Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण

म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 01/30/2023 - 08:01
🗣 273 प्रतिसाद
गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली. https://hindenburgresearch.com/adani/ Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती. The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies. एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते. मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया. निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 64534 views

🗣 चर्चा (273)
स
साहना Tue, 02/07/2023 - 20:17 नवीन
ह्या तथाकथित विरोधकांची विश्वासार्हता मोदी ह्यांच्या लोकप्रियतेच्या ५ टक्के सुद्धा नसल्याने ह्यांनी किती गोंधळ घातला तरी कुणालाही फरक पडत नाही. पण पार्लमेंट बंद पडली आहे हे देशाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्त्युत्तम गोष्ट आहे. जो पर्यंत पार्लमेंट सुरु असते तो पर्यंत देशातील सर्व नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यांत असते - मार्क ट्वेन ! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विश्वनेते महामानव अचानक भीम किंवा मिम मंडळींच्या मतावर डोळा ठेवून काहीतरी मोठे विधेयक आणणार अशी वंदता होती. ह्या निमित्ताने ती संधी त्यांना मिळाली नाही तर देशाचे भलेच होईल.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 02/07/2023 - 06:06 नवीन
आज adani enterprises ला अप्पर सर्किट लागले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/07/2023 - 06:22 नवीन
अदानींच्या समभागांची खरेदी विक्री कधी सुरु होईल. कधी एकदा त्यांची खरेदी करु आणि एकदा की ते जमलं अदानींच मार्केट बघता भविष्यात निव्वळ नफाच नफा म्हणून स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी लोक उभे असतील. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 02/07/2023 - 06:43 नवीन
स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी लोक उभे असतील. :)
मार्केटच्या शब्दकोषात ह्याला व्यवहार म्हणतात, आणि हे व्यवहार रुक्ष/भावनाशुन्य असतात! भावनेच्या आहारी जाउन तुम्ही म्हणता तशी स्वप्ने कोणी बघितल्यास त्याचे दिवाळे निघेल 😀 😀
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/12/2023 - 04:56 नवीन
>>>व्यवहार रुक्ष/भावनाशुन्य असतात! अगदी खरंय...! >>> भावनेच्या आहारी जाउन तुम्ही म्हणता तशी स्वप्ने कोणी बघितल्यास त्याचे दिवाळे निघेल हा हा हा हेही खरंय. -दिलीप बिरुटे (स्वप्नाळू) :)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/07/2023 - 11:53 नवीन
स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी लोक उभे असतील. :) याला बाजारातील चढ उतरत भाग घेणे / जोखीम पत्करणे म्हणतात कि जे तुम्ही सुद्धा सिप / रेगुलर सेविंग प्लॅन वैगरे मधून करीत असता आणि अशी लालसा ज्यांना असेल त्यानं अडानि काय किंवा दुसरे कोणी काय फरक काहीच नसतो पण आपण अडानि अंबानी - मोदी द्वेषांच्या रहाटगाडग्यात अडकले असलयामुळे तुम्हाला इतर काही दिसत नाहीये
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 02/07/2023 - 06:29 नवीन
सध्यातरी अदानी आणि त्याचे गॉडफादर खूपच प्रेडिक्टेबल झालेत. आपण आपली पोळी भाजून घ्यायची.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/07/2023 - 14:09 नवीन
मिपा वर सध्या जास्त येता येत नाही, मध्ये मध्ये वाचन मात्र असतो पण कमीच.. अडानी चा विषय रोचक आहे.. म्हणुन आपण? या शीर्षकातील गोष्टीमुळे बोलतो... ---- माझ्या मागील एका धाग्यात लिहिल्या प्रमाणे शेअरमार्केट ची बाराखडी... भाग १ : Fundamental Analysis या वरील धाग्यात म्हणल्या प्रमाणे, मी यात सांगितलेल्या खालील गोष्टी मध्ये कधीच अदानी आणि त्यांच्या कंपन्या बसल्या नाहित.. १. कंपनीचे balance sheet - थोडक्यात कंपणीचे Assets किती आहे आणि Liabilities (खर्च,देणे) कीती आहे याचा ताळेबंद. २. कंपनीचे Profit & Loss Account ३. Ratios (हे पुढे आपण पाहणार आहोतच त्यामुळे अनेक मित्र या कंपनीतून पैसे कमवत असले तरी मी लांब राहिलो.. मला वाटते याचा अभ्यास केल्यास सरळ जाणवते कि काहीतरी गोम आहे, कर्ज, liability आणि cashflow, valuations अश्या कितीतरी बाबतीत ह्या कंपन्या नक्कीच योग्य वाटत नव्हत्या.. ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांचा ह्या कंपन्या बद्दल नक्कीच हाच अभ्यास असणार.., त्याच बरोबर India Deserves Better - ६. हसदेव अरण्य, कोळसा खाण, पर्यावरणाचा ह्रास आणि अदानी. यात मेन्शन केल्या प्रमाणे नैतिकते मुळे ह्यांच्या कडे जाण्याचे किंवा गुंतवणूक करण्याचा प्रश्न नव्हता.. त्यामुळे अदानी.. आणि आपण यात आपण आपल्या मूल्यांना, आपल्या तत्वाना न सोडणे महत्वाचं आहे. जर अदानी कोर्टात गेले तर त्यांना नक्कीच अनेक प्रश्नाची उत्तरे लेखी द्यावी लागतील, असे अनेक प्रश्न आपल्या देशातील कोणीही न विचारणे आणि सेबी ने हि बऱ्याच गोष्टीत वेळीच पावले न उचलणे हे नक्कीच योग्य नाही.. असो थांबतो..
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Wed, 02/08/2023 - 06:12 नवीन
आपण तर बावा फॅन झालो हिंडनबर्गचा .. काय अभ्यास... काय टायमिंग .. काय हल्ल्याची वेळ ... हिंडनबर्ग मुळे अदानी चा ब्लफ (व्हॅल्युएशन बाबत चा ) उघड झाला ... आणि आमच्यासारख्या सामान्य गुंतवणूक दारांना अडाणीचे लायकीपेक्षा महाग झालेले शेअर्स , आता मात्र लायकीच्या जवळपासच्या भावात खरेदी करण्याची संधी निर्माण होतेय ... हुर्रेय ... येय .. आता अडाणी पुढची १-२ वर्षयी तरी असा ब्लफ गेम (व्हॅल्युएशन बाबत चा ) खेळण्याची हिम्मत दाखवणार नाही ... खरं तर असा अभ्यास रवीशकुमार कडून अपेक्षित होता .. पण रडगाणं गाण्याखेरीज जास्त काय मला दिसलं नाही मागील काही वर्ष्यात ... बाकीचे तर पत्रकार असल्याची ऍक्टिंग करतात त्यांना तर सोडूनच द्या ..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/08/2023 - 07:23 नवीन
अदानीच्या बाँड ची अवस्था बघा. मुख्य धक्का तिथे बसलाय. हिंदेंनबर्ग ने शॉर्ट मधून पैसा कमावला.. आता अदानी ला अप्पर लागो नाहीतर काहीही होऊ दे .. त्यांचा गेम यशस्वी झाला आहे . आणि अदानी चा बडा घर पोकळ वासा होता हेही कळलं.. उगा प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवाद आणि अस्मिता घुसवू नये हे लोकांना कळेल तो सुदिन
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/09/2023 - 08:42 नवीन
उगा प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवाद आणि अस्मिता घुसवू नये हे लोकांना कळेल तो सुदिन
+१ उगा प्रत्येक गोष्टीत श्री मोदी आणि भारत सरकार हे लोकांना कळेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 02/09/2023 - 05:44 नवीन
कदाचित अदानींना वाटत असेल ... ऐला ... थोडी घाई केली अन ... उगाच एन डी टी व्ही त गुंतवणूक केली ... आधी, थोडी जरी आयडिया असती ... तर हिंडनबर्ग, पूर्ण विकत घेतलं असतं ...
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 02/09/2023 - 05:49 नवीन
त्या रवीशकुमारला म्हणावं, जा तिकडं अमेरिकेत .. आणि शिकवणी लाव हिंडनबर्गकड ...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 02/09/2023 - 06:25 नवीन
त्या रवीशकुमारला म्हणावं, जा तिकडं अमेरिकेत .. आणि शिकवणी लाव हिंडनबर्गकड ... नुसते शिकून काहीच साध्य होणार नाही. त्यासाठी त्याला भारताचे नागरिकत्व सोडावे लागेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 02/09/2023 - 12:39 नवीन
थोरात,नाना पटोले,आणि नक्की कुणाच्या चुकीने मविआ सरकार पडलं हा आहे. अदाणीच्या घरच्या कपाटाच्या भाव खाली गेला किंवा वर चढला याने कुणाला काय फायदा होणार आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/12/2023 - 04:23 नवीन
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी पंतप्रधांनाना कोंडी पकड्ण्याचा प्रयत्न केला. मोदी-अदानी यांच्यामधे कसे साटेलोटे आहे, ते दोघेही एकमेकांना कसा फायदा करुन देतात. गेल्या आठवर्षात अदानी समूहाची भरभराट कशी झाली. मोदी अदानी परदेश दौ-यात एकत्र किती वेळा गेले. मोदींचा दौ-यानंतर अदानींना किती परदेश दौरे केले, मोदींच्या दौ-यानंतर अदानींना किती वेळा कंत्राट मिळाले. कंत्राट मिळाल्यानंतर अदानींनी कितीवेळा परदेश दौरा केला वगैरे असे आरोप केले. ( लोकसभा भाषण) पंतप्रधानांनी अदानीचा नामोल्लेख टाळून ”मतदारांनी काँग्रेसला सातत्याने नाकारले असून देशाची प्रगती बघून विरोधक आणखी निराश झाले आहेत. आपल्यावर खोटे आरोप आणि शिव्याशाप देऊन निराशेतून मार्ग निघेल असे त्यांना वाटते. देशवासीयांचा विश्वास हीच आपली ढाल आहे, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले.” जनतेचा विश्वास हीच ढाल. दुसरीकडे, हिंडेनबर्ग अहवालात अदानी ग्रृपवर ठेवलेले आरोप व त्यानंतर कंपनीच्या समभागांच्या झालेल्या पडझडीकडे लक्ष वेधणा-या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी एक सशक्त कार्यप्रणाला निर्माण करण्याची गरज आहे, असे मत नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार तसेच भांडवल बाजार नियंत्रक संस्था (सेबी) यांच्याकडून अदानी प्रकरणातील तुंतवणूकदारांचे नुकसान व अदानी समभागांच्या कृत्रिम पडझडींच्या मुद्यांवर उत्तर मागविले आहे. तसेच अशा प्रकारच्या नकारात्मक घडामोडींचा माग घेण्यासाठी व त्यावर मार्ग काढण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याची सूचनाही केली. ( लोकमत) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 02/16/2023 - 00:17 नवीन
मोदी अदानी परदेश दौ-यात एकत्र किती वेळा गेले. मोदींचा दौ-यानंतर अदानींना किती परदेश दौरे केले, मोदींच्या दौ-यानंतर अदानींना किती वेळा कंत्राट मिळाले. निर्यात वाढावी म्हणून प्रत्येक देश प्रमुख जेवहा परदेशी जातो तेव्हा आपलया देशातील उद्योगातील शिष्टमंडळे घेऊन जातात किंवा त्यांची ओळख ( नेटवर्क ) करून देतात , हे जगात सर्वत्र घडते पण या सरकार ने केले कि काहीतरी काळे बरे असा सोयीस्कर द्वेष चष्मा घातलेल्यांना काय सांगणार ! हे म्हणजे हेच जर राजीव गांधींनी केले असते तर चालले असते पण मोदींनी केले मग ते चुकीचे ! का तुमचाच एकूणच खाजगी उद्योगाला विरोध आहे तसे तरी स्पष्ट करा एक उदाहरण देतो २० बिलियन ऑस्ट्रेलयं डॉलर चा ऑस्ट्रेलयातून सौर ऊर्जा निर्माण करून तो सिंगापोर ला पोचवणे हा प्रकल्प आयोजन चालू आहे आणि तो ऑस्ट्रेलयं खाजगी उद्योग करणार पण तो व्हावा यासाठी ऑस्ट्रेल्याचे सरकार त्यांना मदत नक्कीच करणार ,,,, कारण ते त्यांचे काम आहे पहा : https://suncable.energy/sun-cable-ceo-david-griffin-joins-prime-minister-anthony-albanese-on-the-australian-governments-international-business-delegation-to-indonesia/ https://aapowerlink.sg/ https://www.asiafinancial.com/australia-asia-sun-cable-project-wins-government-support उद्या भारतातीळ उद्योगाला परदेशी बाजारपेठ मिळणार असले तर सरकार ने मदत केली पाहिजेच मग तो उद्योग अदानी / अंबानी असो कि बारामती ऍग्रो असो! काही कळले !
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 02/16/2023 - 00:37 नवीन
बर हे सरकार मजूर ( मध्य डावे ) विचारसरणी चे आहे तरीही "खाजगी " उद्योगाला अश्या प्रकारे "मदत" करते हे सर्व एकांगी विरोधकांनी समजून घावे ● Sun Cable CEO David Griffin is in Jakarta to participate in Prime Minister Anthony Albanese’s first international business delegation, representing Sun Cable’s Australia-Asia PowerLink project which is investing $2.5 billion into Indonesia ● Indonesia’s President Joko Widodo welcomed Sun Cable’s investment commitment into Indonesia in his public remarks on Monday ● Meetings were held on Monday with Minister Luhut Binsar Pandjaitan, Coordinating Minister of Maritime and Investment Affairs, the Indonesian Investment Authority, Indonesian Chamber of Commerce (KADIN), Indonesia Australia Business Council (IABC), and Ministers for Trade and Tourism and Industry and Science ● Leaders affirmed support for Sun Cable’s AUD30+ billion Australia-Asia PowerLink project, which will bring knowledge sharing and renewable energy innovation to the region Sun Cable CEO David Griffin joined Prime Minister Anthony Albanese, Foreign Minister Senator Penny Wong, Trade Minister Senator Don Farrell, Industry & Science Minister Ed Husic, and Member for Solomon Luke Gosling OAM on the Australian Government’s first international delegation to Indonesia this week. Together with Australian and Indonesian leaders in government and industry, David Griffin discussed regional efforts to support decarbonisation and open up future growth industries for Indonesia. President Jokowi welcomed Sun Cable’s investment commitment in his public remarks on Monday. Sun Cable CEO David Griffin said: “It is an honour to be invited by Prime Minister Albanese on the Australian Government’s first international delegation.”
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/16/2023 - 04:57 नवीन
>>>निर्यात वाढावी म्हणून प्रत्येक देश प्रमुख जेवहा परदेशी जातो तेव्हा आपलया देशातील उद्योगातील शिष्टमंडळे घेऊन जातात किंवा त्यांची ओळख ( नेटवर्क ) करून देतात , हे जगात सर्वत्र घडते आपलं हे मत मान्य करण्यासारखेच आहे. आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी तसं संसदेत म्हणायला आणि मान्य करायला पाहिजे होतं. आणि विरोधी पक्षातील संसद सदस्यांना उत्तर देऊन गप्पगार करायला पाहिजे होतं, पण तसं घडलं नाही. ना उत्तर देणार ना चौकशी करणार लेख वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Wed, 02/15/2023 - 03:51 नवीन
वरील एका प्रतिसादात एक प्रतिसाडा वाचला त्यात एलायसी एसबीआय यांच्या अदानी समुहात असलेल्या गुंतवणूका, त्या कोणाच्या सांगण्यावरुन केल्या गेल्या असे विचारले आहे. त्यानी एलायसी एसबीआय या अनेक ठिकाणी पैसे गुन्तवतात आणि हा त्यान्चा उद्योग आहे याकडे दुर्लक्ष केले आहे असे दिसते. त्यामुळे हा प्रश्न येतच नाही.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Wed, 02/15/2023 - 06:12 नवीन
सोशल मीडियावर बघा हे काय काय वाचायला मिळतंय ... Image removed. Coal can be brought from Jharkhand directly to Punjab by rail, but after the instructions of the central government, instead of this route, first from Jharkhand, the Bay of Bengal, then by sea to Sri Lanka and via the Arabian Sea to Mundra port and then to Punjab by rail. It takes only 4-5 days to bring coal to Punjab by rail whereas it takes around 20-25 days to bring coal by sea and rail route. This time delay will lead to shortage of coal in Punjab which will result in increased number of power cuts. Also, as the Punjab government is already under financial burden due to various power subsidies and this route will further increase the burden.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 02/15/2023 - 08:12 नवीन
छान माहिती. एकादा विश्लेषणाचा लेख / प्रतिसाद संदर्भासकट येऊ द्यात. नाहीतर इतर समाजमाध्यमावरील स्वता:चे म्हणुन ढकलायचे असेल तर पुढे काय बोलायचे?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/15/2023 - 09:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sun, 02/19/2023 - 04:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 02/19/2023 - 10:27 नवीन
नुसते नकाशे टाकुन काही होत नाही. मुद्देसुद विश्लेषण येउ द्यात. तुम्हाला कसे मुद्देसुद लिहायचे कसे ते कळत नसेल तर मी तुम्हाला काही मुद्दे देतो. अ. पुर्ण लोहमार्गाने कोळसा वाहतुक ब. लोहमार्ग आणि सागरी मार्गाने कोळसा वाहतुक यांच्याबद्दल तुलनात्मक लिहा. १. अंतरः कोळसा खाण ते उर्जा प्रकल्प यातील दोन्ही वाहतुक मार्गांचे अंतर. २. वेळः दोन्हीला लागणारा वेळ. प्रत्यक्ष प्रवासातील वेळ, इतर वेळ ३. उपलब्धता: वाहतुकीची साधने किती पटकन उपलध होतात ? ४. क्षमता: दोन्ही मार्गाची अत्युच्च क्षमता आणि उपलब्ध क्षमता. ५. खर्चः दोन्ही मार्गाना किती वेळ लागतो? - पंजाब सरकार दुसर्‍या कोणाकडुन कोळसा घेत असेल तर ते कसा कोळसा वाहतुक करतात, किती किंमतीला विकतात ते पहा. जर पंजाबमधील उदाहरण नसेल तर जवळ्च्या राज्यात उदाहरण मिळते आहे का ते पहा. -- तुम्ही कालपरवाच हिंडेनबर्ग कंपनीचे तुम्ही चाहते झालात असे सांगत होता. मग आता त्यांच्यासारखा अभ्यास करुन लिहा, नाहीतर नेहमीसारखे श्री रवीशकुमार यांच्यासारखे रडगाणे गाऊ नका.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 02/20/2023 - 06:36 नवीन
मुद्देसुद विश्लेषण कधी येतंय याची प्रतीक्षा करतोय.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 02/15/2023 - 08:24 नवीन
Coal comes to the rescue of Adani Ports as container volume begins to slow २२ नोव्हेंबरची बातमी आहे. https://infra.economictimes.indiatimes.com/news/ports-shipping/coal-comes-to-the-rescue-of-adani-ports-as-container-volume-begins-to-slow/95288677
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 02/15/2023 - 08:26 नवीन
Coal comes to the rescue of Adani Ports as container volume begins to slow २२ नोव्हेंबरची बातमी आहे. https://infra.economictimes.indiatimes.com/news/ports-shipping/coal-comes-to-the-rescue-of-adani-ports-as-container-volume-begins-to-slow/95288677
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/15/2023 - 10:02 नवीन
मालगाडीला साधारणपणे ४० ते ५८ वॅगन्स असतात व कोणत्याही प्रकारची वॅगन ६० टनापर्यंत माल नेऊ शकते. म्हणजे पूर्ण ५८ वॅगन्स जोडलेली मालगाडी जास्तीत जास्त ३५०० टन कोळसा नेऊ शकेल. मालवाहतूक करणारी जहाजे किमान ८०,००० टन व कमाल २,००,००० टन माल नेऊ शकतात. तस्मात् मालगाडीच्या ५०+ फेऱ्यात जेवढा कोळसा नेता येईल, तितका कोळसा जहाजाच्या एकाच फेरीत नेता येईल. कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेच्या बरोबरीने जहाजांचा वापर करण्यामागे हे कारण असावे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 02/15/2023 - 10:49 नवीन
मुंद्रा पोर्ट ते उत्तरेकडील थर्मल पॉवर स्टेशनपर्यंत कुठले जहाज जाते?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/15/2023 - 12:06 नवीन
वरील छापील पत्रक वाचा.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 02/15/2023 - 15:08 नवीन
म्हणून म्हणतोय शेवटी ट्रेनच वापरणार आहे कोळसा वाहतुकीसाठी. मग हा जलमार्गाचा द्राविडी प्राणायाम कशासाठी?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/15/2023 - 15:18 नवीन
त्यामागे काहीतरी सबळ समर्थनीय कारणे असणारच. उगाच कोणी असा मार्ग आखणार नाही.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/15/2023 - 18:47 नवीन
मोती ने किया होगा कूच शौच के किया होगा
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 02/16/2023 - 08:40 नवीन
कंटेनर्सची आवक कमी झाल्याने अदानी पोर्ट या कंपनीचा फायदा कमी होत होता. त्यांचा फायदा वाढावा, भलेही देशाच्या इंधनाचे नुकसान झाले, ग्राहकांना, पंजाब सरकारला वीज महाग पडली तरी चालेल. असे सरळ समर्थनीय कारण असल्याचे वरील दुव्यानुसार स्पष्ट दिसते. ही नोव्हेंबर २०२२ मधील बातमी आहे. https://infra.economictimes.indiatimes.com/news/ports-shipping/coal-comes-to-the-rescue-of-adani-ports-as-container-volume-begins-to-slow/95288677
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/16/2023 - 09:43 नवीन
कंटेनर्सची आवक कमी झाल्याने अदानी पोर्ट या कंपनीचा फायदा कमी होत होता. त्यांचा फायदा वाढावा, भलेही देशाच्या इंधनाचे नुकसान झाले, ग्राहकांना, पंजाब सरकारला वीज महाग पडली तरी चालेल. असे सरळ समर्थनीय कारण असल्याचे वरील दुव्यानुसार स्पष्ट दिसते. असल्या हास्यास्पद व खुळचट दाव्यांवर विश्वास ठेवता? शिल्लक सेना किंवा राष्ट्रवादी वगैरे पक्षांचे कार्यकर्ते असल्या मूर्खपणाच्या दाव्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतील. परंतु इतरांना थोडे तारतम्य बाळगावे अशी अपेक्षा आहे. अदानी पोर्टवर कंटेनरची आवक कमी झाली याची काही तुलनात्मक आकडेवारी आहे का? अगदी कोरोना काळातही या बंदरावरून होणारी मालवाहतूक वाढली होती. मग नंतरच्या काळात का कमी होईल? जर या बंदरावरून होणारी मालवाहतूक कमी झाली असेल तर भारताची आयात तसेच निर्यातही कमी झाली असणार. मागील अनेक वर्षे भारताची आयात व निर्यात दरवर्षी वाढत आहे. पण मग अदानी बंदरावरून होणारी मालवाहतूक कमी झाली असा दावा असेल तर कदाचित व्यापारी जहाजे या बंदराऐवजी भारताच्या कोणत्यातरी दुसऱ्या बंदराचा जास्त वापर करीत असणार जेणेकरून अदानी बंदरावरून होणारी मालवाहतूक कमी होईल. पण युरोप, उत्तर आफ्रिका, पर्शियन खाडी या विभागातील देशांना भौगोलिकदृष्ट्या अदानी बंदरच सर्वात सोयीचे आहे. अदानी बंदराऐशजी कोणत्यातरी दक्षिणेतील बंदरावरून मालवाहतूक करणे हे आयात व निर्यात या दोन्हीसाठी वेळखाऊ व खर्चिक आहे. त्यामुळे कोणतेही सबळ कारण नसेल तर कोणतीही मालवाहतूक कंपनी अदानी बंदराऐवजी दुसरे लांबचे बंदर निवडण्याची शक्यता अत्यल्प आहे. असो. २०१४ पासून अदानी बंदरातून होणाऱ्या मालवाहतुकीचे आकडे खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अदानी बंदरावरून होणारी मालवाहतूक कमी झाली हे धादांत असत्य आहे हे वाचल्यानंतर समजेल. २०१८ मध्ये १८ कोटी मेट्रिक टन, २०१९ मध्ये २० कोटी मेट्रिक टन, २०२० मध्ये २२ कोटी मेट्रिक टन, २०२१ मध्ये २४ कोटी मेट्रिक टन, २०२२ मध्ये ३१ कोटी मेट्रिक टन मालवाहतूक अदानी बंदरातून झाली आहे. Total volume of cargo handled by Adani ports from 2014
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 02/16/2023 - 11:23 नवीन
गुरूजी हा दावा कोणत्याही पक्षाने केलेला नाही. खुद्द अदानी पोर्ट अॅंड एसइझेड चे सिईओ सुब्रता त्रिपाठी यांनी म्हटलेले, इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे. तसेच कोळसा वाहतुकीमुळे वाढ होईल, असेही म्हटले आहे. निदान दुवा वाचायचे कष्ट घ्यावे, ही विनंती. हे सगळं असं असलं तरी, तोच माल तिप्पट अंतर पार करून शेवटी पुन्हा रेल्वेनेच पंजाबात नेणे, यासाठी कोणतेही संयुक्तिक कारण दिसत नाही. पण मानायचेच नसेल, तर त्याला ईलाज नाही.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 02/16/2023 - 11:52 नवीन
बॅटिंग कोणत्या बाजूने करायची हे ठरलेले आहे मग कष्ट का घ्यावे?
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/16/2023 - 12:07 नवीन
बॅटिंग कोणत्या बाजूने करायची हे ठरलेले आहे मग कष्ट का घ्यावे? >> अगदी बरोबर बोललात तुम्ही. काही लोकांना खुट्ट झाले की श्री मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे किंवा राजीनामा द्यावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/16/2023 - 12:06 नवीन
मुळात या बातमीचे "Coal comes to the rescue of Adani Ports as container volume begins to slow" हे शीर्षकच खोडसाळ आहे. याच बातमीत लिहिलंय की "During H1 FY23, APSEZ handled 177.47 mt of cargo from 159.91 mt a year earlier, clocking a growth of 11 percent. The growth in cargo volume was led by dry cargo." आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ११% वाढ असतानही मालवाहतूक मंदावली हे शीर्षकच खोडसाळ आहे. पण त्माआधीच्या वाक्यात लिहिलंय ही वाढ ३% इतकी आहे. मग खरी वाढ ११% की ३%? अदानी बंदराचे सीईओ करण अदानींनी खालील वाक्य सुद्धा म्हटले आहे. “Overall, we are very confident of reaching the guidance of 350-360 mt for the full year." त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की कोळसा वाहतुकीचा वाढीसाठी नक्कीच उपयोग होईल.म्हणजे कोळसा नाही आला तर कमी वाढ होईल इतकेच. त्यामुळे अदानीसाठी मुद्दाम कोळसा रेल्वेऐवजी जहाजाने नेला जात आहे, हा निष्कर्ष खोडसाळपणा आहे. मी आधी लिहिल्याप्रमाणे यामागे निश्चितच काही सबळ कारणे असणार. ती कारणे कोणती हे सध्या तरी माहिती नाही. रेल्वेच्या तुलनेत एकावेळी मोठ्या प्रमाणात कोळसा नेता येईल हे एक कारण असू शकते. परंतु अदानीसाठी मुद्दाम जहाज वापरत आहेत हे कारण नक्कीच वाटत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/16/2023 - 14:00 नवीन
https://www.ibtimes.co.in/fact-check-why-coal-moved-by-sea-east-west-reasons-explained-facts-856600#:~:text=Based%20on%20proposal%20from%20Asian,averting%20power%20crisis%20and%20more. उत्तरेतील रेल्वे मार्ग हे आधीच अतिरिक्त भाराने भरलेले आहेत यामुळेच मागच्या वर्षी अनेक वीज निर्मिती केंद्रात कोळशाची टंचाई झाली होती आणि रेल्वेला प्रवासी वाहतूक थांबवून कोळशाची वाहतूक करावी लागली होती. Passenger trains in India make way for coal to stop power crisis https://indianexpress.com/article/india/passenger-trains-in-india-make-way-for-coal-to-stop-power-crisis-7893457/ 1,100 Train Trips Cancelled To Make Way For Coal Carriages As Power Crisis Worsens https://www.ndtv.com/india-news/1-100-train-trips-cancelled-to-make-way-for-coal-carriages-as-power-crisis-worsens-2948497 याशिवाय हा RSR (रेल्वे शिप रेल्वे मार्ग) काही केवळ पंजाब मधील वीज निर्मिती केंद्रांसाठी कोळसा नेणार नाही तर महाराष्ट्र आणि गुजरात येथील वीजकेंद्रांना कोळसा पुरवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. पण येथील कावीळ झालेल्या "त्याच यशस्वी" लोकांना सगळं जग पिवळं दिसतं यातला कोणीच काही करू शकत नाही. बाकी आजकाल आप आणि काँग्रेसचे काही नेते ( मनीष तिवारी, रणदीप सुरजेवाला इ) एखाद्या गोष्टी बद्दल आक्षेप घेऊ लागले कि ती गोष्ट बरोबरच असते असे आपोआप वाटू लागते (आणि असे अनेक वेळेस सिद्ध झाले आहे).
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/16/2023 - 14:07 नवीन
Firstly, the decision to use the coastal route to move coal from eastern India to Punjab was proposed by the Asian Development Bank. But the decision wasn't solely for Punjab, instead, it was for entire western India. the decision to use coastal shipping routes eases congestion on railway lines and rake shortage during the peak seasons. The movement of coal from Paradip to other ports along the eastern coast is feasible considering the vacant capacity at ports in the region and the proximity to power plants in southern India. As per ADB's estimations, certain thermal power plants have existing linkages with SECL, which is about 600 km from Paradip port. Shifting the linkage from SECL to MCL will reduce the first mile distance by 200 km from mine to load port. It will also reduce the total cost of coastal shipping, which will be lower than current rail cost from SECL. With this, cost of moving coal from east India to Gujarat Urja Vikas Nigam Ltd's Wanakbori power plant will be lower by Rs 200 per tonne. This addresses the cost issue raked by the opposition ministers. The Center has also taken the power and fuel crisis into consideration for choosing the coastal route for moving coal. Many states had reeled under the power shortage last summer, due to which the state-owned Coal India had to import coal for the first time since 2015. Besides all these reasons, coal movement of coal via coastal route will be more environmentally friendly as compared to road and rail emissions. Hence, the decision is in line with India's climate change commitments.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 02/16/2023 - 01:02 नवीन
आग्या१९९० याचे संपूर्ण आर्थिक गणित + इतरही मुद्दे असतात ( कदाचित ट्रेन ची क्षमता पुरेशी नसेल ) तेवहा हे गणित समजल्याशिवाय कसे काय कोणी म्हणू शकते हे चुकीचे कि बरोबर ते ? का केवळ मोदी सरकार ने केले म्हणजे चुकीचेच किंवा बरोबरच ? एकदा ऐकलेली आर्थिंक गंमत सांगतो न्यू झीलंड पासून ऑस्ट्रेल्या चा पश्चिम किनारा (सिडनी ) येतेच माळ पाठवणायसाठी कधी कधी तो जपान मार्गे पाठवणे किफायतशीर होते कारण असे कि जपान ते सिडने आणि जपान ते ऑकलंड ( न्यू न्यू झीलंड) यात जहाज वाहतूक बरीच होती / असते पण त्यामानाने ऑकलंड ते सिडनी कमी होती बरेचदा ऑस्ट्रेल्या ते यूरोप विमान भाडे आणि ऑस्ट्रेलाय ते भारत विमान भाडे याची तुलना केली तर आश्चर्य वाटते ... कि अंतर आणि वेळ पाहता यूरोप चे भाडे दुप्पट तरी असले पाहिजे पण तसे नसते ... कारण एकूण मागणी आणि पुरवठा याचे गणित
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/15/2023 - 06:26 नवीन
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी आमची चौकशी सुरु आहे, तसेच शेयर बाजातील व्यवहारासंबंधी नियमांचे उल्लंघन झाले आहे काय, याचीही अहवाल येण्यापूर्वी व त्यानंतरही चौकशी सुरु आहे, अशी माहिती सेबीने सर्वोच्च न्यायालयात दिली. ( लोकसत्ता ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 02/17/2023 - 04:01 नवीन
https://www.aksharnama.com/client/article_detail/6578 पैलू पाडलेले हिरे निर्यात करून कसा कर परतावा मिळवला जातो ह्याची रोचक माहिती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/17/2023 - 05:16 नवीन
जगातील कोणता उद्योग गट असे करत नाही? फार कशाला आपले जवळ जवळ सर्वच्या सर्व राजकारणी सुद्धा असेच करत आले आहेत. रॉबर्ट वाद्रा पासून सर्व जण असे झोल करत असताना दिसतात. टाटा यांचे उद्योग साम्राज्य सुद्धा एके काळी चीनला अफू विकून मिळवलेल्या गडगंज नफ्यातूनच उभे राहिलेले आहे. एके काळी याच टाटा बिर्ला यांचा समाजवादी मत्सर करताना दिसत असत. नफा मिळवणे हा हेतू असल्याशिवाय उद्योग उभा राहू शकत नाही आणि सरकारने उद्योग धंदे चालवणेयाच्या सारखा आतबट्टयाचा व्यवहार नाही. समाजवादी किंवा साम्यवादी विचारसरणी मुळात दळभद्री आहे सुखोई २७ हे विमान सरकारी आस्थापन HAL ने भारतात तयार केल्यास एका विमानाला ४१७ कोटी रुपये लागतात या ऐवजी थेट रशिया कडून आयात केल्यास २७० कोटी लागतात. . हे वरचे १४७ कोटी रुपये सामान्य करदात्यांचा खिशातूनच जातात. म्हणजेच HAL कडून २ विमाने घेण्याऐवजी थेट रशिया कडून ३ विमाने घेणे जास्त श्रेयस्कर आहे. पण सध्या श्री मोदींवर कोणता आरोप चिकटवता येत नाहीये म्हणून श्री अदानी ( ते केवल गुजराती आहेत म्हणून) वर आगपाखड करण्यात येथील कावीळ झालेले समाधान करून घेत आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/19/2023 - 04:44 नवीन
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात चार याचिका आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी, गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण व्हावे, आणि या व्यवहारासाठी कठोर कार्यवाहीसाठी आणि उपाययोजनासाठी समिती नेमली पाहिजे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यासाठी सरकारच्या वतीने बंद लिफाफ्यात सरकारने काही नावे दिली होती. मात्र, मा.न्यायालयाने ते बंद लिफ़ाफ्यातील नावे स्वीकारण्यास नकार दिला. पार्दर्शकता आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास बसावा यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती करु असे खंडपिठाने म्हटले आहे. निष्पक्ष चौकशी होऊन सर्व घोळ आणि त्याच्या पालामुळांचा शोध लागेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही, असे वाटते -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 02/19/2023 - 11:10 नवीन
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती करु असे खंडपिठाने म्हटले आहे. चला म्हणजे भारतात अजून तरी हुकूमशाही आली नाहीये, सर्वोच्च न्यायालय स्वत्रंतच आहे की ! कारण गेले काही वर्षे लोकशाही ची गळचेपी फॅसिसिस्ट राजवट वैगरे डावे गोलंदाज सतत गोलंदाजी करीत आहे,,,म्हणून मनात विचार आला
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 02/20/2023 - 06:41 नवीन
भाजप जिंकला की ई व्ही एम ह्याक झालेली असतात, आणि काँग्रेस जिंकली की ई व्ही एम व्यवस्थित चालत असतात. तद्वतच, यांना हवे तसे निर्णय आले तर सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय संस्था इ स्वायत्त आणि सार्वभौम. अन्यथा केंद्र शासनाच्या बटीक!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 02/20/2023 - 07:42 नवीन
कितीही भुंकलं तरी हत्तीला शष्प फरक पडत नाही हे पाहून श्वानांना वैफल्य येते तद्वत हा प्रकार आहे. त्यातून २०२४ मध्ये श्री मोदीच परत येणार आहेत यामुळे सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी स्थिती आहे चालायचंच
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा