Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)

श
श्रीगुरुजी
Tue, 04/27/2021 - 13:54
🗣 304 प्रतिसाद
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता. रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 79307 views

🗣 चर्चा (304)
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 15:40 नवीन
कुठे गेले?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 15:44 नवीन
वाळूवरती टॅक्स वाढवायची शक्यता आहे ... अर्थात, यांचा आर्थिक बोजा सामान्य माणसावरच पडणार... पण, काही टक्के जनतेला ह्या वाढीव भावा बद्दल काहीही वाटणार नाही...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 04/27/2021 - 17:44 नवीन
लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी एकमेकांस इतके चिकटून उभे न राहता, शारीरिक अंतर ठेवले पाहीजे. नाहीतर गर्दीमुळेच कोरोना व्हायचा. आणि परत हेच लोक घरी जाउन अन्य नातेवाईकांच्या जवळच्या संपर्कात येऊन 'सुपर स्प्रेडर' बनतील.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 18:01 नवीन
आज आमच्या सौ,ने लस टोचून घेतली ... गर्दी मुळे, करोना तिथेच चिरडून मेला असावा, असे आमच्या सौ,चे मत ...
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 04/27/2021 - 18:18 नवीन
तुम्ही घेतलीये का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 19:01 नवीन
काही वैयक्तिक कारणे आहेत ... काही सामाजिक कारणे आहेत आणि काही कौटुंबिक कारणे आहेत लस घेणारच, फक्त योग्य वेळ यायला हवी...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 15:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 16:01 नवीन
“मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील”, अजित पवारांनी केलं स्पष्ट! -------- https://www.loksatta.com/mumbai-news/ncp-deputy-cm-ajit-pawar-on-free-vaccination-to-all-in-maharashtra-pmw-88-2455005/ बाॅल ढकलला ....
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 04/27/2021 - 16:39 नवीन
दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला मोजे वर ओढायला सांगितले आहे*. दिल्लीत ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून न्यायालयाने दिल्ली सरकारला खूप झापले आहे. याविषयी अधिक https://www.livelaw.in/news-updates/delhi-high-court-delhi-government-on-distribution-of-medical-oxygen-central-government-to-take-over-173218 *: बेग, बॉरो, स्टिल याचे भाषांतर मराठी मिडियाने भीक मागा, उसने आणा किंवा चोरी करा असे केल्यापासून 'पुल अप द सॉक्स' चे पण असेच भाषांतर करायची प्रेरणा मिळाली.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 04/27/2021 - 18:08 नवीन
दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्या मुळे पुण्यातील jail superintendent ला कामावरून काढून टाकले. लोकसंख्या नियंत्रणासाठी कदाचित हा कायदा केलेला असावा. हा कायदा फक्त हिंदु साठी आहे का सर्व धर्मां साठी लागू होतो?
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 04/27/2021 - 18:45 नवीन
राजेश188 हे आजकाल प्रतिसाद का देत नाहीत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 18:56 नवीन
असे बरेच आयडी पंख फुटले की उडून जातात .... काहींचा आत्मा शुन्यात जातो तर काहींचे चॅप्टर लगेच संपतात
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 04/28/2021 - 04:23 नवीन
तरी मी विचार करतोय इतर काही आयडी अचानक ऍक्टिव्ह कसे काय झाले? पण आयला मानले पाहिजे. इतकी विविध बेअरिंग सांभाळायची म्हणजे सोपे काम नाही. एखादी टीम असावी असेच मला वाटतेय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 04:33 नवीन
असे आयडी फार काळ टिकत नाहीत ...
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 04/27/2021 - 19:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 04/27/2021 - 20:29 नवीन
दिसत नाहीत ते?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 21:16 नवीन
चंद्रपूर : ”आम्हाला वेतन देणे होत नाही तर मारून टाका” कोविड योद्ध्यांच्या भावनांचा उद्रेक… https://www.loksatta.com/maharashtra-news/chandrapur-emotions-of-covid-warriors-erupt-in-front-of-amit-deshmukh-msr-87-2455509/ --------------- आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही....
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 22:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 22:15 नवीन
Image removed. बुलडाणा / प्रशांत खंडारे शाहराला लागून असलेल्या हनवतखेड मार्गावर शिवा गाडेकर यांचे शेत आहे.आज 19 ऑक्टोबर रोजी शिवा गाडेकर यांची आई,भाऊ व वाहिनी शेतात काम करत असताना ते जनावारांच्या गोठ्यात गेले असता,जनावारांसाठी ठेवलेल्या भुस्यात मोठा अजगर आढळून आला. या अजगराला सर्पमित्र विक्की जाधव यांनी रेस्क्यू करून जिवदान दिले आहे. हनवतखेड मार्गावरील शिवा गाडेकर यांच्या शेतात आज 19 ऑक्टोबर रोजी त्यांची आई,भाऊ व वाहिनी काम करत होते. दरम्यान ते जनावारांच्या गोठ्यात गेले असता,जनावारांसाठी ठेवलेल्या भुस्यात मोठा अजगर आढळून आल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. शिवा गाडेकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बुलडाणा येथील सर्पमित्र विक्की जाधव यांना फोन करून पाचारण केले. विक्की जाधव, अमोल चिंचोले घटनास्थळी पोहोचले. भूस्यात दडून बसलेल्या अजगराला शिताफीने पकडलेे. या अजगराला वन विभागाच्या स्वाधीन केले आहे.4 दिवसापूर्वी सुद्धा विक्की जाधव यांनी बुलडाणा शहराला लागून असलेल्या जांभरून गावातील एक घरातून आठ फूट लांबीचा अजगर रेस्क्यू केला होता.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/27/2021 - 22:16 नवीन
Image removed. मूर्तिजापूर भगवान श्रीराम यांचे भक्त पवनपुत्र हनुमान जयंती निमित्त कार्यक्रमाचे औचीत्य साधून मूर्तिजापूर येथील बियाणी जीन परिसरातील हनुमान मंदिरात आमदार हरिष पिंपळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी शहर व तालूका भारतीय जनता युवा मोर्चा तसेच अमित नागवान मित्र परिवाराच्या वतीने दाना-पाणी भांडे वाटपाचा उपक्रम करण्यात आला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, तालूकाध्यक्ष भूषण कोकाटे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालूकाध्यक्ष पप्पू मुळे,शहराध्क्ष हर्षल साबळे, पंडीत धनंजय मिश्रा,बुथ प्रमुख कमलाकर गावंडे, अनिल बियाणी,प्रकाश नागवान,गजानन नाकट,अमित नागवान,संदिप जळमकर,लखन अरोरा,प्रविण लोकरे,लाला डाबेराव,रोहित अव्वलवार,निक्की महाजन,बूशी कुंदनानी,निरज सुदानी आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते आदीं उपस्थित होती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 01:24 नवीन
कायदा सगळ्यांना, सारखाच हवा..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 01:21 नवीन
https://www.loksatta.com/pune-news/sale-of-karnataka-mangoes-under-the-name-of-devgad-hapus-abn-97-2455588/ -------- ही फसवणूक होऊ नये म्हणून, मी एक धागा काढला होता ..... https://misalpav.com/node/48219 वरील धाग्यात, जसे जमतील तसे शेतकरी Add करत जाईन
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 01:41 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/vandalism-of-the-company-office-by-congress-workers-abn-97-2455626/ ------------- मारहाण किंवा मोडतोड सर्वथा अयोग्यच...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 01:54 नवीन
“परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, केंद्राकडे जबाबदारी सोपवू”- उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला सुनावलं! https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-corona-cases-patients-dying-due-to-oxygen-scarcity-high-court-says-vsk-98-2455307/ --------- काय बोलावं ते सुचेना .....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 02:10 नवीन
remdesivir : करोनाच्या गंभीर रुग्णांना देणार रेमडेसिवीर मोफत, यूपी सरकारचा निर्णय ..... यापूर्वी यूपी सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे.... https://maharashtratimes.com/india-news/yogi-adityanath-ordered-free-remdesivir-injection-for-coronavirus-patients/articleshow/82275522.cms ------------ महाराष्ट्र सरकार, घोळ घालत बसले आणि योगी निर्णय घेऊन मोकळे झाले...
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 04:37 नवीन
यूपी मध्ये ग्रामीण भागात केसेस वाढत आहेत, आणि रुग्णांना लोकली ऑक्सिजन मिळत नाही आहे. जिल्हा हॉस्पिटल्स मध्ये जावे लागत आहे, जिथे सुद्धा ( काही दिवसांमागेपर्यंत.) ऑक्सिजन तुटवडा होता. यूपी च्या प्रायव्हेट लॅब मधून होणाऱ्या टेस्ट ची संख्या केसेस वाढत असतानाही कमी होत होती. Et मध्ये १७ एप्रिलला स्टोरी आली की, लखनौच्या काही प्रायव्हेट टेस्ट लॅब्स आम्हाला टेस्ट करण्यापासून रोखण्यात आले असे म्हणत होत्या. स्टेट गव्हर्नमेंटने हे खरे नसल्याचं मांडलं आहे. लखनौमधल्या काही लॅब्स ट्रान्सपोर्टेशन वर ताण आल्यामुळे हा उशीर होत आहे असे म्हणाल्या. सरकारी टेस्ट सेंटर वर सुद्धा टेस्ट रिपोर्ट मिळण्यास काही दिवसांचा कालावधी लागतो, त्यामुळे हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन मिळत नसल्यास बाहेरून ऑक्सिजन मिळणे टेस्ट रिपोर्ट शिवाय खूप अडचणीचे आहे. ग्रामीण भागात इतका स्प्रेड पंचायत इलेक्शन मुले होत असावा असे वाटते. १३५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अलाहाबाद कोर्टाने इ.कमिशनला या बाबत फटकारले, आणि यापूर्वी अलाहाबाद कोर्टानेच इलेक्शन पुढे धकळण्यास नाकारले होते. हे असे कसे असा प्रश्न पडला होता, तो सुटला- कोर्टाने नाकारली ती जनहित याचिका होती, सरकारी संस्थांकडून प्रोटोकॉल आणि खबरदारी घेऊ असे म्हणून कोर्टाला आश्वस्त केले होते. त्यामुळे PIL नाकारली गेली. https://www.livelaw.in/news-updates/allahabad-high-court-refuses-to-postpone-up-panchayat-elections-due-to-covid-surge-172269 https://amp.scroll.in/article/993462/people-are-dropping-dead-like-flies-covid-19-turns-silent-killer-in-uttar-pradesh-villages https://economictimes.indiatimes.com/news/india/covid-19-testing-delays-a-big-issue-in-uttar-pradesh/articleshow/82108038.cms?from=mdr
  • Log in or register to post comments
य
यश राज Wed, 04/28/2021 - 05:32 नवीन
लोकसत्ताच्या खालील बातमीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटित झालेल्या निवडणुकीनंतर कोरोनाचे पेशेंट्स मध्ये दुपटी पेक्षा अधिक झाली आहे.. ७.६% कोरोना संसर्गाचा असलेला रेट आता थेट १४.९५% झाला आहे. https://www.loksatta.com/maharashtra-news/increase-in-corona-patients-after-elections-in-pandharpur-abn-97-2455449/ महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झालेला असताना पंढरपुरात एका साध्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या सभामध्ये कोरोनासाठी असलेले नियम धाब्यावर बसवले हे सर्वाँना ज्ञात असेलच . marathi.abplive.com/news/maharashtra/large-crowd-gather-in-at-ajit-pawar-rally-at-pandharpur-981333 मा.मुं नी पण घरात बसून लोकडाऊन लावताना पंढरपुरात नियम शिथिल केले होते व आता त्याचा परिणाम समोर आहेच. आता या घटनेने कुणाला जबाबदार ठरवायचे .. नाहीतरी आहेतच पेपर मधून हाग्रलेख लिहून केंद्राच्या नावाने शंख करणारे व त्यांचे मानसिक गुलाम.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 04/28/2021 - 07:01 नवीन
माझ्यामते करोनाच्या स्प्रेड ला lockdown वगैरे काहीही पेक्षा नवीन strain जास्त कारणीभूत आहे. या strain ची इन्फेक्शन करण्याची क्षमताच जास्त आहे मुळात.. त्यामुळे अधिक प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. आमच्या सोसायटीमध्ये घरात बसलेले पण लोक इंफेक्ट झाले अशी चर्चा आहे..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 08:00 नवीन
+१ लोक ऊगाचच लाखोंच्या रॅली काढणार्या बंगाली बाबाला दोष देतात. राष्ट्रहितासाठी रॅली काढणे किती गरजेचे आहे हे मुर्ख विरोधकांना काय कळणार :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 04/28/2021 - 08:04 नवीन
तुमच्या बुडाखाली पण तेच जळतंय, तेव्हा राजकारण सोडून या विषयावर काही चर्चा करायची असेल तर करूया. नाहीतरी काय, आहेच!!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 08:25 नवीन
ईतके गरम का होताय?? बरनोल लावा थंड वाटेल. :)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/28/2021 - 10:19 नवीन
बरनॉलची गरज नकली प्लॅस्टरवाल्या बंगाली बाईना आहे हो...प्लॅस्टरचे नाटक करता करता पाय भरून येत असेल :) राज्याची किती काळजी आहे त्यांना, म्हणूनच रोगराईची पर्वा न करता फिरत आहेत राज्यभर...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 10:25 नवीन
परमपूज्य राहुल गांधी, बंगाल मधून आल्या नंतर करोनाने आजारी पडले की आधीच आजारी होते?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 08:13 नवीन
हो, ट्रांसमिटीबिलिटी जास्त आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 04/28/2021 - 06:20 नवीन
मुंब्र्यात खाजगी रुग्णालयाला आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 04/28/2021 - 07:09 नवीन
दुर्दैवी घटना ... आरोग्य व्यवस्थेतेवर ताण वाढत आहे.. आणि सेफ्टी ऑडिट्स कडे दुर्लक्ष होते आहे .. हे टाळले पाहिजे
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 04/28/2021 - 08:00 नवीन
उत्तर प्रदेशात दोन आठवड्यांचा लॉक डाऊन लावावा ही सूचना अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. https://zeenews.india.com/india/impose-14-day-lockdown-in-uttar-pradesh-allahabad-high-court-2358048.html दुसर्‍या एका बातमीत तर असेही वाचले की न्यायालयाने सरकारला ही सूचना 'हात जोडून विनंती' या प्रकारची होती. https://www.timesnownews.com/india/article/with-folded-hands-we-request-you-allahabad-hc-again-urges-up-govt-to-impose-14-day-lockdown/750232 राज्यात कोरोनाची स्थिती भयंकर आहे वगैरे सगळे मुद्दे मान्य आहेत. पण माझा याबाबतीतला मुद्दा थोडा वेगळा आहे. कोरोनाची स्थिती सांभाळायला योग्य ती पावले उचला हा आदेश (सूचना नाही) न्यायालयाने सरकारला देणे समजू शकतो. पण लॉक डाऊनच लावा, दोन आठवड्यांचाच लावा असे न्यायालय म्हणत आहे याचा अर्थ दोन आठवड्यांचा लॉक डाऊन हाच योग्य मार्ग आहे असे न्यायालयाचे मत आहे असा होईल का? आता योग्य मार्ग कोणता हे ठरवायचे काम सरकारचे कारण दररोजचे प्रशासन चालवायचे कामही सरकारचेच असते. न्यायालयाने योग्य मार्ग कोणता हे सांगणे म्हणजे प्रशासनाच्या कामात अतिक्रमण झाले नाही का? त्याप्रमाणेच काल दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला झापले आणि म्हटले की तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा करणे जमत नसेल तर केंद्र सरकारला सांगू. म्हणजे परत एकदा- केंद्र सरकार (किंवा आणखी कोणतीही यंत्रणा) ऑक्सिजन पुरवठा दिल्ली सरकारपेक्षा व्यवस्थित करू शकेल असे दिल्ली उच्च न्यायालयाचे म्हणणे झाले. हे म्हणणे कितपत खरे आहे किंवा खोटे आहे याविषयी मला कोणतेही भाष्य करायचे नाही. पण प्रश्न हा की 'अ' पेक्षा 'ब' ही यंत्रणा अधिक चांगली परिस्थिती हाताळू शकेल हे न्यायालयाने कोणत्या आधारावर म्हटले असावे? तसेच कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला उपाय म्हणजे दोन आठवड्यांचा लॉक डाऊन हे तरी न्यायालयाने कोणत्या आधारावर म्हटले असावे? सध्याची परिस्थिती आणीबाणीची आहे आणि आदेश न देता सूचना केल्या आहेत म्हणून या दोन गोष्टी समजा सोडून देऊ. पण इतक्या आणीबाणीची परिस्थिती नसतानाही न्यायालयाने पूर्वी असे काही आदेश (सूचना नव्हे) दिले आहेत. दिल्ली आणि परिसरात प्रदूषणाची स्थिती खूप वाईट आहे याविषयी कसलेही दुमत नसावे. वाहन उद्योगात सरकारने भारत स्टॅन्डर्ड-४ ची अंमलबजावणी २०२० पासून सुरू करायचे आदेश पूर्वी दिले होते. म्हणजे भारत स्टॅन्डर्ड-४ च्या प्रदूषणविषयक तरतूदी पूर्ण न करणार्‍या वाहनांची नोंदणी १ एप्रिल २०२० पासून करता येणार नाही अशा स्वरूपाचे ते आदेश होते. न्यायालयाने दिल्ली आणि आजूबाजूच्या एन.सी.टी परिसरात (गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबाद वगैरे) ही अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ पासूनच करायचे आदेश दिले. त्यातून झाले असे की वाहनकंपन्यांनी ही अंमलबजावणी २०२० पासून होणार असे गृहित धरून आपले नियोजन सुरू केले होते ते अचानक घाईने करावे लागले. बरं भारत स्टॅन्डर्ड-४ हे वाहनातून होणार्‍या प्रदूषणाविषयीच आहे. त्याव्यतिरिक्त होणार्‍या (आणि कदाचित अधिक जास्त होणार्‍या) प्रदूषणाविषयी काय? दिल्लीत एक ५० वर्षे जुना कोळशावर आधारीत वीज प्रकल्प होता. त्यातून भरमसाठ प्रदूषण व्हायचे. तो प्रकल्प बंद करायचा निर्णय (दिल्ली की केंद्र) सरकारने २०१९ मध्ये घेतला. दुसरे म्हणजे बी.एस-४ स्टॅन्डर्ड असे काही समजा नसतेच तर न्यायालयाने सरकारला प्रदूषण कमी करायला नक्की काय करावे असे सांगितले असते? तिसरे म्हणजे वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करावे या उद्देशाने बी.एस-४ स्टॅन्डर्ड सरकारने आणले. ते आणूनही प्रदूषण पाहिजे तितके कमी झाले नाही तर ती जबाबदारी कोणाची? कारण न्यायालयाने दिलेल्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी केली असे म्हणून हात वर करायचा मार्ग सरकारकडे कधीही मोकळा राहतोच. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की सरकारने अमुक एक परिणाम साध्य करण्यासाठी (कोरोना नियंत्रणात आणणे/ प्रदूषण कमी करणे) जे काही करायला लागेल ते करावे हे आदेश न्यायालयाने देणे समजू शकतो. पण तो परिणाम साध्य करण्यासाठी अमुक एकच गोष्ट करावी (लॉक डाऊन लावावा किंवा बी.एस-४ ही अंमलबजावणी लवकर करा) हे न्यायालय कसे सांगते ही गोष्ट अजूनपर्यंत समजलेली नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/28/2021 - 08:03 नवीन
माजी खासदार व वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 08:10 नवीन
उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर पोस्ट केल्याबद्दल पहिली केस रजिस्टर. शशांक यादव नावाच्या मुलाने आजोबांसाठी ऑक्सिजन पाहिजे असे ट्विट केले, ते द वायर च्या पत्रकारांनी स्मृती इराणी यांना कळवले, कारण मुलगा अमेठीचा होता, स्मृती इराणींनी दखल घेऊन प्रयत्न केले. पुढे समजले, कि हे आजोबा रात्री हार्ट अटॅक येऊन गेले. अमेठी पोलिसांनी "आजोबांना कोव्हिड झाला नव्हता आणि डॉक्टरांनी ऑक्सिजन प्रिस्क्राईब केला नव्हता" या कारणासाठी शशांक यादव वर केस केली. https://www.google.com/amp/s/m.thewire.in/article/government/amethi-up-police-arfa-khanum-sherwani-oxygen-smriti-irani/amp
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 09:22 नवीन
सत्य समोर यायलाच हवे ...
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 04/28/2021 - 10:17 नवीन
असहमत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 10:29 नवीन
कोर्टात केस टाकायला नको होती का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा