चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.
🗣 चर्चा
(304)
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/29/2021 - 05:49
नवीन
अजिबात करू नये...
कारण, इथल्या आमदार, खासदार यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे.. कोटी कोटी रुपयांचे बंगले उभे करायला पैसा आहे, पण ज्या जनतेने ह्यांना निवडून दिले आहे, त्या जनतेच्या आरोग्याचा प्रश्र्न सोडवायला, ह्या जनतेच्या सेवकांकडे पैसे नाहीत....
स्वतःचे भत्ते आणि पगार-निवृत्तीवेतन वाढवायला, हे सगळे जनतेचे सेवक एकत्र येतात ....
भारतातील, कुठलाही जनतेचा सेवक, अगदी महानगर पालिकेतला नगरसेवक ते आमदार-खासदार, चारचाकी शिवाय फिरत नाही... इतका पैसा यांच्याकडे कुठून येतो?
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 04/29/2021 - 06:51
नवीन
लस घ्या!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 04/29/2021 - 06:55
नवीन
इतका पैसा यांच्याकडे कुठून येतो?
त्यांच्याकडे पैसा खिडकीतून दारातून छपरातून जमिनीतून चारी बाजूनी येतो
अन्यथा निवडणुकीच्या अगोदर दारोदार मतांची भीक कशाला मागतील ते
लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा पैसे घेत असल्याचे ( म्हणजे मुळात ज्यासाठी त्यांना निवडून दिले त्यासाठीच) प्रकरण २००५ मध्ये बाहेर आले होते.
आणि यात सर्व पक्षांचे खासदार मिळून हे काम करत असल्याचे दिसून आले होते.
बाकी आमदार खासदारांचा मतदारसंघ विकास निधी, विविध कंत्राटे, महा मंडळे, पतपेढ्या, आपली घरे दुरुस्त करण्यासाठी मिळणारा निधी, विविध स्मारके बांधण्यासाठी मंजूर झालेला निधी अशा अनेक वाटांनी पैसे येतो.
एकदाच नगरसेवक म्हणून निवडून या, तीन पिढ्यांचे कल्याण होईल, आमदार झालात तर पाच आणि खासदार झालात तर सात पिढ्यांचे कल्याण होईल.
आणि एखाद्या पक्षाचे अध्यक्ष होऊन सरकारवर रिमोट कंट्रोल ठेवलात तर अर्ध्या पृथ्वीचे राज्य आपले होते.
आहात कुठे?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/29/2021 - 07:14
नवीन
जनतेची सेवा करा
- Log in or register to post comments
स
सॅगी
गुरुवार, 04/29/2021 - 07:32
नवीन
आजचा अग्रलेख जरा वाचनीय आहे असे वाटते.
Editorial
त्याच वेळेस, मुखपत्राच्या अ(ह)ग्रलेखाची बातमी वेबसाईटच्या फ्रंट पेजवर देण्याची परंपरा मात्र आजही कसोशीने पाळलीच. :)
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 04/29/2021 - 07:42
नवीन
आपल्याला सरकारला( कोणत्याही पक्षाचे) मदत करता येत नसेल तर करू नका पण दुसऱ्याचे घर जळत असेल त्यावर पाणी टाकता येत नसेल तर निदान त्यावर टाळ्या पिटू नये एवढे व्यवधान असायला हवे होते.
डॉकटर साहेब जाऊद्या कशाला आपला वेळ घालवता
ज्यांचा "एकपक्ष एक व्यक्ती द्वेष" हा एक कलमी कार्यक्रम आहे आणि ज्यांना लासोत्सव टाळ्या थाळ्या उत्सव हे प्रतीकात्मक वैगरे असते हे साधे समजत नसेल तर आशय विचहरसरणी पुढे काय डोकं आपटत राहणार... ?
सकारात्मक टीका आणि केवळ टीका यात शिकलेल्यांना समजत नाही ( कि मुद्दामून समजावून घ्याचे नाही )
सकाळ मध्ये अधून मधून "ब्रिटिश नंदी " नामक एक प्राणी लेखांचा रतीब टाकतो .. सतत विरोधीच सूर ...तसेच हे
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/29/2021 - 07:51
नवीन
अशा लोकांचा उद्देश मोदी समर्थकांना (त्यांच्या भाषेत भक्तांना) प्रोव्होक करणे हा असतो. स्वतः मोदी गेली जवळपास २० वर्षे अगदी जहरी टीका करणार्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत. तसे असेल तर आपण पण असल्या लोकांच्या खोडसाळ प्रतिसादांकडे दुर्लक्ष करायला हवे- तसे करणे आपल्याला जमायला हवे. माझ्या पूर्वजन्मी हा प्रकार मला अजिबात जमायचा नाही. आता ९९% जमायला लागला आहे. ९९ वरून १०० वर नेणे हे उद्दिष्ट आहे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 04/29/2021 - 10:53
नवीन
१०० टक्केसाठी शुभेच्छा.
🙏
फक्त सत्याचा विपर्यास होत असेल तर फक्त सत्य सर्वांसाठी टेबलावर मांडून बाजूला व्हायचे. हे करत असताना असत्य मांडणार्या व्यक्तिची छाया आपल्या मनावर पडू द्यायची नाही म्हणजे झालं
😀
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 04/29/2021 - 13:42
नवीन
आणि गम्मत म्हणजे अशा लोकांना हे हि समजत नाही कि सगळे जण काही मोदी भक्त नसतात... आहे त्या परिस्थितीत आणि मागील परिस्थितीतील आढावा घेऊन, सारासार विचार करून मग "हा आज ह्यांना संधी द्या" असे म्हणतात
दुसरी गम्मत म्हणजे लोकशाही मारली जातीय वैग्रे ढोल बडवणाऱ्यांना हे हि समजत नाही कि सुधृद लोकशाही मध्ये निदान २ सबळ पक्ष तरी असावेत देशाच्या अस्त्वित्वात ( ४७ नंतर) एकाच पक्षाला सतत सत्ता दिलीच पाहिजे हि यांची लोकशाही ची व्याख्या
या बरोबर नाण्याची दुसरी बाजू अशी कि जे लोक फक्त " मी मोदी आहेत म्हणून भाजपला मत देतो " ( परेश रावळ, मिथुन इत्यादी ) या पेक्षा मला अमुक अमुक पक्षाची धोरणे आवडतात म्हणून मी त्या कडे झुकतो असा चौफेर विचार करावा
आणि इतिहास बघितलं तर भाजप आणि त्यामागील संघटनेने एका पाठोपाठ एक नेते दिलेलं आहेत .. एकचालक असे वर वर दिसत असले तरी दशकेनू दशके हेच दिसून येते कि एकचालक हा / हि बदलत असतो असते
शामाप्रसाद, वाजपेयी, महाजन , अडवाणी , मोदी, पर्रीकर, गडकरी , सुषमा स्वराज .. आणि दुसरी कडे काय
चाचा , इंदुरानी, एक्षिडेन्टल पी एम आणि आता भोळा भाबडा राजकुमार ... ( मग भले थरूर असोत नाही तर सिब्बल असोत सगळे मागच्या बाकावर )
राज्य पातळीवर काका, मुलगी, पुतण्या , नातू क्रमांक . १ नातू क्रमांक २ ( मग भले जयनत राव असोत नाही तर आबा असोत सगळे मागच्या बाकावर) आणि सोबत "जितुद्दीन घरचा आहेर वाले"
किंवा आदरणीय वाघ साहेब गेल्यावर , वाघाचे फोटो काढणारे आणि आता चिऊराजे ( सोबत वाचाल संजय उवाच )
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/29/2021 - 14:01
नवीन
खरी गंमत म्हणजे सगळे मोदी समर्थक भक्त नसतात हे त्यांना समजत नाही ही नाहीच. त्यापेक्षाही मोठी गंमत आहे. आणि ती गंमत म्हणजे ते स्वतः फार मोठे मोदी भक्त असतात आणि त्याचा पत्ताही त्यांना नसतो.
एन.डी.टी.व्ही वगैरे पुरोगामी वाहिन्यांवरील मंडळी किंवा राजदीप सरदेसाई, बरखा दत्त वगैरे लोक किंवा त्यांना पत्रकारितेतील आदर्श मानणारे सामान्य लोक सांगली जिल्ह्यातील गैबी कुडुत्री या गावापासून मंदाकिनी आकाशगंगेच्या सगळ्यात दूरच्या टोकाच्या कोणत्यातरी ग्रहावर काही झाले तरी त्यामागे मोदी सत्तेत आल्यापासून वाढलेली तथाकथित असहिष्णुता कशी जबाबदार आहे हा शोध लावू पाहतात. मोदींवर टीका करणार्या कोणावरही (गिकुकाका किंवा अन्य कोणी) त्यांनी काही लिहिलेले आपल्याला आवडले नाही म्हणून आपण काही भाष्य केले तर ते मोदी विरोधक आहेत म्हणून आपण टीका करत आहोत असा शोध त्यांना लागतो. याकूब मेमनला फासावर लटकवल्यानंतर याच गिकुंनी टायगर के अब्बा (श्यामची आई या धर्तीवर) असा शोभावा असा अग्रलेख पाडला होता त्यावरही आपण टीका केल्यास 'का-- कुबेर मोदींच्या विरोधात लिहितात म्हणून आवडेनासे झाले वाटतं' हे मी पण माझ्याच नात्यातील एका व्यक्तीकडून ऐकले आहे. आणखी एक गोष्ट कधीतरी लक्षात आलीच असेल. हे मोदीविरोधक- 'काय म्हणतात तुमचे मोदी' हा प्रश्न कधी भेटल्यावर अनेकदा (माझ्या बाबतीत प्रत्येक वेळा) विचारतात. या लोकांचे सगळे विश्व मोदी मोदी या एका तार्याभोवती फिरत असते. खरडफळ्यावर एवढ्यात चक्कर मारली नसेल तर जरूर जाऊन बघा. पोलिटिकली करेक्ट राहायला म्हणून ही मंडळी मोदी हे नाव लिहिणार नाहीत पण ते नक्की कोणाविषयी बोलत आहेत हे समजायला आईनस्टाईनची बुध्दीमत्ता हवी असे अजिबात नाही. मोदी काय बोलले, मोदी कुठे गेले, मोदींनी काय केले, मोदींनी कुठचा कोट घातला, मोदींनी दाढी का केली नाही, मोदींच्या दाढीची लांबी किती.... सतत मोदी, मोदी, मोदी, मोदी.....
असे म्हणतात कंस कृष्णाची द्वेषभक्ती करायचा त्याप्रमाणे हे लोक मोदींची द्वेषभक्ती करत असतात. आणि गंमत म्हणजे या गोष्टीचा पत्ताही त्यांना नसतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/29/2021 - 14:58
नवीन
एकदम चपखल प्रतिसाद
- Log in or register to post comments
स
स्वलिखित
गुरुवार, 04/29/2021 - 08:07
नवीन
आमच्या इकडे (भूम परांडा वाशी - जिल्हा उस्मानाबाद ) निवडून आलेल्या शिवसेना आमदार तानाजी सावंत नामक व्यक्तीने बार्शी - जिल्हा सोलापूर येथे कोव्हिड सेंटर उभारण्याचे काम हाती घेतले आहे .
आमच्या इकडे त्यांनी लाकडाचे जम्बो मिल सुरु करावी का असा प्रस्ताव आहे ,
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/29/2021 - 12:34
नवीन
आज महाराष्ट्रात तब्बल ७९५ रुग्ण दगावलेत. आणि हा नॉटी संपादक काय बरळतोय, तर
--
--
लाजा कश्या वाटत नाहीत यांना, असली निर्लज्ज विधाने करताना ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/29/2021 - 13:09
नवीन
तो पराकोटीचा निर्लज्ज व मूर्ख आहेच (त्यापेक्षाही जास्त म्हणजे नॉटीं आहे), परंतु त्याचे प्रत्येक बरळवाक्य छापून, वारंवार दाखवून प्रसिद्धी देणाऱ्या इतर माध्यमांना का शरम वाटत नाही? जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टॉयलेट पेपरमधून याने गरळ ओकलेले प्रत्येक वाक्य मटा, लोकसत्ता, लोकमत का बेशरमपणे प्रसिद्ध करतात? यांच्या वृत्तपत्रात छापलेल्याला कधी टॉयलेट पेपरमधून प्रसिद्धी मिळते का?
- Log in or register to post comments
स
सुक्या
गुरुवार, 04/29/2021 - 19:19
नवीन
संजय राउत हे "सामना" चे कार्यकारी संपादक आहेत. मालकी हक्क / संपादक पद हे ठाकरे कुटंबीयांकडे आहे. संजय राउतांचा पगार हा ठाकरे कुटंबीयांकडुन येतो. या नात्याने मालकाची हांजी हांजी करणे / खुशामत करणे हे कार्यकारी संपादकांना करावे लागते.
बाकी संजय राउत आणी लाज या परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे जास्त त्रागा करुन घेउ नका :-)
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
गुरुवार, 04/29/2021 - 12:48
नवीन
बिहार मध्ये पण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये निवडणुका झालेल्या आहेत. त्यावेळी सुद्धा पंतप्रधानांनी लाखोंच्या सभा घेतल्या होत्या. परंतु त्यावेळी करोना च्या केसेस एवढ्या वाढलेल्या नव्हत्या.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/29/2021 - 13:25
नवीन
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला तेव्हा सुद्धा कोरोनाचा प्रसार बराच आटोक्यात होता.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 04/29/2021 - 15:19
नवीन
त्यावेळच्या प्रचारसभात पंतप्रधान मोदी मास्क लावून होते. म्हणून करोना पसरला नाही. बंगालच्या निवडणुकांच्या सभातून एप्रिलच्या महिन्यात त्यांनी मास्क लावले नाहीत. भारतात करोनाचा जोरदार प्रादुर्भाव होण्यास हे पुरेसे होते.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/29/2021 - 14:35
नवीन
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना एम्समधून घरी सोडण्यात आले आहे.
https://maharashtratimes.com/india-news/covid-19-former-pm-manmohan-singh-discharged-from-aiims-trauma-centre/articleshow/82309853.cms
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 04/29/2021 - 17:51
नवीन
श्रीगुरुजी आणि प्रदीप,
कुरेशी यांच्या ट्विट मधले club curb अर्थाने वाचले गेले आणि चूक झाली. ते काहीतरी वेगळे सांगत होते. त्यामुळे त्या भागाकडे दुर्लक्ष करावे.
Club करण्याबाबत अर्ज तृणमूल ने केला होता असे वाचले आहे.
क्लब करण्यामागे काय लॉजिक आहे ? कोणी सांगू शकेल ?
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 04/29/2021 - 18:02
नवीन
१. फेज क्लब करून मनुष्यबळ वाचवता आले असते, असे कुरेशी यांचे म्हणणे आहे. त्याचा कोव्हिडशी संबंध नाही.
२. कुरेशी यांच्या म्हणण्याप्रमाणे केंद्र सरकार निवडणूक पोस्टपोन करू शकते. EC च्या कोर्टाबाहेर चेंडू गेला होता, कारण टर्मच्या ६ महिन्यांपेक्षा जास्त पोस्टपोन करणे EC च्या कक्षेत नाही.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 04/29/2021 - 18:52
नवीन
मला प्रश्न पडलाय की,
१) बंगालमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर त्यामुळे महाराष्ट्रातील कोविड प्रसाराला आळा बसला असता का?
२) जर निवडणुकांमुळे कोविडचा प्रसार होत असेल तर महाराष्ट्रात पंढरपूरातच कोविडने थैमान घातले पाहिजे होते. बाकी महाराष्ट्राची परिस्थिती पंढरपूर पेक्षा चांगली असायला पाहिजे होती. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे?
- Log in or register to post comments
य
यश राज
गुरुवार, 04/29/2021 - 19:12
नवीन
अगदी हेच प्रश्न मला ही पडलेत.
त्याच बरोबर
३. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक व्हायला कुंभमेळा पण झाला नाही.
४. पंढरपुरात मोदी तर आले नव्हते मग तेथे कोरोना कसा वाढला?
५. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावूनही अजूनही सगळ्यात जास्त cases महाराष्ट्रातच का वाढताहेत??
ई. ई ..
अजूनही बरेच प्रश्न आहेत. तूर्तास इतकेच
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
गुरुवार, 04/29/2021 - 19:15
नवीन
महाराष्ट्रात खुद्द WHO ला सल्ला देणारे प्रगतीशील सरकार आहे
म्हणजेच महाराष्ट्रात सगळे आलबेल आहे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 04/30/2021 - 03:27
नवीन
लवकरच, शाकहारी कोंबडी आणि शाकाहारी अंडी, मिळायला सुरूवात देखील होऊ शकते ...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/29/2021 - 19:17
नवीन
कोरोना नियंत्रणात आणण्याच्या महाराष्ट्राच्या प्रारूपाचे जगाने अनुकरण केले पाहिजे.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/30/2021 - 05:05
नवीन
६. केरळमध्ये लोकसंख्या बंगालच्या ३५% पेक्षा थोडी जास्त आहे तरीही दररोजचे कोरोनाचे रूग्ण बंगालच्या दुप्पट येत आहेत. काल केरळमध्ये ३८,६०७ तर बंगालमध्ये १७,४०३ नवे रूग्ण होते. केरळमध्ये लोकसंख्येची घनता खूप असली तरी पूर्ण राज्यभर लोकसंख्या पसरलेली आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे परिसर यात राज्याची जवळपास ३०% लोकसंख्या आहे असे केरळमध्ये नाही. केरळमधील निवडणुकांमध्ये लाखांच्या सभा होत नाहीत कारण राज्याचा भूगोल त्याला साजेसा नाही आणि राज्याची लोकसंख्या अशी पसरलेली आहे की २०११ च्या जनगणनेप्रमाणे २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले एकही शहर राज्यात नाही. केरळमध्ये कुंभमेळाही नव्हता. मग केरळमध्ये कोरोना इतका का पसरला असावा?
७. मोदींनी बंगालमध्ये लाखांच्या सभा घेतल्या म्हणून कोरोना पसरला असे म्हणणारे महानुभाव (इथेही तसे आहेतच) केरळमध्ये इतका कोरोना बंगालपेक्षा दुप्पट कसा पसरला याविषयी काहीही बोलताना का आढळत नसावेत? मोदींनी बंगालमध्ये सभा घेतल्या तशा ममतांनीही घेतल्या. त्या सभांनाही अशीच गर्दी असायची. मग कोरोना पसरवण्यात ममतांचा हात या लोकांना का दिसत नसावा?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 04/30/2021 - 05:34
नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 04/30/2021 - 05:57
नवीन
फर्स्ट वेव्ह च्या शेवटी सुद्धा क्वारंताइन आणि आयसोलेशन करून केरळची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती आणि तरीही केरळ सगळ्यात जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यांपैकीनेक झाले होते. (दुसरे.)
ICMR च्या रिपोर्टनुसार देशात २१% लोकांमध्ये अँटी बॉडीज निर्माण झाल्या होत्या, तर केरळ मध्ये ११% लोकांमध्येच. केरळमध्ये ३० पैकी ५ क्लस्टर्स मध्ये विषाणूचा शून्य संपर्क आलेला. (राष्ट्रीय सरासरी- २१%, केरळ - ११%)
त्यामुळे बाकी देशाचा ग्राफ चढता होता तेव्हा केरळचा कमी स्टीप होता, नंतर देशाच्या ग्राफ मध्ये उतार आल्यावर केरळचा ग्राफ वाढला.
https://m.timesofindia.com/india/covid-cases-why-kerala-may-be-a-victim-of-its-own-success/amp_articleshow/80858288.cms
हे उत्तर सेकंड वेव्ह साठी कितपत खरे आहे कल्पना नाही.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/30/2021 - 07:03
नवीन
जे काही कारण असेल ते. नक्की कारण काय- अॅन्टीबॉडी निर्माण न होणे, त्या निर्माण का झाल्या नाहीत वगैरे मला माहित नाहीत. मेडिकल क्षेत्रातील मला काहीही कळत नाही त्यामुळे त्यावर काही लिहित नाही.
मुद्दा एवढाच की इथलेच काही महानुभाव मोदींनी लाखांच्या सभा बंगालमध्ये घेतल्या म्हणून कोरोना पसरला वगैरे बोलत आहेत ते केरळमध्ये अशा सभा किंवा कुंभमेळा यापैकी काहीही न होता इतके आकडे का वाढले याविषयी बोलत नाहीत. मुंबईत दिवसाला जास्तीतजास्त ८ हजारच्या आसपास नवे रूग्ण आल्याची बातमी बघितली आहे. पण तोच आकडा दिल्लीत २२-२४ हजार हा पण बघितला आहे. मग या वाढलेल्या आकड्यांसाठी हेच महानुभाव दिल्लीतील तथाकथित शेतकरी आंदोलनात झालेल्या गर्दीला दोष देताना दिसत नाहीत.
तेव्हा या मंडळींचा अजेंडा उघड आहे. काहीही झाले तरी त्यात मोदींना गोवायचे. कुठल्याही गोष्टीचे खापर मोदींवर फोडायचे. यांचा दिवस मोदींना शिव्या दिल्याशिवाय सुरू होत नाही आणि संपतही नाही असे नेहमी वाटते. सतत या लोकांचा मोदी मोदी हा जप चालू असतो आणि हेच लोक इतरांना भक्त म्हणतात.
आहे की नाही मज्जा?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 04/30/2021 - 07:09
नवीन
वैञ्कीय क्षेत्रातले मला तुम्हाला आणि मोदिनां सुद्धा काही कळत नाही. जास्त गर्दी, एकाच ठिकाणी हजारो आणि लाखो लोकांनी जमू नये
आणि मास्क वापरावा असा सल्ला वैद्यकशास्त्राने दिला तर तो पाळावा राजकारण्यांनी पाळावा अशी अपेक्षा असते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 04/30/2021 - 10:32
नवीन
अरूण जेटली मैदान चालते
शेषराव वानखेडे मैदान पण चालते
पण
नरेंद्र मोदी मैदान चालत नाही
डब्बल ढोलकी वाले, असेच बोंबलत बसतात...
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 04/30/2021 - 06:11
नवीन
मोदी, ममता, कॉम्युनिस्ट, आणि काँग्रेस सभा घेणारे सगळे दोषी आहेत.
TMC आणि काँग्रेस ने सभा थांबवणार म्हणल्यावर सुद्धा कमाल ५०० लोकांच्या (लहान) सभा घेणार (SOP, सोशल डिस्टनसिंग वैगेरे पाळून) असे भाजप म्हणत होते. चांगली गोष्ट कि, हि सभा मोदींनी नंतर रद्द केली.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/30/2021 - 09:50
नवीन
ज्येष्ठ विधीज्ञ आणि भारत सरकारचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी कोविडमुळे निधन झाले आहे. कोविडमुळे आणखी एक चांगला माणूस गेला. त्यांना श्रध्दांजली.

- Log in or register to post comments
स
सुरिया
Fri, 04/30/2021 - 10:05
नवीन
आजतक चॅनल चा स्टार रिपोर्टर रोहीत सरदना कोरोनाचा बळी.
धडाडीचा आणि हुशार अनुभवी पत्रकार. प्रसन्न व्यक्तिमत्वाचा धनी हरपला.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 04/30/2021 - 12:31
नवीन
आजतक चॅनल चा स्टार रिपोर्टर रोहीत सरदना कोरोनाचा बळी.
त्याला हार्ट अॅटॅक आल्याच बातम्यांमधे आलय.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 04/30/2021 - 14:03
नवीन
कोरोना ज्या सर्व सिस्टिम्स वर हल्ला करतो त्यात हृदय ही सर्वात महत्वाची आहे. Virus हल्ला केल्यावर तो कुठल्या ना कुठल्या सिस्टीम ची नासधूस करतो. सर्वसाधारण पणे फुफ्फुसांवर, पण तसा तो बाकी सिस्टिम्स वर हल्ला करून पण हानी घडवून आणू शकतो. हार्ट अटॅक ने जाणारे कोरोना पेशंट हे कोरोनाचेच बळी आहेत. जर कोरोना झाला नसता तर ते इतक्या वेगवान प्रकारे गेले नसते.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 04/30/2021 - 14:06
नवीन
https://khn.org/news/clots-strokes-and-rashes-is-covid-a-disease-of-the-blood-vessels/
https://elemental.medium.com/coronavirus-may-be-a-blood-vessel-disease-which-explains-everything-2c4032481ab2
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 04/30/2021 - 18:00
नवीन
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांचे पक्षाला आदेश, सीएम फंडासाठी राष्ट्रवादीने पेटारा उघडला!
-----------
"रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांचे पक्षाला आदेश, सीएम फंडासाठी राष्ट्रवादीने पेटारा उघडला! | NCP donate 2 crore rupees to Maharashtra Chief minister relief Fund after Sharad Pawars advice said Jayant Patil" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/ncp-donate-2-crore-rupees-to-maharashtra-chief-minister-relief-fund-after-sharad-pawars-advice-said-jayant-patil-447835.html/amp?amp_gsa=1&_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16197975921622&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&share=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fmumbai%2Fncp-donate-2-crore-rupees-to-maharashtra-chief-minister-relief-fund-after-sharad-pawars-advice-said-jayant-patil-447835.html
---------------
असंच दातृत्व पाहिजे.....
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Fri, 04/30/2021 - 18:27
नवीन
100 करोड चोरून २ कोटी परत..
हे म्हणजे पूर्ण कपडे चोरून लांगोटी परत देणे..
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Fri, 04/30/2021 - 18:38
नवीन
एका रम्य पहाटे फडणवीसांनी हा लंगोट घातला होता.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Sat, 05/01/2021 - 07:59
नवीन
तोच घालतात....
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/30/2021 - 19:47
नवीन
या २ कोटींपैकी १ कोटी आमदारांच्या मासिक वेतनातून (म्हणजे जनतेच्याच पैशातून) येणार आहेत व उर्वरीत १ कोटी पक्षाच्या निधीतून येणार आहेत.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 04/30/2021 - 19:51
नवीन
आमदारांना मासिक वेतन गेल्याबद्दल दुःख नक्कीच होणार नाही याबद्दल खात्री आहे मला.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Fri, 04/30/2021 - 18:14
नवीन
https://www.google.com/amp/s/m.saamana.com/article/ex-professor-of-jnu-chamanlal-refused-to-take-vaccine-objected-photo-of-modi-on-vaccination-certificate/362159/amp
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 04/30/2021 - 18:24
नवीन
काय बोलावं ते सुचेना
- Log in or register to post comments
स
सचिन धुमाळ
Fri, 04/30/2021 - 18:41
नवीन
- Log in or register to post comments
स
सचिन धुमाळ
Fri, 04/30/2021 - 18:42
नवीन
- Log in or register to post comments
स
सचिन धुमाळ
Fri, 04/30/2021 - 18:42
नवीन
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Fri, 04/30/2021 - 19:01
नवीन
जौद्या सचिनजी!
तुम्हाला असं म्हणायचं आहे का?
गुरुजी : एक केंद्रबिंदू धरून वर्तुळ काढा.
विद्यार्थी आकृती काढतो.
गुरुजी: हे कसलं वेडंवाकडं वर्तुळ काढलंयस ?
विद्यार्थी: केंद्रानं साथ दिली नाही गुरुजी!
वाटसपवर सगळे वाचतात! :)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »