जळफळाट ? पण काय आहे काहींना खाजगी उद्योग मोठा झाला कि पित्त होतं ... मग सगळंच बेचव होत नाही का ! त्यात शेंठ द्वेष खचून भरलेला एक भारतीय उद्योग समूह निर्माण झाला त्याचा आनंद काहीच नाही .. आज एक भारतीय उद्योग जगातील पर्वत मोठी कोळसा खाण उभी करू बघतोय त्याचे दुसऱ्या भारतीयाला दुःख का होत?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा