चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल.
युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली.
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे.
पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी.
अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या.
...
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
🗣 चर्चा
(266)
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 11:00
नवीन
सहमत आहे...
- Log in or register to post comments
स
सॅगी
गुरुवार, 04/15/2021 - 11:22
नवीन
गर्दी जमवणारे कोणतेही सण, समारंभ, उत्सव नकोतच.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 04/15/2021 - 11:42
नवीन
COVID ची साथ देशांमधून पूर्ण जात नाही तो पर्यंत केंद्र सरकार नी एक पण नवीन कायदा करू नये किंवा आहे ते कायदे बदलू नयेत. lockdown च फायदा घेवून जे नवीन कायदे केले आहेत ते सर्व रद्द करावेत.
कशाला कोण मोर्चा काढेल संसदेवर.
लोक हितविरोधी कायदे केंद्र करणार आणि लोकांनी विरोध करायचा नाही ही कोणती विचारधारा आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 13:42
नवीन
तुम्हाला कुठले कायदे अयोग्य वाटतात?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/16/2021 - 08:55
नवीन
शेतकरी कायद्याविरुद्ध निघणा-या शेतक-यांच्या संभाव्य मोर्चाला परवानगी अजिबात देऊ नये, असे माझेही मत आहे. पण आदर्श सर्वांची उभे करायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी जे वीना मास्क, लोकांना पैसे देऊन रॅलीत बोलावू जयजय करुन घेतला, रोड शो केले. (दुवा) आदरणीय पंतप्रधानांनी करोना काळात ज्या महासभा घेतल्या त्या जर घेतल्या नसत्या, तर देशासमोर एक आदर्श पायंडा पडला गेला असता. परंतु दोघेही सत्तेचे प्रचंड भुकेले आहेत, सत्ता लोभी आहेत. लोक मेले तरी चालतील, त्या मढ्यावरही आपलं साम्राज्य पसरलं पाहिजे, अशी जी ही भूमिका घेऊन फिरणारे सत्तालोभी काय आदर्श ठेवणार म्हणा....या अशा रॅलींवरही बंदी घालायला पाहिजे होती, किंवा प्रचार केला नसता तर दरदिवशी खराब होत असलेल्या प्रतिमा सुधारायला दोघांनाही थोडीफार मदत झाली असती असे वाटते.
दुसरीकडे, जगभर थैमान घालणा-या करोनाच्या संदर्भात. नॉर्वेमधे दहापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही, परंतु तेथील पंतप्रधानांनी आपल्या वाढदिवसाला कुटूंबीयांना बोलावले त्यात एकूण संख्या तेरा झाली, फक्त तीन लोक वाढले. परंतु त्यामुळे नियम मोडल्या गेला. कायद्यासमोर सर्व समान असतात म्हणून त्यांना तेथील पोलिसप्रमुखांनी दंड ठोठावला. (बातमी दुवा ) इतरवेळी सामान्य लोक असते तर कदाचित आम्ही असा दंड ठोठावला नसता परंतू प्रधानमंत्री एक जवाबदार व्यक्ती आहे, नियमांचे पालन करण्याची त्यांचीही जवाबदारी आहे, हा विश्वास लोकांमधे उभा राहावा म्हणून आम्ही असे केल्याचे त्यांनी म्हणाले.
आपल्याकडे असा विश्वास भरण्याच्या करोना काळात आपले पंतप्रधान अपयशी ठरले. गेल्या वर्षी महिनाभर झाला की 'बहनो और भाइयो' म्हणून लोकांना प्रवचन सॉरी प्रबोधन करणारे गुरुवर्य, सध्या टीव्हीवर येत नाहीत. पश्चिम बंगालमधील निवडणूकीचा कार्यक्रम आटोपला की काही तरी नव्या घोषणा करायला येतील, आपल्या महाराष्ट्रात त्यांचं लक्ष जावून आपल्या लशीचा पुरवठा बंद व्हायच्या आत आपण सर्वांनी लशीत्सोवात सहभागी होऊन लशी टोचून घ्याव्यात ही नम्र विनंती.
जाता जाता : कुंभमेळ्यात सहभागी निर्वाणी आखाड्याचे महामंड्लेश्वर कपिल देव यांचं करोनाने निधन झाल्याच्या बातमीबरोबर आज २१०० भाविकांना संसर्ग झाल्याची बातमी वाचनात आली. दुर्दैवी आहे हे सर्व... (बातमी दुवा)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 04/16/2021 - 09:04
नवीन
पंढरपूर, तामिळनाडू आणि केरळ मध्ये सुद्धा निवडणूक आहेत आणि तेथे पण प्रचाराचा धुरळा बराच उडाला आहे
पण त्यावर फुरोगामी लोक आक्षेप घेताना दिसत नाहीत.
ते गैरसोयीचे आहे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/16/2021 - 09:29
नवीन
सर्वच निवडणुकांवर, प्रचारांवर मग तो महाराष्ट्र असो की केरळ बंदीच हवी, पक्ष कोणताही असो आणि त्यांचा प्रमुख कोणीही असो. नीट जेलात नेऊन बसवले पाहिजेत.
>>>> पण त्यावर फुरोगामी लोक आक्षेप घेताना दिसत नाहीत.
सहमत, या पुरोगामी लोकांचा त्रास हल्ली फार वाढला आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Fri, 04/16/2021 - 16:25
नवीन
गृहमंत्री, पंतप्रधान यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे असे वाटते. ममता यांच्या आक्रस्ताळ्या शैलीला तेवढेच आक्रस्ताळ्या प्रचाराने उत्तर देण्यासाठी सरकारमधील नंबर एक आणि दोन कोरोना, गर्दी, आर्थिक परिस्थिती इ. कसलाही विचार न करता जात आहेत, हे आजिबात शोभादायक नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 04/16/2021 - 16:49
नवीन
.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
गुरुवार, 04/15/2021 - 07:31
नवीन
बिरुटे सरांशी सहमत, प्रत्येक राज्याने धार्मिक गर्दीला आवर घातलाच पाहिजे. कुंभ मेळ्याच्या गर्दीला आवर घालायला पाहिजे होता.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 04/15/2021 - 11:49
नवीन
वाह.. जबरदस्त परखड मत
https://www.facebook.com/watch/?v=504643614022782
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/16/2021 - 10:19
नवीन
+१
ह्या चांगल्या व्यक्तीला आता भक्तगण देशद्रोही ठरवतील.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/15/2021 - 14:01
नवीन
https://m.lokmat.com/politics/pandharur-assembly-election-bjp-leader-chandrakant-patil-slams-deputy-cm-ajit-pawar-a584/?fbclid=IwAR3277J0r_mlqqTo6y2uqL_DL_jHZlcqT3lKnHYRTVaM2ef-zuu3kLdDdu8
मला चंपा बोलणं बंद करा अन्यथा...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/16/2021 - 07:10
नवीन
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील चार फेर्यांमधील उरलेल्या मतदानाचे काय करायचे याविषयी चर्चा करायला निवडणुक आयोगाने आज म्हणजे १६ एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे मतदान एकत्र घेण्यात यावे ही मागणी केली आहे. तसे करता येणे कठीण आहे कारण जनप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ३० (ड) प्रमाणे अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवसापासून प्रत्यक्ष मतदानाचा दिवस यात कमीतकमी १४ दिवसांचा अवधी असणे गरजेचे असते. हा कायदा https://legislative.gov.in/sites/default/files/04_representation%20of%20the%20people%20act%2C%201951.pdf वरील पीडीएफ फाईलमध्ये बघता येईल. पुढच्या फेर्यांमधील मतदान एकत्र केले तर हा अवधी १४ दिवसांपेक्षा कमी राहिल त्यामुळे मतदानाच्या कायदेशीर वैधतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल.
दुसरा पर्याय म्हणजे मतदान लांबणीवर टाकणे. राजीव गांधींची हत्या झाली २१ मे १९९१ रोजी तर दहाव्या लोकसभेसाठी मतदान होणार होते २०, २३ आणि २६ मे रोजी. राजीव गांधींची हत्या होण्यापूर्वी मतदानाची एक फेरी झाली होती. पण ती हत्या झाल्यानंतरच्या परिस्थितीत दुखवटा लागल्याने(*) उरलेल्या दोन फेर्यांसाठीचे मतदान १२ आणि १५ जून रोजी घेण्यात आले. तेव्हा कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याने बंगालमधील मतदान पुढे ढकलणे हा पर्याय असू शकतो. पण पुढे ढकलून किती दिवस पुढे ढकलणार? मागच्या वर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात घेता ही परिस्थिती सावरायला काही महिने जाऊ शकतील. तसेच सध्याच्या बंगाल विधानसभेची मुदत २९ मे रोजी संपत आहे. तेव्हा तोपर्यंत मतदान आणि मतमोजणी पूर्ण करून नवी विधानसभा अस्तित्वात आली तर ठीक अन्यथा २९ मे या दिवशी विधानसभा आपोआप विसर्जित होईल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना राजीनामा द्यावा लागेल. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
तिसरा पर्याय म्हणजे मतदानाच्या तारखांमध्ये बदल करायचा नाही पण जाहीर प्रचारावर- सभा, मिरवणुका, रोड शो वगैरेंवर बंदी आणायची. आताच्या काळात प्रचार ऑनलाईन पण होऊ शकतोच त्यामुळे प्रत्यक्ष सभा घेऊन प्रचार केला नाही तरी काही बिघडणार नाही. पण जाहीर प्रचारावर बंदी घालायचा प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे राज्य (किंवा केंद्र?) सरकारकडून यावा लागेल. अशी प्रचारावर बंदी घालायचा अधिकार निवडणुक आयोगाकडे आहे का याविषयी साशंक आहे.
*: दुखवटा लागल्याने मतदान पुढे ढकलले गेले असेल तर नक्की कोणाच्या मृत्यूमुळे दुखवटा लागल्याने असे मतदान पुढे ढकलावे याविषयी नियम काय आहेत याची कल्पना नाही. हत्या झाली तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान नव्हते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या राजीव गांधी आणि मोरारजी देसाई हे त्यावेळी एकाच गटातील होते- माजी पंतप्रधान. मोरारजी देसाईंचे निधन १९९५ मध्ये झाले ते १९९१ मध्ये झाले असते (किंवा माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आणि निलम संजीव रेड्डींचे निधन अनुक्रमे १९९४ आणि १९९६ मध्ये झाले त्याऐवजी मे १९९१ मध्ये झाले असते) तर अशी निवडणुक पुढे गेली असती का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/16/2021 - 09:47
नवीन
City Bank भारत व इतर १२ देशातून व्यवसाय बंद करून भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात या बँकेच्या ३५ शाखा असून ४००० कर्मचारी आहेत. Retail banking, credit cards, wealth management हे या बॅंकेचे भारतातील प्रमुख व्यवसाय आहेत.
https://www.indiatoday.in/business/story/explained-why-citigroup-is-shutting-consumer-banking-operations-in-india-1791581-2021-04-16
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 04/16/2021 - 11:18
नवीन
सिटीबँकेने भारतातील त्यांचे फक्त रिटेल बँकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, जो त्यांना फायदेशीर नाही. भारताप्रमाणेच इतरही १२ देशांतील रिटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, असे बातमी म्हणते.
प्रायव्हेट बँकिग व इतर व्यवसाय ते सुरूच ठेवणार आहेत.
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
Fri, 04/16/2021 - 10:23
नवीन
गुरुजी बातमी देताना पुर्ण देत जा. काही वेळेला मिडीया नाही तर आपही अर्धवट बातमी देउन /पसरवुन उगाचच लोकांमध्ये घबराट निर्माण करत असतो.
त्या बातमीत पुढे असंही म्हंटलंय की
The group has said that its banking services in the country will not be affected in the country from the time being and added that no employees in India will be let go.
याने खातेधारकंना जरा तरी दिलासा मिळेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/16/2021 - 10:54
नवीन
For the time being म्हणजे सरकारी संस्थाकडून मान्यता मिळेपर्यंत.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 04/16/2021 - 11:41
नवीन
कदाचित अजून एखादे वर्ष तरी. माझे सिटीबँकेत खाते आहे आणि म्हणून मला हा वेळ चेक करायला हवा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 04/16/2021 - 13:18
नवीन
खासगी बँक आहे ती सावळा गोंधळ तिथे होणार नाही तुम्ही बँकेत नाही गेलात तरी तुमचे पैसे घरपोच सुरक्षित पोचवून च ते व्यवसाय बंद करतील.
रोजच्या घडामोडी ची माहिती पण देतील. मेल चेक करून बघा सर्व माहिती दिली असेल.शेवटी खासगी बँक आहे ती .निर्धास्त राहा
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Fri, 04/16/2021 - 13:31
नवीन
बरोबर आहे.
माझे खाते खाजगी बँकांत आहेत. तिथून मला माझ्या कामाचे मेल्स (आणि प्रोमोशनल मेल्स पण) येतात.
त्या खाजगी बँकांची सेवा तुलनेने चांगली आहे असा माझा अनुभव आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 04/16/2021 - 14:33
नवीन
अदर पुनावालांची जो बायडेन यांना हात जोडून विनंती
शेठला असल्या फालतू विषयांवर बोलायला वेळ नाहीये.
ते इलेक्शनमध्ये बिझी आहेत.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/16/2021 - 14:40
नवीन
लोकांच्या जिवापेक्शा बंगाल महत्वाचा आहे मित्रो...
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 04/16/2021 - 17:58
नवीन
ही १७ मार्चची बातमी आहे.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 04/16/2021 - 18:08
नवीन
इथेही ती बातमी दिली आहे.
ह्या बातमीत असे म्हटले आहे की अमेरिकेने ह्यासंदर्भात 'डिफेन्स अॅक्ट'खालील काही तरतूदी वापरून, लसी बनवण्यात वापरांत येणार्या काही अत्यावश्यक वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
अशा परिस्थितीत, भारत सरकारला, काही प्रदीर्घ वाटाघाटी कराव्या लागतील, असे दिसते. बहुधा, अमेरिकेच्या स्वतःच्या लसींच्या तरतूदी पूर्ण झाल्यानंतर ह्या वस्तूंवरील निर्बंध शिथल करण्यात यावेत, हा माझा अंदाज आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/16/2021 - 18:27
नवीन
असेल. पण आम्ही मोदींनाच दोष देणार. आम्हाला बाकी काही माहिती नसली तरी आम्ही मोदींनाच दोष देणार म्हणजे देणार.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 04/16/2021 - 18:37
नवीन
म्हणजे महिना भर प्रयत्न करून फाट्यावर मारले आहे का ??
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 04/17/2021 - 02:30
नवीन
कुणाचे ट्विट?
आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे गल्लीतले राजकारण नाही, तेव्हा ते धीम्या गतीनेच होत असते. दुसरे, सीरम इन्स्टिट्यूट्ला, भारताप्रमाणेच इतरही काही देशांना, त्यांच्या अॅस्ट्रो-झेनेकाशी असलेल्या करारानुसार, लसी ठराविक प्रमाणांत व मुदतीत देणे बंधनकारक आहे. तेव्हा ह्या वाटाघातीत, भारताप्रमाणेच WHO ही निगडीत असावी. किंबहुना, त्यांचेही संबंध त्यात गुंतलेले आहेत.
तसेच, आता अमेरिकेस निर्बंध उठवण्यास वेळ लागेल असे दिसल्यावर सरकारने बहुधा स्फुटनिकला तांतडीने मान्यता दिली असावी- हा माझा कयास आहे. आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची उत्पादनक्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 04/17/2021 - 04:53
नवीन
मोदीद्वेष्ट्यांना अजिबात माहिती आणि समज नसते. प्रत्येक मुद्द्यावरून मोदींना झोडपून स्वत:चे हसू करून घेणे एवढेच त्यांना जमते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/17/2021 - 10:47
नवीन
आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे गल्लीतले राजकारण नाही....
ऑ.... आदरणीय महा आदरणीय, पंतप्रधान यांनी पंचावन्न महिन्यात ९३ परदेश दौरे केले त्या परदेश दौ-याची काही फ़लनिष्पत्ती वगैरे काहीच नाही का ? काल अदर पुनावाल्यांनी बायडेनला कच्च्या मालाच्या निर्यातीच्या धोरणावर पुनश्च एकदा विचार करा असे म्हटले, मला वाटतं ही सरकारची स्वत:ची आयडीया असावी. अमेरिका कशी दुजाभाव करीत असून त्यांचं स्वरुप जगासमोर उघडे करायचा हा प्रयत्न असावा, एकदा अमेरिकेला जगासमोर नागडे केलं की मग जगावर सत्ता आपलीच. जसे की, परराष्ट्रीय धोरणाचं प्लॅनिंग करतांना आता आपल्याला मध्य-पूर्व आशियातील काही देशांशी धोरण ठरवितांना आपल्याला आता अमेरिकेचं दडपण असणार नाही. अशी काही तरी आंतरराष्ट्रीय माष्टर स्ट्रोक खेळी असावी असे वाटते. ;)
-दिलीप बिरुटे
(माष्टर स्ट्रोकच्या फॅन)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 04/17/2021 - 10:57
नवीन
काहीही हं सर ;)
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 04/17/2021 - 11:19
नवीन
भारताला प्रचंड बुध्दी मत्ता असलेले प्रधान मंत्री मिळाले आहेत.ते की खेळी खेळतील आणि बाकी देशांना चीत पट करतील ह्याचा अंदाज कोणालाच येणार नाही.
एवढे बुध्दी चे तेज अमेरिकन राष्ट्र अध्यक्षत थोडीच आहे .
भल्या भल्या त्यांची धोरण समजत नाहीत फक्त स्वामिनिष्ठ च धोरण कोणते ही असले तरी देशाच्या फायद्याचेच असणार असा विश्वास बाळगून असतात.
नतभ्रश्ट विरोधी लोकांचं नेहमी खोटं दिसत असते..
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Sat, 04/17/2021 - 12:56
नवीन
साहेब तुम्ही रजा घ्या आता.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 04/17/2021 - 15:01
नवीन
मोदीविरोधक गेल्या सात वर्षात इतक्या वेळेला उघडे पडले आहेत तरी ते परत परत अज्ञानमूलक विधाने कशी करतात काय माहिती. पुराव्यानिशी मुळातला दावा खोडून काढल्यावर ही मंडळी गायब होणार आणि पुढच्या वेळी दुसरीकडे अशीच एखादी पुडी सोडणार. ती पुडी पण अशी खोडून काढली गेली की परत तिथून गायब होणार हा शिरस्ता गेली सात वर्षे अव्याहतपणे चालू आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sat, 04/17/2021 - 16:41
नवीन
तुम्ही जे असेल वगैरे म्हणतंय त्याचा विदा द्या आणि कुणाचे ट्विट हेच माहिती नसेल तर मूळ मुद्दा तुम्हाला कळला नाही किंवा माहिती नाही
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 04/17/2021 - 17:22
नवीन
कुठला विदा तुम्ही माझ्याकडे मागताय? मी दोन बातम्यांचे दुवे दिलेत ते पुरेसे नाहीत?
दुसरे, तुम्ही ट्विट्चा नुसताच उल्लेख केला आहे. मला अदर पूनावालाची ट्विट माहिती आहे. तुम्ही एक मोघम उल्लेख केला आहे "ट्विट आताच केले. म्हणजे महिना भर प्रयत्न करून फाट्यावर मारले आहे का ?" तो अदर पूनावालांच्या ट्विटचा आहे की त्यानंतर इतर कुणाच्या, हे स्पष्ट होत नाही. म्हणून विचारले होते,
मला मुद्दा कळला आहे, पण तुम्ही माझा प्रतिसाद समजवून घेत नाही आहात, किंवा तसे दर्शवता आहात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/16/2021 - 15:04
नवीन
https://m.lokmat.com/crime/pnb-scam-clear-way-nirav-modis-extradition-approved-uk-home-office-a594/
नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला इंग्लंडच्या गृहमंत्र्याने मान्यता दिल्याने आता त्याला लवकरच भारतात आणले जाऊ शकते. मार्च २०१९ पासून तो लंडनमधील तुरूंगात आहे.
नीरव मोदीचा मेव्हणा मेहुल चोक्सीने ऍंंटिग्वा बेटावर आश्रय घेतला असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत कायदेशीर व राजकीय लढाई लढत आहे. त्याने प्रचंड रक्कम देऊन त्या देशाचे नागरिकत्व विकत घेतले आहे. भारताच्या दबावामुळे नुकतेच चोक्सीचे नागरिकत्व ऍंंटिग्वाने रद्द केले आहे. परंतु या निर्णयाविरोधात तो न्यायालयात गेला आहे. भारत व ऍंंटिग्वा यांच्यात पदार्पणाचा करार नसल्याने त्याचे प्रत्यार्पण होणे अवघड आहे.
मल्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन जवळपास वर्ष होत आले. परंतु या प्रत्यार्पणाच्या मान्यतेची फाईल इंग्लंडच्या गृहमंत्र्याकडे अजून अडकली आहे. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण रखडले आहे.
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 04/16/2021 - 16:23
नवीन
कोणतंही बेकायदा काम हे कसलाही मुलाहिजा न बाळगता केले जातात.
पण जेव्हा अशी कामं करणारी लोकं पकडल्या जाण्याच्या बेतात असतात, तेव्हा त्यांना कायदा आठवतो.
सगळे दुर्योधन हे धर्मराजाला धर्म पाळणे किती गरजेचे आणि योग्य आहे हे या न त्या मार्गानं पोहचवतात.
आणि स्वतः कसलाही मुलाहिजा न बाळगता, करणीला चुकत नाहीत.
थोडक्यात हे सगळे, कायदा वगैरेचा भरपूर फायदा उठवतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी वाट्टेल तसा वापरून घेतात.
अशा दुर्योधनांसाठी काय उपाय होऊ शकतो?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 04/16/2021 - 16:56
नवीन
आताच आज तक वर न्यूज वाचली बिहार सरकार corona नी मरणाऱ्या लोकांची संख्या लपवत आहे सरकार जे आकडे देत आहे त्याच्या तिप्पट लोक मरत आहेत.
पटना जी बिहार ची राजधानी आहे तिथे तीन च विद्युत दहिण्या आहेत.
इतकी वर्ष bjp तिथे सत्तेत सहभागी आहे तरी बेसिक सुविधा पण तिथे उपलब्ध नाहीत.
पटना railway station वर एक पण संडास ,मुतारी नाही.
यूपी सरकार नी corona ना नी मरणाऱ्या लोकांची संख्या लपवून ठेवण्यासाठी स्मशान भूमी भोवती उंच भिंत बांधली आहे.
गुजरात सुद्धा corona बाधित लोकांची संख्या आणि मृत्यू लपवत आहे.
गुजरात मध्ये पूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे..
असे हाल bjp शासित राज्याचे आहेत.
महाराष्ट्र सरकार नी covid सेंटर ची मालिका उभी केली आहे राज्यभर,जेवण आणि औषध फुकट आहेत .उध्दव ठाकरे नी लपवा लपवी केली नाही
जे आहे ते जगाला सांगितले
अशा मुख्यमंत्री असलेल्या नेत्यावर bjp वाल्यांन टीका करण्याचा बिलकुल अधिकार नाही.
कुंभ मेळा bjp शासित राज्यात झाला लाखो लोक जमा झाली .त्याचे किती तरी भीषण परिणाम होणार आहेत.
बंगाल मध्ये गर्दी जमवली त्याचे परिणाम बाधित लोकांची संख्या मध्ये वाढ होणार. आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 04/16/2021 - 16:58
नवीन
तिप्पट च्या जागेवर आठपट जास्त लोक मेली आहेत असे लिहायचे होते.चुकून तिप्पट lihle गेले.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/16/2021 - 17:36
नवीन
भाजप शासीत राज्यातील प्रचंड मृत्यूंची बातमी लपवली जात आहे. आजच्याच दैनिक भास्कर भोपाळ बातमी आहे. सरकारी आकडेवारी ४ मृत्यु सांगतेय प्रत्यक्शात ११२ मृत्यु झालेले. भरपूर प्रेत जळतानाचे फोटो फ्रंट पेजला आहे. लोकाना दिसू नये म्हणबन स्मशान भूमीला पत्रे ठोकले होते पण चतूर पत्रकारांनी ड्रोन कॅमेरा ने फोटो घेतले. ईतकं खोटं जनतेवर रेटनार्या भाजपशासीत राज्यांबद्दल कुणीही आजिबात बोलनार नाही. राज्याात भाजप सरकार असते तर अशीच आकडेवारी लपवली गेली असती. सुदैवाने पारदर्शक ठाकरे सरकार आहे. आता भाजपच्या खोटारडेपनावर किती लोक बोलतात पाहूयात.
- Log in or register to post comments
अ
अधर्म
Mon, 04/19/2021 - 13:21
नवीन
त्यो फोटो २०१९ मधला हाय रे भावड्या...बातम्या तरी खऱ्या खोट्या बघून वाचाव्यात
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 04/17/2021 - 01:40
नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/15-die-in-gondia-due-to-lack-of-oxygen-abn-97-2446692/
आता हा दोष कुणाचा?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 04/17/2021 - 01:52
नवीन
....... व्हेंटिलेटरचे केवळ ५ बेड शिल्लक!
https://www.loksatta.com/mumbai-news/bmc-shortage-of-oxygen-ventilator-beds-commissioner-iqbal-singh-chahal-pmw-88-2446521/
तुमचे कुटुंब, तुमची जबाबदारी आणि माझे कुटुंब, माझी जबाबदारी....
घरीच रहा, सुरक्षित रहा ... जनसंपर्क टाळणे, हा उत्तम उपाय आहे...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 04/17/2021 - 02:00
नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/those-who-criticize-shiv-bhojan-should-look-at-the-facts-says-chhagan-bhujbal/articleshow/82103910.cms
संचारबंदी असतांना इतकी माणसे, रस्त्यावर कशी काय? हा प्रश्र्न दुय्यम आहे ... महाराष्ट्र सरकार, भुकेल्यांची योग्य ती काळजी नक्कीच घेत आहे ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 04/17/2021 - 03:52
नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/patients-were-shifted-due-to-lack-of-oxygen-at-jamner-sub-district-hospital/articleshow/82104951.cms
परिस्थिति बिकट होत चालली आहे, असे वाटते ...
घरीच रहा सुरक्षित रहा...
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 04/17/2021 - 04:01
नवीन
ठाकरे सरकार नी निर्णय घेतला आहे की राज्याचा सल्लागार म्हणून PRO म्हणून फडणवीस ह्यांना नेमायचे आणि सर्व काविळ सेंटर,उपचार बंद करायची.फडणवीस ह्यांचे शिक्षण मोदी साहेबांच्या मार्गदर्शनात झाले आहे ते त्याचा उपयोग करतील.आणि चतुर प्रदेश, गुजरात,बिहार,mp इथे त्यांनी प्रॅक्टिकल केले आहे.
मृतांचे आकडे लपवून,बाधित लोकांचे आकडे लपवून कारोणा बाधित लोकांची संख्या कमी करण्याचा त्यांचा अभ्यास आणि प्रॅक्टिकल आहे
तोच gun वापरून राज्य corona विरहित करता येईल आणि फडणवीस च ते करतील असे ठाकरे सरकार la वाटतं आहे.
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Sat, 04/17/2021 - 04:40
नवीन
साहेब तुम्ही गरळ ओकणे बंद करा आता, बाकी राज्यांचं सोडा त्यांचं ते बघून घेतील, आपल्या ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे माहित आहे का तुम्हाला? माझ्या आजूबाजूच्या गावामध्ये ७ -८ लोकांचा मृत्यू उपचाराभावी झालय आता याला कोणी जबादार आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 04/17/2021 - 04:58
नवीन
https://indianexpress.com/article/india/direct-msp-transfers-punjab-farmers-7277139/
Dalip is one of the first three Punjab farmers to receive the payment of wheat MSP directly into his account. Pushed by the Centre, the state government has implemented the system of direct payment for the first time in the face of stiff opposition from the politically and financially powerful arhtiya associations.
नवीन कृषी कायद्यांमुळेच हा बदल झाला असावा का?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 04/17/2021 - 05:14
नवीन
असे घडले आहे असे बिन्धास्त समजा . खयाली पुलाव
आम्हाला तर हेच माहीत आहे कर्तृत्व वान केंद्र सरकार नी त्या कायद्यानं स्थगिती दिलेली आहे
प्रधान सेवकांनी तसे जाहीर केले होते.
अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे येणे म्हणजे लय मोठे जगावेगळे काही घडले आहे असे काही नाही..ही अतिशय किरकोळ बाब आहे. सफाई कर्मचाऱ्यांची रक्कम पगाराची पण अशीच जमा होते महारष्ट्र मध्ये वीस वर्षापासून .प्रधान सेवकांना ते नवीन वाटत असेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »