Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारताच्या तुलनेत

उ
उपयोजक
गुरुवार, 12/29/2022 - 16:33
🗣 204 प्रतिसाद
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे. हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 49486 views

🗣 चर्चा (204)
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2023 - 04:29 नवीन
उत्तम प्रतिसाद. सर्व मुद्द्यांशी सहमत.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 01/08/2023 - 05:57 नवीन
मोदी सरकारने attested प्रतींचा हट्ट सोडल्याने कितीतरी व्यवहार सोपे झाले आहेत .
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sun, 01/08/2023 - 07:47 नवीन
हा मनमोहन सिंग यांच्या काळापासूनच आहे. तसेच थेट लाभार्थ बँकेत जमा होण्याची सुविधा यांचेदेखील श्रेय मनमोहन सरकारला आहे. माझ्या मनमोहन सिंग यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरापेक्षा ज्याचे श्रेय त्याला मिळावे या आग्रहाखातर हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 01/08/2023 - 06:08 नवीन
खरंय. माझ्या प्रत्येक कागदावर पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. आधार, वाहन परवाना, बँक खाते१, बँक खाते२ प्रत्येक ठिकाणी एकच पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. + डिलीव्हरीसाठी कितीही व्यवस्थित पत्ता लिहिला, तरी प्रत्येक वेळी त्याला सांगावं लागतं. शेवटी तो चुकीच्या जागी पोचतो, मग तिथे जाऊन घ्यावं लागतं. याचा उपमुद्दा - पत्ता बदलल्यास तो एका कागदावर (उदा. आधार) बदलल्यास सगळीकडे आपोआप जायला हवा. आधारवर बदला, मग निवडणूक पत्र बदला, मग दोन तीन बँकांत आणि इतर दोन खात्यात बदला, मग गॅस कंपनीत बदला.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/09/2023 - 07:00 नवीन
मी IIT मुंबईत होते तेंव्हा कुणालाही पत्ता द्यायचा म्हणजे दिव्य होते. अगदी फ्लिपकार्ट सुद्दा "लँडमार्क" सांगा म्हणायचे. वोडाफोन ने "लँडमार्क" नाही म्हणून दोन वेळा माझे पोस्टपेड कनेक्शन कापले. मग कुणीतरी लँडमार्क मध्ये JVLR असे लिहा असे सांगितले. (IIT बाहेरच्या रोड चे नाव आदी शंकराचार्य मार्ग आहे पण बहुतेक लोकांना ह्याची माहिती अजिबात नाही), JVLR ह्या चा अर्थ मला आजतागायत ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2023 - 07:43 नवीन
या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे अरे देवा, वरील काही ओळी वाचून हर्ट झालो. बाकी विचार मुद्दे महत्वाचे आहेत. सहमती आहेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 01/08/2023 - 08:47 नवीन
धन्यवाद.
१. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण
घरात राहणार्‍या लोकांना ज्या ठिकाणी राहतो त्यांची नोंद त्या ठिकाणी करण्याची सक्ती असावी. सध्या कोण कोठे रहातो त्याची पडताळणी कशी करावी ह्यासाठी कंपनीचे पत्र पासुन आधार कार्ड काहीही चालते. खोटा पत्ता देणे सहज शक्य आहे, त्यामुळे दिलेल्या पत्यावर विश्वास ठेवणे मुश्कील आहे. अजुन काही माझ्यातर्फे
  1. कंत्राट, दायित्व (liability): जेव्हा कोणी व्यवसायिक सल्ला देतो तेव्हा त्या व्यवसायिकाला सल्ल्याचे दायित्व असावे. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
  2. सरकारी कामे वेळेत व्हावीत, दिलेल्या अर्जाची पोच मिळावी, कायदे सर्वासाठी समान असावेत. लाचखोरी बंद व्हावी. सर्वसामान्य माणासांना त्याबद्दल तक्रार करायची सोय असावी, आणि त्यांचे निवारण व्हावे.
  3. छोट्या छोट्या कंत्राटांसाठी महसुल खात्याच्या मुंद्राकाची गरज नसावी.
  4. कोणाला दिलेले पैसे सहज वसुल करता यावेत. छोट्या छोट्या कामासाठी वकील, न्यायालयाची गरज नसावी.
  5. मुलांना लहान पणापासुन शिस्त पालन महत्व असावे.
  6. छोटे कायदेभंग करणार्‍या आणि अट्टल न झालेल्या लोकासाठी आर्थिक दंडाबरोबर, सक्तीची समाजसेवा (उ. मंदीरापुढे चपला साफ करणे, संडास साफ करणे, रस्ते साफ करणे इ.) असावी.
  7. मोठे तुरुंग बांधावेत. बरेचदा रस्त्यावर मुले, माणसे कायद्याचे पालन करत नाहीत. जेव्हा त्यांना योग्य त्या संधी देऊन त्यात सुधारणा होत नसेल तर त्यांना तुरुंगात ठेवावे. त्यांच्या कडुन शारिरीक श्रम करुन ठेऊन रस्ते तयार करणे, तलाव बांधणे अशी समाजउपयोगी कामे करुन घ्यावीत (मला माहिती आहे की हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो.)
  8. समाज, छपाई, दुरचित्रवाणी माध्यमावर दायित्व कायदा असावा. विनाकारण चरित्रहनन करणार्‍याविरोधात कडक कायदे असावेत.
  9. कोणत्याही कामासाठी राज्याच्या राजधानीत जायची गरज पडु नये, कामे तालुक्यात, कमीत कमी जिल्ह्यातच व्हावीत.
  10. ग्रामिण भागातील कचरा व्यवस्थापन सुधारावे. काच, धातु, प्लॅस्टीक, ओला कचरा, इतर कचरा वेगवेगळा व्हावा.
  11. ध्वनीप्रदुषण थांबावे. धर्म, जात, पंथ, जयंत्या, पुण्यतिथ्या इ. खाजगी गोष्टी व्हाव्यात. सार्वजनिक ठिकाणी, रस्ते अडवणुक बंद व्हावी
  12. ईशनिंदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यावे.
  13. बास आता. :)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 01/08/2023 - 09:25 नवीन
12. ईशनिंदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यावे.
100% agreement
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 01/20/2023 - 19:58 नवीन
भारतातील प्रदुषणाबद्दल अजुन कोणी लिहीले नाही. -उत्तर भारतातील बहुतेक भुभागावर आणि इतर भारतातील मोठ्या शहरामध्ये वायुप्रदुषण भयंकर आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 01/24/2023 - 19:38 नवीन
ऑस्टेलियात पंतप्रधानाला घरच्या हिरवळीवरुन बाजुला जायला सांगितले. असे कधी भारतात दिसु शकेल का? साधा नगरसेवक झाला की लोकांना इतका रुबाब वाटतो की बघायला नको. तसेही भारतातील मंत्री, अधिकारी जनतेचे सेवक कमी आणि मालक जास्तच वाटतात.
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Sat, 01/14/2023 - 06:49 नवीन
पत्त्यासंबंधी थोडी जाहिरात धागा. आता तर हे पद्धत वापरणे खूप सोपे झाले आहे. गुगल मॅप वर पण प्लस कोड दिसतो
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2023 - 07:32 नवीन
सुरु ठेवा. अधुन मधुन वाचत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 01/08/2023 - 07:58 नवीन
सर्वसामान्य लोकांना अजुन एक भेडसवणारी अडचण -- रस्तोरस्ती असलेले भटकी कुत्री, गुरे, पक्षी इत्यादी. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील होऊन जाते.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/09/2023 - 06:52 नवीन
देशांतील लोकांवर प्रेम नसते तर विषयावर लिहून मी वेळ वाया घालविला नसता. मी भारत देशाला घाणेरडा, भिकार आणि मागासलेला असे जे म्हटले आहे ते देशाचा किंवा तेथील लोकांचा अपमान करायच्या हेतून म्हटले नाही. फक्त वस्तुस्थिती विशद केली आहे. लठ्ठ महिलेला तुम्ही सडपातळ म्हटले म्हणून तिचे ४ पौंड वजन कमी होत नाही. देशांत कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे ह्यांत अजिबात शंका नाही आणि त्याला जोड म्हणजे लोकांत स्वच्छते विषयी नसलेले प्रेम. सर्व भारतीय सार्वजनिक ठिकाणे अत्यंत घाण आहेत ह्यांत शंका नाही. विविध समुद्र किनारे, चित्रपट गृहे, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी कचरा आहेच पण गांवात सुद्धा कचरा उघड्यावर फेकला जातो, ऐपत असलेले लोक सुद्धा मुद्दाम उघड्यावर शौच करतात आणि सर्व ठिकाणी पण खाऊन थुंकून ठेवतात. देशावर प्रचंड प्रेम असलेला माणूस सुद्धा ह्या गोष्ट नाकारू शकत नाही. ह्याला घाणेरडा म्हटले तर त्यांत चुकले काय ? भिकार शब्द प्रयोग सुद्धा वस्तुस्थिती विशद करण्यासाठीच वापरला आहे. देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते. हि भीक नाही तर काय आहे ? आणि मागासलेला हे विशेषण तर जवळजवळ ऑफिशिअल आहे. ह्यासाठी वेगळे पुरावे देण्याची सुद्धा गरज नाही. विकसित देशांत आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो त्या इथे आम्हाला धडपडून सुद्धा मिळत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. मूळ मुद्दा म्हणजे जो पर्यंत देशांत काय कमी आहे ह्या गोष्टी लोक प्रांजळ पणे मान्य करत नाहीत तो पर्यंत त्यांत सुधारणा होणे शक्य नाही. मोदी ह्यांनी संडास ह्या विषयवार इतकी भाषणे दिली कि त्याच्यावर टीका झाली होती कि पंतप्रधानांनी अश्या विषयवार बोलणे योग्य आहे का ? पण ते बोलले म्हणून थोडाफार तरी बदल आला कि नाही ? स्वच्छ भारत स्कीम बहुतांशी फोटो=ओप म्हणू न वापरली गेली तरी थोडा बदल तरी समाजांत दिसून येतो कि नाही ?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 01/09/2023 - 07:08 नवीन
देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते.
कुठ्ल्या काळातले सांगताय तुम्ही? आज भारतातली १००% जनता GST च्या रुपाने कर भरत आहे. ह्याला रस्त्यावरचा भिकारीही अपवाद नाहीये! हा पण सर्वसामान्य जनतेकडुन गोळा होणारा कराचा पैसा जेव्हा सरकार नको त्या ठिकाणी खर्च करते ते मात्र नक्कीच खटकते, जसे कि युक्रेन युद्धामुळे तिथे स्वार्थासाठी गेलेल्या लोकांना फुकटात देशात परत आणणे वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 01/09/2023 - 12:28 नवीन
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? भारतात काय कमी आहे यावर जीतकी आग्रही मते या धाग्यावर मला दिसत आहेत तितकी उपरोक्त ठळक गोष्टींवर येताना दिसत नाहीत. याचा अर्थ एकतर तिकडे सगळे आलबेल व १०० टक्के चांगल्याच गोष्टी आहेत असा घ्यायचा का? की परदेशातील वाईट गोष्टी कबूल करण्यात परदेशस्थ भारतीयांना कमीपणा वाटतो? गेल्या काही महिन्यात एका तूनळीवर ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांची मुलाखत पाहण्यात आली. त्यामध्ये तेथील विद्यार्थ्यांनी परदेशात शिकायला गेल्यामुळे किती आर्थिक ताण येतो, तेथे कसं जूळवून घ्यावं लागतं याबाबत माहिती दिली. त्यामधल्या बऱ्याच जणांनी शैक्षणिक कर्ज घेऊन तो देश गाठला होता व तिथंच राहून पैसे मिळवून कर्ज फेडलयाशिवाय भारतात परत येता येणं शक्य नव्हतं. एका मुलीचा स्पेशलायजेशन विषय तेथे कायमचे वास्तव्य करण्यासाठीच्या अटीमध्ये बसत नव्हता. हे तीला खूप उशीरा कळाले. तीला आता भरतात परत यायचंय परंतू तीच्या आईवडीलांनी तीला कर्ज फेडल्याशिवाय भारतात परत यायचं नाही असं स्पष्ट सांगतीलं. कारण तिथलं महागडं शिक्षण घेऊन इथे कमी पगारावर नोकरी करुन हप्ते फेडता येणे शक्य नव्हते. एकाही विद्यार्थ्यांला भारतात परत यायचंच नाही असं दिसत नव्हतं. परंतू त्यांना एकूण अर्थकारणामुळे (शैक्षणिक कर्ज फेडणे+नंतरचे स्थैर्य मिळण्याकरीता) तिथेच राहणं भाग होतं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून वाटलं. तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे. परंतू आपणच आपल्या अपेक्षा वाढवल्या आहेत. असो. अशा प्रकारच्या काही बाजूंवर परदेशस्थ भारतीय प्रामाणिकपणे व्यक्त झाले तर बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना त्यानुसार मार्गदर्शन करता येईल. अन्यथा धागा भरकटलेला आहेच.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/09/2023 - 14:21 नवीन
होय पण धाग्याचा मूळ विषय लोक सोडून का जात आहेत हा आहे. सोडून जाण्यात काय धोके असतील हा नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/10/2023 - 05:09 नवीन
तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे वाट्टेल ते ??? हा तुमचा ( कदाचित भारतातील रहिवासी आणि तेथील या संदर्भात ) विचार पाश्चिमात्य देशात बरीच कामे हलकी समजली जात नाहीत ... त्यामुळे वाट्टेल ते वैगरे फक्त तुमच्या पुरते उलट मी अ रे म्हणेन कि भारतातात हि "वाट्टेल ती कामे " लोक करायला लागली तर बरेच, विशेष करून विद्यार्थी असताना कमवणे / बचत करणे ,,, इत्यादी असो मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे हो करू शकतात ना नाही कोण म्हणतंय ? पण "चांगलं" म्हणजे नक्की काय .. कार्यालयात भारतात काय आणि पाश्चिमात्य देशात काय संख्याच दर्जाचे काम कराल हो पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"? मग हे तत्व वापरलं तर शहरातून खेड्यातच राह्यला पाहिजे ! जमेल ???
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 01/10/2023 - 19:02 नवीन
पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"? मला ह्या प्रवासाचा भारतात इतका बाउ का केला जातो तेच समजत नाही. मी अगदी कोरोना चे लॉकडाउन सुरू होइ पर्यंत रोज १ - १.२५ तास कार / बस किंवा कार / मेट्रो रैल असा प्रवास जवळपास १० -१२ वर्षे नियमीत केला आहे. तेही उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्या तीन्ही ॠतु मधे. यात रोज जवळ्पास अर्धा मैल पायी पण चालावे लागे. भारतात लोकांना डोर टु डोर सर्वीस लागते. माझ्या ऑफीस मधे माझ्या पेक्षा जास्त प्रवास करुन अगदी सायकल वरुन येणारे पण अनेक लोक होते. मी कधीही कुणालाही ह्या प्रवासाचा त्रास होतो. मी थकुन जातो वगेरे वगेरे बोलताना पाहिले नाही. तसेही भारतात मी होतो तेव्हा ऑफीस म्हणजे १० - ५ (वर मधे १ तास लंच ब्रेक) असला प्रकार होता. इथे ऑफीस ८ - ५ असते. तरीही कुणी फार काम करतो मला त्रास होतो अशा तक्रारी करत नाही. भारतीय पण नाही. मग ह्या तक्रारी भारतातच का केल्या जातात?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 01/09/2023 - 15:28 नवीन
मुळात भारताची तुलना लगेच अमेरिकेशी किंवा युरोपियन राष्ट्रांशी करणे चुकीचे आहे. हा आपले ध्येय मात्र त्यांच्यासारखे पुढारलेले बनणे असले पाहिजे. फार फारतर आपण दहा वर्षां पूर्वीचा भारत आणि आजचा भारत ह्यांची तुलना करायला पाहिजे.खरतरं एखाद्या देशासाठी १० वर्षं हा काळ सुद्धा अतिशय कमी आहे. पण एका दशकात आपली दिशातरी योग्य आहे का याचे निपक्ष विश्लेषण तज्ज्ञांकडून व्हायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 01/09/2023 - 19:57 नवीन
ज्याप्रमाणे भारतीय लोक भारताबाहेर दीर्घ मुदतीच्या वास्तव्यास सर्रास जातात तसे भारतात दीर्घ मुदतीकरिता वास्तव्यास लोक येत असतील का ? असल्यास कोणत्या देशातून (नेपाळ व बांग्लादेशातून येतात, पण त्या खेरीज ) ? त्यांचे भारतात स्थायिक होण्याचे कारण / प्रेरणा काय असाव्यात ?
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/09/2023 - 22:16 नवीन
बांगलादेशी, नेपाळ, भूतान, श्री लंका, नायजेरिया काही अरब राष्ट्रे इत्यादी देशांतून लोक कायदेशीर किंवा बेकायदेशीर पणे भारतांत वास्तव्य करतात. अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत. स्पेन, पोर्तुगाल आणि व्हिएतनाम हि तीन राष्ट्रे सध्या पाश्चात्य देशांत देश सोडून जाण्यासाठी महत्वाची आहेत. व्हिएतनाम मध्ये तुम्हाला खूप कमी पैश्यांच्या गेटेड अमेरिकन कम्युनिटी मिळते. पोर्तुगाल अँड स्पेन चे हवामान खूप चांगले आहे आणि राहणीमान उच्च असल्याने अनेक लोक तिथे निवृत्त होऊन जातात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/10/2023 - 03:52 नवीन
नायजेरियन, अफगाणी, बांगडे, पाकडे वास्तव्य संपल्यानंतरही परत जात नाहीत व भारत सरकार काहीही करत नाही. अनेक नायजेरियन, अफगाणी अंमली पदार्थ विकतात. वास्तव्य किंवा अंमली पदार्थ व्यापारावरून त्यांना पोलिस पकडायला गेले की ते झुंडीने हल्ला करून पोलिसांना पळवून लावतात. २०१० च्या दशकात अदनान सामीने बराच आयकर भरला नव्हता व वास्तव्य परवाना संपल्यानंतरही आरामात मुंबईत रहात होता. इतर देशात अश्या व्यक्तीला तुरुंगात टाकून नंतर हाकलून दिले असते व नंतर भारताबाहेर हाकलून परत कधीही भारतात येण्यासाठी आयुष्यभराची बंदी घातली असती. परंतु भारत सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तश्या परिस्थितीतही त्याच्या वास्तव्य परवान्याची मुदत वाढवून दिली व नंतर या गुन्हेगाराला काहीही शिक्षा न करता चक्क नागरिकत्व देऊन टाकले. Nigerian mob attack cops बनाना रिपब्लिक ही संज्ञा भारतावरूनच निर्माण झाली असावी.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Tue, 01/10/2023 - 09:24 नवीन
चक्क नागरिकत्व
नुसते नागरिकत्व नाही. २०१६ ला त्याला नागरिकत्व दिले गेले आणि २०२० ला तर चक्क पदमश्री बहाल करण्यात आली. हे खरे बनाना(और लोगोंको बनाना भी) रिपब्लिक. त्याचे वडील अर्शद सामीखान जे मुळचे काश्मीरी आणि पख्तू सांगतात ते पाकिस्तानी एअरफोर्समध्ये पायलट आणि नंतर राजदूत वगौइरे असले तरी अदनान चा जन्म, शिक्शण ब्रिटिश होते. नंतर तो कॅनडा स्थायीक होता.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/10/2023 - 09:43 नवीन
भारत २०१४ पूर्वी बनाना रिपब्लिक होता व २०१४ नंतरही बऱ्याच प्रमाणात तसाच आहे. मुख्य फरक पडलाय तो परराष्ट्र संबंध आणि लष्करी प्रतिसादात. पाकिस्तान किंवा चीनने आगळीक केली तर भारत फक्त तोंडी निषेध करायचा. आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. तसेच मलेशिया, टर्की वगैरेंनी भारताविरुद्ध काहीही केले तरी भारत लगेच त्यांच्या नाड्या आवळतो. परंतु इतर विषयात अजूनही सुधारणा नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 01/15/2023 - 06:22 नवीन
२०१४ नंतर आणखी एक फरक पडलाय. २०१४ पूर्वी कल्याणकारी योजनांवर सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयातील फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहचायचे. २०१४ नंतर लाभार्थींपर्यंत जास्त पैसे पोहोचायला लागले आहेत आणि हे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे मी भारताच्या भविष्याबाबत आशावादी आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 01/24/2023 - 00:04 नवीन
> आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. हे सुद्धा फक्त प्रसिद्धी मिळवण्याची थोतांड असू शकते. लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. भारताने कतार पुढे जे लोटांगण घातले आणि एका तथाकथित गुअस्वलाने हिंदू महिला नुपूर शर्मा हिचे आयुष्य सरेआम उध्वस्त केले त्यावरून परराष्ट्र धोरण ह्यांत सुद्धा बोलबच्चन पणा जास्त आहे असे वाटते. सत्य कळायला अजून अवकाश आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन Wed, 01/25/2023 - 08:17 नवीन
लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. तुमचा भारतातील लष्करा वर विश्वास नसेल आणि परराष्ट्र धोरणा विषयी संशय वाटत असेल तर तूम्ही भारत आणि भारतीयांना दोष देण्यासाठीच मिपावर येता असे वाटते. क्रुपया आम्हाला आपला बहुमोल सल्ला देण्यात [नावे ठेवण्या त ] आपण आपला[व आमचा] बहूमुल्य वेळ वाया घालवू नये ही मनापासुन विनंती.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 01/10/2023 - 11:32 नवीन
अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत.
धन्यवाद. पण नोकरी/व्यवसायाच्यानिमित्ताने परदेशी नागरिक भारतात किती प्रमाणात वास्तव्यास असतील ? जसे अमेरिकेतील गुगल, मायक्रोसॉफ्ट , नासा ई मोठ्या आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय वा इतर देशांतले परदेशी (अमेरिकन नसलेले) नागरिक नोकरीस आहेत त्याप्रमाणे भारतात अशी कुठली आस्थापने आहेत का जिथे परदेशी लोकांना नोकर्‍या दिलेल्या आहेत ? भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ? म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ?
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 01/10/2023 - 12:05 नवीन
भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ?
शिक्षणव्यवस्थेपेक्षा यशस्वी व्हायला कायदे व्यवस्था सक्षम लागते. उदा. कोणत्याही गोष्टीसाठी अनुत्पादक वेळ/खर्च आणि उत्पादक खर्च्/वेळ अश्या दोन गोष्टी लागतात. अनुत्पादक वेळ/खर्च वाढल्याने उत्पादन वाढत नाही, पण तो न केल्यास उत्पादन करतायेत नाही, उदा. सरकारी परवानग्या, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, मालवाहतुकीला केलेला खर्च, व्याजाचा दर, कर्जाची सहज उपलब्धता, मनुष्यबळ, निकोप स्पर्धा इ.इ. भारतामध्ये ह्या कामाचा खर्च खुप आहे. शिक्षण घेताना ह्या गोष्टी फार आड येत नाहीत, आणि भारतातुन परदेशात गेलेल्या लोकांना कष्ट करण्याशिवाय कोणताय पर्याय नसतो, आणि परत जाउन भारतात करायचे काय हा प्रश्न असतो.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 01/11/2023 - 08:06 नवीन
ह्याचे उत्तर जास्त खोलांत जाऊन द्यावे लागेल पण सध्या थोडक्यांत सांगते. लोकांचे यशस्वी होणे शिक्षण व्यवस्थेपेक्षा समाजावर अवलंबून आहे. इतरांनी नोंद केल्या प्रमाणे कायद्याचे राज्य, योग्य प्रकारे काम करणारी कोर्ट व्यवस्था, सुधृढ फायनान्स व्यवस्था, आपल्या मालमत्तेचे रक्षण व्यवस्थित होणे, सरकार दरबारी कामे व्यवस्थित आणि वेळेत होणे इत्यादी अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. मागासलेल्या देशांत ह्या मूलभूत कमतरता असल्याने सर्वच लोकांना संधी कमी उपलब्ध असतात. शिक्षण (आणि व्यवसाय अनुभव, स्किल इत्यादी) एखाद्या multiplier प्रमाणे काम करतात. आता एखादी मुलगी समाजा काहीही ट्रेनिंग नसतात भारतात सलून मध्ये थ्रेडींग चे काम करते तर कदाचित ती महिन्याला ५००० कमावते तीच मुलगी प्रगत देशांत घेतल्यास साधारण $३००० डॉलर्स कमावेल. त्याच मुलीने समजा ब्युटिशियन कोर्स वगैरे केला तर भारतातील सलून मध्ये ती २०,००० कमावेल तर इतर देशांत कदाचित $५०००. भारत देशांत राहून जर पत उंचावण्याची असेल तर तुम्हाला उच्च दर्जाचे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण उच्च शिक्षण शक्य नसेल तर तुम्ही विदेशांत जाऊन जास्त कमावू शकता (शिक्षण नसले तरी). हे वाचा https://deeshaa.org/2016/04/05/a-misplaced-sense-of-pride/
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 01/11/2023 - 08:18 नवीन
> म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ? पाश्चात्य जगाची प्रमुख समस्या म्हणजे एकूण सर्वच प्रकारच्या मनुष्यबळाची कमतरता आहे. अमेरिकेत सध्या दर वर्षी १० - २५ लाख लोक कायदेशीर मार्गाने येतात तर १०-३० लाख लोक बेकायदेशीर मार्गाने येतात आणि इतके असून सुद्धा देशांत प्रचंड प्रमाणात नोकर्या खाली आहेत. कानडा, फ्रांस आणि जर्मनी ह्यांची परिस्थिती सुद्धा तीच आहे. कॅनडा ने तर मागील वर्षी रिकॉर्ड नंबरच्या विदेशी लोकांना आपले नागरिकत्व दिले. अमेरिकन शिक्षण व्यवस्थेने कितीही सुशिक्षित लोक निर्माण केले तरी अर्थव्यवस्था वाढून त्या सर्व लोकांना कवेंत घेते. ह्यांत आश्चर्य नाही आणि ह्या विषयावर मी मिसळ पाव वर खूप विस्ताराने लिहिले होते असे आठवते. लोक आणि अर्थव्यवस्था ह्यांचे फीडबॅक लूप असते. जगांत जितके जास्त लोक तितक्याच वेगाने समाज प्रगती करतो आणि जितक्या वेगाने समाज प्रगती करतो तितक्याच वेगाने आणखीन लोकांची गरज भासू लागते. पण त्या लेव्हल ला पोचायला समाजाच्या काही मूलभूत समस्या सोडवाव्या लागतात. भारत अजून त्या स्तराला पोचला नाही. पण काही क्षेत्रांत उदाहरणार्थ IT मध्ये हा इफेक्त्त तुम्ही पाहू शकता.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 01/10/2023 - 02:48 नवीन
एखादे मूल अमेरिकन भूमीवर जन्माला आले तर त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळते का? म्हणजे, एक भारतीय गरोदर स्त्री आठव्या महिन्यात अमेरिकेला गेली आणि तिथे महिना-दोन महिने राहून तिने आपल्या बाळाला जन्म दिला तर त्या नवजात अर्भकाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळते का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/10/2023 - 03:37 नवीन
हो. पण भारताबाहेर गर्भधारणा झाल्याने व ती महिला अमेरिकन नागरिक नसल्याने विमा कंपन्या बाळंतपणाचा, औषधांचा, उपचारांचा, बाळंतपणानंतर लागणाऱ्या उपचार व औषधांचा खर्च देणार नाही. तो संपूर्ण खर्च स्वतःलाच करावा लागेल व तो खर्च प्रचंड असेल.
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Tue, 01/10/2023 - 20:00 नवीन
श्रीगुरुजी - विमा कंपन्यांनी कव्हर करण्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही. व्हिसावर आले असतील आणि अशा स्त्रीचा किंवा तिच्या नवर्‍याच्या नोकरीतून विमा असेल (सहसा असतोच) तर त्यातून कव्हरेज मिळेल. एखादी स्त्री फिरायला म्हणून आली, विमा नाही आणि परतही गेली नाही तर तुम्ही म्हणता तसे स्वखर्चाने करावे लागेल. पण त्यातही "ड्यू" असलेल्या स्त्रीला कोणी इमरजन्सी सर्व्हिस नाकारेल असे वाटत नाही. एरव्ही रीतसर डिलीव्हरीकरता कोणत्या रूग्णालयात नाव नोंदवायला गेली तर तेथे हा खर्च कोण करणार हे नक्की विचारतील. त्याशिवाय बहुधा नोंद करू देणार नाही. इमर्जन्सी वगळता.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 01/10/2023 - 23:34 नवीन
हे विमा करारावर अवलंबून आहे. बर्थ पर्यटन हि एक गोष्ट असून साधारण १५,००० मध्ये C सेक्शन करून दिले जाते.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 01/10/2023 - 03:39 नवीन
कायदेशीर किचकट कीती आहे ते माहीत नाही. परंतु अमेरिकन भुमी वर जन्म झाला तर आपोआप नागरीकत्व भेटते.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/10/2023 - 04:34 नवीन
अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन पासपोर्ट बनतो. पूर्ण नागरिकत्व. इतकेच नव्हे तर नाममात्र तिकडे जन्म झालेल्या आणि लहानपणापासून भारतात परत येऊन इथेच वाढलेल्या लोकांना मोठे झाल्यावरही अमेरिकन एम्बसीचे फोन येताना पाहिले आहेत. म्हणजे भारतात काहीतरी unrest किंवा तंग परिस्थिती झाली होती, तेव्हा तुम्ही ताबडतोब सुखरूप अमेरिकेत परत या,. आणि अमेरिकन नागरिकांसाठी खबरदारीच्या गाईडलाईन्स वगैरे. माझ्या मते १८ वर्षे वय झाल्यावर मनुष्य याबाबत फायनल ठरवू शकतो. पण कोणीही ते नागरिकत्व रद्द केल्याचे ऐकिवात नाही, अपेक्षित देखील नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 01/10/2023 - 05:39 नवीन
पूर्वीच्या अनुभवांवरून त्यासंदर्भातले बरेच नियम आता बदलण्यात आल्याचे मागे वाचले होते. गरोदर स्त्रीचा गर्भधारणाकाळ आणि अंदाजित प्रसूतीची वेळ (EDD) विषयक प्रसूतीतज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र व्हिसा आणि विमानप्रवास अशा दोन्ही गोष्टींसाठी अनिवार्य आहे (त्या आधारे व्हिसा आणि विमानप्रवास पैकि एक किंवा दोन्ही नाकरले जाउ शकते) तसेच आणखिनही काही तरतुदी केल्या आहेत त्यामुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 01/11/2023 - 08:11 नवीन
> मुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. किमान अमेरिकेच्या बाबतीत हे पूर्णतः खोटे आहे असे सांगू शकते. birth सिटिझनशिप हा अमेरिकेत घटनात्मक अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्ट्स च्याखूप जुन्या निवाड्याप्रमाणे आई देशांत कशी आली ह्यावर अवलंबून नाही. माझ्या माहिती प्रमाणे कुठल्याही विजा किंवा विमान तिकीटा साठी आपण गरोदर आहोत किंवा नाहीत हे सांगण्याची गरज नाही. विमान कंपन्या बहुतेक करून ८+ महिन्याच्या गरोदर स्त्रियांना विमानांत प्रवेश देत नाहीत पण ते सुद्धा स्टाफ वर अवलंबून आहे. कॅनडा मध्ये तर भारतीय विद्यार्थी मुलींना गरोदर असल्यास भत्ता सुद्धा मिळतो त्यामुळे अनेक पंजाबी मुली गरोदर होतंच कॅनडात विद्यार्थी म्हणून जातात.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 01/10/2023 - 23:36 नवीन
हो. आई अमेरिकेत का होती, कायद्याने अली होती कि नाही इत्यादी गोष्टींचा फरक पडत नाही. म्हणूनच तर चिनी आणि रशियन लोकांनी बर्थ टुरिझम हा प्रकार आणला.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/10/2023 - 04:51 नवीन
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? सध्याचे माहित नाही पूर्वीची काही करणे = १) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे २) जिन्यासा/ क्षेत्रातील पुढील शिक्षण ३) बचत ( ती होतेच असे नाही कारण खर्च हि त्ववढेच असतात + शिवाय आयकर ) साधय यातील काही करणे बाद असतील परंतु साधय सुद्धा बाहेर कायमचे का लोकांना जावे वटतटे हे स्थानिक भारतीय जास्त चांगले सांगू शकतील हि करणे असू शकतात १) स्पर्धा २) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? काहींना तसे वाटत असेल पण म्हणून ते लगेच देशद्रोही वगैरे ठरत नाहीत... एवढेच नमूद करू इच्छितो भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? म्हणजे स्पर्धा या दृष्टीने हो असावे किंवा अजूनही भारतातील वेगवेगळ्या ष्ट्रातील अर्थाजनाची तफावत या शिवाय महागाई हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? भारतात भरपूर हुशार लोक आहेत त्यामुळे हि चिंता नसावी गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? पदोपदी भ्रष्टचार फारसा नाहीये... करणे काहीही असोत पण जगभरचे तत्व हे कि "पोट भरलेले असले" कि मग भ्रष्टचाराची गरज पडत नाही पाश्चिमात्य देशात हे त्यांनी बऱयापैकी जुळवले आहे म्हणून केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? कमी लोकसंख्येचं उपयोग होतो नक्की ,, अर्थवयवस्थेवरील ताण कमी होतो अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? हे फार थोड्यानं जमते ... कारण तो पर्यंत नातवंडे तिकडे आणि आपण इकडे असे होते... पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. हो मान्य देशादेशाप्रमाणे होऊ शकते ( वेगळे लिहीन वेळ मिळाला कि ) साधारण कानडा / ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड हे एका समूहात अमेरिका जरा वेगळी असावी पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? बर्यापैकी .. कारण परत तेच खाऊन पिऊन सुखी मग बाकी गोष्टींकडे वेळ देत येतो अर्थात " सुखी " हा वेगळा विषय आहे ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? एकतर स्वतः बचत करून मग किंवा सरकारी मदत ( प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ) यात आयकर भरणे हे गृहीत आहे अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? कोणते कर्ज ? भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 01/10/2023 - 12:13 नवीन
अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? कोणते कर्ज ? भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा
कर्ज परत देण्याची क्षमता, शिक्षण, इतरांना ज्याप्रकारे कर्ज मिळते त्याच प्रकारे सगळ्यांना मिळते. -- भारतामध्ये बरेचदा आज या, उद्या या करत करत जी मेटाकुटीला आणतात. जर कोणत्या अ वर्गाच्या भारतीय नागरीकाकडुन फोन आला (सरकारी नोकर, मोठे अधिकारी, राजकारणी) तर कामे लगेच होतात. मागासवर्गीय, अल्पसंख्याक असेल मग मज्जाच मजा.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 01/10/2023 - 14:39 नवीन
एक म्हणजे तिकडे व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात - घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही अनेक अमेरिकन / विदेशी लोकांचा बचत ( saving ) , कर्ज , assets building / holding या बद्दल फार वेगळा विचार असतो बेसुमार कर्ज मिळते आणि घेण्याकडे प्रवृत्ती असते बरे मागील economic crisis वेळी एक चमत्कारिक गोष्ट कळली - जरी लायकी नसेल तरी कर्ज दिले जाते - अगदी घराचे पण ! ( भारतात घर / गाडी घेणाऱ्या ना माहीत असेल की क्रेडिट लायकी ( worthiness) साठी किती scrutiny केली जाते ) हे जर अशक्य वाटले तर मी Ninja loans बद्दल लिंक टाकतोय ती पाहा ( A NINJA Loan (No Income, No Job, and No Assets Loan) आणि त्या crisis वेळी / बहुदा आता पण अनेक लोकांनी घरे / गाड्या surrender केली / जप्त केली गेली - लोक मजेत अजून थोडी खालची लाईफस्टाईल जगत राहिले भारतात हप्ते न भरल्या मुळे घर जप्त होत असेल तर ते फार वाईट मानले जाते , लोक आटा पिटा करतात , काहींना depression / attack आले आहे. https://corporatefinanceinstitute.com/resources/knowledge/credit/ninja-loan/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/11/2023 - 05:04 नवीन
रोज ५०० भारतीय नागरिकत्व सोडतात.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 01/11/2023 - 19:26 नवीन
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का?
भारतातील परिस्थिती चांगली, की वाईट यावर वाद करण्यापेक्षा या मुख्य प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्येक सदस्याने स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत (ज्याचे जीवन तुम्ही जवळून पाहिले आहे वा त्याचे अनुभव वा विचार त्याने तुम्हाला तपशीलाने सांगितले आहेत) उत्तर द्यावे असे मला वाटते सर्व सदस्यांनी या प्रकारे उत्तर दिल्यास चर्चा आपसूकच पुर्ण होईल. उगाच कुणातरी "क्ष" व्यक्तीची अर्धवट माहित असलेली जीवन गाथा लिहून त्या अनुषंगाने काहितरी निष्कर्ष काढण्यात फारसा अर्थ नाही असे मला वाटते. म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्या वर्गात मोडता ते नमूद करुन तुमचे विचार विस्ताराने लिहा असे मी सुचवेन १) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे- आणि मला दीर्घकाळ (अगदी निवृत्तीनंतरही) भारताबाहेरच रहावेसे वाटते अ) या निर्णयामागचे माझे कारण असे आहे - ब) तसेच भारतातल्या "या" गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या इथे मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते २) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- पण मला काही काळाने - (खास करुन निवृत्तीनंतर) भारतात परत जायचे आहे (किंवा परत आलेलो आहे) - अ) भारत सोडण्यामागचे माझे कारण ब) भारतात परत जाण्यामागचे कारण ? क) परदेशातील या गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या भारतात मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते ३) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- आणि भारतात परत जायचे की नाही याबाबत मी अजून ठरवू शकलेलो नाहीये ४) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही आणि तशी फारशी इच्छाही नाही- याकरिता माझी कारणे भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते. तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे ५) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही पण "या अमुक" काही देशांत मला जायला आवडेल पण तशी संधी न मिळाल्यासही मला खंत नाही. भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते.तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे - आता माझ्या पुरतं मी ४ वा ५ या प्रकारात मोडतो. म्हणजे मी कधीच भारताबाहेर गेलो नाही. यापुर्वी भारताबाहेर जावे असे प्रकर्षाने वाटले नाही. फार प्रतिभावान नसलो तरी अगदीच मठठ प्रकारतला मी नक्कीच नाही त्यामुळे संधी मिळाल्याही असत्या पण मी अशा संधींच्या शोधात फारसा नव्हतोच. आता वाटते न्युझीलंड या देशात जायला आवडेल - पण माझ्या क्षेत्रात तिकडे संधी फारशा नाहीत त्यामुळे संधी नाही मिळाली तरी खंत नाही. परदेशात न जाण्यामागची कारणे - दुसर्‍या देशात जावून तिथल्या चालिरीती, तिथले कायदे, नियम समजून घेणे त्याप्रमाणे जगायला शिकणे, तिथल्या हवामानाशी जुळवून घेणे ई ई मला बरेच आव्हानात्मक आहे असे मला नेहमीच वाटले. झालेच तर परदेशात अनेक कामे स्वतःच करावी लागतात घरगुती कामांना नोकर मिळत नाही किंवा तिथल्या पगारात ते परवडत नाहीत. त्याउलट भारतात दरमहा लाखभर पगार असणारी व्यक्ती देखील नोकरांंच्या पगारावर फारतर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करुन जवळपास अजिबात घरकाम न करता आरामात जगू शकते. दुसरे असे की मला भारतात - ते ही पुण्यात म्हणजे ज्या शहरात मी मोठा झालो त्याच ठिकाणी चांगल्या नोकरीच्या संधी मिळत गेल्या मग मला बाहेर जायची गरज पडली नाही. मला वाटते की परदेशी जाण्याचे कारण म्हणजे तिथल्या चलनात मिळणार्‍या पगारातुन चांगल्यापैकी बचत कमी कालावधीत होते पण मला तशी गरज वाटली नाही. तिशीच्या आत मी स्वतःचा फ्लॅट घेतला, चाळीशी ओलांडताना पुर्ण कर्जही फेडले. माझ्या भारतातील आवर्जुन बदलल्या जाव्यात या गोष्टी - वाहतुक कोंडी, खराब रस्ते (खासकरुन शहरातले - महामार्ग आता सुधारलेत बहुधा), बेशिस्त वाहतुक , भटके कुत्रे , रस्ते अडवून होणारे उत्सव, मिरवणूका, कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी (अचानक रात्री १२ वाजता फटाके वाजू लागले की डोकं फिरतं) , ध्वनी प्रदूषण ई भारताबाहेर न जाण्याने झालेले नुकसान - आय टी क्षेत्रात करिअरमध्ये ऑनसाईट जाण्याने पुढेही अधिल चांगल्या संधी मिळतात. अर्थात मी फार जास्त महत्वाकांक्षी नाही, आहे त्या करिअर मध्ये समाधानी आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी गुरुवार, 01/12/2023 - 08:25 नवीन
आता माझ्या एका जवळच्या मित्राबद्दल लिहितो. बी ई मेकॅनिकल असलेला हा माझा पुण्यातला मित्र - २००१ पासून आमची मैत्री आहे. २००४ ला तो "रोबोटीक्स , ऑटोमेशन" या विषयातले एम एस करण्यासाठी जर्मनीला गेला. शिक्षण पुर्ण झाल्यावर तिथे त्याला नोकरी मिळाली. काही वर्षानंतर पुण्यातीलच एका मुलीशी त्याने लग्न केले व पत्नीलाही जर्मनीला घेवून गेला. पुढे त्याच्या पत्नीनेही कधी पुर्ण वेळ तर कधी अर्धवेळ व्वगैरे नोकर्या केल्यात. एक मुलगा व एक मुलगी अशी त्यांना दोन अपत्ये झालीत. या काळात तो दरवर्षी एकदा तरी पुण्याला येत असे. पण आता साधारण वर्ष-दीडवर्षापुर्वी तो पुण्यात कायमचा स्थायिक झाला.. अलीकडे माझी त्याच्याशी भेट होवू शकली नाही परंतु फोनवर बोलणे झाले तेव्हा मी त्याला भारतात परतण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण विचारले तेव्हा त्याने जी कारणे सांगितले ती साधारण अशी १) त्याला भारतातले कौटुंबिक आयुष्य आणि अनुषंगाने मुलांवर होणारे कौटुंबिक संस्कार हवेसे वाटत आहेत. पुण्यात आता त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडीलही आहेत. त्याच्या पत्नीचे माहेरही पुण्यातच आहे २) जर्मनीतील तरुण पिढीतील मुले फारशी महत्वाकांक्षी नाहीत. माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही. साधारण शिक्षण घेवून कोणतीही नोकरी केली तरी चांगल्यापैकी पगार मिळत असल्याने इंजिनिअरिंग वा तत्सम व्यावसायिक शिक्षण मेहनतीने घ्यावे अशी इच्छाशक्ती मुलांमध्ये कमी होत आहे. त्यामुळे माझ्या मित्राला त्याच्या मुलांच्याबाबतीत असा धोका पत्करायचा नाहीये.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Sun, 01/15/2023 - 14:45 नवीन
माझ्या मित्राचेही असेच आहे. अनेक वर्षे जर्मनीला राहून तो परत आला. तथापि, मुलांच्या शिक्षणासाठी तो पुन्हा जर्मनी गाठायचा विचार करतोय. हा वेगळाच प्रकार आहे. त्याचे प्रमुख कारण अर्थातच कुटुंब हे होते. जर्मनीत किंवा युरोपियन देशांत गेलेल्या पहिल्या पिढीचा सर्वात मोठा पुल हा पालकांचाच असतो.. कारण शक्यतो ही पिढी मध्यमवर्गीय सधन लहान कुटुंबांतून आलेली असते आणि आई-वडिलांशी खूप गुंतलेली असते. परदेशात गेलेल्या पिढीला त्यामुळे एकटेपणा खायला उठतो. त्यांच्या पुढच्या पिढीला कुटुंबात रमवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. काही मंडळी पुन्हा मायदेशी परततात. आता या परतीच्या वेळेस मात्र पूर्वीचे मध्यमवर्गीय उच्चमध्यमवर्गीय झालेले असते. काही पैसा गाठीशी असतो.. इतर भारतीय समाजापासून त्यांची मुले मात्र पूर्णपणे तुटलेली असतात. श्रीमंत शाळांमध्ये शिकतात. ती मातृभाषा क्रियापदापुरती वापरतात. त्यांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून आय आय एम चे क्लासेस घेतले जातात.. ते इयत्ता बालवाडीलाच फ्रेंच, जर्मन नाहीतर जपानी शिकू लागतात कारण त्या मुलांची मुख्य भाषा भारतीय इंग्रजी झालेली असते. मिंग्लीशसारखी क्रियोल भाषा ते घरी वापरतात आणि ती जगण्यासाठी अगदीच निरुपयोगी आहे हे त्यांना न सांगताच उमजेले असते. हे लोक गेटेड कम्युनिटिज मध्ये राहतात. त्यांच्याकडे ल्यूसी, जॉन किंवा तत्सम नावांची अर्धवट परदेशी कुत्री असतात. त्यांचे म्हातारे आई आजोबा सुद्धा जमेल त्या इंग्रजीत त्यांच्याशी संवाद साधतात. गणपतीला वगैरे उकडीचे मोदक खाऊन, कधीतरी कृषिपर्यटन करून संस्कृती जपतात. बरं त्यांचे वर्तन वैज्ञानिक असते का तर तेही नाही. त्याची सुरवात तर ते अगदी सुवर्णप्राशन वगैरे असल्या गोष्टींपासूनच होते. तुम्ही दिलेले दुसरे कारण अगदी इथेच आकाराला येते. पहिली पिढी एसबीआय बँकेतून क्लार्क म्हणून निवृत्त झाली. दुसरी पिढी समजा डॉएच्च बँकेत आयटी मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तर या दुसर्‍या पिढीला आपल्या मुलांनी किमान दोन स्टार्टप काढाव्यात असे वाटू लागते. काही लोकांच्या यशाच्या आणि कौटुंबिक आनंदाच्या व्याख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना बेस्ट ऑफ बोथ हवे वाटू लागते. जर्मनीसारखे देश शिक्षणामध्ये रॅट रेसला प्राधान्य देत नाहीत. सगळ्या राहणार्‍या व्यक्तींना हेल्थ इन्शुरन्स हा अनिवार्य असतो. जवळ्पास ८५ टक्के हेल्थ इन्शुरन्स हा पब्लिक कंपन्यांचा असतो ज्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवलेल्या असतात. आर्थिक उत्त्पन्न जितके जास्त तितका प्रिमियम जास्त. कमी उत्पन्न असेल तर प्रिमियमही कमी असतो आणि उपचार मात्र त्याच दर्जाचे मिळणार ही हमी असते. हा थोडक्यात समाजवादी प्रकार आहे. सर्वच लोक ठराविक रक्कम भरून सर्व लोकांना त्याच दर्जाची आरोग्यव्यवस्था मिळेल अशी तजवीज करतात. जर्मनीतल्या प्रत्येक मुलाला वयाच्या अठरा वर्षांपर्यंत/काहींना पंचवीस वर्षांपर्यंत एक रक्कम मिळते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्चशिक्षण पूर्णपणे फुकट आहे. वरखर्च उचलावा लागतो पण त्या वरखर्चातली अर्धी रक्कम तर सरकारच देते. खाण्यापिण्यात कन्सेशन असते. विद्यार्थ्यांना संपूर्ण राज्यभर सार्वजनिक वाहतूक फु़कट वापरता येते. त्यामुळे सगळीकडे सारख्याच दर्जाचे शिक्षण मिळते. शिक्षणाचा दर्जा समान राखण्यात या समाजवादी बाबी कारणीभूत आहेत. संधींची त्यातल्या त्यात समानता, रोजगाराला असलेले सरकारी कवच, व्यवस्थेमध्ये रुजलेला प्रामाणिकपणा आणि शिस्त या सगळ्या बाबींमुळे व्यक्ती ही आनंदी राहण्यासाठी धडपड करते, दोन वेळच्या अन्नाची चिंता तितकीशी करत नाही. जिथे सुबत्तेने या बाबी सोडवेल्या आहेत. आपल्या ध्यानीमनीही नसणारे विषय त्यांच्या ऐरणीवर असतात. स्पर्धा असते पण बर्‍याचदा ती स्वतःशी असते. म्हणजे बॉडी बिल्डिंग करणे, सर्फिंग, वेकबोर्डिंग, पॅराग्लाईडींगसारखे धाडसी खेळ खेळून त्यांच्यात प्रावीण्य मिळवणे, इत्यादी इत्यादी..कुठल्याही अडचणीला जवळचे पोलिस स्टेशन गाठायला त्यांची भारतीयांसारखी प्रचंड फाटत नाही. काही जर्मन म्हातार्‍या पोलिसांना दरडावताना मी पाहिल्या आहेत. कधीकधी प्रत्येक गोष्ट झगडून आणि नाका तोंडावर आपटून मिळवलेल्या पहिल्या दुसर्‍या पिढीला हे कळले तरी पचनी पडत नाही असे वाटते. खूप भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे. कदाचित काही दशकांची सामाजिक सुरक्षितता जशी परदेशस्थांना आंदण म्हणून मिळाली आहे तशी भारतीयांना मिळाली नाही आणि दुसर्‍या पिढीने प्रचंड स्पर्धात्मक राहून, भारतात बोर्डाबिर्डात येऊन झगडून मिळव्ली आहे ती सामुहिक असुरक्षिता सतत कुठेतरी पार्श्वभागाला असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 01/15/2023 - 15:31 नवीन
हणमंतअण्णाजी विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा मुद्दा समजला.
भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे
शक्य आहे. कारण त्यांची आताची सुस्थिती त्यांनी भरपूर परिश्रम करुन , अतिशय महत्वाकांक्षेने मिळवली आहे. ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. झालेच तर ते स्वतः उच्चपदांवर काम करत असल्याने श्रमप्रतिष्ठाही मनात रुजलेली नाही. माझा रोबोटीक्स -ऑटोमेशन क्षेत्रात काम करणारा मित्र आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही. पण मी वर म्हंटले तसे - माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही .. फार काय तर , माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार या ज्येष्ठ जर्मन लोकांची तक्रार अगदी टिपीकल भारतीय पालकांसारखीच आहे म्हणजे "आम्ही आमच्या आई-वडीलांच ऐकलं, चांगलं शिक्षण घेतलं, मेहनत घेतली आणि करिअर घडवलं.. पण पुढच्या पिढीतली मुलं आमचं ऐकत नाहीत, मिळालेल्या स्वातंत्र्याचा नाहक फायदा घेतात.. वगैरे"
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/20/2023 - 04:41 नवीन
भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे ".....ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. " तर्कवादी, आपल्या या उप प्रतिसादाशी सहमत विशेष करून पहिल्या पिढीचे स्थलांतरित असे का वागतात या बद्दल २ पैसे माझे पण ..... पहिली पिढी हि बहुतेक फक्त शिक्षण बळावर येथे आलेली असते त्यामुळे आपण म्हणता तसे " आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही." असे घडते जरी येथे आल्यावर पाश्चिमात्य देशात "सर्व कामांना प्रतिष्ठां असते " हे माहिती असून सुद्धा आणि असे भांडी घासण्याची श्रम स्वतः विद्यार्थी दशेत केलेले असले तरी २-३ ऱ्या पिढीत मग बदल होत जातो .. साहजिक आहे .. तेव्हा हे "नाहक" असते असे मी पण १००% म्हणणार नाही ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा