Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
भटकंती

वजिर सुळका ट्रेक.

इ
इरसाल कार्टं
Fri, 08/27/2021 - 11:57
💬 17

ठाणे जिल्ह्यातील 'माहुली' हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक आवडता ट्रेक आहे. त्यातही तो मुंबईकरांना जवळ. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला हा गड त्याच्या सुळक्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक सुळका म्हणजे 'वजीर' सुळका. माहुली गडाचा पसारा हा दक्षिण उत्तर असा पसरला असून त्याच्या दक्षिणेला अनेक सुळके आहेत. यातील सगळ्यात शेवटचा सुळका म्हणजे वजीर. माहुली किल्ल्याचाच भाग असला तरी वजीर सुळक्याचा ट्रेक हा माहुली किल्लयाच्या ट्रेकपासून पूर्ण वेगळा आहे. तसेच, वजीर ट्रेक हा तुलनेने खूप सोपा ट्रेक आहे.
मुंबईपासून पन्नास किमीवर असलेला हा ट्रेक पटकन करण्यासारखा तसेच नव्या ट्रेकर्ससाठी एक चांगली सुरुवात आहे. तसेच छोटा असला तरी तो सुंदर मात्र नक्की आहे. ट्रेकची सुरुवात नंदिलकेश्वर या मंदिरापासून होते. तिथे पिण्याचे पाणी तसेच निवार्याची सोय होऊ शकते.
अलीकडेच मी दोनदा या ट्रेकला जाऊन आलो. पहिल्या फेरीला खूप पाऊस होता आणि दुसऱ्या फेरीला उन्हाने भाजून काढले. या दोन्ही ट्रेकचा व्हिडीओ क्लिप्स मिळून एक व्हिडीओ तयार केला आहे. मी पहिल्यांदाच ट्रेकिंग व्हिडीओ बनवला असून व्हॉईसओव्हर एडिटिंग करताना स्टुडिओत दिला आहे.


  • Log in or register to post comments
  • 8685 views


वाचनखूण लावा
| 8685 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
श
शानबा५१२ Fri, 08/27/2021 - 12:29 नवीन
माझा एक मित्र खुप ट्रेकींग करतो, तो सारखा म्हणतो : "ट्रेकींग करायला फक्त पाऊसातच जावं, बिल्कुल पाय घसरत नाही, आणि घसरलाच तर काय होतंय?"
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 08/27/2021 - 13:07 नवीन
आवाडला. वजीर सुळक्याच्या पायथ्याला सायकल ठेवायची सोय होऊ शकते का?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Fri, 08/27/2021 - 16:44 नवीन
नंदिकेश्वर मंदिरात भरपूर जागा आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/27/2021 - 14:17 नवीन
धुमतारा येऊ द्या.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Fri, 08/27/2021 - 16:46 नवीन
लवकरच व्हिडीओ येईल
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/27/2021 - 17:10 नवीन
'वजिर' पर्यंत चढाई करावी ती त्याला गवसणी (कातळ चढाई) घालण्याकरता, हे ट्रेक वगैरे सर्व फालतू गोष्टी आहेत. ज्याला ट्रेक करायचाच आहे त्याने श्रावणात छिडीघाट मार्गे भिमाशंकराला जावे. (आपआपल्या जबाबदारीवर)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 08/27/2021 - 17:20 नवीन
हे ट्रेक वगैरे सर्व फालतू गोष्टी आहेत.
- आणि ते "फ्री क्लाईंब" की काय बोलतात ते करणारे लोक तर काही सुरक्षा म्हणजे दोरी वगैरे न वापरता खडकी पर्वत चढत जातात. काय फा......ना? नायतर काय!
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 08/27/2021 - 17:22 नवीन
https://www.youtube.com/watch?v=Ff8lfRwBbyc
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Sat, 08/28/2021 - 13:36 नवीन
तुमच्या म्हणण्यानुसार गृहीत धरले तर वजीर सुळक्याची कातळ चढाई हि इतर ठिकाणांच्या मानाने 'फालतू' ठरेल.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 09/08/2021 - 07:59 नवीन
माहुलीचा उल्लेख वाचून तीन वर्षांपूर्वीची भटकंती आठवली. टिटवाळ्याचा महागणपती, आटगांव/आसनगाव जवळचे "मानस" जैन मंदिर पाहून आम्ही माहुली सुळक्यांच्या पायथ्याशी असलेल्या निसर्ग केंद्रात पोहचलो होतो. Image removed. सुळक्यांना नवरा, नवरी, भटोबा, करवली अशी मजेशीर नावे स्थानिकांनी दिली आहेत. या फोटोत वजीर सुळका आहे का कुठे? Image removed. येथील एक आठवण. येथे महिला बचत गटातर्फे जेवणाची सुविधा पुरवली जाते. आम्ही गेलो तो दिवस रक्षाबंधनाचा असल्याने बचत गटाच्या बहुतेक सर्व महिलांनी सुटी घेतली होती. हजर असलेल्या एकट्या महिलेने जेवण बनवून देण्यास होकार दिला पण वेळ लागणार होता. म्हणून मदतीसाठी मी चुलीचा ताबा घेतला. तासाभरात ग्रुपच्या पंधरा जणांचा स्वयंपाक आटोपला होता. Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 09/08/2021 - 08:02 नवीन
माहुलीचा उल्लेख वाचून तीन वर्षांपूर्वीची भटकंती आठवली. टिटवाळ्याचा महागणपती, आटगांव/आसनगाव जवळचे "मानस" जैन मंदिर पाहून आम्ही माहुली सुळक्यांच्या पायथ्याशी असलेल्या निसर्ग केंद्रात पोहचलो होतो. Image removed. सुळक्यांना नवरा, नवरी, भटोबा, करवली अशी मजेशीर नावे स्थानिकांनी दिली आहेत. या फोटोत वजीर सुळका आहे का कुठे? Image removed. येथील एक आठवण. येथे महिला बचत गटातर्फे जेवणाची सुविधा पुरवली जाते. आम्ही गेलो तो दिवस रक्षाबंधनाचा असल्याने बचत गटाच्या बहुतेक सर्व महिलांनी सुटी घेतली होती. हजर असलेल्या एकट्या महिलेने जेवण बनवून देण्यास होकार दिला पण वेळ लागणार होता. म्हणून मदतीसाठी मी चुलीचा ताबा घेतला. तासाभरात ग्रुपच्या पंधरा जणांचा स्वयंपाक आटोपला होता. Image removed.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/08/2021 - 16:13 नवीन
माहुलीचे मिपावरचे लेख. भालदार फेस (माहुली ) https://www.misalpav.com/node/20402 _________________________ किल्ले माहुली (कल्याण दरवाजाच्या खडतर वाटेने) https://www.misalpav.com/node/21990 या लेखात आहे वजीर सुळका. _______________________ माहुली गड | https://www.misalpav.com/node/23981 आणि ब्लॉग फोटोसाठी. http://mahuligad.blogspot.com/?m=1 _______________________ पुनःश्च किल्ले माहुली (Fort Mahuli Trek) https://www.misalpav.com/node/24082 _______________________ रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण https://www.misalpav.com/node/30433 _______________________ वजिर सुळका ट्रेक. https://www.misalpav.com/node/49185
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 09/08/2021 - 09:38 नवीन
भन्नाट आहे व्हिडो, बघून जावेसेच वाटायला लागले ! +१ इरसालजी कार्टो _/\_
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 09/09/2021 - 07:17 नवीन
खरेतर मीही पहिल्यांदाच ट्रेकचा व्हिडीओ बनवलाय.
  • Log in or register to post comments
K
king_of_net Wed, 09/08/2021 - 14:42 नवीन
इथे विडीओ पहिला तर तु-नळी नंबर वाढतो का?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Wed, 09/08/2021 - 16:08 नवीन
माहित नाहि
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 09/08/2021 - 20:06 नवीन
.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा