Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)

श
श्रीगुरुजी
Tue, 04/27/2021 - 13:54
🗣 304 प्रतिसाद
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता. रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 79307 views

🗣 चर्चा (304)
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 10:34 नवीन
आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन शोधण्यासाठी केस ? त्याबव्यक्तीने ट्विट केलेले त्याला १०० लाइक्स सुद्धा नाहीत. मग इतके काय आहे केस करण्यासारखे ? डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नाही इतक्या कारणावरून केस करणे निर्दयी पणा आहे. कोव्हिड पेशंटलाच ऑक्सिजन लागतो असे नसते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 10:39 नवीन
सत्य काय? ते समोर येईलच...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 10:44 नवीन
आॅक्सीजन लागणार असेल त्याशिवाय का कुणी ट्वीट करेल?? योगीच्या राज्यातून सत्य बाहेर येईल असं समजणे म्हणजे पी एम केअर चा हिशेब मिळेल असं समजण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 11:00 नवीन
म्हणजे,तुमचा न्यायाधीशांवर विश्र्वास नाही आहे का? ------------- खालील बातमी वाचलीत तर उत्तम ...... नेहरू आणि न्यायमूर्ती बोस https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/chatusutra-news/loksatta-chatusutra-article-on-nehru-and-justice-vivian-bose-abn-97-2455441/lite/
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 11:13 नवीन
या घडीला २६ लाइक्स आहेत. काडीचाही रीच नाही आहे ह्या व्यक्तीला, कि अटक व्हावी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 11:15 नवीन
केस* अटक नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 11:40 नवीन
म्हणजेच, आता जे काही पुढे घडेल ते, कायदेशीर मार्गानेच घडेल ....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 13:37 नवीन
आता झी न्यूज (हिंदी) या वाहिनीवर याच विषयावर चर्चा सुरू आहे. प्रत्यक्ष घटना बरीच वेगळी आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 13:38 नवीन
आता झी न्यूज (हिंदी) या वाहिनीवर याच विषयावर चर्चा सुरू आहे. प्रत्यक्ष घटना बरीच वेगळी आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 14:36 नवीन
उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर पोस्ट केल्याबद्दल पहिली केस रजिस्टर. शशांक यादव नावाच्या मुलाने आजोबांसाठी ऑक्सिजन पाहिजे असे ट्विट केले, ते द वायर च्या पत्रकारांनी स्मृती इराणी यांना कळवले, कारण मुलगा अमेठीचा होता, स्मृती इराणींनी दखल घेऊन प्रयत्न केले. पुढे समजले, कि हे आजोबा रात्री हार्ट अटॅक येऊन गेले. अमेठी पोलिसांनी "आजोबांना कोव्हिड झाला नव्हता आणि डॉक्टरांनी ऑक्सिजन प्रिस्क्राईब केला नव्हता" या कारणासाठी शशांक यादव वर केस केली. शशांक यादवने ऑक्सिजनसाठी ट्विट केल्यानंतर स्मृती इराणींंनी त्याला तीन वेळा फोन केला. पण त्याचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना त्याला मदत करण्यास सांगितले. नंतर पोलीसांनी फोन क्रमांकावरून पत्ता शोधून ऑक्सिजन सिलींडर बरोबर घेऊन त्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा ते घर बंद होते. काही वेळाने त्याचा फोन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तो कोठे आहे ते शोधले, तेव्हा तो वेगळ्याच ठिकाणी झोपलेला होता. नंतर समजले की मृत व्यक्ती ८८ वर्षांचे आजोबा असून काल रात्रीच ते ह्रुदयविकाराने गेले व त्यांना कोरोना झालेला नव्हता व ऑक्सिजन सुद्धा नको होता. तसेच ते त्याचे आजोबा नसून कोणत्या तरी मित्राचे आजोबा होते. हा सर्व प्रकार एकंदरीत शशांक यादवचा खोडसाळपणा दिसतो. स्मृती इराणी व पोलिसांनी धावपळ करून आपले कर्तव्य योग्यपणे पार पाडलेले दिसते. त्यामुळे आधीच प्रचंड काम असणाऱ्यांंना खोटी माहिती देऊन विनाकारण धावपळ करणाऱ्या विरूद्ध तक्रार दाखल करणे योग्य आहे. ऑक्सिजन, रेमेडिसिवर मागितले म्हणून उत्तर प्रदेशात अनेकांविरूद्ध तक्रार दाखल झाली आहे असा आरोप आआपच्या मुंबईतील प्रतिनिधी प्रीति मेनन यांनी केला. परंतु अनेकदा विचारूनही तक्रार झालेल्याचे एकही नाव त्यांना सांगता आले नाही. दिल्लीतील यमुना विहार भागातील एका रूग्णालयाच्या डॉक्टरांनी एक चित्रफीत ट्विटरवर टाकली आहे. ऑक्सिजन सिलींडर मागितल्यानंतर दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली व ऑक्सिजन हवा असल्यास स्वतः जाऊन टँकर घेऊन या असा सल्लाही दिला, असे ते सांगतात. ऑक्सिजन अभावी आमच्या नातेवाईकाचा मृत्यु झाला असे सांगत एकाच मृताचा फोटो घेऊन वेगवेगळ्या रूग्णालयाबाहेर २० हून अधिक जण बसले आहेत, असे चर्चेत सांगितले गेले. एकंदरीत हा सुद्धा खोडसाळपणा वाटतो. कोरोना संसर्ग हाताळण्यात केंद्र व सर्व राज्य सरकारे कमी पडली याविषयी दुमत नाही. परंतु तथाकथित शेतकरी आंदोलनाप्रमाणे कोरोनासंदर्भातही एक योजनाबद्ध प्रपोगंडा सुरू झाला आहे अशी शंका येत आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 15:23 नवीन
अमेठी पोलिसांचे चलचित्र स्टेटमेंट पाहिले, शशांक हा व्यक्ती खोडसाळ होता पटले. पोलीस आणि स्मृती इराणी यांची तत्परता उठून दिसली.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 15:25 नवीन
दिल्ली अधिकार्याचे खरे असल्यास निषेधार्ह. प्रपोगंडा दोन्ही बाजूने सतत चालूच असतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/28/2021 - 09:18 नवीन
राम राम. गेल्यावर्षभरापासून केंद्रसरकार आपल्या करोना समस्येने ग्रासलेले आहे, करावे तर करावे काय असा प्रश्न मा. मोदी आणि मा. गृहमंत्री या संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाला पडला असेल. फेब्रुवारी २१ मधे एका व्हीडीयो दर्शनात आपण करोनाला कसा प्रतिबंध केला, सर्व जग आपल्यावर कशी टीका करीत होते आपण कशी मात केली वगैरे असा एक स्वतःची पाठ थोपटून घेणारा व्हीडीयो माध्यमात फिरतांना दिसतो लोक त्याला बेफीकिरीचे कॅप्शन जोडून मजा घेत असतात. आपला तो काही उद्देश नाही. आपला प्रश्न इतकाच आहे, की सव तज्ज्ञ म्हणत होते. दुसरी लाट येईल आपण तयारी केली पाहिजे, दुसर्‍या लाटेत आपण सर्व भारतीय पुर आलेल्या भोव-यात सापडलो आहोत. अशा वेळी भारतीय जनतेवर ओढवलेल्या संकटाचे गांभीर्य सरकारला नाही, आता त्यावर बोलून काही उपयोग नाही. सध्याच्या सरकाराविरुद्ध जनरेटा, जनतेचा उठाव, जागृती ही काळात आवश्यक ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमे सरकारच्या बेफिकीर धोरणावर तीव्र टीका करीत आहेत अशावेळी अशा लेखन करणा-या देशांना पत्र लिहून भारतीय कामगिरीबद्द्ल टीका करु नये, वगैरे पत्र लिहिल्या जात आहेत. ऑष्ट्रेलियातील दैनिकातील एका लेखाबद्दल भारतीय दुतावासाने संबंधित सरकारला अशी बदनामी करु नये वगैरे म्हटले आहे. भारतातील मिडिया लाचार आहे, त्यांना ज्याचे खावे त्याचे गुण गावे लागेल परंतु परदेशी माध्यमे कशी ऐकतील. दुसरीकडे ट्वीटरवरी अशा सरकार विरोधी लिहिणा-या खात्यांनाही बंद केले आहे, त्याबद्दल आज अमेरिका सरकारने अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपले पाहिजे असे म्हटले आहे. कोरोनाचे संकट म्हणजे राष्ट्रीयाअणीबाणीच आहे, देश एका मोठ्या संकटातून जात असताना आम्ही मूकपणे पाहू शकत नाही जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही दखल देणार, या संकटाचा मुकाबला करण्यासाठी निश्चित धोरण ठरवावेच लागेल, उच्च न्यायालयांनाही यात महत्वाची जवाबदारी पार पाडावी लागणार आहे. सरकारकडे काही राष्ट्रीय योजना आहे का ? सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे ? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले आहे. सरकार निब्बर आहे, ते काहीही करणार नाही. सरकारचा आता भर लसोत्सवावर आहे, लशीचा तुटवडा, ऑक्सीजन, इंजेक्शन्स, बेड, ही भयंकर परिस्थिती देशभर सर्वत्र आहे, आपापल्या जिल्ह्यात आपण सर्व या भयंकर परिस्थितीचा अनुभव आपण सर्व घेत आहोत. देश आणि राज्य यांच्यात समन्वयाचा अभाव आणि एकमेकांवर टीका करण्यात यात सरकारे जशी आघाडीवर आहेत तसे केंद्रसरकारही तेच करीत आहे, केंद्रसरकारकडून जनेतेने आता फार काहीही अपेक्षा ठेवू नये. करोना संकटावर मोदी सरकारच्या धोरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि नामवंत अर्थतज्ज्ञ यांनी पुन्हा एकदा टीका केलीय.'करोना संकटकाळात लोकांना मदत करण्याऐवजी सरकार हेडलाईन्स मॅनेजमेंट आणि स्वत:चीच पाठ थोपटवून घेण्यात व्यग्र आहे' असा प्रहार प्रभाकर यांनी आपली पत्नीच अर्थमंत्री पदावर असताना मोदी सरकारवर केलाय. एकूणच काय तर आपण आपली सर्वांनी काळजी घ्यावी, येता-जाता साबण-पाण्याने हात धुणे, सॅनिटाइजरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवून संवाद करणे, आपण आपलीच काळजी घेणे हेच आपल्या सर्वांच्या हातात आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 04/28/2021 - 09:33 नवीन
केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे....
तुमच्यासारख्यांनी इतके जंग जंग पछाडूनही जनता केंद्र सरकारविरोधात उठाव करून उभी राहात नाहीये हीच तर खरी पोटदुखी आहे. या सगळ्या समस्या आहेत हे कोणीच नाकारत नाही. पण या समस्या सुध्दा इतर कोणापेक्षाही मोदीच सोडवू शकतील असा विश्वास अजूनही लोकांना आहे त्याविषयी काय म्हणणे आहे? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 09:41 नवीन
लसी बाबतचे निर्णय कसे काय बदलले? कोणे एके काळी, ह्याच अमेरिकेने संगणक आणि इंजिन द्यायला मनाई केली होती... गोव्यात करोना का नाही पसरला?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 10:23 नवीन
free Remdesivir गुड न्यूज ! भारताला मोफत मिळणार साडेचार लाख रेमडेसिवीर "remdesivir: free Remdesivir गुड न्यूज ! भारताला मोफत मिळणार साडेचार लाख रेमडेसिवीर - us firm donate 4.5 lakh vials of remdesivir and expand availability in india | Maharashtra Times" https://maharashtratimes-com.cdn.ampproject.org/v/s/maharashtratimes.com/international/international-news/us-firm-donate-4-5-lakh-vials-of-remdesivir-and-expand-availability-in-india/amp_articleshow/82286844.cms?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16195958052974&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Finternational%2Finternational-news%2Fus-firm-donate-4-5-lakh-vials-of-remdesivir-and-expand-availability-in-india%2Farticleshow%2F82286844.cms ----------- अचानक, अमेरिका इतकी उदार कशी काय झाली? हे असे असेल तर, भाजपला पर्याय नाही... कॉंग्रेसच्या काळात, अमेरिका भारताला हिंग लावून पण विचारत न्हवती ... संगणक पण दिला नाही आणि इंजिन पण दिले नाही...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/28/2021 - 09:44 नवीन
जनता केंद्र सरकारविरोधात उठाव करून उभी राहात नाहीये.
लोक योग्य वेळ आली की योग्य बदल करतात, काळजी करु नका. लोकांना सरकारविरुद्ध उठाव करायला वेळ लागत नाही. सध्याचं सरकार, दिल्लीतील एका जन आंदोलनाच्या कुबड्यावर उभे राहीले. जनाआंदोलनाची मदत झाली, हे विसरता कामा नये. सद्य सरकार सुद्धा लोकांची सहनशिलता संपल्यानंतरच आलेले आहे, तसे ते लोकांची सहनशीलता संपल्यानंतर जाणारही आहे. लोकशाहीची खरी ताकद सर्व भारतीयांना माहिती आहे. पण या समस्या सुध्दा इतर कोणापेक्षाही मोदीच सोडवू शकतील असा विश्वास अजूनही लोकांना आहे त्याविषयी काय म्हणणे आहे? विनोद उत्तम होता. धन्यवाद. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 09:50 नवीन
इतर पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी एकही सक्षम उमेदवार नाही...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 10:17 नवीन
जे स्वतला सकिशम समजायचे ते किती सक्शम आहे हे दिसलेच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 10:32 नवीन
तुम्ही सक्षम पर्याय तयार करू शकता आणि निवडून पण आणू शकता ....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 04/28/2021 - 13:45 नवीन
तुम्ही सक्षम पर्याय तयार करू शकता आणि निवडून पण आणू शकता बाडिस! अजून ३ वर्ष आहेत, आजच्या घडिला!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 15:32 नवीन
कोणाला उभे करायचे? अखिलेश यादव, परमपूज्य राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, मायावती की प्रियांका वाड्रा हां आता, आलटून पालटून, पंतप्रधान होणार असतील तर गोष्ट वेगळी आहे.... जसे आमच्या 3-13-1760 ग्रहावर होते ....
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/28/2021 - 16:38 नवीन
रागांबद्दल इतका अविश्वास!!ै एकदा संधी तर द्या बघा काय काय करुन दाखवतात ते. ;)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 10:31 नवीन
लोक योग्य वेळ आली की योग्य बदल करतात, काळजी करु नका. लोकांना सरकारविरुद्ध उठाव करायला वेळ लागत नाही. बदल करण्यासाठी फक्त योग्य वेळ पुरेशी नाही. बदल करण्यासाठी योग्य कारणे व योग्य पर्याय सुद्धा असावा लागतो. सध्या बदलासाठी योग्य वेळ नाही व योग्य कारणेही नाहीत. पर्याय तर नाहीच नाही. त्यामुळे बदलासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 10:38 नवीन
फुकट लस द्यायची की नाही, हाच घोळ घालत बसले आहेत....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 10:20 नवीन
या सगळ्या समस्या आहेत हे कोणीच नाकारत नाही. पण या समस्या सुध्दा इतर कोणापेक्षाही मोदीच सोडवू शकतील असा विश्वास अजूनही लोकांना आहे त्याविषयी काय म्हणणे आहे? >>>>> लोक मरत असताना बंगालात रॅली काढनारा समस्या सोडवू शकतो असा विश्वास असणारी जनता अजूनही अस्तित्वात आहे??? किती विनोद कराल??
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 10:24 नवीन
बाकी राज्य सरकार बरखास्त करावे हे तुम्ही सांगत होतात. आता केंद्र लोक मरत असताना निवडणूका लढते होते, पी एम केअरचा हिंशेब नाही, पैसे कुठे खर्च झाले ह्याची आकडेवारी नाही, सर्व बाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरलेलं दिसत असतानाही तुम्ही केंद्र सरकार हरखास्त कराव अशी मागणी केलेली दिसत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 10:35 नवीन
केंद्र सरकार बरखास्त खरावे अशी मागणी आम्ही अजिबात करणार नाही, कारण लोक मरत असताना निवडणुक लढणारे, पी एम केअरचा हिशेब व पैसे कोठे खर्च झाले याची आकडेवारी न देणारे आणि सर्व बाबतीत अपयशी ठरलेले केंद्र सरकार आमै कायम हवे आहे. आता खुश?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 10:51 नवीन
तुम्हाला हवेय हो. पण जनतेला नकोय ना? लोकांचे किती हाल होताहेत. बेड आॅक्सीजन मिळत नाहीयेत. केंद्र अपयशी ठरलंय, आंतरराषरीय स्तरावरून टिका होतेय. हे सरकार हकलले पाहीजे, जनतेने बंड करून ऊठले पाहीजे असं वरंच कुणीतरी बोललेय ना? अच्छे दिन च्या नावा खाली देशाला भिकेला लावाव का?? की लोकांना वैद्यकीय सुविधे अभावी मारून टाकाल?? लोकांचे पैसे कुठे पी एम केअरच्या नावाने घेऊन कुठे गडप केले कळायला मार्ग नाही. विरोधी सरकार असणारे राज्य प्रयत्नांची पराकाष्टा करताहेत तर त्याना त्रास देणं सुरूय. काय करायचं असं सरकार????
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 11:05 नवीन
हे सरकार नको असेल तर नवीन आणा ना. कोणी अडवलंय?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 11:11 नवीन
परमपूज्य राहूल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, असे बरेच जण उमेदवार आहेत, त्यापैकी एक निवडला की मग मात्र हमखास भाजपचे राज्य खतम ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 11:09 नवीन
कुठले प्रयत्न हो? ------- ठाण्यातील रुग्णालयात अग्नितांडव! चार रुग्णांचा मृत्यू https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2455949/fire-at-prime-criticare-hospital-first-floor-4-patients-died-rescue-20-patients-mumbra-thane-sdn-96/ ------------ भंडारा जिल्ह्यात सुरूवात झाली, अजूनही, रुग्णालयातील आगी काही कमी झाल्या नाहीत .... का आता ही पण चुकी केंद्राचीच?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 10:18 नवीन
सध्याच्या सरकाराविरुद्ध जनरेटा, जनतेचा उठाव, जागृती ही काळात आवश्यक ठरणार आहे.>>> +१
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 04/28/2021 - 13:03 नवीन
तुमचा वरवरा राव न होण्याबद्दल शुभेच्छा
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 13:18 नवीन
म्हणजे?
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 04/28/2021 - 13:37 नवीन
सरकारविरुद्ध "उठाव" ही सस्यस्थितीत नक्षलवादी संकल्पना आहे. ब्रिटिश सरकार हे जनतेच्या पाठिंब्यावर सत्तेत आलं नव्हतं. त्यामुळे त्याला बदलणे जनतेला शक्य नव्हते. जनतेने अशा वेळी उठावाचा रस्ता पकडला. चळवळ आणि उठाव यातला मुख्य फरक हा की चळवळ शांततामय असते (असु शकते). उठाव हा जनतेद्वारा आपलं म्हणणं कळवण्याचा सर्वात प्रक्षोभक आणि loud प्रकार आहे. उठाव साठी इंग्लिश मध्ये खालील शब्द आहेत: insurrection, rebellion, uprising, revolt. जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या सरकारबद्दल जनतेला केसेस करता येतात, चळवळ करता येते, आंदोलन, धरणे करता येतात, पण उठाव ही लोकशाही देशात अलोकशाही संकल्पना आहे. सरकारचे निर्णय तुम्हाला पटले नाहीत म्हणून तुम्ही त्याविरुद्ध revolt करणे म्हणजे बेबंदशाही/chaos आणण्याचा प्रयत्न करणे होय. एका प्राध्यापक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला शब्दांमधला फरक माहीत नसणे आश्चर्यकारक आहे. किंवा मग त्यांचा rebellion होण्यासाठी सक्रिय/अक्रिय पाठिंबा आहे असे म्हणावे लागते. आणि ती वाट चोखळायची तर शेवटी प्राध्यापक डॉक्टर वरवरा राव यांचे वर्तमान हे भविष्य असू शकते.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 04/28/2021 - 18:20 नवीन
प्राध्यापक महाशय हे लिखाण हेतुपुर्वक मोदि समर्थकाना चिरडीस आणायला लिहित असावेत. काही दिवसान्च्या अन्तराने असा एकच मोठा व्यन्गोक्तीपुर्ण प्रतिसाद लिहायचा आणि मग समर्थकान्ची सुरु झालेली आतिशबाजी मस्त एन्जोय करायची. आणि यामुळे गुलामान्चे पण मोरल वाढुन ते देखिल नव्या जोमाने तुटुन पडतात...तलवार्बाजी चालु... लोक त्यानिमिताने घरी बसत्तात तेवढीच सरकारला मदत
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 04/28/2021 - 20:27 नवीन
तसं काय नसतं हो. आसल्या एकांगी / विवक्षित अजेंड्याचे प्रतीसाद आले की बहुसंख्य लोक फाट्यावर मारतात. काहीजण प्रतीवाद करतात परंतु असल्या १८८ टाईपच्या प्रतीसादांवर काय बोलावे हाच मोठा प्रश्न असतो. दहावी च्या मराठी च्या पेपर मधला निबंध याउपर त्याचे मुल्य नसते .. समाजमाध्यमांवर आजकाल सगळीकडे नकारात्मक माहीती जास्त फिरते आहे त्यामुळे सध्या तरी जास्त भीती पसरत आहे. लोक थोडे सुधारतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/29/2021 - 06:08 नवीन
आपल्या वाटण्याचा आणि मताचा आदर आहे, पण भवतालची परिस्थिती पाहुन सुखीमाणूस दुखी होत नसेल तर माणूस म्हणुन आपल्या विचार करण्याला काहीही अर्थ नाही असे वाटते. काल नेमकं इथे सध्याच्या सरकारविरुद्ध उठाव केला पाहिजे असं लिहिलं आणि सायंकाळी ''देशात ऑक्सीजन, करोना प्रतिबंधक लशी किंवा रेमेडेसिवीरची कमतरता नाही'' डॉ.हर्षवर्धन यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री यांनी आश्चर्य व्यक्त केले असून ''जनतेला मूर्ख समजणा-या अशा सरकारविरोधात जनतेने बंड करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले'' आणि हे खरं आहे. गेल्यावर्षाभरापासून करोनाबाबतीत गाफील राहीलेल्या सरकारला आपल्या पदावर काम करण्याचा अधिकार उरलेला नाही. लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे. एकीकडे लोक किड्यामुंग्याप्रमाणे उपचाराअभावी मरत आहेत, लशीचा उपलब्धता नाही आणि यांना 'लसोत्सव'करावा वाटतो. सत्तेचा उपयोग, स्वतःच्या जाहिरातीसाठी, नसलेल्या गोष्टीच्या जयजयकारासाठी वापर केला जातो, चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमातून पसरवल्या जातात अशावेळी निवडून दिलेल्या केंद्र सरकारविरुद्ध जनतेमधे भ्रमनिरास होतो आहे. लोकांमधे अस्वस्था निर्माण व्हायला हवी, व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण व्हायला हवी. एकीकडे भारतीय जनता उपचाराअभावी तडफ़डत असतांना, एक एप्रीलला आसाममधील कोकराझरला मा.मोदी सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहतात, रॅलीला उपस्थित राहून त्यांचं पारंपरिक वाद्य वाजवित आहेत असे दिसते. हा असंवेदनशिलतेचा कळस आहे. यावरुन आपल्याला इतिहासातील एका जागतिक गोष्टीचं स्मरण होतं. आजूबाजुला घडणा-या वास्तवचित्रण मांडण्याचा, लोकांमधे जागृती निर्माण करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो इतकेच आपल्याला सांगावे वाटते. बाकी, आपल्या मताचा, आपल्या विचारांचा पुन्हा एकदा आदर करुन थांबतो. जय हिंद, जय भारत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/29/2021 - 06:47 नवीन
लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे. आपणच हे आंदोलन करण्यास प्रारंभ करावा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 04/29/2021 - 07:01 नवीन
सहमत आहे. आतापर्यंत मी भाजपाला मत देत होतो, ते आता पुढच्या वेळी देईनच असे नाही, जनता ह्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/29/2021 - 07:48 नवीन
मी हि काँग्रेस ला संधी देईन जेव्हा - गांधी नेहरू घराणे शाही संपेल - एक देश एक कायदा हे कांग्रेस कबुल करेल - काँग्रेस पाठीत कणा आहे हे दाखवेल - अल्पसंख्याकांचे तुष्टीकरणाचे राजकारण संपवेल
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/29/2021 - 08:04 नवीन
आणि हो संघ परिवारातील टोकाच्या धार्मिक वाद्यांची आप्ल्यालाल पण घृणा आहेच पण ६०-७० वर्षाच्या काँग्रेसी थेरांपेक्षा ( सुरुवातील देश घडवण्याचा आणि ७१ चा काळ सोडला तर ) भाजपला संधी हा उपाय सध्या तरी चांगला वाटतोय... आणि हो जाता जात या महारोगाच्या लाटेत भाजप काय कोणतेही सरकार असते तर्री भारतातात जे काही घडले आणि घडत आहे ते काही फारसे वेगळे असते असे जर कोणाला वाटत असेल तर अश्या स्वामींचे पाय दाखवावेत .. खरंच धन्य आहे ...
  • Log in or register to post comments
झ
झेन गुरुवार, 04/29/2021 - 07:15 नवीन
"लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे." खरोखर..सगळे पक्ष गेले खड्ड्यात. पण या परीस्थितीत तुम्ही लोकांना रस्त्यावर उतरायला सांगताय? सिरीयसली?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/29/2021 - 07:23 नवीन
>>>>या परीस्थितीत तुम्ही लोकांना रस्त्यावर उतरायला सांगताय? सिरीयसली? सध्या रस्त्यावर येऊन केंद्रसरकार विरोधी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याची ही परिस्थिती नाही. कोणत्याच मार्गाने कुठेही गर्दी होऊ नये, गर्दी करु नये. पण जनतेचा विरोध, भावना, आणि आवश्यकता विविध माध्यमातून सरकार पर्यन्त तीव्र पद्धतीने गेल्या पाहिजेत त्या अर्थाने त्याकडे बघावे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 04/29/2021 - 07:36 नवीन
मग ओरड करायला मोकळे.. https://www.worldometers.info/coronavirus/ इथे पाहिले तर डेथ पर मिलिअन भारताची खुप कमी आहे.. लोकानी रस्त्यावर उतरावे इतकी काही परिस्थिती हाता बाहेर गेली नाहिये..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/29/2021 - 08:43 नवीन
PPM, PPB, यांचा अभ्यासच केला नसेल तर, त्यांना फक्त आकड्यांतच रस असणार.... 10 PPM is always more than 20 PPB असे आमचे एक गुरू सांगायचे.... त्यांना आकडेवारीतली कुठलीही गोष्ट टक्केवारीवर लागायची .... अर्थात, काही टक्के जनतेला, हे समजणे जरा कठीणच आहे...
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 07:38 नवीन
करू द्या आंदोलने. चारीधाम यात्रा होणार आहेत की. फक्त प्रोफेसर साहेब, आंदोलनात कमाल ७२ तासापूर्वीचे RTPC निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट घेऊन या. आंदोलक कॉम्रेड्सना sop आणि डिस्टनसिंग पाळायला सांगा. मग नो प्रोब्लेम. (उपहास.) २०१९ मध्ये चारीधाम ला आप्रोक्स ३० लाख भाविक गेले होते. यावेळेस कमी जातील म्हणले तरी ... असो, नवीन काय आहे यात जे सरकारला माहीत नाही. आयेगा तो मोदीही. काही का होऊ दे मग.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/29/2021 - 08:40 नवीन
कुंभ मेल्यासाठी RTPCR नेगेटिव्ह असणे आवश्यक होते हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? Kumbh Mela 2021: Pilgrims Must Show COVID-19 Test Report In Haridwar Negative RT-PCR test report mandatory to enter Kumbh Mela; Health Ministry issues guidelines to prevent Corona in Mela http://newsonair.com/Main-News-Details.aspx?id=414021 Negative COVID RT-PCR test report mandatory for Kumbh Mela: Health Ministry https://www.jagranjosh.com/current-affairs/negative-covid-rtpcr-test-report-mandatory-for-kumbh-mela-health-ministry-1618297980-1 मुळात कुंभ मेळा हा सरकारी उत्सव नाहीच तर शतकानुशतके चालू असलेला हा पारंपरिक उत्सव आहे. तेंव्हा सरकारने कुंभ मेळा भरवला हे चूक आहे. कुंभ मेळा भरवायलाच नको होता हे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी धुळवड चालू द्या
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 09:03 नवीन
माझे हि तेच मत आहे आणि चारी धाम यात्रेचे प्लॅनिंग चालू करून पुन्हा तीच चूक रिपीट होऊ शकते !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा