Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारताच्या तुलनेत

उ
उपयोजक
गुरुवार, 12/29/2022 - 16:33
🗣 204 प्रतिसाद
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे. हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 49486 views

🗣 चर्चा (204)
T
Trump Fri, 01/06/2023 - 10:31 नवीन
लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम
श्री कर्नलतपस्वी, तुम्ही सैन्यात होता. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात किती संघर्ष करायला लागला आहे त्याबद्दल शंका आहे. (सैन्यातील नोकरीतील काम म्हणजे संघर्ष होत नाही.) सैनिकांना कामादरम्यान आणि निवृत्तीनंतर मिळण्यार्‍या सुविधांचा हेवा वाटतो. ही कथा सर्वसाधारणपणे सरकारी कर्मचार्यांची असते. माझ्या व्यक्तीगत अनुभवानुसार भारतातील बहुतांशी सरकारी कर्मचारी मुजोर, कामचोर आणि सरकारी पदाचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करायला पुढे मागे बघत नाहीत. त्यांना कायद्याचा कोणताही धाक नसतो. लोकांना चकरा मारायला लावणे, कोणतीही गोष्ट लिखित न देणे, जबाबदारी न स्वीकारणे, आज उद्या करत काम टाळणे. अश्या किती तरी उदाहरणे देता येतील. (आणि कृपया सैन्याचा अपमान झाला अशी ओरड करु नका. तुम्ही पुर्वी सैन्यात होता म्हणुन जास्त अधिकार मागु नका येथे.)
लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम
असली वक्तव्य म्हणजे राणा भीमदेवी थाटात केलेली वक्तव्ये आहे. जर तुम्ही सैन्यात नसता आणि सर्वसामान्य माणसांचा संघर्ष केला असता तर असली आंधळी विधाने केली नसती. भारत आमच्यासाठी सुध्दा प्रथम आहे, पण काही ठराविक वर्गासाठी इतर लोक राबत आहेत आणि आपले आयुष्य घालवत आहेत असे दिसते. --
ज्याचे खावे दाणे त्याचेच गावे गाणे.
पुर्णपणे चुकीचे विधान. परदेशात राहिलेले (अनिवासी आणि पुर्व) भारतीय, भारत आणि भारता विषयी आत्ममियता आणि देशप्रेम बाळगुन असतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/20/2023 - 01:16 नवीन
Trump सहमत
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 01/06/2023 - 18:13 नवीन
परदेशी भारतीयांनी पाठवलेले पैसे: $१०० billion भारतीय माहीती तंत्रज्ञान क्षेत्राने कमावलेले पैसे: $१७८ billion भारताच्या संरक्षण खर्चः $७३.८६ billion संदर्भ: https://www.meity.gov.in/it-export https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/us-replaces-uae-to-become-top-source-of-remittance-flow-to-india-report/articleshow/96025878.cms https://en.wikipedia.org/wiki/Military_budget_of_India#2022-23
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 01/09/2023 - 15:27 नवीन
कुठल्या हिन्दू मंदिरावर ख्रिस्ती अधिकारी नेमला या बद्दल उलगडा करतील काय तिरुपतीच्या बालाजी मंदिरसंस्थेवर एक ट्रस्टी हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांचे मामा आहेत. जगनमोहन हे ख्रिश्चन आहेत. मामा कागदोपत्री हिंदू आहेत. याच मंदिरात अनेक ख्रिश्चन धर्मोपासक शिरु पाहत असतात. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिेराच्या ट्रस्टींपैकी एकजण मुस्लिम आहे म्हणे. खखोदेजा!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/09/2023 - 17:18 नवीन
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/09/2023 - 17:29 नवीन
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/09/2023 - 17:43 नवीन
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/09/2023 - 17:48 नवीन
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/05/2023 - 04:55 नवीन
एक भारतून परदेशात जाणारी व स्थानिक होण्यासाठी धडपडणारी मुलं आणी दुसरा बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? काही लोकांना परदेशी गेल्यावर स्वर्ग दोन बोटे उरल्या सारखे वाटते,आपण काहीतरी इतरांपासून वेगळे आहोत आसा स्वतःबद्दल गोड गैरसमज होतो व सर्वज्ञ असल्याप्रमाणे अकलेचे तारे तोडू लागतात. भारत गरीब आहे विकसनशील देश आहे याची पुरेपूर जाणीव भारतीयांना आहे तेव्हा त्यांच्या गरिबीची काळजी न करता स्वतःचे दारिद्र्य कमी कसे होईल या कडे वरील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या लोकांनी करावी. लेखनाचा मुळ उद्देश प्रतिसादा मुळे भरकटू नये या करता भारतद्वेषी , पूर्वग्रहदूषित प्रतिसादाला प्रती-प्रतिसाद देणे बंद करत आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका गुरुवार, 01/05/2023 - 06:04 नवीन
या विषयावर पूर्वी पण खूप चर्चा झाली आहे. माझा आधीचा प्रतिसाद इथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/05/2023 - 06:45 नवीन
वाचला. बरेच प्रतिसाद सभ्य,संयमित व समर्पक,पटले. परदेशी जा,जीथे अर्थिक,वैचारीक उन्नती होईल तीकडे जा तुलना करा पण सुसंस्कृत झालात तर सुसंस्कृत पणेच वागा,बोला. संदीप डांगे याच्या प्रतिसादातला काही भाग, >> मग होऊ देत की तुलना. तुलना करतांना तटस्थ भाव असेल तर पटते, झुकलेली भावना असेल तर ती तुलना नव्हे तर भलामण होते... भलामणही मान्य पण भारताबद्दल तुच्छ भाव ठेवणे पटत नाही. जसे वर 'बडगा दिसतो' वरुन 'आमच्यावर आरोप झाले' असे म्हटले आहे तसेच आता आमच्या भारतवासी लोकांवर तुच्छपणे केलेली विधाने आम्ही ऐकून तर घेणार नाहीच. स्पष्टच बोलतो. १००%सहमत
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… गुरुवार, 01/05/2023 - 06:42 नवीन
भारत का सोडावासा वाटतो? १. साध्या साध्या गोष्टीसुद्धा टोकाच्या करून सोडणारी प्रत्यक्षातली संस्कृती- संस्कृतीचे कितीही गोडवे गायले तरी वैचारिकदृष्ट्या भारतीय लोक प्रचंड प्रतिगामी, मागास आहेत. सासुरवासासारख्या गोष्टी घराघरांत चालतात. प्रत्येक साध्या गोष्टीला उगीचच काहीतर संस्कृतीचा मुलामा द्यायचा आणि पुरुषी/सामाजिक अहंकार जपायचा. उदा. बायकांनी पुरुषांची ताटं उचलणे. अमुक एक हजार वर्षांपूर्वी युनिवर्सल विचार मांडणे वेगळे आणि ते समाजाच्या अंगाअंगात मुरलेले असणे वेगळे. २. सामान्य भ्रष्टाचार - जगभरात सगळीकडे चालतोच, परंतु भारतात तो प्रत्येकपातळीवर आहे. केवळ सरकारीच नव्हे तर सगळीकडे. मला तलाठ्याला साहेब म्हणून गयावया करून आणि लाच देऊनच पुढे जावे लागते नाहीतर माझी जिरवली जाते. इतकेच नव्हे, खाजगीतही हा बोकाळलेला आहे. मी सीईटीसाठी चाटे कोचिंग क्लासमध्ये होतो तेव्हा माझी मेस बदलण्यासाठी तिथल्या एका क्लार्कने मला ९०० रुपये मागितले होते. ३. छुप्या हुकुमशाहीकडे वाटचाल - गेल्या दशकभरात भारताच्या सार्वजनिक आणि सरकारी, राजकारणी डिस्कोर्समध्ये जर 'हिंदुत्व' वगैरे शब्द तपासले तर भारताची वाटचाल हिंदू तालिबान होण्याकडे होत आहे हे मला तरी स्पष्ट दिसते. माझे वय फार नाही परंतु माझ्या लहानपणी, पौगंडात हे विषय इतके ऐरणीवर कधीच आले नाहीत. हे म्हण्जे पूर्णपणे भुरटे न्युसेन्स विषय. आता मात्र अत्यंत फालतू गोष्टींवरूनसुद्धा टोकाचे राजकारण केले जाते. सगळीकडून मूलतत्त्ववाद्यांना डोक्यावर घेण्याचे प्रकार सुरु झालेत. उदा. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरसारख्या ठिकाणी महिलांनी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे वगैरे म्हणून मोर्चे काढलेत, घरांवर "इथे हिंदू राहतात" वगैरे स्टीकर्स लावणे, बिर्याणी हॉटेलांची तोडफोड केली. कुठल्याही गोष्टीमध्ये 'ही आपली संस्कृती नाही' अशी दमदाटी करणे वगैरे प्रकार इतके वाढत आहेत की उद्या परत सकच्छ की विकच्छ, स्त्रियांनी अमुकच कपडे घातले पाहिजेत, त्यांना शिक्षणाची फारशी गरज नाही, चूल मूल असे विचार हळू हळू पुढे येतील आणि त्या कल्पनेनेसुद्धा थरकाप उडतो. "स्त्रीला पायातली चप्पल मानावे, तिला जाता येता कानफाडली पाहिजे" इत्यादी मुक्ताफळे उधळणार्‍या इंदुरीकरासारख्या कीर्तनकारांना डोक्यावर घेतले जाते आणि त्यांच्या कार्यक्रमांना अफाट गर्दी होते. स्त्रियाही एका बाजूला बसून या गोष्टींना मान डोलवत असतात हे दृष्य जर कुणाला आशादायक वाटत असेल तर वाटो. मला मात्र वाटत नाही. इन्क्रिमेंटल, छोटे छोटे बदल केले की ते नजरेत अजिबात येत नाहीत पण काही वर्षांनी आपण कुठवर आलो हे पाहिले की भस्कन मागासपणाची आणि आपल्या चुकांची जाणीव होईल, अर्थात तोवर वेळ निघून गेलेली असेल. उदाहरण द्यायचे तर - मागच्या वर्षी अनेक व्हीपीएन कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला आहे. कारण नव्या सरकारी नियमांनुसार सर्वर लॉग्ज साठवून ठेवणे, सरकारला ते विनाशर्त विनाअट पुरव्णे बंधनकारक केले गेले आहे. यावर कुणीही जनजागॄती केली नाही की विरोध केलेला नाही. गोष्ट छोटी, पण लांबून डोंगराएवढी. असं हुकुमशाही राजवटीत होतं. ४. अकार्यक्षमता - मला लोक अकार्यक्षम वाटत नाहीत पण व्यवस्था वाटते. विखंडित शेतीचा प्रश्न धोरणीपणाने सोडवला नाही तर हवामानबदलाच्या पडत्या काळात भारताचे प्रचंड नुकसान होणार. प्रचंड कमी सूर्यप्रकाश असूनही जर्मनीसारखी राष्ट्रे सोलार पॉवर इत्यादी गोष्टींमध्ये भारताहून अनेक दशके पुढे आहेत. ५. अर्धवट इन्फ्रा - एखादी गोष्ट 'का' करायची याचा साधा कॉमन सेन्ससुद्धा नसतो. उदाहरण, मेट्रो सारख्या गोष्टींवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु जगातील प्रत्येक पुढारलेल्या शहरात मेट्रो हे एका मोठ्या पब्लिक ट्रानस्पोर्ट सिस्टिमचा केवळ एक भाग असतो. बसेस, इतर मोठ्या पल्ल्याची रेल्वे सिस्टिम एकात एक गुंतवून प्रचंड कार्यक्षण यंत्रणा उभी केलेली असते. ती कार्यक्षम असतेच शिवाय रोबस्टही असते आणि समाजातल्या सर्व स्तरांना जास्तीत जास्त फायदा मिळावा अशा या योजना आखलेल्या अस्तात. बी आर टी नावाचा हास्यास्पद प्रकार खेळून झाल्यावर आपले मूर्ख लोक लगेच मेट्रोच्या नादी लागले. विकासाची ही अर्धवट कल्पना झाली. ६. इनोव्हेशन/सृजन आणि जुगाड यांच्यातली गल्लत - भारतीय लोक जुगाडालाच सृजन समजात. तसे करायला हरकत नाही पण सृजन करण्याची आपली क्षमता तरी आपण विकसित करतोय का हे ही महत्त्वाचं आहे. भारतीय शिक्षणव्यवस्था नावाचा एक मोठा विनोद याला कारणीभूत आहे. ती धड रोजगाराला सक्षम करणारीही नाही किंवा लोकांना शहाणी समजूतदार करणारीही नाही. ८. नैसर्गिक स्त्रोतांची हेळसांड - इतक्या वेळा बोंबलूनही भारतीय लोकांना सुका कचरा आणि ओला कचरा यांच्यातला फरक कळत नाही. भारतातल्या सर्वच नद्या टोकाच्या प्रदूषित आहेत आणि त्या त्यांच्या ७० वर्षांपूर्वीच्या स्थितीत जरी आणायच्या म्हंटल्या तर सगळा देश उल्टा पालटा करावा लागेल. एसटी मधून नदीला पाया पडून प्लास्टिकच्या बाटल्या फेकणारे महाभाग मी पाहिले आहेत. प्रचंड लोक आहेत त्यामुळे उडदामाजी काळे-गोरे या न्यायाने चांगली माणसेही भरपूर आहेत म्हणून इथवर वाटचाल झाली. भारत का सोडावासा वाटत नाही? १. हवामान - रोज सूर्य दिसणे ही खूप मोठी बाब आहे. २. कुटुंब - बहुतेक कुटुंब हे भारतातच आहे. ३. नैसर्गिक आरोग्य - शरीराला इतर प्रदेश मानवतीलच असे नाही. शेवटी फिजिकल मर्यादा असतातच. ४. वैविध्य - खूप मोठी अ‍ॅसेट आहे. ( जरी हिंदूराष्ट्राच्या नावाखाली वैविध्य नाकारण्याचा एककलमी कार्यक्रम होत असला तरी भारतीय पुरुन उरतील ही आशा कुठेतरी वाटते.) ५. जुळवून घेणे - एका बाबतीत भारतीय पुढे आहेत. (नाईलाजाने ) परिस्थितीशरणता आहे की जुळवून घेणे आहे यातला फरक लगेच कळत नाही, पण ही एक गोष्ट आवडते. एकंदरीत भारत सोडावा वाटणे याला सांस्कृतिक कारणे आहेत, आणि न सोडावा वाटणे याला नैसर्गिक (फिजिकल) कारणे आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/05/2023 - 06:54 नवीन
मुद्दा क्रमांक ३ वगळता इतर मुद्द्यांशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/05/2023 - 06:55 नवीन
मुद्दा क्रमांक ३ वगळता इतर मुद्द्यांशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 01/05/2023 - 13:58 नवीन
बरेच काही बदलले आहे, बदलत आहे. काही काही घरांमध्ये कटकट करणारे म्हातारे लोक असतात त्यांना स्वतः:च्या आयुष्यात काही करता आलेले नसते मग ते आजूबाजूच्या लोकांवर राग काढत राहतात. इथेही तसेच आहे काही जणांना स्वतः:च्या आयुष्यात अपयश येते, लायकी नसते किंवा आळशीपणा असतो अंगात मग ते आजूबाजूच्या लोकांवर, सरकारवर, देशातल्या व्यवस्थेवर राग काढत राहतात. भारतात २२ कोटीच्या आसपास दुचाकी आहेत, ७ कोटी चारचाकी आहेत म्हणजे अंदाजे प्रत्येक घरात एक वाहन आहे. उगाच एखाद्या आदिवासी वस्तीचे उदाहरण देऊ नये अपवाद सगळीकडे असतो. तसाच हा नियम सरसकट लागू होणार नाही. याशिवाय आयुष्मान भारत सारख्या योजना मुले अति गरीब माणसे सुद्धा आरोग्य विमाचा लाभ घेतात. सिक्युरिटी गार्ड वगैरे लोकसुद्धा अति गरीब कॅटेगरीत येत नाहीत त्यांना सुद्धा १५ हजार किंवा जास्तच पगार असतो. म्हण्जे जिवन्मान किती उण्चावले आहे बघा. खेड्यांमध्ये मजुरीसाठी लोक मिळत नाहीत कारण गहू २ रुपये किलो आणि तांदूळ ४ रुपये किलो ने मिळत होता रेषन वर. आता हे बंद झाले आहे बहुधा कारण आता धान्य फुकट मिळते रेशन कार्ड पांढरे वर. बरेच जण फक्त फक्त क्वार्टरचे पैसे मिळेपर्यंत मजुरी करतात. ह्याला गरिबी म्हणायचे का? नोव्हेंबर महिन्यात चार चाकी गाड्यांची विक्रमी विक्री झाली, सुट्ट्या आल्या कि पर्यटन स्थळे फुल्ल असतात , कामवाल्या बायका त्यांच्या नवऱ्याला, मुलांना घेऊन हॉटेलात जेवतात बऱ्याचदा काही जण पार्सलहि मागवतात हे मी कनिष्ठमध्यमवर्गाबद्दल सांगत आहे. India's air traffic touches 1.29 crore passengers in Dec 2022, crosses pre-COVID levels हि बातमी वाचली का कोणी. हे सगळे जण नक्कीच अतिशय गरीब असणार ना? २७ डिसेंबर ला ४ लाख एअर तिकीटे बुक झाली हि विक्रमि विक्रि होती. प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे, वैनगंगा ते नळगंगा सिंचन , समृद्धी महामार्ग, ऍक्सेस controlled एक्क्सस्प्रेस वे, बुलेट ट्रेन सारखे अति महत्वाकांक्षी प्रोजेक्त होत आहेत, ह्यातून प्रवास करणारे गरीब आहेत का? मुळात ब्रेन ड्रेन या शब्दाला काही अर्थच नाहीये. काही ठराविक शिक्षणसंस्था यातले पास औट परदेशात जातत. त्यात काही चूक नाही. प्रत्येक जण अधिक चांगले प्रोस्पेक्ट्स पाहतो पण त्याला ब्रेन ड्रेन म्हणायचे म्हणजे फक्त त्यांनाच बुद्धी आहे इतरांना नाही असा अर्थ होतो. ह्यात काहीच चुकीचे नाहीये का? याशिवाय डिजिलॉकर, UIDAI, online सातबारा, डायरेक्ट बेनिफिट to अकाउंट अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे बाबूशाही थोडीतरी कमी झाली. स्वतः ला काही चांगले, भरीव करता येत नाही म्हणून सगळा देश वाईट हा तर्क मात्र अजब आहे.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 01/06/2023 - 04:56 नवीन
भारतात कुटुंबांची एकूण संख्या आहे २९ कोटी आणि सरासरी ४.८ एवढी कुटुंबागणिक सदस्यांची संख्या आहे. २२ कोटी वाहनं असतांना देखील ७ कोटी घरांमध्ये वाहन नाही. म्हणजे सुमारे ३४ कोटी लोकांकडे वाहतुकीचे साधन नाही. २२ कोटी दुचाक्यांपैकी पाच टक्के दुचाक्या या माणशी एक याप्रमाणे ऐपत असणाऱ्या कुटुंबात असतील तर अजून पाच कोटी लोकसंख्या वाहतुकीच्या साधनांपासून वंचित असते. आता या ३९ कोटी लोकांमध्ये किमान १४ कोटी लोक मिळवते असतील तर ते सर्वस्वी वडाप, बसेस यांचा वापर करीत असतील. आणि लोकसंख्येच्या १० टक्के लोकांची “एवढी तफावत तर कुठेही असतेच” अशी आपण संभावना करणार असाल तर अशी देशभक्ती तुम्हालाच लाभो. हि फक्त एका आकडेवारीची चिरफाड आहे.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/06/2023 - 07:40 नवीन
एका आकडेवारीची चिरफाड करतानासुद्धा इतक्या चुका आहेत आता आणखीन चुका टाळाव्यात. माणशी एक दुचाकी वाली 5 टक्के कुटुंब हे assume केले आहे. मग माणशी 0 दुचाकी असणारी पण गरीब नसणारी कुटुंब सुद्धा धरली का? अशी खूप माणसे आहेत. शिवाय वृद्ध माणसे सुद्धा सहसा वाहन चालवणे टाळतात. एखादा मेट्रोने किंवा बसने किंवा वडाप ने प्रवास करत असेल तर तो अतिशय गरीबच असेल असे गृहीत धरले आहे. आणि 22 कोटी दुचाकी आहेत फक्त. 7 कोटी चारचाकी आहेत त्या वेगळ्या. यामध्ये रिक्षा, टमटम वगैरे धरलेल्या नाहीत. तसा युक्तिवाद करायला काहीही करता येईल. फक्त 100 लोकांकडे मिळून 7 कोटी चारचाकी असतील असेही assume करता येईल. त्याला काही अर्थ नाही
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/06/2023 - 08:24 नवीन
शिकागो १९०० असे गुगल इमेजीस मध्ये टाकून पहा. भारतीतील कुठलेही शहर आज सुद्धा त्याची बरोबरी करू शकत नाही. वाहनांची गोष्ट सांगायची झाली तर दुचाकी आणि ४ चाकी माध्यम वर्गीयांना परवडायला साधारण २००० साल उजाडावे लागले. त्याआधी भारत सरकारने जवळ जवळ सर्व वाहन उद्योगावर बंदी घातली होती. काँग्रेसी मित्र बजाज हे अत्यंत भिकार दर्जाची स्कुटर लोकांच्या माथी मारत असत. आज सुद्धा सरकार मृत्यूचे सापळे रस्ते बनवते आणि ४ चाकी वाहनावर भरपूर कर लावून लोकांना धोकादायक अशी दुचाकी चालवायला भाग पडते. अक्षरशः हजारो तरुण आणि तरुणी दार वर्षी ह्या मृत्यूच्या सापळ्यात पडून विनाकारण मरतात. आणि म्हणे "डेटा सिक्योरिटी" वर सरकारचा नवीन कायदा येणार आहे. ह्या पोरांना कोण सिक्योरिटी देणार ? ९०% भारतीय जनता $३०० सुद्धा महिन्याला कमवत नाही ह्या लोकांना दुचाकी कशी परवडेल? हे आकडे पहा बिहार सारख्या गरीब राज्यांत फक्त ३०% घरांत दुचाकी आहे. चार चाकीची परिस्थिती आणखीन खराब आहे. महाराष्ट्रांत फक्त ८% घरांत तर बिहार मध्ये फक्त २% घरांत चारचाकी आहे. हे आकडे पाकिस्तान किंवा व्हिएतनाम च्या तुलनेत खराब नसले तरी जागतिक स्तराचं दृष्टीने अत्यंत खराब आहेत.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 01/06/2023 - 08:55 नवीन
आज सुद्धा सरकार मृत्यूचे सापळे रस्ते बनवते आणि ४ चाकी वाहनावर भरपूर कर लावून लोकांना धोकादायक अशी दुचाकी चालवायला भाग पडते. अक्षरशः हजारो तरुण आणि तरुणी दार वर्षी ह्या मृत्यूच्या सापळ्यात पडून विनाकारण मरतात. आणि म्हणे "डेटा सिक्योरिटी" वर सरकारचा नवीन कायदा येणार आहे. ह्या पोरांना कोण सिक्योरिटी देणार ?
श्री साहना, हे तुमचे म्हणणे बरोबर असले तरी पुर्ण दोष सरकारला देता येणार नाही. लोकांना कितीही सांगितले तरी ते कायदे पाळायला तयार नसतात. तुम्हाला येथे झालेल्या काही चर्चांचे दुवे देतो. हेल्मेटसक्ती - प्रकाश घाटपांडे https://www.misalpav.com/node/29420 चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........ - मनिषशिल्पाअनुसे https://www.misalpav.com/node/36728 नगर - पुणे रस्ता : मृत्यूचा सापळा - उगा काहितरीच https://www.misalpav.com/node/50575 ही काही साधी उदाहरणे आहेत, अशी बरीच देता येतील. भारतातील किती प्रवासी उपलब्ध असलेली खुर्ची पट्टी वापरतात ? श्री सायरस मिस्त्री अश्याच एका अपघात मरण पावले. ते गरीब, अज्ञानी होते असे कोणी म्हणु शकत नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 01/06/2023 - 08:42 नवीन
मग माणशी 0 दुचाकी असणारी पण गरीब नसणारी कुटुंब सुद्धा धरली का? अशी खूप माणसे आहेत.
+१
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/06/2023 - 08:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 01/06/2023 - 10:23 नवीन
निरागस लोकांच्या मते भारतात सर्वसाधारण ५०.३ टक्के सधन लोक आहेत ज्यांना दुचाकीची गरज नाहीय.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 01/05/2023 - 14:47 नवीन
मस्त चर्चा चालु आहे. (की धुरळा उडतो आहे.) --- एक गोष्ट् कोणी लिहीली नाही, भारतामध्ये गेल्या काही वर्षात आंतरजाल खुप वेगवान झाले आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/06/2023 - 21:45 नवीन
+१ इंटरनेट आणि स्मार्टफोन चा प्रसार हि मागील काही वर्षातील भारतातील जमेची बाजू आहे. सुदैवाने भारत सरकारने लुडबुड करायच्या आधीच हा प्रसार वेगाने झाल्याने लोकांच्या नशिबी जागतिक दर्जाच्या सेवा आल्या नाहीतर इथे सुद्धा अवस्था सरकार निर्मित रस्त्याप्रमाणे झाली असती. दुसरी जमेची बाजू म्हणजे भारतात एकूण विमानतळाची संख्या वाढत आहे. मागील १० वर्षांत साधारण १०० नवीन विमान तळ पूर्ण तरी झाले आहेत किंवा बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन Fri, 01/06/2023 - 08:15 नवीन
१. भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते. २. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता ३. याच शिकलेलया,सुसंस्कृत लोकांनी होमी भाभा यांचा विमान अपघात घडऊन आणला. कारगील हल्लाच्यावेळी भारताला जि. पी. एस. चे इनपुट द्यायला नकार दिला. इराक देशाला बर्बाद केले. लिबियाचा गडाफीला मारले. ४. करोनाच्या काळात भारताने इतर देशांना केलेली मदतही आपण विसरलात का? इतर देशांचा नागरिकांची अफगाण, कुवेत, युक्रेनमधुन सुखरुप सुटका केली. तरीही भारतीय असंस्कृत? तूम्ही मिसळपाव वर लिहिण्यापेक्षा लोकसत्ता महाराष्ट टाइम्समधे लिहा. जास्त समर्थक मिळतील.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/06/2023 - 21:16 नवीन
> याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते. पाश्चात्य देशांना सद्गुणी मी म्हटले नाही. तेथील राहणीमानाचा दर्जा भारताच्या कैक पटीने चांगला आहे हे निर्विवाद सत्य मी मांडले आहे. तुम्ही सुद्धा ते मान्य करत आहात. पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ज्या प्रमाणे भारतातील मागासलेले लोक आपल्या खराब स्थितीसाठी मनुस्मुर्ती किंवा सवर्णांना आयुष्यभर दोष देत असतात त्याच प्रकारे मागासलेले देश आपल्या नालायक पणा साठी इतिहासाला दोष देत असतात. इतर देशांची समृद्धता भारताला लुटून आली नाही. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आणि अली असली तरी मागील ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल. >तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता भारतीय लोक भारत सोडल्यानंतरच इतके यशस्वी बनतात. ७०% भारतीयांना अजून सुद्धा ठीक पणे लिहिता वाचता येत नाही. हे सत्य आहे. भारताची अर्थ व्यवस्था ५व्या क्रमांकावर आली आहे ह्यांत छाती बडविण्यासारखे काहीही नाही. १४० कोटी लोकसंख्या असलेला हा देश पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे होता. दर माणसी दुर्ष्टीने पाहिल्यास भारत अजून जगांतील सर्वांत दरिद्री लोकांपैकी आहे आहे. भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि संपत्ती जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन Sat, 01/07/2023 - 11:18 नवीन
पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ब्रिटिशांनी भारतातून नेलेली संपत्ती ४५ ट्रीलीयन डालर्स इतकी आहे. भारताची अर्थव्यवस्था १९४७ मधे ३.४७ ट्रीलीयन डालर्स इतकी होती. आता जर तरीही तुम्ही पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. असे म्हणत असाल तर तुम्ही मुद्दाम गैरसमज पसरवत आहात असे नाईलाजाने म्हणावे लागेल. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आपले विचार ईंग्रजांना माहित नव्हते, म्हणून ते १५० वर्ष भारतात निचोडत होते. ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल. ७० वर्षांत भारतांत दारिद्र्य पसरलं, हे तुम्हाला कोणी सांगितले? स्वातंत्राचावेळी भारतात ८०% जनता गरीब व १९६६ मधे दारिद्र्य रेषेखाली होते, ते २०२२ मधे १६.४% आहेत [ संदर्भ :Global Multidimensional Poverty Index 202] भारताब द्द्ल जर खरी माहीती नसेल तर विचारा, इथे नक्कीच मिळेल. पण कॄपया चूकीची पसरऊ नका आणि तोपर्यत भारतीयांनी काय करायला हवे? हा आपला बहु मोल सल्ला आपल्या जवळच ठेवावा. भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि बारामती फवार जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे. तसेच आपण सोनिआ गांधी, बारामती फवार यांच्याप्र माणेच ट्रंप तात्यांच्या उत्पन्नाचे शोध घ्यावेत.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/09/2023 - 05:18 नवीन
पुन्हा तोच मुद्दा. आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे. जर भारत सामर्थ्यशाली आणि श्रीमंत विश्वगुरू होता तर मग इतक्या दूरवरून बोटीने येऊन गरीब, असुंस्कृत आणि असामर्थ्यशाली इंग्रजांनी २०० वर्षे देशाला गुलाम विश्वगू कसे बरे बनवले ? उद्या आम्ही आणि तुम्ही मिळून अंबानी आणि अडाणीला गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी ठरेल का ? आणि हे मुद्दे मान्य केले तरी मागील ७० वर्षांतील भारताची अधोगती इंग्रजांवर लादली जाऊ शकत नाही. १९४८ साली भारत विश्वगुरू नसला तरी आशियागुरु होता, भरतीय लोकांच्या नेतृत्वाखाली काही दशकांतच भारत आशियागुरु वरून आशियागु वर जाऊन पोचला. हाच दरम्यान जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, पोलंड, चीन इत्यादी देश युद्धांत उध्वस्त होऊन सुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत झाले. २०२२ भारतांत सर्वांत मोठे डेव्हलोपमेंट चे मुद्दे आहेत रस्ते जे छोट्या पावसांत वाहून जात नाहीत, पूल जे उद्धघाटनाच्या वेळीच पडत नाहीत, संडास, वेळेवर धावणाऱ्या (संथ गतीने का असेना) ट्रेन्स, प्राथमिक शाळेंत ऍडमिशन, हे बहुतेक विषय इतर जगाने १००-१५० वर्षे आधीच सोडवले होते. भारतीय समाज माणसात साधारण १९९० च्या दशकांत आला. ह्याला मुख्य कारण होते जागतिक बँकेने भारत सरकारची मग्रुरी तोडून त्यांना जबरदस्तीने आर्थिक सुधारणा करण्यास भाग पाडले. श्रेय नरसिम्ह राव किंवा मौन सिंग घेत असले तरी ह्याचे प्रमुख कारण जागतिक बँक आणि पाश्चात्य राष्ट्रे होती. ह्या सुधारणांना आता लोक चांगले म्हणत असले तरी त्या काळी संपूर्ण समाज "देश विकायला काढला आहे" असे म्हणून शिव्या देत होता. कारण समाज आणि त्याची मानसिकताच मुळांत मागासलेली होती. मोदी सरकार कडून रिफॉर्म्स ३.० ची अपेक्षा होती पण तिथे सुद्धा तीच मागासलेली विचारसरणी नडत आहे आणि कदाचित त्याच मुळे मोदी ह्यांनी आर्थिक सुधारणांचा नाद सोडून आपली सत्ता कशी मजबूत होत राहील ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ९० मधील सुधारणा झाल्या नसत्या तर भारताची स्थिती आणखीन खराब झाली असती.
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन Mon, 01/09/2023 - 08:33 नवीन
आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे. हे आकडे माझे नाही आहेत. हे आंतरराष्टीय आकडेवारीतून घेतले आहेत. आता ती आकडेवारी निरर्थक वाटत असेल तर तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. ईस्रो, रेल्वे , आय टी. मधे भारताने केलेली प्रगती व भारताच्या प्रगतीमधे पाश्चमाश्त देशांनी आणलेली विघ्न(उदा. क्रायोजेनिक ईंजिन मिळू न देणे, पाकिस्तानला शस्त्र देणे, शास्त्रन्यांचा हत्या, देशविरोधी आंदोलनाना आर्थिक व नैतिक पाठींबा ईत्यादी) दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 01/09/2023 - 09:05 नवीन
श्री साहना यांनी अतिशय सरसटीकरण चालु केले आहे. :(
तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते.
बर्‍याच अंशी नक्कीच
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 01/09/2023 - 10:32 नवीन
तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. डिजीटायझेशन. भाजी विकणारा,गाडी धुणारा,पान विकणारा असे छोटे व्यवसायीक सुद्धा गुगल पे अथवा अन्य कॅशलेस ट्रॅजेक्शन करता आहेत. सारथी सारख्या संकेतस्थळावर जाऊन आर टी ओ ची कित्येक, किंबहुना सर्वच कामे दलाला शिवाय व भ्रष्टाचारा शिवाय करू शकतो. पत्ता. झोमॅटो,स्वीगी,आमेझाॅन सारख्या होम डिलीव्हरी देणाऱ्या, कमी शिक्षण घेतलेल्या मुलांना बरोबर घरचे पत्ते कसे सापडतात हो याचा कुणी विचार केलाय का! अशी एक ना अनेक चांगली उदाहरणे देऊ शकतो. डिजीटायझेशन प्रगतीपथावर आहे, विकासातले अडथळे दुर होतायतं. समाज बदलतोय यात शंकाच नाही. कितीही प्रगतीपथावर समाज असला तरी तो परिपूर्ण कधीच होत नसतो. या देशात काय चांगले काय वाईट,काय कमी काय जास्त,काय चुक काय बरोबर याची माहीती इथल्या जनतेला आहे व त्यावर विचार करण्यास इथले लोक समर्थ आहेत. हे कसं, आकाबाईच्या म्हशी अन बोकाबाईला उठाबशी !
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/09/2023 - 22:49 नवीन
धाग्याचा मूळ विषय हा लोक देश का सोडून जात आहेत हा होता. त्यामुळे देशांतील कमतरता ह्या स्वाभाविक पणे चर्चिल्या जाणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर देश सोडून जाण्यांत भारतीय लोक नंबर एक आहेत. भारताचे जवळ जवळ १% लोक देशाच्या बाहेर आहेत. लोकसंख्येच्या मानाने हा आकडा अत्यंत अवाढव्य आहे. त्याशिवाय देश सोडून जाणे हि गोष्ट फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही. बहुतेक श्रीमंत लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व घेतले आहेच (अंबानी परिवाराचा नातू अमेरिकेत जन्माला येऊन तिथला नागरिक झाला आहे) पण मध्यमवर्गीय आणि गरीब लोक सुद्धा विविध देशांत वेगाने स्थलांतर करत आहेत. त्यामुळे देशांतील कमतरता हि छोटी नसून खूप मोठी आहे आहे संपूर्ण समाजाला भेडसावणारी आहे हे लक्षांत येते. कमतरता मान्य केल्याशिवाय त्यांत सुधारणा शक्य नाही. देशांत काहीच चांगल्या गोष्टी नाहीत असे म्हटले नाही. असतील, अनेक असतील पण त्या पुरेश्या नाहीत लोक लोकांचा जो लोंढा बाहेर जात आहे त्यावरून सिद्ध होते. अजून सुद्धा साधारण माध्यम उत्पन देशांचा राहणीमानाचा स्तर भारतीय राहणीमानाच्या स्तरापेक्षा चांगला आहे.
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Fri, 01/06/2023 - 19:59 नवीन
बाकी सर्वांचे जे ओळखीचे  लोक अमेरिकेत/  विदेशात जातात ते सर्व देशप्रेमी / सरळ साधे / गोड गोड / संसारी  सतत देशाच्या नावे उमाळे काढणारे कसे असतात? भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ?   माझे कोण ना कोणी ओळखीचे  अमेरिकेत गेली 30-32 वर्षे जातोय  यातले काही थोडे जण अमेरिकन अय्याश झाले आहेत म्हंजे सुपर बाईक , बोटी , गाड्या , बंदूक , जुगार , गांजा ( मारणे आणि उगवणे), फिरणे, लिव्ह इन असले भारतात न परवडणारे किंवा मान्यता नसलेले छंद असलेले आहेत . बहुतेक मराठी आहेत खास करून सुपर बाईक / हाय परफॉर्मन्स गाड्या तिकडे थोड्या चांगल्या पगारात परवडतात. आणि त्या चालवायला चांगले रस्ते पण आहेत . डूकाटी  आणि हार्ले ठेवणारे लोक आहेत . मस्टँग अमेरिकेत किती ला आहे ? भारतात ती एखाद करोड ला होती  पिस्तूल / बंदूक भारतात छंद  म्हणून ठेवणे अशक्य आहे. आणि त्याचा दारुगोळा सहज मिळत नाही . भारतात  ३-४ गन  / पिस्तूल लायसन्स वर ठेवणे  अशक्य आहे . आणि त्याची किंमत पण फार होईल .  अमेरिकेत जॅक डॅनिअल किंवा जिम बीम ची बाटली किती ला मिळते ? तेथील पगाराच्या मानाने ? भारतात किती सहजपणे त्या लेव्हल ची बाटली परवडते ? नेहमी चांगल्या पब मध्ये जाणे कितीसे परवडते ? जुगार हा भारतात accepted छंद आहे का ? गांजा भारतात बंदी घातली आहे . अमेरिकेत काही स्टेट मध्ये कायदेशीर रित्या मर्यादेत गांजा उगवू हि शकतो . बाकी भारतात सामान्य executive  पगारात घड्याळे , लक्झरी  किती परवडते ? म्हणजे मी भारतात काय लाखांची घड्याळे असतात त्या बद्दल विचारतोय  बहुतेक सर्व व्यवस्थित पैसा कमावणारे बरेचसे संसारी , मुले बाळे असलेले आहेत,काहींनी मुले न होण्याचा कॉल घेतला आहे.   विदेशात व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे  आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात -  घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही  तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही. ओळखीच्या मुली घटस्फोट होऊन परत लग्न केलेल्या आहेत. एकीचे दोन होऊन, बराच काळ लिव्ह इन मध्ये राहून ती त्या बरोबर संसारात आहे - किती जणांसाठी हे सहज शक्य आहे ? याची पण तरुण पिढीला भुरळ पडत नसेल ?
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/06/2023 - 21:06 नवीन
> भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ? भरपूर आहेत. ज्यांना छंदासाठी वेळ सुद्धा भारतात मिळाला नसता अश्या लोकांना इतर देशांत छंदासाठी वेळ मिळतो. बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो. त्याशिवाय मी इथे शिकार आणि मासे पकडायला सुद्धा जाते. धनुष्यबाणाने नि बंदुकीने आम्ही इथे शिकार करू शकतो. पण ह्या शिवाय असंख्य छंद जोपासले जाऊ शकतात. वाईन टेस्टिंग हा एक छान छंद आहे $३ पासून $३००० पर्यंत च्या अनेक आंतराष्ट्रीय वाईन्स आपण इथे पिऊ शकतो. ज्यांना इतर दारूची आवड आहेत त्यांना सुद्धा हजारो प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. इथे लोव किंवा होम डीपोट मध्ये प्रत्येक प्रकारचे घर निर्मितीचे सामान मिळते. त्यामुळे अनेक लोक लाकूड काम, लेसर कटिंग, इपॉक्सी , ३D प्रिंटिंग हे छंद जोपासतात. जगांतील कुठल्याही प्रकारची कुसिन्स इथे मिळतात. बलोच, चिनी उईघुर, नेपाळी, इथिओपियन इत्यादी देशांची रेस्टोरंटस मध्ये विविध प्रकारच्या गोष्टी खायला मिळतात. काही लोकांना भटकंती हवी असते. गाडीच्या फक्त एक टॅंक पेट्रोल वर तुम्ही खूप काही पाहू शकतात, ५० पेक्षा महा मोठे नॅशनल पार्क्स, लक्षावधी छोटे पार्क्स किमान अमेरिकेत उपलब्ध आहेत. इथे विविध प्रकारच्या संधी उपलबध आहेत. हे सर्व छंद इथे साध्या पगारावर सहज जोपासले जाऊ शकतात. तुम्हाला एखादा छंद असला कि ताबतोब तुम्ही समविचारी लोकांशी मैत्री सुद्धा करू शकता. त्यामुळे आपोआप आपले नेटवर्क सुद्धा बनते. ह्याच व्यक्ती देशांत असत्या तर संपूर्ण दिवस ट्राफिक मध्ये आणि सुट्ट्या नको त्या चिंता काढण्यात गेल्या असतंया. छंदाशी निगडित कुठलीही गोष्ट १००% टॅक्स भरल्याशिवाय मिळाली नसती.
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sat, 01/07/2023 - 09:23 नवीन
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? असे होते का ? कि हे मूळ लेखकाचे तर्कट ? असे कितीसे लोक आहेत जे रिटायर झाल्यावर भारतात आलेत ? साधारण ६० -६५ वय पकडले तर ते लोक १९६३ - १९५८ साली जन्मले असतील . साधारण पंचविशीत १९८८ - १९८३ ला असतील त्या काळात कितीसे भारतीय विदेशात जात होते ? त्यातले किती परत आलेत ? का आलेत ? काही माहिती नसताना मूळ धागाकर्त्याने पुडी सोडली आहे असे मला वाटते
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 01/07/2023 - 09:34 नवीन
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
ते जेव्हा भारतात येतात तेव्हा भरपुर पैसे घेउन येतात. शिवाय तिकडे कमवत असताना पैसे पाठवतात ते वरती दिलेलेच आहे.
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sat, 01/07/2023 - 10:05 नवीन
म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 01/07/2023 - 10:18 नवीन
म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?
आखाती देशात गेलेले बहुतांशी सगळे परत आलेत. पाशात्य देशातील साधारतः २० टक्के लोक परत आलेत. (अनुभवावरुन, कृपया विदा मागु नये.)
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sat, 01/07/2023 - 10:05 नवीन
म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sat, 01/07/2023 - 12:13 नवीन
असे म्हातारपणी परत येणारे लोक 5 टक्के तरी असतील का याबद्दल शंका आहे. यात चुकीचे काही आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/09/2023 - 22:55 नवीन
माझ्या माहितीची एक श्रीमंत अमेरिकन व्यक्ती डिमेन्शिया झाल्याने भारतांत परत आली. दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक होती आणि त्यांनी वडिलांची जबाबदारी घ्यायची पूर्ण इच्छा दाखवली होती पण वडिलांचा इगो मोठा होता. त्यामुळे ते साधारण ५० वर्षे अमेरिकेत घालविल्या नंतर भारतांत परत आले. हल्लीच त्यांच्या बँकेने मुलांना पात्र पाठवले कि ह्यांचे चेक्स बाऊन्स होत आहेत, काही तरी करा. तेंव्हा मुलांनी बँक स्टेटमेंट पहिले तर बहुतेक पैसा गायब. तर काय स्थानिक काही संस्था आणि बँक मॅनेजर ह्यांनी साटेलोटे करून व्यक्तीच्या कमकुवत मनाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून भरपूर पैसे विविध संघटनांना डोनेशन म्हणून उकळले.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 01/10/2023 - 08:12 नवीन
असे प्रकार मी परदेशातही पाहीलेले आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sat, 01/07/2023 - 12:01 नवीन
आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत. अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते? भारतातले राहणीमान दरिद्री आहे, भारतात दरिद्री लोक राहतात, भारतातल्या लोकांची लायकी नाही वगैरे विधानांबद्दल वाद होता. शिवाय आपण कुठे जन्माला आलो यावर आपले नियंत्रण नसते वगैरे विधानांमध्ये उगाचच अहंकाराचा दर्प दिसला. म्हणून माझा आक्षेप होता पण आता वरचे प्रतिसाद वाचल्यानंतर माझे काहीच म्हणणे नाही.

संपादित.  व्यक्तिगत टीका टाळावी.
-व्यवस्थापन

  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 01/07/2023 - 12:24 नवीन
आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत. अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते?
अगदी बरोबर. पाशात्य लोक कितीही एकमेकांबरोबर भाडले तरी ते नेहमी अपाशात्याविरोधात एकमेकांना मदत करतात.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Sun, 01/08/2023 - 00:29 नवीन
लेखाच्या उद्देशापासून चर्चा भरमसाठ भरकटली आहे आणि काही लोकांचे प्रतिसाद पाहून मी परत ट्रॅकवर आणू इच्छितो. या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे. १. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण बर्‍याच लोकांना हे काहीतर क्षुल्लक आणि फुटकळ फॅड वाटू शकते. परंतु हा प्रॉब्लेम भारताने सोडवल्यास तो हजारो/लाखो कोटी रुपये वाचवू शकतो. काही तज्ञांच्या मते हा प्रॉब्लेम बिलियन डॉलर्सच्याही पेक्षा मोठा आहे. युरोपियनराष्ट्रांनी हा प्रश्न केव्हास धसास लावला आहे. आणि त्याचे फायदे प्रगत युरोपात प्रत्यक्ष राहिलेल्या लोकांना सहज लक्षात येऊ शकतील. कोणत्याही घराचा/वास्तूचा पत्ता हा तीन गोष्टींनी अचूक सांगता येतो. प्रशासनाच्या कोणत्याही पातळीवर हा पत्ता बदलत नाही. म्हणजे गावपातळीवर, जिल्हापातळीवर, राज्यपातळीवर किंवा देशपातळीवर. १. रस्त्याचे नाव २. घराचा नंबर ३. पिन कोड भारतात पत्ता हा प्रकार केवळ मूर्खपणा आहे इतके आपण मागास आहोत. उदाहरणार्थ - मला जर एखाद्या कंपनीचा पत्ता सांगायचा असेल तर जवळच्या चौकाचे नाव, कॉलनीचे नाव, अमुक झाड, तमुक ओढा, पेट्रोलपंप, हागणदार्‍या मुतार्‍या, समोर, उभे, आडवे, सेक्टर, गल्ल्या, ब्लॉक, टेकड्या, चतुर्थीचा चंद्र अगदी वाट्टेल ते सांगावे किंवा लिहावे लागते. ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले. नाहीतर आपली मजाच होती. काही लोक महसूलविभागांचे सर्वे नंबर्स सुद्धा पत्त्यात टाकतात. शिवाय बेंगलोर मध्ये क्रॉस आणि लेन्स अस्तात, पुण्यात रोड आणि रस्ते नाहीतर संकल्पना असे लिहिलेले चु*या नगरसेवकांचे बोर्ड, रोज बदलणारी चौकांची नावे म्हणजे काहीही प्रमाणीकरण नाही. विशेषम्हणजे हे सिस्टीममध्ये मोजमापात नाही असे नाही. सर्वे नंबर, गावाच्या हद्दी, जमिनींचे प्रकार आणि झोन्स हे सगळे ठरलेले आणि व्यवस्थित रुजलेले आहे. महसूलीरचना मला वाटते राज्य आणि राष्ट्र या दोन्ही सूचींत येते. तरीही आपण याचा गांभीर्याने विचार करत नाही. आता प्रत्येक नगरपालिकांनी घरांना नंबर्स दिलेले आहेत, घरपट्टीचा नंबरही रंगवलेला असतो. तरीही आपल्याला ही व्यवस्था बसवता आली नाही हे आपले खूप मोठे अपयश आहे. याचे फायदे अनेक आणि काहीवेळा तर मुलभूत आहेत. उदा. युरोपियन राष्ट्रांत प्रत्येक घरकुलाला टीव्ही/रेडिओ टॅक्स द्यावा(च) लागतो. तो थोडा थोडका नसतो. काही राष्ट्रांत यातून फारशी सुटका नसते. घरपट्ट्या, पाणीपट्ट्या, खाजगी खर्च, युटीलिटी, सगळे सगळे काही पत्त्याशी गुंतलेले असते. आप्ल्या आधारकार्डावर एक पत्ता, मतदानकार्डावर तिसराच, पॅनकार्डावर चौथाच, आणि बँकेत आठवाच असला गाढवपणा सर्रास दिसतो. यातून सार्वजनिक पैशाचा किती अपव्यय होतो हे कुणीतरी शोधायला पाहिजे. (सर्व आजीमाजी नगरसेवकांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, 'इथे हे या चु*याचे घर आहे' असे सार्वजनिक पैशातून चांगले लोखंडी बोर्डस लावलेले आहेत. प्रत्येक सरकारी गोष्टीच्या नावाखाली 'संकल्पना - अमुक चु*या' असे सार्वजनिक म्हणजे जनतेच्या पैशातून लिहिले जाते. याचा हिशोब काढला तर तोच कोट्यवधी रुपयांचा असेल. याचा फायदा शून्य.) असो. २. फ्लेक्सबंदी - भारतातून सक्तीची फ्लेक्सबंदी करायला हवी. कुठल्याही संस्थेला यातून मिळणार्‍या उत्त्पन्नाची गरज नाहीए. त्याऐवजी उत्पन्नाचे दुसरे चांगले मार्ग शोधावेत. बिलबोर्डासाठी मोठ्या रस्त्यांशिवाय कुठेही परवानगी मिळायला नको. ३. भाषाविषयक धोरणे - भारताने त्रिभाषा सूत्र नावाचा जो अडाणीपणा चालवला आहे तो ताबडतोब बंद करायला हवा. राज्यभाषा आणि इंग्रजी सक्तीच्या भाषा. इतर राज्यभाषा, परदेशी भाषा या ऐच्छिक विषय म्हणून असायला पाहिजेत. ज्या राज्यांची राज्यभाषा प्रमाण हिंदी असेल ते शिकवतील हिंदी तिथल्या मुलांना. बाकीच्या मुलांना, त्यांच्या पालकांना इच्छा असेल तर हिंदी/इंडोनेशियन/थाई ऐच्छिक म्हणून शिकतील. शिवाय आजकाल बोलीभाषांना एक उगीचच अवास्तव महत्त्व आले आहे त्याचे कौतुक तेवढ्यापुरते तेव्हढे ठेवावे. राज्यभाषांचे तर प्रचंड नुकसान झालेलेच आहे. मुलांवर भाषांचा मारा जितका कमी करता येईल तितका तो केला पाहिजे. प्रत्येक महत्वाचा सरकारी कागद उदा. जन्म दाखला हे कमीतकमी दोन भाषांत (राज्यभाषा आणि इंग्रजी) दिला गेलाच पाहिजे. भाषाशिक्षणाचे प्रमाणीकरण केले पाहिजे. ४. कागदपत्रांचे प्रमाणीकरण - वेगवेगळ्या सरकारी कागदपत्रांचे देशपातळीवर प्रमाणीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. उदा. जन्मदाखला, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, लग्नाची नोंद, प्रॉपर्टीची कागदपत्रे इत्यादी इत्यादी.. आधी प्रमाणीकरण, मग आपसूक येते ते डिजीट्लीकरण.. ती कमीतकमी दोन भाषांमध्ये एकाचवेळी देणे बंधनकारक केले पाहिजे. ५. भारतीय पर्यटनस्थळे : भारत पर्यटनात खूप मोठी मजल मारू शकतो आणि भरपूर कमवूदेखील शकतो. काही पर्यटनस्थळे जागतिक दर्जाची असावित. म्हणजे तिथली पायाभूत सुविधांची कलाकुसर, सोयी, ट्रान्स्पोर्ट हे परदेशी नागरिकांना मानवेल असे ठेवावे. उदा. अजिंठा वेरुळ लेणी, बदामीचा परिसर. काही पर्यटनस्थळे ही देशी-परदेशी दोन्ही लोकांच्या दृष्टीने विकसित करावीत. उदा. रायगड. दुसर्‍या प्रकारची भारतीय पर्यटनस्थळे भारतीय पुरातत्व विभाग नावाच्या तुरुंगातून ताबडतोब मोकळी करून राज्यांना विकसित करायला द्यायला हवीत. तिथे नाममात्र फी न ठेवता भरपूर फी ठेवावी. उदा. बदामी लेणी आणि किल्यांसाठी किमान ५०० रुपये आणि १० डॉलर्स प्रतिमाणशी इतका तरी दर पाहिजे. पन्नास भंगार लोक तिथे जाण्याऐवजी दहा शहाणी माणसे पैसे मोजून जातील. सर्वसामान्यांना परवडत नाही वगैरे गळे काढू नयेत. सर्वसामान्य माणूस खंडोबाला जाऊन हजारेक रुपये सहज उधळून येतो. ६. आधार सगळीकडे - सर्व ठिकाणी आधार सक्तीचे करावे. लग्नाच्या नोंदी, कुटुंबाच्या नोंदी, इत्यादी इत्यादी सगळीकडे. सरकारने कुठल्याही कोर्टाच्या निर्णयाला न जुमानता आधार लिंकिंग राबवले पाहिजे. स्वस्त धान्य वगैरे आधार शिवाय अजिबात मिळाले नाही पाहिजे. त्यासाठी दर किमान ५००० लोकसंख्येमागे एक या हिशोबाने सरकारी आधार केंद्रे सुरु करायला पाहिजेत. मतदान, बँक, इतर सरकारी आस्थापने, दवाखाने इथे सगळीकडे आधार सक्तीचेच पाहिजे. भ्रष्टाचाराची खूप मोठी कुरणे आधारसक्तीने बंद होतील. ७. महत्त्वाच्या संस्थांचे 'आयआय'करण/ नवीन क्षेत्रांमध्ये अशा संस्था स्थापणे - सरकारने काही महत्त्वाच्या संस्थांना 'इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स' चा दर्जा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक तर अशा दर्जाची संस्था हवी आहे. काही उत्तम संस्थांचे सरकारने आय. आय. करण करून त्यांचा दर्जा किमान एखाद्या आयायटी इतका केला पाहिजे. शिवाय त्यांची स्वायत्तता अबाधित ठेवून किमान दर्जा राखण्यासाठी काहीतरी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरवून दिला पाहिजे. सगळ्या क्षेत्रांमध्ये सरकारने अशा संस्था काढून भरपूर आर्थिक अनुदान आणि सवलती दिल्या पाहिजेत. उदा. प्रत्येक राज्यात एकतरी एफटीआयआय च्या दर्जाची संस्था हवी. प्रत्येक दहा जिल्ह्यांमागे एक आय आय टी, प्रत्येक जिल्ह्यात एक एन आय टी, प्रत्येक राज्यात किमान तीन स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर सारखी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अशा प्रकारची काहीतरी योजना करावी. मला खालील प्रकारच्या संस्था/संस्थांचे प्रमाणीकरण पाहायला खूप म्हणजे खूप आवडेल - १. इंडियन इन्टिट्यूट्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस/म्युझिक/फिल्म/मेडिया २. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लॉ ३. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिसिन ४. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ कॉमर्स/इकॉनॉमिक्स/ट्रेड ५. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ फॅशन ६. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सोशल सायन्सेस/हुमॅनिटिज ७. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ अ‍ॅग्रीकल्चर ८. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लँग्वेजेस/आर्ट्स/लिटरेचर ९. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ स्पोर्ट्स १०. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ पॉलिसी/गव्हर्नन्स ११. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ डिफेन्स १२. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ बेसिक अँड नॅचरल सायन्सेस इत्यादी इत्यादी व इतर विवक्षित संस्था उदा. बँकिंग व इन्शुरन्स ८. रेल्वे सामायिक सूचीत - रेल्वे ही केंद्रीय सूचीतून काढून ती सामायिक करावी. प्रत्येक राज्याला रेल्वेमार्ग बांधण्याचा, रेल्वेसेवा चालवण्याचा पुरेपूर हक्क पाहिजे. १०. पब्लिक हेल्थ इन्शुरन्स - ना नफा ना तोटा तत्वावर एल आय सी सारख्या पब्लिक हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्या सरकारने काढाव्यात. प्रत्येक व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स सक्तीचा केला पाहिजे. तो सावर्जनिक असो वा खाजगी. कदाचित हे अवघड जाईल सुरुवातीला, पण या अंगाने कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. ११. धार्मिक स्थळांवर कर - सगळ्या सार्वजनिक आणि खाजगी धार्मिक स्थळांवर वेगळी कर आकारणी झाली पाहिजे. ट्रस्ट शिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाला मंजूरी मिळाली नाही पाहिजे. प्रत्येक ट्रस्टचे वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक केले पाहिजे. मग ते मंदीर असो, नाहीतर गुरुद्वारा, नाहीतर एखादा मठ, नाहीतर चर्च असो वा मशीद/मदरसा.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 01/08/2023 - 02:38 नवीन
नेहमीप्रमाणे मुद्देसूद प्रतिसाद आणि मांडणी. धन्यवाद. एक बारीकसे मत.
ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले.
काहीशी असहमती. पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत (सहा आकडी पिन कोड नव्हे)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2023 - 08:07 नवीन
पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत
संदर्भ...? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 01/08/2023 - 08:19 नवीन
तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे.. घ्या https://en.m.wikipedia.org/wiki/Postal_Index_Number The PIN system was introduced on 15 August 1972 by Shriram Bhikaji Velankar, an additional secretary in the Government of India's Ministry of Communications.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2023 - 08:40 नवीन
तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे..
तसदीबद्दल क्षमस्व सर. आणि माहितीबद्दल आभारी आहे. आपलं मत गुगलल्याशिवाय मान्य करणार होतो. पण, दोन हजार चौदापासून 'विश्वासराव' खपले आहेत. पडताळणी करायची आणि मग मान्य करायचं. असं धोरण आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 01/13/2023 - 11:33 नवीन
प्रा डॉ असण्याविषयी विश्वास्राव काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा