Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारताच्या तुलनेत

उ
उपयोजक
गुरुवार, 12/29/2022 - 16:33
🗣 204 प्रतिसाद
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे. हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 49486 views

🗣 चर्चा (204)
श
श्रीराम बिडीकर Mon, 01/02/2023 - 21:20 नवीन
तुम्ही हाच प्रश्न Quora.com वर विचारा.. ढिगाने उत्तरं मिळतील.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/03/2023 - 01:15 नवीन
१)भारतातील सुस्तपणा. एखादी गोष्ट चोख व्हावी याचा आग्रह नसतो. कोणत्याही चांगल्या गोष्टीला एक गुप्तपणे/उघड राजकीय विरोध असतो. २)गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांची सांगड घातली जात नाही. विद्यालये, महाविद्यालये इथे तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ तयार होतात. पण त्याची गती मंद आहे किंवा आव्हानं स्विकारण्यात वेळ घालवतात. मग तज्ज्ञ लोक ठामपणे उद्योगांना आपल्या इथे बनवलेले शोधलेले तंत्रज्ञान देण्यात मागे पडतात. ३)वचनाला जागणे याचा अभाव. या तीन गोष्टी प्रगतीला मारक आहेत.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 01/13/2023 - 10:36 नवीन
३)वचनाला जागणे याचा अभाव. >> +१
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/03/2023 - 03:53 नवीन
इतर राज्यांची फारशी माहिती नाही. परंतु ज्या राज्यात अजूनही जनतेसाठी काही करण्याऐवजी कोणाचा तरी अपमान, कोणाची तरी बदनामी, शेकडोंची जयंती/पुण्यतिथी, जातीयवाद याचा अतिरेक झाला आहे, त्या राज्यातील शहाणे जन अन्यत्र स्थलांतरित होणारच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/03/2023 - 03:53 नवीन
इतर राज्यांची फारशी माहिती नाही. परंतु ज्या राज्यात अजूनही जनतेसाठी काही करण्याऐवजी कोणाचा तरी अपमान, कोणाची तरी बदनामी, शेकडोंची जयंती/पुण्यतिथी, जातीयवाद याचा अतिरेक झाला आहे, त्या राज्यातील शहाणे जन अन्यत्र स्थलांतरित होणारच.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 01/03/2023 - 06:03 नवीन
भारतात १४०० कोटी लोक रहातात. त्यातले १ - २ कोटी लोक बाहेरच्या देशांत गेले तर असा काय फरक पडणार आहे? झाला तर थोडाफार देशाला व बाहेर जाउ ईच्छीणार्‍या पुढच्या पीढीला फायदाच होईल. बरेचसे दुसर्‍या देशांत गेलेले लोक जास्त पैसे कमवायलाच गेलेले असतात. तीथे बहुतेकवेळा भारतापेक्षा कितीतरी जास्त संधी आणी कमी स्पर्धा असते. परदेशातील चांगल्या सुखसोईंची व आरामशीर जीवनाची सवय होउन त्याची परीणीती तीथेच स्थायिक होण्यात होते.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 01/03/2023 - 06:40 नवीन
१४०० कोटी ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 01/03/2023 - 08:12 नवीन
असू शकेल. ६०० कोटी मतदारांनी भाजपला मत देऊन सत्ता हातात दिली असे पंतप्रधान म्हणाले होते.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 01/03/2023 - 09:32 नवीन
तरीपण एखाद कोटी, किंवा २५ - ५० लाख बाहेर गेले तर काय बिघडते. बाकीच्यांना संधी उपलब्ध होतील.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 01/06/2023 - 01:37 नवीन
Quality ओव्हर Quantity ! कुठल्याही समाजांत बहुतेक प्रगती हि फक्त १०-२०% लोकपासूनच होते. ह्याला Pareto तत्व म्हणतात. त्यामुळे हे लोक गेल्यास समाजाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे देशांत खूप लोक आहेत १-२ कोटी गेल्यास फरक पडत नाही हे नेहमीच बरोबर नाही. युगांडा मधील शेती व्यवस्था आपले गुज्जू लोक सांभाळत होते आणि ते चांगले श्रीमंत होते. ईडी अमीन सत्तेवर आल्यानंतर त्याने रातोरात ह्यांना हाकलून लावले. युगांडा ची शेती व्यवस्था युगांडा मधील कृष्णवर्णीय लोक चालवू शकले नाहीत आणि अर्थव्यवस्था कोलमडली. गुज्जू मंडळी लंडन मध्ये निर्वासित म्हणून गेली आणि काही दशकांत ती मंडळी आता लंडन मधील सर्वांत श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. पण भारताच्या बाबतीत आपले म्हणणे बरोबर आहे. भारत बऱ्यापैकी मागासलेला असल्याने भारतातील उच्चशिक्षित मंडळीच नाही तर अगदी साधारण शिक्षित मंडळी सुद्धा विकसित देशांत जाऊन कैक पटीने पैसे कमावू शकते. आणि ह्या पैश्यांतील १०% जरी त्यांनी भारतात पाठवले तर भारतात राहून त्यांनी जितका पैसा कमावला असता त्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त पैसे असतात. साधा ट्रक ड्राइवर वर्षाला भारतांत फार तर २ लाख कमावू शकतो. तोच माणूस कॅनडात गाडी धुण्याचे काम करत २ लाख रुपये सेविंग्स म्हणून भारतात पाठवू शकतो. त्यामुळे मागासलेल्या देशांतील लोक विकसित देशांत गेल्यास मागासलेल्या देशाला जास्त फायदा होतो. हळू हळू मागासलेला देश प्रगत होत जातो आणि हा फरक कमी होत जातो. चीन आणि कोरिया ह्याचे उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 01/03/2023 - 08:11 नवीन
काही मुद्दे १. भारतातील बेशिस्त-- कुठेही टपर्‍या टाकणे/अतिक्रमणे करणे, जागा बळकावणे, बेकायदा बांधकामे आणि त्याला असलेले राजकीय पाठबळ, रस्त्यात हिंडणारे प्राणी, भिकारी, सिग्नल न पाळणारे, राँग साईडने गाड्या चालवणारे लोक २.प्रदूषण,घाण आणि कचरा- कुठेही कचरा टाकणे,थुंकणे,विधी उरकणे,पाळीव प्राण्यांची जिन्यात्,रस्त्यात घाण, हायवेच्या बाजुला कचरा जाळणे ३. बेकारी- तुलनेने महाग होत चाललेले शिक्षण आणि नंतर मिळणार्‍या संधीचा/नोकर्‍यांचा अभाव, सगळीकडे वाढत चाललेली स्पर्धा आणि त्यामुळे कमी पैशात जास्त श्रम करायला भाग पडणे ४. कौटुंबिक कलह,हेवेदावे- कुटंबापासुन दूर राहुन कोणाची ढवळा ढवळ सहन न करता शांतपणे जगण्याची इच्छा, फॉरेन स्टाईल जीवनशैलीचे आकर्षण दुसर्‍या बाजुने बघितल्यास १.रशिया युक्रेन युद्ध, कोव्हिड, ब्रेक्झिट, वाढती महागाई यामुळे कुठल्यही देशात नवरा बायको दोघांना नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. भारतात निदान आपल्याला दरवर्षी ७ टक्के माहागाई वाढण्याची सवय आहे, पण सध्या परदेशात ईंधनाचे दर दुप्पट झाल्याने भयंकर परीस्थिती आहे. माझे कॅनडातील मित्र जे महिना ४०-५० डॉलरचे पेट्रोल आणि ७००-८०० मध्ये महिन्याचा किराणा घेत होते ते आता त्यासाठी २०० डॉलर आणि १५०० डॉलर पर्यंंत खर्च करत आहेत. अमेरिकेत आणि ईंग्लंड्मध्येही फारशी वेगळी स्थिती नाही. २. भारतात अजुनही काही प्रमाणात सपोर्ट सिस्टीम टिकुन आहे. नातेवाईक, शेजारी पाजारी मदत करतात. वेळ पडल्यास पैसे टाकुन कामवाल्या बायका,ड्राय्व्हर, पाळणाघरे, नर्सेस, स्विगी,झोमॅटो,ओला/उबेर्,बिग बास्केट सगळे घरपोच मिळते. ३. वर्ण द्वेष- काही दिवसांपुर्वी कायप्पावर एक व्हिडिओ बघितला. फ्रान्समधील कुठल्याशा शहरात स्थलांतरीत मुस्लिम लोक रस्त्यात नमाज पढत आहेत आणि वैतागलेले खोळंबलेले कार वाले लोक त्यांना शेवटी ओढुन रस्त्यातुन हटवत आहेत. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणारे हल्लेही काही नवीन नाहीत. थोड्याफार फरकाने सर्वच देशात ही अवस्था आहे कारण बाहेरचे लोक येउन आपली नोकरी घालवत आहेत हे कोणालाच आवडणार नाही. त्यात ते स्थानिक कायदे पाळत नसतील तर अजुनच. परदेशात स्थायिक झालेले मिपाकर सध्याच्या परीस्थितीवर जास्त चांगला प्रकाश टाकु शकतील.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 01/03/2023 - 09:30 नवीन
कुठेही टपर्‍या टाकणे/अतिक्रमणे करणे - अमेरीकेत तरी सर्वत्र बेघर लोक कुठेही तंबु ठोकुन खुशाल राहु शकतात. कायद्याचे संपुर्ण संरक्षण त्यांना आहे. लॉस एंजलिस व सॅन फ्रांसिस्को सारखी शहरे या बेकायदा झोपडयांनी बकाल केली आहेत. काही ठिकाणी तर भर दिवसा जायला भीती वाटते. ते लोक रस्त्यावरच सर्व वीधी उरकतात व दीवसभर नशेत पडुन असतात. पालिकेचे कचरेवाले तीथे साफसफाई करायला जात नाहीत. लै बेकार परिथिती आहे. पेट्रोलचे दर जरी डबल झाले तरी फारसा फरक पडत नाही. काही काळाने कमी होतात. १५०० डॉलर किराणाव कुणी खर्च करत नाहीत. ५०० डॉलर्सच्या आसपास महीन्याचा किराणा आरामात भागतो. पगार मजबुत असतो. नवीन कॉलेज ग्रॅज्युएट मुलांना आरामात दीड ते दोन लाख डॉलर्स पर्यंत पगार मिळतो. तेव्हा लोकांना फारसा फरक पडत नाही. आपल्या भारतीय लोकांनातर अजीबातच नाही.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 01/03/2023 - 10:10 नवीन
फ्रेशर पास आउट मुलांना १.५-२ लाख डॉलर पगार? तोही आरामात? आणि महिन्याचा कुटुंबाचा किराणा ५०० डॉलर्समध्ये? डिटेल्स द्या की राव, लगेच माझ्या मुलाला तिकडेच पाठवतो पुढे शिकायला. जमल्यास फॅमिली रि युनियन वगैरे करुन मी पण येतो की तिकडेच, हा का ना का.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 01/03/2023 - 17:03 नवीन
जरुर पाठवा. हल्ली बरेच भारतीय आपल्या मुलांना १२ वे नंतर अमेरीकेतल्या स्टेट कॉलेजेसमध्ये पाठवतात. फी थोडी कमी असते.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 01/04/2023 - 04:54 नवीन
या निमित्ताने-- अंडर ग्रॅड साठी परदेशात जावे की पोस्ट ग्रॅड साठी अशीही एक चर्चा ईथे करता येईल.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 01/09/2023 - 14:56 नवीन
बेघर लोकांनी 'अमेरिकेसारख्या सर्वशक्तीमान देशात' ही अशी बकाल परिस्थिती निर्माण करुनही त्यांना कायद्याचे इतके संरक्षण का? अमेरिका धनाढ्य नि प्रगत देश असूनही या लोकांना साधी मोफत घरे बांधून देण्यात अमेरिकेला अडचण काय असावी?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 01/03/2023 - 13:03 नवीन
@ राजेन्द्र मेहेंदळे: सगळे मुद्दे यथोचित मांडलेले आहेत. सहमत आहे. अमेरिकेत मी मुलाबरोबर दर शनिवारी बाजाराला जायचो. गेल्या वर्षीपर्यंत दरमहा भाजीपाला, फळे आणि दूध यालाच ५०० डॉलर्स लागत होते. हल्लीचे माहीत नाही. पॅरिसमधे महागाई खूपच वाढलेली आहे आणि आणखीही वाढतच आहे. १९९१ पासून आम्ही रहात असलेले दिल्लीजवळचे फरिदाबाद शहर आता इतके घाणेरडे झालेले आहे की घराबाहेर पडणेही नकोसे वाटू लागले होते, त्यामुळे तिथे बांधलेले घर विकून इंदौरला स्थानांतरित झालो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/03/2023 - 13:22 नवीन
सध्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे, जनतेच्या हिताचे प्रश्न व समस्या खालीलप्रमाणे - १) संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक २) महाराष्ट्र धर्म की हिंदू धर्म ३) औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला की हत्या केली ४) औरंगजेब हिंदूद्वेष्टा होता की नव्हता? ५) महापुरूषांचा अपमान राष्ट्रवादी, शिल्लक सेना वगैरे विरोधी पक्ष करताहेत की सत्ताधारी भाजप? ६) महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांचे पुतळे जाळायचे की त्यांच्या तोंडावर शाई फेकायची? ७) शिवाजी महाराजांचे खरे समर्थक राष्ट्रवादी, शिल्लक सेना वगैरे विरोधी पक्ष की सत्ताधारी भाजप? ८) खरे कडवे हिंदुत्ववादी शिल्लक सेनावाले की मनसेवाले की भाजप? ९) सावरकर माफीवीर की स्वातंत्र्यवीर? १०) बाळ ठाकरेंच्या धगधगत्या हिंदुत्ववादी विचारांचे (!) खरे वारसदार बा. शिवसेना की शिवसेना (उबाठा)? ११) उर्फी जावेद असभ्य वेशभूषा करते की सभ्य वेशभूषा करते? १२) नागपुरातील संघ कार्यालयात एकनाथ शिंदेंनी गुलाल लावलेली लिंबे ठेवली की उद्धव ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी गुलाल लावलेली लिंबे ठेवली? १३) उठांच्या सभेला जास्त गर्दी होती की एकनाथ शिंदें च्या सभेला? १४) भगव्या बिकिनीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाला की नाही झाला? १७) महापुरूषांच्या तथाकथित अपमानाविरूद्ध आवाहन केलेला महाराष्ट्र बंद यशस्वी की अयशस्वी? १८) मुंबईतील महामोर्चा यशस्वी की अयशस्वी? १९) जात्याधारीत जनगणना हवी की नको? २०) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ न ठेवता निवडणूक घ्यावी की न घ्यावी? या अत्यंत गंभीर समस्या व प्रश्नांवर विचार करून योग्य उत्तर शोधण्याऐवजी महाराष्ट्रातील उच्चशिक्षित युवक-युवती परदेशी जाण्याचा पलायनवादी मार्ग स्वीकारत आहेत, यासाठी त्यांचा जाहीर निषेध करतो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 01/03/2023 - 13:55 नवीन
मार्मिक
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 01/03/2023 - 14:10 नवीन
@श्रीगुरूजी एक महत्वाचा मुद्दा विसरलात,आरक्षण. बाकी अमरिकेत थोडे दिवस राहीलो आहे. आमच्या सारख्या वरीष्ठ नागरिकांना वैद्यकीय सुखसोई नाहीत. महागाई जरी वाटत आसली तरी पगार सुद्धा तसेच आहेत. पेट्रोल चे भाव सारखेच वाटले. १०० डालरात बर्‍यापैकी सामान येते. गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे. खोबरं तीकडे चांगभल नाहीतर काय उपाशी मरायचं. बरेच काही लिहीता येईल. १४० कोटीतली काही बाहेर गेल्याने फरक पडतो हे जोपर्यंत सरकारला कळत नाही तोपर्यंत असेच रहाणार. कुसुमाग्रज यांची पाच पुतळ्याची कवीता आजही तेवढीच लागू पडते. प्रत्येकजण आपापले पुतळे पकडून बसलेत. इतीहासचा उपयोग तुंबडी भरण्या साठीच होताना दिसतोय. दर एक जानेवारीला मन उदास होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/03/2023 - 16:18 नवीन
गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे. २००% सहमत. मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत किळसवाणे व रसातळाला पोहोचले आहे व यासाठी महाराष्ट्रातील सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष समान प्रमाणात कारणीभूत आहेत. अर्वाच्य बोलणे, शिवीगाळ, दुसऱ्याच्या बोलण्यातून एखाद्या वाक्याचा सोयिस्कर अर्धवट भाग उचलून त्यामुळे महापुरूषांचा अपमान झालाय अशी बोंब मारणे, आपल्याविरूद्ध कोणी टीका केली तर लगेच त्याच्या/तिच्या विरूद्ध ३०-४० पोलिस ठाण्यात तक्रार करून त्याला/तिला आत टाकणे, पराकोटीचा जातीयवाद, टीकाकारांना बेदम मारहाण, प्रचंड भ्रष्टाचार, मुख्य प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष, अत्यंत नालायक लोकांना आपल्या गटात ओढून सत्ता मिळविणे व त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे . . . या सर्व प्रकाराचा किळसवाणा अतिरेक झालाय. दुर्दैवाने बहुतेक सर्व माध्यमे केवळ सुपारीबाज बनली असून खोट्या कहाण्या बनवून आगीत तेल ओतून आग भडकविण्यात व्यग्र आहेत. अश्या भीषण परिस्थितीत आपल्याला काहीही भवितव्य नाही व देशाबाहेर जाणे हाच युवक-युवतींना एकमेव योग्य मार्ग वाटल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 01/13/2023 - 15:34 नवीन
महाराष्ट्राचे राजकारण शिसारी येण्याएवढे घाण झाले आहे. गेल्या २० वर्षातील घसरण बघुन लाज वाटते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/13/2023 - 17:22 नवीन
दुर्दैवाने खरे आहे. यासाठी सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष व त्यांचे नेते समप्रमाणात कारणीभूत आहेत.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 01/03/2023 - 13:53 नवीन
जिथे अधिक संधी तिथे स्थलांतर हे नैसर्गिकच आहे. भारतातून अनेकजण वैध मार्गाने आणि काहीजण अवैध मार्गाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांत जातात तसेच त्याच्या कित्येकपटीने अधिक बांगलादेशी अवैधपणे भारतात येतात, राहतात. जो पर्यंत "वसुधैव कुटुंबकम" ही वृत्ती 'विश्वमान्य' होणार नाही तो पर्यंत हे चालूच राहणार.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 01/04/2023 - 08:51 नवीन
भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. फॅमिली, प्रिय व्यक्ती आणि धर्म ह्या गोष्टी सोडल्यास भारतांत राहायला एकही चांगले कारण नाही. कतार सारख्या कट्टर इस्लामिक राष्ट्रांत भारतीय लोक जाऊन अक्षरशः गुरा प्रमाणे आनंदाने राबतात कारण भारतातील त्यांची परिस्थिती आणखीन भयावह आहे. इतर देश का चांगले आहेत हे मिपा वर लिहून काही साध्य नाही. भारत देश खूप म्हणजे खूपच गरीब आहे. आम्ही तुम्ही सहज पणे भारतातील टॉप १०% लोकां पैकी आहोत. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. बहुतेक लोकांची क्षमता स्वीग्गी डिलिव्हरी बॉय ची सुद्धा नाही. भ्रष्टाचार हि मोठी गोष्ट नाही. पोर्तुगाल आणि स्पेन मध्ये असंख्य भारतीय जातात. ह्या दोन्ही देशांत भरपूर भ्रष्टाचार आहे. युक्रेन, पोलंड इत्यादी देश जास्त श्रीमंत नसले आणि बऱ्यापैकी भ्रष्ट असले तरी भारत पेक्षा कित्येक पटींनी जास्त राहण्या योग्य आहेत. भारत सरकार हे ब्रिटिश सरकार २.० आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याच नागरिकांना चोरा प्रमाणे वागवणे, प्रत्येक गोष्टीसाठी भीक मागण्यास लावणे आणि आपल्या जवळच्या काही लोकांच्या हाती देशाची संपत्ती सोपवणे हे काम ज्या पद्धतीने ब्रिटिश सरकार आणि त्यांचे हस्तक करत होते त्याच प्रमाणे भारत सरकार आणि इतर राज्य सरकारे करत आहेत. हिंदूंच्या देवळांवर डल्ला, शिक्षण क्षेत्रावर आपला लोखंडी पंजा आणि इतर प्रत्त्येक ठिकाणी सरकारी बाबुंचे तळवे चाटल्याशिवाय काहीही देशांत घडू नये ह्याची खबरदारी. हे काम भारत सरकार करत आहे आणि त्याच साठी विविध लोक शेवटी कंटाळून देश सोडून इतर ठिकाणी जातात. जिला शक्य आहे आणि आवड आहे तिने नक्कीच जावे. कुठल्या देशांत आपला जन्म व्हावा हा निर्णय आम्ही घेत नाही पण कुठे आपण राहू शकतो हा निर्णय आम्ही नक्कीच घेऊ शकतो. Image removed. हि आहे भारतीय विश्वगुरू संस्कृती : Image removed.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 01/04/2023 - 11:02 नवीन
भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. इतर देशात बेघर,बेकार लोकांची काय परीस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय? त्यांचे रहाणीमान पंचतारांकित आहे का?. क्रिमिनल, काॅमप्रमाइज्ड एरीया का काय म्हणतात तो नाही का?. इतर देशात सर्वांची संपत्ती एकसारखी आहे काय? बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. बहुतेक लोकांची क्षमता स्वीग्गी डिलिव्हरी बॉय ची सुद्धा नाही. इतर देशात काय सगळेच आईनस्टाईन चे वंशज आहेत का? State of mental illness मधे कुठले देश अग्रणी आहेत व तुलनात्मक भारतातली परिस्थीती लक्षात घेता कुठला देशात बेकार व कुठला चांगला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. कतार सारख्या कट्टर इस्लामिक राष्ट्रांत भारतीय लोक जाऊन अक्षरशः गुरा प्रमाणे आनंदाने राबतात कारण भारतातील त्यांची परिस्थिती आणखीन भयावह आहे. कतार सारख्या देशात काय फक्त भारतीयच आहेत काय? आपण म्हणता तशी परीस्थीती सर्वच देशात आहे. गरीब श्रीमंत, सज्जन दुर्जन ,लहान मोठे. सर्व चमकदार गोष्टी सोन्याच्या नसतात. भारत व भारतीय लोकांबद्दल आपले मत पूर्वग्रहदूषित आहे असे वाटते. किंवा आपण फुल्स पॅरडाईज मधे राहातायं. उघडा डोळे बघा निट. कितीतरी गोष्टीत भारत अत्मनिर्भर आहे. आपण या देशात रहात नाहीत असे वाटते नाहीतर असे अपशब्द लिहीले नसते.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 01/04/2023 - 13:07 नवीन
कै च्या कै!! परदेशात बसुन भारतावर थुंकायचे ते पण कुठल्यातरी वेबसाईटवरचा डेटा गुगलुन. त्या डेटाची सत्यता पडताळुन पाहिली आहे का? किती ऑथेंटिक आहे? काही पत्ता नाही. कॅनडामध्ये अबोरिजिनल लोकांना सरकार भत्ता देते, दिवसभर ते लोक नशा करुन ते पैसे उडवतात आणि मग रस्त्यात भीक मागत फिरतात. अमेरिकेत न्युयॉर्क आणि एल ए मध्ये तंबु टाकुन रस्त्याकडेला राहणार्‍यांचा उल्लेख वर आलाच आहे. युरोपमध्ये स्थलांतरीत लोकांचीही स्थिती वेगळी नाही. भारतात निदान शेती भरपुर टिकुन असल्याने गरीबातील गरीब माणुसही थोडेफार अन्न मिळवु शकतोच. शिवाय उन्हाळा/पावसाळा/हिवाळ्यातील हवामानात प्रचंड फरक (हे मी +३० ते -३० च्या तुलनेत म्हणतोय) नसल्याने कपडे वगैरे फारसे न बदलता माणुस बाहेर हिंडु शकतो. ठिकठिकाणी कट्ट्यावर्,देवळात्,बागेत चकटफु हिंडु शकतो,सामाजिक जीवन्,शेजार पाजार अजुन टिकुन आहे. परदेशात माणुस आजारी पडला तर शेजारी नाही मदत करणार. दारात मेडिकल सर्विस बोलावण्याशिवाय पर्याय नाही. आणि वयस्क एकट्या माण्सांना वृद्धाश्रमात (मग नाव कितीही गोंडस द्या) रहाण्याला पर्याय नाही. वयाच्या सोळाव्या वर्षापासुन बॉयफ्रेंड्/गर्लफ्रेंड बरोबर राहण्यासाठी घर सोडण्याची पद्धत असल्याने शिक्षण थांबते आणि पैसे कमवायला लहान मोठे जॉब करावे लागतात. यामुळेच परदेशाचे गोडवे गाणारे भारतीय बाप , मुलगी वयात आली की अचानक आपली संस्कृती वगैरे आठवुन गळे काढु लागतात आणि भारतात परत यायला बघतात. अजुन बरेच लिहिता येईल पण इत्यलम.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 01/04/2023 - 14:04 नवीन
राजूभौ एकदम सहमत आहे. आजही मुलं आईबापाचे पाय शिवतात. तीकडे मुलांना वाचायला यायला लागले की ९११ ची धमकी देतात. नाॅर्वे कर तर मुलाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून आई बापाला हाकलून देऊन तान्ह्या बाळाला सुद्धा ठेवून घेतात. एक L S CS झाले तर बहात्तर लाखाचे बिल बनवले. दात दुखतोय तीन महिन्यानंतर आपाइन्टमेन्ट. असे ऐकण्यात आले की अमरिकेत जर अर्थिक इमर्जन्सी आली तर कमरेचे सोडून द्यावे लागते कारण विकांताला खिसा खाली होतो. तसे सुद्धा हुच्च शिक्षण परवडत नाही त्यामुळे ड्रापआऊट भरपुर एखादाच बिल गेट्स बनतो बाकीच्यांना स्वीगी झोमॅटोने घेतले तर घेतले. उच्च शिक्षित कुठून आणणार? होय, भारतात गरीबी आहे बरोबर माणूसकीपण आहे. आता लोक संख्याच भरपुर म्हणून त्याच प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट पण आहेत. स्वराज्य मिळून फक्त पंच्याहत्तर वर्ष झालीयं. थोडा वेळ लागेल पण विश्वगुरू नक्कीच होणार. माझ्या देशात घर जमीन जरी नसली तरी आधार आहे, हाकलून देणार नाही एवढा विश्वास जरूर आहे. जे परदेशी गेले त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 01/04/2023 - 21:33 नवीन
> आपण म्हणता तशी परीस्थीती सर्वच देशात आहे. गरीब श्रीमंत, सज्जन दुर्जन ,लहान मोठे. गरीब श्रीमंत सर्व देशांत आहेत हा मुद्धा बरोबर असला तरी भारतीय गरिबी हि अतुलनीय आहे. भारतांत बहुसंख्य लोक गरीब आहेत आणि इतर देशांतील तुलने खूपच म्हणजे अकल्पनीय गरीब आहेत. मेक्सिको, ब्राझील सुद्धा भारतापेक्षा कैक पटीने चांगले आहेत. भारताची परिस्थिती सुधारायची असेल तर, हि गोष्ट मान्य करणे स्टेप १ आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 01/09/2023 - 18:35 नवीन
https://fb.watch/hY10Z1zGC8/
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 01/07/2023 - 05:08 नवीन
पुरेपूर सहमत. साहना बाई कोलोनियल मनोवृत्ती वैगरे टाईप बाता मारणाऱ्या पैकी आहेत. पण खरा inferiority complex दाखवतात. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. स्वतच्या लोकांबद्दल इतका वंशव्देश्टा विश्वास कसा आहे समजत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sat, 01/07/2023 - 12:23 नवीन
बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो. हे त्यांच्याच एका प्रतिसादातले वाक्य आहे. त्यावरून अंदाज घ्या. हे वाक्य वाचून मी तर माघार घेतली
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 01/07/2023 - 05:04 नवीन
भिकार ऑप इंडिया. आजपर्यंत पूर्णपणे खरी अशी बातमी ह्यांनी कधी दिलीये का अशी शंका येते. तुम्ही दिलेली पंत बद्दलची बातमी सुध्दा शुद्ध असत्य आहे. कोणीही पंतच्या वस्तू चोरल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 01/07/2023 - 21:45 नवीन
@ साहना: तुमच्या प्रतिसादातील 'फॅमिली, प्रिय व्यक्ती आणि धर्म ह्या गोष्टी सोडल्यास भारतांत राहायला एकही चांगले कारण नाही'. हे वाक्य माझ्या यापूर्वीच्या वाचनातून सूटून गेले होते. आज पुन्हा वाचताना हे वाक्य वाचून मी अंतर्मुख झालो, आणि माझ्यापुरते तरी ते मला पूर्णपणे पटले. का आणि कसे, हे थोडेसे स्पष्ट करतो: माझी जन्मापासूनची पहिली सव्वीस वर्षे इन्दौरमधे गेली, तेंव्हा तिथे मला आवडायचे. बाहेरचे जग तोपर्यंत बघितले नव्हते. अधून मधून मुंबई पुणे वगैरेला जाणे व्हायचे, परंतु मला त्यापेक्षा इन्दौरच चांगले वाटायचे. दिल्लीला एकदोनदा गेलो, तेंव्हा नव्या दिल्लीतले प्रशस्त रस्ते, हिरवळी आणि मोठमोठी झाडे, लोदी गार्डन वगैरे सुंदर आणि विस्तीर्ण उद्याने, जुन्या इमारती, संग्रहालये, उतम पुस्तकालये, कला विथिका वगैरे मला आवडले आणि आपण तिथे स्थानांतरित व्हावे असे वाटू लागले. योगायोग आणि थोडे प्रयत्न यातून ती इच्छा पूर्ण झाली आणि इ.स. १९७७ ते २०२२ आम्ही दिल्ली परिसरात राहिलो. मात्र या ४५ वर्षात दिल्लीत खूप बदल घडून आले आणि नंतरच्या काळात तिथे रहाणे नकोसे वाटून अलिकडे पुन्हा इन्दौरला स्थानांतरित झालो. (गेल्या सहा वर्षांपासून इंदौर हे भारतातले सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेलेले आहे) गेल्या काही वर्षांपासून वर्षातले अनेक महिने आम्ही उभयता परदेशात स्थायिक झालेल्या मुलांबरोबर रहातो. त्यामुळे भारतात 'कुटुंब' असे नाही. समवयस्क नातेवाईकांपैकी काही परलोकवासी झाले, काही परदेशी गेले, काही खूपच वृद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या मुला-नातवंडांना आमच्यात स्वारस्थ्य न वाटणे स्वाभाविकच आहे. 'प्रिय व्यक्ती' म्हणजे लहानपणापासूनचे थोडेसे जे मित्र भारतात आहेत, ते आपापली कौटुंबिक कामे, आरोग्यविषयक समस्या वगैरेत गुंतलेले असल्याने भेट झाली तर काही तास गप्पा करणे, यापलिकडे फारसे काही नाही, आणि त्यांचेशी फोनवर बोलणे भारतातून काय वा परदेशातून काय, सारखेच आहे, ते मी पुष्कळदा करत असतो. तथाकथित 'धर्म' या गोष्टीशी मला लहानपणापासूनच काही सोयरेसुतक नसल्याने तोही प्रश्न नाही. अर्थात भटकंतीत आढळणारी मंदिरे, लेणी, वा चर्च वगैरेंमधे मी जरूर जातो ते तिथली वास्तुकला, मूर्तीकला वगैरे बघण्यासाठी. इथे एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मला सर्वप्रकारच्या प्राचीन गोष्टींबद्दल उत्सुकता असल्याने 'प्राचीन शिव मंदिर' वा तत्सम पाटी दिसली, तर मी आवर्जून तिथे जातो. परंतु तिथे (अद्याप टिकून असलेच तर) एकादे मोठे जुने झाड वा दूर कोपर्‍यातली एकादी पडकी भिंत, याव्यतिरिक्त 'प्राचीन' असे काहीही दिसत नाही. उलट म्युन्सीपाल्टीच्या मुतारीत लावतात तसल्या ओंगळ टाईल्स, भडक रंगरंगोटी आणि ठिकठिकाणी लोंबत असलेल्या चुन्न्या (हे कशासाठी असते कुणास ठाऊक) खरकट्या पत्रावळी आणि अन्य घाण वगैरेच बहुतेक जागी आढळते. याउलट युरोपमधील आठशे-हजार वर्ष जुन्या एकाद्या चर्चमधील लाकडी जमीन वा छत दुरुस्त करताना लावली जाणारी नवीन लाकडे भवतालच्या जुन्या लाकडांमधे बेमालूम मिसळून जातील, असे त्यांना पॉलिश वगैरे केले जाते. (सुतारकामाची आवड असल्याने असे काम मी बघत उभा रहातो). उदाहरणार्थ नुक्तेच मी फ्रान्समधील एक प्राचीन स्थळ बघून आलो. अकराव्या शतकातील फ्रेंच 'क्रुसेडर्स' जेरुसेलमला धर्मयुद्धासाठी जाण्यापूर्वी जिथे काही काळ राहून आवश्यक प्रशिक्षण घेणे, सामानाची जुळवाजुळव वगैरे करायचे, ते हे ठिकाण. इथल्या प्राचीन इमारती आवश्यक ती डागडुजी करून अजून उभ्या आहेत आणि तिथे त्यांची साद्यंत माहिती देणारे एक संग्रहालय अल्प तिकीट दर लावून चालवले जात आहे. या संपूर्ण परिसरात तिथले प्राचीन वातावरण भंग होईल असे काही दिसत नाही. मुख्य म्हणजे हे सगळे 'सरकार' ने केलेले नसून तिथल्या रहिवासींच्या पुढाकारातून केले गेलेले आहे. खाली तिथले काही फोटो देतो आहे: Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. तात्पर्य, माझ्या युरोप- अमेरिकेतील मुक्कामात भरपूर भटकंती, मोठमोठी संग्रहालये आणि कला-प्रदर्शने बघणे, प्रदूषणमुक्त स्वच्छ वातावरण, शेकडो वर्षांपासून जपलेल्या, खरोखरच्या 'प्राचीन' वास्तु, उत्तम साहित्य आणि अवजारे घेऊन कलानिर्मिती- सुतारकाम, लेखन - वाचन, वाद्ये वाजवणे वगैरे करणे तिथे जसे शक्य होते, तसे माझे भारतात होत नाही. अर्थात हे सगळे माझ्यापुरते सांगितले आहे. इतरांचे अनुभव अर्थातच अगदी वेगळे असू शकतात.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 01/08/2023 - 06:51 नवीन
होय. विविध विकसित देशांत आपल्या इतिहासासह रक्षण त्यांनी व्यवस्थित पद्धतीने केले आहे. भारतांत अनेक प्रचिंन वास्तु असल्या तरी तुलनेने त्याची देखभाल करण्यात आम्ही मागे पडलो आहोत. कला, संस्कृती इतिहास ह्या गोष्टी आणि समाजाची समृद्धी ह्यांचा फार खोल संबंध आहे. समृद्ध समाजांत अनेक व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य कला किंवा इतिहासाच्या अभ्यासांत घालवू शकतात. त्या अभ्यासातुन थेट वित्त निर्मिती होत नसली तरी इतर श्रीमंत लोक त्यांना मदत करतात. त्याच मुळे पाश्चात्य देशांत किंवा जपान मध्ये तुम्हाला हर प्रकारचं विषयावर आयुष्य वेचलेले लोक पाहायला मिळतील. भारतांत अश्या लोकांचे फार हाल होतात. तरी सुद्धा बाबासाहेब पुरंदरे, राम स्वरूप, सीताराम गोयल, विविध शास्त्रीय संगीतातील पंडित आणि विदुषी ह्या देशांत निर्माण होतात हि आपली पूर्वपुण्याई आहे. आमच्या इथे गड किल्यांची अवस्था दयनीय आहे. हेच किल्ले जर फ्रांस मध्ये असते तर तेथील सर्वांत महत्वाची आकर्षणे झाले असते आणि जागतिक पर्यटक स्थानांपैकी एक झाले असते. अमेरिकेत तर विविध ठिकाणी गरज नसताना किल्ले सदृश्य इमारती बांधून त्यांना पर्यटन स्थळे बनवली गेली आहेत. > मुख्य म्हणजे हे सगळे 'सरकार' ने केलेले नसून तिथल्या रहिवासींच्या पुढाकारातून केले गेलेले आहे. खाली तिथले काही फोटो देतो आहे: हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. न्यू यॉर्क मधील सार्वजनिक वाचनालय हि एक महत्वाची अमेरिकन संस्था आहे. पण प्रत्यक्षांत हि संस्था सरकारी नाही आणि नव्हती. पाश्चात्य देशांत अनेक वस्तू संग्रहालये, आर्ट गॅलरी इत्यादी आहेत त्या बहुतांशी लोकांचं पुढाकाराने निर्माण झालेल्या आहेत. अमेरिकेत एकूणच शासन व्यवस्था हि शहरांना केंद्र बिंदू मानून निर्माण झालेली असल्याने न्यू यॉर्क मधील सेंट्रल पार्क इत्यादी कागदो पत्री सरकारी मालकीचे असले तरी जेंव्हा त्याची निर्मिती होत होत तेंव्हा स्थानिक रहिवाश्यानीच त्याचे नियोजन केले होते आणि मालकी हक्क स्थानिक संस्थेकडे दिला होता. भारतीय शासन व्यवस्था सुद्धा एके काळी ह्याच तत्वावर चालत होती. पण ब्रिटिश व्यवस्था हि ब्रिटिश सरकारच्या फायद्यासाठी असल्याने त्यानी त्याचे केंद्री करण केले आणि तथाकथित स्वातंत्र्यानंतर तीच पद्धती भारतीय सरकारने राबवली आहे. त्यामुळे शहरे, पंचायती ह्यांची स्वायत्तता कमी आहे आणि कुठल्याही नागरिकांनी पुढाकार घेऊन निर्माण केलेल्या संस्थेला हर प्रकारे अडथळा निर्माण करणे हि भारत सरकारची पॉलिसी आहे. मी माझ्या लेखांत मंदिरावरील सरकारी नियंत्रण हे भारतीय समाजाच्या निकृष्टपणाचे उदाहरण म्हणून दिले होते. ह्याचे कारण सुद्धा तेच आहे. एके काळी मंदिर हि संस्था केंद्र बिंदू असायची आणि त्याच्या भोवताली व्यापार, कला इत्यादींना समाज आश्रय द्यायचा. मठ परंपरा, विविध संत परंपरा ह्यांना धाग्याप्रमाणे विणून भारतीय समाजाची घडी निर्माण झाली होती. ह्यांत सरकारी लुडबुड निर्माण झाली आणि हे निर्भेळ दूध नासवले गेलॆ. महाराष्ट्रातील गांवा गांवात आपण जातो तेंव्हा कुणी तरी अवलिया मास्तराने आपला संसार उध्वस्त करून गांवात शाळा निर्माण केली अशी कथा ऐकायला मिळते. हि शाळा मागील ५० वर्षे चालत असून हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला असे ऐकू येते. समाज गरीब असल्याने फक्त शाळा निर्माण करणे ह्या सारखी ध्येये ह्यांनी ठेवली. हीच मंडळी जर एखाद्या समृद्ध समाजांत जन्माला अली असती तरी त्यांनी युरोपच्या तोंडात मारतील अश्या संस्था उभ्या केल्या असत्या. भारतीय विद्या भवन, बनारस हिंदू विशवविद्यालय, भांडारकर इन्स्टिटयूट, गीता प्रेस सारख्या संस्थांना पाहावे. TIFR, IISC इत्यादी संस्थांना पाहावे (ज्यांना सरकारने शेवटी बळजबरीने ताब्यांत घेतले), ह्या संस्था बहुतांशी ब्रिटिश कालीन आहेत. एअर इंडिया हि १९३२ साली सुरु झाली होती. युरोपियन संस्थांशी टक्कर देतील अश्या प्रकारच्या संस्था भारतीय आणि हिंदू लोक ब्रिटिश काळांत निर्माण करत होते. बँकिंग किंवा विमा क्षेत्रांत असंख्य खाजगी संस्था ब्रिटिश काळांत अस्तित्वांत होत्या. स्वतंयंत्रानंतर एन केन कारणाने त्या सर्व कोलमडल्या. हल्ली काही लोक नेहरू नि IIT निर्माण केली असल्या बतावण्या करतात पण सोयीस्कर पणे विसरतात कि त्याच भारतात नेहरूंच्या आधी किती तरी चांगल्या संस्था भारतीयांनी विना सरकारी मदत निर्माण केल्या होत्या ह्या शेवटी सरकारी हस्तक्षेपाने खराब झाल्या. दुर्दैवाने हि अधोगती लोक पाहत नाहीत. व्यक्तीपूजा आणि अंध राजकीय निष्ठा ह्यांच्या नादी लागून लोकांनी भारत विश्वगुरू आहे वगैरे थापा आत्मसात केल्या आहेत. जो पर्यंत आपली कमजोरी आम्ही ओळखत नाहीत तो पर्यंत त्यांत बदल घडवून आणणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sun, 01/08/2023 - 08:36 नवीन
२०१४ ला मिळालेले स्वातंत्र्यदेखिल तथाकथितच आहे का?
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/09/2023 - 05:21 नवीन
२०१४ ला स्वातंत्र्य नाही तर मुक्ती मिळाली. तर्क, वस्तुस्थिती, न्याय, विवेक बुद्धी ह्या सर्वापासून देशाला मुक्ती मिळाली. निष्काम भक्ती म्हणजे काय हे आता रॅली नंतर सतरंज्या उचलताना सर्वाना मिळते.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Mon, 01/09/2023 - 23:48 नवीन
एके काळी मंदिर हि संस्था केंद्र बिंदू असायची आणि त्याच्या भोवताली व्यापार, कला इत्यादींना समाज आश्रय द्यायचा. मठ परंपरा, विविध संत परंपरा ह्यांना धाग्याप्रमाणे विणून भारतीय समाजाची घडी निर्माण झाली होती.
आपणास खालील गोष्टींमधला सहसंबंध आठवतो का? १. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, पंढरपूर २. साने गुरुजी कोणत्या भारतीय युटोपियाबद्दल आपण बोलत असता? कधी होता हा अस्तित्त्वात?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 01/18/2023 - 00:23 नवीन
हि आहे भारतीय विश्वगुरू संस्कृती :
२००५ मध्ये न्यू ऑरलींस मध्ये कतरीना वादळाने धुमाकूळ घातला होता. कतरीना वादळानंतर शहरात काही दिवस अंधाधुंदीची स्थिती होती. तेव्हा त्या शहरात डिपार्टमेंटल स्टोअर्स फोडणे, जाळपोळ वगैरे प्रकार झालेच होते. इतकेच नाही तर स्त्रियांवर बलात्कारही झाले होते. त्या शहरातील परिस्थितीमुळे काही लोक मिसिसिपी नदीवरील पूल चालत ओलांडत ग्रेटना या शहरात जात होते तिथे त्या शहरातील पोलिसांनी त्यांना बंदुकांचा धाक दाखवून हाकलून दिले होते. या अमेरिकेतील महान संस्कृतीला नक्की काय म्हणावे? अमेरिकेत कतरीना वादळ आले त्याच्या एक महिना आधीच मुंबईत २६ जुलैचा महापूर आला होता. दोन्ही शहरांवर आलेले पुराचे संकट मोठे होते - कारणे वेगळी असतील कदाचित पण संकट मोठेच आले होते. त्यावेळी कधी आयुष्यात परत तोंड बघायची सुतराम शक्यता नसलेल्या लोकांनी एकमेकांना मदत केली होती. इतर वेळेस स्त्रियांवर अचकट विचकट कमेंट्स करणाऱ्या लोकांनीही अडकलेल्या स्त्रिया आणि मुलींनाही मदतीचा हात दिला होता. मुंबईत त्यावेळी जाळपोळ, लुटालूट, बलात्कार याच्या किती घटना घडल्या होत्या? आश्चर्य वाटेल पण २६ जुलै नंतर दोन तीन दिवस मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण खूप कमी होते. या संस्कृतीला काय म्हणावे? भारत देश वाईटच आणि इतर देश चांगलेच अशी sweeping statements करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या हाच अनाहुत सल्ला.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 01/18/2023 - 01:35 नवीन
प्रॉपर्टी अधिकारांच्या बाबतीत आम्ही भारतीयांनी गप्प राहिलेलेच बरे. वर्षाला अनेकवेळा गुंड मंडळी भारत बंद, मुंबई बंद इत्यादी करत असतात. मुस्लिम बहुल भागांतून हिंदूंची हकालपट्टी हि नेहमीची बाब आहे. शेतीविषयक कायद्यांच्या आंदोलनात अनेक रस्ते महिनाभर बंद ठेवले, त्यांत बलात्कार, खून इत्यादी अनेक गुन्हे सुद्धा घडले. आणि हे नेहमीच घडत आले आहे, त्यासाठी वादळ वगैरे येण्याची गरज नाही. जिथे ह्या गोष्टी अपेक्षित नसतील तिथे अचानक काही मोठ्या आपत्तीने ह्या गोष्टी घडाव्यांत ह्यांत आश्चर्य नाही (विशेषतः जिथे कृष्णवर्णीय लोक मोठ्या संख्येने आहेत तिथे) पण लूटमार आणि बलात्कार हि नेहमीची बाब इथे आहे. बहुतेक दुकाने, घरें इथे खाजगी सिक्योरिटी ठेवतात कारण पोलीस व्यवस्था योग्यवेळी पोचेल ह्याची शाश्वती नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 01/18/2023 - 05:30 नवीन
म्हणजेच काय तर अमेरिकेतही अनेक वाईट गोष्टी आहेत हे तुम्हीही मान्य करत आहात. मुद्दा तोच आहे. भारत म्हणजे सर्वकाही वाईटच आणि अमेरिका म्हटले की सर्वकाही चांगलेच असे अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 01/18/2023 - 06:32 नवीन
आणि धाग्याच्या विषयाला अनुसरुन स्वत: भारत कायमचा सोडण्याचा वा भारतात परतण्याचा वा भारत न सोडण्याचा असा कुठलाही निर्णय नेमका का घेतला याबद्दल प्रतिसादकर्त्यांनी लिहिल्यास चर्चा नेमकेपणाने होवू शकेल.. पण त्यापेक्षा काही सदस्य फक्त भारतात सगळेच कसे वाईट आहे एवढा एकच सूर फक्त लावून बसलेत
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 01/05/2023 - 00:09 नवीन
शेवटी एकाच सत्य, रांगा अमेरिका, कॅनडा, uk, इत्यादी देशांच्या दूतावासापुढे लागलेल्या असतात भारतीय दूतावासा पुढे नाहीत. एकदा विदेशांत जाऊन आले कि समजते कि भारताची दुर्दशा किती खालच्या स्तराची आहे. आणि ह्या साठी फक्त अमेरिका दुबईत जाण्याची गरज नाही तर कतार, स्पेन, पोर्तुगाल सुद्धा चालतील. आमची शेती आहे, इकडे मुलांना संस्कार असतात असल्या हास्यास्पद गोष्टींत सुद्धा काही तथ्य नाही. भारतीय शेतकरी जगांत सर्वांत मागे आहे, जवळ जवळ प्रत्येक पिकाच्या बाबतीत जगांतील सर्वांत कामचुकार आणि अकार्यक्षम शेतकरी आहे. ह्यावर मी आधी लिहिले आहे. देशांत हिंदू लोकांची मंदिरे सरकारने ताब्यांत घेतली आहेत आणि त्याच्यावर ख्रिस्ती अधिकारी नेमले आहेत. मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे. शहरांत सुद्धा ज्यांच्या मुली तरुण आहेत त्यांच्या जीवाची घालमेल दररोज पाहावी. आपण पूर्णपणे अपयशी ठरलो कि नंतर मग आपल्यात माणुसकी आहे, अध्यात्म आहे, असल्या थातुर मातुर गोष्टी बोलून आपल्या मनाची समजूत काढायची. धर्मादायी खर्च, माणुसकी ह्या बाबतीत सुद्धा देश खूपच मागे आहे. अपघात होतांच जखमीला आधार देण्याऐवजी त्याचिया खिशातील पैसे चोरण्यात आपण पुढे. अपघात झालेल्या मैत्रिणीला सोडून पळ काढण्यात पुढेच. श्रीमंत मंदिरांचे पैसे सरकार चोरून नेते. सरकारी जमिनीवर गुंड लोक बळजबरीने कब्जा करतात. नवीन शाळा सुरु करणे कायद्याने गुन्हा आणि चुकून कोणी केलीच तर त्याच्या मागे सरकारी हापिसरांचा ससेमिरा. आज भारतीय तत्वज्ञानाचे व्हिडीओ पाहायचे असतील तर नंबर १ न्यूयॉर्क मधील स्वामी सर्वप्रियानंद आहेत. आपले अध्यात्म परमबिंदू शंकराचार्य हे "निगेटिव्ह नंबर्स खोटे आहेत" असली पुस्तके लिहीत आहेत. शब्द कटू वाटले तरी सत्य आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/05/2023 - 03:45 नवीन
बऱ्याच मुद्द्यांशी सहमत आहे. मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे. त्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारी तरूण पाहण्याची आवश्यकता नाही. ट्विटर, फेसबुक इ. समाजमाध्यमातील अनेक मराठी तरूणांच्या प्रतिक्रिया वाचले की यांच्यावरील संस्कार लक्षात येतात.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/05/2023 - 05:49 नवीन
@श्रीगुरूजी, व्यक्ती तीतक्या प्रकृती हा नियम सर्वत्र एक सारखाच. चांगले वाईट संस्कार सगळीकडेच पहायला मिळतील. मुद्दा हा आहे भारत खुपच मागासलेला, गरीब, घाणेरडा देश आहे असे दाखवून परदेश किती सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवण्याची एतद्देशीय परदेश धार्जीणी मनोवृत्ती यावर आक्षेप आहे. परदेशातील असलेले आवगुण, शार्टकमिंग्ज झाकून ठेवून आपल्याच देशाचे वाभाडे काढायचे हे पटत नाही. नशेडी,गंजेडी,चोर,बलात्कार, डोमेस्टिक व्हायलन्स काय फक्त भारतातच आहेत का? परदेशात जाणारी मुलं पोटासाठी नोकरीच करतात फार काही वेगळे करत नाहीत. सर्व सामान्य आयुष्य जगतात व मरून जातात. कोव्हीड वर उपाय व सुयोग्य व्यवस्थापन हे एक चांगले उदाहरण नाही काय. कितीतरी गरीब देशांना भारताने लस दिली याबद्दल काय म्हणायचे आहे? इतर देशांच्या तुलनेत भारतातील परीस्थीती काय होती हे जगजाहीर नाही काय? माझे म्हणणे एवढेच आहे परदेशाचे गोडवे गाताना भारताला,भिकार,घाणेरडा आशी विशेषणे लावण्याची गरज नाही. ज्या गोष्टी भारतात घडतात त्याच प्रकारच्या गोष्टी परदेशात ही घडतात हे विसरून चालणार नाही.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 01/05/2023 - 10:15 नवीन
> सर्व सामान्य आयुष्य जगतात व मरून जातात. बहुतांशी लोक सर्व सामान्य आयुष्य जगण्यासाठीचा विदेशांत जातात. सर्वसामान्य आयुष्य हेच लोकांना इथे मिळत नाही. पावसांत भिजत दुचाकी घेऊन कामाला जायचे. मृत्यूचे सापळे असलेल्या रस्त्यावर दिव्य करत पोटाची खळगी भरण्यासाठी कसला तरी उद्योग व्यवसाय करायचा, मग बहुतेक पैसे GST वर घालवायचे, राहिलेले आरोग्य, मुलांचे शिक्षण, आणि विविध कारणासाठी लाँच देत घालवायचे. काही वाचलेच तर मग कुठल्या तरी कंपनीत गुंतवायचे ज्याचा CEO मग तुमच्याच पैश्यांची चालविलेल्या सरकारी बँक ला गंडा घालून जातो आणि ते पैसे मग पेट्रोल वरील करणे तुम्हीच पुन्हा भरता. दुर्दैवाने तुमचा जन्म तथाकथित सवर्ण जातीत झाला तर विचारूच नका. साधी प्राथमिक शाळा पासून नंतर नोकरी मिळवण्यापर्यंत तुम्ही सर्वांत शेवटी राहाल. अपार कष्ट करून म्हाताऱ्या आईवडिलांना गावी ठेवून शहरांत यायचे. २० वर्षे लोन भरत छोटासा फ्लॅट घ्यायचा जयंत साधा सेंट्रल ac सुद्धा नसतो. शनिवारी रविवारी फारतर मॉल मध्ये अवाजवी पैसे भरून चित्रपट पाहायचा आणि आणखीन पैसे देऊन तो थंडगार सामोसा आणि गरम गरम कोक प्यायचा. वर्षातून काही वेळा गावी जायचे तीच काय ती सुट्टी. आणि हे आयुष्य फक्त तुम्ही शिकले असाल तरच तुमच्या नशिबी. तुम्ही अडाणी असाल तर कुठे तरी गुरा ढोरा प्रमाणे कुणी तरी तुम्हाला वागवून फार तर दोन दिवस जिवंत राहण्यापुरता पगार देईल. माझी कॅलिफोर्निया मधील कुक पंजाबी स्त्री आहे. वयाच्या ५५ वर्षी ती इथे आली. घरी तिला डोळे वर काढून पाहायची सोय नव्हती. पंचक्रोशीत म्हणे ती एकटीच ८वि पास होती. इथे येऊन तो गाडी चालवायला शिकली (कॅलिफोर्निआ मध्ये ड्रायविंग टेस्ट पंजाबी भाषेतून उपलब्ध आहे). सध्या ती निव्वळ जेवण बनवून साधारण ४००० डॉलर्स कमवते. मी म्हटले तुला पैसे केश देऊ का ? तर म्हणते नाही दीदी, इथे टॅक्स भरावासा वाटतो. मागील दोन वर्षांत तिने पंजाबी ड्रेस सोडून पंत शर्ट घालायला सुरुवात केली. आपले सेविंग मग ती पंजाबात जमीन घेण्यावर खर्च करते. तिची मुलगी पंजाब मध्ये होती, ती गरोदर होताच तिने धडपड करून तिला कानडा मध्ये विद्यार्थी म्हणून आणले आणि नातवाला कॅनेडियन सिटीझन बनवले. काही महिन्यात तिची इतर मुले आणि बहीण सुद्धा इथे येईल. हिचे आयुष्य सर्व सामान्य म्हणून जरी जात असले तरी ते सामान्य आयुष्य तिच्या नशिबी पंजाब मध्ये नव्हते. तिथे शेणी थापत आणि सासूचे पाय दाबत तिचे आयुष्य गेले असते. इथे ती जास्त खुश आहे. > माझे म्हणणे एवढेच आहे परदेशाचे गोडवे गाताना भारताला,भिकार,घाणेरडा आशी विशेषणे लावण्याची गरज नाही. भिकार आणि घाणेरडा हि दोन्ही विशेषणे भारताला १००% लागू आहेत आणि त्या तुलनेत जवळ जवळ प्रत्येक देश भारता पेक्षा खूप पटीने चांगला आहे. हे शब्द कटू वाटले तरी सत्य आहेत. मी भारताला शिवी देत आहे किंवा अशी शिवी देऊन मला आनंद वाटत आहे असे अजिबात नाही. जी गोष्ट वाईट आहे ती मान्य केल्याशिवाय आपण त्यांत सुधारणा घडवून आणू शकत नाही. "स्वच्छ भारत" स्कीम ची गरज का भासली ? कारण सार्वजनिक ठिकाणी आम्ही प्रचंड कचरा निर्माण करतो. आपले सार्वजनिक प्रसाधनगृहे सामान्य स्त्री ने वापरण्यासारखी नाहीत. शहरच नाही तर ग्रामीण भाग सुद्धा खरोखर प्रचंड घाणेरडा आहे. हगंदारी मुळे अनेक गांवांत सकाळी नाक बंद ठेवावे लागते. मी मेक्सिको, ब्राझील, स्पेन आणि इंडोनेशिया मध्ये प्रवास केला आहे. येथील ग्रामीण भाग सुद्धा भारतापेक्षा कैक पटीने चांगले आणि जास्त स्वच्छ आहेत. IIT मुंबई हि तथाकथित मोठी शिक्षण संस्था आहे. त्यांना पैश्यांची कमी नाही. तेथील हे प्रसाधनगृह पहा . हा लेख एका प्राध्यापकाने लीहिला आहे. https://www.cse.iitb.ac.in/~soumen/APKGKAH/flaky-products/maintain.html टीप: माझ्या कोकणातील शेतजमिनीवरील पम्प चा फ्यूस वारंवार उडत होता म्हणून मी गांवातील एका इलेक्ट्रिसिटी वाल्याला पाहायला सांगितले. जमिनीची जो देखभाल करतो त्याला ह्या विषयातील काहीच समजत नाही त्यामुळे मलाच फोन वरून बोलावे लागले. तर हा इलेक्ट्रिसिटी वाला मला सांगतो. काही नाही मॅडम सोप्प आहे, थोडा जास्त अँपिअर चा फ्यूस घालायचा, तो मग उडत नाही ! दुसरी टीप : भारतात उणिवा आहेत ह्याचा अर्थ इतर देश १००% चांगले आहेत असे नाही. पण सर्वसामान्य शिकलेल्या मध्यमवर्गीय भारतीयाला जी अवहेलना भारतात सहन करावी लागते तशी अवहेलना अगदी मजूर म्हणून काम करताना सुद्धा इतर देशांत भोगावी लागत नाही. रस्ते तुम्हाला ठार मारत नाहीत, वाहन परवडते, पिण्याचे पाणी पण्यासारखे असते, हवा फुफुफ्सांत घेतली असता दोन सिगारेटी पिल्या प्रमाणे वाटत नाही, शाळेत जाताना रस्ता क्रॉस करताना आपल्या मुलांना कुठली तरी बस किंवा ट्रक चिरडून जाणार नाही हि खात्री, कधी कधी फिरायला चांगले पार्क, विविध प्रकारचे अन्न, रात्री फिरताना कुणी तरी आपला बलात्कार करणार नाही हि खात्री, अश्या छोट्या छोट्या गोष्टीच आपले जीवन जगण्यासारखे बनवतात. आणि ह्याच अत्यंत सध्या गोष्टीसाठी लोक भारत सोडून इतरत्र जातात. इतर देशांत समस्या अनेक आहेत पण त्या भारतीय समस्यांच्या मानाने कमी आहेत. सर्वसाधारण भारतीयाला विनाकारण देशांत अवहेलना सहन करावी लागते हे १००% सत्य आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 01/05/2023 - 10:16 नवीन
The society which scorns excellence in plumbing as a humble activity and tolerates shoddiness in philosophy because it is an exalted activity will have neither good plumbing nor good philosophy: neither its pipes nor its theories will hold water ---John W. Gardner.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 01/06/2023 - 10:44 नवीन
बहुतांशी लोक सर्व सामान्य आयुष्य जगण्यासाठीचा विदेशांत जातात. सर्वसामान्य आयुष्य हेच लोकांना इथे मिळत नाही.
श्री साहना, तुमचे म्हणणे पुर्णपणे बरोबर आहे. परदेशात गेलेले सगळे भारतीय सीईओ आणि तत्सम पदावर जात नाहीत. बहुतेकांचे जीवन सर्वसामान्यपणेच जाते. --- सर्वसामान्य लोकांना जास्त काही नको असते, शाश्वत उत्पन्न (याचा अर्थ नोकरीच्या, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या संधी असा होता), आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये (नोकरी जाणे, आजारी पडणे, कोणी त्रास दिला इ.इ) न्याय्य मदत, डोक्याला त्रास न होता सरकारी कामे होणे, तोंड बघुन नियम न बदलणे, दिलेया वचनाला जागणे अश्याच गोष्टी हव्या असतात. आणि त्याच सहजपणे मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी गुरुवार, 01/05/2023 - 04:44 नवीन
तुमची अतिरेकी ऊजवी विचारसरणी, जी वारंवार भात खातांना गारेच्या खड्यासारखी मध्ये मध्ये येते, ती सोडली तर प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/05/2023 - 06:27 नवीन
@सर टोबी जी, आमच्या भातातले खडे दिसले पण @सहाना जींची भाषा नाही दिसली. प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे. यातच सर्व आले नाही का? अतिरेकी उजवी वगैरे काही नाही,देशातील घडामोडींवर लक्ष असते सर्वांचेच समर्थन करत नाही. असभ्य भाषा प्रयोग, तो सुद्धा देशाबद्दल आणी पोटार्थी,देशोधडीला लागलेल्या कडून, ना मंजूर. लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम मला जास्त माहीती नाही पण त्यांचा जन्म याच देशातला आयुष्यातली आठरा विस वर्ष याच देशाच्या अन्नावर वाढल्या असतील. या देशात काहीच चांगले दिसले नाही! देशाला भिकार,घाणेरडा,मागासलेला, आशी विषेशणे लावतात याबद्दल काहीच म्हणायचे नाही! आम्ही तर मागासलेले पण तुम्ही तर शिकलेले,सुसंस्कृत ना?भाषा उपरोधिक पण सभ्य, संयमित नको? एक गोष्ट चांगली म्हणताना दुसरी घाणेरडी,भिकार म्हणले म्हणजे ते खरे ठरत नसते. त्यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा. किती खोटारडी विधाने आहेत. कुठल्या हिन्दू मंदिरावर ख्रिस्ती अधिकारी नेमला या बद्दल उलगडा करतील काय, सरकार देवळात हस्तक्षेप करत आहे याचा व परदेशी जाण्याचा काय संबध? इतकापण काही वाईट नाहीये भारत. आजही कित्येक विदेशी इथली संस्कृती,शिल्प,नृत्य कला,साहित्य हे शिकण्यास भारतात येतात तुलनात्मक कमी पण येतात हे सत्य आहे. बरोबरच आहे म्हणा, ज्याचे खावे दाणे त्याचेच गावे गाणे. शेवटी एक स्पष्ट करावेसे वाटते, प्रतिसाद देणे म्हणजे फटकावणे वगैरे काही नाही. भाषेवर आक्षेप म्हणून खटाटोप एवढेच.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा