Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 02/19/2021 - 15:32
🗣 242 प्रतिसाद
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणी बंगलोरची तथाकथित चळवळी दिशा रवीची दिल्लीच्या कोर्टाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच थोडीफार प्रसिध्दी मिळाली म्हणून आपण वाटेल त्या विषयावर बोलायला मोकाट आहोत हा सोस अनेकांना आवरत नाही त्याचाच एक भाग म्हणजे ग्रेटा थनबर्गचे नवे वक्तव्य . आता ती नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्तव्य करत आहे आणि म्हणत आहे की अशा मोहिमांसाठी असा खर्च करायची काहीही गरज नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61342 views

🗣 चर्चा (242)
स
सुक्या Fri, 02/26/2021 - 19:01 नवीन
मला वाटते तो ग्लोबल फिनामिना होता. या आठवड्यात बहुतेक वेस्टर्न मार्केट खाली आली होती. पुढच्या आठवड्यात कळेल रेकवरी कशी होते ते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/26/2021 - 13:47 नवीन
निवडणुक आयोगाने चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पाँडेचेरी, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मतदान एकाच टप्प्यात ६ एप्रिलला होणार आहे. आसामात मतदान तीन टप्प्यात २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिलला होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदान आठ टप्प्यात २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल आणि २९ एप्रिल या दिवशी होणार आहे. सर्व ठिकाणी मतमोजणी रविवार २ मे रोजी होणार आहे. मतमोजणी रविवारी होणार असल्याने चांगले आहे. एक दिवस रजा काढावी लागणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/26/2021 - 14:51 नवीन
हे उत्तम
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 02/26/2021 - 15:11 नवीन
मतदानाचे दिवस पण सुट्टीचे दिवसच असावेत. मतदानाचे कर्तव्य बजावायला सुट्टी कशाला हवी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 02/26/2021 - 16:28 नवीन
ते काय असते.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 02/26/2021 - 17:05 नवीन
ह्या निवडणुका होईपर्यंत पेट्रोल ,डिझेल आणि गॅसचे दर कमी करू नये सरकारने. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले तरी सरकारने ठाम राहावे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 02/26/2021 - 17:10 नवीन
कशी चांगली,मागणी नुसार दर ठरले पाहिजेत. आणि काय काय शहाणपण शेतकऱ्यांना शिकवणारे पेट्रोल ,डिझेल च्या दरात सरकार नी जे नियंत्रण आणून वेडा बाजार चालवला आहे त्या बद्द्ल एक शब्द बोलत नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2021 - 05:06 नवीन
वर्तणूक मात्र उलट.... https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/a-woman-file-complaint-against-shivsena-leader-mp-sanjay-raut-in-bombay-high-court/articleshow/81238622.cms ज्या राजवटीत, स्त्रीयांचा आदर केला जात नाही, ती राजवट रसातळालाच जाते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 02/27/2021 - 07:23 नवीन
या प्रकाराचा किती पुरोगामी विचारवंत निषेध करतात हे बघायचे. पण संजय राऊत हे कायम भाजपविरोधी (पुरोगामी विचारवंतांच्या भाषेत बीजेपीविरोधी) भूमिका घेत असल्याने ते याविषयी शांत बसतील. त्यांच्यातील अन्यथा स्त्रियांचे हक्क, स्त्रियांचे प्रश्न वगैरे बोलणारे फेमिनिस्टही काही बोलायचे नाहीत. माझा एक आवडता सिध्दांत आहे. समजा सगळ्या विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकांमध्ये दाऊद इब्राहिमला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले तर हे सगळे विचारवंत लोक 'दाऊद इब्राहिम कित्ती कित्ती चांगला आहे' याचे गोडवे गायला लागतील.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2021 - 07:46 नवीन
कारण हीच घटना आधी पण घडली होती ..... संजय दत्तला बाळासाहेब ठाकरे यांनी माफ केले आणि सगळे वर्तमानपत्र वाले शांत झाले. मी घराणेशाही मानत नसल्याने, लगेच शिवसेनेला, जय महाराष्ट्र केला... मुळात शिवसेना स्थापन केलेले सगळे कुठल्या तरी कोपर्यात फेकले गेले, जोशी, पाटणकर, कोकाटे इत्यादि..... किंबहुना, शिवसेना स्थापन झाल्या पासून, मराठी माणसांच्या नौकर्या पण कमी झाल्या, गिरण्या बंद पडल्या, मुंबईतून मराठी माणूस, हळूहळू हद्दपार झाला. आज, शिवसेनेला, गुजराती माणसाला आणि मुस्लिम जनतेला जवळ करावे लागत आहे, ह्यातच सर्व काही आले. उद्या शिवसेनेने तामिळ, तेलगू, कानडी आणि केरळी भाषेत प्रचार केला तरी मला आश्र्चर्य वाटणार नाही.... शिवसेनेची सगळी दादागिरी, फक्त मराठी भाषिकांवरच."हटाव लुंगी और बजाव पुंगी", ही घोषणा जाऊन, "हम करेसो कायदा", हीच घोषणा आली आहे का? असा प्रश्र्न पडला आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2021 - 07:13 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/hindu-christian-girls-being-tricked-into-marriage-by-love-jihad-e-sreedharan-ahead-of-joining-bjp-scsg-91-2405000/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/27/2021 - 09:51 नवीन
88 वर्ष वय झाल्यावर आणि आता काहीच वर्ष शिल्लक असताना ह्या श्रीधरन ला आताच कसा साक्षात्कार झाला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2021 - 11:18 नवीन
श्रीधरन् तुमचे शाळासोबती आहेत का? मनमोहन सिंग वयाच्या ८९ व्या वर्षी राजस्थानमधून राज्यसभेत खासदार म्हणून गेलेत. मग श्रीधरन् यांनी का येऊ नये?
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 02/27/2021 - 11:52 नवीन
‘आधीच मर्कट त्यातही मद्य प्याला। झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला। झाली तया तदनंतर भूतबाधा। चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा।।’ दुर्लक्ष माडी बेको...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/27/2021 - 12:08 नवीन
कचरा टाकून झाला(विचारांचा)
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 02/27/2021 - 12:24 नवीन
श्रीधरन यांचा एकेरी उल्लेख मलाही आवडला नाही. असो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/27/2021 - 13:19 नवीन
उत्तम प्रशासक आहेत. मेट्रो रेल्वे,कोकण रेल्वे इत्यादी. कर्तृत्व मोठे आहे. पण त्यांना आताच bjp मध्ये जावं असे का वाटलं. Bjp ल त्यांचा वापर देश हितासाठी करायचा असता तर त्यांना योग्य ते मंत्री पद दिले असते.राज्य सभेत पाठवल असते. सक्रिय राजकारणात त्यांना उतरवून फक्त त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा वापर करायचा हाच हेतू आहे. Bjp ni आडवाणी,मुरली मनोहर जोशी ह्यांना वय झाले म्हणून सक्रिय राजकारणातून बाहेर केले. पण ह्या श्रीधरन ह्यांचे वय मुरली मनोहर जोशी पेक्षा जास्त आहे. कर्नाटक चे मुख्यमंत्री ८० वर्षाचे आहेत. आणि अडवाणी ना बाहेर आहेत. श्रीधरन ह्यांचा राजकीय पिंड नाही पण bjp मध्ये येताच राजकीय भाष्य करत असतील तर त्यांचा इतिहास विसरून त्यांच्या वर टीका होणारच.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 02/27/2021 - 13:38 नवीन
हा मुद्दा चांगला आहे. मलाही पटला. फक्त एकेरी उल्लेख नकोच. मा. मनमोहन सिन्ग यांचाही कुणी करु नये. राजकीय मतभेद वेगळे, अणि विद्वान व्यक्तिमत्व वेगळे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/27/2021 - 14:26 नवीन
विद्वान लोकांचा एकेरी उल्लेख नको. मला भावलेले सर्वात मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी निवडणूक आयुक्त T.N. शेषन. भारतात निवडणुकीचा पूर्ण चेहराच त्यांनी बदलून टाकला आणि शिस्त पूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी असावी ह्याचा धडा पण दिला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2021 - 11:49 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/sanjay-raut-slams-opposition-on-pooja-chavan-suicide-case-sanjay-rathod-resignation-pmw-88-2409874/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2021 - 13:03 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/had-chitra-wagh-not-joined-the-bjp-the-fadnavis-government-would-have-filed-the-case-then-sachin-sawant-msr-87-2409972/ चित्रा वाघ यांना पक्षांत घेणे ही भाजपची चूक आहे. स्वतःचे चारित्र्य उत्तम असेल तरच इतरांवर दोषारोप करणे योग्य. महाराष्ट्र भाजपात, मोठी उलथापालथ करणे, आता तरी भाग आहे. जिन के घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2021 - 17:00 नवीन
पूर्वीच लिहिले आहे. सत्ता न मिळाल्याने भाजप ठाकरेंना अडचणीत आणत आहे. संजय राऊत, प्रताप सरनाईक, धनंजय मुंडे, सुशांतसिंग राजपूत, संजय राठोड ही प्रकरणे भाजपने वापरली. शिवसेना चित्रा वाघच्या नवऱ्याचे जुने प्रकरण काढून उत्तर देतेय. जर ठाकरे अजूनही झुकले नाहीत, तर विधानसभा निवडणुकीनंतर थेट ठाकरे कुटुंबियांना लक्ष्य केले जाऊ शकते. काहीही करून, दडपण आणून, चौकशी मागे लावून हे सरकार घालवून आपले सरकार आणण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करतोय. जाता जाता . . . इतर मागासवर्गीय व ब्राह्मणांची कमी झालेली मते भरून काढण्यासाठी फडणवीसांनी इतर सर्व पक्षातून जमेल तेवढा कचरा उचलून भाजपत आणला. यापैकी कोणीही विश्वासार्ह नाही, त्यांची भाजपला फारशी मदत होणार नाही व ते भाजपला गोत्यात आणणार हे नक्की. पक्षातील जुन्या निष्ठावतांना संपवून बाहेरचा कचरा पक्षात आणण्याची शिक्षा भाजपला मिळायलाच हवी.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 02/27/2021 - 17:12 नवीन
मुक्तविहारी, चित्र किशोर वाघ या बाई दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमच्या कसल्याश्या कार्यक्रमांना हजेरी लावायच्या म्हणे. ऐकीव माहिती आहे. खखोदेजा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/27/2021 - 17:53 नवीन
ह्याचा अर्थ सर्वपक्षीय एकमत आहे.दाऊद पाकिस्तान मध्येच ठीक आहे भारता ला पाकिस्तान नी सोपवला तरी तो राज्यकर्त्यांना नको आहे. नको नको ते संबंध उघड व्हायचे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2021 - 13:36 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/bjp-mns-may-form-alliance-to-fight-nashik-municipal-election/articleshow/81239053.cms राज ठाकरे, यांचा काहीही भरवसा नाही. शरद पवार यांच्या बरोबर, राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे, सत्तेचे गाजर दिसताच, राज ठाकरे पण पलटी मारण्याची शक्यता आहे. शरद पवार, हे हळूहळू भाजपचा एक एक साथीदार कमी करत आहेत. पुढच्या निवडणूकीत, सगळे पत्ते शरद पवार यांच्या हातात असणार आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/27/2021 - 17:50 नवीन
राजकारणात प्यादी महत्वाची असतात पण राजकारणात एक गमत असते प्यादी कोण आहेत आणि कोणाची आहेत हे ओळखता येत नाही. आणि राजकारणात विचारधारा हा प्रकार फक्त बोलण्यासाठी असतो . Bjp ल मुफ्ती पण चालते. आणि ज्या पक्षांवर टीका करण्यात आयुष्य गेले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेनेला जवळचे वाटतात. फक्त सत्ता मिळवणे महत्वाचे. जनहित साठी सत्ता ध्या असे सर्वच पक्ष सांगत असतात पण जनहित पेक्षा स्व हित च ते बघत असतात. आपण सामान्य लोकांनी इतक्या आत मध्ये न जाता आपल्या रोजच्या समस्या जो व्यक्ती सोडवेल त्याला च मत द्यावे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 02/28/2021 - 04:36 नवीन
जानेवारी २०२१ मधील ताज्या आकडेवारीनुसार देशात बेरोजगारी विक्रमी उच्चांकावर आहे. त्याबद्दलचे विश्लेषणः https://youtu.be/8iaZFoRNABc
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/28/2021 - 04:58 नवीन
भंगारवाला, वडापाव विकणारा, खारे दाणे विकणारा, इत्यादी माझ्या दृष्टीने, बेरोजगारी हे एका अर्थाने, काही लोकांसाठी वरदान आहे..... काही लोकांसाठी ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/28/2021 - 05:05 नवीन
अभियांत्रिकी शाखेतील पदवी धारक, उच्च शिक्षित तरुण ह्यांनी खरे तर भज्जी विकली पाहिजेत . त्या मध्येच त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/28/2021 - 05:01 नवीन
बंगाल मध्ये परत ममता दीदी च सत्तेवर येणार,केरळ मध्ये bjp ल भोपळा पण फोडता येणार नाही. किंवा दोन तीन च जागा मिळतील असे अंदाज आहेत. पेट्रोल दर वाढ,शेती विषयक कायदे ,बँकांचे चे खासगीकरण ह्याचा प्रभाव मतदार वर नक्की असणार आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/28/2021 - 05:08 नवीन
https://www.loksatta.com/manoranjan-news/karbhari-layabhari-actress-ganga-was-attacked-some-people-at-bus-stop-mumbai-avb-95-2409933/ दोन साधूंची हत्या झाली सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली अभिनेत्याने आत्महत्या केली सोलापूर बलात्कार केस आहेच आणि आता तर, ट्रान्सजेंडर पण सुरक्षित नाहीत .....
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 02/28/2021 - 05:25 नवीन
मु.वि. जी मग तुम्हाला उत्तर प्रदेशात स्थायिक झाल पाहीजे. सर्वात सुरक्षितता तुम्हाला तिथेच मिळेल. तुमच्या पक्षाच सरकार तर तेथे आहेच.(क्रु. ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/28/2021 - 05:54 नवीन
योग्य सल्ला. भारता मधील सर्वात सुरक्षित राज्य म्हणजे योगीचे उत्तर प्रदेश. लोकांना एवढे स्वतंत्र आहे की पोलिस वर सुद्धा गोळीबार करून त्यांना मारण्याचे तिथे स्वतंत्र आहे. तिथे बलात्कार,खून,चोऱ्या,दरोडे असले किरकोळ खूने होतच नाहीत. राम राज्य च म्हणा ना
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sun, 02/28/2021 - 07:19 नवीन
तिथे पोलिसांनाही स्वातंत्र्य आहे बहुदा...गुन्हेगारांच्या गाड्या उलटवुन त्यांना मारण्याचे... आमच्या कडचे गुन्हेगार तर तुरुंगातुन सुटल्यावर लगेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून मिरवणुका काढुन टोल न भरताच निघुन जातात म्हणे. आमच्या कडे "अजब तुझे सरकार" असल्याने असे होत असावे बहुदा.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sun, 02/28/2021 - 07:24 नवीन
आमच्याकडे तर रात्री १२ वाजता तलवारीने केक कापुन, फटाके फोडुन बड्डे सेलिब्रेट करण्याचे, कोयते/तलवारी नाचवत दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या गाड्या तोडायचेही स्वातंत्र्य आहे. आमचे अजब सरकार तोडीस तोड आहे म्हणायचे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/28/2021 - 05:11 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/billions-of-rupees-earned-from-broadcasting-dirty-obscene-videos-alkp-94-2410182/ ह्या राजवटीत कुणीही सुरक्षित नाही....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/28/2021 - 06:53 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/jaish-ul-hind-claims-responsibility-of-placing-explosive-says-big-picture-yet-to-come/articleshow/81253931.cms उद्योगपतीच ज्या राज्यात सुरक्षित नाहीत, तिथे सामान्य माणसांचा काय पाड लागणार?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/28/2021 - 09:29 नवीन
https://www.hindustantimes.com/elections/abpcvoter-opinion-poll-predicts-edge-for-tmc-in-west-bengal-101614493605017-amp.html एबीपी-सीव्होवटर मतदानपूर्व मतदार सर्वैक्षणाचे अंदाज - बंगाल (२९४): तृणमूल १४८-१६४, भाजप ९२-१०८ आसाम (१२६): भाजप ६८-७६, कॉंग्रेस ५३-५१ पॉंडीचेरी (३०): रालोआ १७-२१, कॉंग्रेस १२ केरळ (१४०): डावी आघाडी ८३-९१, कॉंग्रेस आघाडी ४७-५५ तामिळनाडू: द्रमुक १५४-१६२ अद्रमुक ५८-६६ तामिळनाडू व पॉंडीचेरीत सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 02/28/2021 - 19:59 नवीन
बयान के अनुसार, ‘‘रेलवे सूचित करना चाहता है कि यात्री और कम दूरी की अन्य ट्रेनों के किराए में यह बढ़ोत्तरी लोगों को अनावश्यक यात्राएं करने से रोकने के लिए किया गया है।’’
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/01/2021 - 03:13 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/400-crore-for-balasaheb-thackeray-memorial-abn-97-2410611/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/01/2021 - 03:32 नवीन
वडिलांच्या स्मारकासाठी स्वतःच्या खिशातून दमडी सुद्धा न देता जागतिक वारसा असलेले महापौर निवासस्थान बळकावले. त्यावरील ७-८ कोटी रूपयांचे हस्तांतरण शुल्क माफ करून घेतले. आता सरकारचे (म्हणजे जनतेचे) ४०० कोटी वापरून वडिलांचे स्मारक बांधणार. बोला आवाज कोणाचा . . . !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/01/2021 - 03:41 नवीन
राम मंदिराला देणगी देतांना हात आखडला.... शेतकरी वर्गाला, बांधावर जाऊन 25-30 हजार देतांना, हात आखडला...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा