चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणी बंगलोरची तथाकथित चळवळी दिशा रवीची दिल्लीच्या कोर्टाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच थोडीफार प्रसिध्दी मिळाली म्हणून आपण वाटेल त्या विषयावर बोलायला मोकाट आहोत हा सोस अनेकांना आवरत नाही त्याचाच एक भाग म्हणजे ग्रेटा थनबर्गचे नवे वक्तव्य . आता ती नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्तव्य करत आहे आणि म्हणत आहे की अशा मोहिमांसाठी असा खर्च करायची काहीही गरज नाही.
🗣 चर्चा
(242)
म
मुक्त विहारि
Sun, 02/21/2021 - 13:38
नवीन
कंगनाला, भाजप आवडते.....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/22/2021 - 04:00
नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/shivsena-saamana-editorial-on-petrol-diesel-price-cental-government-sgy-87-2405483/
राम मंदिरासाठी देणगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोळा करत आहे.ह्यात केंद्र सरकारचा, काहीही संबंध नाही.
- Log in or register to post comments
स
सुक्या
Mon, 02/22/2021 - 04:20
नवीन
सामना सारख्या टिनपाट पेपर चे संपादकियाला ईतर वॄत्तपत्रे इतके महत्व का देतात हे मला अजुन समजले नाही. सामना हे वॄत्तपत्र म्हणन्याच्या लायकीचे नाही हे माझे १० वर्षापासुन चे मत आहे. शिवराळ भाषा आणी फुकाच्या गम़ज्या सोडुन काहीही नसते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/22/2021 - 04:46
नवीन
मी पण होतो ....
सामना मध्ये, आधी संजय दत्तला दोषी ठरवले आणि नंतर माफ केले ...
मी केलेली चूक, इतरांनी करू नये, इतकीच माफक अपेक्षा...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/22/2021 - 04:57
नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cm-uddhav-thackeray-live-updates-interactive-with-people-of-maharashtra-through-facebook-live/articleshow/81136582.cms
आपल्या लोकांना फक्त फटक्यांची भाषा समजते.आधीच फटके दिले असते, तर ही वेळ आली नसती.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 02/22/2021 - 09:01
नवीन
पूर्वीच्या निकम्म्या सरकारांनी (त्यात बीजेपीचीही सरकारे आलीच) तेलाच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी करायचा अजिबात प्रयत्न केला नाही हे श्री मोदींचे म्हणणे अचूक आहे.
परंतु गेल्या साडेसहा वर्षांमध्ये मोदींच्या सरकारने आयात कमी करण्याऐवजी वाढवली आहे. शिवाय देशांतर्गत तेल व नैसर्गिक वायूचे साठे शोधण्याचे काम करणार्या ओएनजीसीसारख्या कंपन्यांची शिल्लकही उडवली आहे. असो.
सरकारच्या कामाचे मूल्यमापन करणे म्हणजेसुद्धा मोदीविद्वेष असतो असे इथल्या विद्वानांनी ठरवले असल्यास आगाऊ क्षमा मागतो.
https://youtu.be/r5BV-9YR74Q
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 02/22/2021 - 09:18
नवीन
मोदी महाराजांच्या मुक्ताफळांना काहीही अर्थ नाही. जपान सर्व तेल आयात करतो, दक्षिण कोरिया बहुतेक तेल आयात करतो. आयातीमुळे ह्या देशांच्या प्रगतीला अजून तरी काहीही प्रतिबंध झालेला नाही किंवा तेलाचे दर गगनाला भिडले आहेत असेही नाही.
आमच्या देशांत फुकट्या लोकांची संख्या जास्त असून शेतकरी, सरकारी बँका, नुकसानीत चालली bsnl, रेल्वे , एअर इंडिया, विजय सुपर स्कुटर, काम ना करता पगार घेणारे शिक्षक, ह्या सर्वांवर जी उधळपट्टी चालली आहे ते पैसे जनतेकडून वसूल नाही होणार तर कुठून होणार ?
अर्थांत ह्या घाणीत राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही पूर्ण पणे बरबटलेले आहेत आणि एकमेकांना दोष देणे म्हणजे उदय चोप्राने वरून धवन वर तुला ऍक्टिंग येत नाही असा आरोप करणे आहे.
> शिवाय देशांतर्गत तेल व नैसर्गिक वायूचे साठे शोधण्याचे काम करणार्या ओएनजीसीसारख्या कंपन्यांची शिल्लकही उडवली आहे
नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ?
मोदी महाराजानी आपल्या पहिल्या वर्षांत जर काही चांगले आर्थिक बदल केले असते तर एव्हाना भारत त्याची फळे चाखत बसला असता पण ह्यांच्या डोक्यांत उजेड इतक्या लवकर पडणार नाही. तरी कोळसा ह्या प्रकारांत त्यांनी बऱ्यापैकी सुधार केले आहेत त्यामुळे किमान भारताला कोळसा सध्या आयात करावा लागत नाही (म्हणे).
सर्व उद्योग धंद्यांचा पाया हा ऊर्जा असून त्यावर प्रचंड कर लावणे म्हणजे अर्थव्यवस्थेच्य पायाला कमजोर करण्यासारखे आहे. भारत गरीब राहण्याची जी असंख्य कारणे आहेत त्यातील हे एक महत्वाचे कारण. खाजगी पेट्रोल कंपनींना मुक्त पद्धतीने व्यापार करू देणे, त्यांना त्यांचे दर ठरवू देणे, सर्व राज्यांत एकच दर ठेवण्याऐवजी आणि फिक्स्ड नफा देण्याऐवजी वाट्टेल तो भाव आकारण्याची मुभा दिली असती तर एन्व्हाना देशांत लक्षावधी जास्त पेट्रोल पम्प असते आणि पेट्रोल वरील कर सुद्धा कदाचित कमी केला जाऊ शकला असता.
देशाचं भाग्य फुटलं आहे आणखीन काय !
- Log in or register to post comments
प
पिनाक
Mon, 02/22/2021 - 09:18
नवीन
इंधन आयात करणे थांबवणे म्हणजे अर्थव्यवस्थेला खीळ घालणे. जोपर्यंत पर्यायी गोष्टी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कुठलीही आयात थांबवणे घातक ठरले असते. पर्याय उपलब्ध व्हायला वेळ लागतो.
इथेनॉल वर चे प्रयत्न श्री. गडकरी करत आहेत, पण प्रचंड पाणी घातलेल्या उसापासून इंधन तयार करणे हे फारसे चांगले नाही.
दुसरा पर्याय अणू उर्जेचा. Kudankulm चा विरोध कोण करतंय आणि का ते सांगायची गरज नाही. विकी वरून:
The Church of South India and the National Council of Churches opposed the power plant and supported the protests against it.[47] Supporters of the power plant and the government have alleged that the protest against the power plant was instigated by churches and funded by foreign sources. The protestors dismissed the allegation of foreign funding, but said that seeking support from church was "natural" as many protestors were Christian localities living in the vicinity of the Reactor.[48]
शेवटचा पर्याय सोलर. आपली कॅपॅसिटी वाढतेय. 2022 पर्यंत 100 gw च उद्दिष्ट आहे.
https://www.hindustantimes.com/india-news/pm-modi-to-inaugurate-asia-s-largest-solar-power-plant-in-mp-today/story-yaBz5rj5TG78j6DJ3Y9siL.html
https://www.nsenergybusiness.com/features/largest-solar-power-plants-india/
असो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/22/2021 - 09:40
नवीन
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला सुद्धा शिवसेनेने विरोध केला. तेव्हा स्वखुर्चीहित देशहितापेक्षा वरचढ ठरल्याने फडणवीसांनी तो प्रकल्प गुंडाळून टाकला.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Mon, 02/22/2021 - 10:09
नवीन
माझ्या मते शिवसेनेला एवढी किंमत द्यायची काहीच गरज नव्हती. अर्थात जर त्या वेळी फडणवीसांचे आडाखे हे तात्पुरते बंद करून नंतर पूर्ण बहुमत आल्यावर पुन्हा सुरू करण्याचे असले तर नकळे. किंवा मग कदाचित फुकुशिमा मुळे हे सगळं थंडया बस्त्यात गेले असेल.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/22/2021 - 10:15
नवीन
तुम्ही च अती हुशार आणि जनता महामूर्ख हाच भक्त शिरोमणी चा agenda तुम्ही लोक वापरत आसल तर .
तर सत्तेत इथून पुढे bjp कधीच नसेल.
अजुन पण वेळ गेली नाही आत्मचिंतन करा.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Mon, 02/22/2021 - 10:21
नवीन
Admin साहेब, कृपया या id बद्दल माझी फॉर्मल complaint घ्यावी. हा id spamming करत आहे आणि पर्सनल अटॅक करतो आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/22/2021 - 10:28
नवीन
तुम्ही चुकीची माहिती पसरवत असाल तर विरोध होणारच.
इथे तुम्ही काही माझे पर्सनल विरोधक नाही आहात ..
वैचारिक विरोध क आहात.
मी शिव्या किंवा गलिच्छ भाषा तर वापरत नाही ना..
Admin ते समजून घेतील
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/22/2021 - 11:05
नवीन
शिवसेना पायाखालील चादर ओढेल या भीतिने फडणवीसांनी शिवसेनेची प्रत्येक मागणी मान्य केली (जैतापूर व नाणार प्रकल्प गुंडाळणे, जागतिक वारसा असलेले मुंबई महापौर निवासस्थान ठाकरे स्मारकासाठी देणे, त्यावरील हस्तांतरण शुल्काचे ७-८ कोटी रूपये माफ करणे, सोमय्यांना उमेदवारी नाकारणे, ४ वेळा जिंकलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेला देऊन टाकणे, मुंबई महापालिकेत पूर्ण रान मोकळे देणे, शिवसेनेची अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ सहन करणे, शिवसेना करीत असलेली प्रत्येक अडवणूक सहन करणे, शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत तब्बल १२४ जागा देणे इ.). शिवसेनेची मर्जी राखण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रहिताकडे व देशहिताकडे दुर्लक्ष केले. एवढे करूनही शेवटी हातात भोपळाच मिळाला.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Tue, 02/23/2021 - 02:20
नवीन
जैतापूरचं इतकं नाव घेत आहात तर तुम्हाला डॉ. मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रयत्नाने अमेरिकेसोबत केलेला अणुऊर्जा करारही माहित असेल अशी आशा.
आधीच्या सरकारांनी काहीच प्रयत्न केले नाहीत आणि मीच एकटा मोठा शहाणा असा अविर्भाव फक्त अर्धवट माणूसच घेऊ शकतो.
मोदींनी बर्याचदा पूर्वसुरींवर जबाबदारी ढकलून हात झाडायचे प्रयत्न केले आहेत.
बाकी फडणविसांचे म्हणाल, तर बहुमताने सत्ता हाती असतानाही विरोधकांना घाबरून काही करता येत नसेल तर काय उपयोग सत्तेचा?
नवी मुंबईतले खारफुटीचे जंगल तोडणे व आरेमध्ये कारशेड बनवणे हे उद्योग मात्र बरे धडाडीने जमत होते फडणविसांना!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/23/2021 - 03:30
नवीन
अभिनंदन! विषय कोणताही असला तरी त्याचा मोदींंशी येनकेनप्रकारेण बादरायण संबंध जोडून दुगाण्या झाडण्याचे तुमचे कौशल्य वादातीत आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/22/2021 - 09:46
नवीन
इंधन आयात थांबवणे ह्याचा अर्थ काय..
सरकारी कंपन्या bpcl,hpcl ह्यांची ताकत वाढवणे.
वाढवली का ह्या सरकार नी.
तुम्ही जेवढे फेकाल तेवढे जास्त गाळात rutal ते तर अतिशय
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 02/22/2021 - 09:22
नवीन
आता पर्यंत च्या भारताच्या इतिहासात जेवढी सरकार झाली ती आताच्या सरकार पेक्षा अनेक पट उच्च दर्जाची होती.
केंद्रीय सरकार मधील महत्वाच्या लोकांना एकाध्या विषयाची माहिती नसेल तर त्या विषयात ज्यांचा अभ्यास आहे त्यांची मतं ऐकुन घेतली जात असत.
मीच शहाणा ही वृत्ती नव्हती.
आताचे सरकार सर्वच क्षेत्रात पूर्ण अयशस्वी
झाले आहे ह्याचे कारण हुशार लोकांना च्या मताना फालतू समजणे आणि मीच शहाणा असा गैर समज करून घेणे.
हिंदू कार्ड वर भरवसा ठेवू नये ह्या सरकार नी
हिंदू आता पर्यंतच्या सर्व सरकार च्या काळात आर्थिक बाबतीत मजबुत होते आणि ह्या सरकार च्या काळात आर्थिक बाबतीत कमजोर झालेले आहेत
फक्त चार पाच हिंदू च फायद्यात आहेत
हिंदू च हे सरकार उलथून टाकतील निवडणुकीत.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 02/22/2021 - 14:48
नवीन
फक्त चार पाच हिंदू च फायद्यात आहेत
वा वा.. जगातल्या मोजक्या 4 हिंदूंमध्ये समावेश केल्याबद्दल मी आपले आभार मानतो.
पेढे खायला कधी येताय?
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 02/22/2021 - 09:59
नवीन
https://maharashtratimes.com/india-news/puducherry-chief-minister-submits-resignation-to-the-lieutenant-governor-after-losing-majority-in-the-assembly/amp_articleshow/81148295.cms
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/22/2021 - 12:25
नवीन
अडीच महिन्यात तेथे विधानसभा निवडणुक होणार आहे. त्यामुळे आता अत्यल्प फरक पडेल.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 02/22/2021 - 10:08
नवीन
https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-cases-increase-in-mumbai-therefore-bmc-administration-alert-for-prevent-coronavirus/amp_articleshow/81132588.cms
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 02/22/2021 - 12:18
नवीन
दादरा नगरहवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह मुंबईतील मरीन लाईन्समधील सी ग्रीन हॉटेलमध्ये सापडला आहे.
मोहन देलकर यांचा जन्म १९ डिसेंबर १९६२ रोजी झाला. ते १९८९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून, १९९१ आणि १९९६ मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून, १९९८ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून, १९९९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून, २००४ मध्ये स्वतःच्या भारतीय नवशक्ती या पक्षाचे उमेदवार म्हणून दादरा नगरहवेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण त्यांचा २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या नथुभाई पटेल यांनी पराभव केला. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवत भाजपच्या नथुभाई पटेल यांचाच पराभव केला.

- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 02/22/2021 - 14:19
नवीन
शिवसेना नेते अनंत तरे यांचे निधन झाले आहे. ते १९९३ ते १९९६ या तीन वर्षांच्या काळात ठाण्याचे महापौर होते.

- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/22/2021 - 14:53
नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-cm-uddhav-thackeray-raigad-water-coronavirus-lockdown-sgy-87-2405753/
अंतराळ विज्ञान हे केंद्रीय अखत्यारीत येते ....
रायगड हा महाराष्ट्र राज्यात येतो ....
महाराष्ट्र राज्यातील पाण्याची अडचण पण केंद्रानेच सोडवायची का?
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/23/2021 - 09:10
नवीन
गेले दोन आठवडे गायब असलेले मंत्री संजय राठोड यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी मंदिराच्या यात्रेत अवतीर्ण झाले आहेत. पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव गोवले गेल्यानंतर ते गायब झाले होते. त्यांनी सपत्निक देवीची पूजा पण केली. त्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांची हजारोंच्या संख्येने तोबा गर्दी जमली आहे. परवाच मुख्यमंत्र्यांनी राज्यात परत वाढत असलेल्या कोरोनाच्या आकड्यांमुळे असले कार्यक्रम राज्यात करायला बंदी घालण्याची घोषणा केली होती पण त्या घोषणेला केराची टोपली दाखवली जात आहे. विदर्भात आता कोरोना परत मोठ्या प्रमाणावर डोके काढत आहे, अमरावती विभागात अनेक ठिकाणी परत लॉक डाऊन लावला आहे असे असताना असला प्रकार आणि तो पण मंत्र्याकडूनच होणे धक्कादायक आहे.
सगळा प्रकार बघून खरोखरच संताप आला.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 02/25/2021 - 09:15
नवीन
पोहरादेवीला हजारोंची गर्दी झाली होती आणि त्यातील १९ जणांना कोरोनासंसर्ग झाला आहे असे उघडकीला आले आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/mahant-kabirdas-maharaj-and-19-people-of-pohardevi-tested-positive-of-covid-19/articleshow/81206178.cms हा प्रकार विदर्भाला आणि म्हणून महाराष्ट्राला आणि म्हणून देशाला भलताच महागात पडायची शक्यता आहे. परत लॉक डाऊन लावायला लागला तर त्याची जबाबदारी कोणाची?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 02/25/2021 - 10:25
नवीन
सरकार अॅक्शन काय घेणार हे मह्त्वाचे ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/23/2021 - 10:16
नवीन
काही दिवसांपूर्वी पंजाबमधील स्थानिक निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वत्र विजय मिळाला होता. अकाली दल, भाजप व आआपचा दारूण पराभव झाला होता. भाजपला पंजाबमध्ये तसे नगण्य स्थान आहे. अकालींशी युती असताना विधानसभेच्या ११७ पैकी ९४ जागा अकाली व फक्त २३ जागा भाजप लढायचे. लोकसभेच्या १३ पैकी ११ जागा अकाली व २ जागा भाजप लढायचे. अशा पक्षाला पंजाबमध्ये खूप कमी जागा मिळणे स्वाभाविक आहे. खरा पराभव अकाली दलाचाच होता. परंतु अकाली दलाचे नावही न घेता, शेतकरी कायद्यांमै भाजपचा दारूण पराभव झाला असे माध्यमांनी ठोकून दिले.
आज गुजरातमधील स्थानिक निवडणुकीचे निकाल येताहेत. आताची परिस्थिती अशी आहे.
GUJARAT MUNICIPAL ELECTION RESULTS 2021 SO FAR:
Ahmedabad: 80 BJP; 20 congress
Surat: 56 BJP; 8 Congress
Vadodara: 41 BJP; 7 Congress
Rajkot: 48 BJP; 0 Congress
Jamnagar: 28 BJP; 0 Congress
Bhavanagar: 32 BJP; 8 Congress
गुजराती जनतेने कृषी कायद्यांना प्रचंड पाठिंबा दिल्याचे स्पष्ट आहे.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Tue, 02/23/2021 - 16:33
नवीन
https://thepunjabpulse.com/alarming-rise-in-conversion-of-sikhs-to-christianity/
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Tue, 02/23/2021 - 10:40
नवीन
बैतूल, मध्य प्रदेशच्या कॉंग्रेस आमदार निलाय डागा याच्या कंपनीवर आयकर विभागाने धाड घालून साडेचारशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता आणि परकीय चलन उघड केले.
त्याची बातमी.
आता वरवर पाहता ही कंपनी सोयाबीन प्रक्रिया करत आहे, मग हे धंदे आंदोलन जीवी मंडळींशी संबंधित असतील का हे कळायला हवे.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 02/23/2021 - 10:42
नवीन
एक नातेवाईक भेटला जो शेती करतो. त्याची शेती जुन्नर तालुक्यात आहे.त्याला विचारले तू शेतकरी आहेस तर कृषी कायद्याबद्द्ल तुझे काय मत आहे.
तो म्हणाला की एका गोष्टीचे सरकारने निराकरण केले तर कायदा चांगला आहे. त्याचे म्हणणे असे की एखाद्या कंपनीबरोबर करार केला आणि मधेच अवकाळी पाऊस, गारपीट, पिकांवर रोग अशा नैसर्गिक आपत्ती आल्या, तर कंपन्या अंग काढून घेऊ शकतात. अशा परिस्थितित शेतकर्याला कुणी वाली रहाणार नाही. शेतकर्याचेच नुकसान होईल. त्याच्या नुकसानभरपाईची कायद्यात तरतूद केली तर शेतकर्यासाठी हा कायदा वरदान ठरेल असे त्याचे म्हणणे पडले.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Tue, 02/23/2021 - 11:12
नवीन
आपक्तालीन परीस्थिती मधे काय करायचे अशा क्लॉजेसचा अंतर्भाव करारात करता येउ शकेल ना ?
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 02/23/2021 - 12:34
नवीन
पण कायद्यात तशी तरतूद असेल तर कंपन्यांवर तसा क्लॉज टाकणे बंधनकारक होईल. कायदा नसेल तर ते कंपनीच्या हातात असेल तो क्लॉज टाकायचा की नाही.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/23/2021 - 12:42
नवीन
अशा प्रसंगी आपल्याकडे विकायला पीक नाही म्हणून शेतकर्यांनी अंग काढून घेतले तर समजू शकतो पण पीक विकत घेणार्या कंपन्या का अंग काढून घेतील?
- Log in or register to post comments
प
पिनाक
Tue, 02/23/2021 - 13:35
नवीन
1. Companies futures ट्रेड करतायत. समजा गव्हाचा सध्याचा दर 2000 रुपये प्रति क्विंटल आहे. कंपन्या शेतकऱ्याला म्हणू शकतात की मी 1950 रुपये ने घेईन. उद्या भाव 1600 ला गेले तरी 1950 आणि 2200 रुपये गेले तरी 1950. जर पीक असेल आणि ते योग्य क्वालिटी चे असेल (त्याचे मापन करून प्रतवारी ठरवली जाईल) तर कंपन्या घेणार. जर निकृष्ट प्रतीचे असेल तर एकतर घेतील कमी किमतीने किंवा घेणार नाहीत. ते agreement मध्ये लिहायला हवे. जर प्रतवारी बरोबर असेल आणि धान्य बरोबर असेल तर कंपन्या पण ट्रेड मधून बाहेर पडू शकत नाहीत, आणि शेतकरी ही. म्हणजे अगदी शेतकरी सुद्धा 2200 मिळत असतील तरी त्यांना 1950 ला विकावे लागेल. पण यात एक प्रकारचा insurance असेल म्हणून दर बदलला जाणार नाही.
2. दुसरा प्रकार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा. मी तुमचे शेत घेतो. तुम्हाला ठरावीक पैसे देईन. किंवा ठराविक धान्य देईन ते तुम्ही विका. काय हवं ते आधी कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहायचं.
3. तिसरा प्रकार म्हणजे no contract. शेतकरी बाहेर किंवा APMC मध्ये विकू शकतात.
आता हे सगळं पहाता नक्की काय changes expected आहेत? तुमच्या पिकावर रोग पडला (प्रकार 1 मध्ये) तर कंपन्या नक्कीच जबाबसरी घेणार नाहीत. प्रकार 2 मध्ये जबाबदारी घेतील. तेव्हा मला नक्की concern कळला नाही.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
गुरुवार, 02/25/2021 - 11:12
नवीन
तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काय हवं ते काँट्रयाक्ट मधे लिहायला शेतकरी तेव्ह्ढा जागरूक अथवा सुशिक्षित हवा. कंपनीने फक्त स्वतःच्या नुकसानीचा विचार न करता शेतकर्याच्या नुकसानीचा पण विचार करायला हवा आणि त्याप्रमाणे कलमे टाकावीत. कन्सर्न तोच आहे
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 02/26/2021 - 07:49
नवीन
हाच खरा कळीचा मुद्दा आहे. काही शहरी लोक हा प्रश्न नीट समजाउन न घेता , शेती आणि शहरी उद्द्योग यांची तुलना करतात आणि शेती विषयी असंवेदनशीलता व्यक्त करतात. मोठ्या उद्योगा मधे प्रत्येक विभागामधे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी काम करत असतात. (उदा: एमबीए, सीए, ईंजीनीअर्स वगैरे) . तेच लोक बाहेरच्या जगाशी संपर्कात असतात आणि स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करुन उद्योगाला लाभ होईल असेच व्यवहार करतात.
इथे एकाच शेतकर्याक्डुन उत्पादनापासुन विक्री पर्यंत सर्व काही व्यवस्थित पार पाडण्याची आपण कशी अपेक्षा करु शकतो
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 02/26/2021 - 08:01
नवीन
एक गोष्ट सांगा- समजा कंपन्यांनी काही शेतकर्यांना फसवले तर आताच्या काळात ही घटना लपून राहिल का? आठ दिवसात देशभर ती बातमी पोहोचेल आणि सगळ्यांना त्याविषयी कळेल. अशा परिस्थितीत इतर शेतकरी कंपन्यांबरोबर करार करायला पुढे येतील का? म्हणजे शेतकर्यांना न फसविण्यात कंपन्यांचे पण हितसंबंध आहेत असे वाटत नाही का? म्हणजे कंपन्यांना या उद्योगात राहायचे असेल तर शेतकर्यांना फसवू नये एवढे कळणार नाही? अर्थात कंपन्या धुतल्या तांदळाच्या आहेत असे अजिबात नाही पण डिमांड-सप्लाय मार्केटमध्ये हे स्वसुधारणा तंत्र असते त्यामुळे डांबरट लोकांना पण आपल्या स्वार्थासाठी का होईना मार्केटमध्ये सौजन्याने वागावे लागते याकडे पण दुर्लक्ष व्हायला नको इतकेच.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Fri, 02/26/2021 - 08:20
नवीन
सध्याच्या शेतकर्याच्या आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा विचार करता त्याला फसवणे खूप सोपे आहे. शेतकरी संघटित नसल्याने असल्या घटना माध्यमांपर्यंत पोहचणे कठीण आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 02/26/2021 - 09:30
नवीन
मग तुम्ही आहात ना त्यासाठी.
एखादी आघाडी करा स्थापन.
हाथरस मध्ये पोचले होते ना तुमचे नेटवर्क, मग इथे पण पोचेल!
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Fri, 02/26/2021 - 11:02
नवीन
असे काही घडू नये म्हणून तर आंदोलन चालू आहे .
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 02/26/2021 - 19:16
नवीन
कंपनी शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार कशासाठी करेल? ते तिचं काम नव्हे. तिचं काम आपल्या शेअर होल्डर्स साठी जास्तीत जास्त नफा कमावणे हे असतं. या ठिकाणी सरकारची भूमिका महत्त्वाची ठरते. सरकारने सगळी काँट्रॅक्टस standardized करायला हवीत (आता काय आहे कायद्यात कल्पना नाही). हे सगळं कोण करेल, सरकारी अजेंसी असेल की नाही माहिती नाही. पण कंपनी शेतकऱ्यांच्या फायद्याची जबाबदारी घेऊच शकणार नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 02/27/2021 - 01:03
नवीन
योग्य ते वातावरण आणि जागा निवडण्याचा
शेतकरी वर्ग, हमीभाव ठरवू शकतो...
उदाहरणार्थ, कोकणातील शेतकरी काजू Export करणार्या कंपनी बरोबर, 15-20 वर्षांचा करार करू शकतो.
कराराचा कालावधी मोठा असल्याने, नैसर्गिक आपत्ती आली तर, कंपनी शेतकरी वर्गाला, किमान नुकसान भरपाई देऊ शकते.
जसे, काही लोक भाड्याने शेती करतात, ते शेतकरी वर्गा बरोबर, वार्षिक करार करतात. नैसर्गिक आपत्ती आली तरी, ह्या पद्धतीने शेतकरी वर्गाला नुकसान होत नाही
इथे, भाड्याने शेती करणारा मालामाल होत जातो, तर शेतकरी उपाशीच राहतो.
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 02/27/2021 - 04:44
नवीन
> ण काय हवं ते काँट्रयाक्ट मधे लिहायला शेतकरी तेव्ह्ढा जागरूक अथवा सुशिक्षित हवा.
गरज नाही. कारण विविध कंपन्या जेंव्हा स्पर्धा करतात तेंव्हा काँट्रॅक्ट्स आपोआप शेतकऱ्याचं फायद्यांत जातात. (अर्थांत काँट्रॅक्तं फार्मिंग केलेच पाहिजीए असे नाही, शेतकऱ्याला आपला माल आता वाटेल तेंव्हा विकायचे स्वातंत्र्य आहे.).
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 02/27/2021 - 04:59
नवीन
शेतकरी हुषार असतो
नैसर्गिक आपत्ती आणि रूढी परंपरा, यामुळे झालेले आर्थिक नुकसान सहन करायची ताकद मात्र, फार कमी शेतकरी वर्गाकडे असते
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sat, 02/27/2021 - 05:10
नवीन
एक दोन मोठ्या कंपन्या आर्थिक ताकद वापरून स्पर्धा बाजूला सारून मक्तेदारी स्थापित करण्याची शक्यता अधिक आहे. सुरवातीला शेतकऱ्यांना आमिष दाखवून जाळ्यात ओढू शकतात. शेतकऱ्याची फसवणूक झाली तरी त्याच्याकडे कायदेशीर लढाई लढण्यासाठी वेळ, पैसा आणि योग्य सल्लागार बाबतीत तो कंपनीच्या तुलनेने कमीच पडणार.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Sat, 02/27/2021 - 09:22
नवीन
वर मराठी लेखक यांनी लिहिल्याप्रमाणे कंपन्यांकडे प्रोफेशनल स्टाफ असतो. शेतकरी त्यांना पुरून उरेल असे म्हणता येणार नाही.
सगळेच शेतकरी काही हुशार नसतात. बहुसंख्य आर्थिक दृष्ट्या पिचलेले, नाडलेलेचे असतात. त्यांना योग्य असा करारमदार करण्यासाठी प्रोफेशनल मदत कोण करणार?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/27/2021 - 10:43
नवीन
शेती कंत्राटावर देणे बंधनकारक नाही. हा एक नवीन पर्याय दिलेला आहे. ज्याला द्यायची आहे त्याने स्वतःच्या जबाबदारीवरच करार केला पाहिजे. नसेल जमत तर नका करार करू. त्याची सक्ती नाही. पण कोणालाच करार करण्याचा पर्यायच नको हा अट्टाहास का?
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 02/25/2021 - 12:33
नवीन
असा क्लॉज टाकला तर भारीच !
पण एकंदरीत शेतकर्यांचेच नुकसान. कारण कंपन्या काही असा क्लॉज मान्य करणार नाहीत !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »