Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)

श
श्रीगुरुजी
Tue, 04/27/2021 - 13:54
🗣 304 प्रतिसाद
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता. रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 79307 views

🗣 चर्चा (304)
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/29/2021 - 09:21 नवीन
धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर ...
  • Log in or register to post comments
य
यश राज गुरुवार, 04/29/2021 - 09:56 नवीन
उत्तराखंड सरकारने कोरोनाच्य वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमिवर मागिल वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा चारी धाम यात्रा रद्द करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/chardham-yatra-is-cancelled-said-teerath-singh-rawat-cm-uttarakhand-vsk-98-2457014/
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 04/29/2021 - 09:56 नवीन
रद्द करण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 10:43 नवीन
उत्तराखंड सरकारचा उत्तम निर्णय.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 09:04 नवीन
सरकारी उत्सव नसला तरी सरकारने clean and safe kumbh अश्या जाहिराती केल्या, इथे चुकले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/30/2021 - 15:05 नवीन
भाजपचं सरकार असणं हीच मोठी चूक आहे म्हटल्यावर सरकारची चूक तर असणारच.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/30/2021 - 15:16 नवीन
भाजपवर टीका करणे हीच मोठी चूक आहे त्यामुळे टिकाकाराच्या तोंडात कोणती पण वाक्ये कोंबून मुद्दा दुर्लक्षित करून स्वतःचे समाधान करावेच लागणार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/30/2021 - 15:42 नवीन
सरकारी उत्सव नव्हता. फक्त rtpcr झालेल्यानाच कुंभ मेळ्याला परवानगी दिली होती. कुंभमेळा झाल्यावर सुद्धा उत्तराखंडात इतर राज्यांपेक्षा करोना केसेस वाढल्या नाहीत. कुंभमेळ्यावर अर्थव्यवस्था किती अवलंबून आहे याचा आपण अंदाज केला आहे का? एक लाख वीस हजार कोटी रुपये यात ६ लाख लोकांना रोजगार मिळतोय. https://www.fortuneindia.com/polemicist/why-the-kumbh-mela-is-an-economic-blessing/102900 https://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/kumbh-to-generate-rs-1-2-lakh-crore-revenue-cii/articleshow/67609608.cms हे २०१९ च्या कुंभ मेळ्याबद्दलचे अंदाज आहेत. केसेस कमी असताना सरकारने एक वर्ष घरी बसलेल्या लोकांना परत घरी बसा म्हणणे आपल्याला योग्य वाटतंय? आजच्या तारखे पर्यंत उत्तराखंडात १ लाख ७५ हजार केसेस झाल्या आहेत आणि मृत्यू २५०२ तुलनेसाठी आज केवळ दिल्लीत ३९५ मृत्यू झालेले आहेत. पण तरीही सरकारचे चुकलेच.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 04/29/2021 - 08:20 नवीन
तर गेल्याच वर्षी खुप वाइट अवस्था झाली असती. उलट याजागी जर कोन्ग्रेस्सचे सरकार असते तर खुप हाहाकार झाला असता. आठवा ते मुम्बैतील बोम्ब्स्फोट , विविध आतन्कवादी हल्ले आणि तेव्हाच्या सरकारची हतबलता.. https://www.macrotrends.net/countries/IND/india/death-rate इथे पहिले तर दर हजारी म्रुत्युचे प्रमाण २०२० ला २०१९ एवढेच होते. आणि आता २०२१ ला ते वाढु नये ही देवाकडे प्रार्थना आत्ताची परिस्थिती वाइट आहे आणि याचे कारण सरकारचा ढिसाळपणा इतकेच लोकान्चा निष्काळजीपणा हे देखिल आहे.. अश्या अडाणी लोकाना सुरक्शित ठेवण्यासाठी सरकारने जर विविध उपाययोजना केल्या तर निर्बन्ध घातले म्हणुन विरोधक गळा काढायला मोकळे. आत्ता जर बन्गाल मधील निवडणुका पुढे ढकलल्या अस्त्या तर तिथे राष्ट्रपती राजवट आणावी लागली असती मग परत भाजपा निवडुन येणार नाही म्हणुन राष्ट्रपती राजवट लावली असे म्हणले असते... (सन्दर्भ https://www.business-standard.com/about/what-is-president-s-rule How is President's rule imposed in a state? Article 356 of the Constitution of India gives the President of India the power to impose this rule on a state on the advice of the Union Council of Ministers. There are some conditions that the President has to consider before imposing the rule: a) If the President is satisfied that a situation has arisen in which the government of the state cannot be carried on in accordance with the provisions of the Constitution. b) The state government is unable to elect a leader as chief minister within a time prescribed by the Governor of that state. c) There's a breakdown of a coalition leading to the chief minister having a minority support in the House, and the CM fails to prove majority in the given period of time. d) Loss of majority in the Assembly due to a vote of no-confidence in the House. e) Elections postponed on account of situations like natural disasters, war or epidemic. )
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 08:32 नवीन
विरोधक गळा काढतील म्हणून निवडणूक घेतली ? हे काय कारण झाले ? स्वतःचे काही मत आहे की नाही मग सरकारला ?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 04/29/2021 - 13:45 नवीन
कायम रिअ‍ॅक्ट करते. बाकि ते थोडॅफार स्वछ भारत वगैरे ओरिजिनल असावे.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 04/28/2021 - 18:12 नवीन
स्त्रियाना घरच्या विरोधाला तोण्ड द्यावेच लागते. बिचार्या निर्मलाजी खुप काम करतायत तरी सासर्च्याना काही पसन्त पडत नाही. काय बै बायकान्चा जन्म वैट
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 19:39 नवीन
प्रतिसाद आवडला ...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/29/2021 - 06:37 नवीन
सरकारचा आता भर

लसोत्सवावर

आहे @बिरुटे सर आपल्याला लसीकरणाबद्दल किती माहिती आहे हे मला माहित नाही परंतु आपले हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. करोना हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर आजतरी औषध नाही भारताची लोकसंख्य १३८ कोटी आहे. यापैकी ७० टक्के लोकांना लस दिली किंवा त्यांना करोना झाला तर आपल्याला हर्ड इम्युनिटी येऊन हि महामारी संपेल याचा अर्थ रोज २ लाख लोकांना लस दिली तर पूर्ण लसीकरण होण्यास दीड वर्ष लागेल. इतक्या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारणे आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारणे हि सोपी गोष्ट नाही. त्यातून लस वाया जाण्याचे प्रमाण ५% गृहीत धरले तर (यातील राजकारणात मी जात नाही). पूर्ण लसीकरणासाठी दोन वर्षे जातील हे गृहीत धरणे आवश्यक आहे. लसोत्सव म्हणण्यासाठी कोणतेही आरोग्य कर्मचारी तेथे दिवाळी करायला आलेले नाहीत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत. घरात बसून ऑनलाईन काम करून पगार घेत नाहीत एवढे भान आपल्याला असायला हवे होते. आपल्याला सरकारला( कोणत्याही पक्षाचे) मदत करता येत नसेल तर करू नका पण दुसऱ्याचे घर जळत असेल त्यावर पाणी टाकता येत नसेल तर निदान त्यावर टाळ्या पिटू नये एवढे व्यवधान असायला हवे होते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/29/2021 - 07:10 नवीन
>>>>> आपल्याला लसीकरणाबद्दल किती माहिती आहे हे मला माहित नाही परंतु आपले हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. डॉक्टरसाहेब, वक्तव्य बेजवाबदार आहे, असे सध्याची परिस्थिती पाहुन वाटत नाही. देशात लसच उपलब्ध नाही. लोकांना लस मिळविण्यासाठी रांगा कराव्या लागत आहेत. एकूणच लशीचा तुटवडा असतांना असे उत्सव करण्याची गरज नाही. लशीचा साठा मुबलक प्रमाणात असता तर लोकामधे जनजागृती साठी असे उत्सव केले पाहिजेत, सध्या ही वेळ नाही, असे वाटते. बाकी लशीसाठी लागणारा वेळ वगैरे आपला प्रतिसाद माहितीपूर्ण आहेच. डॉक्टरसाहेब, भारतातील भयावह करोना लाटेसाठी विषाणुचे एक म्युटेशन जवाबदार नाही त्यामागे अनेक कारणे आहेत, पहिली लाट ओसरताच मोठमोठ्या सभा, प्रचंड गर्दीचे सोहळे, कोरोनाचे अनेक व्हेरियन्ट, आणि मंदगतीने होणारे लशीकरण यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे मत डब्लू एच ओ ने नोंदवले आहे, या त्यांच्या मताकडे तरी दुर्लक्ष करता येईल. >>>घरात बसून ऑनलाईन काम करून पगार घेत नाहीत एवढे भान आपल्याला असायला हवे होते. हे मत कोणाबद्दल आहे माहिती नाही, पण काही ऑनलाइन काम करणा-यांना पहिल्या लाटेत चेक पोष्टवरच्या ड्यूटीज, घरोघर जाऊन स्क्रीनिंग टेष्टच्या ड्यूटीज, आणि आताच्या ड्यूटीत पर्यवेक्षक म्हणून घरोघर जाऊन नोंदणी करण्याचे काम आहे, त्याच बरोबर विद्यापीठाच्या परीक्षेचं नियोजन नसल्यामुळे थेट वर्गात जाऊनही परीक्षा घ्याव्या लागत आहेत याचंही भान काहींना टिका करतांना असायला हवं. बाकी येत जा डॉक्टरसाहेब मिपावर तुमची मतं काहीही असली तरी आपण डॉक्टर म्हणून भला माणूस आहे, हे माझं मत कायम आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पिनाक गुरुवार, 04/29/2021 - 07:13 नवीन
लसोत्सव म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही असं थोडंच आहे? इथे कोणताही पारंपरिक उत्सव वगैरे साजरा न करता जास्तीत जास्त लोकांना एका दिवसात किंवा काही दिवसात लस द्यावी आणि असा इव्हेंट केल्यामुळे लोक त्याला जास्त प्रमाणात प्रतिसाद देतात हे पूर्वीच दिसलं आहे. हे याना माहीत नसेल असं थोडंच आहे? मग उगीचच काही तरी गोष्टीवरून का टीका केली असेल ओळखा? बहुधा मिपा वरचे लोक हे सुशिक्षित आहेत आणि आपल्यावर टीका करू शकतात हे त्यांनी गृहीत धरलं नसावं. फेसबुक वर स्वतः च्या प्रदेशातले, धर्मातले, जातीतले, शिळोप्याच्या गप्पा मारणारे, पारावर टेकणारे लोक जास्त. तिथे लोकांना भडकवणं पण सोपं. आपल्या राजकीय, धार्मिक, जातीय आणि सामाजिक समजुती आणि श्रद्धा यातून जो पराकोटीचा द्वेष निर्माण होतो त्याला तिथे खतपाणी घालुन अशा लोकांमध्ये खोटं पसरवणे आणखीनच सोपं. मागे 15 लाखांबद्दल पण अशाप्रकारे फालतू आणि गंभीरतेचा मागमूस नसणारे प्रतिसाद पाडलेच होते की. तेव्हा ही एक मानसिक समस्या आहे हे ओळखून ignore करणे श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/29/2021 - 07:25 नवीन
देशात लसच उपलब्ध नाही. हे विधान चुकीचे असून देशात पुरेशी लस उपलब्ध नाही हे सत्य विधान आहे . याची कारणे सर्वाना माहिती आहेत. झारीतील शुक्राचार्य परदेशात होते त्यांचे नाक दाबल्यावर तोंड उघडले आहे. कॉव्हॅक्सिन हि भारतीय लस उत्परिवर्तित विषाणू साठी सुद्धा उपयुक्त ठरली आहे हे डॉ फाऊची या अमेरिकन तज्ञाने कालच जाहीर केले आहे. लसीकरण हाच एक उपाय आहे असेही स्पष्ट झाले आहे. त्यासाठी "करोना एक थोतांड" या धाग्यावर मी दिलेला सविस्तर प्रतिसाद मला न सांगता आक्षेपार्ह भाग उडवण्या ऐवजी संपूर्णच उडवण्यात आला. परत तसा प्रतिसाद देण्याची माझी अजिबात इच्छा राहिलेली नाही बाकी लॉक डाऊन अनंत काळापर्यंत करणे शक्य नाही हे जनतेला आणि सर्व पक्षातील लोकांना माहिती आहे. त्यांच्या राजकीय धुळवडीत उतरण्याची माझी अजिबात इच्छा नाही. त्या धुळवडीत उतरून आपण "लसोत्सव" असे विशेषण वापरलेत हे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुखऱ्या नसेवर डाग देण्यासारखे आहे एवढेच नमूद करतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 09:35 नवीन
पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद; दुकानातल्या वस्तूंवर डल्ला https://lokmat.news18.com/amp/videsh/pakistani-embassy-officers-shop-lifting-in-korea-caught-in-act-in-cctv-camera-gh-544599.html ---------------
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 09:44 नवीन
https://youtu.be/g0zZyvr7HnU
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 10:21 नवीन
रामदास यांनी ४ एप्रिल २०१७ या दिवशी मिसळपाव या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला "आंबा पहावा देठात" हा लेख त्यांच्या नावाचा उल्लेख न करता कायप्पावर फिरतोय. http://www.misalpav.com/node/39378
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 11:45 नवीन
१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण होणार! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय! ---------- https://www.loksatta.com/maharashtra-news/free-corona-vaccine-in-maharashtar-cabinate-meeting-decision-on-vaccination-pmw-88-2456073/ --------- अतिशय उत्तम निर्णय ......
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 04/28/2021 - 13:06 नवीन
अतिशय चुकीचा निर्णय. मला परवडते लस विकत घ्यायला. मी फुकट गोष्टी घ्यायला काँग्रेस चा मतदार नाही. मी लस फुकट का घ्यावी?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 14:38 नवीन
बिंधास्त घ्या हे सरकार नंतर, टॅक्स वाढवणारच आहे... तुम्ही टॅक्स भरत असाल तर, फुकट घेणे हा तुमचा अधिकारच आहे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 11:54 नवीन
भारत संकटात असताना चीनची मोठी खेळी; शेजारी देशांना जाळ्यात ओढलं https://maharashtratimes.com/international/international-news/china-plays-vaccine-diplomacy-amid-surge-in-india/articleshow/82289721.cms ----------- परमपूज्य नेहरूंनी दुर्लक्षित केलेला आणि प्रसंगी पाठिंबा दिलेला भस्मासुर, भारताचाच घास घ्यायला टपला आहे.... गेल्या 70 वर्षांत केलेल्या चुकीची फळे निस्तरायला, अजून किती तरी वर्षे लागतील....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 12:04 नवीन
सामनाच्या उच्च परंपरेनुसार अत्यंत फालतू बातमी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 12:10 नवीन
भारतासाठी घातकच आहेत ....
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 12:25 नवीन
सहमत, ना बुडखा ना शेंडा, फक्त क्लिकबेट टायटल.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 12:34 नवीन
उत्तराखंड चार धाम यात्रेसाठी तयारी करत आहे. ह्यात नवीन SOP असणार आहेत आणि बहुधा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट असणार्यांनाच संधी मिळणार आहे. विरोधकांच्या व्हॅलीड टीकेला सुद्धा भिरकावून द्यायचे ? कुंभ मेळ्याचे उदाहरण ताजे असूनसुद्धा. १४-२० मे दरम्यान भारत पिक वर असणार आहे किंवा पीक नुकताच होऊन गेला असणार आहे. त्यात पुन्हा तश्याच गर्दीचे आयोजन का केले जात आहे ? https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/focus-now-on-char-dham-yatra-says-uttarakhand-govt/amp_articleshow/82277808.cms
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 12:45 नवीन
धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 15:39 नवीन
दिल्लीत आता नायब राज्यपाल म्हणजेच “सरकार”; नवा कायदा लागू https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-will-now-under-leutenent-governers-rule-new-nct-act-2021-came-into-force-vsk-98-2455985/ अतिशय योग्य निर्णय.... अर्थात, ह्या निर्णयावर, काही टक्के जनता नाखूष होणारच....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 16:15 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/hawkers-travel-in-central-railway-local-train-smoothly-zws-70-2455745/ ----------- त्यापेक्षा, फेरीवाल्यांकडून टॅक्स गोळा केला तर उत्तम, महिन्याला किमान 10-15 कोटी तरी सरकारी खजिन्यात जमा होतील...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 16:29 नवीन
खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का? जाणून घ्या सत्य https://www.loksatta.com/trending-news/fact-check-nagpur-resident-naraynrao-dabhadkar-dies-after-giving-bed-to-save-other-corona-patient-sgy-87-2456139/ ------------ म्हणून तर, अफवा पसरवणे, हा फौजदारी गुन्हा हवा आणि असा कायदा असेल तर, त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 16:33 नवीन

एबीपी माझाच्या वेबसाईटवर अशी कोणतीही बातमी प्रकाशित झालेली नाही. व्हायरल होत असलेला स्क्रीनशॅाट हा फोटोशॅाप आहे, आम्ही याची सायबर सेलकडे तक्रार करत आहोत#TeamABPMajha pic.twitter.com/PLZ4nR8XRw

— ABP माझा (@abpmajhatv) April 28, 2021
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 16:36 नवीन
पारलीयमेंट्री कमिटीने नोव्हेम्बर २०२० मध्ये हा SWOT रिपोर्ट बनवला होता. त्यात दुसऱ्या लाटेमध्ये काय होऊ शकत आणि काय तयारी गरजेची आहे हे सांगितले होते. यावरून राज्य आणि केंद्र सरकारांना काय काय माहिती तज्ञांनी दिली होती हे कळावे. उत्तरादाखल काय केले गेले हे पाहतच आहोत. https://www.newslaundry.com/2021/04/28/mps-panel-predicted-second-covid-wave-in-november
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 16:42 नवीन
दुर्दैवाने भारतात आरोग्यव्यवस्था ही प्राथमिकता कधीच नव्हती व नाही. सर्व सरकारांनी व जनतेने अत्यंत ढिलाई दाखविली ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 04/29/2021 - 10:11 नवीन
केंद्र सरकारच्या प्रमुख शास्त्रीय सल्लागारांची मुलाखत आज इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित केलेली आहे, ती कृपया पहावी. तीत ते म्हणतात, की ही दुसरी लाट इतकी भीषण इंटेन्सिटीची असेल असे भारतांतील व अगदी परदेशांतील शास्त्रज्ञांनाही वाटले नव्हते. "None of the national or global experts, including those at IHME (Institute of Health Metrics and Evaluation at the University of Washington) or LANL (Los Almos National Laboratory in the United States), were forecasting second wave of such vehemence. In fact, many indeed put it (the intensity of the second wave) explicitly lower than the first wave under conditions then present." पुढे ते असेही म्हणताहेत की तीन कारणे (कमीजास्त प्रमाणांत ह्या भीषणतेस) कारणीभूत झाली असावीतः "...three factors are likely to be at play — public behaviour, increased susceptibility of the population, and new variants of the virus" लोकांची वर्तणूक, कमी झालेली प्रतिकारशक्ति, व विषाणूची नवी रूपे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 11:28 नवीन
दुसऱ्या लाटेची भीषणता प्रेडीक्ट झाली नव्हती हे त्यांचे म्हणणे मान्य करण्यासारखे आहे. पण केंद्र सरकारचे सायंटिफिक सल्लागार असे पद असून त्यांनी सरकारला मोठ्ठे जनसमुदाय आणि निवडणुकांबद्दल काहीच सल्ला दिला नाही, कि त्यांनी दिलेला सल्ला पाळला गेला नाही ? मानवी कंट्रोलच्या बाहेरचा सगळा दोष पब्लिक बिहेवियरला देणं मला आजिबात पटलं नाही आहे. पब्लिक बिहेवियर स्रीक्टली एनफोर्स करणे शक्य होते. आणि जिथे हवे असते तिथे स्ट्रीक्ट इन्फोर्समेन्ट दिसते सुद्धा. हिंडसाईट मध्ये काय केलं असतं मध्ये म्हणतात-
Not differently, but more rigorously perhaps. (...) Measures like widespread use of masks and restrictions on large public gatherings should have been more strictly enforced, and abided by.
त्यांचे अराजकीय पद असल्यामुळे त्यांचे राखून बोलणे समजण्यासारखे आहेच, पण मला प्रतिवाद करणे गरजेचे वाटते म्हणून करतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/29/2021 - 11:46 नवीन
पण केंद्र सरकारचे सायंटिफिक सल्लागार असे पद असून त्यांनी सरकारला मोठ्ठे जनसमुदाय आणि निवडणुकांबद्दल काहीच सल्ला दिला नाही, कि त्यांनी दिलेला सल्ला पाळला गेला नाही ? निवडणुक वेळापत्रकानुसार घ्यायची का पुढे ढकलायची हा निर्णय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार घेऊ शकत नाही. या निर्णयाचे अधिकार निवडणुक आयोगाकडे आहेत. राज्य सरकालचा विरोध असूनही विधानसभा निवडणुक आधी घेण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या काही घटना भूतकाळात घडलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 12:26 नवीन
निर्णय नाही घेता येत बरोबर आहे, पण निदान काहीतरी स्टॅन्ड घेता आला असता कि.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 04/29/2021 - 12:32 नवीन
श्रीगुरूजींनी सांगितल्याप्रमाणे, निवडणूकांबद्दल केंद्र सरकार स्वतःहून काही करू शकत नाही, निवडणूका संबंधी सर्वच प्रोसेसेस निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात. ह्याविषयी इथे काही चांगली माहिती आहे. पर्याप्त परिस्थितीत निवडणूक आयोग, तेव्हाच निवडणूका पुढे ढकलू शकले असते, जर केंद्राने आणिबाणी (संपूर्ण देशभर अथवा बंगालपुरती) जाहीर केली असती. अथवा, केंद्राने बंगाल विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपतींची राजवट तेथे लागू केली असती. एक राजकीय पक्ष हा निर्णय सहजपणे घेऊ शकत नाही (पूर्वी एका पक्षाने हे अनेकदा केले आहे, व त्याने त्याची किंमतही मोजली आहे),
मानवी कंट्रोलच्या बाहेरचा सगळा दोष पब्लिक बिहेवियरला देणं मला आजिबात पटलं नाही आहे.
त्यांनी सगळा दोष जनतेच्या वर्तणूकीला दिलेला नाही. तीन कारणे दिली आहेत. त्यांतील, माझ्या अनुमानानुससर, जनतेची वागणूक व म्युटेटेड स्ट्रेन, ही प्रमुख दोन कारणे असावीत.
पब्लिक बिहेवियर स्रीक्टली एनफोर्स करणे शक्य होते. आणि जिथे हवे असते तिथे स्ट्रीक्ट इन्फोर्समेन्ट दिसते सुद्धा.
मला वाटते इथे(च) आपल्या समाजाचा बराचसा प्रॉब्लेम आहे. म्हणजे, सर्व प्रकारच्या नियमांचेच नव्हे तर गाईडलाएन्सचेही पालन जनतेकडून व्यवस्थित करून घ्यायची जबाबदारी सरकारची! मुळात हे असले करणे स्वतः जनतेतून आले पाहिजे. म्हणजे ते ऑर्गॅनिक असेल तरच ते व्यवस्थित पाळले जाईल. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बाबीसाठी डोळे वटारायला, सरकारी संस्था कशाला हवी? हे स्वतःहून जनता जोंवर करीत नाही, तोंवर कठीणच आहे. आपल्या समाजांच्या एकंदरीत जडणघडणीत बेशिस्त अतिशय भिनलेली आहे. त्यांतून प्रत्येक व्यक्ति, प्रत्येक सरकारी अथवा अगदी खाजगी संस्थापनांबद्दल वाद घालणार-- अनेकदा तर कोर्टांतही जाणार. दुचाकींसाठेवे हेल्मेट वापरणे हा जगांत कुठेही वादाचा विषय होत नाही, ते फक्त आपल्याकडेच आहे. ट्रॅफिक लाईट्सना, वाहने हळूहळू पुढे सरकत रहातात, ते फक्त आपल्याकडेच. ह्यापुढे जाऊन, अनेकांना (मध्यम वर्गीय व त्यावरील वर्गीय) प्रत्येक नियमाससठी काहीबाही अपवाद करून हवा असतो; अन्यथा ते शक्य नसेल तर त्यांतून एखादी पळवाट. तेव्हा, तुम्ही म्हणता तसे 'स्ट्रिक्टली एन्फोर्स' करायचे म्हटले, तर त्यासाठी पोलिसांच्या रिसोर्सवर अति प्रचंड ताण पडेल, त्याचे काय? ते तसे सहजी शक्य नाही. पूर्वीच्या लॉकडाऊनचेच पहा. तेव्हा पोलिस कुणीतरी बाहेर पडला म्हणून मारहाणी वगैरे करत होते, ते फक्त पायी चालणार्‍यांवर, अथवा टू व्हीलर्सवरून जाणार्‍यांवर. कार्समधून फिरणार्‍यांना ते सौम्यपणे सांगत होते, काहीवेळा त्यांतील मंडळी शहाजोगपणे काहीतरी निमीत्ते देत होती, काही वेळा ती हुज्जत घालत होती. ह्याचे कारण पोलिसांची ह्या स्तरांवरील लोकांना अजिबात दहशत नाही, कारण त्यांचे कुणीतरी उच्च्पदस्थ एका फोनकॉलच्या अंतरावर असतात.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 13:22 नवीन
"The central government has the power to declare an emergency in which case the election will not be possible," SY Quraishi, the 17th Chief Election Commissioner of India, told FactChecker. "This has happened in Kashmir, Assam and Punjab. The emergency will be declared as an internal or external one. Hence this decision is made only by the ruling central government."
म्हणजे केंद्र सरकार आणीबाणी निवडणूक पुढे ढकलू शकत होते, १ वर्षापर्यंत, तर हे महत्वाचे कारण वरील गृहस्थांनी कव्हरच केले नाही. आणीबाणी लावण्याचा निर्णय अवघड आहे, विरोधक टीका करतील हे सगळे व्हायरसचा स्प्रेड रोखण्यापेक्षा अत्यंत गौण मुद्दे होते. त्यांनी सांगितलेल्या तीन कारणांपैकी नवा स्ट्रेन आणि वाढलेली ससेप्टीबिलिटी दोन्ही माणसाच्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत, राहता राहिले ते कारण म्हणजे पब्लिक बिहेवियर. सरकारला पूर्ण क्लीन चिट. गरजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे- शक्य नव्हते. वेगळे काही करायला हवे होते का- नाही, फक्त आणखी जोमाने करायला हवे होते, मोठी गर्दी टाळायला हवी होती, इतकेच. पब्लिक बिहेव्हियर म्हणजे जनतेला रोगाचे गांभीर्य माहीतच नाही आणि ते नेहमीप्रमाणे उंडारत आहेत असे त्यातून ध्वनित होते. आपली लोकसंख्या आणि घरात बसून राहणे न परवडणाऱ्या लोकांची टक्केवारी पाहिल्यास गर्दी होणे स्वाभाविकच आहे.
मला वाटते इथे(च) आपल्या समाजाचा बराचसा प्रॉब्लेम आहे. म्हणजे, सर्व प्रकारच्या नियमांचेच नव्हे तर गाईडलाएन्सचेही पालन जनतेकडून व्यवस्थित करून घ्यायची जबाबदारी सरकारची! मुळात हे असले करणे स्वतः जनतेतून आले पाहिजे.
खुद्द पंतप्रधान मास्क न घालता रॅलीत भाषण देत होते. हे जर यूएसे मध्ये किंवा काही युरोपियन देशात घडले असते तर बहुदा त्यांना जाहीर माफी मागण्याशिवाय गत्यंतर उरले नसते (democrat नेत्याला तरी, निदान.). सरकारने आपल्या परीने सगळे प्रयत्न केले असतील तर त्यांना लोकांकडे बोट दाखवण्याचा हक्क आहे, असे मला वाटते. इथे सरकारने निवडणूका, रॅल्या आणि मोठे जमाव होऊ दिले, तर पब्लिक कडे बोट दाखवणं शुद्ध कोडगेपणा आहे. म्हणून मला एकूण वरील महोदयांच्या स्टॅन्ड पटला नाही. पोलिसांचा आणि टाळेबंदीचा त्रास गरिबांना होतो हे कबूल आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/29/2021 - 14:53 नवीन
म्हणजे केंद्र सरकार आणीबाणी निवडणूक पुढे ढकलू शकत होते, १ वर्षापर्यंत, तर हे महत्वाचे २६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी निवडणुक आयोगाने या ५ राज्यात निवडणुक घेण्याच्या तारखा जाहीर केल्या. त्यावेळी भारतात सर्वत्र कोरोनाप्रसार खूपच कमी झाला होता. ३ महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणुक व्यवस्थित पार पडली होती व त्या काळातील प्रचारामुळे कोरोनाप्रसार वाढला नव्हता. अशा परिस्थितीत देशात आणिबाणी जाहीर करणे व त्याद्वारे निवडणुका पुढे ढकलणे यासाठी केंद्राकडे कोणतेही सबळ कारण नव्हते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 16:13 नवीन
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ८००००+ केसेस दररोज वाढत होत्या. अश्या परिस्थितीत मतदानाच्या ७ फेज झाल्या. त्यातल्या ४ एप्रिल १५ नंतर झाल्या, जेव्हा २०००००+ केसेस दररोज वाढत होत्या. केंद्राकडे सबळ कारण नव्हते पटत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 04/29/2021 - 16:52 नवीन
अर्ध्यावर आले असतांना (शब्द्शः नव्हे) निवडणूका स्थगित करता येतात का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/29/2021 - 16:59 नवीन
नाही. केंद्र सरकार तसे करू शकत नाही. निवडणुक आयोगाला निवडणुक पुढे ढकलण्याचा अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 17:05 नवीन
कशावरून ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 17:11 नवीन
काँग्रेसने आयोगाला पत्र लिहून निवडणूक फेजेस १४-१५ मे पर्यंत पुढे ढकला असे सांगितले तेव्हा निवडणूक आयोगाने कारण अर्धी निवडणूक झाली हे न देता,
Since the term of West Bengal assembly is ending on 30.5.2021, the Commission is mandated under the Constitution to complete the electoral process before this date… Any postponement of scheduled elections would affect the adherence to Constitutional and statutory provisions related to timely conduct of elections.”
असे दिले. इथे केंद्र दखल घेऊ शकले असते. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/elections/ec-tmc-west-bengal-polls-club-remaining-phases-7283512/lite/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/29/2021 - 17:28 नवीन
याचे सविस्तर उत्तर चंद्रसूर्यकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहे. १९९१ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या केवळ २ दिवस आधी निवडणुक आयोगाने मतदान पुढे ढकलले होते. त्याच वर्षी राजीव गांधींच्या मृत्युनंतर उर्वरीत मतदान १ महिना पुढे ढकलले होते. एप्रिल २००२ मध्ये मध्ये मोदींनी मुदतपूर्व निवडणुकीसाठी गुजरात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. जून २००२ मध्ये त्यांना निवडणुक हवी होती. परंतु दंगली व हिंसाचार ही कारणे देऊन आयोगाने लगेच निवडणुक घेण्यास नकार दिला होता. मोदी त्याविरूद्ध न्यायालयात जाऊनही उपयोग झाला नव्हता. शेवटी निवडणुक डिसेंबर २००२ मध्ये झाली होती. मतदान केव्हा घ्यायचे, पुढे ढकलायचे का नाही हे ठरविण्याचा अधिकार फक्त निवडणुक आयोगाचा आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला हा अधिकार नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/29/2021 - 17:43 नवीन
केंद्र कसे काय नाही ? श्रीगुरुजी,पूर्वीचे EC चीफ कुरेशी काय म्हमतांना:
The proposal to club last three phases of polls in WB alongside the ban on all physical rallies is sensible, desirable and doable. Saving lives at all costs is the foremost objective." Qureshi tweeted on April 15, 2021.
त्याआधी, EC ला निवडणूक टर्म संपल्यावर सहा महिन्यांपेक्षा जास्त पोस्टपोन करायला हक्क नाही आहे. प्रकरण EC च्या हाताबाहेर गेले होते. आणि, केंद्राकडे, वर म्हणल्याप्रमाणे, ही शक्ती आहे. मोदी न्यायालयात जाऊन उपयोग झाला नाही हे उदाहरण इथे कसे चालेल ? तेव्हा ते केंद्रात कुठे होते ? आता मोदींकडे केंद्र सत्ता आहे ना ?
However, in case of a state of Emergency, an election can be postponed for one year and it can extend to a period of six months after the Emergency is lifted. While there is no specific legal provision that specifies postponement in non-Emergency situations, exceptional circumstances such as natural calamities, law and order situations or any other unforeseen circumstance which is beyond the EC's control can be the reasons for postponement or extension.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/29/2021 - 17:48 नवीन
यावर एका वेगळ्या धाग्यात चंद्रसूर्यकुमार यांनी सविस्तर प्रतिसाद दिला आहे. तो वाचावा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 48 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 1 minute ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 2 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 4 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 8 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा