Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)

श
श्रीगुरुजी
Tue, 05/18/2021 - 11:32
🗣 219 प्रतिसाद
मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना. https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strain-use-super-spreader-kumbh-bjp-congress-toolkit-destroy-pm-image-1803935-2021-05-18

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 83644 views

🗣 चर्चा (219)
आ
आनन्दा Fri, 05/21/2021 - 05:49 नवीन
ती केस काय आहे नेमकी?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 05/21/2021 - 05:56 नवीन
ह्याच तुम्ही दिलेल्या दुव्यामधील खालील भाग तुम्ही वाचलात काय? "The dispute began after a previous Indian government decided to impose capital gains tax retrospectively on some companies, such as Cairn and telecoms operator Vodafone Plc, which also took its case to arbitration and won. The cases scared off foreign investors and dealt a blow to the government of Manmohan Singh, who lost power in a 2014 election to Prime Minister Narendra Modi. The (Modi) government has said it would not make retrospective tax claims in future but it has defended outstanding cases."" ह्यांतले, बोल्डीकरण माझे. माझ्या आठवणीनुसार हा अतिशय मूर्ख रिट्रोअ‍ॅक्टिव्ह टॅक्स, चिदंबरन अर्थमंत्री असतांना, तत्कालिन सरकारने लावला होता. तेव्हा ही वखवख त्या सरकारची होती. सध्या भारत सरकारने अपिल केलेले आहे, तसेच बोलण्याचे गुर्‍हाळही सुरू आहे. त्यामुळे एक खबरदारी म्हणून, आपले नोस्ट्रो अकाउंट्समधे असलेले पैसे वाचवायची धडपड भारत सरकारतर्फे सुरू आहे, ही बातमी आहे. ह्यात "देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा म्हणणारे गायब झाले आहेत" असे कुठे दिसले तुम्हाला? त्यांनी ह्याविषयी जाहीर वाच्यता करत फिरावे, अशी अपेक्षा आहे काय? दुसरे, "देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा" हे एका वेगळ्या संदर्भांत मोदींनी म्हटले होते, त्याचा तुम्ही येथे उल्लेख करत आहांत. ते अगदी वेगळ्या संदर्भात म्हटले होते, हे तुम्हाला माहित नसावे, ह्याची शक्यता कमी आहे. तेव्हा तो संदर्भ माहित असूनही तुम्ही मुद्दाम येथे तो तिरकस उल्लेख करत असावेत, असे दिसते. असे आपले पैसे अडकले असतां, वेळप्रसंगी ते झटकन काढून घेण्याची वेळ अनेकांवर येते- अगदी सूट्स्वाल्या उविविंवरही. अलिकडचेच आर्चिगोसचे उदाहरण घ्या ना? तिथे दोन मोठ्या, उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड ब्यांका सोडल्या तर इतर दोन- तीन मोठ्या (अर्थात, उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड) ब्यांकांनी अगदी अशीच पळापळ सफलरीत्या केली. त्या दोन मोठ्या उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड ब्यांकांचे नुकसान झाले. हे अगदी अलिकडेच झाले आहे. त्या उदाहरणांत व आता तुम्ही दिलेल्या बातमीच्या केसमध्ये फरक इतकाच, की एका ठिकाणी उविवि धावपळ करत होते, इथे भारतीय वेषांतले मंत्री व सफारीवाले बाबू ती धडपड करत आहेत. दोन्ही केसेसमधे समान दुवा, पैशाची अतिरेकी हाव.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 05/21/2021 - 06:20 नवीन
अज्ञान आणि द्वेषी मळमळ याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. मुळात हे प्रकरण २००६ मध्ये सुरू झाले जेव्हा सुसंस्कृत, मितभाषी, विद्वान, अर्थतज्ज्ञ वगैरे विशेषणांनी नटलेले मौनीबाबा पंतप्रधान होते व अजून एका नामवंत अर्थतज्ज्ञ चिदंबरम् अर्थमंत्री होते. केर्नच्या भारतातील उपकंपनीने वोडाफोनला आपले समभाग विकल्यानंतर २०११ मध्ये भारताने त्यावर मोठी कर आकारणी केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये ही कर आकारणी रद्द केल्यानंतर भारताने नवीन विधेयक आणून पूर्वलक्षी पद्धतीने केर्नला कर भरण्यास सांगितले व कराच्या किंमतीएवढी केर्नची मालमत्ता भारताने गोठवून ठेवली. शेवटी केर्न जागतिक न्यायालयात गेले व आता त्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. मोदींना नेहरूंच्या गंभीर घोडचुका निस्तरताना आता मौनीबाबांंच्याही गंभीर घोडचुका निस्तराव्या लागत आहेत. परंतु काही बिनडोक यासाठी मोदींनाच दोष देत आहेत. https://www.google.com/amp/s/www.natlawreview.com/article/cairn-v-india-investment-treaty-arbitration%3famp
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 05/21/2021 - 10:10 नवीन
काँग्रेसला कंटाळूनच लोकांनी दिले ना मोदींना निवडून? सात वर्षात खाजगीकरणही जमले नाही वाटते. ज्यांनी चुका केल्या त्यांची सत्ता गेली. काही बिनडोक मात्र अजून त्यांचेच नाव घेत बसलेत चुका दुरुस्त होताहेत की नाही ते पाहण्यापेक्षा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 05/21/2021 - 10:17 नवीन
काही बिनडोक मात्र अजून त्यांचेच नाव घेत बसलेत हे मात्र अगदी खरं बोललात आणि बोलताना आत्मताडनही केलंत. लगे रहो!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 05/21/2021 - 11:11 नवीन
सात वर्षांत सगळे अधिकार असलेल्या निकम्म्या दैवताने काही केले असते तर असे बालीश शब्दच्छल करयची वेळ आली नसती. =))
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 05/21/2021 - 11:18 नवीन
निकम्म्याने केर्नवर पूर्वलक्षी प्रभावाने कर लावण्याचे भलते उद्योग न करता काही भरीव केले असते तर आज ही वेळ आली नसती आणि काही नंबरीनिर्बुद्धांना रोज मळमळ ओकावी लागली नसती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/21/2021 - 06:06 नवीन
काही लोकांना २०१४ पासून कावीळ,रक्तदाब, आम्ल पित्त आणि मूळव्याध हे चारही एकदम उपटलेले आहे. त्यामुळे तिखट, आंबट, क्षारयुक्त असं सर्व अन्न वर्ज्य आहे. आणि गोड सात्विक अन्न याना झेपत नाही. तेंव्हा फक्त कडू आणि तुरट असे अन्न खाऊन यांची जीभ कडू झालेली आहे. त्यामुळे त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. त्यासाठी बारामती, नंदीग्राम, वायनाड, अमेठी अशा अनेक ठिकाणच्या निष्णात वैद्यांचे औषध आणवले गेले परंतु त्याचा अजिबात गुण आलेला नाही. आता यावर ऑक्न्त उपाय करावा याचे चर्वित चर्वण चालू आहे. कोणास रामबाण उपाय माहिती असेल तर कळवावा योग्य ते पारितोषिक दिले जाईल
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 05/21/2021 - 14:33 नवीन
आणि आता इतर पक्ष ते उभेही करू शकत नाहीत...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 05/21/2021 - 15:09 नवीन
हा आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 05/21/2021 - 12:32 नवीन
करोनात जीव गमावलेल्या श्रद्धांजली वाहताना त्यांनी एक आवंढाही गिळला. सोबतच, योग आणि आयुषनं करोना विषाणूच्या या काळात लोकांची ताकद वाढवल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय https://maharashtratimes.com/india-news/pm-narendra-modi-gets-emotional-while-talking-with-doctors-varanasi/articleshow/82827094.cms
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 05/21/2021 - 12:42 नवीन
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/21052021/0/1/ ह्या पानावर नांदेड मधील भयंकर घटना
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 05/21/2021 - 13:01 नवीन
तुम्हाला नक्की कुठली अभिप्रेत आहे, ते समजले नाही. मात्र त्या पहिल्याच पानावर, उजवीकडे सरकारच्या आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या पाहणीची बातमी आहे. तीअवश्य पाहावी.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 05/21/2021 - 13:35 नवीन
तुम्हाला ही बातमी म्हणायची आहे का? कोरोना रुग्ण असलेल्या एका शिक्षकाच्या मृत्यूनंतर केवळ पैसे लाटण्यासाठी तीन दिवस त्यांच्या मृत्यूची बातमीच नातेवाइकांपासून लपवून ठेवली आणि उपचार सुरू असल्याचा अाभास निर्माण करण्यात आला... https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/nandurbar/news/nanded-corona-newd-and-updates-hospital-treated-patient-three-days-after-his-death-laundered-rs-90000-in-nanded-128508313.html
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 05/21/2021 - 15:49 नवीन
हो हीच बातमी. काल पण आली होती. आज त्या घटनेचा पुढचा भाग आला आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 05/21/2021 - 19:39 नवीन
उत्तर प्रदेश सरकारला १७ मे २०२१ या दिवशी आदेश देऊन १ महिन्याच्या आत राज्यातील सर्व ९७,००० खेड्यांमध्ये ICU सुविधा असलेल्या प्रत्येकी २ ऍम्ब्युलन्स पुरविण्याचा आदेश दिला होता. परंतु राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन अशी व्यवस्था १ महिन्याच्या आत करणे व्यावहारिक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देताना सांगितले की उच्च न्यायालयाने असे अव्यावहारिक आदेश देऊ नये. https://m.timesofindia.com/india/hcs-must-not-pass-orders-that-are-impossible-to-implement-says-sc/articleshow/82831200.cms#_ga=2.53300840.1930923880.1620233159-amp-jYqPLLBLSTAtzk5m0R26KNDoIeqn0_pDb7YPfI0XUkDWAAutIxoPjbVk4R8pO4ue
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 05/21/2021 - 23:54 नवीन
खरं आहे. १ महिन्यात १,९४,००० ICU सुविधा असलेल्या ऍम्ब्युलन्स पुरवणे प्रामाणिक प्रयत्न केले तरी अशक्य आहे. त्यात कर्मचारी भरती पण करावी लागेल. असले आदेश न्यायालय का देते हे गुढ आहे. न्यायालयाचा अवमान करण्याचा हेतु नाही परंतु न्यायालयाने असले टार्गेट आपल्या केसेस कमी करायला स्वतः वर लावायला हवेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/22/2021 - 08:13 नवीन
न्यायालयाने असे अचाट आणि अफाट पण अंमल बजावणी करता येणार नाही असे निकाल देऊ नयेत हि वस्तुस्थिती. त्यावर स्पष्टपणे टीका झालीच पाहिजे. जनतेच्या क्षोभाचा धाक हा न्यायाधीशाना सुद्धा असला पाहिजे. बेदम मारहाण झाल्यावर के इ एम मधील निवासी डॉक्टर संपावर गेले असता न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती मंजुळा चेल्लुर यांनी तुम्हाला भीती वाटत असेल तर राजीनामा देऊन घरी बसा असे बेताल वक्तव्य केले होते. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आज याच निवृत्त न्यायमूर्तींना विचारले पाहिजे कि आज हेच डॉक्टर अंगावर पी पी ई किट घालून प्रत्यक्ष काम करत असताना देशातील सर्व न्यायालये मात्र घरून कामे करत आहेत. त्यांना(खालच्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना) आपण "तुम्हाला भीती वाटत असेल तर राजीनामा देऊन घरी बसा" असा सल्ला देण्याची हिंमत करणार का? १००० च्या वर डॉक्टर या महामारीत काम करत असताना हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना निदान काही सन्माननीय भरपाई दिली जाईल या बद्दल न्यायालये काही करतील का? NJAC च्या सुनावणीच्या वेळेस सत्य बोलल्याबद्दल श्री मुकुल रोहटगी यानि पूर्व न्यायाधीशांच्या अकार्यक्षमतेबद्दलची वस्तुस्थिती न्यायासना समोर आणली असता सरन्यायाधीश खेहर यांनी त्यांना पूर्व न्यायाधिशांवर टीका केल्या बद्दल न्यायालयीन अवमाननेचा इशारा दिला होता. तेंव्हा श्री मुकुल रोहटगी यांनी सरन्यायाधीश खेहर याना माझ्या विरुद्ध तुम्ही न्यायालयीन अवमान केल्याबद्दल कार्यवाही करून दाखवाच असे सरळ स्पष्ट आव्हान दिले होते. पुढे ते म्हणाले सूर्यप्रकाशाएवढे सत्य समोर आणण्याबद्दल तुम्ही माझ्या वर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कार्यवाही करू शकत नाही. सरन्यायाधीश खेहर यांची कार्यवाही करण्याची हिम्मत झाली नाही. न्यायालयाचा अवमान हि काही गल्लीतल्या गुंडावर पोलीसांनी केलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/22/2021 - 07:59 नवीन
मुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देताना सांगितले की उच्च न्यायालयाने असे अव्यावहारिक आदेश देऊ नये.
नक्कीच स्वागतार्ह निवाडा. कधीकधी न्यायालयाचे काही काही आदेश खरोखरच अनाकलनीय असतात. मागे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने नॅशनल हायवे ऑथोरीटी ऑफ इंडियाला पूर्ण देशात टोल प्लाझांवर व्ही.आय.पी साठी एक स्वतंत्र लेन ठेवण्यात यावी आणि त्या लेनमध्ये न्यायाधीशांचाही समावेश असावा हा आदेश दिला होता. इतकेच नव्हे तर या न्यायाधीशांनी म्हटले होते-- It is embarrassing for VIPs and sitting judges to have to wait at toll plazas and display identity documents. इतकेच नव्हे तर या लेनमध्ये केवळ व्ही.आय.पींनाच प्रवेश द्यावा तसेच इतर लोक या लेनमध्ये आल्यास कारवाई करण्यात येईल अशीही तंबी या न्यायाधीशांनी दिली. कसली संस्कृती हे न्यायाधीश आणू पाहात होते? आणि ते पण स्वतःसाठी सगळ्या यंत्रणेला वाकवून? अशा ठिकाणी कोणी व्ही.आय.पी असेलच तर ते म्हणजे रूग्णवाहिका आणि अग्नीशमन दल वगैरेंची वाहने. त्यांना टोल प्लाझावर किंवा कुठेही अजिबात अडकायला लागले नाही पाहिजे. बाकी कोणी व्ही.आय.पी नाही/नसावा. या एका निर्णयाबद्दल संसदेने तातडीने त्या न्यायाधीशांविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे होते असे फार वाटले होते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/22/2021 - 08:20 नवीन
CHENNAI: The Madras high court sent a blunt message to the National Highways Authority of India (NHAI) on Wednesday: Create exclusive lanes for VIPs, including sitting judges, at all toll plazas on national highways or face contempt of court proceedings. https://timesofindia.indiatimes.com/india/hc-wants-separate-toll-lanes-for-judges-vips/articleshow/65599940.cms अतिशय संतापजनक वक्तव्य आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/22/2021 - 10:37 नवीन
या एका निर्णयाबद्दल संसदेने तातडीने त्या न्यायाधीशांविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे होते असे फार वाटले होते. १९८० च्या दशकात हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रामस्वामी यांनी सरकारी खर्चाने ८० लाखांचे फर्निचर घेतले होते. त्यांच्याविरूद्ध महाभियोग चालविण्यासाठी १९९३ मध्ये संसदेत ठराव आला होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या मणीशंकर अय्यरने रामस्वामी तामिळ आहेत व तामिळीविरूद्ध महाभियोग चालवू नये यासाठी दक्षिणेतील कॉंग्रेसच्या खासदारांना एकत्र आणून नरसिंहरावांवर दबाव आणला होता. त्यामुळे नरसिंहरावांनी कॉंग्रेसच्या खासदारांना मतदानात सहभागी न होण्याचा आदेश देऊन महाभियोगाचा ठराव मंजूर होऊन दिला नव्हता. हे करण्यासाठी त्यांनी रामस्वामीकडून राजीनामा देण्याचा शब्द घेतला होता. परंतु महाभियोगाचा ठराव अमान्य झाल्यानंतर रामस्वामीने राजीनामा न देता आपली उर्वरीत कारकीर्द पूर्ण करून नंतर निवृत्ती घेतली होती.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/22/2021 - 13:28 नवीन
हो. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी वायकोंविरूध्द शिवकाशी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणुक पण लढवली होती. १९९३ चे हे व्ही.रामस्वामी महाभियोग प्रकरण मी रस घेऊन बघितले होते. त्यावेळी मी शाळेत होतो आणि महाभियोग असे काही असते हेच पहिल्यांदा कळले. महाभियोगात संबंधीत व्यक्तीला आपला बचाव संसदेत करता येतो आणि त्यासाठी आपला वकील नेमता येतो. तेव्हा कपिल सिब्बल रामास्वामींचे वकील होते. कपिल देव सोडून आणखी कोणी कपिल असतात हे पण तेव्हा पहिल्यांदाच कळले :) पुढे अण्णांचे २०११ मधील उपोषण चालू असताना संसदेने कलकत्ता उच्च न्यायालयाचे सौमित्र सेन यांच्यावर महाभियोग चालवून पदच्युत केले होते. महाभियोग चालवून संसदेने पदावरून हटविलेले ते पहिले न्यायाधीश होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/22/2021 - 14:14 नवीन
मी सुद्धा तेव्हाच पहिल्यांदा कपिल सिब्बल हे नाव ऐकले. ते प्रकरण सिब्बलांच्या आयुष्यातील एक वळणाचा दगड ठरले. त्यानंतर अनेक मोठे खटले त्यांनी यशस्वीपणे हाताळले व राजकारणातही पाय रोवले. ते सलग २० वर्षे खासदार व केंद्रीय मंत्री होते. अलिकडे मात्र ते चालवित असलेले बहुतेक सर्व खटले हरत आहेत. श्रीरामजन्मभूमी खटल्यात ते बाबरी मशीद कृती समितीचे वकील होते व त्यासाठी त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावाने खोटे बोलण्याच्या खटल्यात ते राहुल गांधींचे वकील होते. मराठा राखीव जागा खटल्यात ते महाराष्ट्र सरकारचे वकील होते. हे सर्व खटले ते हरले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/22/2021 - 14:15 नवीन
सलग १० वर्षे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/22/2021 - 15:52 नवीन
महाभियोग चालवून संसदेने पदावरून हटविलेले ते पहिले न्यायाधीश होते. हे बरोबर नाही. राज्यसभेत त्यांच्यावर महाभियोगाचा ठराव पस झाल्यावर लोकसभेत ठराव येण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे लोकसभेत असा ठराव आलाच नाही. आणि त्यांचा राजीनामा मंजूर करून घेतला Ahead of the impeachment motion against him in the Lok Sabha on 5 & 6 September 2011, he resigned on 1 September 2011 https://en.wikipedia.org/wiki/Soumitra_Sen इतर दोन्ही न्यायाधीश ज्यांच्या विरुद्ध असा महाभियोगाचा ठराव आला होता त्यात एक श्री दिनकरा यांनी राजीनामा दिला आणि श्री रामस्वामी यांच्या विरुद्ध ठराव पास झाला नाही. एकंदर स्वतंत्र भारताच्या इतिहासात एकाही न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग होऊन त्यांना बडतर्फ केले गेलेले नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/22/2021 - 16:03 नवीन
धन्यवाद. हो सौमित्र सेन यांनी आधी राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा मान्य न करता त्यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना हटविणार अशी चर्चा चालू होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. राज्यसभेने महाभियोग ठराव पास केल्यानंतर लोकसभेत तो ठराव येण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि तो मान्य केला गेला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/22/2021 - 06:48 नवीन
मोदी जनतेची नाडी अचूक ओळखतात व विरोधकांना आपल्याच मैदानात आपल्याच खेळपट्टीवर सामना खेळायला लावून लोळवितात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर सुद्धा विरोधक मोदींनी लावलेल्या सापळ्यात अलगद अडकतात. मोदी अशा कृती करतात की ज्यामुळे महत्त्वाचे सर्व विषय बाजूला ठेवून विरोधक त्यांच्यावर व्यक्तीगत हल्ले सुरू करतात व त्यातून शेवटी बहुसंख्य जनतेची सहानुभूती मोदींनाच मिळते व विरोधक संधी हातची घालविल्याने हात चोळत बसतात. काल मोदी बोलताना भावुक झाल्याने लगेच त्यांच्यावर टीका सुरू झाली. ते टीव्हीवर येऊन रडणार असे भाकीत मी आधीच केले होते असे आपटार्ड संजय सिंहने सांगून नाटकी, ढोंगी अशा शब्दात मोदींची संभावना केली. इतर विरोधक शहाणे असतील या प्रकाराला फार महत्त्व न देता व व्यक्तीगत टीका न करता मुख्य विषय बाजूला पडून देणार नाहीत. अन्यथा पुन्हा एकदा ते तोंडावर आपटतील.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/22/2021 - 06:54 नवीन
काही महत्त्वाच्या बातम्या - - ख्यातनाम पर्यावरण कार्यकर्ते व चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. - तहलका संपादक तरूण तेजपाल लैंगिक छळाच्या सर्व आरोपातून पुराव्याअभावी निर्दोष सुटले. - मागील आठवड्यात दैनिक नवीन कोरोना रूग्णांची संख्या ४ लाखांहून अधिक झाली होती. काल ही संख्या अडीच लाखांच्या आसपास आहे. हा आकडा सुद्धा खूप मोठा आहे, परंतु नवीन रूग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/22/2021 - 07:34 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawars-policy-actually-causes-fertilizer-price-hike-keshav-upadhye-msr-87-2476922/lite/ ---------- शरद पवार, नेहमीच पलटी का मारतात? शेतकरी आंदोलनच्या नंतर, आता ही दुसरी पलटी ...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 05/22/2021 - 12:48 नवीन
लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. https://maharashtratimes.com/entertainment/wellknown-musician-hum-aapke-hain-kaun-fame-ram-laxman-vijay-patil-no-more/articleshow/82852641.cms
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/22/2021 - 14:54 नवीन
विरोधक ब्लॅक फंगस आहेत असा घणाघात शिवसेनेचे नेते आणि सामनाचे सहसंपादक खासदार संजय राऊत यांनी केला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/shiv-sena-mp-sanjay-raut-has-criticized-the-leader-of-opposition-and-called-them-as-black-fungus/articleshow/82858187.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/22/2021 - 15:06 नवीन
आणि ही घाण म्हणजे स्पुटनिक लस.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 05/23/2021 - 04:54 नवीन
There is news about Covaxine not considered for overseas travel and Covaxine is not approved - not yet on the World Health Organisation's (WHO) Emergency Use Listing (EUL). https://amp/s/www.news18.com/amp/news/auto/as-covaxin-is-not-on-who-list-international-travel-plans-of-indians-could-get-hampered-3765002.html जागतिक आरोग्य संघटना चीनची गुलाम आहे. भारतीय लसीला मान्यता मिळू नये व चीनच्या लसीला मान्यता मिळावी यासाठी चीनच्या दबावाखालीच जागतिक आरोग्य संघटनेने मुद्दाम हा निर्णय घेतला असावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/24/2021 - 06:24 नवीन
Axis बँकेवर झाली ठाकरे सरकारची कृपा; अमृता फडणवीसांवर सातत्याने करत होते टीका.... --------- "Axis बँकेवर झाली ठाकरे सरकारची कृपा; अमृता फडणवीसांवर सातत्याने करत होते टीका - Marathi News | Axis Bank favored by Thackeray government; Amrita Fadnavis was constantly criticizing by Leaders | Latest politics News at Lokmat.com" https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/politics/axis-bank-favored-thackeray-government-amrita-fadnavis-was-constantly-criticizing-leaders-a629/amp/?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16218207021682&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fpolitics%2Faxis-bank-favored-thackeray-government-amrita-fadnavis-was-constantly-criticizing-leaders-a629%2F ------------- बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/24/2021 - 07:00 नवीन
बाबा बिचारे एक व्हाट्सॅप मेसेज वाचुन दाखवत होते, त्यात अधुनिक मेडिकल सायन्स कसे इश्टुपिड आहे असे लिहिले होते. म्हणे- हाय्ड्रोक्सीक्लोरोक्वीन फेल झाले, फॅबीफ्ल्यु फेल झाले, प्लाज्मा थेरपी सुद्धा फेल आणि बॅन झाली म्हणे, आणि लाखो लोकं मेले ते औषधे खाउनच. हा मेसेज बाबांना मान्यच होता असे दिसते. आयएमए ही संस्था जाम भडकली, आणि रामदेव आपले "इल्लिगल औषध" खपवण्यासाठी थापा लाऊन भिती पसरवत आहे असा दावा केला आणि त्यांनी हर्षवर्धन ह्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. हर्षवर्धन ह्यांनी रामदेव बाबांना आपले विधान मागे घेण्याची मागणी केली, रामदेव बाबांनी ऐकली. पण ह्याच आयएमए ने डॉ. हर्ष वर्धन यांना त्यांनी आपण कोरोनीलचा प्रचार करत नाही आहे असे घोषित करावे असे सांगितले होते, तिथे माझ्या महितीप्रमाणे काहीही झाले नाही. कोरोनील सारख्या औषधाला कोव्हिडसाठी पुरक म्हणुन विक्रीची परवानगी देणे, ते सुद्धा रामदेव बाबा WHO ने कोरोनीलला मान्यता दिली असे धाधांत खोटे बोलत असताना.
“Being a Health Minister of the country, how justified is it to release such falsely fabricated unscientific product to people of the whole country and how ethical was it to promote the product in unethical, wrong and false ways,” the IMA statement said. The association also pointed out that as per the code of act of the Medical Council of India, no doctor can promote any drug, “whether for compensation or otherwise, any approval, recommendation, endorsement, certificate, report or statement” and said that it was “surprising that the Minister himself is promoting the drug (Coronil)”.
रामदेव बाबाला प्रॉफीट व्हावा म्हणुन सरकार सरळ सरळ शिलींग करत आहे. निषेध.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Mon, 05/24/2021 - 13:39 नवीन
HCC चा खरंच काही उपयोग झाला नाही. रेमदेसीविर बद्दल बोलायचं तर आपले अलोपॅथी चे डॉक्टर्स त्याला अक्षरशः दिसेल त्याला prescribe करत होते. म्हणून तर गुलेरिया सारख्याना सांगावं लागलं की ते फक्त मधल्या काळात द्यायचं औषध आहे. सुरवातीला देऊन उपयोग होत नाही आणि नंतर दिलं तर उपयोग तर होतंच नाही, शिवाय रोग्याला त्याचा त्रास होतो. प्लाझ्मा थेरपी बद्दल नक्की काय प्रकार आहे खरंच माहिती नाही. मध्ये त्याबद्दल खूप ऐकलं होतं पण आता त्याबद्दल काही ऐकू येत नाही.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Mon, 05/24/2021 - 13:50 नवीन
1. भारताला प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स ची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मेडिकल च्या सीट्स खूप प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे. होऊ दे डॉक्टर्स चा अति पुरवठा, काहीही बिघडत नाही. 2. शिवाय जे विद्यार्थी सरकारी ग्रँट घेऊन शिकतील त्यांना आयुष्यभर सरकारी हॉस्पिटल्स मध्ये काम करायला भाग पाडणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतर करू दे त्यांना private मध्ये काम हवं तर. 3. जर कुणाला private हॉस्पिटल्स मध्ये काम करायची इच्छा असेल किंवा स्वतः ची private प्रॅक्टिस करायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःचे लाखो (की करोडो?) रुपये घालून शिक्षण घ्यावे. 4. सरकारने वैद्यकीय क्षेत्रावर खर्च होणारा निधी वाढवण्याची गरज आहे. या खर्चात सरकारी डॉक्टर्स च्या सॅलरी वर होणारा खर्च ही वाढवावा. 5. चांगल्या प्रतीचे वैद्यकीय इन्फ्रास्ट्रुक्चर तालुक्यापर्यंत आणि गावांपर्यंत नेण्याची गरज आहे. हे कसं करायचं हा प्रश्न असेल पण हे होण्यासाठी लागणारे डॉक्टर्स तरी मोठ्या प्रमाणावर तयार करावे लागणार. 6. सध्याच्या वैद्यकीय कट प्रॅक्टिस आणि मोठ्या हॉस्पिटल्स मधून होणाऱ्या प्रचंड बिल्स कडे लक्ष देऊन खरोखरच इतका खर्च होतो का, हॉस्पिटल्स चा revenue किती आणि income किती, तेवढा टॅक्स भरला जातो का, मेडिकल इन्शुरन्स चा हॉस्पिटल्स गैरवापर करतात का हे पहाण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 05/24/2021 - 14:02 नवीन
6. सध्याच्या वैद्यकीय कट प्रॅक्टिस आणि मोठ्या हॉस्पिटल्स मधून होणाऱ्या प्रचंड बिल्स कडे लक्ष देऊन खरोखरच इतका खर्च होतो का, हॉस्पिटल्स चा revenue किती आणि income किती, तेवढा टॅक्स भरला जातो का, मेडिकल इन्शुरन्स चा हॉस्पिटल्स गैरवापर करतात का हे पहाण्याची गरज आहे.
याबाबत विचार करुन डोके गरगरते... हॉस्पिटल चालवायला घेतली जातात (खाजगी असली तरी) इथेच कंत्राटी प्रकरण सुरु होत असल्याने आणखी काय बोलणार ?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 05/24/2021 - 15:23 नवीन
हा व्हिडिओ पाहा: https://fb.watch/5HohAALpEC/ महान योगगुरु श्री रामदेव बाबा यांनी कोविडमुळे मेलेल्या डॉक्टरांची खिल्ली उडवली आहे. परंतु आता ब्रह्मर्षी त्यावर मूग गिळून बसतील. ज्या विद्येमुळे पोटापाण्याची व्यवस्थाच नव्हे तर मानसन्मानही मिळाला ती विद्या अडाणी व लुच्च्या लोकांच्या पायी वाहण्यासाठी नक्कीच काहीतरी प्रचंड अमिष असले पाहिजे. मुस्लिम धर्मवेड्यांना ७२ अप्सरांचे असते म्हणतात. ह्या लोकांना कसले असावे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 05/24/2021 - 15:28 नवीन
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. संपादक मंडळ आपले असभ्य प्रतिसाद वारंवार काढत टाकले असूनही पुन्हा पुन्हा तेच प्रतिसाद टाकण्याची खोड सुरूच आहे.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Mon, 05/24/2021 - 20:52 नवीन
पंतप्रधान सिंगापूर मध्ये बसून 9 ते 5 नोकरी करतात आणि बाकीच्या वेळी ट्विटर, मिसळपाव, फेसबुक वर वेळ घालवतात अशी त्यांची कल्पना दिसते. पंतप्रधानांना (सगळ्याच) दिवसातले 14-18 तास काम करायचे असते. त्यांचे दिवस सकाळी 5 ला सुरू होऊन रात्री उशिरा कधीही संपू शकतात. रामदेवबाबाच्या बातमीवर, राजकुमारांच्या ट्विट वर, संजय रौतांच्या interview वर आणि अशा फुटकळ गोष्टींवर मतं व्यक्त करत बसले तर देशातल्या सगळ्या मंत्र्यांच्या/सचिवांच्या/राष्ट्रपती/राज्यपाल/मुख्यमंत्री आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यांच्या कामावर लक्ष कधी ठेवणार? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Mon, 05/24/2021 - 19:29 नवीन
या रामदेव बाबांना थोडा तारतम्य हवे. आय. एम. ए. भडकली आहे देशातील डॉ़क्टर भडकले आहेत. एक गोष्ट साफ झाली आहे कि केंद्र सरकारला वाटते कि सगळयांनी गुलामासारखे वागावे. आणि केंद्र सरकारचे गुण गावेत यासाठि भारतातली जनता आहे. आय. एम. ए. फक्त अ‍ॅलोपैथिक डॉ़क्टरांचे प्रतिनिधित्व करत नाही ( अ‍ॅलोपैथिक डॉ़क्टरांचे संघटनेत वर्चस्व आहे हे मान्य ). कशाला मागच्या वर्षी (अ‍ॅलोपैथिक) डॉ़क्टर काम करत असलेल्या हॉस्पिटल मध्ये डॉ़क्टर आणि नर्सिंग स्टाफ वर कोव्हीड योध्दा म्हणुन भारतीय वायुदलाच्या हॅलिकॉप्टर मधुन पुष्पवर्षाव केला. ? एखादा रुग्ण करोना रुग्ण आहे हे RT-PCR , HRCT , Antigen टेस्ट शिवाय कसे शोधु शकाल ? बर RT-PCR , HRCT , Antigen टेस्ट शिवाय एखादा रुग्ण शोधला तर तो किती गंभीर आजारी असणार आणि त्या रुग्णाचे काय होणार हे सांगायची गरज आहे का ? असा रुग्ण PPE kit न घालता कोणी बरा करु शकेल काय ? असा रुग्ण PPE kit न घालता कोणी बरा करु शकत असेल तर त्याने वैद्यकिय शास्त्राला आव्हान द्यावे. आणि हि परिस्थिती लक्षात घेउन केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावे हि माफक अपेक्षा.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Mon, 05/24/2021 - 21:00 नवीन
केंद्र सरकारचा काय संबंध? आय एम ए आणि रामदेवबाबा बघून घेतील की. केंद्र सरकार ला वाटते सगळ्यांनी गुलामसारखे वागावे? केंद्र सरकारच्या कुठल्या अध्यादेशामध्ये हे म्हटलं आहे? की एखाद्या मंत्र्याने/नोकरशहाने असं म्हटलं आहे? की एखाद्या interview मध्ये असं म्हटलं आहे? की हे तुमचं interpretation आहे? असेल तर कोणत्या फॅक्टस वर अवलंबून आहे? आणि नसेल तर फडतूस ट्रोलिंग पोस्ट कशासाठी?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 05/24/2021 - 20:35 नवीन
मुळात रामदेव बाबा कोणी सरकारी अधिकारी, मंत्री वगैरे आहेत का? त्यांच्या बोलण्याला एवढं महत्त्व देण्याचं कारणच काय? "डॉक्टरांंना काय कळतं, मी तर नेहमी कंपाऊंडरकडूनच औषध घेतो" असे मागच्या वर्षी संजय राऊत बोलले होते. तेव्हा त्या बोलण्याला किती जणांनी महत्त्व दिले होते? मग रामदेव बाबांंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष का करीत नाहीत?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/25/2021 - 06:05 नवीन
बाडीस
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 06:47 नवीन
रामदेव बाबा एलोपेठीच्या स्पर्धक औषधांचा व्यापार करतात राऊतांप्रमाणे देशाच्या एका विशिष्ट भागापुरते मर्यादित प्रभावशील नाहीत परिणामी त्यांची चिखलफेक हि निर्लेप नसून दिवस रात्र राबून जो अभ्यासक्रम शिकून लाखो लोकांचे प्राण ज्यांनी वाचवले त्याचा उघड अपमानही आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/25/2021 - 09:54 नवीन
राऊत ज्या विशिष्ट मर्यादित भागात प्रभावशाली आहेत, त्या भागातील किती जणांनी डॉक्टरऐवजी कंपाऊंडरकडून औषध घ्यायला सुरूवात केली? देशी दारू प्यायल्याने कोरोना बरा होतो असे नुकतेच एका डॉक्टरनेच सांगितले होते. त्याचे ऐकून किती जणांनी देशी दारू ढोसायला सुरूवात केली? फेअर अँड लव्हली लावून गोरेपण येते, अशी जाहिरात अनेक दशके सुरू आहे. ती पाहून किती जण गोरे होण्यासाठी हे मलम वापरले? अनेक वृत्तवाहिन्या रोज अनेकदा अर्ध्या तासांचे डॉक्टरांचे पेड जाहिरातींंचे कार्यक्रम दाखवितात. ते पाहून किती जणांनी त्या डॉक्टरकडून उपचार घेतले? हे सर्वजण डॉक्टरांचा अपमान करीत नाहीत का?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 10:11 नवीन
राऊत ज्या विशिष्ट मर्यादित भागात प्रभावशाली आहेत, त्या भागातील किती जणांनी डॉक्टरऐवजी कंपाऊंडरकडून औषध घ्यायला सुरूवात केली? वेल हे घडले नसेल तर राउतांनी डॉक्टरांची माफी मागायलाच हवी याबद्दल आपले मिपाकर डॉ खरे साहेब याच मताचे असतील. देशी दारू प्यायल्याने कोरोना बरा होतो असे नुकतेच एका डॉक्टरनेच सांगितले होते. त्याचे ऐकून किती जणांनी देशी दारू ढोसायला सुरूवात केली? आयत थिंक तुम्ही काही तरी गल्लत करताय, देशी दारू पाजुन मग डोक्टरने देशी प्यायल्याने कोरोना बरा होतो असे म्हटले होते म्हणजे देशी पाजली गेली आहे ते सुध्दा डॉक्टर कडुन. फेअर अँड लव्हली लावून गोरेपण येते, अशी जाहिरात अनेक दशके सुरू आहे. ती पाहून किती जण गोरे होण्यासाठी हे मलम वापरले? आयम नॉट रेसिस्ट आणी या जाहीरातीचा धिक्करही केला गेला आहे. अनेक वृत्तवाहिन्या रोज अनेकदा अर्ध्या तासांचे डॉक्टरांचे पेड जाहिरातींंचे कार्यक्रम दाखवितात. ते पाहून किती जणांनी त्या डॉक्टरकडून उपचार घेतले? त्यात खरेच डोक्टर (म्हणजे आपले खरे डो़क्टर न्हवे)असतात की अभिनेते डॉक्टरचा रोल करुन फसवणूक करतात ? तसेही कायदेशीर बाबितुन सुटका करणार्‍या जाहीरातदारांच्या ट्रिक्स म्हणजेच ** आणी अजुन बारीकबारीक अक्षरातील सुचना आपणास माहीत नाहीत ? बाकी डॉक्टर लागुनी जाहीरती केल्या तर त्यांचे लायसेंस रद्द केल्य गेले होते. हे सर्वजण डॉक्टरांचा अपमान करीत नाहीत का? म्हणून रामदेव बाबाला सहन करयच व्हय ? मग तर सर्वप्रथम रामदेवबाबाला तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति हा धागाच ऊदवायला सांगायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/25/2021 - 10:50 नवीन
तेच म्हणतोय मी. जे रामदेवबाबांंनी केलंय ते पूर्वी अनेकजणांनी केलंय. परंतु त्यांच्या बाबतीत क्वचितच निषेधाचे सूर उमटले होते. संजय राऊतच्या बरळण्याकडे जसे दुर्लक्ष केले जाते, संजय राऊतला जसे सहन केले जाते, तसे रामदेवबाबांच्या बाबतीत का केले जात नाही? मुळात रामदेवबाबांनी जे उत्पादन आणलंय ते औषध नसून immunity booster आहे. त्यासंबंधीचा खालील प्रतिसाद वाचा.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 10:52 नवीन
तेच चालु रहायला आपला काही विरोध नसावा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा