चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल.
युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली.
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे.
पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी.
अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या.
...
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
पण तो पात्र नसतांना लस दिल्या गेली.आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. आंतरजालावर त्या दुरच्या पाहुण्यांचे आपल्या सोबतचे सर्व फोटो व्हायरल झालेले आहेत. -- लस देताना तो पात्र आहे की नाही हे तपासायची जबाबदारी कोणाची होती, फडणवीसांची की लस देणार्या कर्मचार्यांची ? की मोदींची ?दुसरीकडे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे. (बातमी )ही मुलाखत टाईम्स नाऊ यांनी घेतली होती व त्यांनीच या मुलाखतीतील माहिती खालील पानावर दिली आहे. अमित शहा असे म्हटल्याचे यात कोठेही लिहिलेले नाही. अमित शहांची खालील वाक्ये पहा. On some states' allegation of step-brotherly treatment amid COVID On this question, the HM said that this charge is nothing but 'plain politics'. "Remdisivir is being manufactured in both Maharashtra and Gujarat. We have given more Remdisivir injections to Maharashtra than Uttar Pradesh. I can understand their (Maharashtra) concern due to high cases but this kind of politics is not right," the BJP leader said. https://www.google.com/amp/s/www.timesnownews.com/amp/india/article/amit-shah-interview-with-navika-kumar-of-times-now-covid19-lockdown-kumbh-news-west-bengal-election/746620 प्राध्यापक डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेल्या बातमीचा दुवा सामनाचे मांंडलिक असलेल्या मटाचा आहे. भाजपविरूद्ध धडधडीत खोटे लिहिणे, भाजपविरोधात असलेल्या शिवसेना व इतर पक्षांची चाटुगिरी हेच मटामधून होत असते. मटा हे वृत्तपत्र नसून विकाऊ प्रकाशन आहे. या बातमीने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.