चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)
मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना.
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strain-use-super-spreader-kumbh-bjp-congress-toolkit-destroy-pm-image-1803935-2021-05-18
🗣 चर्चा
(219)
न
निपा
Tue, 05/18/2021 - 12:46
नवीन
इमेज ची किती पडलीय नाही .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 05/18/2021 - 13:46
नवीन
आपली रेघ मोठी करता येत नसली की दुसऱ्याची रेघ छोटी केली की आपली रेघ आपोआप मोठी दिसते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 05/18/2021 - 13:02
नवीन
Narada Scam: उच्च न्यायालयाने जामीन नाकारताच ममतांच्या मंत्र्यांची तब्येत बिघडली, तिघे हॉस्पिटलमध्ये
--------------
https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/crime/narada-scam-mamata-banerjees-ministers-fell-ill-subrata-mukherjee-admitted-three-hospital-a607/amp/?amp_gsa=1&_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16213354448705&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&share=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcrime%2Fnarada-scam-mamata-banerjees-ministers-fell-ill-subrata-mukherjee-admitted-three-hospital-a607%2F
-------------
असे आजारपण येणे, हा निव्वळ योगायोग आहे...
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Tue, 05/18/2021 - 13:12
नवीन
निवडणुक झाल्यावर चौकशी हा पण योगायोग च.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 05/18/2021 - 13:48
नवीन
आता कारवाई होत आहे ...
पण नेमके, अशावेळीच काही जणं आजारी कसे काय पडतात बुवा?
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 05/18/2021 - 13:23
नवीन
मी गेले चार दिवस टीव्ही बंद करुन बसलो आहे.
उगाच भणाभणा दिवसभर चालू असते.
आणि बातम्या किती खर्या आहेत तेच समजत नाही.
या कोवीड आणि महाविकास आघाडी शिवाय जगात सध्या दुसरे काहीच नाही असे वाटायला लागलेय.
एकोहम सत्यं ...... टीव्ही नाम : अस्मिन.
जगात इतरत्र काय होतेय तेच समजत नाहिय्ये.
गाझा मधे इस्राईल हल्ले करतच आहे.
पाकिस्तान मधे इम्रान विरुद्ध लोकमत वाढायला लागलय. तहेरीक ए लब्बाईक ही नवीच संघटना पुढे येतेय.
बाकी भुतान ब्रम्हदेश नेपाळ स्रिलंका अफगाणीस्थान बांगलादेश येथे सध्या काय चाललय तेही समजत नाहिये.
इंग्लंड हळू हळू कोविड मधून बाहेर येतय, जर्मनी पण खम्बीर पणे सामना करतय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 05/18/2021 - 13:50
नवीन
अगदी उत्तम ....
मी अद्याप पर्यंत टीव्ही वरच्या बातम्या लावलेल्या नाहीत, 1975 पासून ...
- Log in or register to post comments
श
श्रीराम हसबनीस
Wed, 05/26/2021 - 09:19
नवीन
उत्तम गोष्ट. तारीख आणि फार तर नावं वेगळी असतात. घड़ामोड़ी त्याच. संसर्ग, मृत्यु, आरोप-प्रत्यारोप, भ्रष्टाचार, हल्ले, राजकारण. आपण आपलं मार्मिक साहित्य, कला वैग़ैरेचा आस्वाद घ्यावा. अगदी कळकळ वाटली तर एखाद्या गरजूला मदत करावी. अजून काय?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Tue, 05/18/2021 - 15:37
नवीन
केरळ मध्ये मुखमंत्री पी विजयन सोडले तर संपूर्ण मंत्रिमंडळ नव्या चेहेऱ्यांना संधी देण्यासाठी बदलले आहे.
कोव्हिड मध्ये उत्तम काम करणाऱ्या आरोग्यमंत्री शैलजा टीचर यांना सुद्धा संधी दिली नसल्याने लेफ्ट मिडियाकडून केरळ वर टीका होत आहे. पण त्या स्वतः म्हणतात-
मला नवीन लोकांना संधी देण्याचा निर्णय आवडला.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 05/18/2021 - 20:00
नवीन
पंकजाकडून इतकं शिकलं तरी पुरेसे आहे.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 05/19/2021 - 02:15
नवीन
पद्मश्री डॉक्टर के के अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले.
स्वतः डॉक्टर असूनही “दिवे लावल्याने कोरोनाचा प्रतिबंध कसा होतो” व्गैरे छ्द्मविज्ञान पसरवणारे म्हणून ते नेहमीच लक्षात राहतील.
एका अशिक्षित, द्वेषवादी व गावगुंडासारख्या माणसाच्या समर्थनासाठी उच्चशिक्षण घेतलेले लोक स्वतःचे अवमूल्यन करुन घेताना पाहणे वेदनादायी आहे.
मला वाटतं ह्यांच्या डोक्यात ह्यांच्या आईबापांनी श्रेष्ठत्वाच्या व जुन्या सुप्रिमसीच्या खुळचट कल्पना भरवलेल्या असतात व मोदी आपल्याला तो जुना “सुवर्णकाळ” आणून देईल असे ह्यांना वाटत असणार.
प्रत्यक्षात अस्तनीतला निखारा स्वतःलाच चटका देणार हे त्यांना चटका बसेपर्यंत कळत नाही.
पारंपारिक रिझर्वेशनमधून उच्च्शिक्षण वगैरे घेत असले तरी हे शेवटी सुमार ते सुमारच.
असो. त्यांचे प्रेत जाळायला लाच न देता जागा मिळाली असेल अशी आशा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 05/19/2021 - 07:02
नवीन
मुळात मोदींची पदवी खोटी आहे हे केजरीवाल, आशुतोष, संजय सिंह या विकृत आपटार्ड्सनी निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक पसरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. परंतु त्यात तोंडावर आपटल्याने हा अपप्रचार बंद झाला. परंतु विकृत मनोवृत्तीचे काही नंबरी अजूनही तोच अपप्रचार करीत आहेत.
How did Narendra Modi get a degree in entire political science when such a degree isn’t even offered in India, or any part of the world?
Entire Political Science used to be a popular degree during 1970s and 80s. The Vice Chancellor of Gujarat University has also tried to clear the air regarding this. In fact, it is also awarded in the Magadh University, Bodh Gaya of Bihar.
What is Entire Political Science Course?
It is about completing entire MA course where the candidate/student has taken only political science subjects. The candidate has not taken any allied subject and has taken all 8 papers related to Political Science only. That is why it is called Entire Political Science.
Now, many universities have stopped this course, but you can’t blame Modi for the same.
Gujarat University has uploaded the mark sheet of Narendra Modi on its official website. You can see 'Entire Political Science' mentioned in the mark sheet.
- Log in or register to post comments
स
साहना
Sun, 05/23/2021 - 08:04
नवीन
मोदींचे शिक्षण आणि त्यावरील गोंधळ ह्या इतका मूर्खपणाचा वाद मी भारतीय राजकारणांत पहिला नाही. जो माणूस सामान्य परिवारांत जन्माला येऊन स्वकर्तृत्वावर प्रधानमंत्री झाला त्या माणसाला शिक्षण आहे कि नाही हा मुद्दा पूर्णपणे निरर्थक आहे. त्यामाणसाने आपले स्किल आधीच कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. स्वयमेव मृगेंद्रता म्हणतात ती तीच. शिवाजी महाराज हे क्षत्रिय परिवारातील होते कि नाही, त्यांना तलवार किती चांगली चालविता येत होती, धनुष्यबाणाने त्यांचा वेध किती अचूक होता, राजकारणाचे धडे त्यांनी कुठे गिरवले हे मुद्दे पूर्णपणे गौण आहेत कारण ह्या माणसाने स्वकर्तृत्वाने हिंदू राजेशाही उभारली. अहो शिक्षण हि शिडी आहे पण जो माणूस आधीच वर पोचला आहे तो शिडीवरून नक्की किती पाऊले उचलून आला हा मुद्धा फक्त सुशिक्षित मूर्ख लोकच उचलून धरू शकतात.
तुकाराम महाराजांनी कुठल्या वेदपाठशाळेंत दाखला घेतला होता ? पण
‘वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं।
भार धन वाही मजुरीचें।।’
हे सांगून त्यांनी संपूर्ण हिंदू धर्मांत स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केले. वेदपाठशाळेंत गेलेल्या कुठल्याही ब्राह्मणापेक्षा तुकाराम महाराज कुठल्याही पद्धतीने कनिष्ठ अजिबात नाहीत.
कुठल्याही राजकीय नेत्याला शिक्षण असणे गरजेचे नाही असे माझे मत आहे. मुलांत भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया ढासळत चालला आहे हे सर्वच लोक मान्य करतात. माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे दिल्लीच्या दरबारांत व्यक्ती पोचली कि सर्व ज्ञानावर आपोआप एक पडदा पडतो आणि बुद्धिभ्रम होतो. त्यामुळे शिक्षण हे दिल्लींत फायद्याचे नाही.
सुशिक्षित म्हणवणारे IAS अधिकारी कसे उन्मत्तपणे जनावरांप्रमाणे वागतात आम्ही पहिले आहे. उच्चविद्याविभूषित असे मन्नू साहेब कश्या प्रकारे देशाची वाट लावतात हे सुद्धा आम्ही पहिले आहे आणि विशेष शिक्षण नसणारे फवार साहेब कश्या प्रकारे क्रिकेट पासून दारुक्षेत्र पर्यंत सगळीकडे चाणाक्ष पद्धतीने खेळ्या खेळत आहेत हे सुद्धा पहिले आहे. सोनिया गांधी ह्यांना विशेष शिक्षण नसले तरी उत्तम नेतृत्व दाखवून त्यांनी काँग्रेस जिवंत ठेवली. चांगले शिक्षण घेतलेला त्यांचा सुपुत्र सध्या ते जहाज बुडवत आहे.
---
शिक्षण महत्वाचे नसले तरी, सत्य बोलणे महत्वाचे आहे. काही राजकीय नेते जसे स्मृती इराणी ह्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रांत आपले शिक्षण खोटे सांगितले होते असा आरोप आहे. इथे खोटे बोलणे चुकीचे आहे, शिक्षण किती आहे हा मुद्दा नगण्य आहे.
टीप : बहुतेक शिक्षण हे माणसापासून कारकून घडविण्यासाठी आहे. ह्या व्यक्ती नेते बानू शकत नाहीत. पहिल्या बाकावर बसणारा विद्यार्थी क्वचितच चांगला नेता होतो.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Sun, 05/23/2021 - 10:18
नवीन
शिवाजी महाराजांना गरजेचे शिक्षण बालपणिच मिळाले त्यांचे कर्तुत्व म्हणजे पुढे त्यानी ज्ञानाचा खुबिने केलेला वापर होय.
तुकाराम महाराज राजकारणात न्हवते तर ते आत्मोध्दाराच्या मार्गात होते तिथे शिक्षण न्हवे तर नेमका उलट प्रवास अस्तो म्हणुन त्यान्चे उदाहर देणे हीच बाब ज्ञानाचा आभाव दर्शवते.
आजुनही कोणत्याही विद्याविभुशीत नेत्याला भारतीय जनतेने एक्वटुन शक्ती दिलेली नस्ल्याने नेत्याना शिक्षणाची गरज काय असा आप्ला भ्रम झालाय खरे तर पक्षातील ३५% खासदार आम्दार हे उच्च्विद्या विभुशीत अस्ले पाहिजेत असा काय्दा हवा मग ब्घा भारतातुन कसा सोन्याचा धुर वाहु लाग्तो ते. आज साहेब किमान माजी पंतप्रधान नक्किच गणले गेले असते जर ते....
असो शिक्षणा शिवाय, लोकशाही, संविधान बळकट होउ शकत नाही आज देशात जो काही भ्रष्टाचार, ब्रेन ड्रेन, आणी नको असणार्या गोष्टी असतील तर त्याला कारण फक्त आंणी फक्त शिक्षणाचा आभाव हेच आहे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/24/2021 - 06:21
नवीन
@ गॉडजिला
खरे तर पक्षातील ३५% खासदार आम्दार हे उच्च्विद्या विभुशीत अस्ले पाहिजेत असा काय्दा हवा मग ब्घा भारतातुन कसा सोन्याचा धुर वाहु लाग्तो ते.
जरा खालच्या वस्तुस्थितीवर नजर टाका
The current Lok Sabha has the highest number of people with at least a graduate degree, 394/542. This is almost three times the number of graduates in the first Lok Sabha.
https://www.hindustantimes.com/india-news/number-of-graduates-is-highest-ever-in-lok-sabha/story-0qNN9JHyjSOwYzOZA8PpgP.html
अन्यथा दक्षिण आफ्रिकेतील सामाजिक बदल या विषयावर ज ने यु मधून आठ वर्षे घेऊन पी एच डी केलेला उमेदवार खासदार झाला किंवा अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास या विषयातअथवा उत्तरध्रुवावरील पांढऱ्या अस्वलाच्या उवांवर संशोधन करून डीम्ड विद्यापीठातून पी एच डी झालेला अशी काय क्रांती करणार आहे तो लोकसभेत.
केवळ उच्च शिक्षित झाला म्हणजे सामाजिक परिस्थितीची जाणीव आणि आकलन असेलच असे नाही.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Mon, 05/24/2021 - 08:19
नवीन
तसे असते तर आपले क्रेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे बाबा रामदेवचे कोरोनील औषध लाँच करायला गेलेच नसते. बाबा धडधडीत खोटे दावे करतोय आणि हे निमूटपणे ऐकत होते. मिपावर कोणीकोणी त्यांचा निषेध केला?
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Mon, 05/24/2021 - 08:41
नवीन
हे माहीत न्हवते खूप छान.
केवळ उच्च शिक्षित झाला म्हणजे सामाजिक परिस्थितीची जाणीव आणि आकलन असेलच असे नाही.
हम्म बरे झाले हे स्पष्ट केले अन्यथा यापुढे नेते हे शिक्षकच असावेत हा विचार करत होतो
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sun, 05/23/2021 - 10:35
नवीन
शिक्षण नसणे या कारणाने आउट ऑफ हँड उडवून लावणे अतार्किक आहे.
पण नेत्याने शिक्षण घेतले असावे अशी अपेक्षा असणे आणि उच्चशिक्षण एक प्रो मुद्दा मानणे हे योग्यच वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 05/23/2021 - 11:30
नवीन
शिक्षण असणे हा एक मुद्दा आहे. जो द्विपदवीधर आहे, त्याच्या शिक्षणाबद्दल योजनाबद्ध कंड्या पिकवून त्याचा अशिक्षित, अडाणी, अल्पशिक्षित असा तुच्छतापूर्वक करीत राहणे हा पूर्ण वेगळा मुद्दा आहे.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sun, 05/23/2021 - 12:11
नवीन
हो, सहमत आहे.
- Log in or register to post comments
U
Ujjwal
Sun, 05/23/2021 - 13:41
नवीन
+१००
बरं असंही नाही कि शिव्या देणाऱ्यांचा नेता उच्चशिक्षित आहे. ड्रॉपआउट नेत्याची चाटण्यातच यांना धन्यता वाटते.
ते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
- Log in or register to post comments
U
Ujjwal
Sun, 05/23/2021 - 13:41
नवीन
+१००
बरं असंही नाही कि शिव्या देणाऱ्यांचा नेता उच्चशिक्षित आहे. ड्रॉपआउट नेत्याची चाटण्यातच यांना धन्यता वाटते.
ते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 05/23/2021 - 14:45
नवीन
मोदींच्या शिक्षणाबद्दल मुद्दाम अफवा पसरवून संशय पसरविण्याचा योजनाबद्ध प्रयत्न केला गेला. माहिती अधिकार कायद्याचा वापर करून व त्याची जाहिरात करून मोदींच्या पदवीविषयी माहिती मागितली गेली. त्यातून जी पदवी प्रमाणपत्रे मिळाली ती खोटी आहेत असे आरोप केले गेले. विद्यापीठात जाऊन कुलगुरूंना वारंवार भेटून मोदीची पदवी, त्यांचा परीक्षा क्रमांक इ. गोष्टींसाठी पिच्छा पुरविला गेला. कुलगुरु घामाने निथळत होते, भीतिने थरथर कापत होते असे कुलगुरूंविषयी आशुतोष या आपटार्डने जाहीर पसरविले होते. १९७० च्या दशकात मोदींना संगणकीकृत गुणपत्रिका मिळणे शक्यच नाही कारण तेव्हा म्हणे भारतात संगणकच नव्हता असे आपले अज्ञान जाहीर हे तोंडावर आपटले. त्यांच्या दुर्दैवाने काही जणांनी आपली १९७३ मधील सीबीएसईची संगणकीकृत गुणपत्रिका प्रसिद्ध केल्याने यांचे तोंड काळे झाले.
ज्यांनी आजतागायत स्वतःच्या शिक्षणाचे कोणतेही पुरावे दिले नाहीत, ज्यांनी राबडीसारख्या ठार निरक्षर महिलेला सलग ८ वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता, ज्यांनी राजस्थानात गोलमादेवी नावाच्या ठार निरक्षर महिलेला मंत्री बनविले होते, जे जेमतेम १० वी उत्तीर्ण असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान बनवायला निघाले होते, तेच नालायक मोदींच्या पदवीची उठाठेव करीत होते कारण त्यांच्याकडे मुद्देच नव्हते. बरं, पदवी, शिक्षण वगैरे म्हणून नाचणाऱ्यांच्या पक्षातील उच्चविद्याविभूषित नेत्यांनी फक्त चाटुगिरी करून देशाचं वाटोळं करणे यासाठीच आपल्या तथाकथित उच्च शिक्षणाचा उपयोग केला, याकडे मात्र यांचे सोयिस्कर दुर्लक्ष.
हे सर्व जनता ओळखून असल्याने जनतेने या मुद्द्यावरून यांना भीक घातली नाही. त्यामुळे आता तो दुष्प्रचार थांबलेला दिसतो. अर्थात तोच मुद्दा घेऊन मोदींना अर्वाच्य बोलणारे काही नंबरीनिर्बुद्ध मिपावर आहेत व अनेक वेळा तोंडावर आपटूनही ते चिवटपणे हाच मुद्दा पुन्हा पुन्हा उगाळत बसतात.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sun, 05/23/2021 - 16:34
नवीन
कशी मिळणार? भारतात संगणक म्हणजे काय असते हेच मुळी राजीव गांधी पंतप्रधान होण्यापूर्वी माहित नव्हते ना? मग १९७० च्या दशकात संगणकीकृत गुणपत्रिका कशा मिळणार?
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sun, 05/23/2021 - 16:38
नवीन
हे उपरोधाने लिहिले आहे हे वेगळे लिहायलाच नको.
भारतात पहिला संगणक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये १९५५ मध्ये आला होता. टी.सी.एस ची स्थापना १९६८ मधील तर इन्फोसिसची १९८१ मधील. स्वतः नारायणमूर्ती पटणी कॉम्प्युटर्समध्ये नोकरीला होते म्हणजे पटणीची स्थापना १९८१ पूर्वीची कधीची तरी.
तरी भारतात कॉम्प्युटर पहिल्यांदा कोणी आणले? तर राजीव गांधींनी.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 05/23/2021 - 18:18
नवीन
१९७७ मध्ये जनता पक्षाची सत्ता केंद्रात आल्यानंतर तत्कालीन उद्योगमंत्री जॉर्ज फर्नांडिसांनी काही महिन्यातच आयबीएम, कोका कोला अशा मोठ्या परदेशी कंपन्यांना भारतातून निघून जाण्यास भाग पाडले.
त्यावेळी भारतात आयबीएम, बरोझ, आयसीएल, डेटा जनरल, डेक, कंट्रोल डेटा कॉर्पोरेशन अशा मोठमोठ्या परदेशी संगणक कंपन्या व्यवसाय करीत होत्या. पुण्यातील विद्युत महामंडळ, पुणे विद्यापीठ अशा ठिकाणी आयसीएलचे मेनफ्रेम वापरात होते. किर्लोस्कर कमिन्स मध्ये ६० टर्मिनल जोडलेला आयबीएमचा मेनफ्रेम होता. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीत बरोझचा मेनफ्रेम होता. अल्फा लाव्हल मध्ये डेटा जनरलचा मेनफ्रेम होता.
HCL १९७६ मध्ये, काळे कन्सल्टंट्स १९८० मध्ये, विप्रो १९८० मध्ये स्थापन होऊन डेटा प्रोसेसिंगचे काम करीत होते. MCA हा ३ वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम इंदूर विद्यापीठाने १९८२ मध्ये व पुणे विद्यापीठासहीत अजून ४ विद्यापीठांनी १९८३ मध्ये सुरू केला होता.
राजीव गांधी ३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी पंतप्रधान झाले होते.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 05/19/2021 - 08:46
नवीन
मंग यांचे सीएओ कधी ड्रॉप ऑउट का नसतात ? ते मात्र शिकलेले का लागतात ? एंप्लोयी मस्ट बी नॅचरल एक्स्टेंशन असे असुनही यांचे सिएओ वगैरे वगैरे मंडळ हाय हाय टी, यमाइटी वाले कसे असते ?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 05/19/2021 - 08:56
नवीन
प्रतिसाद देताय येवढाला.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 05/19/2021 - 13:00
नवीन
आपल्या कौतुकाची शिदोरी मर्यादितच असते, तेव्हा मोदींसारख्या, तुमच्या मते, अशिक्षीत व अडाणी माणसाच्या वाट्यास तुमचे कौतुक नाही आले, हे ठीकच. कारण फायनॅन्स, बँकिंग व ऑडिटर्स ह्या क्षेत्रांतील उच्चविद्याविभूषितांसाठी ते राखून ठेवले पाहिजे. त्यांची विद्वत्ता व त्यांतून निपजणारे कारनामे काय वर्णावे?
काही अलिकडची उदाहरणे पहाता, तुम्हाला त्या क्षेत्रांतील उविविंनी बरीच संधी अलिकडेच दिली होती:
१. मलेशियन सॉव्हरीन फंडाच्या संबंधित एका नामांकित बँकच्या उविविंनी केलेला फ्रॉड, जो त्यांनी कबूल केला आहे.
२. वायरकार्डचा अनेक वर्षे सुरू राहिलेला फ्रॉड, त्यांच्या ऑडिटर्सच्या लक्षांत आला, किंवा नाही, ह्याविषयी संभ्रम.
३. ग्रीनसीलसंबंधित घोटाळ्यांत एका मोठ्या बँकेचे पैसे गेल्यात जमा. ह्या २ व ३ संबंधीत एकाच नामांकित बॅंकेच्या (अर्थात, उविवि) रिस्क म्यॅनेजरची गच्छंति.
ह्या व अशाच सर्वच घोटाळ्यांत पकडले गेल्यावर, दंड भरून शहाजोगपणे सुटण्याची हुशारीही अर्थात ह्या उविविंनी चालवलेल्या संस्थांकडे असतेच.
आणि ह्या क्षेत्रांतील उविविंचे हे असलेच कारनामे पूर्वीही सुरूच होते. ते तसेच ह्यापुढेही सुरू राहतीलच, ह्यांत शंका नाही. तेव्हा आपल्या कौतुकाचा मर्यादित साठा, जपूनच वापरावा, ह्यांजकडून खूपच संधि उपलब्ध होत राहतीलच तुम्हाला.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Tue, 05/25/2021 - 07:22
नवीन
आता तसा संभ्रम राहिला नाही, असे दिसते आहे. जर्मनीच्या पार्लमेंट्च्या कमिटीने ई. वाय. वर भरपूर ताशेरे ओढले आहेत. आता, तेथील उविविंची स्वतःची कातडीव बचावण्यासाठी पळापळ होईल. पण येथील उविवि ह्याविषयी काही बोलणार नाहीत.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
गुरुवार, 05/20/2021 - 06:37
नवीन
संपादक मंडळाला ह्या प्रतिसादाबद्दल काहीच वावगे वाटत नाही ?
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Wed, 05/19/2021 - 03:11
नवीन
असे आजारपण येणे, हा निव्वळ योगायोग आहे...>>> योगायोगच नव्हे तर नशीब पण लागते. अगदी असेच आजारपण भुजबळाना पण आले होते. तेम्व्हा ते मफलरमधे असायचे आता एकदम टुणटुणीत दिसतात. आजारी आहोत असे दाखवून त्यानी पुरोगामी व राश्ट्रवादी लोकान्च्या मनात त्यानी खूप सहानभूती निर्माण केली जशी ममतानी पाय मोडला आहे असे दाखवून केली तशी.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Wed, 05/19/2021 - 06:34
नवीन
आजारपण यायलाच पाहीजे असे काही नाही....आजारपणाचे नाटक जरी केले तरी खूप झाले..
हल्लीचेच उदाहरण बघा, प्लॅस्टर आणि व्हीलचेअर मतदानानंतर अचानक नाहीशी झाली. =))
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 05/21/2021 - 13:38
नवीन
राजकारण्यांना अशी "राजकीय" आजारपणे हुकमीपणे काढता येतात. अन् बहुतेक पब्लिक त्याला भुलते सुद्धा.
यात मला तरी काही वावगे वाटत नाही. जसं बंद/आक्रसताळेपणा/अफवा म्हणजे एक राजकीय हत्यार, त्याचप्रमाणे, राजकीय आजारपण/हृदयाची हाक वगैरे सगळ्या राजकीय ढाली आहेत. फक्त कोण किती निर्ढावलेले आहेत तेवढे यातून नीट समजते हे खरे.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Wed, 05/19/2021 - 08:25
नवीन
https://www.lokmat.com/politics/karuna-dhananjay-munde-told-about-dhananjay-mundes-property-parali-pune-mumbai-cm-uddhav-thackeray-a607/
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 05/19/2021 - 08:31
नवीन
@ नगरीनिरंजन
पारंपारिक रिझर्वेशनमधून उच्च्शिक्षण वगैरे घेत असले तरी हे शेवटी सुमार ते सुमारच.
असो. त्यांचे प्रेत जाळायला लाच न देता जागा मिळाली असेल अशी आशा.
डॉ के के अगरवाल यांच्या सारख्या उत्कृष्ट डॉक्टरांवर आपण शिंतोडे उडवून काय मिळवलं हे समजत नाही.
द्वेषाने आपली दृष्टी अंध झाली आहे एवढेच मी म्हणेन.
डॉ अगरवाल यांनी यु ट्यूबच्या माध्यमातून गेले एक वर्ष करोना बाधित रुग्णांचे किती प्रबोधन केले आहे किती लोकांना मानसिक आधार दिला आहे याची आपल्याला यत्किंचितही कल्पना नाही.
वैद्यकीय क्षेत्रात या व्यक्तीला किती मान होता याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही.
आरक्षणाचा येथे काय संबंध आहे? जिथे तिथे गरळ ओकून मोदी विरोध जातीयवादी वक्तव्ये करून आपण घाण करून ठेवली आहे.
निदान त्यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा कसा उपयोग केला आहे आणि किती रुग्णांना दिलासा दिला आहे या बद्दल थोडी तरी माहिती घेतली असतात तर बरे झाले असते.
त्यांच्या ज्ञानाला सुमार म्हणायला आपली लायकी काय आहे? He was one of the pioneers of streptokinase therapy for heart attacks in India and introduced the technique of Colour Doppler Echocardiography in India. [7]
Dr Aggarwal had been honoured with the Dr. B. C. Roy Award, the highest Indian award in the medical category, in 2005.[6][7][10][11]
He was also a recipient of Vishwa Hindi Samman, National Science Communication Award, FICCI Health Care Personality of the Year Award, Dr D S Mungekar National IMA Award,[10] and the Rajiv Gandhi Excellence Award.[10] In 2010, he received the Padma Shri.[5] He had been the National President of the Indian Medical Association [12] and Chief Editor of IJCP Group.[13]
अशी निरर्गल टीका करण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतः करोनाबाधित असताना ऑक्सिजन वर असताना यु ट्यूब वर टाकलेला निदान शेवटचा व्हिडीओ एकवार पाहून घ्या.
मृत्युशय्येवर असताना सुद्धा रुग्ण सेवा करणाऱ्या अशा ऋषितुल्य डॉक्टरवर टीका करताना मृत व्यक्तीच्या पार्थिवाला प्रेत म्हणताना आपल्याला जरा सुद्धा लाज वाटली नाही?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 05/19/2021 - 08:58
नवीन
की झालं, काहीही बरळायला मोकळे असला काहींचा समज दिसतोय
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 05/19/2021 - 08:59
नवीन
सहमत आहे.
मृत व्यक्तीसोबत प्रत्येक बाबत सहमत व्हावे असे नसले तरी "त्यांनी छद्मविज्ञान पसरवले" इतक्या वरुनच त्यांचे त्यांच्या क्षेत्रातले यश मोजणे पटले नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 05/19/2021 - 09:47
नवीन
डॉ. अग्रवाल यांच्याबद्दल खूप चांगले वाचले आहे. परंतु मोदीद्वेषाने भान हरपलेले काही नंबरी निरंजन कायम आपली मळमळ ओकत असतात.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 05/19/2021 - 11:51
नवीन
नगरीनिरंजनचे प्रतिसाद कॉंग्रेसच्या "टुल किट"चा एक भाग असावा.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 05/20/2021 - 04:48
नवीन
फेक बातमी आहे.
काँग्रेसचे सेंट्रल व्हीस्ता वरचे डॉक्युमेंट घेऊन उर्वरित टूलकिट फेक तयार केले आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/20/2021 - 06:00
नवीन
ही पश्चात बुद्धी आहे. आपले कारस्थान उघडकीस आल्याने कॉंग्रेसने सारवासारव आणि कांगावा सुरू केलाय. यालाच चोराच्या उलट्या बोंबा असे संबोधले जाते.
कॉंग्रेसनेच टुलकिट तयार केलंय. टुलकिट लेखिका म्हणून सौम्या वर्मा या कॉंग्रेस कार्यकर्तीचं नाव बाहेर येताच, तिने तातडीने स्वत:चे ट्विटर खाते डीलीट करून टाकले. टुलकिटची सर्व ४ पाने खोटी आहेत असे सांगणाऱ्या कॉंग्रेसने आज त्यातील १ पान आपणच तयार केल्याचे मान्य केलंय. राहुल गांधींनी टुलकिट मधील सूचनांचं १५ दिवस आधीच पालन करायला सुरूवात करून कोविडचा उल्लेख मोविड, कोरोनाचा उल्लेख इंडियन व्हायरस असा ट्विट्स मध्ये केलेला आहे. टुलकिट मध्ये जे लिहिलंय त्याचं तंतोतंत पालन मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते करीत आहेत.
चीनविरूद्ध डोकलाममध्ये भारतीय सैन्य १०० मीटर अंतरावर युद्धाच्या पवित्र्यात उभे असताना चोरून चीनच्या राजदूताला भेटणारे राहुल आणि देशहिताची कधीही पर्वा न करणाऱ्या कॉंग्रेससाठी, असले टुलकिट तयार करून जगभर मोदी व भारताची योजनाबद्ध बदनामी करणे ही अत्यंत किरकोळ गोष्ट आहे.
Coronavirus | It’s MOVID pandemic, says Congress
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 05/19/2021 - 11:20
नवीन
धन्यवाद!
खरंच बरं वाटतं घुसनट बाहेर पडली की.
लोक मरताहेत खूप. बातम्या येतात आजूबाजूच्या.
कोणी व्हेंटिलेटरवर आहे; कोणी ऑक्सिजनवर आहे.
कोणी गेलाच.
लस मिळत नाहीये. मित्रांचे म्हातारे आईबाप चकरा मारताहेत लशीसाठी.
स्वतः मित्र जवळपासच्या गावोगावी हिंडून पाहताहेत लस मिळतेय का.
मेडिकल क्षेत्रातले मित्र थकलेत; पण अजून शेवट दॄष्टीपथातही नाहीय.
घुसमट म्हणा, मळमळ म्हणा, ती आहेच.
आणि बाहेर पडणारच. त्याला काही ईलाज नाही.
नुसतं मुक्या जनावरासारखं नाही ना बघता येत.
मिपावर काढता येते म्हणून मिपाचे आभार.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 05/19/2021 - 11:23
नवीन
पडली ना सगळी मळमळ बाहेर. मग झोपा आता.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 05/19/2021 - 11:37
नवीन
बरंय तुम्हाला काही घुसमट, मळमळ वगैरेचा प्रॉब्लेम नाही.
सदासुखी. असेच सुखी राहा.
- Log in or register to post comments
प
पिनाक
गुरुवार, 05/20/2021 - 20:58
नवीन
हे सगळे प्रॉब्लेम्स: लस नसणे, औषधे नसणे, लोक मृत्यू पावणे इत्यादी फक्त नवीन रिझर्वेशन वाल्यानाच आहेत अशी कल्पना आहे का? पारंपरिक रिझर्वेशन वाले याने त्रस्त नाहीत असं वाटतंय का? उगीच वड्याचं तेल वांग्यावर काढण्यात काय अर्थ आहे? सगळे नवीन रिझर्वेशन वाले डॉक्टर घेऊन व्हायरस आठवड्याभरात कंट्रोल मध्ये येणार असेल तर देऊया सगळ्या पारंपरिक रिझर्वेशन वाल्याना नारळ!
- Log in or register to post comments
स
सुक्या
गुरुवार, 05/20/2021 - 22:50
नवीन
एवढं हायपर व्हायची गरज नाहीये. लोकांच्या निष्काळजी पणा मुळे ही दुसरी लाट आली आहे. लाख गोष्टी असतील परंतु गर्दी झाली की कोरोना पसरतो हे माहीत असुनही लोक सभा / लग्ने / धार्मीक कार्यक्रम याला जातात कसे? आपल्या जीवाला धोका आहे हे माहीत असुनही मास्क न वापरणे / साधे स्वच्छतेचे नियम न पाळणे अजुनही चालु आहे.
भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. लस उत्पादन एका रात्रीत वाढवता येत नाही. जागतीक आरोग्य संघटनेशी झालेल्या करारामुळे बाहेर देशांना लस पुरवावी लागते. हे काही नवीन नाही. आता जे लोक आजारी आहेत त्यांना बरे करणे हे एकच ध्येय आहे.
मित्रांना गावोगावी हिंडू देउ नका. त्याने आजार पसरण्याचीच जास्त शक्यता आहे.
मेडिकल क्षेत्रातले मित्र आहेत त्यांना आवश्यक मदत करा . . ते रात्रंदिवस काम करत आहेत. हे ही दिवस जातील .. प्रत्येक वाईट गोष्टीचा शेवट होतो .. धीर धरा . . .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 05/19/2021 - 16:50
नवीन
+ १
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
गुरुवार, 05/20/2021 - 00:41
नवीन
असे भासवायचे हा टुलकीटचा भाग आहे याची खात्री पटली. आणि हे कौन्ग्रेस्चे कारस्थान आहे याचा पुरावा मिळाला.
लस येण्याआधी जे लोक मरण पावले त्याना मोदि कसे काय जबाबदार?लस आल्यावर प्राधान्याने ती वैद्यकीय सेवेतील लोकाना दिली गेली होती. हा आजारच सन्सर्ग हवेतुन पसरवतो आहे त्यामुळे वैद्यकिय व्यवसायातील व्यक्ती त्यात सापडत आहेत.
आत्ता कौन्ग्रेस् सत्तेवर नाही म्हणुन भारतियान्चे नशीब जोरावर आहे कारण पहिली लाट खुप चान्गली थोपवली गेली. दुसर्या लाटेपासुन बचाव होतो आहे.आता रुग्ण्सन्ख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे.
अश्या प्रतिक्रिया वाचल्या की मोदीना पाठीम्बा अजुन ठामपणे द्यावासा वाटतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/20/2021 - 12:13
नवीन
https://m.lokmat.com/national/video-show-must-go-dr-kk-aggarwal-last-video-death-free-opd-will-continue-a607/
केवळ मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला म्हणून डॉ. अग्रवालांसारख्या व्रतस्थ समाजसेवकांवर शिंतोडे उडविणाऱ्या काही मूर्ख बरळवीरांना वरील बातमी वाचून उपरती होईल अशी आशा आहे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »