भारताच्या तुलनेत
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?
पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?
मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_
गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे.२००% सहमत. मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत किळसवाणे व रसातळाला पोहोचले आहे व यासाठी महाराष्ट्रातील सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष समान प्रमाणात कारणीभूत आहेत. अर्वाच्य बोलणे, शिवीगाळ, दुसऱ्याच्या बोलण्यातून एखाद्या वाक्याचा सोयिस्कर अर्धवट भाग उचलून त्यामुळे महापुरूषांचा अपमान झालाय अशी बोंब मारणे, आपल्याविरूद्ध कोणी टीका केली तर लगेच त्याच्या/तिच्या विरूद्ध ३०-४० पोलिस ठाण्यात तक्रार करून त्याला/तिला आत टाकणे, पराकोटीचा जातीयवाद, टीकाकारांना बेदम मारहाण, प्रचंड भ्रष्टाचार, मुख्य प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष, अत्यंत नालायक लोकांना आपल्या गटात ओढून सत्ता मिळविणे व त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे . . . या सर्व प्रकाराचा किळसवाणा अतिरेक झालाय. दुर्दैवाने बहुतेक सर्व माध्यमे केवळ सुपारीबाज बनली असून खोट्या कहाण्या बनवून आगीत तेल ओतून आग भडकविण्यात व्यग्र आहेत. अश्या भीषण परिस्थितीत आपल्याला काहीही भवितव्य नाही व देशाबाहेर जाणे हाच युवक-युवतींना एकमेव योग्य मार्ग वाटल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे.त्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारी तरूण पाहण्याची आवश्यकता नाही. ट्विटर, फेसबुक इ. समाजमाध्यमातील अनेक मराठी तरूणांच्या प्रतिक्रिया वाचले की यांच्यावरील संस्कार लक्षात येतात.